सोमवार, ३० एप्रिल, २०१८

● "दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया" या समूहातील महत्वपूर्ण नियम आणि अटी

● "दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया" या समूहातील महत्वपूर्ण नियम आणि अटी

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

१) सदर "Group" या शब्द प्रयोगाला समूह असे म्हणतात. समुहात कुठल्याही प्रकारच्या वाद - विवाद किंवा लोकांच्या भावना दुखावणारे पोस्ट टाकण्यास परवानगी नाही.

उदाहरण :-
चेष्टा करणे, शिवीगाळ करणे, जाति विषयक वाद करणे, वाद - विवाद करणे, व्यभिचार करणे, खोटे बोलणे, अश्लील जोक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारचे जोक्स, व्हीडिओ, छायाचित्र किंवा मजकूर इतर गोष्टी वैगेरे.

२) या समूहात आपण ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, बातम्या सहज टाकू शकता. समुहात ७ पेक्षा जास्त छायाचित्रे म्हणजे फोटोज टाकू नयेत किंवा इतरांना त्याचा त्रास होता कामा नये. जर ते अत्यंत महत्वाचे असल्यास त्या छायाचित्र किंवा विडिओ सोबत व त्याखाली माहिती अवश्य टाकावी, पुन्हा पुन्हा तीच माहिती पोस्ट करू नये. नवी माहिती पोस्ट कराव्यात. जर आपण परवानगी नसून सुद्धा नियमांचे उलथन करत असल्याचे आढळून आल्यास नियम (२) लागू होईल आणि आपणास समुहातून त्वरित विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

३) आपण स्वतः हून लिहलेले मजकूर असलेल्या पोस्ट म्हणजे लेख, कविता किंवा इतर काही गोष्टी मोठ्या प्रमाणात टाकाव्या पण सदर छायाचित्रे टाकणे टाळावे.

४) प्रत्येक मजकूर सुस्पष्ट लिहलेले असावे, मजकुर संदर्भात वाद निर्माण होता कामा नये. कोणताही मजकूर टाकताना काळजी घ्यावी. वारंवार एकच मजकूर असलेली पोस्ट टाकू नये. कारण इतर लोकांचा मोबाईल डेटा - बॅलन्स वाया जाता कामा नये.

५) समुहात येणाऱ्या विविध माहिती विषयक पोस्ट काळजी पूर्वक वाचाव्यात आणि समजून घ्याव्यात. चिंतन करावे. समुहात सर्व पोस्टचा वाचण्याचा आनंद सर्वांना मिळावा, यासाठी कुणी पोस्ट टाकली की त्या नंतर कमीत कमी ४ किंवा ७ मिनिटांनी दूसरी पोस्ट टाकणे. म्हणजेच २ पोस्ट मधील अंतर कमीत कमी मिनिटे असावे.

६) समूहामध्ये कुठल्याही गप्पा मोठ्या प्रमाणात मारत बसू नयेत. कोणताही एक महत्वाचा विषय निवडून त्यावर चर्चा करू शकता पण सदर एखाद्या वेळेस सुरु असताना त्या मध्ये कोणत्याही प्रकारची पोस्ट टाकू नये, जेणे करून चर्चा सुरु असताना अडथळा येणार नाही.

७) समूहावरील चिन्ह (ICON) बदलण्याचा अधिकार फ़क्त संचालक यालाच आहे. दुसऱ्या कुणाला ही चिन्ह बदलण्याची परवानगी नाही, तरी तसे केल्यास नियम (२) लागु होईल. त्यामुळे लगेच समूहातून विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

८) सदर समूहातील व्यक्तिगत समस्या, एकमेकांना भेटणे, फसवणे, राजकारण, जाती - धर्माच्या पोस्ट, पैसे उसने देणे - घेणे इत्यादी व्यवहार वगैरे अश्या समस्याची जोखिम सदस्यांची स्वतः ची राहील. संचालक कुठल्याही घटनेला जबाबदार राहणार नाही. सादर सूचित करण्यात येते की, आपण कुणाची ही फसवणूक करू नये. अन्यथा आपणा वर बहुतेक गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी सर्वानी नोंद घ्यावी.

९) जर कुणाला ही अपघात - रक्ताची गरज असल्यास कुठल्या ही वेळी ग्रुप मध्ये मदत मागु शकतात, अश्या पोस्टला नियम (२) लागू होत नाही. एखादी नोकरी किंवा व्यवसाय संदर्भात जाहिरात आल्यास त्या संदर्भात चौकशी करून "भरती बंद' असल्यास त्या जाहिरात संबधी पोस्ट इतरांना न पाठवता त्या संदर्भात लोकांना सूचना द्यावी. इतर दुसरी कोणतीही जाहिरात (उदाहरण :- जागा, घर खरेदी करणे किंवा विकणे.) पोस्ट करता येणार नाही. एकदा चूक झाल्यास क्षमा करण्यात येईल. पुन्हा चूक करता कामा नये.

१०) सादर आपल्याला ग्रुप सोडायचा असल्यास आपण ग्रुप का सोडत आहोत याचे कारण ग्रुप मध्ये किंवा संचालकास पर्सनल चैट मध्ये सांगावे. याने आम्हाला ग्रुपच्या नियमात बाहेर करता येइल. सर्वात खास गोष्ट ही की, आपण या समुहात सामिल झालात, समुहातून आपण स्वतः च्या इच्छेनुसार न सांगता बाहेर होऊ शकता, पण परत सहभागी होऊ शकणार नाहीत.

११) सादर काही कारणाने आपल्याला कुणा सदस्यावर "तक्रार" दाखल करायची असेल तर संचालक म्हणजे ADMIN कडे करावी. नियमात कोणताही बदल करायचा अधिकार संचालक म्हणजे ADMIN ठेवतो.

१२) शुभ सकाळ, शुभ संध्याकाळ, सण, वाढदिवस शुभेच्छा आणखी अमुक तमुक वैगेरे... समूहात पोस्ट न करता लोकांना वैयक्तिक (पर्सनल) मेसेज ने पाठवाव्यात. इतर कोणतीही - कुठलीही (नियम - अट क्रमांक २ नुसार सांगितल्या प्रमाणे) पोस्ट खात्री करूनच पाठवावी.

१३) विनोद (जोक्स), शेर - शायरी, अनावश्यक छायाचित्रे (फोटो) पाठवू नयेत. शैक्षणिक माहिती, बातम्या, चालु घडामोडी, निवेदन - आमंत्रण पत्रिका सहज पाठवू शकता.

१४) काही कारणास्तव तुमच्यावर तक्रार दाखल झाल्यास आणि संचालक द्वारे समूहातून विलंबित (बाहेर) करण्यात आल्यास त्याला कारणीभूत संचालक राहणार नाही.

१५) आपण जेव्हा आपला नंबर बदलत असाल तर बद्दलण्या पूर्वी संचालकास पर्सनल चॅट वर मेसेज करून कळवावे. कारण कारण ठराविक नंबरमुळे व्यक्तीची ओळख ठरते. नंबर कोणाचा आहे ते कळले पाहिजे नाही तर न कळवता नंबर बदलण्यात आल्यास "अनोळखी व्यक्ती" म्हणून विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

१६) आपणास "फ़िल्म विषयक पोस्ट" करण्यास परवानगी नाही, कारण फ़िल्म काल्पनिक असते त्याला कोणत्याही व्यक्तिशी काही संबंध नाही, असे प्रत्येक फ़िल्म मध्ये सुचनेच्या स्वरुपात लिहून येत असते. परवानगी नसून सुद्धा नियमांचे उलथन केल्यास नियम (२) लागू होईल आणि विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

१७) अफवा असलेल्या गोष्टी कड़े लक्ष्य देऊ नये किंवा त्याचा प्रचार करू नये. जर वारंवार अफवा असलेल्या पोस्ट करून लोकांची दिशाभूल केल्यास, त्या संदर्भात वाद - विवाद निर्माण केल्यास, त्या संदर्भात फसवणूक केल्यास समूहात कोणतीही सूचना न देता विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

१८) कुणा व्यक्ती सोबत संवाद करायच्या असल्यास त्यासाठी आपण त्यांना ओळखत असाल तरच संवाद साधणे, आपण जर एखाद्या व्यक्तीला ओळखत नसल्यास कोणाला ही मेसेज पाठवू नका, जर वाद निर्माण झाला तर त्याला इतर कोणी ही जबाबदार राहणार नाही. आणि नियम - अट क्रमांक १४ नुसार सांगितल्या प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

१९) बक्षिसे, फ्री रिचार्ज, डेटा, फ्री पैसा कमावण्या सारख्या गोष्टी, साईटचे रेफेरल लिंक्स (Referal Links) न चुकन सुद्धा पोस्ट करू नयेत. याचे कारण आपण इतर लोकांना लोभ दाखवत असल्याचे किंवा फसवणूक करत असल्याचे समजण्यात येईल आणि कोणतीही सूचना न देता विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

२०) पुन्हा पुन्हा तीच माहिती पोस्ट करू नये. जर आपण पुन्हा तीच माहिती काही कारणास्तव पोस्ट करत असल्यास (पुनः प्रसारण) करत असल्याचे कळवावे. नवी माहिती पोस्ट कराव्यात. जर आपण परवानगी नसून सुद्धा नियमांचे उलथन करत असल्याचे आढळून आल्यास नियम (२) लागू होईल आणि आपणास समुहातून त्वरित विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

२१) कॉपी - पेस्ट असलेली माहिती पोस्ट करू नये. जर ती फारच महत्वाची असेल तर करावी. स्वयं काही लिहण्याचा प्रयत्न करावा. जर आपणास थोडक्यात लिहण्यास जमत नसेल तर काही न लिहता फक्त वाचन करावे.

२२) अनावश्यक (ज्याने कसलाही लाभ नाही.) अशी माहिती प्रसारित करू नये. परवानगी नसून सुद्धा नियमांचे उलथन करत असल्याचे आढळून आल्यास नियम (२) लागू होईल आणि आपणास समुहातून त्वरित विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

२३) वरील नियमावली नेहमी लक्षात ठेवावी. किंवा जपून ठेवावी. नियमाचे उलथन करत असल्याचे आढळून आल्यास आणि विचारणा करते वेळ मला नियम संदर्भात माहिती नाही असे बोलणे आढळून आल्यास नियम (२) लागू होईल आणि आपणास समुहातून त्वरित विलंबित (बाहेर) करण्यात येईल.

२४) नव्या सदस्यांना समूहात सहभागी करून घेण्या करिता स्वतः त्याने (ज्याला सहभागी व्हायचे आहे त्याने) प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. प्रवेश प्रक्रिया संदर्भात खाली माहिती दिली आहे.

समूहामध्ये कोणाला सहभागी व्हायचे असल्यास खालील प्रकारे माहिती लिहून सहभागी होऊ इच्छित व्यक्तीची माहिती 9967065953 किंवा 7738971042 या नंबर वर व्हाट्सअँप मेसेंजर पाठवावी. त्यांनतर आपण सहभागी झाल्यावर खालील प्रकारे तुमची माहिती समूहात पोस्ट करून सांगावी. जेणे करून इतर सदस्यांशी आपला परिचय होईल.

• संपूर्ण नाव -
• मोबाइल नं -
• जन्म तारीख -
• नागरित्व - 
• राहण्याचे ठिकाण -
• दैनंदिन कार्य - (नोकरी, व्यवसाय, शिक्षण)

जर वरील माहिती आपणाला सांगण्यास त्रास वाटत असेल तर फक्त आधार कार्डचा नंबर कळवावा. आपण लिहून दिलेली माहिती खोटी आढळून आल्यास लगेच बाहेर करण्यात येईल. आपण नोंद घ्यावी की, आपण दररोज नेहमी प्रमाणे २ वेळे पेक्षा जास्त वेळा समुहात हजेरी लावावी लागेल. माहिती पाठवताना फोन नंबर दोनदा तरी तपासावा. नोंदणी करीता कृपया कॉल किंवा मिस कॉल करू नये.

वरील सर्व नियम मान्य असल्यास समूहामध्ये यावे. पहिल्या आलेल्या लोकांनाच सहभागी केले जाईल, अशी आपण सर्वानी नोंद घ्यावी.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।