रविवार, २७ ऑगस्ट, २०१७

● डि.एन.ए (विद्रोही कविता)

● डि.एन.ए

बाप बदलवणाऱ्या,
तू लक्षात घे ।
तुझ्यातला डि.एन.ए,
तू चेक करुन घे ।।धृ।।

गणपतीला बसव कि,
दुर्गा देवीला तू ।
म्हसोबाला ओवाळ कि,
शंकराला तू ।।१।।

तू रक्तच नाही,
आमचं हे जाणून घे ।
तूझ्यातला डि.एन.ए,
तू चेक करन घे ।।२।।

तुझ्या तोंडातलं मडकं,
त्याने नको काढाया होतं ।
तूझ्या भिकेचं गाडगं,
त्याने नको फोडाया होतं ।।३।।

तुझं कुत्र्यावानी जीणं,
एकदा आठवून घे ।
तुझ्यातला डि.एन.ए,
तू चेक करुन घे ।।४।।

बापाच्या जयंतीला,
भिकारी तू होतोस ।
गणपतीसाठी मात्र,
खिसा फाडून देतोस ।।५।।

बाबासाहेब तूझा,
कोण हे समजून घे ।
तूझ्यातला डि.एन.ए,
तू चेक करून घे ।।७।।

आरती म्हणावया,
कसा आतुर तू झाला ।
बुद्ध वंदनेसाठी,
घरी वेळ नाही तूला ।।८।।

तुझ्या तिरडीची,
व्यवस्था तूच करून घे ।
तुझ्यातला डि.एन.ए,
तू चेक करून घे ।।९।।

कवी -
अमोल गायकवाड
(लेखक, कवी एवं विचारवंत)

══════════════════════

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा