● दि ग्रेट इंडियन - एक प्रखर देशभक्त
उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जनहितार्थ मार्गदर्शक माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कार्यव्य असले पाहिजे.
लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•
मनुष्य मात्रांच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्गाता, कोट्यावधी मानवाच्या जीवना मध्ये प्रकाश निर्माण करण्याचे काम डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करून असामान्य कर्तृत्व उभे केले अस्पृशांच्या आचार विचारा मध्ये अमूल्याग्र क्रांती केली. माणूस असूनही ज्याला माणसा प्रमाणे तर नाहीच पशू पेक्षा ही हिन जीवन जगत असलेल्या मनुष्य मात्रास समाजा मध्ये प्रतिष्टित करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले त्यासाठी बाबासाहेबांना अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागला त्याचा हा संघर्ष, लढा संबंध मानव जातीच्या उत्थनाचा स्वाभिमान आंदोलनच ठरले. अस्पृश्यांच्या मुक्तीसाठीचा हा प्रारंभीचा लढा अस्पृश्यां पुरताच मर्यादित राहिला नाही. समाज, राष्ट्र यांच्या परिस्थितीना या आंदोलनाने केव्हाच ओलांडल्या. संबंध मानवी जीवन, विश्व कल्याणाचा मुलभूत विचार असणारे हे आंदोलन विश्वव्याप्ती बनले. अस्पृश्य समाजात जन्मल्यामुळे अस्पृश्यतेचे दाहक अनुभवाचे चटके बाबासाहेबांना लहानपणी बसलेच नंतर शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनात त्या अनुभवानी पाट सोडली नाही म्हणून त्यांच्या चळवळीचा मुख्य केंद्र अस्पृश्य समाजाचा उद्धार हा असणे श्यवहार्य आणि सामाजिक ठरतो. जसाजशी आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. तसा बाबासाहेबांच्या चळवळीचे केंद्र समाज, देश, विश्व व एकून मानवजात राहिली म्हणूनच अस्पृश्यांच्या उद्धाराचे मुख्य ध्येय असले तरी त्यांनी समाज, देशहिताकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणार्धांत बाबासाहेबांनी समाज देश देशाची एकता व अखंडता, स्वातंत्र्य व समता याचाच विचार केला म्हणूनच बाबासाहेब प्रखर राष्टभक्त होते, राष्टवादी होते. आपल्या अस्पृश्य समाजामध्ये देखील तशीच राष्टभक्ती जोपासण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. म्हणून अण्णाभाऊ साठे सारखे साहित्यक बाबांची एका वाक्यात आठवण करून देतात ते असे -
"जग बदल घालूनी घाव ।
सांगून गेले मज भिमराव ।"
बाबासाहेबांच्या कर्तृत्वाच्या अनेक पैलूचा अभ्यास झालेला आहे. पण बाबासाहेबांचा राष्टवाद आणि त्यांचे देवप्रेम या विषयाला अद्यापही म्हणावा तसा न्याय मिळाला नाही. प्स्थापित इतिहासकार, विचारवंतानी जाणीव पूर्वक हा विषय सर्व व्यापक बनवला नाही उलट दुसरीकडे बाबासाहेबांच्या एखाद्या भूमिकेचा चुकीचा अर्थ काडून त्याचा मात्र प्रसार व प्रचार करण्यात येतो आहे. तसाच संदेश विद्यार्था पर्यत पसरवला जाऊन बाबासाहेबांनी देशाच्या स्वतंत्र्याबद्दल, देशभक्ती बद्दल फारसे काही झाले नसल्याचे विद्यार्थाना बिंबवले जाते. विशेषत काँग्रेसने तिच्या चळवळीत ज्यांनी भाग घेतला नार्ही, सहकार्य केले नाही त्या सर्वाना देश विरोधी आणि स्वातंत्र्य विरोधी ठरविले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यातून सुटले नाहीत म्हणूनच बाबासाहेबांची राष्टवादाची भावना त्यांचे देशप्रेम हा दृष्टिकोन सर्वव्याप्ती झाला नाही.
• बाबासाहेबांची राष्ट्रवादाची संकल्पना -
याकाळी काँग्रेस आणि तिच्याशी संलग्नीत असणाऱ्या संघटनांच्या नेत्याच्या राष्टवादाची संकल्पना आणि बाबासाहेबांचा राष्ट्रवाद ही संकल्पना यात फरक असल्याचे दिसून येते.
• स्वातंत्र्य कुणाचे -
बाबासाहेब देशाचे स्वातंत्र्य आणि जनतेचे स्वातंत्र्य अया दोन वेगळ्यच बाबी मानत. देश स्वातंत्र झाला म्हणजे देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळते. असा अर्थ नाही. देश स्वातंत्र्य होवून हि देशातील जनता जर गुलामगिरीत आणि मुठभर लोकांच्या शोषणास बळी पडत असेल, विकासाची संधी मिळत नसेल, तर अशा स्वातंत्र्यास बाबासाहेब स्वातंत्र्य मानत नसत. या संदर्भात बाबासाहेब अमेरिकेच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा संदर्भ देतात. ४ जुलै १७७६ ला अमेरिका ब्रिटिशांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. अमेरिकेस स्वातंत्र्य मिळाले पण तेथील निग्रोंना मात्र स्वातंत्र्य मिळाले नाही. त्याला त्यानंतर कित्येक वर्ष गुलामगिरीत जगावे लागले. अमेरितेच्या स्वातंत्र्या नंतर निग्रोंना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी संघर्ष करावा लागला. प्रदीर्घ संघर्षानंतर तेथे निग्रोंना अधिकार मिळाले, स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच देशातील सर्व सामान्य माणसास समतायुक्त आणि शोषण मुक्त जीवन जगता येत नाही त्यांस मानसिक, बौध्दिक, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोग नसतो. म्हणून स्वातंत्र्याचा असा उदात्त अर्थ बाबासाहेबांन अभिप्रेत होता आणि ब्रिटिश्यां विरुद्ध स्वातंत्र्याची मगणी करणारी काँग्रेस तर मुठभर लोकांचीच प्रतिनिधीत्व करते. आपल्या अनुयायांनी देखील त्यांनी स्वराज्य म्हणजे ते समजावून घ्यावे आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन केले होते.
• सायमन कमिशन व डाँ. बाबासाहेब आंबेडकर -
येथील जातीवादी आणि मनुवादी लोकांनी बाबासाहेबांच्या द्वेषापोटी त्यांच्या हिताच्या आणि विशिष्ट बाबींना समोर ठेवून स्वातंत्र्य चळवळी बाबत बाबासाहेबांनी भूमिका मात्र अंधारात ठेवली. इतिहासातील अनेक घटनांचे विकृतीकरण करुन आम्हाला तोच इतिहास येथे शिकविला जातो. हा वेगळा आणि स्वातंत्र्य विषय आहे. भारतीयांना द्यावयाच्या राजकीय हक्का संदर्भात भारतीय संघटना, नेते यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी १९२७ ला भारतात सायमन कमिशन पाठविले. या कमिशनावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. कारण असे सांगतात की, या कमिशनमध्ये सर्व सदस्य ब्रिटिश होते. पण बहिष्काराचे खरे कारण दुसरेच आहे. या दरम्यान भारतात विविध जातीधर्माच्या लोकांकडून आपापल्या समूहासाठी हित जोपासणाऱ्या मागण्या चालू होत्या आणि सायमन देखील त्यात अनूकुल होते त्यांच्या हिताच्या मागण्यांचा इंग्रजा कडून विचार होवू नये म्हणून काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला.
या कमिशनला बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले. इंग्रजांकडून अस्पृश्य समाजाची बाजू मांडणे महत्वाचे वाटत होते म्हणून बाबासाहेबांनी सायमनला साक्ष दिली, लेखी निवेदने दिली. त्या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी दुष्ट बुद्धिने घेतलेल्या निर्णयास विरोध केला. स्वातंत्र्य आंदोलनाची धार कमी करावी. हिंदू - मुस्लिमांत अंतर पडावा हिंदूना झोडपण्यासाठी मुस्लिमांचा उपयोग होईल अशा अनेक हेतूने सायमनने सिंध प्रांत निर्माण करण्याची शिफारस केली होती. जमातवादावर आधारित इंग्रजांच्या कारस्थानास बाबासाहेबांनी विरोध केला. भारतात जमातवाद आणि धार्मिक द्वेष वाढविण्याचा प्रयत्न इंग्रजांनी करु नये असे बाबासाहेबांनी सांगून निवेदना मध्ये स्पष्ट नमूद केले. येथील हिंदू - मुस्लिम किंवा सिंधी हे पण अगोदर हे सर्व भारतीय आहेत आणि नंतर ही भारतीय आहेत. त्यामुळे जमातवादी गट, जाणीव वाढेल असे काहीही प्रयत्न इंग्रजानी करु नये, असे बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर भूमिका घेतली.
• इंग्रजांवर प्रखर टिका -
डाँ. बाबासाहेब आंबेडकर सरकार नियुक्त अनेक समित्यांवर, गव्हर्नरच्या कार्यकरी मंडळात सदस्य असताना देखील त्यांनी इंग्रजांच्या अन्यायी, पक्षपाती आणि भारतीय जनतेच्या विकासास मारक ठरणाऱ्या धोरणावर जाहीर टिका केल्या, भूमिका घेतल्या. १९१९ च्या साऊथ बर समितीने जातवार प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले पण आवश्यक असलेल्या अस्पृश्यांना मात्र योग्य व प्रमाणशीर प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून हे प्रतिनिधित्व देण्याचे धोरण अनुदारपणाचे व बेअकलीपणाचे आहे, अशी प्रचंड टिका त्यांनी केली. सायमन कमिशन वेळी बाबासाहेब मुंबई कौन्सिलचे सदस्य होते आणि सायमनला सहकार्य करण्यासाठी नेमलेल्या समतीचे ही सदस्य होते तरी पण बाबासाहेबांनी इंग्रजां विरुद्ध भूमिका घेऊन त्यांच्यावर प्रखर टिका केली. बाबासाहेबांनी पी.एच.डी. (PH.D) आणि डी.एस.सी. (DS.C) साठी जे प्रबंध लिहले. त्या प्रबंधा मधून देखील इंग्रजांच्या शोषणामुळे भारतात दरिद्र कसे वाढत गेले आणि शोषण कसे होते याचे सादर विश्लेषण करुन इंग्रजांचे अंतरंग उघडे करून दाखविले. ब्रिटिश सत्ता भारतात खिर झाल्यापासून भारता मध्ये अनेकदा दुष्काळ पडला त्यात अनेक लोक भुकेने मेले या उपासमारीचे कारण इंग्रजांचे धोरण. कारण आहे. येथे उद्योग व्यापार याची वाढ होवू द्यायची नाही व भारतातील व्यापारी पेठ सदैव खुली रहावी असे इंग्रजांचे राज्य कारभार करण्याचे धोरण आहे, असे न्या रानडे, दादाभाई नौरोजी प्रमाणेच बाबासाहेबांनी ही स्पष्ट केले. याचाच सलोख अभ्यास करुन अण्णाभाऊ साठे जाहिरपणे सांगतात कि -
"ये आजादी जूठी है ।
देश कि जनता भूखी है ।"
भारतीयांच्या अधिकारासाठी इंग्रजां विरुद्ध कायदेशीर लढाई बाबासाहेबानी प्रयत्न केले. १९३० च्या सविनय कायदे भंगाच्या चळवळीचा एक भाग म्हणून ठिक ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आले. पनवेल जवळ चिरनेर मध्ये असाच जंगल सत्याग्रह चालू असताना पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब केला तेव्हा सत्याग्रही देखील आक्रमक बनले त्यामुळे हिंसक वळण लागले यात काही सरकारी कर्मचारी, एक मामलेदार ठार झाला. सरकारने अनेक सत्याग्रहींना अटक करून खटला दाखल केला. अटक सत्याग्रहींची बाबासाहेबांनी बाजू माडली. गोलमेज परिषदेसाठी सरकार कडून त्यांची नियुक्ती झाली होती तरी बाबासाहेब सरकारच्या विरोधात सत्याग्रहींच्या बाजूने उभे राहीले. सरकारच्या ध्येर्या पेक्षा जनतेचे न्याय्य हक्क आणि स्वातंत्र्य यांना जास्त प्राधान्य द्यावे अशी भूमिका घेवून बाबासाहेबांनी युक्तीवाद करुन सत्याग्रहींची मुक्तता केली.
• गोलमेज परिषदे मध्ये प्रखर राष्टवादाची प्रचिती -
डाँ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत 'मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीय आहे.' १२ नोव्हेबर १९३० पासून सुरू झालेल्या लंडन येथील गोलमेज परिषदेसाठी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर आणि डाँ. सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली. इंग्रजांच्या साम्राज्यात जाऊन त्यांच्या साम्राज्यवादा विरुद्ध बोलण्याचे साहस डाँ. बाबासाहेबांनीच दाखविले. या परिषदेत बाबासाहेबांनी भारतीयांना न्याय्य हक्क देण्यास आणि जबाबदार शासन पध्दती देण्यासाठी तयारी नसेल तर इंग्रजांनी भारत सोडून निघून जावे, असे स्पष्ट निर्भिडपणे इंग्रजांना सुनावणारे बाबासाहेब एकमेव प्रतिनिधी होते. ब्रिटिश राजवटी मध्ये अस्पृश्यांच्या स्थिती मध्ये कसली सुधारणा झाली नाही. त्यामुळे दलितांचा ब्रिटिशांनी विश्वासघात केला. अशा ब्रिटिशांनी भारतात लवकरात लवकर जबाबदार शासन पद्धती देण्याची मागणी गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी केली.
बाबासाहेब आपल्या संपूर्ण जीवना मध्ये राष्टनिष्ठेपासून ते कधीच ढळले नाहीत. देश्याच्याच ऐक्याला एकात्मतेला आणि अखंडतेला अस्मितेला धोका पोहचणार नाही, याची सदैव काळजी घेतली. जरी या देशातील लोकांनी, धर्माने, संस्कृतीने त्यांना व त्यांच्या समाजास अमानवी वागवणूक दिली. गुलामगिरीचीच व्यावस्था जोपासली त्या लोकांबद्दल आणि धर्माबद्दल त्याना राग असला तरी त्या समाजाचा आणि देशाचा सुड घेण्याचा विचार ही त्यांच्या मनाला स्पर्श केला नाही. मुस्लिम लीघ आणि बँरिस्टर जिना यांच्याशी संगनमत करुन बाबासाहेब पहिले प्रधानमंत्री होऊ शकले असते. फाळणी टाळण्यासाठी जिनांनी बाबासाहेबांना पंतप्रधान करत असल्यास पाकिस्तानची मागणी मागे घेण्याच प्रस्ताव काँग्रेसकडे ठेवला होता. बाबासाहेबांनी कधीच देशहितापेक्षा आपला स्वार्थ हित यास प्राधान्य दिले नाही. म्हणूनच बाबासाहेब अन्य कोणत्याही राष्टवाद्यापेक्षा अधिक प्रखर राष्टवादी होते. नंतर ते ८ मे १९५० ला स्वतंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. ते जाणत होते की आपला समाज अजून स्वतंत्र्य अनूभवत नाही. देशात कुठेना कुठे गैर प्रकार घडतोच त्याकरिता त्यानी राज्यघटना लिहली.
पण हि राज्यघटना २६ जानेवारी १९५० ला प्रजेच्या हिता करिता लागू करून अंमल बजावणी केली हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून लोकशाहीचे बिज रोवले आणि सर्वाना एक संदेश दिला कि संविधान किती ही चांगले असो पण ते चालवणारे लोक चांगले नसतील तर संविधान इतके सवोत्कृष्ट असून सुद्धा ते लोक इतरांचे कल्याण करु शकत नाहीत. आणि प्रजासत्ताक दिन संबधी समते विषयी प्रश्न उभे करून सांगितल की २६ जानेवारी १९५० ला आपण एक विसंगती युक्त जीवनात प्रवेश करणार आहेत, राजकारणात आपल्याकडे समता राहील; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमत्ता राहिल. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत.
अश्या परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळापर्यत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्या शिवाय राहणार नाही. हि विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्ट परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकिय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील. परत स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे? ते जबाबदारीचे सार हे पटवून देताना बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य ही आनंददायी चीज आहे परंतु स्वातंत्र्याने आपणावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नये.
आणखी ते म्हणतात कि आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची व बंधुत्वाची गरज आहे. एकात्मता व बंधुता हा आपल्या राष्टाचा गाभा ठरला पाहिजे. आपली राज्यघटना म्हणजे काय आहे? हे समजावून सांगतात कि - "आपली राज्यघटना म्हणजे संसदीय लोकशाही स्थापित करण्यासाठी केलेली यंत्रणा आहे. संसदीय लोकशाहीचा अर्थ आहे. 'एक व्यक्ती एक मत' याचाच अर्थ असा की शासनकर्ते सतत दक्ष असावेत. जेव्हा ते मतदात्यांपुढे जातील तेव्हा त्यांनी केलेल्या कामाचा जनता आढावा घेऊ शकेल."
पाहिले बाबासाहेब जे सांगतात त्यावरूनच जे स्वातंत्र्य, समता, बंधूत्व स्मरण करून देणारा दिवस म्हणजे संविधान गौरव दिवसाला प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो यावरून डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्टभक्त होते ते लक्षात घेतले पाहीजे.
•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया",
"दि नॅशनल नेटवर्क बुद्धिस्ट युथ : पुणे ग्रुप"
लेखाचा पहिला भाग -
https://m.facebook.com/737916446278745/photos/a.738180676252322.1073741827.737916446278745/787019241368465/?type=1&refid=17
लेखाचा दुसरा भाग -
https://m.facebook.com/737916446278745/photos/a.738180676252322.1073741827.737916446278745/787426684661054/?type=1&refid=17
लेखाचा तिसरा भाग -
https://m.facebook.com/photo.php?fbid=1049561971726633&id=524271910922311&set=a.524738524208983.138854.524271910922311
•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा