● मनाला उमंग आता
गणंग होता पिचून गेलो,
नसे मनाला उमंग आता ।।धृ।।
मदत मिळेना कुणी कडे,
वादळात ला मी पतंग आता ।।१।।
अमीर झाली उमेद माझी,
जहाल अभिमान पाळताना ।।२।।
घरात आहे जरी भुकेले,
नशीब माझे भणंग आता ।।३।।
जिवंत असता खुशीत गुणगान,
गायचे जे हजार वेळा ।।४।।
फितूर मेल्यावरी चघळती,
कितीक चर्चा खमंग आता ।।५।।
पुन्हा पुन्हा नाडती मला ही,
बघून मज फाटका जरी ते ।।६।।
धरू कशाला भिती कुणाची,
गरीब ना मी, दबंग आता ।।७।।
दिवस उगवला उजेड आला,
घरोघरी शिक्षणा मुळे अन ।।८।।
भिमामुळे जिंदगीत माझ्या,
मधूर उठती तरंग आता ।।९।।
कवी -
रमेश सरकाटे
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा