● तुका मारूनी टाकला
नाही वैकुंठाला गेला,
तुका मारूनी टाकला ।
डाव्या हाताचा कलंक,
उजव्या हाताने झाकला ॥१॥
ऐसे बोलीले बयान,
आले नेण्यासी विमान ।
त्यात बैसुनिया तुका,
गेला निघुनी गुमानं ॥२॥
खरे काय? काय खोटे,
सत्य जाणूनी घेवावे ।
मीही सांगितले म्हणुनी,
नाही विश्वासी रहावे ॥३॥
गीतेवरी भाष्य ग्रंथ,
तुका लिही मंत्र गीता ।
त्याने भडकला तेंव्हा,
वेदाभिमान्यांचा माथा ॥४॥
वर्ण व्यवस्था तयाने,
सारी येईल धोक्यात ।
वेदा विरोधाचे ज्ञान,
कैसे भरले तुक्यात ॥५॥
रामेश्वर भटा सांगे,
सांगे मंबाजी चुगली ।
मन कर्मठांची मने,
तुका रोषाने फ़ुगली ॥६॥
रामेश्वराच्या दिवाणी,
न्याय मागूनी घेतला ।
तुकोबांचा ग्रंथ साठा,
इंद्रायणीत फ़ेकला ॥७॥
होते तुकाचे अभंग,
बहु लोकायच्या तोंडी ।
पुन्हा आले जनलोकी,
कैसी होणार गा कोंडी ॥८॥
रामेश्वर मंबाजीने,
मारियले तुकोबास ।
आणि सांगितले जगाला,
तुका गेला वैकुंठास ॥९॥
कवी -
निलेश फाले
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा