मंगळवार, २९ ऑगस्ट, २०१७

● गाडगे बाबांचे अखेरचे किर्तन (गणपती विषयक)

● गाडगे बाबांचे अखेरचे किर्तन (गणपती विषयक)

दि. ८/११/१९५६ रोजी मुंबई, बांद्रा पोलिस स्टेशन येथे गाडगे बाबांचे किर्तन झाले. तेव्हा ''गणपती'' विषयी बाबा काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात स्पष्ट करुन ते म्हणतात - माय बाप स्वप्नात तुम्ही देव पाहिला का कधी?

लोक - नाही.

बाबा - मग जो फोटो पाहिला तोच देव दिसतो. खरा देव दिसत नाही. देव दिसायची वस्तु नाही. तुकोबाराय म्हणतात - '"देव - देव करता शिणले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे."

बाबा - आता आपण "गणपती" मांडला का नाही?

लोक - हो!

बाबा - गणपती बसवणं देवाची भक्ती नाही. हे एक रुढी पडून गेली. काय पडली रूढी? ज्या व्यक्ती गणपतीला आणता - बॉन्ड लावता अन् भजन लावता, अन वाजवत वाजवत आणता.

मोरया... मोरया... मोरया ! आणून सिंहासनावर बसवता, अन त्याची दहा दिवस पूजा करता. मोदक, नैवद्य आरत्या करता. शेवटच्या रोजी उठवता का नाही?

लोक -  हो!

बाबा - मग त्याले कुठ घेता? डोक्यावर... बोला, डोक्यावर अन् मग कुठे नेता? एवढ्या पाण्यात... चले जाव!

माय बाप हो,
ही देवाची भक्ती नाही. ज्याची एवढी शोभा केली, आरत्या केल्या अन् त्याले पाण्यात बुडवून मारता! तुमच्यावर खटला भरला तर फौजदारी होते.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
डेबूजी जानोरकर उर्फ संत श्री. गाडगे बाबा
(प्रसिध्द संत, कीर्तनकार एवं समाज सुधारक)

••◆●◆•◆●◆•●◆●•◆●◆•◆●◆••

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा