सोमवार, १४ नोव्हेंबर, २०१६

● महामानवाला अभिवादन करूया. समाजाला सांस्कृतिक प्रदुषणातून मुक्त करूया.

● महामानवाला अभिवादन करूया. समाजाला सांस्कृतिक प्रदुषणातून मुक्त करूया.

दरेकाने दरेकाला धम्मदिक्षा देण्याची अनुमती देऊन डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध माणसाला धम्म प्रचार व प्रसार करण्याचा आदेशच दिला होता. बौद्ध माणसाने मिशनरी धम्म प्रचारक होणे हाच सारा भारत बौद्धमय करण्याचा राजमार्ग, बौद्ध धम्माच्या प्रतिनिष्ठा ठेऊन बौद्ध माणूस आपली शुद्ध ओळख निर्माण व्हावी व सुखी आणि स्वाभिमानाचे जीवन जगून इतरांना आदर्श देता यावा म्हणून २२ प्रतिज्ञाचं उल्लंधन करतात. बौद्ध वस्तांतील सांस्कृतिक प्रदुषण दुर करण्यासाठी आम्ही काही उपाय योजना मांडल्या आहेत. सांस्कृतिक प्रदुषण रोखण्यासाठी आम्ही विचारांनी काम करत असताना आता आमच्यातल्या काही मंडळीना भंडारा या प्रकाराला देखील उचलून धरायला सुरूवात केली आहे. या साथीच्या विकाराने अनेक लोक पछाडले जातात.

महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना त्याच्या बौद्धमय भारताच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गातील हे अंतर्गत अडथळे मनाला फारच व्याकूळ करतात. महामानवाचे हे निर्मळ, प्रेमळ व करूणामय स्वप्न केवळ एका जमातीसाठीच नव्हे तर अखंड देशातील लोक डोळस संवेदनशील, सुखी होऊन शुद्ध मानवी जीवन जगू शकतील असे आहे. त्यांची जबाबदारी ज्या समुहावर टाकली गेली, केवळ जबाबदारी नव्हे तर बाबासाहेबांनी त्या समुहाने ही जबाबदारी योग्य प्रकारे पेलली नाही तर तो समुह एक बेजबाबदार व लायक नसणारा नालायक समुह होता अशी इतिहासात नोंद होईल.त्यात अखंड भारतीय समाजाच देखील मोठ नुकसानच आहे. सारा भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी ज्या बौद्ध समाजावर आहे. त्या बौद्ध अर्थात पुर्वाश्रमीच्या महारांनी दरेकाने दरेकाला धम्मदिक्षा देण्याच्या बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराच महत्व समजून तर घेतले नाहीच पण स्वत: देखील परिशुद्ध बौद्ध म्हणून जगू शकले नाहीत. तेव्हा जागृत व प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या व प्रांजळ, निर्मळ बौद्ध उपासक उपासीकांवर अंतर्गत सांस्कृतिक शुद्धिकरणाची एक मोठी जबाबदारी येऊन पडते आहे.

क्रांतीसुर्य डां. बाबासाहेब आँबेडकरांना भावपूर्ण श्रद्धाजंली पाच कलमी शुद्धिक्रियेच्या निश्चयाने करून एकशुद्ध चळवळ अर्थात समतेचा हा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी एक "क्लिन मुव्हमेंट" उभी करूया. बौद्ध समाज अतंर्गत सांस्कृतिक शुद्धिकरणा करिता पाच कलमी शुद्धिक्रिया :-

१) बौद्ध सणांच्या व्यतिरिक्त इतर धर्माचे सण साजरे करणार नाही. दिवाळी बोनस इतर सणांनिमित्त मिळणारी खर्ची इनव्हेस्ट करा. ज्या धम्म संघटनांनी धम्म शिबीरे आयोजित केली आहेत त्या शिबीरांमध्ये सहभागी व्हा.

२) अंधश्रद्धा वाढीस लागले अशा देव पुजेपासून परावृत करणे.

३) दर एकाने देवी बसविणाऱ्या एका कुटूंबाला किंवा एक मंडळाला देवी बसविण्यापासून परावृत करण्याचा निश्चय करावा.

४) धम्मचक्र प्रवर्तन दिन घरा - घरात सणा सारखा साजरा करण्याचा निश्चय करा. या पवित्र दिनी किंवा अन्य काही दिनांचे औचित्य साधून बौद्ध लेण्यांवर बौद्ध पर्यटन स्थळावर तसेच आपल्या प्रेरणा स्थळांवर सहलीचे आयोजन करा किंवा वैयक्तिक रित्या भेटी देत रहा.

५) वर्षावास कार्यक्रमाच्या आयोजना करिता विहार कमिट्यांना, मंडळाना, महिला मंडळांना, असंघटीत उपासकांना काही काळ अगोदर विचारपूस करून प्रोत्साहन द्या. वर्षावासाला अद्यावत स्वरूप देण्याचा निश्चय करा.

हा पाच कलमी कार्यक्रम म्हणजे महानगरपालिकेच्या साफ सफाई खात्या सारखाच पण सांस्कृतिक साफ सफाईचा कार्यक्रम आहे. त्याला संत गाडगे महाराजांच असणार स्वच्छता अभियान देखील म्हणता येईल. बौद्ध समाज जर शुद्ध स्वरूपात एक बुद्धिस्ट आयडाँल म्हणून उभा राहिला तर त्यांच प्रचाराने आणि प्रभावाने अनेक लोक कर्मकांड, अंधश्रद्धा, दैव्यवाद यापासून मुक्त होऊन बौद्ध धर्माचा स्विकार करतील. त्यातून शुद्ध बहूमत तयार होऊन राजा सम्राट अशोकासारखे कल्याणकारी राजकारण देखील साध्य होईल. पाच कलमी शुद्धक्रियेच्या प्रचार, प्रसाराचा सम्यक संकल्प हिच महामानव परमपुज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदराजली ठरेल.

महामानवाला अभिवादन करूया. एक असा संकल्प करूया. समाजाला सांस्कृतिक प्रदुषणातून मुक्त करूया.

आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

● वैचारिक कृती : एक गरुडझेप

● वैचारिक कृती : एक गरुडझेप

६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महापारीनिर्वाण झाले. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन आणि मानवंदन करायला संपूर्ण भारतामधून लाखो भीम सैनिक चैत्यभूमीला येतात. बाबासाहेबांना मानवंदन तर करतातच पण तेथेच कचरा करतात, जेवणाचा नासाडी करतात, अस्वच्छता बाळगतात. जर तुम्हाला खरच बाबासाहेबांना मनापासून वंदन करायचे असेल तर खालील नियम कटाक्षाने पाळा.

◆ नियम आणि अटी :
सर्वांनी आपआपला प्रवास तिकीट काढूनच करावा. मुंबई मधील सर्व भीम सैनिकांनी, संघटनांनी चैत्यभूमीच्या परिसरात ठिक ठिकाणी कचरा पेट्या ठेवाव्यात. स्वच्छता पाळावी, कोठेही कचरा फेकू नका, कचरा पेटीतच टाकावा म्हणजे त्याचा वापर करावा. अन्न पदार्थाचे नुकसान करू नका, अन्न पदार्थ कचरा पेटी मधेच फेकावे, अन्न पदार्थ कोठेही फेकू नका, कचरा पेटीतच टाकावा. चांगले रहावे. स्वच्छ राहावे, स्वच्छ कपडे घालावे, जमले तर सफेद कपडेच घालून यावे, जास्त भडक कपडे घालू नका, बाबासाहेबांचे फोटो असलेले कपडे घालू नका. जास्तीत जास्त स्वच्छता गृहांचा वापर करा, उघड्यावर अंघोळ करू नका, लहान मुलांना उघड्यावर शौचालयाला बसवू नका, उघड्यावर लघवी किंवा शौचास इकडे तिकडे जाऊ किंवा बसू नका.

जत्रेचे स्वरूप तयार करू नका. कोणीही जत्रेमध्ये आल्याप्रमाणे लहान मुलांसाठी खेळणी विकत घेऊ नका, आपला दुखाःचा दिवस आहे आनंदाचा नव्हे. विशेष महिला भगिनींनी कोणत्या हि प्रकारची खरेदी म्हणजे रस्त्यावरील पर्स, गळ्यातले, कानातले, नाकातले, गजरे विकत घेऊ नका, कारण हा आपला दुःखाचा दिवस आहे आपण अभिवादन करायला येणार आहोत. कोणीही समुद्र चौपाटीवर हार, मेणबत्ती, अगरबत्ती फेकू नका, या वस्तू घेण्याऐवजी प्रबोधनाची पुस्तके, प्रतिमा, कॅलेंडर, भीम गीतांची सीडी घेऊन एखाद्याला भेट म्हणून द्या. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊ नका, कोणाचीही टिंगल करू नका, भडकाऊ घोषणा करू नका कारण आपण वंदन करायला आलो आहे म्हणून शांततेने वंदन करावे हि नम्र विनंती.

प्रत्येक भीम सैनिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, काही समाज कंटकांकडून जातीयावाद्यांकडून पसरवलेल्या अफवांवर विश्वास ठेऊन धावपळ करू नका, कारण अशा धावपळीमुळे आपलेच बांधव चेंगरून मरतात हे लक्षात ठेवा. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतीज्ञांचे पालन करा, म्हणजे दारू पिऊन येऊ नका, गुटखा, सिगारेट, तंबाकू खाऊ नका, आपल्याच भगिनींना त्रास देऊ नका, आपल्याच लोकांची लुटमार करू नका म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतीज्ञांचे पालन करा. गळ्यात हातात धागे दोरे, देवाचे लॉकेट घालून येऊ नका, कपाळावर भगवा टीका लाऊ नका. मुंबई मधील भीमसैनिक संघटनांनी कोणाला ही खेळणी व विकृती दर्शक साधानांचा स्टाँल लावू देऊ नका. मुंबई मधील संघटनेच्या सभासदांनी वाद्य, सीडीचे स्टाँल यांना कमी आवाजात गाणे लावायला सांगावे. कारण आपला दुःखाचा दिवस आहे हे विसरता कामा नये. बाबासाहेबांच्या विचारांचे प्रबोधन करा, चळवळीत सक्रीय सहभाग घ्या.

आवहनात्मक मार्गदर्शक लेख -
सविता बावीसकार (संचालिका)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

● जाणीव असू द्या.

● जाणीव असू द्या.

६ डिसेंबर, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, दि ग्रेट इंडियन डाँ. बाबासाहेब आंबेडकर ६० व्या महानिर्वाण दिना निमित्त भिमानुयायांचा आपल्या पित्यास अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभुमी येथे जनसागर उसळणारच आणि अशा वेळी मनुवादी टि.व्ही. चँनलवाले तसेच वृत्त पत्रीय पत्रकार आपापल्या परीने या कार्यक्रमाकडे जेवढे दुर्लंक्ष करता येईल, टाळता येईल, असे प्रयत्न करत असतात. परंतु ते शक्य होत नाही. डाँ. आंबेडकरांचे महात्म प्रसार माध्यमांनी दुर्लंक्षित केले म्हणजे या महामानवाला अभिवादन करणाऱ्यानी संख्या कमी होईल किंवा बुद्ध धम्माकडील लोकांचे आकर्षण धम्माचरण यात बद्दल होईल असे मुळीच नाही. उलट दिवसे दिवस देश विदेशातील लोक बाबासाहेबांच्या विचाराला सलामी देत आहेत. वंदन करून बाबासाहेबांना स्विकारत आहेत. तरी ही निष्काम कर्माला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न षडयंत्र द्वारे रचला जातोय.

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान दिन हे दोन्ही दिवस स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिना इतकेच महत्वाचे असतात. प्रत्येक भारतीयाने ते आंनदाने साजरा करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी साजरे होत असतात हे कार्यक्रम साजरे करण्याचे प्रमाण ही दिवसे दिवस वाढत आहे. संविधान दिन हा राज्यभर साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्यानुसार आयोजन ही केले होते, परंतु प्रसार माध्यमांनी आपले आवाज बंद ठेवले होते. १४ आँक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाकडे सर्वच वृत्त पत्रकांनी दुर्लंक्ष केले. त्यामध्ये काही आंबेडकरी विचारी वृत्तपत्रे सोडली तर आजचे विषेश बाळासाहेबांच्या जत्रा मेळाव्या शिवाय काहीच नाही, असे मानले होते. बाळ ठाकरेचा 'दसरा मेळावा' त्याची गर्दी आणि शिव्यांचा भडीमार भाषण प्रदर्शन एवढच दाखवायचे आणि तेच दिन विशेष म्हणून दिवसभर चविष्ट मसाल्याची फोडणी देवून चघळत होते, पण अशा कार्यक्रमाच्या प्रसारणातून बहूजन जनतेला काय मिळते. त्यांना काय अपेक्षित असते? याचा विचार या चँनल वाल्यांना पडतो, परंतु या चँनल वाल्यांनी एवढे ध्यानात ठेवले पाहीजे की, हा देश विकासाकडे वाटचाल करत आहे. ते केवळ बुद्ध - फुले - शाहू - आंबेडकर - शिवाजी राजे यांच्या प्रबोधनी विचारामुळेच !

डाँ. आंबेडकरांचे परिपूर्ण विचार जर या देशाने स्विकारले असते तर केव्हाच देश महासत्ता झाला असता. बाबासाहेबांसारख्या युगपुरुषाचे मार्गदर्शन आज साऱ्या विश्वाला लाभदायक ठरत आहे आणि त्यांनी लिहलेलं संविधान अखंड विश्वामध्ये प्रथम क्रमांकाचे आणि सर्वोत्कृष्ट आहे. शिवाय देशाचा कारभार या संविधानानुसार चालतो, असे असताना जर अशा कार्यक्रमाकडे दुर्लंक्ष केले तर लहान मुलापासून तरूण पिढी - युवक घडणार कसे? बाबासाहेबांच्या कार्यक्रमाकडे दुर्लंक्ष करून प्रसार माध्यमे आंबट शौकिन बातम्यांचा भडीमार करण्यात समाधान मानतात. परंतु असा कोणताही दर्जा प्रबोधन नसलेल्या, महत्व नसलेल्या बातम्या कार्यक्रमातून लोकांपुढे कोणता आदर्श जातो?

इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरून चालत नाही असे खुद्द डाँ. बाबासाहेब आंबेडकरच उद्गारले होते. आपल्याला जर विकसित राष्ट्राच्या यादीत उतरायचे असेल तर बुद्ध - फुले - शाहू - आंबेडकर - शिवाजी राजे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन क्रांतिकारी पावले टाकणे गरजेचे आहे. तुसते अर्धनग्न अवस्थेतील रिअँलिटी शोज प्रदर्शन, राजकारण्यांची हमरी - तुमरी, 'दसरा मेळाव्या' सारख्या शिवराळ कार्यक्रमांचे प्रदर्शन बुवाबाजी आणि अंधश्रद्धा यासारख्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देणे अशाने कोणतीच प्रगती आपल्या देशाची होणार नसून उलट बहुजन वर्ग लुटला जात आहे, हे लक्षात घेतले पाहीजे. तसेच भटाळलेल्या सडक्या मेंदूच्या चँनल वाल्यांनी ही ध्यानात घेतले पाहीजे की, आपण या देशाचे नागरिक आहोत. देशाचे देणेकरी आहोत. जे योग्य असेल तेच देण्याचा प्रयत्न करा. कारण असल्या कु - कर्मी यांना कोणत्याही प्रकारची लाज लज्जा नसते.

बाबासाहेबांच्या प्रत्येक विचार आणि कृतीतून मरगळ आलेल्या व्यक्तीला सुद्धा प्रेरणा मिळते. एका नव्या शक्तिची ऊर्जा मिळते आणि अबोल माणूस बोलू लागतो. बिघडलेला व्यक्ति घडू लागतो आणि म्हणूनच बाबासाहेबांचे प्रखर विचार आणि त्याचा अर्थ समाज विषयक गाढा अभ्यास पाहून देशी विदेशी लोक तोडात बोट घालतात आणि नळकत बाबासाहेबांना टाळणारे लोक आज बाबासाहेबाच्या विचारांना शरण जावून वंदन करून त्यांचा स्विकार करतात. शिवाय बाबासाहेबांनी लिहलेले ग्रंथ हेच आपले गुरु आहेत सांगू लागतात.

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्विकार केल्या नंतर सारा भारत बौद्धमय करण्याच्या दिशेला लागले. परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर क्रांती मध्ये खंड पडला. बहुजन बांधव एकत्र आले पण त्यांच्या ताकदीने गट - तट निर्माण झाले. पुन्हा विस्तृत फेकले गेले. कार्यकत्ता, नेता, पुढारी यांचे निवडणूकीच्या वेळी फक्त दर्शन होते म्हणूनच बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न आपल्या अनुयायांना संविधाना द्वारे मार्गदर्शन करून बहूजनांनी एकत्रित राहून सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. परंतु आजचे वास्तव चित्र पाहता बाबासाहेबांच्या क्रांतीत खंड पाडल्या नंतर सर्वत्र अलबेल आहे. आम्ही बाबांचे विचार आचरणात आणण्यास कमी पडतो. मग आम्ही भिमानुयायी कसे? ६ डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी सर्वत्र विविध रुपाने अभिवादन केले जाते. त्यातील महत्वाचे म्हणजे लाखो लोक दादर चैत्यभुमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात. त्यावेळी आपल्यातील काहीना आपल्या कर्तव्य जाणीवेचा विसर पडलेला दिसतो. अक्कलेची तार तुटलेल्या व्यक्तिनी आंबेडकरी विचाराची धार वापरली पाहिजे. असे आपल्या सर्वांना माझे आवाहन आहे.

चला एक पाऊल विकासाकडे नेऊया.
चला एक होऊन धम्म सागरात न्याहुया.

आवहनात्मक मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

● नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.

● नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.

महापरिनिर्वाण दिना निमित्त काय करावे अन् टाळावे यावर मार्गदर्शक लेख -

ठिक रात्री १२ वाजता आपल्या धम्म बांधवांना एकत्रित करून मेणबत्ती प्रज्वलित करा मग बुध्द वंदना वैगेरे आटपून एकत्र येऊन आपल्या चौकातील किंवा नगरातील आंबेडकराच्या पुतल्याला हातातील मेणबत्ती पुतळ्या जवळ लावा आणि पुष्यहार किंवा फुले आणले असेल तर अर्पण करा. अभिवंदन करून घ्यावे आपल्या मूलांसह घरी परतल्या वर आपल्या मुलांना चिरकाळ आठवतील अश्या बाबासाहेबांच्या आठवणी आणी धम्मविषयक माहिती द्यावी जेणे करून मुलांवर संस्कार होतील धम्माकडे वाटचाल होईल.

महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वानी अंघोळ आटपून जूने सफेद कपडे पुरूषानी, तरूणानी, वयोरूद्धानी, लहान मुलांने सफेद शर्ट/टि-शर्ट, पँट, धोतर, कुर्ता पायजामा आणि स्त्रिया, तरूणी, मुलीनी सफेद साडी, कुर्ता पायजामा घालावेत. सोसायटी, अपार्टमेंट किंवा सार्वजनिक ठिकाणी धम्मध्वज आणि निळा झेंडा फडकवून मानवंदना करा. बुध्दाना फुले आणि आंबेडकरांना पूष्यहार अर्पण करावा, मेणबत्ती आणि अगरबत्ती लावावी. बुद्धवंदना वैगेरे सर्व विधी पार पाडून चैत्यभुमी दादरला जात असल्यास फुकटचा प्रवास करू नका कारण आता तूम्ही कमावते आणि सुशिक्षित व्यक्ती आहात मात्र विसरता कामा नये. आपण बाहेर जाताना नवीन कपडे घालता पण ठिक आहे पण आपण याच दिवसा का मुर्खपणा करता? जूने सफेद कपडे घालूनच जाणे ठिक राहिल कारण हा चैत्यभुमी परिसर स्मशानाचा परिसर आहे आणि दुखाचा दिवस सुद्धा आहे.

काही जन 2 डिसेंबरच्या आधीच भिमसैनिक सतत त्याच परिसरात वावरत असल्यास भारतीय बौद्ध महासभातील लोकांना काही कामाकरिता हातभार लावावा. शिवाजी पार्कवर स्पेकरवर गाणी लावणारांची सिडीज् ची दालने हटवणून बंद करायला लावावीत किवा दालने चालवणाऱ्याची समजूत काढावी. आणि चैत्यभूमीला भेट देणाऱ्यानी रांगेतूनच चैत्यग्रहात जावून बाबासाहेबांच्या अस्थिचे पुष्यहार, फुले, अगरबत्ती, मेणबत्ती अपर्ण करून अभिवंदन करून दर्शन घ्यावे.

काही अनुयायी रांग खुप मोठी असल्यास समुद्रसपाटीवर शिल्प उभारून तेथे किवा चैत्यभूमी लगत पुतल्याला किवा प्रतिमेला फुले वैगेरे अपर्ण करतात. चैत्यभुमीला आल्यास चैत्यग्रहातच जावून दर्शन घ्यावे असा आग्रह आहे. काही जन दर्शन झाल्यास जेवनासाठी रांग लावतात. पण हे सर्व गरिब गरजू दुरून आलेल्या लोकांकरिता असते आपण पण खुशाल करा जेवन पण लक्षात ठेवा जेवढी गरज असेल तेवढेच घ्या आणि द्यायला सांगा कारण अन्न वाया जाणार नाही.

जेवण करून झाल्यास पात्रावळी इकडे तिकडे टाकू नका आढळल्यास उचलून कुडीत टाकावे. कारण बाबासाहेबांची प्रेरणा गाडगे बाबां मानत होते गाडगे बाबा सुद्धा 6 डिसैबर या दुखात ओढवले होते अवघ्या 14 दिवसात त्यांचे हि निर्वाण झाले म्हणून चैत्यभूमीचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या ताटात खाता तेच तुडवत राहायला तुम्हाला कोणी शिकवले आहे काय?

बाबासाहेब म्हणतात -
"नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही."

आता तुम्ही बौद्ध आहात म्हणजे बुद्धिमान आहात उगाच मुर्खपणाने वागू नका. मेंदू उगाच डोक्यात घालून ठेवायचा नसतो तर विचार करण्यासाठी उपयोगात आणायचा असतो. एकदा नाहीतर दहादा विचार करून पाहा. विचार केल्यानेच बद्दल घडतो.

आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

● दिशा कशी देणार?

● दिशा कशी देणार?

"बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले" पत्नी रमाला दिल्या प्रमाणे पंढरपूरलाच नव्हे तर उभ्या महाराष्टातील पवित्र तिर्थस्थळांना लाजवेल असं दादर चैत्यभूमी वर महापंढरपूर निर्माण करणारे प्रज्ञासूर्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर आपले मुक्तीदाता आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने देश विदेशातून भीमानुयायी चैत्यभुमी वर येवून महामानव डाँ. बाबासाहेबांच्या चरणी माथा टेकून अभिवादन करतात. ही कोटी कोटी प्रणाम करणारी लाखो माणसं अन्याया विरूद्ध संघर्ष करण्याची डाँ. बाबासाहेबांकडून प्रेरणा घेत असतात. जन सागराने मानवता धर्म पाळला तर तिर्थक्षेत्र पंढरपूर आणि चैत्यभूमी मधील फरक स्पष्ट करता येईल.

शिवाजी पार्क वरील कँसेट विक्रेते, सामाजिक संघटना, आणि भोजन दान करणाऱ्या संघटना यांचा चाललेला गोंधळ हा आम्ही महामानवाचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो कि आनंदोत्सव साजरा करतो याचे आम्हाला भान राहिलेले नाही. लाखोच्या संख्येने चैत्यभूमी वर आलेल्या भीमानुयांना आपण अंधभक्त बनवित आहोत का? दादर चैत्यभूमी वर बाहेर गावावरून आलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था पाहिली की वाटतं खरचं आमची परिस्थिती सुधारली का? कारण शिवाजी पार्क वर लोक गर्दीचा धुरळा उडत असतो. शहरी बांधव तोंडाला रुमाल लावून इकडे तिकडे फिरत असतात. बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांसाठी मोफत भोजन दान करणाऱ्या स्थानिक सामाजिक संघटना आपला विभाग आणि मुंबईतून मोठ्या प्रमाणात वर्गणी जमा करतात. शासकीय, निम शासकीय कंपन्या आणि मुंबईतून मोठ्या प्रमाणात वर्गणी जमा करतात. शासकीय निम शासकीय कंपन्या आणि बँका आपली जाहिरात करण्यासाठी त्याच्या व्यवस्थापनातील एस.सी, एस.टी (S.C, S.T) कर्मचारी संघटनांना मोफत भोजन दान करण्यासाठी एक लाखापासून दहा लाखापर्यत आर्थिक मदत करित असतात. मुंबईतील कित्येक स्थानिक संघटना विभागातून वर्गणी काडून विभागातच रात्री जेवण बनवून प्लँस्टिक पिशवीत बंद करून सकाळी चैत्यभूमी वर येवून वाटप असतात. बरेचदा ते रात्री बनवलेले जेवण अंबलेले असल्याने खेड्यातील लोक घेतात आणि तेथेच खातात. करोडो रुपयांचा निधी जमा होवून देखील आम्ही बाहेर गावांवरून आलेल्या लोकांची सामुहिक भोजनाची नोंद व्यवस्था गेल्या ६० वर्षात करु शकलेला नाही.

मुंबई आणि महाराष्टातील मोफत भोजन करणाऱ्या चैत्यभूमी वरील सर्व सामान्य आणि कर्मचारी संघटना एकत्र फेडरेशन बनविली तर बाहेर गावावरून येणाऱ्या लाखो लोकांना टेबल खुर्चीत बसवून चांगल्या प्रतिचे जेवन, नास्ता, चहा - पाणी देता येईल. या शिवाय परतीच्या प्रवासाची त्याला गाडीत जेवण्यासाठी जेवणाचे पँकेट देखील देता येईल. सामुदायिक भोजनाने शिवाजी पार्कवर एक शिस्तप्रिय वातावरण निर्माण होईल. सामाजिक संघटनाना सहकार्यातून सहकार कळला तर सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग सापडेल. त्यासाठी आम्ही सर्वानी येवून सामुदायिक एकत्र भोजनाचा उपक्रम राबविला पाहीजे. शिवाजी पार्क मैदानाची उभा राहून पाच लाख आणि बसून तीन लाख लोकसंख्येची क्षमता आहे. त्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरील सर्वच स्टाँल हे मैदानाबाहेर माहिम ते वरळी रोडच्या फुटपाथ वर स्थालांतरीत केले पाहिजेत. शिवाजी पार्क मैदानात एकच भव्य मंडप घालून सर्व बाजूंनी पडदे लावून बंदिस्त केला आणि जमिनीवर संपूर्ण कारपेट टाकले तर त्या परिसरात धुळ उडणार नाहीत. मोफत भोजन दान घेणांऱ्या लोकांची नोंदणी केली तर गाव खेड्यात आंबेडकरी चळवळीचे जाळे तयार होईल. त्यांच्या मार्फत आम्हाला आमची अर्थ व्यावस्था उभी करण्याचा मार्ग सापडेल.

मानुष्य केवळ भाकरीवर जगत नसून त्याला चांगल्या संस्कृतीची गरज असते. शिवाजी पार्कच्या मैदानात अर्ध्या भागावर भोजनची तर अर्ध्या भागात धम्म ज्ञानाची खरी गरज आहे. त्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानांवर ३ दिवस जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात यावे. धम्म परिषदेचे चैत्यभुमीचा परिसर बौद्धमय होईल. प्रबुद्ध भारत हे डाँ. बाबासाहेबांचे ध्येय होते. त्यासाठी गटतट विसरुन शिवाजी पार्कच्या मैदानावर जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्याने केवळ आंबेडकरी चळवळीलाच नव्हे तर बहुजन समाजाला एक नवी दिशा मिळेल. डाँ. बाबासाहेबांच्या ६० व्या महापरिनिर्वाणानंतर खेड्या पाड्यातील सुद्धा आंबेडकरी चळवळीची पोटाची भुक तशी वैचारीक भुक वाढलेली आहे. त्यासाठी विचार मंथन जरुरीचे आहे. बौद्ध धम्म हा मानवी विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्या केंद्रबिंदू मध्ये सामाजिक धार्मिक आणि राजकीय संघटना एकत्र येवून डाँ. बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती यशस्वी करू शकतो. आपण सर्वच मतभेद विसरून सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग स्विकारीत नाही तोपर्यत स्वत:चा आणि बहुजनांचा उद्धार होणार नाही. निदान विचार मंथनाला सुरूवात करा, लगेच कृतीला सुरूवात होईल.

आवहनात्मक मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.