शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

● आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे.

● आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे.

• मनोगत :

मित्रांनो,
मला आज आपल्याशी थोडं बोलायचं आहे. आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे, असे मी समाजात वावरतांना भरपूर लोकांच्या तोंडातून ऐकले. खुपदा लोकांशी संवाद साधल्या नंतर त्यांची प्रति उत्तरे ऐकून मला थोडा धक्काचं बसला, समाजातील लोकांची प्रच्च्युत्तरे पुढील प्रमाणे आहेत.

आपला धम्म हा चिखलात अडकलेला आहे, मग त्याला बाहेर काढून आपण स्वत: वर कशाला चिखल उडवायचा? आपल्या समाजातील व्यक्ति कधीचं सुधारणार नाही. धम्म काय आपल्याला दोन वेळचे जेवण आणून देतात का? मंगेश धम्माचा नाद सोडून दे, तुला शेवट पर्यंत काहीचं मिळणार नाही. अरे आमच्या कुटूंबाला सोडून आम्ही जर धम्माचे कार्य केले तर उद्या उघड्यावर आमचे कुटूंब येणार. धम्माचे कार्य फक्त बाबासाहेबचं करु शकतात. ते आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचे काम नाही. धम्माचे कार्य करतांना खूप पैसे लागतात, मग आम्हांला पैसे कोण देणार? गावा - गावात जाऊन धम्माचे कार्य करण्याचा मुर्खपणा कोण करेल? आम्ही बाबासाहेब नाही आणि आम्हांला बाबासाहेब सुद्धा बनायचे नाही. "पाटील - देशमुख" लोकांमध्ये आम्हांला किंमत आहे, हे धम्माचे कार्य करुन आम्हांला आमची किंमत वाया घालवायची नाही. या जगात धम्मा पेक्षा पैसा जास्त महत्वाचा आहे मंगेश "पैसा करे भला कैसा"

मित्रांनो,
गावागावात धम्माचा प्रचार आणि प्रसार करतांना समाजा सोबत धम्माबद्दल चर्चा करतांना आपल्या बुद्धिजीवी समाजाने मला वरील उत्तरे दिली. ही उत्तरे ऐकूण प्रत्येकाला आश्चर्यचं वाटेल. पण ही सर्व उत्तरे खरी असून माझ्या सोबत प्रत्यक्षात घडलेली आहे. ही विचित्र उत्तरे ऐकून मला एका गोष्टीचा अनुभव आला की, आपला समाज बाबासाहेबांवर आणि तथागतांवर केवळ भावनिक प्रेम करतोय, भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी बाबासाहेबांना आणि तथागतांना सिमेंटच्या पुतळ्यांमध्ये कैद करून ठेवले. आणि समाजाने त्यांचे एक ब्रीद वाक्य तयार केले की "अन्याय, अत्याचार व गुलामगिरीत जिवन जगणे हाच आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारचं" अन्याय अत्याचारात जिवन जगण्याची जणू काही त्यांना सवयचं जडलेली आहे.

• बुद्ध धम्मा वरील प्रबोधन :

अखंड विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महाकारुणीक बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब उर्फ भिमराव रामजी आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्री बाई फुले, माता रमाई, धम्म प्रवर्तक सम्राट अशोक, संत कबीर, छत्रपति शाहू महाराज, शिवाजी महाराज या महान विभूतींना सर्व प्रथम मी त्रिवार वंदन करतो आणि माझ्या भाषणास प्रारंभ करतो.

जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जीवंत होते, तोपर्यंत या समाजाला एक वैचारिक दिशा होती, परंतू बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्या नंतर हा संपूर्ण समाज विविध गटा - तटा मध्ये विभागला गेला. समाजाच्या संकुचित विचार सरणीला गती मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली. लहानपणापासून जातीभेदाचे चटके अनुभवत असतांना बाबासाहेब आपल्या आईला विचारतात, आई हा संपूर्ण समाज माझे शोषण करते आहे, माझा तिरस्कार आणि अपमान करत आहे, माणूसकी नावाची बाब नेस्तनाभूत झालेल्या लोकांसाठी मी जगायचे का? बाबांच्या मनाची तळमळ लक्षात घेऊन माता भिमाई बाबांना म्हणतात की, "भिमा" नेमका तु कोणासाठी जगशीलं? "जन्मदात्या आईसाठी की पालन कर्त्या पित्यासाठी, ममतेचा हात फिरवणाऱ्या बहिणीसाठी की नेहमी मानसिक आधार देणाऱ्या भावासाठी, प्रेमाच्या वेलीसाठी की त्या वेलीं मधून बहरलेल्या फुल्यांसाठी नेमकं कुणासाठी? अरे भिमा हे संपूर्ण जग स्वार्थासाठी, आपण जगावं आपल्या माणसांसाठी?"

मित्रांनो,
बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण आयुष्य आपल्या माणसांसाठी जगले. या संपूर्ण समाजाला विशिष्ट दिशा देऊन त्यांच्या निरागस आयुष्याला सद् धम्माची जोड देऊन त्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्याचे सार्थक कार्य बाबांनी केले. या संपूर्ण समाजाला बुद्ध धम्माची दिक्षा देण्या अगोदर बाबांनी जगातील सर्व धर्मांचा सतत २१ वर्ष सखोल अभ्यास करुन शेवटी १४ आँक्टोंबर १९५६ ला नागपूर येथे बुद्ध धम्माचा परिपक्व विचारांनी स्वीकार केला.

परंतू बुद्ध धम्माचा स्वीकार करण्या अगोदर बाबांनी पहीला ग्रंथ वाचला, त्याचे नाव होते "बायबल" बायबला मध्ये येशू ख्रीस्त सांगतात की मी कोण आहे? मी देवाचा पुत्र आहे, पहिला आणि शेवटचा, येशूंचे स्वत: बद्दलचे उत्तर ऐकून बाबासाहेब विचार करतात की, येशु सुद्धा मला कुठे नेतोय? परमेश्वराकडेचं नेतोय. बाबासाहेब दुसरा ग्रंथ वाचतात, त्याचे नाव होते "कुराण" या कुराणाच्या आयाता मध्ये हजरत अली मोहम्मद पैगंबर म्हणतात की, मी कोण आहे? तर मी अल्लाचा प्रेषित आहे पहिला आणि शेवटचा. बाबासाहेब तिसरा ग्रंथ वाचतात, त्याचे नाव होते "भगवद गीता" या भगवद गीते मध्ये श्री कृष्ण म्हणतात की, मी कोण आहे? तर मी देवाचा देव आहे. मी मोक्षदाता आहे. बाबासाहेब श्री लंके मध्ये असतांना तथागतांचे त्रिपिटक वाचतात, त्या त्रिपिटक मध्ये तथागत स्वत:ची सुंदर अशी ओळख करुन देतात, "तथागत" म्हणतात की, मी कोण आहे? "मी एका स्त्री आणि पुरुषांपासून जन्माला आलेलं एक बाळ आहे. मी केवळ मार्गदाता आहे"

मित्रांनो,
एक स्त्री आणि पुरुष ही दोघे जर का एकत्र आलीचं नाही, तर या संततीची निर्मिती होऊ शकते का? नाही होऊ शकत, हा सत्यावर आधारित असलेला परिसा समान सुंदर असा बुद्ध धम्म बाबांनी आम्ही दिला. बुद्ध धम्म तर दिलाचं पण त्याच बरोबर त्रिशरण आणि पंचशील सुद्धा दिले. हे पंचशील असे आहे.

मित्रांनो,
जर भारताने बुद्ध धम्माचा नव्याने स्वीकार करुन आपल्या दररोजच्या नित्य दिनक्रमात पंचशील अनुकरणात आणले तर या देशातील संपूर्ण समस्या क्षणार्धात नाश पावेल. येथील ब्राम्हणांनी, हिंदूंनी, कुणबी, पाटील, देशमुख, मराठा, माळी, बुद्धिष्ट समुदायाने आपल्या घराच्या तथागतांची मुर्ति बसवून दररोज त्या मुर्ती पुढे नतमस्तक होऊन पंचशील धारण करायला हवे. "अन्ना हजारे" खूप दिवसांपासून ओरडून सांगत आहे की या देशातील भ्रष्टाचार मिटला पाहीजे, पण देशातील भ्रष्टाचार कसा मिटला पाहीजे, हे मात्र अन्ना हजारे सांगत नाही. परंतू तथागतांना पंचविसशे (२५००) वर्षांपुर्वी सांगितले की भ्रष्टाचार कसा मिटवायला हवा. त्यासाठी तथागतांनी एक पंचशील दिले आहे.

"मुसावादा वेरमणी सिख्खापद समादीयामी"

"मी खोट बोलणार नाही." अशी प्रतिज्ञा ग्रहण करतो. तुम्ही खोटचं बोलू नका, भ्रष्टाचार वाढणार नाही. देशात दररोज स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहे, त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण केले जातात, त्याच्यावर बलात्कार केले जातात. हे सर्व अनिष्ट आणि माणूसकीला काळीमा फासणारे प्रकार आपण एका दिवसात थांबवू शकतो.

"कामेसु मेच्छाचारा वेरमणी सिख्खापद समादीयामी"

मी काम वासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा ग्रहण करतो. जर देशातील प्रत्येक मनुष्याने दररोज हे पंचशील ग्रहण केले तर देशातील एकाही मुलीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार होणार नाही, ऐवढे सामर्थ्य या पंचशीला मध्ये आहे, पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा संपूर्ण भारत या पंचशीलेचे वास्तविक रित्या अनुकरण करेल. परंतू येथे बाबासाहेबांची फसगत झाली, संपूर्ण मानवी समाज बाबासाहेबांच्या विचारांना बेईमान झाला. कारण बाबासाहेबांना जो समाज अभिप्रेत होता, तो समाज म्हणजे काय? "what means by society? बाबासाहेबांना जो समाज अभिप्रेत होता तो समाज पुढील प्रमाणे आहे.

"स" म्हणजे सदगुणी
"मा" म्हणजे माणूसकीला
"ज" म्हणजे जपणारा.

असा असतो समाज. हा समाज बाबासाहेबांना अभिप्रेत होता. पण असं म्हणतात की, बुद्ध धम्म हा परिवर्तनशील धम्म आहे. म्हणून समाजाच्या व्याख्ये मध्ये सुद्धा परिवर्तन झाले. आणि आताच्या आधुनिक काळात समाजाला परिपक्व सुट होणारी व्याख्या पुढील प्रमाणे आहे.

"स" म्हणजे सडलेला
"मा" म्हणजे मागासलेला
"ज" म्हणजे जंग चढलेला

असा आहे आपला समाज. ज्या भारता बद्दल आम्हांला ऐवढा अभिमान वाटतो, तो भारत म्हणजे काय? "what means by India? भारताची खरी ओळख पुढील प्रमाणे आहे.

"भा" म्हणजे भाकरीसाठी
"र" म्हणजे रयतेसाठी
"त" म्हणजे तरसणारा

असा आहे आपला खरा भारत. माझा भारत महान म्हणण्यापेक्षा माझा भारत महाग म्हटलेले बरे ।

मित्रांनो,
बाबासाहेब बोलायचे की, "जन्माला येणं माझ्या हातात नव्हतं,,म्हणून मी जन्माला आलो" परंतु मरणं माझ्या हातात आहे,कदापि मी हिंदू म्हणून मरणार नाही" ही सिंहाची गर्जना फोडणारे डाँ. बाबासाहेब आंबेडकर होते. परंतू आपल्या लोकांवर हिंदू धर्माचा जबरदस्त पगडा आहे. ते आज हिंदू धर्मांचे सण साजरे करतात, मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेला बळी पडतात. हिंदू समाज सत्य नारायणाची पुजा करतात आणि आपला समाज त्यांच्यांच प्रमाणे परित्राण पाठ करतात.

मित्रांनो,
तथागतांनी अख्ख्या आयुष्यात कधी परित्राणपाठ केले नाही,पण आपला समाज मात्र परित्राण पाठ करायला सुरुवात केली. हिंदू धर्मातील जनता हाताला भगवा किंवा लाल धागा हाताला बांधतात आणि बुद्धिष्ट समुदाय हाताला पंचशीलेचा पांधरा धागा बांधतात. पंचशीलेचा धागा हाताला बांधतांना हा पण विचार करत नाही की, पुढचा व्यक्ति खरच पंचशीलानुसार आचरण करतो की पंचशीलाच्या विरुद्ध करतो, याचा मात्र विसर पडतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की - "माझे भाग्य जर का आकाशातील ग्रह आणि तारे ठरवित असतील, तर माझ्या या बुद्धिचा आणि मनगटाचा काय फायदा?" बाबांनी स्वतच्या बुद्धिचा आणि मनगटाचा वापर करुन जगात वैचारिक क्रांती घडवून आणली. परंतू आपला समाज मात्र त्याच अंधश्रद्धेच्या पगड्या मध्ये गुरफटतांना दिसतोय.

आपल्या प्रबळ शत्रू पेक्षा ही आपले तथ्यहीन विचार आपल्यासाठी आणि समाजासाठी अपायकारक व हानिकारक ठरतात. आज हा धम्माचा गाढा पुढे नेण्यासाठी आम्हांला तो अगोदर पूर्णपणे समजावून घ्यावा लागेल. कारण कुठल्याही गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी त्या सारखे सामर्थ्य या मनात निर्माण करावे लागतात. तेव्हा त्या गोष्टीची जाणीव या मनाला होणार. परंतू हे कार्य आम्हांला इतरांवर अवलंबून न राहता, स्वत:च पुढाकार घेऊन करावे लागणार, कारण "इतरांच्या सावलीत उभे राहून आपण आपल्या सावलीचे स्वतंत्र अस्तित्व गमावतो, परंतु प्रत्येकाला आपल्या सावलीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी एकदा तरी त्या कडकडत्या सूर्याच्या प्रखर उष्णतेत स्वतंत्र उभे रहावेच लागते. म्हणून आम्हांला आता नविन सुरुवात करावी लागेल, नव नविन माणसांना या कार्यात सहभागी करावे लागेल. "जे एका दिवसाचा विचार करतात. ते लोकांसोबत बोललात. जे एका वर्षाचा विचार करतात. ते रोपटं लावतात, जे दहा वर्षांचा विचार करतात. ती झाडी लावतात. जी संपूर्ण आयुष्याचा विचार करतात  ती माणसे जोडतात आणि जी माणसे जोडतात. ती बहुतांश व्यक्ति आयुष्यात यशस्वी होतात.

आम्हांला खरा बुद्ध धम्म संपूर्ण भारतात रुजवायचा आहे. "दिव्याला दिवा लावत गेला की, दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की, फुलांचा एक फुलहार तयार होतो. हाराला हार जोडत गेलं की, हारांची एक माळ तयार होते आणि जर का माणसाला माणूस जोडतं गेलं की माणूसकीचं एक सुंदर नातं तयार होतं" आमचा धम्म आम्हांला हाक मारत आहे, तो आम्हांला म्हणत आहे की, "मी एका पडीत जमिनी प्रमाणे तुम्हां सर्वांच्या सुखद आधाराची आतुरतेने वाट बघत आहे. जर का माझ्यावर एकदा तुम्हां सर्वांच्या आधाराचा सुखद पाऊस पडला तर, मी पुन्हा हिरवागार होणार आणि बहरायला सुरुवात करेल. म्हणून तुमच्या आधाराच्या सुखद पावसाला माझ्या वर लवकरात लवकर सुखद वर्षाव करायला सांगा, कारण मला तुमच्याच केवळ तुमच्याच आधाराची गरज आहे. धम्माशी एकनिष्ठ होऊन संपूर्ण भारत सत्य बुद्ध धम्माचे बुद्धमय करुया. पण हे वाटते तेवढे सोपे काम नाही. धम्माचे कार्य करत असतांना आपणा सर्वांना भरपूर संकटांचा सामना करावा लागेल, परंतू पुढील प्रेरणादायी ओळी मी आपणा सर्वांसाठी लिहत आहे.

"आयुष्य हे नेहमीच सुखाने भरलेले नसतात. थोडे दुख ही असतात, पण आयुष्याच्या रात्री नंतर सकाळ मात्र सोनेरी किरणांनी सजून येते. जर आयुष्यात अशी कधी कठीन वेळ आलीच कि, जेव्हा आपलं म्हणून काळजी घेणारं कोणीचं नसेल तेव्हा अगदी मनापासून हाक मारा. आपला बुद्ध धम्म आणि त्याची वैचारिक विचारधारा तिथेचं असेल" आम्ही जर का धम्माच्या कार्याची सुरुवात केली, तर आपण नक्कीच परिवर्तन घडवून आणनारचं, कारण आपण या जगाचा इतिहास लिहिणाऱ्या बाबांची मुलं आहोत.

"सूर्याची गर्जना आमची,
आम्ही वाघाची रं पिलं ।
चिरत नेऊ अंधार सारा,
आम्ही क्रांती सूर्याची लेकरं ।।"

मित्रांनो,
मला आज आपल्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून या लेखा द्वारे मी स्वत: चे विचार आपणा सर्वां पुढे मांडलेत. जर आपल्याला धम्माच्या कार्याची आवड असेल तर कृपया मला पुढील क्रमांकावर काँल करा. कारण २०२० पर्यंत आपल्याला अर्ध्या पेक्षा जास्त महाराष्ट्र बौद्धमय करायचा आहे, हे सकारात्मक उद्दिष्ट डोळ्या पुढे ठेऊनचं धम्माचे कार्य करण्याचा संकल्प केलेला आहे. परिपक्व विचारांनी एकत्र येऊन बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करुया. वैचारिक क्रांतीच्या बुद्धिजीवी विचारांचा सर्वांना क्रांतिकारी जय भिम.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
मंगेश नाईक (महाराष्ट्र राज्य प्रवक्ते)
"आक्रमण युवक संघटना"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा