रविवार, २८ जानेवारी, २०१८

● एक त्याग मूर्ती, एक सेवक वृत्ती आणि एक उत्कृष्ट भार्या : डॉ. सविता भिमराव आंबेडकर

● एक त्याग मूर्ती, एक सेवक वृत्ती आणि एक उत्कृष्ट भार्या : डॉ. सविता भिमराव आंबेडकर

लेख -
सुनील खोब्रागडे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

विसाव्या शतकातील भारतीय राष्ट्र आणि भारतीय समाज यांच्यावर ज्या महान व्यक्तीमत्वांचा आत्यंतिक प्रभाव पडला आहे त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वोच्च स्थानावर आहे. या महान व्यक्तिमत्वाला आकार देण्यात ज्या काही मोजक्या व्यक्तींनी पराकोटीचा त्याग केला त्यामध्ये बाबासाहेबांची प्रथम पत्नी रमाई आणि रमाईच्या मृत्यू नंतर १३ वर्षांनी बाबासाहेबांच्या आयुष्यात प्रवेश केलेल्या साविता माई यांचे स्थान सर्वात वरचे आहे.

सविता माईनी बाबासाहेबांच्या उतारार्धातील जीवनात सर्वार्थाने बाबासाहेबांची सावली होऊन प्रत्येक प्रसंगात बाबासाहेबांना सावरून धरले. मधुमेह, न्युरायटीस, उच्च रक्तदाब, संधिवात अशा अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याने पुढील आठ वर्षे प्रज्वलित ठेवले. बाबासाहेबांच्या हळूहळू विझत जाणाऱ्या जीवन ज्योतिची मानसिक ऊर्जा म्हणून त्या अखंड कार्यरत राहिल्या. सविता माईंची प्रेमळ सेवा आणि काळजी पूर्वक केलेली शुश्रुषा यामुळेच आयुष्याच्या शेवटच्या पर्वात बाबासाहेबांची कीर्ती आणि सन्मान अखिल विश्वा मध्ये वाढविणारी महान कार्ये त्यांच्या हातून घडली असे म्हणावे लागेल. मात्र माईंच्या या महान त्यागाची, स्वतःचे आयुष्य पणाला लावून केलेल्या सेवेची कदर करण्याच्या ऐवजी त्यांच्या वाट्याला उपेक्षा आणि टीकाच आली.

खरे तर माई साहेबांचा त्याग एवढ्या उच्च दर्जाचा आहे की - त्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही. तरी ही स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी माई साहेबांचा बावन कशी त्याग समजून घेऊन त्यांचा कायम ऋणी राहिले पाहिजे. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा लाभ घेऊन आज सुख-चैन भोगणाऱ्या प्रत्येक स्त्रीने माई साहेबांचे चरित्र वाचून प्रेरणा घेतली पाहिजे.नव्हे प्रत्येक आंबेडकरी स्त्रीने सविता माईंनी स्वतः लिहिलेले ‘ डॉ. आंबेडकरांच्या सहवासात‘ हे आत्म चरित्र वाचलेच पाहिजे.

माई साहेबांच्या संपूर्ण आयुष्यावर एक वर वरची नजर टाकली तरी लक्षात येईल की, त्यांच्या आयुष्याचा एकूणच प्रवास हा एखाद्या सर्व साधारण स्ञी प्रमाणे नाही. सविता माई म्हणजे एक असामान्य, बुध्दीमान, करुणावान, त्यागमयी स्त्री होती. एका सुख वस्तू सारस्वत ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या माईंचे माहेरचे नांव शारदा कृष्णराव कबीर होते. त्यांचे कुटुंब रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातील डोर्ले या गावचे होय. माई साहेबांचा जन्म २७ जानेवारी १९१२ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील कृष्णराव तत्कालीन मुंबई राज्याच्या आरोग्य खात्यात अधीक्षक पदावर पुणे शहरात कार्यरत होते. त्यामुळे सविता माईचे प्राथमिक व इंटर पर्यंतचे शिक्षण पुण्यातच झाले.

इंटर सायन्स परीक्षेत त्या परशुराम भाऊ महाविद्यालयातुन सर्व प्रथम आल्या होत्या. मुंबईच्या ग्रांट मेडिकल कॉलेज मधून १९३७ साली त्या एम.बी.बी.एस. झाल्या. पदवी पूर्ण झाल्या नंतर त्यांनी त्याकाळचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. माधवराव मालवणकर यांच्या खाजगी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या. याच काळात त्यांनी एम.डी.ची परीक्षा दिली. पण ऐन प्रॅक्टिकल परिक्षेच्या वेळी त्या टाईफाईड, डिहायड्रेशन, बॉईल्स अशा आजाराने खिळल्या व त्यांना पदव्युत्तर पदवी पूर्ण करता आली नाही. त्यानंतर त्यांनी गुजरात मधील एका मोठ्या सरकारी रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केली. परंतु तेथील हवामान न मानवल्यामुळे त्या नेहमी आजारी पडायला लागल्या. यामुळे शेवटी नोकरीचा राजीनामा देऊन त्या मुंबईला परतल्या व पुन्हा डॉ. मालवणकरांच्या दवाखान्यात ज्युनियर डॉक्टर म्हणून रुजू झाल्या.

माईसाहेब व डॉ.बाबासाहेबांची पहिली भेट मुंबईतील विर्लेपार्ले भागात राहणारे अर्थशास्त्र विषयाचे विद्वान डॉ व्हि. के. राव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे मित्र होते. बाबासाहेब मुंबईत आले की आपल्या या मित्राकडे त्यांच्या घरी जात असत. १९४७ च्या मध्यात बाबासाहेब मुंबईत डॉ. राव यांच्या घरी आले होते. त्यावेळी डॉ. राव यांच्या मुलीला (जी सविता माईची मैत्रीण होती) भेटण्यासाठी सविता माई सुद्धा तेथे आली होती. बाबासाहेब त्यावेळी मजूर मंत्री होते.

डॉ. राव यांनी औपचारिकता म्हणून सविता माईंची ओळख बाबासाहेबांशी करून दिली. डॉ. राव यांच्या पत्नीला सुद्धा मधुमेह होता. त्यामुळे त्या डॉ. मालवणकर यांच्याकडे उपचार घेत होत्या. बाबासाहेबांनाही मधुमेह असल्यामुळे डॉ. राव यांनी त्यांना डॉ. मालवणकरांकडून ऊपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपचारासाठी डॉ. मालवणकरांच्या ह्युजेस रोड येथील दवाखान्यात गेले. यातूनच सविता माईशी त्यांचा परिचय वाढला.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व सविता माईंचा विवाह -

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रथम पत्नी रमाई यांचे २७ मे १९३५ रोजी क्षय रोगाने निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा विवाह न करण्याचा निश्चय केला होता. रमाईच्या निधना नंतर अनेक मित्रांनी व सहकाऱ्यांनी बाबासाहेबांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र ते आपल्या निर्धारावर ठाम होते. १९४२ नंतर बाबासाहेबांना मधुमेह व उच्च रक्तदाब याचा आजार गंभीर प्रमाणात जाणवू लागला. यामुळे त्यांनी देखभाल करण्यासाठी व वेळेवर जेवण, पथ्यपाणी याची काळजी घेण्यासाठी एखादी नर्स ठेवावी, असा ही सल्ला त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी व डॉक्टरांनी दिला. मात्र तसे करणे लोक निंदेला कारण ठरेल, म्हणून त्यांनी या सूचनेस नकार दिला. पुढे १९४६ - १९४७ मध्ये त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब याच्या बरोबरच संधिवाताचा ही प्रचंड त्रास जाणवू लागला. यावेळी दिल्लीतील नामवंत डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे सूचित केले की, त्यांनी वेळेवर वैद्यकीय उपचार, वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार व पथ्यपाणी केले नाही तर ते फार काळ जगणार नाहीत. याच काळात त्यांनी मधुमेहाच्या व संधीवाताच्या दुखण्यासाठी डॉ. मालवणकर यांच्याकडे उपचार घेणे सुरु केले होते.

येथे सविता माईशी त्यांचा परिचय वाढला होता. त्याच्याशी झालेल्या परिचयातून व चर्चेतून बाबासाहेबांनी २५ जानेवारी १९४८ रोजी सविता माईना पत्र पाठवून लग्नाची मागणी घातली. अशाच प्रकारे त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी कमलकांत चित्रे यांना २० फेब्रुवारी १९४८ रोजी, दौलतराव गुणाजी जाधव यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी व भाऊराव गायकवाड यांना १६ मार्च १९४८ रोजी पत्र पाठवून आपल्या निर्णया संदर्भात माहिती दिली. सविता माईंचा होकार मिळाल्या नंतर शेवटी सर्व सहकार्यांशी विचार विनिमय करून त्यांनी सविता माईशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्लीत नोंदणी पद्धतीने विवाह केला.

बाबासाहेब व माई साहेब यांच्या विवाहा मागील पार्श्वभूमी व या संदर्भात त्यांचा उपलब्ध असलेला पत्र व्यवहार पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की, सविता माईं मध्ये असीम करुणा, सर्वोच्च त्याग करण्याची वृत्ती आणि स्वतंत्रपणे उचित निर्णय घेण्याची क्षमता हे गुण ओतप्रोत भरलेले होते. सविता माईंनी बाबासाहेबांशी विवाह करताना जात, वयातील अंतर, आजारपण यापैकी काहीही पाहिले नाही. विवाहाच्या वेळी बाबासाहेबांचे वय ५६ वर्षे व साविता माईंचे वय ३६ वर्षाचे होते.

सविता माईंना हे ठाऊक होते की - अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या डॉ. आंबेडकरांना कधी काय होईल यांचा नेम नाही. त्यांच्या कडून अपत्य प्राप्तीची अपेक्षा नाही. तरीही त्यांनी जाणून बुजून बाबासाहेबांशी विवाहाच्या प्रस्तावास मान्यता दिली. अशा प्रकारचा धीरोदात्तपणाचा निर्णय केवळ एक असामान्य स्त्रीच घेऊ शकते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "त्यांच्या बद्दल माझ्या मनात आत्यंतिक सहानुभूती निर्माण झाली. तत्क्षणी माझ्यातील डॉक्टर जागा झाला आणि मी विचार केला की - ही एक अशी गरजू व्यक्ती आहे की, जिला वैद्यकीय मदतीची अत्यंत जरुरी आहे. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन, पथ्य पाणी व नियमित उपचार जर त्वरित दिले तर या व्यक्तीचे आयुष्य निश्चितच वाढणार आहे. माणुसकीच्या व डॉक्टरांच्या निती धर्माशी इमान राखण्याच्या विचाराने मी मनोमन निश्चय केला की, या व्यक्तीसाठी आपण निश्चितच काही तरी केले पाहिजे.” (डॉ. आंबेडकरांच्या सहवासात- डॉ. सविता आंबेडकर पृष्ठ ५१)

• भीमराव नावाच्या हिऱ्याचे कोंदण -

विवाहानंतर माई साहेब म्हणजे भीमराव नावाच्या प्रखर तेजाने तळपणाऱ्या हिऱ्याचे जणू कोंदण बनल्या. एक डॉक्टर म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या प्रकुतीची आपले सर्व वैद्यकीय कौशल्य पणाला लावून सर्वतोपरी काळजी घेतली. बाबासाहेबांनी हाती घेतलेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमां मध्ये माईसाहेब बाबासाहेबांची सावली म्हणून वावरत असत.

सविता माईंशी विवाह झाल्या नंतर बाबासाहेबांच्या हातून अत्यंत महत्वपूर्ण आणि त्यांना जागतिक स्तरावर कीर्ती, मान सन्मान मिळवून देणारे कार्य घडले हे नाकारता येणार नाही. या ८ - ९ वर्षाच्या काळात त्यांनी राज्य घटनेचा मसूदा तयार करणे, राज्य घटनेतील कलमांवर उपस्थित केलेल्या आक्षेपांना व चर्चांना कायदा मंत्री म्हणून उत्तरे देणे, हिंदू कोड बिल तयार करणे, श्रीलंका व नेपाल येथे भरलेल्या जागतिक बौध्द परिषदांमध्ये सहभागी होऊन धम्माचा प्रचार प्रसार याविषयीचा आराखडा मांडणे, मिलिंद कॉलेजची स्थापना व इमारतींचे बांधकाम, फिलॉसॉफी ऑफ हिन्दुइजम, रिडल्स इन हिन्दुइज्म, रीव्होलुशन अँड कॉऊंटर रीव्होलुशन इन इंडिया, बुध्द की कार्ल मार्क्स, दि बुद्धा अँड हिज गोस्पेल, पाली व्याकरण, दि बुद्धा अँड हिज धम्म इत्यादी अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ लिखाण याच काळात बाबासाहेबांच्या हातून घडले.

भंडारा येथील पोट निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर खिन्न आणि उदास झालेल्या बाबासाहेबांना त्यांच्या धर्मांतराच्या  प्रतिज्ञेची आठवण करून देऊन त्यांनी बौध्द धम्मात सामुहिक धर्मांतर करण्यास प्रोत्साहित केले. धर्मांतर सोहळ्यात अत्यंत मोलाची भूमिका त्यांनी बजावली. बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर काही स्वार्थ प्रेरित लोकांनी माईंच्या विरोधात षड्यंत्र पूर्वक बदनामीची मोहीम उघडली. तरी त्यांनी या सर्व मोहिमेला धीरोदात्तपणे तोंड देऊन आपले कार्य सुरु ठेवले.

माईंच्या पाठ पुराव्यामुळेच दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल जस्टीस आणि डॉ. आंबेडकर नेशनल मेमोरियल कमिटी या दोन संस्थांची स्थापना १९६२ साली झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य व ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी त्यांनी स्वत:हून पिपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. जाधव यांच्याशी १९६५ साली पत्र व्यवहार करून त्यांची संमती मिळविली व तसे महाराष्ट्र शासनास कळविले.सन १९८१ साली स्वतःच्या ताब्यातील हस्त लिखिते डॉ. आंबेडकर लिखाण व भाषणे प्रकाशन समितीच्या सुपूर्द केली व वारस म्हणून त्वरित संमती दिली. गुजराततील आरक्षण विरोधी आंदोलनाच्या वेळी आरक्षण समर्थनार्थ अनेक सभा संमेलनात त्या सहभागी झाल्या.

दलित पँथर चळवळीत त्या सक्रीय होत्या. याशिवाय देशभरात अनेक विद्यापीठात, संसदेत आणि अन्यत्र वेळोवेळी हजर राहून त्यांनी बाबासाहेबांचे जीवन व कार्य या विषयावर विद्वत्ता पूर्ण मार्गदर्शन केले. पुणे स्थित सिम्बाँयसिस संस्थेत माई साहेबांच्या प्रयत्नाने व संस्थेचे प्रमुख डॉ. मुजुमदार यांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऊभे राहिले. माई साहेबांच्या प्रयत्नां मुळेच महू येथील जन्म स्थळाची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी होऊ शकली.

भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर `भारतरत्न' किताबाने गौरव केला, त्यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून माई साहेबांनी हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला. आयुष्याच्या अखेरी पर्यंत त्या विविध कार्यात मग्न राहिल्या. अशा या त्याग मूर्तीचे वार्धक्यामुळे दिनांक २९ मे २००३ ला निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मालवती ज्योत प्रज्वलित करणाऱ्या या त्याग मुर्तीची समाजाकडून अत्यंत ऊपेक्षा आणी अवहेलना झाली. मात्र माई साहेबांनी आपल्या कृतीतून एक आदर्श निर्माण केला. त्या आदर्शाची आणि त्यागाची जाणीव प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी ठेवली पाहिजे.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सुनील खोब्रागडे (संपादक)
"दैनिक जनतेचा महानायक, मुंबई"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

शुक्रवार, २६ जानेवारी, २०१८

● आपण भारतीय आहोत (कविता)

● आपण भारतीय आहोत

कवी -
सचिन डांगळे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

निळा झेंडा लाऊन, विना हेल्मेट,
ट्रिपल सीट बाईक समोरून गेली ।
राव पकडायचं द्या सोडून,
त्यानं जायला जागा करून दिली ।।धृ।।

आठ फूटी दांडा त्याला,
मोठा भगवा झेंडा ।
ड्राईव्हर सोबत सारा,
दारू प्यायलेला तांडा ।।१।।

हातवर केला यानं जेव्हा,
त्यांनी "जय महाराष्ट्र" घोषणा केली ।
दारू नव्हतो प्यायलो, हेलमेट होतं,
लायसंस होत, गाडीचे पेपर,
अन् इंशूरंस ही होतं ।।२।।

मागे बायको, मध्ये मोठी लेक,
अन माझ्या पूढ्यात बारकं लेकरू होतं ।
तरी त्यानं आडवलं,
कायद्याचं पूस्तक पढवलं ।।३।।

पावती फाडंच म्हणून,
वातावरण वाढवलं ।
पावती फाडली, गाडी काढली ।।४।।

बायकोने विचारलं काय ओ,
आपल्यालाच का पकडलं ।
माझ्या गाडीवर लावलेल्या राष्ट्र ध्वजाकडे,
पाहून म्हटल "आपण भारतीय आहोत" ।।५।।

कवी -
सचिन डांगळे
(प्रसिद्ध लेखक, कवी एवं ज्लवंत विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

● अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन २०१८ : डॉ. यशवंत मनोहर यांचे अध्यक्षीय भाषण (संपूर्ण मजकूर स्वरूपातील भाषण)

● अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन २०१८ : डॉ. यशवंत मनोहर यांचे अध्यक्षीय भाषण

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• कार्यक्रमाचे नाव -
अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलन २०१८

• आयोजक -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व स्टटिस सेंटर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

• अध्यक्षीय भाषण -
डॉ. यशवंत मनोहर (प्रसिद्ध बौद्ध साहित्यक)

• कार्यक्रमाचे स्थळ -
संविधान नगरी, बाल गंधर्व, पुणे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

बहिणींनो आणि भावांनो,
जय भारत! जय संविधान! जय भीम!

अ. भा. सम्यक साहित्य संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक पद्मश्री डॉ. केइनोक, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पूर्वाध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर बंधू, डॉ.विजय खरे, प्रज्ञा मंचा वरील इतर ही मान्यवर आणि सभागृहात उपस्थित सर्वच जाणकारांनो! मी प्रथमच परशुराम बाडेकर, डॉ. विजय खरे, डॉ.अनिल सपकाळ, डॉ. राजाभाऊ मैलुमे, दीपक म्हस्के, धर्मराज निमसरकर यांच्या सकट सर्व सहकाऱ्यांना त्याच्या धन्यवाद यासाठी देतो की - त्यांनी मला महाराष्ट्रातील एका अत्यंत महत्वाच्या संमेलनाचे अध्यक्ष करून माझा बहुमान केलेला आहे. सम्यक या संकल्पनेची व्याप्ती आपल्या या संमेलनामुळे विस्तारत आहे.

सम्यक साहित्य संमेलन हे मानवी समाजाची आणि साहित्याची ही सतत पुनर्रचना करीत राहणाऱ्या प्रज्ञांची आणि प्रतिभांची निर्मिती व्हावी, यासाठी धडपडणारे संमेलन आहे. या संदर्भातली आपली ताकद वाढवित चाललेले हे सम्यक साहित्य संमेलन या वर्षाच्या संमेलनापासून अखिल भारतीय होत आहे. हा एका अर्थ आपली जबाबदारी अधिकच मोठी करण्याचा आणि आपल्या कर्तव्याचा टोकदारपणा आणि परिघ ही असीम करण्याचा निर्धार आहे, असे मला वाटते. हा सकल्प यशस्वी होवो, अशी संयोजकांना हार्दिक सदिच्छा देतो आणि अख्ख्या परिवर्तनवादी आणि संविधान निष्ठ महाराष्ट्राने आणि देशाने या संमेलनाच्या पाठीशी आपल्या निष्ठांच्या शक्ती सकट उभे राहावे, अशी इच्छा व्यक्त करतो.

आपण भाषणाच्या पहिल्या वाक्यापासून भारतातल्या आणि जगातल्या अजिंक्य परिवर्तन परंपरेशी नाते जोडू. या परिवर्तन परंपरेचा आपल्याला बुलंद करणारा निरोप बाबासाहेबांनी पुढील शब्दामधून सांगितला आहे, ते शब्द असे - "There is Nothing Fixed, Nothing Elemal, Nothing Sanatan, That Everything is Changing, That Change is The Law of Life for Inlividuals As Well As Society." (Annihilation of Caste, BAWS - Vol. I, P. 79) हाच कळकळीचा निरोप जीवनाला सतत प्रयोगशील ठेवणाच्या विज्ञानाचा ही आहे. विज्ञान निष्ठ तत्वज्ञानांचा ही आहे आणि माणसाला तेजोमय करणाऱ्या मानवता वादाच्या विस्डमचा ही आहे. या निरोपाला आपण आपली दिशा मानतो. या दिशेच्या प्रांगणात कोणी ही शोषक नाही, कोणीही शोषित नाही, असा समाज आपल्याला दिसतो. ज्यात विविधता आहे, पण विरोध नाही. जीवन स्वातंत्र्याचा सुंदर उत्सव झाले आहे आणि तरी ही त्यात कोणती विषमता नाही. अशा निरामय मानवी समाजाचे चित्र आपल्या हातात ही आहे आणि डोक्यात ही आहे. या शाश्वत मार्गदर्शक तत्त्वांचा आविष्कार आपल्या जीवनात ही आणि साहित्यात ही व्हावा, अशी उत्कट निष्ठा असलेली माणसे ही आणि साहित्यिक ही आपण आहोत.

बहिणींनो आणि भावांनो,
तुमच्या साक्षीने मला ‘आपण - आपले' या शब्दांची व्याख्या करू द्या. ‘आपण' म्हणजे संविधान निष्ठ भारतीय नागरिक! आदि, अंती निखळ भारतीय! आणि असे असलेले भारतीय आपण मग कुठल्या ही अडचणी शिवाय आदि, अंती निरामय वैश्विक ही होऊ शकतो. कोणत्याही चौकटीत जे मावत नाहीत ते वैश्विक विज्ञान दृष्टी, पुनर्रचना शीलता, मानवा - मानवा मधील परस्पर सन्मान भाव याच गोष्टी मानवतेच्या हिताच्या आहेत असे ज्यांना वाटते ते म्हणजे 'आपण'! विघटन शील परंपरांनी आपल्यावर लादलेले जातीय, वर्गीय, प्रादेशिक आणि धर्माय हित संबंध विसर्जित करणे आणि सर्व कल्याणी मानवत्वाशी नाते जोडणे जीवनाच्या निकोपतेसाठी कसे आवश्यक आहे, असे मानणारे ते ‘आपण'! महाराष्ट्रा पुरते बोलायचे तर आपण फुले, शाहू आणि बाबासाहेबांना अभिप्रेत लोक आहोत. हे माझे लोक आहेत, हेच तुमचे ही लोक आहेत. आपले पणाचा हा आपला अर्थ आहे.

प्रत्येकच व्यक्तीला आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान माहीत नसते पण प्रत्येकच व्यक्ती कुठल्या तरी तत्त्वज्ञानाने केलेल्या सस्काराचा आविष्कार आपल्या वागण्या - बोलण्यातून करीत असतेच. हे संस्कार व्यक्तींच्या आवडी - निवडींची रचना करीत असतात. म्हणजे आवडी - निवडी आणि संस्कार कुठल्या तरी तत्त्वज्ञानाशी प्रतिबद्ध असतात याचा अर्थ प्रत्येकच व्यक्ती प्रत्यक्षा - प्रत्यक्षपणे कुठल्या तरी तत्त्वज्ञानाशी संबंधित असतेच असे म्हणता येते. ही तत्वज्ञाने विवक्षित संस्कृतीची द्योतक असतात


अधिकाधिक परिष्कृत, परिशुद्ध होत जाणारा मूल्यांचा कोश म्हणजे संस्कृती, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय, भगिनीताना ही मल्ये शाश्वत मानली जातात. समाजाला या शाश्वत मूल्यांकडे नेणाऱ्या विविध विचार सरणी मूल्य तयार होतात. या विचार सरणींना साध्याकडे नेणारी साधने असे म्हटले जाते. धर्म, संप्रदाय, वाद, पक्षा, प्रवृत्ती या विवक्षित समूहांचे कल मांडणाच्या विचार सरणीच असतात. काही विचार सरणी देवालाच यय मानतात तर काही त्यालाच जीवन मानतात. म्हणजे विचार सरणीचे देव, ध्येय वा माणूस असे नायक असतात. या नायक त्याची मूल्यांची असे प्रस्थापना म्हणजे शाश्वत प्रस्थापना असते. त्या त्या विचार सरणीच्या लोकांना वाटत असते.

विचार सरणी गटांच्या म्हणजे त्यांच्या हित संबंधांच्या द्योतक असतात. या विचार सरणी कोणत्या तरी चांगल्या वा वाईट, थांबलेल्या वा प्रवाही, समतावादी वा विषमता वादी संस्कृतीच्या प्रतिनिधी असतात. आर्य पूर्व भारतात सिंधु नदीच्या काठी एक सर्व समावेशक आणि प्रगमन शील संस्कृती नांदली. ती प्रकृतितः इहवादी आणि प्रयोग शील होती. ती वर्ण विहीन आणि प्रकृतीमयच होती. स्वातंत्र्य हा त्या संस्कृतीचा जाहीरनामा होता. खुलेपणा हा तिचा स्वभाव होता. ही संस्कृती विज्ञानाच्या मनाने नव नव्या गोष्टी शोधत भिरभिरत होती. थांबणे तिला मान्य नव्हते. चिकित्सेशी फारकत घेणे तिला कबूल नव्हते.

सिंधु संस्कृतीच्या जगण्याच्या या पद्धतीचे तत्त्वज्ञान रचणारे तत्त्वज्ञ म्हणून आदिसांख्य आणि लोकायत यांचा सन्मानाने उल्लेख करावा लागतो. पुढल्या काळात महावीर आणि बुद्ध यांनी या संस्कृतीचे तात्चज्ञानिक भरण पोषण केले. पुढे सम्राट अशोक, जोतीराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर इत्यादी महान प्रज्ञावंतांनी याच भारतीय संस्कृतीला जागतिक वैज्ञानिकांच्या आणि तत्वज्ञांच्या डिस्कोर्स मध्ये परम सन्माननीय करून दाखविले. वेद पूर्व भारतीय संस्कृतीचा हा विज्ञान निष्ठ मूल्यांचा साकल्य सिद्धान्तच भारतीय संविधानात आहे.

इथे एक निरीक्षण नोंदवायला हवे ते हे की या भारतीय संस्कृतीने धर्म संस्थेची निर्मिती केली नाही. धर्म विचार थांबवतो. त्याचे प्रवाही पण गोठवतो आणि माणसाच्या डोक्याला स्थगिती देणे, या डोक्याचे डबक्यात रूपांतर करणे, हे भारतीय संस्कृतीला मान्य नाही. या संस्कृतीने माणसाचे महानायकत्व अबाधित राखण्यासाठी ईश्वर नावाची काल्पनिकता घडविली नाही. माणसाच्या मनाला याने बांध घातला नाही. माणसाच्या ऊर्जेचे अपहरण केले नाही. माणसाला माणसाच्या सर्व वियुक्त (एलिमेट) केले नाही. माणसाच्या बुद्धि स्वातंत्र्याची संभाव्यतांपासून ध्वजा कायम फडकत राहील, असे वातावरण त्यांनी कधी मावळू दिले नाही.

आदिसांख्य, लोकायत, बुद्ध, सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या कोणीही धर्म निर्माण केला नाही. धर्म, ईश्वर, परलोक, पूर्वजन्म - पुनर्जन्म, मोक्ष असे माणसाला विचार विन्मुख करणारे नकार त्यांनी निर्माण केले नाहीत. त्यांनी चिकित्सेला, स्वतःच्या ही आणि समाजाच्या ही पुनर्रचनेला हस्तक्षेपाला आणि नव सर्जनाच्या शक्तीला माणसाचे अस्तित्वत मानले. मी विचार करतो, म्हणून मी माणूस आहे. जुन्याची कठोर समीक्षा करीत मी सतत नव्याची निर्मिती करतो, म्हणून मी माणूस आहे. ही माणसाची नवी व्याख्या त्यांनी जगाला दिली. त्यांचा सिद्धान्त माणसाच्या सार्वभौमत्वाचा सिद्धान्त आहे.

आर्य पूर्व भारतीय संस्कृतीचे आजच्या अनुषंगाने आणखी एक निरीक्षण नोंदवायला हवे. या संस्कृतीच्या तत्त्वज्ञांनी दैव किंवा नियतीच्या बेड्यांमध्ये माणसांची मने अडकवली नाहीत. या संस्कृतीत कोणी सटवी नाही आणि कोणी ब्रह्म नाही. म्हणजे रेषा आखणारे ही कोणी नाही आणि त्या रेषेवर पाचवीला काही लिहिणारा ही कोणी नाही. म्हणजे दैव, नियती, प्राक्तन, नशीब अशी माणसाची कोणतीही फसवणूक या संस्कृतीच्या तत्त्वज्ञांनी निर्माण केली नाही. भारतीय संस्कृतीच्या तत्त्वज्ञांनाची तत्त्वज्ञाने अशी माणसाच्या सार्वभौमत्वाची गर्जना करणारी तत्वज्ञाने आहेत. डी.एन.ए. ला जिवाचा वा जीवनाचा मूलाधार मानले जाते. ते जिवाचे मूळ एकक आहे.


प्राणी किंवा वनस्पती यांच्या पेशीतील त्या प्राण्याचे किंवा वनस्पतीचे गुण विशेष ठरविणारे रसायन म्हणजे डी.एन.ए.! त्यात ही आणि जनुकात ही बदल करता येतो. "आपल्याला अधिक समजदार, अधिक सुसंस्कृत व्हायचे असेल तर स्वयंरचित उत्क्रांतीच्या वाटे वरून जावे लागेल. आपल्या मूलभूत डी.एन.ए. मध्ये बदल करावा लागेल. आपल्या जीवनाचा समग्र अभ्यास करून त्यात दुरुस्ती करणे, याचा पहिला टप्पा म्हणजे जनुकात बदल करून आपण श्वास घेत असलेल्या शरीर संस्थेस उपलब्ध वातावरणात जीवनाचे अस्तित्व टिकवणे, मांस पेशींची अनिर्बध वाढ नियंत्रित करणे या बरोबरच मानवी बुद्धिमत्ता, भावनांचे व्यवस्थापन, रोग प्रतिकारक क्षमता इत्यादी मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या गोष्टीचे नियमन करणे हा आज एक विश्वास आहे. येणाऱ्या नजिकच्या काळात मानवी अंतः प्रेरणा व बुद्धिमत्ते वर मुळात संशोधन होऊन सुसंस्कृत पिढीची निर्मिती होईल." असे स्टिफन हॉकिंग यांनी म्हटले आहे.

डी.एन.ए. आणि जनुके म्हणजे नशीब, दैव, प्राक्तन, नियती! आदिसांख्यांनी, महावीराने, बुद्धाने, जोतीराव फुल्यांनी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या नियतीलाच हरकत घेतली. हस्तक्षेप नोंदवला आणि प्राक्तन, नियती या सर्वां सोबतच महासंग्राम पुकारला. अपरिवर्तनीय काहीही नाही. सर्वच बदलत आहे हे बाबासाहेब म्हणतात आणि त्यांचे हे शक्ति विधान संग्राम शील भारतीय संस्कृतीचा इत्यर्थ आहे, असे म्हणता येईल. बराक ओबामा पाश्चात्य जगातील अशाच एका साहसी मानवी संस्कृतीचा निरोप जगाला देतात. “येस, आय कॅन चेंज..." हा तो निरोप आहे. मला वाटते माणसाला असीम करणारा हा निरोप पहिल्यांदा सिंधु खोऱ्यात बहरलेल्या भारतीय संस्कृतीने जगाला दिला आहे. वैदिक संस्कृती पूर्वी ही हि संस्कृती भारतात होती आणि वैदिक संस्कृती निर्माण झाल्या नंतर तिच्याशी अटी तटीचा संघर्ष करीत ती जोतीराव फुले, भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर अशा अजिंक्य रूपात अस्तित्वात आहे.

वैदिक संस्कृती ही आर्यांच्या वर्चस्वासाठी निर्माण झाली. अध्यात्म, परलोक चातुर्वण्र्य या बरोबरच विषमता आणि शोषण या गोष्टी चिरंतन म्हणून रुजू झाल्या. या संस्कृतीला विषमूतेत कोणताही बदल मान्य नाही. वेद, उपनिषदे पुराणे, महाकाव्ये, मनुस्मृती अशी ही आज वर सुरू असलेली वैदिक परंपरा ब्रह्म, आत्मा, परलोक मार्ग, अमरत्व, स्वर्ग आणि अदृकर्म विपाकाचीच शिकवण देतात. या दोन संस्कृतीं मधला संघर्ष आज ही सुरू आहे.

सिंधूच्या खोऱ्यात जन्माला आलेली भारतीय संस्कृती आणि वेदांपासून सुरू झालेली वैदिक संस्कृती यांच्यात संपूर्ण इतिहासात सतत संघर्ष झालेला आहे. हा दोन मूल्य छावण्यांतला संघर्ष होता. मूलतः तो समता आणि विषमता, अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टी, इहलोक आणि परलोक तसेच शोषण आणि शोषण विहीनता यातीलच संघर्ष होता. हा संघर्ष साहित्यिकांसकट सर्वांनीच समजावून घेण्याची गरज आहे.

आता विचाराचा वा विचार सरणीचा विचार करू. दुथडी भरून वाहणाच्या नदीच्या या काठावरून पलीकडच्या काठावर आपल्याला जायचे आहे, असे समजा. इथे पलीकडचा काठ म्हणजे जिथे जावयाचे आहे, ते निश्चित केलेले ठिकाण. तेव्हा या पुरातून पलीकडे जाण्यासाठी अलीकडच्या काठाशी काही डोंगे आहेत. त्यातील आपल्याला पैलकाठी सुरक्षित पोचवणाऱ्या डोंग्याची, इष्टा - निष्टाचा विचार करून केलेली निवड ही सम्यक निवड ठरेल. एखादा डोंगा उलटू शकतो, एखादा डोंगा मध्य प्रवाहात वाहून जाऊ शकतो. एखाद्या डोंग्यात पाणी शिरून तो बुडू शकतो. एखाद्या डोंग्यात एकाच बाजूने खूप माणसे बसल्याने तो कलंडू शकतो. एखादा डोंगा आपल्याला सुरक्षितपणे पैलकाठी नेऊ शकतो. इथे ध्येय म्हणजे सकल कल्याणी समाज व्यवस्था असे आपण समजू आणि तिथपर्यंत आपल्याला पोचवणारी विचार सरणी ही सम्यक विचार सरणी समजू बॉन ड्युईचा फल प्रामाण्यवाद आपल्याला हे सांगतो की - ध्येय निश्चित करा. त्या ध्येयाप्रत नेणाऱ्या मार्गाची पडताळणी करा. हे मार्ग म्हणजे विचार सरण्या!

विचार सरण्या या साधनांसारख्या असतात. त्यामुळे ठरीव विचार सारणी काहींना प्रिय असते आणि काही तिचा हेका धरतात. खरे म्हणजे जो विचार पुढे ठाकलेल्या आव्हान पुढे मान टाकतो. तो पराभूत होतो आणि स्वतःची अन्वर्थकता गमावतो. युगाच्या पुढे वा निदान युगाच्या सोबत चालण्याच्या आपल्या क्षमतेला तो पार होतो. त्या विचाराच्या शिळ्या कढीला परत परत गॅसवर गरम करून तिथी अन्वर्थकता सिद्ध करण्याचा अनाठाई प्रयत्न करायचा नसतो. कालचा विचार आजच्या समस्यांवर लादायचा नसतो. नव्या समस्या नदी उत्तरे मागतात. नवे नवे उपाय मागतात. विचाराचा वा विचार सरणीचा विषय समस्येची सोडवणूक हा आहे. नि:संदर्भ विचार काळाचा हात सुटलेला विचार नव्या समस्यांसाठी वापरू नये. तर ही नवी समस्या सोडवू शकणारा जिंदादिल विचार जन्माला घालावा.

ज्या किल्लीने कुलूप उघडेल, तीच किल्ली वापरा. ज्या ज्या उत्तराने प्रश्न सुटेल तेच उत्तर वापरा. ही किल्ली लागत नाही तर दुसरी शोधा. एक विचारसणी त्या साकल्यापर्यंत पोचवत नसेल तर दुसरी निर्माण करा. तिसरी निर्माण करा. ध्येयापर्यंत पोचणे महत्त्वाचे. विचार सरणीच्या संदर्भात भांडत बसणे महत्वाचे नाही. बुद्ध ही धम्माला जसा आहे तसाच पुढे न्या, हे सांगत नाही तर नव्या आव्हानांच्या नुसार त्यात बदल करा हे सांगतो. जो धम्म जीवना सोबतच नव्हे तर जीवना पुढे उजेडाची झाडे लावीत चालेल. तो धम्म आपली अन्वर्थकता कधीच गमावणार नाही. याचा अर्थ धर्माला म्हणजे जीवन उजळून टाकू इच्छिणाऱ्या तुमच्या तत्त्वज्ञानाला शिळे होऊ देऊ नका. त्याची पोथी करू नका. ज्या तत्त्वज्ञानाची पोथी होत नाही तो विचार कधी कालबाह्य होत नाही. म्हणून विचाराला सतत अन्वर्थक करीत राहावे लागते.

विचार कुठे ही थांबत नाही, असे या संदर्भातच बाबासाहेब म्हणतात - "रानडे, गांधी आणि जीना" या भाषणाच्या शेवटी बाबासाहेब महानायकांचे वैचारिक निष्कर्ष पुढे नेऊ नका, हे सांगतात. त्याची त्या त्या काळातील नव्या समस्यांना भिडणारी प्रज्ञा डोक्यात घ्या. म्हणजे स्वतः प्रश्नांची सोडवणूक करणारे विचार निर्माण करा, हे सांगतात. संविधान सभेतील शेवटच्या भाषणात जेफर्सन उद्धृत करून ते नव्या पिढ्यांवर आपले विचार लादू नका, त्यांचा विचार त्यांना करू द्या, अन्यथा केवळ मेलेल्या पिढ्या जन्माला येतील, हे सांगतात. म्हणजे व्यक्तीचा आणि पिढ्यांचा जिवंतपणा विचार करण्याच्या वृत्तीशी आणि क्षमतेशी ते जोडतात.

एकोणिसाव्या शतकात उदयास आलेल्या फल प्रामाण्यवादाशी या संदर्भात बुद्धाची ही आणि बाबासाहेबांची ही मीमांसा जुळते, असे मला वाटते. चालर्स पर्स आणि जॉन ज्यू हे फल प्रामाण्यवादी तत्व मानले जातात. ड्यूई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कोहनिया मधले अत्यंत आवडते प्राध्यापक होते. आपण विचार करतो म्हणजे कशी करतो. या विचाराचे मूळ असमाधानात असते. या असमाधानकारक स्थितीची पुर्नरचना करणे आणि समाधानकारक रूप निर्माण करणे, हे तिचे उद्दिष्ट असते. याचा अर्थ अधिक समाधानकारक, सुसंगत, सुरचित, दोष विहीन स्थिती निर्माण करतो तो विचार किंवा विचार सरणी सत्यलक्ष्यी वा मूल्यलक्ष्यी असते. म्हणजे आपल्या गरजा, आपले सामूहिक ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगी ठरेल, ती विचार सरणी स्वीकारली जाते. अनेक विचार सरणी असतात पण आपण त्यापैकी व्यावहारिक निकषावर उतरेल ती विचार सरणी उपकारक मानतो. कारण ती मूल्यांच्या संदर्भात अधिक उज्वल आणि अधिक उपकारक असे फळ आपल्याला देते.

कालामांना स्वतःच्या सदविवेक बुद्धीला जे मान्य होईल तेच स्वकारा असे बुद्धाचे सांगणे आहे. बाबासाहेब मला अंधभक्त नकोत, असे सांगतात आणि दीक्षाभूमीवर धम्म स्वीकार प्रसंगीच्या भाषणात धम्माचा स्वीकार जाणिवेने करा म्हणजे विचार पूर्वक, चिकित्सा पूर्वक करा, असे ते सांगतात आणि बावीस प्रतिज्ञा मध्ये संपूर्ण वैज्ञानिकता भरून ठेवतात. बुद्ध आणि बाबासाहेब हे दोघे ही त्यांचा उपयोग नाही, ती टरफले बाजूला फेकायला सांगतात आणि विचार, विचार सरणीला निक्या सत्वाचे प्रमाण लावतात. जंगलात शिंशप वृक्षाची खूप पाने आहेत. असेच विचारांचे आहे. मी तुम्हाला या अवाढव्यतेतून फक्त मानवी जीवन अतदीप होण्यासाठी वा सर्व कल्याणी होण्यासाठी आवश्यक तेवढेच सांगितले. बुद्धी असे उपयुक्ततावादी इष्ट फल प्रामाण्यबादी आहेत आणि बाबासाहेब ही प्रमाण्यवादीच आहेत. ते कुठे ही गोंधळत नाहीत. त्यांची "सब्बे सत्ता सुखी होन्तु" या इहवादी ध्येया वरची ही पकड पक्की आहे आणि तिथे हमखास पोचवणाऱ्या विचार सरणी वरची आणि तिच्यात गरजे प्रमाणे भर घालण्याऱ्या त्यांच्या क्षमते वरची पकड ही घट्ट आहे.

जीवन अर्थपूर्ण करू पाहणाऱ्या गृहस्थांनी ही आणि साहित्यिकांनी ही बुद्धाचे. बाबासाहेबांचे आणि विज्ञानाचे हे पद्धती शास्त्र नीट लक्षात ठेवायला हवे. इथे वैज्ञानिक नीती नावाची गोष्ट संभवते काय? या नीतीची काही सूचक सूत्र मांडता येतील काय? या सूचक सूत्रांचा समता, स्वातंत्र्य, बंधुता या महामूल्यांशी संबंध जोडता येईल काय? आपण आता या प्रश्नांचा विचार करू. विज्ञान हे एक पद्धती शास्त्र आहे, ते कायम पुर्नरचनावादी पद्धती शास्त्र आहे. शास्त्राची नव निर्माणशील प्रतिभा मांडते. अभ्युपगमाला इंग्रजीत हायपोडिसीस म्हटले. एखादा अभ्युपगम जाते. अभ्युपगम म्हणजे एखाद्या सिद्धान्ताची कल्पना! अभ्युपगमाची सत्यता सिद्ध करण्यासाठी अनेक निरीक्षणे नोंदविली जातात. निरीक्षणे सत्य असली तर अभ्युपगम सत्य ठरतो. जे आहे त्याच्या पलीकडे जाणारे विज्ञान हे प्रकृतितः बंडखोरच असते. विज्ञान बंडखोर असते. याचा अर्थ वैज्ञानिकाचे किंवा माणसाचे मनच बंडखोर असते. त्यामुळे माणूस या शब्दाचा अर्थ डबके असा कधीच होत नाही. माणूस या शब्दाचा अर्थ प्रवाहित्व असाच आहे. थांबत नाही, सतत वाहत राहतो आणि सतत पुढे पुढेच जात राहतो, असेच माणसाचे वर्णन करायला हवे.

माणसाच्या जगण्यानेच माणसाला तर्कशील केले. अडचणींचा अभ्यास जगताना येणाऱ्या करता करता माणूस तार्किक झाला. अडचणींनी आणि उणिवांनी त्याला बंडखोर केले. पुढे जाण्याच्या प्रवृत्तीनेच माणसाला शास्त्रज्ञ केले, कवी आणि वैज्ञानिक केले. अराजकात समाधारी असणारा माणूस कधी ही होत नसतो. वैज्ञानिक ही होत नसतो. अधिक चांगल्या व्यवस्थेचा हव्यास, अधिक उपकारक रचनेचा हव्यासच माणसाला कवी करतो किंवा शास्त्रज्ञ करतो. तो गृहीतकाला वा अभ्युपगमाला अनेक कसोट्या तपासतो. सिद्धान्ताची पण निरीक्षणांच्या लावून पुन्हा तपासणी करतो. आपल्या चुका तो मान्य करतो. नवी निरीक्षणे उभी करतो. नवे पुरावे उभे करतो. वैज्ञानिकाला कोणतेही शब्द प्रामाण्य मान्य नसते. तो प्रयोग प्रामाण्यवादी असतो. श्रद्धा म्हणजे पुरावा नसलेली समजत. जिची पडताळणी करता येत नाही, ती श्रद्धा अपरिहार्यच असते. हाती आलेल्या सिद्धान्ताला आंधळ असणे अंतिम मानणे, ही शास्त्रज्ञाच्या प्रकृतीत बसत नाही. एक अप्युपगम शक्य झाला की त्यातूनच नवे अभ्युपगम उगवत असतात आणि शास्त्रज्ञाला खुणावत असतात. सिद्ध झालेला कोणता ही अभ्युपगम त्यामुळे त्याच्यासाठी शेवटचा कधीच नसतो. त्याचा हा अभ्युपगम वा शोध नेहमीच शेवटच्या शोधाच्या आधीचा असतो. कारण तो मु्ल तत्त्ववादी असतो. तो कधी ही मूल तत्त्ववादी होत नाही. त्याचे विधान कधीही अंतिम विधान नसते, पण त्या त्या वेळचे त्याचे विधान सर्वात अन्वर्थक विधान असते.

विज्ञानाचे हे पद्धती शास्त्र आहे. हे पद्धती शास्त्र अध्यात्या प्रमाणे वा दैववादा प्रमाणे निश्चितार्था नाही. म्हणजे Confemist नाही. अनंत संभाव्यता त्याने गृहीतच धरल्या आहेत. विज्ञानाला ईश्वर, आत्मा, स्वर्ग, नरक, परलोक या गोष्टी अमान्यच आहेत. Being And Becoming असे विज्ञान तत्व आहे. Being म्हणजे मानव प्राणी हा मानव सतत घडण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया म्हणजे माणसाची नव नव्याने फुलण्याच्या शक्यतांचीच प्रक्रिया आहे. अपरिवर्तनीय काहीही नाही. सर्वच सतत बदलत आहे. याचा अर्थ माणूस म्हणजे सतत घडण शिलता! माणूस ही निर्मिती आहे आणि खुद माणूस ही निर्मितीची एक अखंड प्रक्रिया आहे.

इथे विज्ञान आणि इहवाद विज्ञान आणि बुद्धिवाद, इहवाद आणि पुर्वनाशीलता, विज्ञान आणि समता या गोष्टी एकत्र येतात. निदान भारतीय संदर्भात तरी धर्म, जाती आणि गरिबी - श्रीमंती या सर्वच गोष्टी ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. विज्ञानाला ईश्वर ही मान्य नाही आणि विषमता ही मान्य नाही. विज्ञान अधिक पूर्णतेचा सतत शोध घेत चाललेले आहे. म्हणजे माणसाच्या परिपूर्णतेचा शोध हे विज्ञानाचे नीतीशास्त्र आहे, असे म्हणता येते.

मानवी जीवनातील खरी समस्या नैतिकतेचीच आहे. धर्म, ईश्वर, परलोक या मागनेि निर्माण केली गेलेली नीती माणसाला दुय्यमत्व देते. त्याला पत्रकाशित आणि परावलंबी करते. माणसांमध्ये धर्माचे समूह निर्माण करते. एकूणच माणसे जी धर्माच्या गटांमध्ये विभागली नव्हती. त्या माणसांना धर्म वेगवेगळ्या गटात वाटतात. विभाजनाची ही प्रक्रिया परकेपणाच्या भिती निर्माण करणारी प्रक्रिया असते. हे करणारी सत्ता सक्त माणसेच असतात आणि ते या विभाजनात त्यांच्या त्यांच्या ईश्वरांना सामावून घेतात आणि त्यांना आपल्या वर्गाच्या हित संबंधांचे रक्षण करणाच्या मॅनेजरची भूमिका देत असतात. तसेच वणचे आणि जातीचे ही आहे. वर्ण, जाती, उपजाती यांचे नियोजन हे वर्चस्व प्रस्थापनेसाठीच आकाराला आलेले नियोजन असते. हे नियोजन विज्ञानाच्या एकूण प्रकृतीत वा त्याच्या एकूणच पद्धती शास्त्रात बसत नाही.

विज्ञान हे मानते की मूल्यांचे आणि नीतीचे महत्व जाणण्याची तरतूद माणसात आहे आणि तशी क्षमता ही त्याच्यात आहे. विज्ञान मानवी जीवनाची निर्मिती विश्वाची निर्मिती कशी झाली. हे तर सगळेच पण  विज्ञान मध्ये ही आणि माणसा मध्ये ही सारखी स्थित्यंतरे कशी होत आहेत, तेही सांगते. व्यक्तीच्या स्वायत्त व्यक्तिमत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून विचार करणे आणि या विचारात विकास घडवून आणणे ही विज्ञानाचीच आहे. विज्ञान निष्ठ माणसाचीच ती केंद्रीय प्रक्रिया विज्ञानाची म्हणजे वृत्ती आहे. हा माणूस सारखा बदलत आणि विकसत आलेला आहे. निसगनेि जे दिले ते त्याने केवळच टिकवून ठेवले, असे नाही तर त्याने निसर्गाच्या मदतीने एक नवे, एक अनुकूल आणि अधिकाधिक चांगले जगता येईल, असे विश्व निर्माण केले.

समाज रचना त्याला निसर्गाने दिली नाही. ती त्याने निर्माण केली. निसर्गातल्याच असंख्य गोष्टी या माणसाने विज्ञान, मनाने बेचल्या आणि त्यातून असंख्य नव्या नव्या गोष्टीची रचना तो करीत आला. निसर्गाला अनुकूल करून घेत त्याने मानवी जीवनाचे सौंदर्य विश्व निर्माण केले. नीतीचे महत्त्व जाणणारा माणूस ही या धडपडीतून साकार झाला. आपले जगणे विधायक, जगण्या योग्य, सर्जन शील, शांततामय आणि सुरक्षित व्हावे. या संबंधीच्या त्याच्या इच्छा ही प्रकट होत गेल्या. नीतीचा उगम या त्याच्या जीवन अधिक चांगल्या पद्धतीने जगण्याच्या गरजेत आहे. विज्ञानाने हे सांगितले की - एकूणच मानव जातीचे जैविक मूळ एकच आहे. निसर्गा मधील इतर वस्तूं प्रमाणेच मानव प्राणी ही अणू मधूनच निर्माण झालेले आहेत आणि माणसाला केवळच बुद्धी आहे, असे नाही तर त्याच्यात निसर्गतःच एक विवेकी आहे. पृथ्वीच्या पाठी वरील सर्व स्त्रिया आणि पुरुष हे भाऊ - भगिनी आहेत. हे तत्व विज्ञानाच्या या सूत्रां मधूनच आपल्याला मिळते आणि ते महान नैतिकतेचे आधारभूत तत्त्व आहे.

समता, भगिनीता आणि बंधुता, स्वातंत्र्य, विवेक बुद्धी, पुनर्रचना शीलता, धर्म शीलता, जात्य शीलता अशी ही विज्ञानाच्या पद्धती शास्त्रातून संभवणारी नीती पूर्णतः इहवादी आहे. या नीतीत कुठे ही ईश्वर नाही. आत्मा नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म आणि परलोक ही नाही. ती पूर्ण बुद्धीवादी आणि इहवादी नीती आहे. ही नीती माणसाला सतत वाहता राहायला सांगते. ती माणसाला कुठे ही गोठू देत नाही. त्याचे डबके होऊ देत नाही. ही नीती माणसाला कुठे ही थांबू देत नाही. त्याला मूल तत्त्ववादी होऊ देत नाही. ही विज्ञान मीती निरंतर घडण शील नीती आहे. ती प्रयोग शील म्हणजे सतत पुनर्रचना शील नीती आहे. ही विज्ञान मीती अध्यात्माच्या, धर्माच्या नीती पेक्षा माणसाला महान करणारी नीती आहे. त्याचे माणूसपण जपणारी आणि सतत नव नव्या पूर्णकाकडे त्याला नेणारी ही नीती आहे. ही विज्ञान नीती मानवी बुद्धीच्या पूर्ण स्वातंत्र्याची नीती आहे. ही माणसाच्या साकल्याची नीती आहे आणि ती माणसालाच जीवनाचा एकमेव महानायक मानते.

विचाराचे आणि जीवनाच्या प्रगतीचे माणूस हेच एकमेव - द्वितीय केंद्र आहे, असे ती मानते. ही नीती कोणत्याही अर्थाने आणि कोणत्याही संदर्भात माणसाला परावलंबी, पर प्रकाशित होऊ देत नाही. ही माणसाच्या स्वयं प्रकाशनाची आणि त्याच्या पूर्णत्वाची ही नीती आहे. ही नीतीच माणसाच्या बुद्धीचा आणि मानवत्वाचा समान सन्मान करणारी नीती आहे. माणसाला स्वयं प्रकाशित करणारी हीच नीती जगाच्या पाठीवर प्रथम बुद्धाने सांगितली आणि हीच नीती विश्व सौंदर्याची एक संपूर्ण नवी रचना जगाला देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही सांगितली. ही नीती पूर्णतः विज्ञान निष्ठच आहे. शेवटी नीतीचे प्रयोजन काय असते? नीतीचा विषय आणि उद्देश काय असतो? माणसाच्या सन्मानाची प्रस्थापना या शिवाय नीतीचा आणखी दुसरा कोणता हेतू असू शकतो?

कोणत्याही माणसाच्या सन्मानाला इजा पोचणार नाही अशा मानवी सन्मानाने मोहरणारा समाज हीच नीतीची व्याख्या असायला हवी. बाबासाहेब याच नीतीचे चित्र 'एक व्यक्ती, एक मूल्य' या चार शब्दात काढतात. ही नीतीच मानवाला मानवी विस्डम देणारी किंवा मानवी जीवनाला समतोलाचे सौंदर्य देणारी नीती आहे. लोकशाहीच्या आधी युद्धे करून माणसे सत्ता हस्तगत करीत. ग्रामणी म्हणतात. त्याप्रमाणे सत्ता सक्ती आणि संमती अशी दोन प्रकारची असते आणि कुठल्या ही पद्धतीने सत्ता हाती आली की सत्ताधारी वर्ग आपले वर्चस्व न्याय्य ठरवणाऱ्या आणि ते वर्चस्व चिरंतन करणाऱ्या विचारांची बांधणी करतोच. सत्तेत येणाऱ्या पक्षाला लोकशाही अशी मुभा देत नाही. लोकशाही सर्व लोकांच्या समान हिताच्या मूल्यांची आधीच रचना करून ठेवते. अशी मांडणी लोकशाही आपल्या संविधानातून करून ठेवते.

संविधान हा शब्द राष्ट्राच्या कल्याणाचाच शब्द असतो. त्यामुळे लोकशाहीला एका नैतिकतेचे रूप प्राप्त होते. हे मूल्यादर्शन प्रत्येक नागरिकाच्या जगण्यातून निर्भयपणे आणि सन्मानाने उगवतील यासाठी शासन कर्त्यांनी कार्य करायचे असते. शासन कर्ते हे या मूल्य दर्शान प्रत्यक्षात उतरवणारे लोकशाही सेवक, संविधान सेवक वा लोक सेवक असतात. हे लोक सेवक संविधान निष्ठ असावे लागतात. पूर्वीच्या काळचे राजे रजवाडे मनः पूत वर्तन करीत असत. ते त्यांच्या हिताचा आणि त्यांचे वर्चस्व टिकेल या पद्धतीनेच कारभार करीत. लोकशाहीत कोणालाही राजांसारखे वा हुकुमशहा सारखे वागता येत नाही. कारण शासन कर्ता सार्वभौम नसतात. सर्वच लोकांच्या समान हिताची रचना पुरस्कारणाऱ्या संविधानासाठी लोकशाही सार्वभौम असते. म्हणजे लोकशाहीचे संविधान हा प्रकृतितःच शाश्वत नीती मूल्यांचा ग्रंथ असतो. भारताचे संविधान असाच महत्वपूर्ण नीती मूल्यांचा ग्रंथ आहे.

जगा आणि जगू द्या. सन्मानाने जगा आणि सन्मानाने जगू द्या. तुम्ही स्वतंत्र व्हा आणि इतरांच्या ही स्वातंत्र्याचा आपल्या स्वातंत्र्या इतकाच सन्मान करा, ही मानवी नीती सर्वांच्या हिताची आहे. ती कोणा राजाच्या वा राज्य कर्त्या पक्षाच्या हिताची नाही तर ही जी ती सर्वांनाच समान सन्मानाचे अवकाश प्राप्त करून देणारी नीती आहे. वर सांगितली ती विज्ञान नीती अशीच आहे. तिच्यातून विषमता व शोषण कुठे ही सूचित होत नाही. तिच्यातून देव - दैववाद, नियती, प्राक्तन वा नशीब कुठे ही वित होत नाही. माणूस विवेक शील आहे. स्वातंत्र सर्जक आणि प्रयोग शील आहे. मानवी प्रजेला, त्याच्या अन्वेषण शक्तीला वा पुनर्रचना शीलतेला थांबवणारे वा दुय्यमत्व देणारे काहीही या विज्ञान नीतीला मान्य नाही. वाहते पाणी हा या नीतीचा स्वभाव आहे. प्रगमन शीलता हे तिचे बिंद्र आहे. स्वातंत्र्य हे तिचे प्रयोजन आहे. जावे पुढे त्यापुढे हा अधिकाधिक उज्ज्वलतेचा ध्यास हाच तिचा ध्यास आहे.

अध्यात्माची नीती माणसाला दुय्यमत्व देते. त्याचे नायकपण नाकारले. काल्पनिक देव निर्माण करून त्याला प्रामुख्य देते. अंधश्रद्धांचा कारखाना निर्माण करते. माणसाच्या बौद्धिक शक्तीला पंगळे करते. त्याची सर्जन शीलता नाकारते. स्थिती शीलतेचे तिच्यातील सामाजिक विषमतेचे धुरीणांच्यासाठी समर्थन करते. माणसाला डांबण्यासाठी पारतंत्र्याचे विविध पिंजरे निर्माण करते. काही धोड़या लोकांना ही नीती डोक्यावर घेते आणि असंख्य लोकांची फसवणूक करीत पायदळी तुडबते. विषमता ही नीती असूच शकत नाही. शोषण ही नीती असूच शकत नाही. परद्वेष ही नीती असूच शकत नाही. फसवणूक ही नीती असूच शकत नाही. कोणत्याही संदर्भात आणि पद्धतीने, कोणत्याही माणसाचे स्वातंत्र्य आणि सन्मान पायदळी तुडवणे, ही नीती होऊच शकत नाही. समतेला नाकारणे, ही नीती होत नाही. पारतंत्र्याचा पुरस्कार ही नीती होऊच शकत नाही. कोणाचे ही भले असह्य वाटणे, ही नीती होऊ शकत नाही. ती राजांनी सांगितली तरी नीती ठरत नाही. ती कोणा तत्त्वज्ञाने सांगितली तरी नीती उरत नाही. धर्माने सांगितली तरी ती नीती ठरत नाही आणि काल्पनिक शिवराच्या तोंडून संगितली गेली तरी ती नीती ठरत नाही. अत्याचार ही नीती होत नाही. अन्याय ही नीती होत नाही आणि कोणत्याही प्रकारची सामाजिक, आर्थिक आणि स्त्री - पुरुषांमधील विषमता कधी ही नीती होऊ शकत नाही. म्हणजे अनेक धर्म, देव, तत्वज्ञाने आणि ग्रंथ भारतात ही आणि जगात ही जाहीरपणे अनीतीचाच पुरस्कार करीत असतात आणि या अनीतीलाच ते नीती म्हणायच्या प्रधा निर्माण करीत असतात.

आपण मात्र माणसावर चौफेर अन्याय करणाऱ्या अनीतीला नीती मानतच नाही. विषमतेला, शोषणाला आणि अन्यायाला वंदनीय वा पवित्र माना अशी व्यूह रचना शोषक करीत असतात. बहुसंख्य लोकांना वंचित, दुय्यम, अविचारी आणि पर्वत ठेवणाच्या शोषकांच्या नियमांना नीती म्हणायची सवय धर्माच्या मदतीने लावली जाते. ही पिळवणुकीची रचना असते. ही अमानुष पद्धती असते. हि नीती नसते, ती पूर्णतः अनीतीच असते. या वैदिक अनौतीच्या विरोधातच लोकात, बुद्ध यांनी आणि पुढे बाबासाहेबांनी नितीचे आंदोलन उभे केले. या नीतीच्या आंदोलनाची मुळे वेद पूर्व काळातच सिंधु खोऱ्यात बहरलेल्या भारतीय संस्कृतीत आहेत. साहित्यिकाच्या साहित्य कृतीतील आशय, त्यातील मर्म आणि हे सर्व प्रकाशित करणारा शब्द नैतिकच असतो. ही नैतिकता साहित्यिकाने प्रमाण मानलेल्या विचार सरणीची द्योतक असते. याचा अर्थ साहित्य कृतीत विचार सरणीचा उच्चार वा वर्णन येणे अपरिहार्यच असते असे नाही. या नैतिकतेच्या इच्छा साहित्य कृतीतील शब्दांमधून, प्रसंगा मधून आणि साहित्य कृतीतील संपूर्ण आशय आणि आकृती यांच्या एकजीव बंधातून फुलत असतात.

साहित्य कृतीत साहित्यिकाच्या नीतीचे वर्णन वा उच्चार नसतो, तर तो साहित्य कृतीरूप सौंदर्याविष्कार असतो. साहित्यिकाच्या नीतीचे सौंदर्यात रूपांतर झालेले असते. त्याची जीवन मूल्येच त्याची नैतिकता झालेली असते आणि त्याची नैतिकताच सौंदर्य झालेली असते. हे सौंदर्य जीवनातील अखिल कुरूपता अधोरेखित करीत, त्या कुरूपते ला हस्तक्षेप करीत निरामय सौंदर्य झालेले असते. साहित्य कृतीतून या सौंदर्याची प्रस्थापना झालेली असते. या सौंदर्याला सौंदर्य यासाठी म्हणायचे असते की - ते कोणतीही कुरूपता मान्य करीत नाही. माणसाच्या सन्मानाला इजा होईल, अशी कोणतीही तरतूद त्यात नसते. जीवनातील कुरूपतेचे अत्यंत प्रभावी चित्रण साहित्य कृतीत होतेच, पण ते विघातक म्हणूनच होते. जहराचे चित्रण जहर म्हणूनच केले जाते. जहराला दूध म्हणा असे सांगण्याचा दुष्पषा साहित्य कृतीतील सौंदर्याला शक्य नसतो. कारण सौंदर्य ही सकल माणसांच्या सन्मानाचीच नीती असते. या नीतीचा जन्म सदविवेकाच्या पोटी झालेला असतो.

सार आणि असार, इष्ट आणि अनिष्ट, विधायक आणि विघातक यांचे वर्गीकरण करते त्या बुद्धीला सदविवेक बुद्धी म्हटले जाते. शोषकांची सदविवेकाची व्याख्याच उलटी असते. ती मानवी सन्मानाच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने जे विघातक असते त्याला सौंदर्य म्हणते. जातीय आणि आर्थिक शोषणाला ती सौंदर्य मानते. त्यांच्या म्हणजे मूठभर शोषकांच्या वा वर्चस्वीच्या हिताचे आसते ते सौंदर्य अशी त्यांची सौंदर्याची व्याख्या असते. संस्कृतातले सर्व साहित्य सिद्धान्त असे वर्ण संस्थेच्या, पुरुषार्थ विचाराच्या अनुषंगाने रचले आहेत आणि ते केवळ मूठभर अभिजनांच्या हित संबंधाचे डोल वाजवणारे सिद्धान्त आहेत. रस सिद्धान्ता सारख्या या सिद्धान्तांना साहित्य सिद्धान्त म्हणणे हे अडाणी पणाचेच आहे. ते मूठभरांच्या हित संबंधाची सेवा करणारे गुलाम सिद्धान्त आहेत आणि या मूठभर लाभार्थानी दुय्यम करून ठेवलेल्या सर्व विराट वंचितांचे आहे. आपल्याला वंचितता निर्मूलनाचा, विषमता निर्मूलनाचा, शोषण निर्मूलनाचा आणि सौंदर्याची प्रथापना करणारा सौंदर्य सिद्धान्त हवा आहे. आपण त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. जाती प्रमाणे, धर्मा प्रमाणे, वर्णा प्रमाणे, वा वर्षा प्रमाणे त्या त्या व्यक्तीचे वेगवेगळे मूल्य ठरावे. हा दुष्ट प्रस्तावच आपल्याला मान्य नाही. उलट जाती, धर्म, वर्ग आणि वर्ग या चौकटी तोडून नितळ माणूस झालेल्या माणसाचा सौंदर्य सिद्धान्त आपल्याला हवा आहे. अभिजनांचे सौंदर्य सिद्धान्त सौंदर्य मान्य नसलेले, सौंदर्य माहीत नसलेले, सौंदर्य द्वेष्टे आणि सौंदर्य शत्रू सिद्धान्त असतात. त्यांचे हे सौंदर्य द्वेष सिद्धान्त विषमतेच्या नीतीचा सौंदर्य म्हणून पुरस्कार करतात. ते जीवनातील असुंदराला सुंदर म्हणतात आणि जीवनातील सुंदरते वर कुऱ्हाड चालवतात.

जीवनातील असुंदराला सुंदर ठरवणाऱ्या, विषमतेला वंदनीय आणि सुंदर ठरवणाऱ्या त्यांच्या सिद्धान्तांना आपण सौंदर्य सिद्धान्त मानावे, अशी त्यांची गळा कापणाऱ्या केसाची असावी तशी इच्छा असते. त्यांचे जीवनातले सर्व आदर्श शोषणाचा पोवाडा गाणारे आदर्शच असतात. आपण या आपल्या मृत्यूच्या सिद्धान्तांना सौंदर्य सिद्धान्त मानू नये आणि आपण मानतही नाही. सिंधु संस्कृतीच्या प्रकाश खोऱ्यात जन्माला आलेल्या इहवादी, वर्ण संस्था नसलेल्या आणि माणसांना दुय्यम न मानणाऱ्या भारतीय संस्कृतीचे प्रमाण शास्त्र आपण मानतो.

आदिसांख्य, लोकायत आदिजैन आणि बुद्ध या भारतीय संस्कृतीच्या तत्ववेत्यांना आपण आपल्या नीतीचे शिल्पकार मानतो. पुढे हीच नीती फुले - आंबेडकरांनी अजिंक्य म्हणून जगापुढे मांडली. हीच भारतीय संस्कृतीची नीती भारतीय संविधानात आहे. झाडातून, वेल मधून फुले यावीत. तसे या नीती मधून मानवी सन्मानाची प्रस्थापना करणारे सौंदर्य उगवते, असे आपण या आपल्या सौंदर्य शास्त्राला आपण सम्यक सौंदर्य शास्त्र हे नाव देऊ शकतो.

सिंधु खोऱ्यातील सौंदर्य संस्कृतीची रचना नागवंशांच्या प्रज्ञावंत लोकांनी केली. आदिसांख्य, लोकायत आणि पुढे बुद्ध हे याच संस्कृतीच्या पोटी जन्माला आले होते. म्हणून आपण स्वतःला अपेदिक, अनार्य, अब्राह्मण म्हणू नये. ध्वनी उमटला तरच प्रतिध्वनी उमटतो. झाड असले तरच त्याची सावली पडते. आपण स्वतःला प्रतिध्वनी म्हणून स्वत:कडे दुय्यमत्व का ध्यावे? आपण स्वतःला झाडाची सावली मानावे, पण झाड मात्र मानू नये. हे योग्य नव्हे. म्हणूनच आपण स्वत:ला द्रविड म्हणावे आणि बाबासाहेबांनीच आपण सर्वच मूळच्या नागवंशाचे लोक आहोत हे सांगितले. आपली सन्माननीय मूळे त्यांनी आपल्याला सांगितली. म्हणून सन्मानाने आपण स्वतःला नाग म्हणवून घ्यावे. आपल्याला स्वतंत्र नाव आहे. आपण सापेक्ष होऊ नये. गौरवाची बाब अशी की - सिंधु संस्कृतीतून उणवलेल्या या नागसूयनी जगाला प्रथमच इहवादी आणि समतावादी तत्वज्ञान दिले. हे जगाच्या पाठीवरचे संपूर्ण मानवी स्वातंत्र्याचे, समतेचे आणि बंधुत्वाचे तत्त्वज्ञान होते. म्हणून स्वतःला आपण गनेि नागवंशीय म्हटले पाहिजे.

नाग हे आता कोण जातीचे वा जातीगटांचे वर्णन मानण्याचे कारण नाही. ते आता इहवादी सौंदर्याचे नाव झालेले आहे. या सौंदर्याला 'सम्यक' सौंदर्य सिद्धान्त म्हणा, आंबेडकरवादी सौंदर्य सिद्धान्त म्हणा. काहीही म्हणा. सम्यक म्हणजे सार आणि असार यातील असाराचा त्याग आणि जे सार आहे त्याचा अंगीकार! सम्यक म्हणजे इष्टचा स्वीकार आणि अनिटाला नकार. सम्यक म्हणजे विघातकाला नकार आणि विधायकाचा स्वीकार सम्यक म्हणजे असुंदराला नकार आणि सुंदराचा सत्कार. सम्यक म्हणजे माणसाच्या सन्मान प्रकल्पाचा स्वीकार आणि त्याच्या सर्व अवमान प्रकल्पांचा धिक्कार. मानवाच्या सौंदर्य मार्गातील अडथळ्यांना नकार आणि मानवी मार्गात उगवणाऱ्या सदिच्छांचा स्वीकार इथेच आपण एका भयानक असुंदराचा विचार करू.

अंत्यज, बहिष्कृत, अछुत, दलित, हरिजन, अनुसूचित जाती, शेड्यूल्ड कास्ट हे सर्व शब्द 'अस्पृश्य' या शब्दाचेच अनुवाद आहेत. अस्पृश्य अवर्ण आहे. तो हिंदू धर्माच्या चार वर्णाचा भाग नाही, म्हणून अस्पृश्याला 'अवर्ण' हिंदू मानले गेले. १९३५ साली डॉ. बाबासाहेबांनी येवले येथे 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी गर्जना केली. हिंदू म्हणून मरणार नाही या गर्जनेचा सरळ अर्थ मी अस्पृश्य वा दलित म्हणून मरणार नाही असा आहे. १९१६ साली बाबासाहेबांनी 'Castes In India' हा शोध निबंध कोलंबिया विद्यापीठात झालेल्या मानवंश सेमिनारसाठी लिहिला आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी अस्पृश्यतेच्या पायातच सुन पेरला. १९३५ सालच्या त्यांच्या गर्जनने ही हे दलितत्वच निर्धारपूर्वक लाथाडले. भारतीय संविधानाच्या सतराव्या अनुच्छेदा द्वारे 'अस्पृश्यता' नष्ट करण्यात आली आहे आणि तिचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे.

अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही नि:समर्थता लादणे, हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल असे म्हटले आहे आणि तत्त्वतः देश दलितत्व विहीन केला आहे. १९५६ साली त्यांनी कोणतीही जात, वर्ण, अस्पृश्यता, देव - दैववाद वा धर्म नसलेला धर्म स्वीकारला. हा सुद्धा त्यांनी दलितत्वाला दिलेला आमूलाग्र नकार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि त्यांचे तत्त्वज्ञान अस्पृश्यता, जाती, वर्ग आणि स्त्रीदास्य या सर्व विषमतांच्या निर्मूलनासाठीच होते, हाच या सर्व घटितांचा अर्थ आहे. दलितत्व ही तुच्छता दर्शक निर्मिती वैदिक हिंदू धर्माची आहे. वैदिकांनी देवांच्या नावाने या आर्थिक विषमतेची निर्मिती केली आहे. त्यांच्या धर्म ग्रंथांनी, परंपरांनी आणि मोफत गुलामांची गरज असलेल्या उच्च वर्गीय लोकांनी ती सांभाळली आहे. दलितत्व हिंदू धर्माने असे चिरंतन केले. काही दलितच आता हिंदु धर्माचे काम करीत आहेत. दलितत्व स्वत:च जपत आहेत आणि ते चिरंतन ठेवण्यासाठी स्वतःच प्रयत्न करून हिंदु धर्माला सर्व तोपरी मदत करीत आहेत. या लोकांना सांगावेसे वाटते की हिंदू धमनेि तम्हाला दलित केले आणि ठेवले. आता तुमच्या पुढील पिढया मधील मुला - मुलींना इमाने इतबारे दलित ठेवायचे काम तुम्ही स्वतःच करीत आहात. तुम्ही हिंदू धर्माचीच भूमिका करीत आहात.

पुढील काळात तुमच्या पुढील पिढयांना दलित असण्यात आनंद वाटेल काय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला हवा. सुप्रीम कोर्टाने ही अलीकडच्या काळात कुणाला ही दलित ठेवणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरवलेला आहे. याचा अर्थ स्वतःला, तुमच्या पुढील पिढ्यांना आणि स्वतःच्या साहित्याला ही दलित ठेवायचा शिक्षापात्र गुन्हा आपण करणार आहात काय? तुम्ही स्वतःला, स्वतःच्या साहित्याला आणि स्वतःच्या मुला - मुलीना दलित ठेवून भारतीय संविधानाच्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या, त्यांच्या चळवळीच्या, त्याच्या तत्त्वज्ञानाच्या आणि त्यांनी दिलेल्या धम्माच्या विरोधात काम करणार आहात काय असा प्रश्न आहे.

जीवनात कोणीही दलित असू नये कारण दलित असणे म्हणजे मानवी अस्तित्वाला पारडे होणे असते. सवर्णाना पशूचाही विटाळ होत नाही पण दलितांचा होतो. म्हणजे दलित पशुपेक्षा ही निषत्तर आहेत. दलितत्व हा असा तुच्छतेचा विषय आहे. ही तुच्छता कोण कशाला जपायची असा प्रश्न आहे. ही तुच्छता सामान्य माणसांनी फेकून द्यावी असे ज्या प्रतिभावंत साहित्यिकांनी सांगावे ते साहित्यिकच ही तुच्छतो कशासाठी जपतात ? प्रतिभा म्हणजे पर्यायी प्रकाश निर्माण करणारी सर्वक शक्ती जे मान्य नाही त्याला हस्तक्षेप करणारी, जे मानवी सन्मानाच्या विरोधात आहे त्याचा प्रतिकार करणारी आणि जीवनाची सर्वांना सन्मानदायी पुनर्रचना करणारी शक्ती म्हणजे प्रतिभा मानवी स्वातंत्र्याची निर्मिती करणारी सौंदर्य शक्ती म्हणजे प्रतिभा आणि ही प्रतिभा ज्यांच्या जवळ आहे त्यांना आपण साहित्यिक म्हणतो. साहित्यिक स्वतःच सौंदर्याचा महोत्सव असतो. त्याची प्रतिभा ही साक्षात उजेडाचीच संरचना असते. म्हणून प्रतिभा अंधारावर किंवा जीवनातील कुरूपते वर निर्णायक भाष्य करते आणि मानवी सौहादांचे सर्जन करते.

दलितता हे मानवी जीवनातले सौंदर्य नव्हे. ती मानवी जीवनाची असुंदरताच आहे आणि या असुंदराला आग लावीत नाही ती प्रतिभाच नव्हे. मानवी जीवना वरील हा कलंक मिटविण्यासाठी आकाशपाताळ एक करीत नाही त्या व्यक्तीला साहित्यिक म्हणता येत नाही. माणसाने आपल्या सन्मानासाठी निर्णायक लढाई करावी हे सांगत नाही तो शब्द साहित्यिकाचा नव्हे. माणसावर लादलेल्या या घृणेने पेटून उठत नाही ते मन प्रतिभावंताचे नव्हे. जगात कुठेच नाही त्या अस्पृश्यता नावाच्या भीषण अमानुषतेचे समर्थन करणारा माणूस कधीही साहित्यिक ठरणार नाही आणि असा साहित्यिक माणूस ही ठरणार नाही. अशा अमानुषतेचा पुरस्कर्ता फक्त व्यवस्थेला आनंद देणारा आदर्श गुलाम ठरू शकेल. प्रस्थापिताचा हुजन्या किंवा चाकर ठरू शकेल.

जो साहित्यिक स्वतःला दलित मानतो तो हिंद असणे अपरिहार्यच आहे. कारण दलितत्व हा हिंद च्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. म्हणून दलित साहित्यिक असणे म्हणजे तर्कतः हिंदू साहित्यिक असणेच असते. याचा ही अर्थ स्वत:ला दलित महणवणाच्या व्यक्ती या साहित्यिक हिंदु व्यवस्थेचा सन्मानच करीत असतात आणि स्वतःच्या दलित असण्याचाही सन्मान करीत असतात. ते स्वतःला जर सन्मानाने दलित म्हणतात तर त्यांना इतरांनी ही दलित म्हणणे सन्मानाचेच वाटणे, अपरिहार्य आहे. असे बहुसंख्य हिंदू दलित साहित्यिक भारतातील वेगवेगळ्या राज्यात आहेत आणि आणि त्यांना हिंमत देणारे थोडे हिंदू दलित साहित्यिक महाराष्ट्रात ही अजून टिकून आहेत. पण ही वस्तुस्थिती आंबेडकरवादी साहित्यिक या घटिताशी दुरान्वयाने ही संबंध सांगू शकत नाही.

दलित हा काही जातींचा समूह आहे. यातील प्रत्येकच जात परत काही पोट जातींचा समूह आहे म्हणजे दलित माणसे एकाचवेळी आपल्या जातीचे आणि पोट जातींचे ही समर्थन करीत असतात. हा विलभीकरणाचा संसर्ग परत व्यवस्थेच्या विवक्षित चारित्र्याशी संबंधित आहे. जाती नष्ट हाव्यात अशी भूमिका या माणसांच्या जाती भवतीत बसतच नाही. जाती नष्ट व्हाव्यात अशी भूमिका घेणारा माणूस काही जाती टिकाव्यात आणि काही जाती नष्ट व्हाव्यात अशी भूमिका घेऊ शकत नाही. जातींची रचना हा एका समाज व्यवस्थेचा भाग आहे.

आम्ही दलित राहणे पण तुम्ही तुमच्या जाती सोडायला हव्यात असे म्हणता येणार नाही. आम्ही चोया करीत रह, तुम्ही मात्र चोऱ्या करता कामा नये. आम्हाला आमच्या जातीत राहायची विशेष सवलत किंवा आरक्षण द्या, तुम्ही मात्र तुमच्या जातीत राहू नका असे म्हणता येणार नाही. स्वतः जातीत राहणारे लोक इतरांना जाती सोडा म्हणायचा अधिकार गमावून बसत असतात. दलित हा हिंदू समाज रचनेचा अविभाज्य भाग आहे, याचा अर्थ दलित असणे! म्हणजे हिंदू असणे असाच आहे. दलितत्व कवटाळून कोणीही आपले हिंदू असणे नाकारू शकत नाही आणि दलितत्वाच्या वाट्याला येणाच्या वेदना ही मग वेदना राहत नाहीत कारण दलितत्वाचा स्वीकार म्हणजे दलित म्हणुन वाट्याला येणाऱ्या वेदनांचा ही स्वीकार असतो.

दलितत्व आणि वेदना या दोन गोष्टी वेगवेगळ्या नसतातच. म्हणूनच वेदना नष्ट करायचा अर्थ दलितत्व नष्ट करणे हाच असतो किंवा बेदनांचा उगम नाकारणे हाच असतो. हिंदू धर्माचा त्याग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितत्वाच्या निर्मलनासाठी म्हणजे दलित असण्यामुळे वाट्याला येणाऱ्या वेदनांच्या निर्मुलनासाठीच केला होता, हे आपण समजावून घ्यायला हवे.

दलितत्व जपायचे असते, त्यामुळे प्राप्त होणाऱ्या वेदना एजॉय करायच्या असत्या तर त्यांना हिंदू धर्म खोडायची गरजच नव्हती. कारण हे ध्येय तर हिंद ूधर्मात राहणे अधिक प्रभावीपणे साध्य होण्या सारखे होते. दलितत्व जपायचे असते तर भारतीय संविधानाच्या सतराव्या कलमानुसार त्यांनी अस्पृश्यता कशाला नष्ट केली असती? विज्ञान निष्ठ धम्माचा स्वीकार कशाला केला असता? देव - दैववादाला, धर्म संस्थेला आणि विषमतेचे ढोल वाजवणाऱ्या शास्त्रांना कशाला लाथाडले असते. याचा अर्थ हिंदू म्हणूनच मरायचे ही स्वयं बाळगणाऱ्यांना जात म्हणून मरण्याला गत्यंतरच नसते. अशा लोकांनी दलितपणाच्या बदलांना वेदना ही म्हणायचे नसते. तर त्या वेदनांना न्यायाचा भाग मानायचे असते आणि ईश्वराचा प्रसाद म्हणून भक्तीने त्यांचा आस्वाद घ्यायचा असतो.

दलित राहणाऱ्या या लोकांना बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार कोणत्या अथनि पोचतो? कारण हे ही दलित म्हणजे मिश्वबंत हिंदच असतात. ते बाबासाहेब, भारतीय संविधानाचे आणि धर्मातीत धम्माचे विरोधकच असतात. आर.एस.एस लोक बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाला, संविधानाला आणि घम्भाला विरोधच करतात पण तेही बाबासाहेबांच्या नावाचा गजर करतातच आणि हे दलित ही बाबासाहेबांचे आमलाग्र क्रांतीचे तत्वज्ञान नाकारून बाबासाहेबांच्या नावाचा गजर करतात. या दोघांच्या ही उद्योगातले हे साम्य लक्षात घेणे आवश्यकच आहे.

धम्माचा मूल्यकोश, संविधानाचा मूल्यकोश आणि आंबेडकरवाद या गोष्टीचे दिशा आणि ध्येय एकच आहे. विषमतातीत, शोषणातीत आणि परस्पर द्वेषातीत व्हा. भारतीय नागरिक व्हा. बंधुभाव आणि भगिनी भाव हाच या सर्व मूल्यकोशांचा अर्थ आहे. इहवादी माणुसकी हाच या मूल्यकोशाचा आतला आणि बाहेरचा हि आवाज आहे. बुद्ध हे कोणा धर्म रचनेचे नाव नाही. ते विज्ञान निष्ठेचे सतत प्रयोग शीलतेचे आणि मानवी जीवनाच्या सतत पुनर्रचना शीलतेचे नाव आहे. तुम्ही बुद्धीवादी व्हा. वैज्ञानिक विचार सरणीची स्थापना मेंदूत करा. तुम्ही इहवादी व्हा. बंधुतावादी आणि भगिनीतावादी तुम्ही बुद्ध  धम्माची दीक्षा घेतली असेल किंवा घेतली नसेल. पण मनाने तुम्ही बौद्ध झालेले असताच. जगात अशा बौद्धांची संख्या फार मोठे आहे. आपण आपली माणुसकी उद्ध्वस्त करणारी मूल्ये नाकारायची आहेत आणि तिचे बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या सर्वच माणसांना सन्माननीय करणन्या मूल्यांची प्रतिमा लावायची आहे.

दलितत्वाने हजारो पिढयांना मानसिक अपंग केले आहे. या पिढयांना दयनीय आणि लाचार केले आहे. दलितत्व हे माणसांना विचार शून्य आणि अस्तित्व शून्य करणारे महाअरिष्ट होते. स्वाभिमान शून्य, परतंत्र आणि किळस वाणे असे ते भिकारी आणि परावलंबी जगणे होते. दलितत्व ही विराट जखम होती आणि ती शतकानुशतके ठणकत होती. दलितत्व हे माणुसकीचे कलेवर होते आणि काही माणसांना ते वाहून न्यायची शिक्षा मनुवादाने ठोठावली होती. तुम्हाला दलित म्हणण्यात येथील उच्च वर्णियांच्या अहंकाराला आनंद होतो. पण तुम्ही दलित असण्यात तुम्हाला कोणता आनंद आहे? तुमचे त्यात कोणते भले आहे?

दलितत्वाने तुम्हाला परकेपणा शिवाय दास्या शिवाय आणि अपमाना शिवाय काहीही दिले नाही. दलितत्व हा कलंक आहे. तुमच्या आधीच्या सर्व पिढयांना आणि तुम्हाला ही त्याने पूर्णतः अपमानित केलेले आहे. हा कलंक कशासाठी जपायचा? हा तुम्हाला जणू न देणारा आजार कशासाठी जपायचा? त्या शब्दाच्या नावाने साहित्य निर्मिती करणे म्हणजे आपल्या अपमानाचा आनंदोत्सव साजरा करण्या सारखेच आहे वा गुलामीचा सत्कार करण्या सारखेच आहे. बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि देह बोली अशा सर्वच संदर्भात पूर्वा स्पृश्यांना आज कोणी दलित म्हणू शकत नाही. याच पद्धतीने इतर ही सर्व गरिबांना जीवनाच्या मध्य धारेत आणले गेले पाहिजे. दलितता या आजारापासून सुटका होणे. सर्वच दृढंनी अत्यंत आवश्यक आहे. दलितत्व आता वाळून किंवा पुसूनच टाकले पाहिजे. दलितत्वात गौरव वाटावा, असे काहीही नाही.

आज आपण माणसाच्या आणि साहित्याच्या आंबेडकरवादी सौंदर्य सिद्धान्ताची मांडणी करीत आहोत. या सौंदर्य सिद्धान्ताच्या आरशात आपला चेहरा आणि आपले मानवी अस्तित्व अधिकच सुंदर झाले आहे, असे प्रत्येक माणसाला वाटेल. हा सौंदर्य सिद्धान्त म्हणजे आपला माणूस होण्याचा सोहळा आहे, असे प्रत्येकच माणसाला वाटेल. या विचाराला सम्यक सौंदर्य शास्त्र म्हणता येईल पण आपण त्याला आंबेडकरवादी सौंदर्य शास्त्रच म्हणावे असे मी म्हणेन. कारण आंबेडकरवादात सम्यकतेच्या सर्व कळा आहेतच. आंबेडकरवादाचा अर्थ सम्यक विचार, सम्यक सौदर्य, सम्यक वर्तन, सम्यक साहित्य निर्मिती, सम्यक आजीविका आणि सम्यक सर्जन शीलता असाच आहे.

सम्यक साहित्य, सम्यक नीती, सम्यक स्वातंत्र्य असेच आंबेडकरवादाचे स्वरूप आहे. आंबेडकरवाद हा कुठेच थांबत नाही. गोठत नाही. प्रवाहित्व हे त्याचे पद्धती शास्त्र आहे. मानवी सौंदर्याच्या भराम्या हे त्याचे गती शास्त्र आहे. विज्ञाना सारखी सतत प्रयोग शीलता, पुनर्रचना शीलता हे त्याचे अकुंठित चारित्र्य आहे. माणसाचे न थांबणारे डोके आणि त्या डोक्यातला कुठे ही न थांबणारा विचार असे, आंबेडकरवादाचे मूल्य विधान आहे. स्वत:ला सतत परिष्कृत, अद्ययावत आणि अन्वर्थक करीत जाणे, हे आंबेडकरवादाचे स्वरूप आहे. आंबेडकरवाद म्हणजे जगातले कोणत्याही स्वरूपातले शोषण आणि विषमता जाळणारी मशाल!

प्रत्येक माणसाच्या समान स्वातंत्र्याचा आणि समान सन्मानाचा काळाच्या सोबत आणि काळाच्या पुढे चालणारा प्रयोगशील काताच्या मूल्य प्रबंध म्हणजे आंबेडकरवाद. आधुनिक जगात या प्रबंथाचे नाव आपण आपल्या साहित्याला साहित्याच्या सौंदर्य शास्त्राला दिले तर दुनियेला ही या कृतीचा अपार आदरच वाटेल. म्हणून आपण सिंधू खोऱ्यातील प्रकाशगामी भारतीय संस्कृतीत मुळे असलेल्या आंबेडकरवाद या मूल्य प्रकल्पाचे नाव आपल्या साहित्याला आणि सौंदर्य शास्त्राला ही यावे, असे मला नम्रपणे वाटते. प्रत्येक काळात प्रश्न बदलतात. नवी आव्हाने पुढे येतात पण असे सर्व प्रश्न उभे केले तरी जीवनाचे शोषक - शोषित हे वास्तव कायम असतेच. प्रश्न जसे उत्पन्नाच्या बदलत्या साधनांच्या नुसार बदलतात, तशी उत्पन्नाची साधने बदलत्या विज्ञाना नुसार बदलतात. याचा एक अर्थ असा ही होतो की - विज्ञानाच्या प्रगती बरोबर माणसाच्या डोक्याच्या क्षमता ही वाढलेल्या असतात. प्रश्नांचे स्वरूप बदलते आणि माणसाच्या डोक्याची विचार करायची प्रक्रिया ही बदलते. याचा अर्थ त्या त्या काळाच्या संत माणसाची पुंज साकार होते आणि माणूस त्यातून मार्ग काढतच जातो.

आव्हाने आजच निर्माण झालेली आहेत आणि आव्हाने गतकाळात नव्हतीच असे म्हणणे चुकीचेच ठरेल. मला खात्री आहे शोषक - शोषित या आजच्या वास्तवातली ही दोनता इतिहासभर होतीच. आजच्या जागतिकी करणाने हे वास्तव गुंतागुंतीचे केले. जीवन गतिमान झाले तरी या वास्तवातील विषमतेला भौतिक जीवनातील काणे आहेत. विज्ञानाच्याच मदतीने उद्याचे बदललेले जग  या कारणांवर मात करील. पण भारतात वेद काळापासून विषमतेची आणि शोषणाची कारणे होती ती गूढच होती. म्हणजे कर्म विपाकासारखी बनवा बनवीची आणि अदृश्य कारणे सांगितली गेली आणि या कारणांनी निर्मिलेले शोषण आज ही संपायचे नाव घेत नाही. याचा अर्थ त्या काळची आव्हाने आजच्या पेक्षा कमी अवघड नव्हती. किंबहुना ती अधिकच अवघड होती असे आपल्याला म्हणता येईल.

मूळ मुदा हा की शोषक - शोषित हे बास्तब कोणत्याही काळात कायम होतेच आणि त्या त्या काळाच्या प्रकृती नुसार त्या त्या काळात अवघड वाटावीत, अशी कारणे ही होती. हे वास्तव देशोदेशी असतेच. शोषकांची नावे बदलतात. शोषितांची नावे बदलतात. देश बदलतात. काळानुसार भौतिक तपशील बदलतात पण शोषणाचा पेच तोच असतो. सर्व सामान्य माणसे गोंधळून परिस्थितीमुळे हतबल होतात. परिस्थितीच्या डाव्यात स्वत: ला बसवतात. परिस्थितीचा भाग होतात. इथेच इंटेलेक्चुअल्सची खरी परीक्षा असते. विचारवंतांची आणि साहित्यिकांची ही ही परीक्षेचीच वेळ असते. खरे तर कोणतीही वेळ साहित्यिकासाठी पेटती वेळच असते. व्यक्तीच्या वा समाजाच्या जीवनात प्रत्येकच काळ संक्रमण काळच असतो. जुने संपत असते. तेही सोडवत नाही. काही थोड्यांचे हित संबंध त्या जुन्यात गुंतलेले असतात. म्हणून त्यांना जुने सोडवत नाही आणि नवे जन्माला येत असते, ते आपल्याच हिताचे असेल याची खात्री नसल्याने त्याचे अनेकांना स्वागत ही करता येत नाही.

मूल्य दृष्ट्या हा हवे - नकोच्या मधला काळ असतो. निर्णय होत नाही. संभ्रम उडतो. कमी अधिक बऱ्या - वाईटाच्या गर्दीत नेमका निर्णय घेता येत नाही. अश्या फोटोवर उजेड आणि अध्या फोटोवर अंधार तसे व्यक्तीचे आणि समाजाचे होते. हा शेवाळलेला काळ असतो. चुकण्या सारखा काळ असतो. हा हेरा फेरी करणारा वा भुल भुलैयाचा काळ असतो. दिशा आपल्या जागे वरच असतात. पण नजरेची दिशाभूल झालेली असते. मनाची निर्णय शक्ती दुबळी झालेली असते. रस्ते अनेक वचनी झालेले असतात. विचार सरणी अनेक असतात आणि सारख्या चेहरे बदलत असतात. असा गोंधळ काळाने मांडलेला असतो आणि मग मनाचा ही मग गोंधळ उडालेला असतो. हा गोंधळ ही नवा नसतोच. जीवनाच्या वळणा वळणावर तो असतो. त्यातले वादक - गायक बदलतात. त्यांची वाढ आणि गाणी बदलतात. गोंधळ्यांचे पेहराव बदलतात. शब्दांमधील आणि सूरी मधील युक्त्या बदलतात, तंत्रे बदलतात. पण गोंधळी बदलले तरी गोंधळ हे घटित बदलत नाही.

समाजाची रचना ही धुरीण वर्गाच्या हित संबंधाचीच रचना असते. काही प्रतिभा या हित संबंधांचे भजन करण्यात दंगे असतात. या थोडया मक्तेदार वर्गाकडे या प्रतिभांनी आपले स्वातंत्र्य गहाण टाकलेले असते. काही प्रतिभा धोके पत्करतात. अप्रियता पत्करतात. सत्ता स्वामींची नाराजी पत्करून ही या प्रतिभा आपले असमतोल भंजनाचे कार्य सुरू ठेवतात. हा अटी तटीचा संघर्षच असतो. साहित्य विश्व या युद्धाची भूमी झालेले असते. रचनेची जपणूक आणि पुनर्रचनेची गरज या दोन सरणीं मधला हा संघर्ष असतो.

मराठी पुरते बोलायचे तर एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून या संघर्षाची आग भडकली आहे. जोतीबा फुल्यांचे साहित्य आणि त्यांच्या पासून प्रेरणा घेतलेले निखारे फुलविणारे साहित्य असे पेटत्या रणभूमीचे रूप मराठी साहित्याला आले होते. मधल्या काळात मराठी साहित्य जरा स्थिरावले. पुढे १९६० नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचे ज्वलंत निखारे फुलवणारे साहित्य साकार झाले आहे. हे मक्तेदारी संपवणारे आणि सर्वांना एकत्यत्व देणारे साहित्य आहे. आंबेडकरवादी साहित्याला जाती संघर्ष वा वर्ग संघर्ष मूळापासून मांडावाच लागतो. पण हे चित्र साहित्य कृतीत मांडत असताना जात्यतीततेचे आणि वर्गातीततेचे स्वप्नच या साहित्याच्या नजरेत असते, असेच म्हटले पाहिजे. हे साहित्य प्रखर हस्तक्षेपाचे साहित्य आहे. हस्तक्षेपाच्या पोटी पर्यायाची निर्मिती होते. किंबहुना पययाच्या गरजे पोटीच हस्तक्षेपाची निर्मिती होते, मला असे वाटते की इथे हस्तक्षेप आणि साहित्यिक पर्याय आणि साहित्यिक हे शब्द समानार्थी होऊन जातात. इथे साहित्यिकाचे आणि त्याच्या साहित्याचे ही तत्वज्ञानाशी आणि विज्ञानाशी नाते जुळते.

विधायक मूल्येच हस्तक्षेप करीत असतात. हा असाराला साराने केलेलाच हस्तक्षेप असतो. हा वाईटाला चांगुलपणाने दिलेला नकारच असतो. याचा अर्थ पर्याय हा हस्तक्षेपच असतो. साहित्य कृती हा हस्तक्षेपाचा म्हणजे पर्यायाचाच आविष्कार असतो. हा आविष्कार स्वत च भावना प्रतिभेची निर्मिती आहोत हे सांगत असतो. जो साहित्य हस्तक्षेपाच वा पयांचाची निमेिंती नसते. तो स्वभावतःच पुनर्रचनेला विरोध करीत असते आणेि पडावे त्याकडे पाठ फिरवून जे आहे त्यांच्या भोवतो संरक्षणाचे कवच उभारीत असते. अशा साहित्य कृती निर्माण करपारे साहित्यिक वाहत्या काळाच्या नात्यात कोण लागत नाहीत कारण त्यांनी कोणत्याही काळातील मूलभूत द्वंद्वांशी फारकत घेतलेली असते, असे म्हटले पाहिजे. असे साहित्य कोणत्याही काळातील कोणत्याही जीवनाचे व त्या जीवनातील मर्माचे साहित्य नसते. भले साहित्य सत्तेच्या पाडीशी आपले गुलाम शब्द या शब्दांचा कलेवरे घेऊन उभे असते. हे साहित्य जीवनाच्या कल्लोळात वा मर्मात उतरतच नसते.

आपण जीवनाच्या संघात उतरण्याचा आणि तिथे आपला मर्म बेचणाऱ्या साहीत्याचा विचारात आहेत. हा विचार करताना आपल्या वाड्मयीय संविधानाचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ध्येय सम्यक अजिविकाच आहे असे म्हणायला हवे. हि सम्यक अजिविका म्हणजे पूर्ण वैज्ञानिक, पूर्ण बुद्धिवादी आणि मानवतावादी. हि सम्यक अजिविका विघातक. मिथ्या, शोषक आणि विषम अजिविका हस्तक्षेप करते आणि नव्या शोषण विहिन निरामय जीवनाची निमिर्ती करते. असा हस्तक्षेप करणाऱ्या आणि अजिविकेच्या पूर्ण प्रयोग शील पर्यायांचे सौंदर्य विधान निमिनाऱ्या मूल्यकोषाचा आपण साहित्यक मानतो. अश्या सम्यक साहित्यिकांची जिवंत आणि उग्र सर्जनशील प्रतिमा आपल्याला निर्माण करायची आहे. तो प्रयोग शील असल्याने आधीच्या कोणत्याच प्रगत किंवा सामाजिक चौकटीत स्वतःला अडकू देत नाही.

पाणी नितळ असेल तर त्यातील सर्व दिसते. नितळ प्रतिभा चौकटीच्या, परिघाच्या म्हणजे माणसाला कोंडून लहान करणाऱ्या पिंजऱ्याच्या आतीत गेलेली असते. अशा नितळ, मुक्त, स्वतंत्र प्रतिभालाच जीवनाचा तळ स्पर्शी गुंता पाहता येतो. बऱ्या - वाईट संबंधातील मर्मे अशा प्रतिभेलाच वाचता येतात. ती फक्त बाजूची असते, म्हणून तो इतर कोणच्याच बाजूची नसते. ती सौदर्याच्या बाजूची असते. म्हणूनच असे सौंदर्यविश्व किंवा ही पर्यायी सौदर्य श्री निर्माण करतो. त्या प्रतिभावंताला आपण साहित्यिक म्हणतो. साहित्यिक म्हणजे नव निर्माता!

नव्या माणसाची रचना टाकून शब्दाच्या रचना करणाऱ्या लोकांना आपण साहित्यिक म्हणू नये, त्यांना शोषकांचे लेखनिक म्हणायला हवे. असे लेखनिक जातीचे आणि धर्माचे पुरस्कार करणारे अॅडे असतात. ते साहित्यिक नसतात. ते डबक्यांचे प्रतिनिधी असतात. ते बिहिरांमधील सत्ता सेवक बेडके असतात. प्रतिभावंत पणाशी त्यांनी स्वतः च आपला संबंध तोडून टाकलेला असतो. साहित्यिकाची प्रतिभा जीवनाची मुलाखत घेते. जीवनाचे सर्व कप्पे आणि गुहांची तो उलट तपासणी करते आणि जिवनातील विस्डमचा म्हणजे प्रज्ञानाचा शोध येते. हा बुद्धत्वाचा, साँर्केटींसत्वाचा वा आंबेडकरत्वाचाच शोध असतो. हा माणसाच्या जगण्याच्या प्रयोजनाचाच, त्या प्रयोजनाच्या मौलिकतेचाच आणि मानवी अस्तित्वाचा परम सौंदर्याचाच शोध असतो.

मानवी अस्तित्वाच्या उज्ज्वल अर्थाचाच तो विनय शोध असतो. साहित्याला आपण मानवी प्रज्ञानाची शोध मोहीम आणि साहित्यिकाच्या प्रतिभेला अन्वेषण पद्धत म्हणायला हवे. ही प्रतिभाच बोधनातील व्यवहाराचा गुंतवला आणि त्याचा अन्वयार्थ सांगते. विचार सरणीच वर्ण, जात आणि धर्माचे तपासते. वेगवेगळ्या विचार सरण मागील उदेश, त्यांची नियत आणि नैतिकता तपासते. या तपासणीला झाडाला फुले यावीत. तशी काही मर्माची फुले येतात, म्हणून साहित्याला माहितीचे उकिरडे म्हणता येत नाही. कारण साहित्य हे माहितीच्या अर्थाचा उजेड असते. साहित्यिकाचा कृती किंवा साहित्यिकाच बाजू साहित्य कृतीच्या अर्थात भिनलेले असतेच. साहित्य कृतीत अनेक आवाज असतात पण यो आवाजांचे अन्वर्थन करणारा एक दिग्दर्शक आणि शहाणा आवाज असतो. तो शहाणा आवाज प्रतिभावंताच्या विस्डमचा असतो.

माणूस विवेकशील आहे हा विज्ञानाचा विश्वास आहे. विज्ञानाची वा विस्डमची संकल्पना ही माणसाच्या या विवेक शीलतेचाच निष्पत्ती आहे. हा विवेक शीलता हेच माणसाचे सामवंत आहे आणेि सौदर्य ही आहे. माणूस सम्यक होऊ शकतो. सार आणेि असार यातून सार काय ते तो ठरवू शकतो. अश्या मानव जीवनाचा इतिहास त्याच्या या निवड क्षमतेचाच इतिहास आहे. आता घोड़े आजच्या संदर्भात शोधण सत्ता स्वातंत्र्याला, बंधुत्वाला, भगिनीत्वाला आणि समते फार घाबरते.

शोधण सत्ता राजकीय शिक्षण, अधशन साहित्य अशा कोणत्याही क्षेत्रातले असेल, तिला आपले जुने गुलाम टिकवायचे असतात आणि नव्या गुलामांची निर्मिती करायची असते. लोकांना दुबळे ठेवायचे असेल तर संभ्रमाचे पिंजरे तयार करावे लागतात. संभ्रमांच्या पिंजच्यांचे कारखाने म्हणजे धर्म, सत्तेची सर्वच अंगे - उपअंगे मग या कारखान्यातून सतत नवनवी हत्यारे घेत असतात. आज असेच संविधानाच्या विरोधात राजकारणाला सरळ सरळ धर्ममय केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघा जवळ आणि संघ प्रणीत बीजेपी जवळ धर्म आहे. धर्म म्हटले की माणसे मानवी जीवनाचा इतिहास, त्यांना धर्माने दिलेल्या दुय्यम वा दासाच्या भूमिका आणि विशेषतः विवेक शीलता अत्यंत अविचारपूर्वक विसरूनच जातात.

आज भारत एका विलक्षण वळणावर उभा आहे. संघा जवळ धर्म आहे. तो धर्म आपण वर म्हटले तो सिंधु संस्कृतीच्या उजेडाच्या खोऱ्यात मोहोरला तो धर्म नव्हे वा सिंधूच्या सूर्य खोऱ्यात प्रकाशली ती भारतीय सस्कृती नव्हे. संघा जवळ वैदिक धर्म आहे. त्यातील वेद - मनुस्मृती मधील चातुर्वण्याचे म्हणजे विषमतेचे वा शोषणाचे शास्त्र आहे. पण आपल्या जवळ असा लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेणारा धर्म नसला तरी लोकांना चिकित्सक, आधुनिक आणि शहाणे करू इच्छिणारे संविधान आपल्या जवळ आहे. जे आपल्याला भारतीय नागरिक म्हणून गौरविते.

समतेची ही धर्म निरपेक्षतेची आणि समाजवादाची दौलत आपल्या जवळ आहे. ही आपली दौलत संपूर्ण आधुनिक युगाने मुजरा करावा अशीच आहे. आणि आणखी एक क्रांतिकारी दौलत आपल्या जवळ आहे. या दौलतीचे नाव किंवा या त्रिसरणाचे नाव फुले - शाहू - आंबेडकर हे आहे. आपण भारताला उज्ज्वल भवितव्यात घेऊन जाऊ इच्छितो आणि भारतीय संस्कृतीच्या बौद्धीक सामग्रीने आपल्या हातात दिलेले विज्ञान आणि मानवतावाद हे दोन सूर्य - चंद्र आहेत. आता या पुढला संघर्ष धर्म आणि संविधान असाच होणार आहे. या संघर्षात आपल्या मानवी अस्तित्वाचा अर्थ आणि सौंदर्य यांची हमी देणाऱ्या संविधान छावणीत आपण निष्ठेने असावे, अशी विनवणी तुम्हाला करतो आणि धांबतो.

•◆●■ समाप्त ■●◆•

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

आभार -
राजू त्रिंबक साबळे (पुणे जिल्हा संघटक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।