● दिसती माझी माय...
हंबरून वासराले,
चाटती जवा गाय ।
तवा मले तिच्या मंदी,
दिसती माझी माय ।।धृ।।
आया बाया सांगत,
व्हत्या व्हतो जवा तान्हा ।
दुस्काळात मायेच्या,
माजे आटला व्हता पान्हा ।।१।।
पिठा मंदी पानी,
टाकून पाजत जाय ।
तवा मले पिठा मंदी,
दिसती माझी माय ।।१।।
कन्या - काट्या येचायाला,
माय जाई रानी ।
पायात नसे वाहन,
तिच्या फिरे अनवानी ।।२।।
काट्या कुट्याला ही
तिचं नसे पाय ।
तवा मले काट्या मंदी
दिसती माझी माय ।।३।।
बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं ।
बास झालं शिक्षण,
आता घेऊ दे हाती काम ।।४।।
शिकुन श्यानं कुठं,
मोठ्ठा मास्तर हुनार हायं ।
तवा मले मास्तर मंदी,
दिसतो माझी माय ।।५।।
दारु पिऊन मायेले मारी,
जवा माझा बाप ।
थर थर कापे अन,
लागे तिले धाप ।।६।।
कसायाच्या दावनीला,
बांधली जशी गाय ।
तवा मले गायी मंदी,
दिसती माझी माय ।।७।।
बोलता बोलता एेकदा,
तिच्या डोळा आलं पानी ।
सांग म्हने राजा तुझी,
कवा दिसंल रानी ।।८।।
भरल्या डोल्यान कवा,
पाहील दुधा वरची साय ।
तवा मले सायी मंदी,
दिसती माझी माय ।।९।।
म्हनून म्हंतो आनंदानं,
भरावी तुझी वटी ।
पुना एेकदा जन्म,
घ्यावा तुजे पोटी ।।१०।।
तुझ्या चरनी ठेवून,
माया धरावं तुझं पाय ।
तवा मले पाया मंदी,
दिसती माझी माय ।।११।।
कवी -
स. ग. पाचपोळ
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.
सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.
◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy
◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy
◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा