सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

● का करु मी स्वातंत्र्य दिन? (कविता)

● का करु मी स्वातंत्र्य दिन?

दवाखान्यात ऑक्सिजन नाही,
सैन्या जवळ दारुगोळा नाही ।
नेत्यांजवळ माणुसकी नाही,
शेतकऱ्यांला हमी भाव नाही ।।धृ।।

शेतीसाठी पाणी नाही,
महिलांना सुरक्षितता नाही ।
तरुणांना नोकरी नाही,
बैंकेजवळ पैसा नाही ।।१।।

मतदारांना अक्कल नाही,
भक्तांना मेंदुच नाही ।
विरोधकांमध्ये एकी नाही,
नागरिकांमधे कृतज्ञता नाही ।।२।।

मीडीया कडे स्वाभिमान नाही,
न्यायालयात न्याय नाही ।
राज्या - राज्यात एकोपा नाही,
पत्रकारांकडे हिम्मत नाही ।।३।।

भ्रष्टाचाराला अंत नाही,
सत्यवाद्यांना जगु देत नाही ।
जाती - जातीत विश्वास नाही,
आदिवासींना सम्मान नाही ।।४।।

एकात एक नाही, बापात ल्योक नाही,
मी एक जागृत भिमसैनिक आहे ।
पाण्याच्या बरोबर जायला मी ओंडका नाही.
मग आहे तरी काय ज्याचा मी गर्व करु? ।।५।।

कवी -
मनोज काळे : ठाणे
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

••◆●◆•◆●◆•●◆●•◆●◆•◆●◆••

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा