गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

● बुद्ध धम्माच्या आचरणाच्या दृष्टीने

● बुद्ध धम्माच्या आचरणाच्या दृष्टीने

लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षेच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा मधील पहिल्या आठ प्रतिज्ञा (क्रमांक १ ते ८) हिंदू धर्माचा धिक्कार करणाऱ्या आहेत, तर उर्वरित १४ प्रतीज्ञा बौद्ध धर्माचे आचरण करण्याचा निश्चय करणाऱ्या आहेत. बौद्धा मधील अनेक जण पहिल्या आठ प्रतिज्ञांचा (क्रमांक १ ते ८) हवाला देऊन बौद्ध धम्माला हिंदू धर्माचा विरोधी धर्म म्हणून उभे करण्याचा खटाटोप करतात. उर्वरित १४ प्रतीज्ञां बाबत मात्र तेवढाच टोकाचा आग्रह धरताना दिसत नाही. (काही सन्माननीय अपवाद वगळता)

माझ्या मते,
हिंदू धर्माचा धिक्कार करणाऱ्या या आठ प्रतिज्ञा व १९ व्या क्रमांकाची - "माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला अस्मान व नीच मानणाऱ्या हिंदु धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो." ही प्रतिज्ञा त्यावेळी धर्मांतर करणारा सर्वच समुदाय त्या क्षणी हिंदू असल्यामुळे त्यांची हिंदू धर्म सोडण्याची मानसिक तयारी करून घेण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. एकदा का व्यक्तीने स्वतः ला बौद्ध म्हणून घोषित केले तर त्याच्या पुढील जीवनात या आठ प्रतिज्ञा व १९ व्या क्रमांकाची प्रतिज्ञा गैर लागू ठरतात. उर्वरित १३ प्रतिज्ञा मात्र बुद्ध धम्माच्या आचरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरतात. या तेरा प्रतिज्ञां पैकी क्रमांक ९ व १० च्या प्रतिज्ञा बुद्धाच्या धम्माची समानता प्रस्थापित करण्याशी असलेली बांधिलकी स्पष्ट करणाऱ्या आहेत तर क्रमांक ११ ते १८ या प्रतिज्ञा अष्टांगिक मार्ग, पंचशील व पारमिता यांचे पालन करण्या विषयी आहेत. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे अविभाज्य अंग असल्याने या प्रतीज्ञाना बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथात स्थान दिले आहे.

मात्र हिंदू धर्माचा धिक्कार करणाऱ्या क्रमांक १ ते ८ च्या प्रतीज्ञाना बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथात स्थान दिलेले नाही. याचाच अर्थ धर्मांतर करणारी व्यक्ती जर हिंदू व्यतिरिक्त अन्य धर्माची असेल तर या प्रतिज्ञा त्यानुसार बदलल्या जाऊ शकतात. या आठ प्रतीज्ञांचे स्वरूप व्यक्तीची पूर्व धारणा बदलण्या संदर्भातील आहे. ही पूर्व धारणा काहीही म्हणजेच हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिस्चन, पारसी किंवा अन्य पंथाला मानणारी किंवा निधर्मी असू शकते. या पूर्व धारणेचा बुद्धांची स्वतंत्र ओळख किंवा संस्कृती निर्माण करण्याशी काहीही संबंध नाही. यामुळे हिंदू किंवा अन्य कोणत्याही धर्माशी संबंधित बाबीं विषयी बौद्ध व्यक्तीची भावना वैरत्वाची नव्हे तर उपेक्षेची असली पाहिजे.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा