सोमवार, २ जानेवारी, २०१७

● सावित्रीच्या लेकीनो...

● सावित्रीच्या लेकीनो...

सावित्रीच्या लेकीनो,
डॉ. बाबासाहेबांचे स्फूर्ती स्थान राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी दीडशे वर्षापूर्वी पशुपेक्षा हीन जगणं वाट्याला आलेल्या स्त्रियांसाठी भारताच्या पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका व स्वतःची पत्नी सावित्रीमाई यांना घडविले नसते आणि डॉ. बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीला राज्यघटनेत शिक्षणासाठी निर्माण करून दिलेले समान अधिकार कदाचित मांडले नसते. तर आज ही मनुवादी, विषमतावादी पुरुष प्रधान लोकांचीच मक्तेदारी अर्थात पेशवाईचा कहर माजला असता हे नक्की.

सावित्रीमाई फुलेंनी राष्ट्रपिता ज्योतीबांना साथ देत स्त्रियांसाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि शिक्षण क्षेत्राला वेगळी दिशा देण्यासाठी क्रांतीज्योत पेटवली. स्त्रियांना त्यावेळी शिक्षण घेण्यासाठी मज्जाव केला जात असे. अशा कठीण प्रसंगी स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता त्यांनी स्त्रियांना जगण्यासाठी काळ्या कुट्ट अंधारात एक शिक्षणाचा दिवा लाऊन दिला. ज्योतीबांच्या सहकार्याने खांद्याला खांदा लाऊन स्वतः शिक्षण घेतले म्हणूनच त्याच आधारावर भारतातील स्त्रियांना भवितव्याचा आत्म सन्मानाने शिक्षणाचा मार्ग त्यांच्या समोर निर्माण केला .त्या काळात अर्थात पेशवे काळात काटेरी अंतरुणावर सुद्धा झोपण्याची मनाई अशी भयाण अवस्था, पायदळी तुडवणाऱ्या समाजाला जागे करण्याचे आणि ज्योतीबांच्या सानिध्यात राहून अनेक काट्यांनी भरलेली वाट सोपी करून शिक्षणाचे दालन उभे केले. म्हणूनच आज २०, २१ व्या शतकातील स्त्रिया विविध क्षेत्रात आघाडीवर पोहचलेल्या दिसतात. हे वादादित सत्य आहे .

आज कोणते ही क्षेत्रं असू द्यात, बँकिंग, कार्पोरेट, सरकारी, निमसरकारी, राजकारण क्रीडांगण, कोणी पायलट, मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध क्षेत्रात काम करताना आढळतात. याचे खंर श्रेय मात्र या महिलांनी सावित्रीमाईनाच द्यायला हवे असे मी म्हणेन. कारण क्रांतीसूर्य सावित्रीनी भारतीय स्त्रीला तिच्या सामर्थ्याची व अस्थित्वाची जाणीव जर करून दिली नसती. तर धगधगत्या चितेवर जिवंत स्त्रीचा देह जाळून टाकणाऱ्या मनुवादी विचारांना व पुरुष प्रधान संस्कृतीला वाट मोकळी झाली असती आणि मग स्त्री केवळ 'उपभोग' हा कायमचा कलंक त्यांच्यावर अबाधित राहिला असता.

आधुनिक युगात आपण स्त्रियांचा विचार केला तर पूर्वीची स्त्री व आधुनिक स्त्रीया मध्ये बरेच अंतर आहे. असे निदर्शनात येते. सार्वजनिक क्षेत्र, महाविध्यालयचा परिसर, ऑफिसचा परिसर, सध्या पश्चिमात्य पद्धतींचे क्वाल सेंटर, कार्पोरेट क्षेत्रं, चित्रपट क्षेत्रं घ्या या ठिकाणी काम करणाऱ्या काही स्त्रिया अतिशिक्षणाने म्हणा अथवा पश्चिमात्य पद्धतींचे भूत अंगात, डोक्यावर बसले म्हणून म्हणा, त्या स्वतःच अस्तित्व, भवितव्य सामाजिक बांधिलकी, आत्मीयता विसरताना दिसत आहेत. आई वडिलांनी दिलेले संस्कार, वागणूक बांधिलकी व भारतीय संस्कृती याचा आधुनिक काळात विसर पडला आहे. याची सतत जाणीव होताना दिसत आहे. हे आवर्जून सांगावेसे वाटते. त्यांचे आधुनिक राहणीमान वागणूक सूटसुटीत असायलाच हवे. त्याबद्दल वादच नाही. परंतु भारतीय संस्कृतीचा, समाजातील लोकांचा, आई वडिलांचा आदर्श स्वतः समोर ठेवूनच आधुनिक राहणीमान करायला हवे. ते कसे असावे, काय घालावे हे त्यांनीच ठरवायचे आहे. अन्यथा पश्चिमात्य संस्कृती अर्थात आधुनिकता फोफावाल्या शिवाय राहणार नाही. नाहीतर ती अधिकाधिक वाढतच आहे हे नाकारू शकत नाही. मात्र आधुनिकता वाढायला हवीच मात्र पारदर्शकता जपायला हवी. हे कसे बरं विसरून चालणार? म्हणूनच भारतीय संस्कृतीला जोपासणे व तिचा विचार करणे आजच्या काळाची गरज आहे.

आपण नेहमी सकाळी, संध्याकाळी पायपीट करायला जातो तेंव्हा आपल्या निदर्शनात येईल आजू बाजूला क्वाल सेंटर उभी आहेत. त्या गेटच्या आजू बाजूला, काही कार्पोरेट ऑफिसच्या जिन्या मध्ये, रेल्व स्थानकात, महाविध्यालय याच्या समोर पश्चिमात्य संस्कृती रूढी प्रमाणे धुम्रपान करताना आधुनिक महिला दिसतात. रात्रीच्या दुनियेतील बार संस्कृतीच्या आड काय होते हे न सांगितलेल बंर? बिचारे वाचमन, येणारी जाणारी वडील धारी मंडळी त्यांच्याकडे बघत मान खाली घालण्याची वेळ येते. या आधुनिकतेकडे मिशिकील हताश पाहणे केवळ उरते. हे सगळं चित्रण पाहून असे दिसते की, या भारत भूमीवर ज्या सावित्रीमाई फुल्यांनी शिक्षणाचे दार उघडून दिले त्या ठिकाणी वेगळेच चित्र पहावायस मिळते. सावित्रीमाई यांनी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून चालण्यासाठी आयुष्यात नवीन बदल घडविण्यासाठी मोठी पराकाष्ठा सोसली. त्यांना शिव्या शाप अचकट विचकट शेरे अगदी शेनगोले ही खावे लागले. तरी त्या विचलित झाल्या नाहीत. त्यांची कामा वरची निष्ठा कल्पने पलीकडची होती.असे उदाहरण समोर असताना आधुनिक देशात जे घडत होत आहे, किती अयोग्य आहे, या आधुनिक महिलांनी विचार करणे आवशक आहे. त्यामुळे समाजावर, आई वडिलांवर भारतीय संस्कृती वर वेगळे परिणाम होण्याची शक्यता आहे हे नाकारू शकतो का?

काही वर्षापूर्वी महिला सकाळी बाहेर पडायच्या संध्याकाळी घरी लवकर परतायच्या. हा त्यांचा दिनक्रम असायचा. आपणाला आठवत असेल फक्त रुग्णालयात काम करणाऱ्या आया, परिचारिका व डॉक्टर सोडल्या तर इतर क्षेत्रात रात्र पाळी नव्हतीच. आता मात्र आधुनिक पश्चिमात्य पद्धती सुरु झाली आहे. त्यामुळे आता ही "महिला" रात्री अपरात्री कुठे ही नवीन 'आधुनिकता' दिसायला लागली आहे. या पश्चिमात्य आधुनिकतेच्या नावाखाली भारतीय संस्काराचा, संस्कृतीचा बोजवारा होत चाललाय. काही महिला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतचा प्रपंच स्वतः बरोबर कुटुबातील लोकांची पोटाची खळगी भरावी म्हणून रात्र पाळ्या असणारी कामे करतात. हे मनाला पटण्यासारखे आहेच आणि त्यांचे कर्तव्य आहे .परंतु त्यांनी स्वतःच अस्तित्व टिकवून, संस्कृतीचा विचार करून आई वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला भवितव्याचा मार्ग शोधायला हवा व स्वत:ची उन्नती करायला हवी.

दूरदर्शन, वर्तमान पत्रामध्ये नेहमीच वाचायला मिळते. मुंबई, पुणे बंगलोर अशा मोठ्या शहरात रेव्ह पार्टीला उत आलेला दिसतो आहे. त्याच्यातूनच अमली पदार्थाचे सेवन होते. अर्थात आपल्याला रेव्ह पार्टीचा अर्थ आज ही कळलेला नाही. प्रतिष्टीत म्हणजे विधेचे माहेर घर आणि सावित्रीमाई यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्या भिडे वाड्यात, पुण्यात नुकतेच ओठावर मिसरूड फुटले मुल आणि नुकतीच वयाची १६ वर्ष झाली अशा मुली अर्थात तरुण तरुणी रेव्ह पार्टी मध्ये धुम्रपान, मद्यपान अश्लील चाले करताना अटक होते अशा वारवार बातम्या ऐकायला मिळतात. आणी मग शरमे पोटी स्वतःचा चेहरा ओढणीने झाकून घेतात आडोशाला उभ्या राहतात, कशासाठी? कशासाठी हे करतात? हे करण्याच्या आधी हा विचार का करू नये? याच्यातून आपले भवितव्य घडणार आहे का? उलट तुमचे आयुष्यात न भरून येणारे नुकसान होणार हे ठरलेल आहे. आई वडील एवढा खर्च करतात तुम्हास शिक्षण घेण्यासाठी भवितव्य घडविण्यासाठी मात्र त्याच्यावर तुंम्ही वरवंटा फिरवताय. या अशा वागण्यातून समाजाचा, आईवडिलांचा, नातेवाईकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदल होणार हे ठरलेलं आहे. ज्या आई वडिलांनी जन्म दिला. लहानाचे मोठे केले त्यांचा तरी विचार आपल्याला करायला हवा कि नको? आई वडिलांना समाजा पुढे उभे राहण्याची ताकत आधुनिकतेच्या मानसिकतेमुळे नष्ट होत चालले आहे. हेच मोठे दुखाचे ओझे आपल्या समोर उभे आहे. आज कुठे ही प्रावास करीत असाल तर त्या वाहनाच्या पाठीमांगे हमखास हे वाक्य आपल्या नजरेत येते 'मुलगी शिकली प्रगती झाली' या वाक्याचा आत्मीयतेने अगदी मनापासून विचार केला तरी ज्ञानज्योती सावितीमाईचे स्मरण झाल्या शिवाय राहणार नाही .

या आधुनिक काळा बरोबर सृष्टीत ही बदल होऊ लागलाय. आपण जेंव्हा पहाटे उठतो. त्याच वेळी कोकिळेचा सुमधुर कुहू कुहू आवाज कानी पडतो. केवढी प्रसन्न सकाळ वाटायची. मात्र हीच आधुनिक कोकिला आज कोठे ही कधीही कोणत्याही वेळेला ओरडताना दिसायला लागली आहे. किती बदल झाला आहे या सृष्टीत! व तसाच बदल आपल्या संस्कृतीत घडत चालला आहे. बघा आपण सृष्टीत बदल करू शकत नाही, पण संस्कृतीत नक्कीच घडवून आणू शकतो. याकरिता सावित्रीमाईंच्या आधुनिक मुलीनी पुढाकार घेणे आवशक आहे. संस्काराच्या मायेतून संस्कृती, समाज व आई वडिलांना बरोबर घेऊन जाण्यासाठी मुलीनो तुमचीच गरज आहे. तरच हे टिकवून राहील नाहीतर असे म्हणण्याची वेळ येईल,' मुलीचा जन्म म्हणजे आई बापाच्या गळ्यातील धोंड.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व शिक्षणाचे समान हक्क सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवानी दाखविलेल्या शिक्षणाच्या मार्गाने चालत आहोत, अजून ही आयुष्यात मेहनत, संघर्ष करून आत्म विश्वासाने जीवन उज्वल करण्यासाठी आपल्या चांगल्या विचारांची शिदोरी सोबतीला घेऊनच मार्ग काढायचा आहे व प्रकाशमय जीवन जगायचे आहे. बुद्धीचे सौंदर्य निर्माण करावयाचे आहे.

पहा...
सावित्री माईंच्या लेकीनो ,
देश आपलाच आहे, आई वडील आपलेच आहेत, समाज आपलाच आहे आधुनिक काळ आपल्यासाठीच आहे. याचा विचार करूनच भारतातील बुद्धिमय संस्कृती जोपासणे हे आपल्या हाती तर आहेच, मात्र त्याला साह्य विज्ञानवादी बुद्धाच्या बुद्धीजीवी संकल्पनेची साथ आचरणात आणली तर पौर्णिमेचा चंद्र अधिकच प्रजोलीत, तेजोमय दिसेल.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
"आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था"

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।

अभिवादक -
• यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक : दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया)

• राजेश सावंत (चेअरमन : आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था), (संचालक : दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया)

• सविता बावीसकर (सरचिटणीस : भारतीय बौद्ध महासभा, बदलापूर शाखा), (संचालक : दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया)

• तेजस हजारे (प्रतिनिधी : लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन, उस्मानाबाद), (संचालक : दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया)

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा