सोमवार, २५ डिसेंबर, २०१७

● भिम करवा (Lyrics)

● भीम कारवा (लेखी गीत)

कवी -
संजय बनसोडे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

जयभीम तयाच्या मुखी गोडवा,
शिल बुद्धाच्या संगी अंगी थोरवा,
चालला पुढे पुढे हा भिम कारवा ।।धृ।।

ना द्वेष कुणाचा ना मत्सर,
अंगी लावूनी शांतीचे अत्तर,
जाई जिथे - तिथे दिसे त्यांचा गवगवा ।।१।।

प्रज्ञा - शील - करून त्याचे शस्त्र,
बा भीमाच्या विचाराचे केले अस्त्र,
वादळे - तुफान हि केली शांतीची हवा ।।२।।

कवी -
संजय बनसोडे
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

● छाती ठोकून हे सांगू जगाला (Lyrics)

● छाती ठोकून हे सांगू जगाला (लेखी गीत)

कवी -
सोनू निगम

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

छाती ठोकून हे सांगू जगाला,
असा विद्वान होणार नाही ।।धृ।।

कोणी झालाच विद्वान मोठा,
असा बुद्ध भगवान होणार नाही ।।१।।

दिन दुबळ्यांची उडवून सुस्ती,
चतुवर्नियांची जिरवून मस्ती ।।२।।

कधी हरला ना ओ कधी हरणार ना,
कधी हरणार ना ज्ञानाची कुस्ती,
असा पहिलवान होणार नाही ।।३।।

ज्याच्या घटनेवर चाले हे राज,
ज्ञान वैभव त्यालाच साज,
कुबेराला हो, कुबेराला हि वाटावी लाज,
असा धनवान होणार नाही ।।४।।

ओझं पाठीशी हे उपकाराचं,
कस फिटणार त्या युगंधराचं,
हे रमेशा त्या प्रभाकराच,
कार्य गुणगान होणार नाही ।।५।।

कवी -
सोनू निगम
(सुप्रसिद्ध गायक, संगीतकार एवं अभिनेता)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

शनिवार, ९ डिसेंबर, २०१७

● बुद्ध आणि कार्ल मार्क्स : प्रस्तावना, लेख आणि भाषणासह

● बुद्ध आणि कार्ल मार्क्स

लेखक -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

■ प्रस्तावना

प. पू. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या व्यवस्थेवर केवळ टिका न करता तेव्हाच्या सामाजिक परिस्थितीशी सकारात्मक लढा देऊन समस्त पिडीत समाजाला सन्मानाने उभे राहून देशासाठी कार्य करायला सांगितले देशाच्या विकासासाठी जातींचा अंत झालाच पाहीजे, हेच तत्वज्ञान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दिले. त्यांचा कुठल्याही संकुचित विचारधारेशी कधीच संबंध आला नाही हे ही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत. देशाच्या व्यवस्थेला नेहमीच टिकेचे केंद्र करुन ती उलथून टाकण्याचा केवीलवाणा प्रयत्न काही शक्ती करत आहेत आणि त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा हवा तसा उपयोग ते करतायत. देशातील जनाधार नष्ट होत चाललेल्या मार्क्सवादी संघटनांनी दलित चळवळीतील राजकीय दुफळीचा फायदा घेऊन या चळवळीला मार्क्सवादाशी जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चालवला आहे. अशा संधी साधू संघटनांचा मूळ हेतू लक्षात घेऊन अ. भा. वि. प. ने वेळोवेळी पूराव्यानीशी त्यांचा चेहरा समाजा पुढे आणून त्यांना विरोध केला आहे व भविष्यात ही करत राहील. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीत बुध्दाच्या शांततेच्या आणि दिशाहीन मार्क्सवादाच्या मार्गा विषयी भाष्य केले होते व बुध्दांचा चिरकाल शांततेचा मार्गच सर्वश्रेष्ठ आहे असे सुचित केले होते. आज जी मंडळी दलित चळवळीला मार्क्सवादाकडे घेऊन जाऊ इच्छितात त्यांना डॉ. आंबेडकरांनी केलेल भाष्य चपराक असेल. डॉ आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा सुशिक्षित समाज दिशाहीन मार्क्सला कदापी जवळ करणार नाही अशी खात्री आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विचार आपल्या पर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्याच मार्क्स विषयी भाषणाचा मराठी अनुवाद आपल्या समोर ठेवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. सदर भाषण वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मार्क्सवादा बद्दलची भूमिका आपल्या लक्षात येईल अशी अपेक्षा.

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

कार्ल मार्क्स व बुद्ध यांच्या मधील तुलना विनोद म्हणून ही मानली जाईल. त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. माक्र्स व बुद्ध यांच्या २३८१ वर्षाचे अंतर आहे. बुद्ध इ. स. पूर्व ५६३ मध्ये जन्माला आला व कार्ल मार्क्स इ. स. १८१८ मध्ये कार्ल मार्क्स हा एका नव्या तत्वज्ञानाचा नव्या राज्य व्यवस्थेचा एका नव्या अर्थ शास्त्रीय पद्धतीचा शिल्पकार असल्याचे समजण्यात येते. दुसऱ्या बाजूस बुद्ध हा ज्याचा राज्य शास्त्राशी वा अर्थ शास्राशी काहीही संबंध नाही अशा धर्माचा संस्थापक, यापेक्षा आणखी कोणीही नाही, असे मानले जाते. अशा प्रदीर्घ कालखंडाचे अंतर असलेल्या व वेगवेगळी विचार क्षेत्रे व्यापलेल्या या दोन व्यक्तिमत्वां मधील तुलना अथवा विरोध विचारार्थ मांडणारे ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’’ हे या निबंधाचे शीर्षक विचित्र वाटणे स्वाभाविक आहे. 

मार्क्सवाद्यांना साहजिक त्याचे हसू येईल आणि मार्क्स व बुद्ध यांचा एकाच पातळीवर परामर्श घेण्याच्या कल्पनेची ते कुचेष्टा करतील. माक्र्स किती आधुनिक व बुद्ध किती प्राचीन! मार्क्सवादी म्हणतील की - बुद्धाची त्यांच्या गुरूशी तुलना करता बुद्ध निव्वळ आदिम ठरणे क्रम प्राप्त आहे. अशा दोन व्यक्तींमध्ये कसली तुलना होऊ शकणार मार्क्सवादी बुद्धाकडून काय शिकू शकणार? बुद्ध काय शिकवू शकणार? काहीही असो, या दोघां मधील तुलना आकर्षक व बोधपर आहे. दोघांचे ही वाचन झाले असल्यामुळे व दोघांच्या तत्त्वज्ञानात रस असल्यामुळे त्यांच्यातील तुलना करण्याचे काम माझ्या वर येऊन पडते. जर मार्क्सवाद्यांनी त्यांचे पूर्वग्रह मागे सारले आणि बुद्धाचा अभ्यास केला व त्याची भूमिका काय होती हे समजून घेतले तर मला खात्री वाटते की, ते त्यांचा रोख बदलतील बुद्धाचा उपहास करण्याचे त्यांनी ठरवले असल्याने ते त्याची प्रार्थना करू लागतील अशी अपेक्षा करणे अर्थात अवाजवी होईल. परंतु एवढे मात्र म्हणता येऊ शकेल की, त्यांनी दखल घ्यावी असे, त्यांच्या योग्यतेचे बुद्धाच्या शिकवणुकीतून काही तरी आहे, हे त्याच्या लक्षात येईल.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण १ : बुद्धाचा सिद्धांत

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

सर्व साधारणपणे बुद्धाचा अहिंसेच्या तत्त्वांशी संबंध जोडण्यात येतो. त्यांच्या शिकवणुकीचा तो आदि व अंत असल्याचे मानले जाते. बुद्धाने शिकवले ते फार पलीकडचे, अत्यंत व्यापक आहे, हे क्वचितच कोणाला माहीत असेल. म्हणून त्याची तत्त्वे तपशीलवार मांडणे आवश्यक आहे. त्रिपिटकाच्या वाचनातून मला जी तत्त्वे समजली ती मी खाली नमूद करीत आहे :

स्वतंत्र समाजासाठी धर्म आवश्यक आहे. प्रत्येक धर्म स्विकारण्या सारखा असतोच असे नाही. धर्माचा जीवनाच्या तथ्यांशी आणि वास्तविकतेशी संबंध असला पाहिजे. त्याचा ईश्वर किंवा आत्मा, स्वर्ग किंवा पृथ्वी या विषयीच्या सिद्धांतांशी व कल्पनांशी संबंध असता कामा नये. ईश्वराला धर्माचा केंद्र बिंदू मानणे अयोग्य आहे. आत्म्याची मुक्ती हा धर्माचा केंद्र बिंदू मानणे चूक आहे. 

प्राण्याचा बळी देणे हा धर्माचा केंद्र बिंदू मानणे चूक आहे. खरा धर्म माणसाच्या मनात बसत असतो, शास्रात नव्हे. मनुष्य व नीती हा धर्माचा केंद्र बिंदू असला पाहिजे. जर तसे नसेल तर धर्म ही एक क्रूर अंधश्रद्धा ठरेल. जगात ईश्वर नसल्यामुळे नीती ही केवळ जीवनाचा आदर्श असणे पुरेसे नाही तर जीवनाचा नियम अथवा कायदा असावा. धर्माचे कार्य जगाची पुनर्रचना करणे व त्याला सुखी बनविणे हे आहे, त्याचा आरंभ वा अंत यांचे स्पष्टीकरण करणे नव्हे.

हित संबंधांच्या कलहामुळे जगात दुःख आहे व तो सोडवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अष्टांग मार्गाचे अनुसरण होय. संपत्तीची खाजगी मालकी एका वर्गाला सत्ता तर दुसऱ्या वर्गाला दु:ख देते.

समाजाच्या भल्यासाठी ह्या दुःखाचे कारण दूर करून ते नष्ट केले जाणे आवश्यक आहे. सर्व मानव समान आहेत. माणसाचे मूल्यमापन त्याच्या जन्माने नसून त्याच्या कर्तृत्वाने होते. महत्त्वाचे काय तर उच्च आदर्श; उच्च घराण्यातील जन्म नव्हे. सर्वां बद्दलची मैत्री अथवा मित्रत्व कधीच सोडता कामा नये. आपण त्यासाठी आपल्या शबूचे देखील ऋणी असले पाहिजे. प्रत्येकाला विद्या प्राप्त करण्याचा, अध्ययन करण्याचा हक्क आहे. 

माणसाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे विवेची ही आवश्यकता आहे. सदाचरणा शिवाय ज्ञान हे घातक होय. कोणतीही गोष्ट अंतिम (अस्खलन शील) नाही. कोणतीही गोष्ट कायम बंधनकारक नाही. प्रत्येक गोष्ट चौकशी व परीक्षण यांस पात्र आहे. कोणतीही गोष्ट अंतिम नाही. प्रत्येक गोष्ट कार्यकारण भावाच्या नियमाला धरून आहे. 

कोणतीही गोष्ट कायम अथवा सनातन नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तन शील (बदलास पात्र) आहे. अस्तित्व हे नेहमीच घडत असते. किंबहुना परिवर्तन शीलता हाच जगाचा नियम होय. युद्ध जर सत्यासाठी व न्यायासाठी नसेल तर ते घातक आहे. विजेत्याची जितांबाबत काही कर्तव्ये आहेत. संक्षिप्त स्वरूपात बुद्धाची तत्त्वे ही आहेत फार प्राचीन काळात जरी सांगितलेली असली तरी ही आज ही ती तितकीच नवीन वाटतात. (किती प्राचीन, पण किती नवीन!)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण २ : कार्ल मार्क्सचा सिद्धांत

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

आता आपण कार्ल मार्क्सने मुळात प्रतिपादन केल्याच्या तत्वांचे करू (त्याच्या तत्वाकडे वळूया.) कार्ल मार्क्स हा आधनिक समाजवादाचा अथवा साम्यवादाचा जनक आहे यात शंका नाही. परंतु केवळ समाजवादाचा सिद्धांत प्रतिपादन करण्यात त्याला स्वारस्य नव्हते. ती गोष्ट त्याच्या ही फार पूर्वी इतरांनी केली होती. मार्क्सला त्याचा समाजवाद वैज्ञानिक होता हे सिद्ध करण्यात अधिक स्वारस्य होते. त्याची चळवळ भांडवलदारां विरूद्ध जशी होती तशीच ती ज्यांना त्याने स्वप्न रंजित किंवा अव्यावहारिक समाजवादी म्हटले त्यांच्या विरूद्ध ही होती. आपला समाजवादाचा प्रकार हा वैज्ञानिक असून स्वप्न रंजित नाही, हे आपले म्हणणे प्रस्थापित करणे, यापेक्षा मार्क्सने प्रतिपादन केलेल्या सर्व सिद्धांतांचा अन्य कोणताही हेतू नव्हता.

"वैज्ञानिक समाजवाद" द्वारे कार्ल मार्क्सला जे अभिप्रेत होते ते हे की, त्याचा समाजवादाचा प्रकार हा अटळ आणि अपरिहार्य आहे आणि समाज त्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे व त्याचा मार्ग कोणी ही रोखू शकत नाही.

आपले हे नवे आणि विचार सरणी (म्हणणे) सिद्ध करण्यासाठी मार्क्सने विशेषतः (कष्ट घेतले) परिश्रम केलेले आहेत. मार्क्सची विचार सरणी (म्हणणे) पुढील सिद्धांतांवर आधारलेली आहे, ती अशी -

तत्वज्ञानाचा हेतू (जगाची पुनर्रचना करणे हा असून) विश्वाचे उगम स्थान काय याचे स्पष्टीकरण करणे हे नसून विश्वाचे पुन निर्माण करणे हा आहे. आर्थिक शक्ती हीच मुख्यतः इतिहास घडविण्यात जबाबदार असतात. समाजाची मालक व कामगार या दोन वर्षां मध्ये विभागणी झालेली आहे. या दोन वर्षां मध्ये नेहमीच वर्ग कलह (चालू आहे) सुरू असतो.

मालक वर्गा द्वारे मजूर वर्गाचे नेहमीच शोषण होत असते. कामगारांच्या श्रमाचे फळ असलेल्या नफ्यांचे (Profit) अथवा अतिरिक्त मुल्याचा मालक वर्गा द्वारे दुरूपयोग होत असतो. ही पिवळणूक उत्पादन साधनांचे राष्ट्रीयीकरण करून म्हणजे (खाजगी) व्यक्तिगत संपत्ति नष्ट करून (संपुष्टात आणता येईल), नष्ट करता येईल.

मालक वर्गा द्वारे मजूर वर्गाची पिळवणूक हीच श्रमिक वर्गाला अधिकाधिक दुर्बल आणि दारिद्रय बनवित आहे. कामगारांमधील ह्या वाढती दुर्बलता आणि दारिद्रयाचा परिणाम म्हणून कामगारांमध्ये क्रांतिकारी भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे वर्ग कलहाचे रूपांतर वर्ग लढ्यात होत आहे.

कामगार हे मालका पेक्षा संख्येने जास्त असल्यामुळे ते राज्य सत्ता हस्तगत करतील व स्वतःचे राज्य प्रस्थापित करतील हे अटळ आहे (यालाच त्याने कामगार वर्गाची हुकूमशाही असे म्हटले आहे.) या क्रांतीला कुणी ही रोखू शकत नाही त्यामुळेच समाजवाद हा अटळ आहे. मला आशा आहे की, मार्क्सच्या समाजवादाची मूलभूत विचार सरणी मी अचूकपणे मांडलेली आहे.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण ३ : मार्क्स सिद्धांतातील टिकावूपणा

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानांची तुलना करण्यापूर्वी ह्या मार्क्सवादी तत्त्वांच्या मूळ लिखाणातील किती से टिकून राहिले, इतिहासाने किती बाद ठरवले व त्याच्या विरोधकांनी किती नष्ट केले याची नोंद घेणे आवश्यक आहे. मार्क्सवादी तत्त्वज्ञान, ज्यावेळी एकोणिसाव्या शतकाच्या मध्य काळात मांडण्यात आले होते, तेव्हा पासूनच त्याच्या वर पुष्कळ टीका होत आलेली आहे. या टीकेचे पर्यवसान कार्ल मार्क्सने उभारलेल्या तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाचे तुकडे पडण्यात झाले आहे. समाजवाद हा अटळ आहे हा मार्क्सवादी दावा फोल ठरला आहे. यात शंका घेण्यास क्वचितच एखादी जागा असू शकेल. समाजवादाचे बायबल असलेल्या त्याच्या ‘‘दास कॅपिटल’ चे प्रकाशन झाल्या नंतर साधारणतः सत्तर (७०) वर्षांच्या कालावधी नंतर १९१७ मध्ये एका देशात (रशियात) कामगार वर्गाची हुकूमशाही प्रथम प्रस्थापित झाली. 

साम्यवाद (जे कामगार वर्गाच्या हुकूमशाहीचे दुसरे नाव आहे. जेव्हा रशियात आला तेव्हा देखील तो कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयत्ना शिवाय काही तरी अटल बाब म्हणून आला नाही; त्याच्यासाठी क्रांती) साम्यवाद रशियात प्रत्यक्षात आणण्यासाठी (पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी) पुष्कळच हिंसा व रक्तपात घडवून आणावा ह्याकरिता जाणीव पूर्वक योजना आखावी लागली. साम्यवाद ज्याला कामगार वर्गाची हुकूमशाही म्हणतात. तो रशियात सहजा सहजी आलेला नाही तर त्याला देखील मानवी प्रयत्न करावेच लागले अर्थात् क्रांती करावी लागली. रशियाने उर्वरित जगातील देशात आज ही साम्यवाद प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्याची दिवा स्वप्ने बघितली. समाजवाद अटळ आहे' हा मार्क्सवादी सिद्धांत सर्व साधारणपणे फोल ठरला आहे. त्याशिवाय या यादीत सांगितलेली इतर विधाने देखील तकने तसेच अनुभवाच्या आधारावर नष्ट करण्यात आली आहेत. इतिहास घडण्यास कारण म्हणून आता कोणीही (इतिहासाचे) आर्थिक स्पष्टीकरण स्वीकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले गेले आहे हे कोणी ही मान्य करीत नाही. हीच गोष्ट त्याच्या इतर आधार विधानांना लागू आहे.

कार्ल मार्क्सचे विचार सरणीतील जे काही अवशेष समान शिल्लक राहतात ते आहेत अवशेष, लहान तरीही अत्यंत महत्त्वाची आहेत. माझ्या मते या अवशेषा मध्ये पुढील चार बाबींचा अंतर्भाव होतो.

१. तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे. विश्वाच्या उगम स्थानाचे स्पष्टीकरण करण्यात वेळ नष्ट करणे नव्हे,

२. वर्गा - वर्गा मध्ये हित संबंधांचा कलह आहे.

३. संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते तर दुसऱ्या वर्गाला त्याची पिळवणूक झाल्यामुळे दुःख मिळते.

४. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण ४ : बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्या मधील तुलना 

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

मार्क्सवादी सिद्धांतातून जी तत्व टिकून राहिली आहेत. ते येऊन आता आपणास बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्या मध्ये तुलना करता येईल.पहिल्या मुद्यावर बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्या मध्ये पूर्ण एकमत आहे, हे एकमत किती घनिष्ठ आहे हे दर्शविण्यासाठी मी बुद्ध आणि पोट्टपाद ब्राह्मण यांच्या मध्ये झालेल्या संवादातील काही भाग खाली देत आहे. त्यानंतर पोट्टपादाने पुढील शब्दात (बुद्धाला) प्रश्न विचारले -

१. जग नित्य नाही काय?

२. जगाला अंत आहे काय?

३. जग अनंत आहे काय?

४. चेतना (जीव) ही शरीरा सारखीच आहे काय?

५. चेतना ही एक गोष्ट व शरीर ही दुसरी गोष्ट आहे काय?

६. ज्याला सत्य प्राप्त झाले आहे तो (तथागत) मरणोत्तर जिवंत राहतो काय?

७. तो मरणोत्तर पुन्हा जिवंत राहत ही नाही किंवा जिवंत राहत नाही असे ही नाही, असे आहे काय? आणि मग या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले व्यक्त केलेले नाही.

‘‘परंतु भगवंतांनी त्यावर कोणतेही मत का व्यक्त केलेले (कारण) या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही, त्याचा धम्माशी संबंध नाही ते सदाचरणाच्या कोणत्याही तत्त्वांची वृद्धी करीत नाही, किंवा त्यापासून अनासक्ति, लोभापासून हृदयाची मुक्ती किंवा शांती दमन किंवा अभिज्ञान (अष्टाग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान) किंवा निर्वाण साध्य होत नाही, म्हणून मी आपले मत व्यक्त केलेले नाही."

दुसऱ्या मुद्या बाबत, बुद्ध व कोसलचा राजा प्रसेनजित यांच्या मध्ये झालेल्या संवादातील भाग मी खाली देत आहे? "आणखी असे की, राजा - राजांमध्ये, सरदारा - सरदारांमध्ये, ब्राह्मणा - ब्रह्मणांमध्ये, गृहस्था - गृहस्थांमध्ये, माता व पुत्रामध्ये, पुत्र व पित्यामध्ये, बंधू - भगिणींमध्ये, मित्रा - मित्रांमध्ये नेहमी कलह चालू आहे. जरी हे शब्द असले तरी त्यातून त्याने समाजाचे खरे चित्र उभे केल्याचे बुद्धाने नाकारलेले नाही. वर्ग कलहा बाबतचा स्वतःचा दृष्टीकोन विचारात घेता, त्याचा अष्टांग मार्गाचा सिद्धांत हा 'वर्ग कलह अस्तित्वात आहे' वा हा वर्ग कलह हेच दुःखाचे कारण आहे' यास मान्यता देतो. तिसऱ्या प्रश्ना बाबत मी पोट्टपादा बरोबर झालेल्या बुद्धाचा त्याच संवादातील भाग उद्धृत करतो? 

‘‘मग भगवंतांनी काय सांगितले?" पोट्ठपाद, मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितले! मी दुःखाचे मूळ काय आहे, हे सांगितले. मी दुःखाचा अंत कसा होऊ शकतो ते सांगितले. मी कोणत्या मार्गाने दुःखाचा अत घडवता येईल, ते सांगितले."

‘‘आणि भगवंतांनी याप्रमाणे का सांगितले?" कारण पोट्ठपाद हे विधान लाभदायक आहे. ते धम्माशी संबंधित आहे. ते सम्यक् आचरणाचा प्रारंभ, वैराग्य, लोभापासून मुक्ती, शांती, दमन, अभिज्ञान ऊर्फ जीवनातील उच्चतर अवस्थांची दृष्टी (संबोधि) व निर्वाण यांना कारणीभूत होते. म्हणून पोट्ठपाद मी त्याप्रमाणे विधान केले आहे." भाषा वेगळी आहे, परंतु अर्थ तोच आहे. जर दु:खाचा अर्थ पिळवणूक' असा घेतला तर बुद्ध व मार्क्स यांमध्ये अंतर नाही. 

खाजगी संपत्तीच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यात झालेल्या संवादातील पुढील उतारा उद्बोधक आहे. आनंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतो - ‘धन, लालसा, हाव' असण्याचे कारण ‘मालकी’ असे मी सांगितले आहे. तर ते तसे कोणत्या प्रकारे सांगितले, ते आनंद या पद्धतीने समजून घेता येईल."

जे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची मालकी नसेल मग ती कोणाची ही असो वा कोणत्याही गोष्टीची असो. तेथे कोणतीही मालकी नसल्यामुळे, तेथे मालकीच्या अशा नसण्यामुळे कोणत्याही प्रकारची धन, लोभ (हावा) दिसून येईल काय?

‘दिसून येणार नाही, भगवन् !" ‘म्हणून, आनंद, हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. लोभ (हाव) असण्याचे कारण मालकी."

"मी आसक्ती हे मालकी असण्याचे कारण सांगितले आहे. तर आनंद, ती तशी कोणत्या प्रकारे आहे, या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. जेथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही. मग ती कोणी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत दाखविलेली असो. ती जी काही असेल त्या आसक्तीच्या नसण्याने, कोणत्याही प्रकारची मालकी दिसून येईल काय?"

"दिसून येणार नाही, भगवन् !" म्हणून आनंदा, हे त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. मालकीचे कारण आसक्ती.

चौथ्या मुद्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भिक्षु संघाचे नियमच यांचे उत्तम प्रमाण आहेत. या नियमांनुसार भिक्षु केवळ पुढील आठ वस्तूं पुरतीच खाजगी संपत्ती जवळ बाळगू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. या आठ वस्तू म्हणजे -

१. रोजच्या वापरासाठी तीन वटै (चीवर)
२. कमर बंध
३. एक भिक्षापात्र
४. एक वस्तरा
५. एक सुई
६. धागा
७. एक पाणी गाळण्याचे फडके

दुसरी गोष्ट, भिक्षु त्याला जवळ बांळगण्यास परवानगी दिलेल्या आठ वस्तूं शिवाय सोन्याने वा चांदीने आणखी काही वस्तू विकत घेईल या भीती पोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षुला पूर्णपणे मनाई होती. हे नियम रशियातील साम्यवादात दिसून येणाऱ्या नियमांपेक्षा किती तरी अधिक कठोर आहेत.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण ५ : साधने

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

आता आपण साधनांचा विचार करूया. बुद्धाने प्रतिपादन केलेली साम्यवाद घडवून आणणारी साधने अत्यंत निश्चित अशी (स्पष्ट) होती. ही साधने तीन भागांमध्ये वर्णन करता येऊन शकतील.

भाग एक यामध्ये पंचशीलाच्या आचरणाचा समावेश होतो. बुद्धाने एका नव्या धर्म तत्त्वाला (गॉस्पेल) जन्म दिला. त्याला जो प्रश्न सतावत होता त्या प्रश्नाच्या उत्तराची किल्ली त्या धर्म तत्त्वात (गॉस्पेल) होती. 

जग दुःखाने व दैन्याने भरलेले आहे, हे सत्य या नव्या धर्म तत्त्वाचा पाया आहे. हे सत्य केवळ दखल घेण्या पुरते नाही, तर मुक्तीच्या कोणत्याही उपाय - योजनेत ते पहिले व सर्व प्रथम मानणे आवश्यक आहे. ही वस्तुस्थिती जाणून घेणे हा बुद्धाने त्याच्या धर्म तत्त्वाचा प्रारंभ बिंदू मानला. ते धर्म तत्व कोणत्याही उपयुक्त प्रयोजनार्थ उपयोगी ठरण्यासाठी हे दुःख व दैन्य दूर करणे हे त्याचे ध्येय व उद्दिष्ट होते. या दुःखाची कारणे कोणती असू शकतील याची चौकशी करता बुद्धाला ती केवळ दोन कारणे असतील, असे दिसून आले. माणसाचे दुःख व दैन्य काही अंशी त्याच्या स्वतःच्या दुराचरणाचा (गैर वर्तणुकीचा) परिणाम असतो. दुःखाचे हे कारण दूर करण्यासाठी त्याने पंचशील आचरणात आणण्याचा उपदेश केला. पंचशीला मध्ये पुढील (नियमांच्या) तत्व पालनाचा अंतर्भाव होतो.

१. कोणत्याही प्राणी मात्राला ठार करण्यापासून वा ठार करण्यास कारण ठरण्यापासून अलिप्त राहणे.

२.चोरीपासून म्हणजे दुसऱ्याची मालमत्ता लबाडीने किंवा बळ जबरीने संपादन करण्यापासून अलिप्त राहणे.

३. असत्य भाषणापासून अलिप्त राहणे, काम वासनेपासून अलिप्त राहणे, मादक पेयांपासून अलिप्त राहणे.

जगातील दुःख व दैन्य याचा काही भाग, बुद्धाच्या मते, माणसाच्या माणसाबाबत असलेल्या असमानतेचा परिणाम होय. ही असमानता कशी दूर करता येईल? माणसाची माणसाबाबत असलेली असमानता दूर करण्यासाठी बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. आर्य अष्टांगिक मार्गाची तत्त्वे अशी आहेत.

१. सम्यक दृष्टी म्हणजे अंधश्रद्धांपासून मुक्ती.

२. सम्यक संकल्प म्हणजे बुद्धिमान व निश्चयी माणसाला साजेसा उच्च संकल्प.

३. साम्य वाचा म्हणजे करूणेची, मुक्त व सत्य पूर्ण वाचा.

४. सम्यक व्यायाम म्हणजे इतर सर्व सात तत्त्वांचे पालन.

५. सम्यक आजीव म्हणजे प्राणी मात्राला दुखापत किंवा इजा न करणारी उपजीविका.

६. सम्यक कर्मात म्हणजे इतर सर्व सात तत्त्वांचे पालन.

७. सम्यक स्मृति म्हणजे जागृत व कृतिशील मनाने ठेवलेली स्मृती.

८. सम्यक समाधि म्हणजे जीवनातील गहन गूढ तत्त्वांवरील गंभीर विचार. 

पृथ्वीवर न्यायाचे साम्राज्य प्रस्थापित करणे व त्याद्वारे जगाच्या पाठी वरून दुःखाला व दैन्याला हद्दपार करणे हे आर्य अष्टांगिक मार्गाचे ध्येय होय. काही तरी उपयोग होऊ शकेल या विचारापासून मुक्त झाल्या शिवाय कोणतेही सत्संकल्प केले तरी मग ते किती ही ठाम असत. त्यांच्या पासून त्याला कसलाच लाभ होणार नाही. या अडथळ्यांवर मात केली तरच माणसाने उत्तम प्रकारे कार्यारंभ केला आहे व त्याला लवकरच किंवा उशीरा का होईना विजय प्राप्त होण्याची शक्यता आहे, असे म्हणता येऊ शकेल. चौथ्या अडथळ्यात शारीरिक वासनांचा (काम तृष्णा) समावेश होतो. पाचवा अडथळा इतर व्यक्तीं बाबतची दुष्ट भावना (क्रोध) हा आहे. सहावा अडथळा भौतिक आस्ततिंपासून असलेल्या भावी प्राप्ती करण्यासाठी सुखाचा लाभ होतो. सातवा अडथळा अरूप देव लोक - प्राप्तीची इच्छा (अरूप राग) हा आहे. आठवा अडथळा अहंकार (मान) आहे व नववा अडथळा (दंभ) होय. या अशा भावना आहेत की - माणसांना त्यांवर मात करणे सर्वात कठीण आहे व अधिक श्रेष्ठ व्यक्तींना स्वतः पेक्षा जे कमी समर्थ आहेत व कमी चारित्र्यवान आहेत. त्यांच्या प्रति तिरस्कार वाटण्याच्या भावनेवर विजय मिळविणे आणखीच कठीण असते. दहावा अडथळा ‘अज्ञान (अविज्ज)' होय. 

जरी सर्व अडथळ्यावर मात केली तरी हा एक अडथळा उरेलच. सुज्ञ व सद्गुणी माणसाला सलणारा तो काटा आहे. तो माणसाचा अंतिम व कट्टर शत्रु आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण करताना निब्बाणाद्वारे अडथळ्यांवर मात करणे अभिप्रेत आहे. माणसाने मनाची कोणती अवस्था चिकाटीने विकसित करावी हे आर्य अष्टांगिक मार्गाचा सिद्धांत सांगतो. माणसाला जर आर्य अष्टांगिक मार्गावर चालावयाचे असेल तर त्याने कोणत्या मोहावर व अडथळ्यावर मनःपूर्वक मात केली पाहिजे ते निब्बाण सांगते. या नव्या धर्म तत्त्वाचा (गॉस्पेलचा) चौथा भाग पारमितांचा सिद्धांत हा आहे.

पारमितांचा सिद्धांत माणसाच्या दैनंदिन जीवनात दहा सद्गुणांचे आचरण मनावर ठसवतो. ते दहा सगुण असे आहेत - 

१. प्रज्ञा 
२. शील
३. नैष्कर्य 
४. दान 
५. वीर्य 
६. सत्य 
७. अधिष्ठान 
८. मैत्री
९. उपेक्षा.

अविद्या, मोह किंवा ज्ञानाचा अभाव यांचा अंध:कार दूर करणारा प्रकाश म्हणजे प्रज्ञा अथवा शहाणपण होय.

आपल्या पेक्षा सुज्ञ असलेल्यानां प्रश्न विचारून आपल्या सर्व शंका दूर केल्या पाहिजेत, सुज्ञची संगत केली पाहिजे व मनाचा विकास करण्यास मदत करतील अशा वेगवेगळ्या कला व शास्त्रे जोपासली पाहिजेत. या गोष्टी प्रशंसाठी आवश्यक आहेत. शल ही नैतिक भावना आहे. वाईट गोष्टी न करण्याचा व चांगल्या गोष्टी करण्याचा, चूक करण्याची लाज वाटण्याचा असा तो स्वभाव आहे. शिक्षेच्या भीतीने वाईट करण्याचे टाळणे म्हणजे शील शीलाचा अर्थ पापाचरण करण्याची भीती. 

नैष्कर्य म्हणजे ऐहिक सुखांचा त्याग. दान याचा अर्थ, इतरांच्या भल्यासाठी, त्या बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करता, एखाद्याने आपली मालमत्ता, रक्त, अवयव व आपले प्राण देखील अर्पण करणे होय.

वीर्य म्हणजे साम्यक प्रयत्न. मागे न फिरण्याच्या विचाराने आपण जी काही गोष्ट करण्यासाठी हाती घेतली असेल ती आपली सर्व शक्ती एकवटून पार पाडणे होय.

शांती म्हणजे सहनशीलता होय द्वेषाला उत्तर न देणे हे तिचे सार आहे. कारण द्वेषाने ष शम्पत नाही, तो केवळ सहनशीलतेने शमतो. 

सत्य म्हणजे खरे बोलणे कधीही खोट न बोलण्याची सत्य ही बुद्धाची एक उत्कट इच्छा होय. त्याचे बोलणे सत्य असते व ते अन्य काही नसून केवळ सत्य असते.

अधिष्ठान म्हणजे ध्येया पर्यंत पोहोचण्यासाठी केलेला ठाम निर्धार होय. 

मैत्री ही शत्रु व मित्र, प्राणी व मनुष्य अशा सर्व प्राण्यांना सामावणारी मैत्रीची भावना होय.

‘उपेक्षा' ही उदासीनतेहन भिन्न अशी अलिप्तता होयही मनाची एक अवस्था आहेत्या अवस्थेत कोणतीही आवड किंवा नावड नसते. परिणामाने विचलित न होता त्याचा पाठपुरावा करीत राहण्याची ती अवस्था होय. हे सद्गुण आपण पराकाष्ठेने आपल्या आचरणात आणले पाहिजेत. म्हणूनच त्यांना पारमिता (पूर्णतेच्या अवस्था) असे म्हणतात.

जगातील दु:ख व दैन्य संपष्टात आणण्यासाठी बुद्धाने त्याच्या संबधीची फलश्रुती म्हणून अधिकारवाणीने प्रतिपादन केलेला हा धम्मोप्रदेश आहे. बुद्धाने स्विकारलेली साधने ही माणसाने (स्वच्छेने) प्रज्ञा व शील याचा अनुसरून आपला नैतिक आचरण बदलावा व मतान्तर घडवून आणावे यासाठी होती, हे स्पष्ट आहे. साम्यवाद्यांनी स्वीकारलेली साधने तितकीच स्पष्ट, अपुरी व झटपट अंमलात येणारी आहेत.

ती म्हणजे १. हिंसा आणि २. कामगारांची साम्यवाद प्रस्थापित करण्याची केवळ हीच दोन साधने आहेत असे साम्यवादी म्हणतात. पहिले साधन हिंसा आहे. विद्यमान पद्धती मोडून टाकण्यासाठी त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पर्याप्त ठरणार नाही. साधून, कामगारांची हुकूमशाही आहे. साम्यवादी (नवीन) आणण्यासाठी त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट पर्याप्त ठरणार नाही. व कार्ल मार्क्स यांच्या मधील साम्य व भेद आता स्पष्ट झालेले आहेत.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण ६ : साधनांचे मूल्य मापन

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

आपण आता साधनांच्या मूल्य मापना कडे वळू या. कोणाची साधने श्रेष्ठ असून ती साधने दीर्घकाळ टिकून राहतील हे आपण विचारात घेतले पाहिजे. तथापी, दोन्ही बाजूस काही गैरसमज आहेत. ते काढून टाकणे.

हिंसेचा मुद्दा घ्या. हिंसेच्या केवळ कल्पनेने ज्यांचा थरकाप उडतो असे अनेक लोक आहेत. परंतु ही केवळ एक भावना आहे. एकंदरीत पाहता हिंसे वाचून चालू शकणार नाही. बिगर साम्यवादी देशांमध्ये देखील खून्याला फाशी देण्यात येते. फाशी देणे हे हिंसा करण्यासारखे नाही काय? बिगर साम्यवादी देश बिगर साम्यवादी देशा बरोबर युद्ध करतात. लाखो लोक ठार केले जातात. ही हिंसा नाही काय? जर एखाद्या संपत्तीच्या मालकाला, जर त्याची मालकी बाकीच्या लोकांना दु:खात लोटत असेल तर, का ठार करण्यात येऊ नये? संपत्तीच्या मालकाचा अपवाद करण्याचे कोणतेही कारण नाही. खाजगी संपत्ती पवित्र म्हणून कोणी का मानावी? 

बुद्ध हिंसेच्या विरूद्ध होता परंतु तो न्यायाच्या ही बाजूला होता. जेथे न्यायासाठी आवश्यक असेल तेथे त्याने बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती. ही गोष्ट वैशालीचा मुख्य सेनापती असलेल्या सिंह सेनापतीशी झालेल्या त्याच्या संवादातून उत्तम रीत्या दर्शविली गेली आहे. बुद्ध अहिंसेचा उपदेश करीत असल्याचे समजल्या वरून सिंह सेनापती त्याच्याकडे गेला व त्याने असे विचारले. 

भगवान अहिंसेचा उपदेश करतात. याचा अर्थ भगवान अपराध्याला शासन करू नये, असा उपदेश करतात काय? आमच्या बायका - मुलांचे आमच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी आम्ही युद्धावर जाऊ नये, असा उपदेश भगवान करतात काय? अहिंसेच्या नावाखाली आम्ही गुन्हेगारांच्या हातून सोसावी हानी काय? युद्ध सत्याच्या व न्यायाच्या हिताचे असले तरी तथागत सर्व प्रकारच्या युद्धाला प्रतिबंध करतात काय?

बुद्धाने उत्तर दिले - मी जो काही उपदेश करीत आहे त्याचा तू चुकीचा अर्थ घेतला आहेस. अपराध्याला शिक्षा झालीच पाहिजे व निरपराधी माणसाची सुटका देखील झाली पाहिजे. न्यायाधीशाने जर एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा दिली तर तो न्यायाधीशाचा गुन्हा नाही. तेथे शिक्षेचे कारण म्हणजे गुन्हेगाराचा गुन्हा आहे. शिक्षा सुनावणारा न्यायाधीश केवळ कायद्याची अंमल बजावणी करीत असतो. त्याला अहिंसा न पाळल्याचा आरोप करता येऊ शकत नाही. जेव्हा शांतता राखण्याचे सर्व उपाय अयशस्वी ठरतात. तेव्हा होणाऱ्या हिंसेची जबाबदारी जो युद्ध सुरू करता त्याच्यावर येऊन पडते. दुष्ट शक्तींना कोणी कधीच शरण जाता कामा नये. युद्ध असू शकेल पण ते स्वार्था हेतूंसाठी असता कामा नये.

प्रा. जॉन ड्युई यांनी आवर्जून मांडलेल्या कारणा सारखीच अहिंसेच्या विरोधात अर्थात इतर हि कारणे आहेत. जे असे सांगता कि, साध्य हे  साधनांना योग्य ठरवते. हे नैतिक दृष्ट्या विकृतच आहे. त्यांचा समाचार घेताना ड्युईंनी योग्यच विचारले आहे की, साध्य जर साधनांना योग्य ठरवू शकणार नसेल तर कोण योग्य ठरवू शकेल? केवळ साध्यच असे असू शकते की सांधनांना योग्य ठरवू शकते. साध्यच केवळ साधनांना योग्य ठरवू शकते, यास बहुधा बुद्धने मान्यता दिली असती. दुसरी कोणती शक्यता होती? आणि जर साध्याने हिंसा ही योग्य ठरविली असेल तर नजरे समोरचे ‘साध्य' साध्य करण्यासाठी हिंसा ही न्याय्य साधन असेल, असे तो म्हणाला असता. जर बळ हे त्या साध्यासाठी एकमेव साधन असते तर संपत्तीच्या मालकांना बळाच्या वापरातून त्याने निश्चितच वगळले नसते. अशा प्रकारे साध्यासाठी असलेली त्याची साधने ही वेगळी होती असे आपणास दिसून येईल.

प्रा. ड्ळूई यांनी दर्शविल्या प्रमाणे, हिंसा हे केवळ बळाचा वापर करण्याचे दुसरे नाव आहे. आणि जरी हिंसा ही सृजनात्मक प्रयोगनासाठी वापरणे आवश्यक असले तरी "ऊ" म्हणून बळाचा वापर आणि हिंसा म्हणून बळाचा वापर यामध्ये भेद हा केलाच पाहिजे. एक साक्ष्य प्राप्त करताना जी गोष्ट नष्ट करावयाचे योजले असेल तिच्या बरोबर असलेल्या इतर अनेक साध्यांचाही नाश अंतर्भूत असतो. बळाचा वापर अशा प्रकारे नियंत्रित असला पाहिजे की एक वाईट गोष्ट नष्ट करताना शक्य होतील तितकी इतर अनेक साध्ये वांचवली जावीत. बुद्धाची अहिंसा ही जैन धर्माचा संस्थापक महावीर त्याने उपदेशिलेल्या अहिंसे सारखी टोकाची नव्हती. त्याने फक्त ऊर्जा म्हणून करण्यात येणाऱ्या बळाच्या वापराला परवानगी दिली असती. अहिंसा हे अनिबंध तत्त्व आहे. असा प्रचार साम्यवादी करतात . बुद्धाचा त्यास सक्त विरोध होता. 

हुकुमशाहीच्या बाबतीत सांगावयाचे तर बुद्धाला कसलीच हुकूमशाही मान्य झाली नासती. तो प्रजासत्ताकवादी म्हणून जन्माला आला व प्रजासत्ताकवादी म्हणूनच पावला. त्याच्या जीवन काळात १४ राजसत्ताक राज्ये व ४ प्रजासत्ताकवादी राज्ये होती. तो शाक्यांपैकी होता आणि शक्यांचे राज्य प्रजासत्ताक होते. वैशाली हे त्याचे दुसरे घर होते, ते प्रजासत्ताक असल्यामुळे त्याला वैशाली बद्दल अत्यत प्रेम वाटप असे महापरिनिर्वाणा आधीच त्याचा वर्षावास त्याने वैशालीत घालवला. हा वर्षावास पाहिले व आनंदाला म्हणाला - तथागताला वैशालीचे हे अखेरचे दर्शनं आहे. इतके त्याला या प्रजासत्ताकाबद्दल प्रेम वाटत होते. तो पूर्णपणे समतावादी होता. सुरूवातीला भिक्षा, स्वतः बुद्ध देखील चिंध्यांपासून बनविलेली वस्त्रे वापरीत सरंजामदारी वर्गाला संघात सामील होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी हा नियम घालून देण्यात आला होता. पुढे महाभिषकू जीवकाने संपूर्ण कापडापासून बनविलेले एक वस्त्र बुद्धाला (प्रेमाने) स्वीकारायला लावले. बुद्धाने तत्काळ नियम बदलला व तो सर्व भिक्षुना ही लागू केला.

भिक्षुणी संघात सामील झालेली बुद्धाची माता प्रजापती गौतमी हिने एकदा बुद्धाला थंडीची बाधा झाल्याचे ऐकले. तिने लगेच त्याच्यासाठी एक लोकरी पट्ट विणायला सुरूवात केली. तो विद्वान झाल्यावर ती तो बुद्धाकडे घेऊन गेली व तिने त्याला तो घालण्याची विनंती केली. परंतु जर ते दान असेल तर ते सर्व संघाला दिलेले दान असले पाहिजे, ते संघाच्या कुणा व्यक्तिगत सदस्यासाठी असता कामा नये, असे म्हणून त्याने तो स्वीकारण्यास नकार दिला. तिने पुन: पुन्हा विनवणी केली, परंतु त्याने तो घेण्यास नकार दिला.

भिक्षु संघाची रचना अत्यंत समतावादी होती. बुद्ध स्वतः केवळ भिक्षुंपैकी एक होता. तसेच तो संसदेच्या सदस्यांमध्ये पंतप्रधानासारखा होता. तो कधीच हुकूमशहा नव्हता. संघावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघाचा प्रमुख म्हणून कोणाला तरी नेमावे अशी त्याच्या मृत्यू पूर्वी दोनदा विनंती करण्यात आली होती. परंतु त्याने हुकूमशहा नेमण्यास ही नकार दिला.

साधनांच्या मूल्या विषयी काय? कोणाची साधने श्रेष्ठ आहेत व चिरकाल टिकणार आहे? साम्यवाद्यांनी त्यांचे मौल्यवान साध्य प्राप्त करताना इतर मौल्यवान सध्याचा नाश केला नाही असे ते म्हणू शकतात काय? त्यांनी खाजगी मालमत्ता नष्ट केली आहे. हे मौल्यवान असल्याचे गृहीत धरून ते साध्य करण्याच्या प्रक्रियेत मौल्यवान साध्ये नष्ट केलेली नाहीत, असे ते म्हणून शकतात काय? त्यांचे साध्य प्राप्त करण्यासाठी त्यांनी कित्येक लोकांना ठार केले. मानवी जीवनाला कोणतेच मोल नाही काय मालकाचा प्राण न घेता मालमत्ता घेता येऊ शकली नसती काय? 

आता हुकूमशाहीचा विचार करूया. क्रांती ही कायमची क्रांती बनविणे हे हुकूमशाहीचे साध्य आहे, हे एक मौल्यवान साध्य आहे. परंतु हे प्राप्त करताना त्यांनी इतर मौल्यवान साध्ये नष्ट केली नाहीत, असे साम्यवादी म्हणू शकतात काय? स्वतंत्र्यांच्या अभाव अथवा संसदीय शासनाचा अभाव अशी हुकूमशाहीची व्याख्या नेहमी करण्यात येते. दोन्ही अर्थ तितकेसे सुस्पष्ट नाहीत. जेथे संसदीय शासन आहे तेथे देखील स्वातंत्र्य नाही. कारण कायद्याचा अर्थ स्वातंत्र्याचा शासन आहे, तेथे देखील स्वातंत्र्य नाही. कारण कायद्याचा अर्थ स्वातंत्र्याचा अभाव असाच आहे, येथे ही संसदीय शासन यामध्ये फरक आढळतो. संसदीय शासन संस्थेत प्रत्येक नागरिकाला शासनाने लादलेल्या निबंधावर टीका करण्याचा हक्क असतो. संसदीय शासन संस्थेत तुम्हाला कर्तव्य आहे व हक्क आहे, त्यामुळे कायद्याचे पालन करण्याचे कर्तव्य आणि कायद्यावर टीका करण्याचा हक्क आहे. हुकूमशाहीत केवळ पालन करणे एवढेच कर्तव्य आहे, परंतु तिच्यावर टीका करण्याचा हक्क नाही.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण ७ : कोणाची साधने अधिक परिणामकारक व टिकावू आहेत? 

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

आता आपण कोणती साधने आधिक टिकणारी आहेत याचा विचार करूया. बळाने चालणारे शासन आणि नैतिक भावनेने चालणारे शासन यापैकी कुणा एकाची निवड करावी लागले. बर्कने म्हटल्यानुसार बळ हे कायम स्वरूपी टिकणारे साधन असू शकत नाही. अमेरिकेशी समेट करण्या संदर्भातील त्याच्या भाषणात त्याने ही धोक्याची सूचना दिली आहे.

"महाशय, केवळ बळाचा वापर हा तात्पुरता टिकणारा आहे ही गोष्ट सांगण्यास मला परवानगी असावी. तो (वापर) क्षणभर ताब्यात आणीलः पण पुन्हा ताब्यात आणण्याची आवश्यकता तो नाहीशी करत नाही आणि अशा प्रकारे जे राष्ट्र कायमचे जिंकलेले असेल त्या राष्ट्रावर शासन चालत नाही." माझा या पुढील आक्षेप त्याच्या अनिश्चिते बाबत आहे. दहशत हि नेहमीच बळाचा परिणाम असते असे नाही व शस्र सज्जता हा विजय असत नाही. तुम्ही जर विजयी झाला नाहीत तर तुम्हाला पर्याय नसेल. कारण, समेट अयशस्वी ठरल्यावर बळाचा वापर करणे एवढाच मार्ग उरतो. परंतु बळाचा वापर अयशस्वी ठरल्यावर त्यापुढे समेटाची कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधी कधी सदयतेने ठरल्यावर कसलीच आशा उरत नाही. सत्ता व अधिकार कधी कधी सः परंतु दारूण व पराजित हिंसे कडून त्यांची कधीच भीक मागितली जाऊ शकत नाही.

"बळा विषयी आणखी एक आक्षेप असा आहे की, आपले साध्य टिकवून ठेवण्याच्या बळ जबरीच्या हरेक प्रयत्नामुळे आपण आपले साध्य बिघडवून टाकतो. त्यामुळे आपण ज्या गोष्टीसाठी लढतो नि अपयशी ठरलो स्पर्धेत वाया गेलेली व वापरलेली असते." भिक्षुना दिलेल्या एका प्रवचनात बुद्धाने सदाचरणाचा नियम आणि दंड शक्तीचा म्हणजे विधीचा नियम यांमध्ये फरक दाखविला होता. भिक्षु संघाला उद्देशून तो म्हणाला होता.

फार फार वर्षांपूर्वी, हे बंधूनो, दृढनेमी नावाचा न्यायाने राज्य करणारा राजा, सार्वभौम अधिपती, विजेता, लोकांचा रक्षण कर्ता, राज्य करीत असलेले एक साम्राज्य होते. तो धर्मचक्र प्रवर्तक होता, या समुद्रवेष्टित या धर्म तत्त्वाचा तिसरा भाग म्हणजे निब्बाणाचा सिद्धांत होय. निब्बाणाचा सिद्धांत हा आर्य अष्टांगिक मार्गाच्या अविभाज्य भाग आहे. निब्बाणा शिवाय आर्य अष्टांगिक मार्गाची ओळख पूर्ण होऊ शकत नाही, आर्य आपेंगिक मार्ग ओळखण्याच्या मार्गात कोणत्या अडचणी येतात. ते निब्बाणाचा सिद्धांत सांगतो. 

अडचणी पैकी मुख्य अडचणी दहा आहेत. बुद्धाने त्याना दहा आस' (आश्रव), बंधने अथवा अडथळे असे म्हटले आहे. पहिला अडथळा स्वतः विषयीचा भ्रम हा आहे. जापयत माणूस हा पूर्णपणे स्वतः पुरता जगत असेल, जोपर्यंत तो स्वतः च्या अंतकरणातील तीव्र इच्छांचे समाधान पोकळ कल्पना करून प्रत्येक दिखाऊ वस्तूच्या मागे लागला असेल, तो पर्यंत त्याच्यासाठी कोणताही मार्ग आर्य मार्ग नाही. अमर्याद विश्वाचा तो केवळ एक लहानसा भाग आहे. या वस्तुस्थितीने जेव्हा त्याचे डोळे उघडतील तेव्हाच, त्याचे तात्पुरते व्यक्तित्व ही किती अनित्य गोष्ट च्या खडतर मार्गावर पाऊल टाकू शकेल.

दुसरा अडथळा शंका व अनिश्चय (विचिकिच्छा ऊर्फ विचिकित्सा) व्हां अस्तित्वाच्या महान गूढ विषयी, प्रत्येक व्यक्तित्वाच्या अशाश्वतते विषयी माणसाचे डोळे उघडतील. तेव्हा शंका व अनिश्चय यांचा त्यांच्या कृतीवर परिणाम (हल्ला) होणे संभवनीय आहे. करावे की करू नये, नाही तरी माझे सर्व व्यक्तित्व हे क्षण भंगुरच आहे, मग एखादी गोष्ट का करावी वा न करावी, अशा प्रश्नांनी त्याला अनिश्चयी व निष्क्रिय बनविले जाते. परंतु जीवनात ते चालणार नाही. गुरूजी शिकवण अनुसरण्यासाठी, सत्य स्वीकारण्यासाठी व लढ्यात उतरण्यासाठी त्याने मनाची तयारी केलीच पाहिजे, नाही तर त्याला याहून अधिक काहीच प्राप्त होणार नाही. 

तिसरा अडथळा संस्कार (धर्म विधी) व व्रत वैकल्पे यांच्या कार्य सिद्धीवर अवलंबून राहणे (सील ब्बत परामास उर्फ शील व्रत परामर्श) हा आहे. माणूस धर्मिक विधीचे स्तोम माजवण्या पासून व कोणत्याही बाह्य कृती, कोणतेही पौरोहित्याचे प्रस्थ व पवित्र व्रत वैकल्पे यांचा त्याला पराक्रमाने किंवा तलवारीने नव्हे, तर सदाचाराने जिंकून तो या पृथ्वीवर सम्राट म्हणून जगला.

"मग बंधूनो, अनेक वर्षांनंतर, सहम्रावधी वर्षांनंतर, दृढनेमी राजाने एका माणसाला अशी आज्ञा केली. ते त्याच्या जागेपासून थोडेसे ढवळे आहे, असे मला वाटते; तरी पाहून येऊन मला सांग."

तेव्हा शेकडो वर्षांनी (दिव्यचक्र) त्याच्या जागेपासून ढळले आहे हे पाहिल्यावर तो माणूस दृढनेमी राजाकडे गेला आणि म्हणाला, 'दिव्यचक्र बुडाले आहे व आपल्या जागेपासून ढळले आहे हे महाराज, खरे आहे.

बंधूनो, दृढनेमी राजाने त्याच्या ज्येष्ठ राज पुत्राला त्यासाठी बोलावले व म्हटले - “प्रिय मुला, पहा, माझे दिव्यचक्र थोडेसे बुडाले आहे. ते त्याच्या जागेपासून ढळले आहे. मला असे सांगण्यात आले आहे, जर चक्र परावर्तित करणाऱ्या राजाचे दिव्यचक्र बुडाले अथवा ते त्याच्या जागेपासून ढळले तर राजा फार काळ जगणार नाही. मी माझा पूर्ण मानवी ऐहिक आनंद उपभोगला आहे; आता आध्यात्मिक दिव्य आनंद प्राप्त करण्याची वेळ झाली आहे. प्रिय मुला, ये, समुद्रवेष्टित अशा या पृथ्वीचा ताबा घे. मी दाढी - मिशी काढून, मुंडन करून आणि काषाय वस्त्रे परिधान करून घरातून बेघर अवस्थेत जाता आहे."

अशा प्रकारे बंधूनो, दृढनेमी राजाने त्याच्या थोरल्या मुलास रीतसर गादीवर बसवले व नंतर आपली दाढी- मिशी काहून मुडन केले, काषाय वस्त्रे परिधान केली व तो घरातून बेघर अवस्थेत गेला. परंतु तो राज संन्याशी गेल्या नंतर सातव्या दिवशी ते दिव्यचक्र अदृश्य झाले, मग एक माणूस राजाकडे आला व त्याला म्हणाला - "हे राजा, दिव्यचक्र अदृश्य झाले खरे आहे."

हे बंधूनो, मग तो राजा अतिशय भय व्याकुळ झाला व दुःखी झाला आणि मग तो राज सन्याशाकडे गेला व त्याला म्हणाला - महाराज हे खरे आहे. दिव्यचक्र अदृश्य झाले आहे आणि अभिषिक्त राजाला असे बोलताना पाहून, राज संन्यशाने त्याला उत्तर दिले - "प्रिय मुला, दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून दु:ख करू किंवा दिव्यचक्र अदृश्य झाले म्हणून व्यवस्थित होऊ नको."

दिव्यचक्र, हे प्रिय मुला, पित्या कडून वारशाने मिळत नसते. परंतु प्रिय मुला, चक्र प्रवर्तकांच्या आर्य प्रवर्तना प्रमाणे (जगाचे खरे सम्राट म्हणून त्यांच्या समोर मांडलेल्या कर्तव्याच्या उदात्त ध्येयानुसार केलेली कृति) खरोखर तू ते प्रवर्तित कर. मग तू जर धर्मचक्र प्रवर्तक सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडलेस आणि मुख्य वरिष्ठ दालनात शुचिर्भूत होऊ न धर्म प्रवचने चालू ठेवलीस तर बरे होईल. दिव्यचक्र त्याच्या हजारो आऱ्यांसह, धावेसह, मण्यांसह व त्याच्या संपूर्ण भागांसह प्रकट होईल.

"परंतु पिताजी, चक्रवर्ती सम्राटाची आर्य कर्तव्ये कोणती?" प्रिय पुत्रा, तू धर्म ध्वज, धर्म पताका (धर्म केतू) असल्यामुळे धर्माला (सत्य व सदाचाराच्या नियमाला) तू मान देऊन, आदर देऊन व पूज्यभाव दाखवून, त्यास वंदना करून, पवित्र मानून, त्याचा आधार घऊन तुझ्या जनतेची, सैन्याची, उमरावांची, दासांची, ब्राह्मणांची व गृहस्थांची, नगराची व नगर वासियांची, धार्मिक जगताची आणि पशु - पक्ष्यांची योग्य काळजी घे व त्यांना सरक्षण दे. तुझ्या राज्यात दुष्कृत्य (अधम्म) घडू नये. तुझ्या राज्यात जे कोणी निर्धन असतील त्यांना धन देण्यात यावे.

आणि प्रिय पुत्रा, जेव्हा तुझ्या राज्यातील धर्म जीवी माणसे (श्रमण आणि ब्राह्मण) निष्काळजीपणा सोडून, इंद्रियांना उन्मत्त करण्यापासून विरत आत्म शमन करून, प्रत्येक जण स्वतः चे संरक्षण करून वेळोवेळी तुझ्याकडे येतील आणि चांगले काय व वाईट काय, कशाला गुन्हा म्हणावा व कशाला गुन्हा म्हणू नये, काय करावे व काय करू नये, कोणती कृत्ये दीर्घकाळ अथवा अल्पकाळ दुःखाला कारण ठरतील, यांविषयी प्रश्न विचारतील, तेव्हा त्यांना काय सांगायचे आहे ते तू ऐक. तू त्यांना दुष्कृत्य करण्यापासून परावृत्त कर आणि सत्कृत्य हाती घेण्यास त्यांना आज्ञा कर. प्रिय पुत्रा, जगाच्या सम्राटाचे हे आर्य कर्तव्य आहे.

तसेच होईल महाराजाने अभिषिक्त राजाला उत्तर दिले व त्याच्या आज्ञेचे पालन करून सम्राटाचे आर्य कर्तव्य पार पाडले. त्याने अशी वर्तणूक केल्यावर पूर्ण चंद्राच्या आनंदोत्सवाच्या वेळी तो जेव्हा स्नात होऊ न उपासना करीत मुख्य श्रेष्ठ दालनात गेला तेव्हा हजारो आरे, धावा, मणी व इतर सर्व भागांसह दिव्यचक्र स्वयं प्रकट झालेते पाहिल्यावर राजाच्या मनात आले. मला असे सांगण्यात आले होते की, अशा प्रसंगी ज्या राजा समोर दिव्यचक्र पूर्णपणे प्रकट होते, तो राजा चक्रवर्ती सम्राट बनतो. मी देखील त्याप्रमाणे जगाचा सम्राट बनतो.

मग बंधंनो, राजा त्याच्या आसना वरून उठला आणि एका खांद्या वरील वस्र काढूने आपल्या डाव्या हातात त्याने झारी घेतरी आणि उजव्या हाताने दिव्यचक्रावर पाणी शिंपडीत तो म्हणाला - “हे चक्रदेव ! पुढे गोल फिर. हे चक्रदेवा ! पुढे जा व विजय प्राप्त कर !"

चक्रवर्ती राजा आपले सैन्य, घोडे, रथ, हत्ती व सेवक यांच्या सह याच्या मागोमाग गेला आणि ज्या कोण्या ठिकाणी, बंधंनो, ते चक्र जेथे बले तेथे विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाने त्याच्या चतरंग सैन्या सह तळ ठोकला. तेव्हा पूर्व प्रदेशातील प्रतिस्पर्धा राजे सार्वभौम राजाकडे आले व म्हणाले - ‘‘यावे हे शक्तिशाली राजा, तुझे स्वागत असो ! हे शक्तिशाली राजा, हे सर्व तुझे आहे. हे शक्तिशाली राजा, आम्हाला धर्मोपदेश दे तेव्हा सार्वभौम श्रेष्ठ योद्धा असलेला राजा म्हणाला - “तुम्ही कोणत्याही प्राणी मात्राची हत्या करता कामा नये. जे दिले गेले नाही ते तुम्ही घेता कामा तुम्ही शारीरिक विषय वासना चुकीच्या मार्गाने भागवता कामा नये. तुम्ही खोटे बोलता कामा नये. तुम्ही कसलेच मादक पेय प्राशन करता कामा नये. तुम्ही तुमच्या मालमत्तेचा तुमच्या इच्छेप्रमाणे उपभोग घ्या."

मग बंधूनो, दिव्यचक्र पूर्व समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले व दक्षिण प्रदेशाकडे गोल फिरते गेले. (आणि पूर्वेला घडले त्याप्रमाणे तेथे ही सर्व काही घडले.) आणि अशाच पद्धतीने दिव्यचक्र समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले आणि पश्चिम प्रदेशाकडे गोल फिरत गेले. आणि उत्तरे कडील प्रदेशाकडे गोल फिरत गेले; आणि तेथे देखील दक्षिणेत व पश्चिम घडले तसेच घडले, मग दिव्यचक्र जेव्हा समुद्र सीमा असलेल्या संपूर्ण जगावर विजय मिळवीत पुढे गेले. तेव्हा ते राजधानीत परत आले व उभे राहिले, असे की कोणाला ते (न्याय दानाच्या सभागृहा पुढे जगाचा सम्राट असलेल्या चक्रवर्ती राजाच्या आतील वाड्याच्या तोंडाशी आपल्या दीप्तीने प्रकाश देत स्थिर केले आहे) असे वाटावे. 

व बंधूनो, चक्रवर्ती सम्राट असलेल्या, विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या दुसच्या राजाने आणि तिसऱ्या आणि चौथ्याः आणि पाचव्या आणि सहाव्या आणि सातव्या राजाने देखील अनेक वर्षांनंतर, शेकडो, वर्षांनंतर, हजारो वर्षांनंतर माणसाला अशी आज्ञा केली; 'तू जर दिव्यचक्र बुडाले आहे, त्याचे जागेपासून ढळले आहे असे पाहिलेस तर मला कळव.'

महाराज, तसेच करीन. त्या माणसाने उत्तर दिले. अशा प्रकारे अनेक वर्षांनी, शेकडो वर्षांनी त्या माणसाने पाहिले की दिव्यचक्र बुडाले आहे, त्याच्या जागेपासून ढळले आहे आणि असे पाहिल्यावर विजेता श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाकडे तो गेला व तसे त्याने राजाला सांगितले. मग (त्या दृढनेमी राजाने जे केले) तेच त्या राजाने केले. आणि दिवशी राज्य संन्याशी पुढे निघून गेल्यावर ते दिव्यचक्र पुन्हा अदृश्य मग एका माणसाने राजाकडे जाऊन त्याला तसे सांगितले. तेव्हा दिव्यचक्र अदृश्य झाल्याने राजा चिंताक्रांत झाला व दुःखाने व्यथित झाला. परंत सम्राट श्रेष्ठ योद्धा याच्या आर्य कर्तव्या संबंधात त्याने संन्याशी राजाला विचारले नाही. परंतु खरोखर त्याने त्याच्या जनतेवर मनमानीपणाने राज्य केले; आणि अशा प्रकारे त्यांच्या वर जसे राज्य करण्यात आले होते त्याहून वेगळ्या प्रकारे त्याच्यावर राज्य करण्यात आले. राजाचे आर्य कर्तव्य पार पाडले होते, अशा आधीच्या राजांच्या आधिपत्या खाली जशी त्यांची भरभराट झाली होती तशी त्यांची भरभराट झाली नाही.

मग बंधूनो, मंत्री व सरदार, खनिजदार, रक्षक व द्वारपाल, तसेच साधु वृत्तीने जगणारे लोक राजाकडे आले व त्याला म्हणाले - ‘‘हे राजा, आधीचे राजे कर्तव्य पार पाडत असताना तुझ्या जनतेवर ज्या पद्धतीने राज्य करीत त्याहन वेगळ्या पद्धतीने तू मनमानीपणाने त्यांच्यावर राज्य करीत असल्याने जनतेची भरभराट होत नाही, सम्राट राजाच्या आर्य कर्तव्याने ज्ञान असलेले मंत्री व सरदार, खनिजदार, रक्षक व द्वारपाल आणि साधु वृत्तीने जगणारे आम्ही श्रमण व ब्राह्मण असे दोन्ही प्रकारचे लोक आता तुझ्या राज्यात आहोत. तेव्हा हे राजा ! कर्तव्या बाबत असे विचारल्या वर आम्ही ते कर्तव्य तुला सांगू."

मग बंधूनो, त्या राजाने मंत्र्यांची व इतर बाकी सर्वांची एकत्र परिषद बोलावली व त्यांना सम्राट श्रेष्ठ योद्धा याच्या आर्य कर्तव्या विषयी विचारले व त्यांनी ते त्याला सांगितले. आणि त्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर योग्य देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली. परंतु निर्धनांना धन दिले नाही व असे न केल्या कारणाने गरिबी सर्वत्र वाढली.

गरिबी अशा प्रकारे जेव्हा भरमसाठ वाढली. तेव्हा एका माणसाने जे त्याला देण्यात आलेले नव्हते ते घेतले, त्यालाच लोक चोरी म्हणत. त्याला राजाच्या सेवकांनी पकडून राजा समोर आणले व म्हणाले - "हे राजा, ह्या माणसाने जे त्याला देण्यात आलेले नाही ते घेतले आहे व ती चोरी आहे." त्यावर राजा त्या माणसाला म्हणाला - "काय रे, हे खरे आहे काय? कोणत्याही माणसाने तुला दिलेले नाही ते तू घेतले आहेस. त्यामुळे लोक ज्याला चोरी म्हणतात. ती तू केली आहेस?" महाराज, हे खरे आहे. परंतु का? महाराज, मला जगण्यासाठी कोणते ही साधन नाही. तेव्हा राजाने त्या माणसाला धन दिले व म्हटले - "या धनाने तू स्वतःचा निर्वाह कर."

मग बंधूनो, दुसऱ्या एका माणसाने जे त्याला देण्यात आले नव्हते ते चोरी करून घेतले. त्याला त्यांनी पकडले, राजा समोर आणले व राजाला सांगितले. आणि राजा (आधीच्या माणसाला जसा म्हणाला व त्याने त्याला जशी वागणूक दिली तसा) याही माणसाला म्हणाला व तशीच वागणूक.

मग बंधूनो, लोकांनी असे ऐकले की, चोरी करून ज्यांनी त्यांना न दिलेले घेतले होते त्यांना राजा धन देत आहे आणि हे ऐकल्यावर त्यांनी असा विचार केला, आपणास जे देण्यात आले नाही ते आपण चोरी करून घ्यावे. मग एका माणसाने तसे केले आणि त्याला राजाच्या सेवकांनी पकडले. त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. तेव्हा चोरी का केली होती असे राजाने त्याला (अगोदरच्या प्रमाणे) विचारले कारण, महाराज, मी माझा चरितार्थ चालवू शकत नाही, तेव्हा राजाने विचार केला. मी जर कोणी चोरी करून त्याला न दिलेले घेत असेल अशा कोणाला ही धन दिले तर त्यामुळे या गोष्टीला पूर्ण पायबंद घातला पाहिजे व त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्याचा शिरच्छेद केला पाहिजे. म्हणून त्याने त्याच्या सेवकांना बोलावले व म्हटले, तर तुम्ही असे करा. हया माणसाचे हात - पाय मजबूत दोराने पाठी मागून घट्ट बांधा, त्याच्या डोक्याचे मुंडन करा, जोराजोराने नगारे वाजवून त्याला रस्तोरस्ती, गल्ली - बोळांतून सर्वत्र फिरवा त्याला दक्षिण दरवाजातून बाहेर काढून, नगराच्या दक्षिण बाजूस न्या व त्याचा कायमचा बदोबस्त करा. त्याला परमोच्च शिक्षा द्या, त्याचा शिरच्छेद करा. "होय महाराज, तसेच करू." त्या सेवकांनी उत्तर दिले व आज्ञा पार पाडली.

तेव्हा बंधूनो, लोकांनी असे ऐकले की, जो कोणी चोरी करून त्यांना न दिलेले घेतात त्यांना अशा प्रकारे मृत्युदंड मिळतो आणि असे ऐकल्यावर त्यांनी विचार केला. धारदार तलवारी आपल्याकडे तयार ठेवाव्यात आणि आपणास जे दिले गेले नाही ते आपण ज्यांच्या कडून घेतो. ते त्यास काहीही म्हणतो त्याचा आपण शेवट घडवून आणावा, त्यांना परमोच्च शिक्षा द्यावी व त्यांच्या शिरच्छेद करावा. आणि त्यांनी धारदार तलवारी घेतल्या व गाव, नगर, जनपदे लुटण्यासाठी व महामार्गावर वाटेमारी करण्यासाठी ते पुढे आले आणि मग ज्यांना त्यांनी लुटले त्यांना शिरच्छेद करून संपविले. 

अशा प्रकारे बंधूनो, निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली, गरिबी बेसुमार वाढल्यामुळे चोरी करण्याचे प्रमाण वाढले. चोरी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हिंसा फोफावली, हिंसा फोफावल्यामुळे, प्राणघात ही सामान्य गोष्ट बनली, खून वारंवार झाल्याने त्या माणसांचा जीवन काल आणि त्यांचे सौजन्य हे दोन्ही ही संपुष्टात आले.

मग बंधूनो, त्यानंतरच्या काळात माणसांमधील काहींनी त्यांना जे दिले गेलेले नाही ते चोरी करून घेतले आणि इतरांप्रमाणे त्यांच्यावर जरी राजा समोर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आले की तुम्ही चोरी केली आहे हे खरे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिली, "नाही महाराज, ते जाणून बुजून खोटे बोलत आहेत." अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे खोटे बोलणे ही सामान्य गोष्ट होई पर्यंत गरिबी, चोरी, हिंसा, खून यात बेसुमार वाढ झाली. तसेच एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या माणसा विषयी चहाडी करतांना, "अशा म्हणत राजाकडे तक्रार केली. गरिबी बेसुमार वाढली. चहाडी करणे अमर्याद वाढले. खोटे बोलण्यामुळे व्यभिचार वाढला. चोरी, हिंसा, खून, खोटे बोलणे, चडाडी करणे, अनैतिकता बेसुमार वाढली.

बंधूनो, त्यांच्या मध्ये तीन गोष्टी वेगाने वाढल्या. निषिद्ध नात्यांतर्गत व्यभिचार, दुष्ट - लोभ व विकृत हाव. मग या गोष्टी वेगाने वाढल्यावर माता - पित्यां विषयीचा आदर नष्ट झाला, साधु वृत्तीच्या माणसांविषयी धार्मिक सद्भावना नष्ट झाली, कुल प्रमुखा विषयी अनादर निर्माण झाला.

बंधूनो, असा काळ येईल की, तेव्हा त्या लोकांच्या वंशाजांचे आयुर्मान दहा वर्षांचे असेल. या आयुर्मानात माणसांमध्ये कुमारिकांचे विवाहाचे वय पाच वर्षांचे असेल. अशा माणसांमध्ये तूप, लोणी, तिळ, तेल, साखर, मीठ या प्रकारच्या चवी लोप पावतील. दहा अनैतिक वर्तनाने मार्ग अत्याधिक वाढतील अशा मानव - प्राण्यांमध्ये नीतीसाठी कोणताही शब्द असणार नाही, नैतिक मार्गदर्शन मिळणे अगदीच दुरापास्त असेल. आज जसा कुटुंब वत्सल मनाच्या माणसांना, धर्माचरण करणाऱ्यांना व जे त्यांच्या कुळाच्या प्रमुख्याला आदर देतात. त्यांना आदर दिला जातो व त्यांची प्रशंसा केली जाते.

त्याप्रमाणे अशा मानव - प्राण्यांमध्ये बंधूनो, ज्यांच्या मना मध्ये कुटुंब वत्सलतेचा व दयेचा अभाव आहे आणि जे कुल प्रमुखाला आदर देत नाहीत त्याच्या आदर व प्रशसा करण्यात येईल. अशा मानव - प्राण्यामध्ये, माता किवा मामी किंवा गुरूपनी हिच्याशी विवाह करणे निषिद्ध असावे, या प्रकारच्या विचाराची बूज राखली जाणार नाही. 

शेळ्या - बकऱ्यांप्रमाणे, कोंबड्या अशा मानव - प्राण्यांमध्ये बंधूनो, परस्परात तीव्र शत्रुत्व हा नियम होईल. त्यांच्यात तीव्र दुष्टेच्छा, तीव्र वैरभाव, आईने तिच्या मुलाला, मुलाने त्याच्या पित्याला. भावाने भावाला, भावाने बहिणीला, बहिणीने भावाला ठार मारण्याचे देखील भावनातिरेकी विचार येतील. तसे करताना एखाद्या खेळाडूला तसे आपला खेळ पाहून वाटते त्याप्रमाणे त्यांना आनंद वाटेल. जेव्हा नैतिक शक्ती अयशस्वी ठरते व पाशवी शक्ती तिची जागा घेते. तेव्हा जे काही घडते त्याचे हे बहधा अत्यंत सुंदर चित्रण आहे. बदला अपेक्षित होते ते हे की, प्रत्येक माणसाला नैतिक दृष्ट्या असे शिक्षण द्या
की, तो स्वतःच सदाचरणाच्या साम्राज्यासाठी एक सैनिक बनेल.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण ८ : राज्याची शिथिलता किंवा समाप्ती

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

एक कायमची हुकूमशाही म्हणून राज्या विषयी असलेला साम्यवाद्यांचा सिद्धांत दुवा असल्याचे साम्यवादी स्वतःच मान्य करतात. ते आश्रय घेतात. त्यामुळे दोन प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यावे लागेल. ते केव्हा नष्ट होईल? राज्य नष्ट झाल्यावर त्याच्या जागी काय येईल? पहिल्या कालावधीसाठी चांगली असेल ही आणि लोकशाही सुरक्षित बनविण्यासाठी देखील ती स्वगातार्ह गोष्ट असेल ही. पण हकूमशाहीने तिचे कार्य केल्यावर, लोकशाहीच्या मार्गातील सर्व अडथळे व दगडधोंडे दूर केल्या नंतर व लोकशाहीचा मार्ग सुरक्षित बनविल्या नंतर, तिने स्वतः संपुष्टात का येऊ नये? अशोकने उदाहरण घालून दिले नव्हते काय? त्याने कलिंग विरोध हिंसा केली, परंतु त्यानंतर त्याने हिंसेचा पूर्णपणे त्याग केला. 

आजच्या आपल्या विजेत्यांनी जर त्यांच्या केवळ बळी ठरलेल्यांनाच निःशस्र न करता स्वत:ला ही निःशस्र केले असते तर सर्व जगभर शांतता प्रस्थापित झाली असती. साम्यवाद्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. राज्य नष्ट झाल्या नंतर त्याची जागा कोण घेईल, हा प्रश्न राज्य केव्हा नष्ट होईल या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहेत. तथापि काही केल्या या प्रश्नाला कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. त्यानंतर हुकूमशाहीच्या जागी अराजक येईल काय? जर तसे असेल तर साम्यवादी राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न निरर्थक आहे. जर ते बळा शिवाय कायम राखता येऊ शकत नसेल आणि साम्यवाद्यांना बळ परत काढून होत असेल तर साम्यवादी राज्य काय कामाचे?

बळ काढून घेतल्यावर ते राज्य कायम राखू शकेल अशी एकमेव गोष्ट म्हणजे धर्म होय. परंतु साम्यवाद्यांना धर्म हा वज्र्य आहे. त्यांचा अराजकात धर्मा विषयीचा द्वेष इतका खोलवर रूजला आहे की, ते कोणते धर्म साम्यवादाला सहाय्यक आहेत आणि कोणते धर्म तसे नाहीत यांमध्ये भेद देखील करायला तयार नाहीत. सामवाद्यांनी त्यांचा ख्रिस्ती धर्मा विषयीचा द्वेष बौद्ध धर्मालाही लागू केला. त्या दोघां मधील फरक तपासून पाहण्यासाठी ते थांबले नाहीत. साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्मा विरूद्ध केलेला आरोप दुहेरी होता. ख्रिस्ती धर्मा विरूद्ध त्यांचा पहिला आरोप हा होता की, त्याने लोकांना परलोकात नेले आणि इहलोकात त्यांना गरिबी भोगायला लावली. या निबंधातील या आधीच्या भागात बौद्ध धर्मापासून घेतलेल्या अवतरणांवरून दिसून येऊ शकेल की असा आरोप बौद्ध धर्मा विरूद्ध करता येऊ शकते.

साम्यवाद्यांनी ख्रिस्ती धर्मा विरूद्ध केलेला दुसरा ही आरोप बौद्ध धर्मा विरूद्ध करता येऊ शकत नाही. या आरोपाचा सारांश धर्म ही लोकांसाठी अफू आहे. या विधानाने देण्यात आला आहे. बायबल मध्ये दिसून येणाऱ्या पर्वता वरील प्रवचनावर हा आरोप आधारलेला आहे. पर्वता वरील प्रवचन गरिबीचे व दुर्बलतेचे उदात्तीकरण करते. ते गरिबांना व दुर्बलांना स्वर्गाचे आश्वासन देते. बुद्धाने आपल्या शिष्यांपैकी अनाथ पिंडीक या शिष्याला या विषयावर दिलेले प्रवचन मी पुढे देत आहे. 

एकदा भगवान राहत होते तिथे अनाथ पिंडिक आला. आल्यावर त्याने भगवंताला वंदन केले व एका बाजूला बसून बसून विचारले - "कोणत्या गोष्टी गृहस्थाला स्वागतार्ह, आनंदादायी व इष्ट परंतु दुष्य प्राप्य असतात ते भगवंत सांगतील काय?" 

अशा गोष्टी पैकी पहिली गोष्ट, कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळविणे ही होय. दुसरी गोष्ट, तुमचे नातेवाईक देखील त्यांची संपत्ती कायदेशीर मार्गाने मिळवितात का हे पाहणे ही होय. तिसरी गोष्ट, दीर्घकाळ जगून वृद्धत्वाला पोहोचणे ही होय. चौथी गोष्ट, सत्य ज्ञानाची प्राप्ती करणे होय.

खरे तर या गोष्टी प्राप्त करण्यासाठी या जगात ज्या स्वागतार्ह. आनंददायी, इष्ट परंतु मिळविण्यासाठी कठीण आहेत अशा चार शर्ती देखील त्याआधी येतात. त्या म्हणजे विश्वासाची इष्टसिी, सद्गुणी वर्तनाची इष्टसिद्धी, उदारपणाची इष्टसिद्धी व ज्ञानाची इष्टसिद्धी.

सद्गुणी वर्तनाची इष्टसिद्धी प्राण घेणे, चोरी करण्यापासून, व्याभचारापासून खोट बोलण्यापासून ब मादक पेय सेवन करण्यापासून अलिप्तं ठेवते. जीवनात द्रव्य लोभाच्या कलंकापासून मनाने मुक्त असलेल्या, मुक्त हस्त, दान देण्यात आनंद मानणान्या, ज्याला दान मानावे दान - दानास वाहिलेला आहे, अशा गृहस्था मध्ये औदार्याची इष्टसिद्धी वसत असते. ज्ञानाच्या इष्टसिद्धीत कशाचा अंतर्भाव होतो? एखादा गृहस्थ असा असेल की त्याच्या मनावर द्रव्य लोभ, हाव, दुष्ट इच्छा विचलन व मनः क्षोभ यांनी पगडा बसवलेला असतो. तसेच ते चुकीची कृत्ये करत असतो व जी करायला पाहिजेत, तिकडे दुर्लक्ष करत असत व तसे केल्याने ते सुखापासून, मनापासून वंचित झालेला असतो हे तो जाणतो.

द्रव्य लोभ, लालसा, दुष्ट इच्छा, आळस, सुस्ती, विचलन, मनः क्षोभ व संशय हे मनाचे कलंक आहेत. ज्या गृहस्थाची अशा मनाच्या मुक्तता होते तो महाज्ञान, प्रचंड ज्ञान, स्वच्छ दृष्टी व पूर्ण ज्ञान प्राप्त करतो. अशा प्रकारे मोठ्या उद्योग शीलतेने मिळवलेली, बाहु सामथ्र्याने प्राप्त केलेली व निढळाच्या घामावर मिळविलेली संपत्ती कायदेशीर मार्गाने व न्याय्य मार्गाने संपादन करणे ही मोठी इष्टसिद्धीस आहे. तोच गृहस्थ स्वतःला सुखी व आनंदी बनवितो व पूर्ण समाधानी होतो. तसेच त्याचे आई, वडील, पत्नी, मुले, सेवक व मजूर, मित्र व सोबती यांना देखील सुखी व आनंदी बनवितो व त्यांना देखील पूर्ण समाधान देतो.

बळ काढून घेतल्यावर साम्यवाद कायम राखण्यासाठीचा एक अंतिम उपाय म्हणून रशियन लोक बौद्ध धर्माकडे अजिबात लक्ष देत नाहीत. असे रशियन लोकांना त्यांच्या साम्यवादाचा वर्ग आहे. परंतु ते एक गोष्ट विसरतात की - सर्व आश्चर्यातील आश्चर्य म्हणजे बुद्धाने संघा मध्ये हुकूमशाही शिवाय साम्यवाद प्रस्थापित केला. तो अतिशय छोट्या प्रमाणातील साम्यवाद असेल ही, परंतु तो हुकूमशाही शिवाय असलेला साम्यवाद होता व हे आश्चर्य लेनिनला सुद्धा करता आले नाही. 

बुद्धाला मार्ग वेगळा होता. त्याचा मार्ग माणसाचे मन बदलण्याचा, माणसाचा स्वभाव बदलण्याचा होता, जेणे करून माणूस जे काही करतो ते तो स्वेच्छेने व बळाचा अगर जबरदस्तीचा वापर न करता करील. माणसाचा स्वभाव बदलण्याची त्याची मुख्य साधने त्याचा धम्म व त्याच्या धम्माची अखंड शिकवण होती. जे करायला आवडत नाही ते त्यांना लावण्यासाठी लोकांवर बळजबरी करणे हा बुद्धाचा मार्ग नव्हता, मग ती कृती त्यांच्या भल्यासाठी का असेना. त्याचा मार्ग लोकांचा स्वभाव बदलण्याचा होता, जेणे करून त्यांनी जे अन्यथा केले नसते ते स्वेच्छेने करतील.

रशियातील साम्यवादी हुकूमशाहीने अर्थातच आश्चर्यकारक क यश मिळविले आहे, असा दावा करण्यात येतो. हे अर्थातच कोणी ही नाकारू शकत नाही. म्हणूनच तर मी म्हणतो की रशियन हुकूमशाही सर्व मार देशांना उपयुक्त ठरेल. परंतु हा कायमच्या आवश्यकता नाही. आध्यात्मिक टिकवून ठेवण्याची देखील तिला आवश्यकता आहे. कायमच्या आध्यात्मिक मूल्यांकडे लक्ष दिलेले नाही आणि तसे लक्ष देण्याची तिची इच्छा नाही. कार्लाईलने ती चूक केली. कारण माणसाला भौतिक सुखांची गरज असते. परंतु साम्यवादी तत्वज्ञान देखील तितकेच चूक असल्याचे दिसून येते. कारण त्याच्या तत्त्वज्ञानाचे ध्येय डुकराना धष्टपुष्ट करण्याचेच कसला फरकच नाही. 

माणसाचा भौतिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. ज्याचा सारांश फ्रेंच राज्य क्रांतीने सहभाव, स्वातंत्र्य व समता या तीन शब्दांत दिला आहे. त्या नवीन पायावर समाजाची उभारणी करण्याकडे समाज वाटचाल करीत आहे. या घोषणेमुळे फ्रेंच राज्य क्रांतीचे स्वागत झाले. परंतु समता प्रस्थापित करण्यात ती अपयशी ठरली. आम्ही रशियन क्रांतीचे स्वागत करतो. कारण समता प्रस्थापित करणे हे तिचे ध्येय आहे, परंतु तिला अवास्तव महत्त्व देता येणार नाही. सहभाव वा स्वातंत्र्य या शिवाय समतेला कसला ही अर्थ नाही. बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील असे दिसते. साम्यवाद केवळ समता ही एकच गोष्ट देऊ शकतो, (समता, सहभाव व स्वातंत्र्य या) सर्व गोष्टी देऊ शकत नाही.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

■ प्रकरण ९ : बौद्ध धर्माचा उदय आणि ऱ्हास

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

(काठमांडू येथे "जागतीक बौध्द परिषद" राजे महेंद्र ह्यांच्या अध्यक्षते खाली भरलेली होती. तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक २० नोव्हेंबर १९५६ "Buddha And Karl Marx" ला हे निम्नलिखीत भाषण खास लोकांग्रहास्तव केले होते. त्याचा हा मुक्त अनुवाद)

सन्माननीय अध्यक्ष महाराज, 
आदरणीय भिक्षु गण आणि सद्गृहस्थ हो,
जागतीक बौध्द परिषदेच्या निमीत्ताने नेपाळ मध्ये येऊन सुध्दा परिषदेच्या कामकाजात एखाद्या प्रतिनिधी सारख्या प्रत्यक्ष भाग घेऊ शकलो नाही याबद्दल मी अत्यंत दिलगीर आहे. आज जरी मी या ठिकाणी उपस्थित असलो तरी मी शारीरीक दृष्ट्या आजारी असल्याने परिषदेच्या कामकाजातील दगदग त्रास माझ्याने सोसावला जाणार नाही, याची जाणीव प्रतिनिधींना असावी, अशी मला खात्री आहे. माझ्या शरीर स्वार्थामुळे मी परिषदेच्या कामकाजाच्या कर्तव्यास बरोबर जागू शकणार नाही, ह्याच कारणास्तव मी उपस्थित राहू शकलो नाही. कदाचित परिषदेला गैरहजर राहिल्या बद्दल नुकसान भरपाई म्हणून की काय आज ह्या भर दुपारी तुमच्या पुढे भाषण देण्या बद्दल मला सांगण्यात आले आहे. मी भाषणासाठी मान्यता दिली आहे खरी, परंतु इथे उपस्थित झाल्या वरच हि अन अपेक्षित गोष्ट माझ्यावर सोपविण्यात आली. तुम्हा लोकांपुढे द्यावे लागेल याची मला किंचित ही पुर्व सुचना नव्हती. 

मी कोणत्या विषयावर बोलू इच्छेन ह्याची मला विचारणा केल्यावर बौध्द धर्मातील अहिंसा हा विषय मी सांगितला होता. परंतु सर्वसाधारण मी ज्या विषयाच्या ओझरता उल्लेख केला होता त्याच विषयावर सभेत म्हणजे 'बौध्द धम्म व साम्यवाद' ह्यावर मी बोलावे असे परिषदेला उपस्थित असलेल्या बहुसंख्यक लोकांना वाटत असल्याचे मला सांगण्यात आले. भाषणाचा विषय बदलण्यास जरी मान्यता दिली असली तरी प्नामाणिकपणे मला हे सांगितले पाहिजे की, हा विषय आकस्मिकपणे सोपविला गेला असल्याने एवढ्या महान व विस्तृत विषयावर बोलण्याची माझी तयारी झालेली नाही, हा विषय केवळ महान व विस्तृत व नाहीतर अत्यंत भारदस्त आहे. ह्मा भारदस्त विषयाच्या दडपणा खाली अर्धे अधिक जग सापङलेले आहे. एवढेच नव्हे तर बौध्द राष्ट्रातील तरुण विद्यार्धी वर्ग सुध्दा ह्या विषयावर मगर मिठीत सापडलेला आहे, ही दुसरी बाब मला अत्यंत चिंताजनक वाटते.

साम्यवाद जी जीवन प्रणाली सांगते त्या जीवन प्रणाली पेक्षा बौध्द धम्माने सांगितलेली जीवन प्रणाली उत्कृष्ट व सरस आहे, अशी प्रशंसा जोपर्यंत बौध्द राष्ट्रातील तरुण पिढी करत नाही तोपर्यंत बौध्द धर्माचे भवितव्य उज्ज्वल आहे. असे म्हणता येणार नाही. बौध्द धर्मावरील श्रध्दा दोन एक पिढ्या ही तग धरु शकणार नाही. यास्तव बौध्द धम्मावर ज्यांची दृढ श्रध्दा आहे अशा लोकांनी तरुण पिढीस बौध्द धर्माची महत्ता पटवून देऊन साम्यवादाला बौध्द धर्मच पर्याय आहे. किंबहुना बौध्द धर्मच एकमेव सर्वोत्तम जीवन मार्ग आहे असे सांगणे अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट पटवून दिल्यावरच बौध्द धर्म टिकवून धरण्याची आशा बाळगता येवू शकते. आपण हे ही तेवढेच ध्यानात घेतले पाहीजे की, युरोप मधील बहुसंख्यक लोक व आशिया मधील बहुसंख्यक तरुण असा दृष्टिकोण की, आजच्या जगात कार्ल मार्क्स हाच बाळगतात. केवळ एक पूजनीय महापुरुष किंवा प्रेषित आहे. त्याच बरोबर ते असा ही विचार प्रदर्शित करतात की, बौध्द भिक्खु संघातील फार मोठा भाग केवळ निरुपयोगीच नव्हे तर एक मोठे पिवळे संकट आहे. अशा प्रकारची विचार सरणी कशाचे द्योतक आहे. हे भिक्खूनी लक्षात घेतले पाहीजे. तिच्या मागची पार्श्वभूमी त्यांनी समजुन घेतली पाहीजे आणि कार्ल मार्क्सशी तुलना केली जाऊ शकेल, अशा प्रकारे स्वत:ला घडवुन घेण्याची त्यांना पराकाष्ठा करावयास पाहीजे. तेव्हाच बौध्द धर्माचे श्रेष्ठत्व साक्षीत केले जाऊ शकेल. 

ह्या प्रास्ताविकानंतर बौध्द तत्वज्ञान व मार्क्सवाद किंवा साम्यवाद ह्यातील ठळक वैशिष्टपुर्ण मुद्दे कोणते आहेत ह्या बद्दल मी आपणास विवेचन करुन सांगेन हे विवेचन बुध्दाचे तत्वज्ञान व माक्र्सचे तत्वज्ञान यांच्या आदर्शातील साम्य व भेद ह्या संबंधात असेल. जीवनातील उदिष्ट्ये साध्य करण्यासाठी साम्यवादी जीवन मार्गापेक्षा बौध्द जीवन मार्ग मानवी जीवनाचे ध्येय हस्तगत करण्यात चिरंतन ठरु शकेल किंवा नाही ह्याचा ही त्यात उहापोह असेल. जो जीवन मार्ग अल्प कालीन असेल, रान - वनातुन भटकविणारा असेल किंवा अराजकतेकडे घेऊन जाणारा असेल अशा जीवनमार्गाचा पाठपुरावा करणे उचीत ठरणार नाही. परंतु तुम्हाला अवलंबण्यास सांगीतलेला मार्ग जर मंद गतीचा व लांब पल्ल्याचा असेल, तथापी तो खात्रीचा असुन सुरक्षीत व भक्कम पायावर पोहचविणारा असेल आणि तुमच्या आदर्श तत्वांना साहाय्यभूत ठरणारा व तुमच्या जीवनाला स्थायीभाव देणारा असेल तर तोच मार्ग चोखाळने न्यायाचे ठरेल. कमी अंतराचा शॉर्टकट म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मार्गा पेक्षा मंद गतीचा लांब पल्ल्याचा मार्गच आक्रमण करीत राहणे केव्हा ही रास असते. जीवनातले ‘शॉर्टकट' नेहमीच घातकी असतात. नुसतेच घातकी नव्हे तर महाघातकी असतात, हे सतत ध्यानात ठेवले पाहीजे.

आता मी माझ्या प्रमुख विषयाला हात घालतो. मार्क्सच्या साम्यवादाची विचार सरणी तरी काय? त्याचे मुलभूत तत्वज्ञान तरी काय आहे? साम्यवादी विचार सरणीचा मुलारंभ असा आहे की, ह्या जगात पिळवणूक चाललेली आहे. ही पिळवणुक धनिकांकडून गरीबांची होत आहे. कारण धनिकांना संपत्तीची हाव आहे. त्यांना अधिकाधिक मालमत्ता हवी आहे, त्यासाठी ते जन समुदाय गुलाम करीत आहेत. ही गुलामगिरी शेवटी यातना, दुःख व गरीबी यांच्या निर्मीतीस कारणीभूत होत आहे, हेच मार्क्सवादाच्या प्रारंभाचे मुळ आहे. मार्क्स ह्याने ‘पिळवणूक' ह्या शब्द प्रयोगाचा उपयोग केला आहे ही पिळवणुक नष्ट करण्यासाठी मार्क्सने कोणती उपाय - योजना सांगितली आहे? पिळवणुक होणाऱ्या ह्या एका वर्गाचे दैन्य व दु:ख नष्ट करण्यासाठी वैयक्तीक मालमत्ते वर प्रतिबंध घातला पाहीजे असे मार्क्सचे सांगणे आहे. व्यक्तिशः कोणी ही मालमत्ता बाळगु नये किंवा करु नये. कारण कार्ल मार्क्सच्या तांत्रिक भाषेत सांगावयाचे धन संचय झाल्यास असे म्हणता येईल की, कामगारांच्या किंवा मजुरांच्या श्रमशक्तीपासुन उत्पादीत झालेले अतिरीक्त धन स्वत:च घेणारा किंवा स्वतःच गिळंकृत करणारा हा खाजगी मालमत्तेचा एक मालक बनतो. कामगार आपल्या निढळाच्या घामाने उत्पादन वाढवितो व अतिरीक्त धन मिळवुन देतो. 

परंतु ह्या अतिरीक्त धनावर त्या कामगारांचा कोणताच अधिकार राहत नाही. त्याला त्यामधून कहीही हिस्सा मिळत नाही. ते सारे अतिरीक्त धन केवळ मालकच बळकावून बसतो. ही बाब लक्षात घेऊन कार्ल मार्क्सने असा प्रश्न उपस्थित केला की कामगारांनी आपल्या श्रम शक्तीच्या जोरावर निर्माण निर्माण केलेल्या अधिक उत्पादित धनावर मालकाने काय म्हणुन हक्क सांगावा? मार्क्सच्या मतानुसार अतिरीक्त धनावर मालकाचा केव्हा ही अधिकार असता कामा नये. अतिरीक्त धनावर केवळ राज्याचाच अधिकार असावा, आणि हे राज्य सुध्दा कामगारांचेच असावे. याच कल्पनेवर मजुरांच्या किंवा कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचा सिद्धांत मार्क्सने प्रस्थापीत केला. मार्क्सने जे सिध्दान्त प्रस्थापीत केले, त्यातील हा एक तिसरा सिध्दांत आहे. कामगार वर्गाची हुकुमशाही ह्याचा अर्थ मार्क्स असा करतो की, शासन हे शोषितांचे म्हणजे कामगारांची पिळवणूक करणारे नसावे. ते शोषितांचे म्हणजे पिळवणूक होत असलेल्या कामगारांचे असावे. अशा प्रकारचे मार्क्सचे मुलभुत सिध्दांत आहेत. याच सिध्दांतावर आधारीत साम्यवादाची उभारणी रशियात झालेली आहे. सिध्दान्तात भर ही घातली गेलेली आहे आणि भर घालणे सतत चालु ही आहे. मात्र मुलभुत सिध्दांत सुरवातीस सांगितल्या प्रमाणे कायम आहेत. 

मी आता क्षणभर बुध्द तत्वज्ञानाकडे वळतो. कारण कार्ल मार्क्सने उपस्थित केलेल्या मूलभूत विचार सरणीच्या बाबतीत बुध्दाचे काही म्हणणे आहे का हे ही पाहणे आवश्यक आहे. मार्क्सने गरीबांच्या संबंधी किंवा कामगारांच्या पिळवणूकी संबंधी प्रश्न उपस्थित करुन आपल्या मार्क्सवादाची किंवा साम्यवादाची उभारणी केलेली आहे. बुध्द काय म्हणतो? बुध्दाने कोठून सुरुवात केलेली आहे? बुध्द तत्वज्ञानाची किंवा बुध्दाच्या धम्माची इमारत कोणत्या पायावर उभारली गेली आहे? कार्ल मार्क्स प्रमाणे बुध्दाने ही २५०० वर्षांपूर्वी म्हणजे कार्ल मार्क्सच्या कित्येक वर्ष अगोदर हिच गोष्ट सांगितली आहे. बुध्दाने म्हटले, “जगात दु:ख आहे." बुध्दाने कार्ल मार्क्स प्रमाणे ‘पिळवणूक' हा शब्द प्रयोग उपयोगात आणला नाही. मात्र पिळवणुकी मधुन जे दुःख, दैन्य निर्माण होते त्याच दुःखाची कल्पना देऊन बुध्दाने आपल्या तत्वज्ञानाची, आपल्या धम्माची उभारणी केली. जगा मध्ये दु:ख आहे जगमान्य सत्य आहे. असे सांगून बुध्दाने दु:खाची परिभाषा निरनिराळ्या अर्थाने केली. दुःख म्हणजे जीवन मरणाचा फेरा असा ही अर्थ बुध्दाने केलेला आहे, परंतु ह्या अर्थाशी मी सहमत नाही. 

दुःख हा शब्द दारिद्रय, गरीबी, ह्या अर्थाने ही उपयोगात आणला गेला असल्याचे बौध्द वाङमयातून दिसून पडते. तेव्हा बौध्द तत्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्सचा तत्वज्ञानाचा मूलभूत पाया यात काहीही फरक आढळत नाही याचाच अर्थ असा की कार्ल मार्क्सने प्रस्थापित केलेला सिध्दांत हा ही नविन नाही. तेव्हा जीवनाचा मूलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौध्द बांधवास कार्ल मार्क्सचे दार ठोठावण्याची काहीही गरज नाही. बुध्दाने तो पाया केव्हाचाच अगदी उत्तम प्रकारे प्रस्थापित करुन ठेवलेला आहे आणि तो त्याने आपल्या पहिल्या प्रवचनातील उपदेशात केलेला आहे, हे प्रवचन बौध्द वाडमयात 'धम्मचक्र परिवर्तन सुत्त' ह्या नावाने ओळखले जाते. ज्या लोकांच्या मनावर कार्ल मार्क्सच्या विचारांचा पगडा बसलेला आहे. त्यांना मला हेच सांगायचे आहे की, तुम्ही धम्मचक्र परिवर्तन सुत्ताचा अभ्यास करा व बुध्दाने काय म्हटले आहे हे समजून घ्या. मला खात्री आहे की, तुम्हाला त्यात मानवी जीवन संग्रामाचे उत्तर क्वचितच आढळेल. बुध्दाने आपल्या तत्वज्ञानाची किंवा धम्माची उभारणी ईश्वर, आत्मा किंवा अशाच अनाकल्पनिय अतिमानवी बाबी वर केव्हाही केलेली नाही. त्याने मनुष्याच्या वास्तव जीवनाकडे अंगुली निर्देश करून आपले सारे तत्वज्ञान विशद केलेले आहे. मनुष्य यातना, दुःख यांनी पीडलेला आहे. ही मानवी जीवनाची वास्तविकता आहे. केवळ मार्क्सने ह्या गोष्टींचा ऊहापोह केला असे नव्हे तर त्याच्या जन्मा अगोदर दोन हजार वर्षांपूर्वी बुध्दाने ह्या गोष्टी जाणल्या व त्यावर उपाय सुध्दा सांगितले, हे एक विशेष आहे. हे तुम्ही समजुन घेतले पाहीजे. याप्रमाणे गरिबीच्या संदर्भात बुध्दाच्या तत्व प्रणालीत व मार्क्सच्या तत्व प्रणालीत कमालीचे साम्य आहे. हे तुम्हास कळून येईल. 

मार्क्सच्या विचारानुसार कामगारांच्या पिळवणुकींच्या प्रतिरोध करण्यासाठी उत्पादना पासुन प्राप्त होणारी संपत्ती राज्याने आपल्या मालकीची करावयास पाहीजे. साच्या जमीनी राज्याच्या मालकीच्या असाव्यात. साऱ्या उद्योग धंद्यांवर राज्याचा अधिकार असावा म्हणजे व्यक्तिगत मालकास हुकूमत गाजविण्यास वाव मिळणार नाही. तसेच मजुरांच्या श्रम शक्तिने निर्माण केलेल्या उत्पादित वस्तु वरील अतिरीक्त फायद्याच्या लाभ त्या मालकास होणार नाही व मजुरांना लुबाडण्याचा प्रसंगच येणार नाही. अशी ही पिळवणूकीच्या संदर्भात कार्ल मार्क्सची विचार सरणी आहे. 

व्यक्तिगत मालकी हक्काच्या संदर्भात बुध्दाची विचार सरणी काय आहे ते आपण तपासून पाहू या. ह्यासाठी आपणांस बौध्द भिक्खु संघाचा विचार करावा लागेल आणि बुध्दाने भिक्खूसाठी लावलेल्या जीवन विषयक नियमाची चिकित्सकपणे परिक्षा करावी लागेल बुध्दाने भिक्खूसाठी असे काय नियम केले आहेत? बुध्दाने कटाक्षाने सांगितले की कोणत्याही बौध्द भिक्खूने खाजगी मालमत्ता बाळगता कामा नये. वस्तुत: बोलायचे झाल्यास कोणत्याच भिक्खु जवळ स्वायत्त मालमत्ता असू नये, असा कडक निर्बध असून ही आज तुम्हाला अपवादात्मक काही उदाहरणे दिसतील काही देशातील भिक्खु वर्गात त्यांच्याकडे वरिल मालमत्ता असल्याचे मी स्वत: पाहीले आहे. परंतु बहुसंख्यक भिक्खु जवळ कोणतीच मालमत्ता नाही मालमत्ता बाळगण्याच्या बाबतीत बौध्द भिक्खु संघाचे निबंध एवढे कडक आहे की, रशियातील साम्यवाद्यांनी केलेले नियम सुध्दा एवढे कडक नसावेत. हा विषय अद्याप कोणी ही विचार विनिमयासाठी न घेतलेला आहे.

भिक्खु संघ निर्मीती मागे बुध्दाचे कोणते उद्दिष्ट असावे? भिक्खूचा संघ असावा असे त्याला का वाटले असावे? इतिहासाचा मागोवा जर आपण घेतला तर असे आढळून येते की, बुध्द जेव्हा आपल्या धम्माचा प्रचार व प्रसार करित होता. तेव्हा ‘परिव्राजक' म्हटले जाणारे लोक इस्ततः भटकत होते. एवढेच नव्हे तर बुध्दाच्या अगोदर पासून ते वावरत होते. 'परिव्राजक' ह्या शब्दाचा अर्थ निराश्रीत म्हणजेच ज्याना घरदार नाही असे लोक असा होतो. आर्य काळात आर्याच्या निरनिराळ्या टोळ्या इतर वन्य टोळ्यांसारख्या आपापसात लढत होत्या. विजयी टोळ्या स्थायिक होऊन रहात. पराभूत टोळ्यांतील काही लोक मात्र आपले घरदार मालमत्ता सोडून केवळ भ्रमंती करित राहत स्थायिक जीवन त्यांनी कधी ही स्विकारले नाही. अशा भटकणाऱ्या लोकांना कालांतराने ‘परिव्राजक' म्हटले गेले. बुध्दाने अशा भटकत राहणाच्या परिव्राजक लोकांना एकत्रीत करुन त्यांचा संघ निर्माण करण्याचे व त्यांच्या भ्रमन जिवनाला नियमब्ध करण्याचे फार मोठे मोलाचे कार्य केले ज्या नियमांनी अशा परिव्राजकांना बध्द केले त्या साच्या नियमांचा उल्लेख आपणास विनय पिटकात आढळतो. 

परिव्राजक भिक्खू बनले व विनय पिटकात निर्देशिलेल्या नियमा प्रमाणे बौध्द काटेकोरपणे वागू लागले त्यातील नियमा प्रमाणे भिक्खूला मालमत्ता जमविण्याची किंवा बाळगण्याची परवानगी नव्हती. भिक्खूला पुढील केवळ सात वस्तुच बाळगण्यास सांगितले गेले होते. एक वस्तरा, एक लोटा एक भिक्षा पात्र, तिन चिवरे, आणि एक सुई ह्या त्या सात वस्तु होत. साम्यवादाच्या मूळ गाभ्यावर हुकुम व्यक्तिगत मालमत्ता असू नये, अशी जर बाब असेल तर विनय पटीकातील बौध्द भिक्खूसाठी सांगितलेला एवढा कडक निबंध कुठे तरी असेल? कामला तरी असा नियम कुठे आढळत नाही. म्हणून व्यक्तिगत मालमत्ता नसण्याचा बाबतीत साम्यवादी मत प्रणाली मध्ये एखाद्या आजच्या पिढीत तरुणास आकर्षण वाटत असेल, तर त्याने क्वचितच बौध्द तत्वज्ञानाच्या विनय पटीकात डोकवावे त्याला ज्याचा शोध घ्यावयाचा आहे हे त्यात निश्चित गवसेल. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की, व्यक्तिगत मालमत्ता नसण्याचा नियम साच्या समाजाला कसा काय लागू करता येईल? व केव्हा पर्यंत लागू करता येईल अर्थात हि सारी बाब उपाय - योजना, काळ परिस्थिती व मानवी जीवनाचा विकास ह्यावर आधारीत हे तात्विक दृष्ट्या विचार करता व्यक्तिगत मालमत्ता काढून घेणे खरोखरीच चूकीचे आहे का? यदा कदाचित एखाद्यास खाजगी मालमत्ता बाळगण्याची इच्छा असेलतर बौध्द धर्म आड येईल का? निश्चित नाही. कारण बौध्द भिक्खु संघाची निर्मिती करतांना बुध्दाने काही सवलती मान्य केल्या आहेत. आवश्यक गरजा भागविण्यास लागणारी मालमत्ता बाळगण्यास बुध्दाने मनाई केलेली नाही. ही बाब विशेषत्वाने ध्यानात घेतली पाहीजे.

आता ह्याच बाबीच्या दुसऱ्या मुद्याकडे आपण वळू. साम्यवाद घडवून आणण्यासाठी कार्ल मार्क्स किंवा साम्यवादी लोक कोणता मार्ग अवलंबवावा म्हणून सांगतात? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. साम्यवाद (म्हणजेच दु:खाचे अस्तित्व मान्य करुन व्यक्तिगत मालमत्ता नष्ट करणे हा वाद) प्रस्थापित करण्यासाठी साम्यवादांचा मार्ग अत्याचारी मार्ग आहे. विरोधकांची हत्या करण्याचा मार्ग आहे आणि ह्यातच बुध्द कार्ल मार्क्स उपाय - योजनाच्या मार्गात त्यांच्या मूलभूत फरक आहे बौध्द तत्वज्ञान किंवा बौध्द धम्म प्रस्थापित करण्यासाठी लोकांची मने वळविणे हा बुध्दांचा सनदशीर मार्ग आहे. नैतिक शिकवणीने व प्रेमाने लोकांची मने वळविणे यावर बुध्दांचा भर आहे. बुध्दाला विरोधकांना जोर जबरीने किंवा सत्तेने जिंकावयाचे नसून प्रेमाने व आपुलकीने जिंकावयाचे आहे, हा मूलभूत फरक लक्षात घेतला म्हणजे असे कळून येते की, तत्वज्ञान प्रस्थापनासाठी बुध्दाला रक्तपात मान्य नाही, हिंसा मान्य नाही, उलट साम्यवाद्यांना हिंसेचा मार्ग पसंत आहे. या मार्गाने साम्यवद्यांना ताबडतोब फल प्राप्ती होते किंवा त्यांची उद्दिष्ट्य जलद सफल होतात. यात मुळीच वाद नाही. कारण तुम्ही जेव्हा मनुष्य निर्मूलनाचेच तत्व अंमलात आणता तेव्हा तुम्हाला विरोध करणारा वा तुमचा प्रतिकार करणाराच कोणी उरत नाही. अर्थात ही सफलता केवळ दिखाऊच असते. मार्क्सवाद्याच्या तुलनेत बुध्दाचा मार्ग मंद गतीचा व लांब पल्ल्याचा आहे. कदाचित तो लोकांना कंटाळवाना ही वाटण्याचा संभव आहे. कारण सफलता फार उशिरा प्राप्त होते. मात्र हे ही तेवढेच खरे की, त्या मार्गात सुरक्षितता आहे. तुमच्या जीवनाची हमी आहे. यास्तव तुम्ही तुमच्या आदर्शावर हुकुम मार्ग आक्रमित असतांना बुध्दाच्याच बिनधोक मार्गावर पाऊल ठेवणे हितावह होणार आहे. 

मी माझ्या साम्यवादी मित्रांना नेहमी दोन, तीन प्रश्नांची उत्तरे मागत असतो. परंतु मला प्रामाणिकपणे सांगितले पाहिजे की माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते समर्थ नाहीत. ते मजुर वर्गाची हुकुमशाही रक्तपाताने प्रस्थापित करु इच्छितात. राजकीय सत्तेचे वर्चस्व असणाऱ्यांना ते नेस्तानाबूत करु इच्छितात. त्यांच्या मतानुसार लोकसभेत प्रतिनिधित्व असू शकत नाही. मताधिकार असू शकत नाही. त्यांना केवळ राज्याची एकतंत्री महाप्रजा म्हणून राहवयाची आहे. त्यांना सत्ता वाटप किंवा अधिकार वाटप न करता राज्य करावयाचे आहे. त्यामुळे त्यांना मी असा प्रश्न करतो की, हुकुमशाही ही लोकांवर राज्य करण्याची योग्य पध्दती आहे का? त्यावर ते असे उत्तर देतात की, सध्याचा काळ निर्वाणीचा काळ असल्याने कामगाराची हुकुमशाही निर्माण होणे अत्यावश्यक आहे. मजुर वर्गाची हुकुमशाही निर्माण झाल्याशिवाय प्रस्थापित भांडवलदाराचा किंवा अतिरिक्त धन गिळंकृत करणाच्या मालक वर्गाचा नायनाट होणार नाही. अजून त्यांना प्रश्न केला की, हा निर्वानीचा कालावधी तरी केवढा आहे? वीस वर्ष, चाळीस वर्ष, की पन्नास वर्ष? याला त्याचा निश्चित उत्तर नाही. ते गुळमुळीत उत्तर देतात की, साम्यवाद स्थिर झाल्यावर मजुर वर्गीय हुकुमशाही आपोआपच नष्ट होईल. मग पुढे काय? तिची जागा कोण घेईल? मनुष्याला कोणत्याच प्रकारच्या शासनाची आवश्यकता वाटणार नाही काय? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. 

याच संदर्भात जेव्हा आपण बुध्दाकडे वळतो आणि त्याच्या धम्मा संबंधीत प्रश्न उपस्थित करतो तेव्हा तो काय म्हणतो? बुध्दाने जगाला एक अत्यंत महान अशी गोष्ट सांगितलेली आहे. मनुष्याची मनो धारणा बदलल्या शिवाय आणि पर्यायाने जगाची सुधारणा किंवा उन्नती करणार नाही, असे बुध्दाचे सांगणे आहे. बुध्दाच्या शिकवणुकी प्रमाणे मनुष्याची मनो धारणा बदली गेली व त्यानुसार त्याने साम्यवादी विचार सरणी स्विकारून तीवर निष्ठेने प्रेम केले व ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. तर ती खर्चतच स्थाही स्वरुप प्राप्त करु शकेल? आणि अशा वेळेस मनुष्याला कायदे कानुनाच्या बेडीत अडकविण्यात सैनिक किंवा पोलिस कारवाईची जरुरी पडणार नाही. असे का घडू शकेल याला उत्तर असे की, नैतिकतेने वागण्यास व योग्य मार्गाने चालण्यास तुमच्या मनाची जडण - घडण बुध्दाने तयार केलेली असेल तुमचे मनच चिरंतर स्वरुपात सन्मार्गी झालेले असेल. 

साम्यवादाची उपाय - योजना संबंधाची विचार सरणी जुलुम जबरदस्ती वर आधारलेली आहे. कल्पना करा, उद्या रशियातील साम्यवादी हुकुमशाही बारगळली किंवा तशी चिन्हे दिसू लागली तर काय होईल? साम्यवादाची अवस्था कशी होईल हे जाणून घेण्यास मी निश्चितच उत्सुक राहिन. माझ्या कल्पने प्रमाणे राज्याच्या मालकीची मालमत्ता बळकावण्यास रशियन लोक परस्परात रक्तपात घडवून आणतील आपापसात लढाया करतील हि परिणीती अपरिहार्य अशीच राहिल. कारण रशियातील लोकांनी साम्यवादी विचार सरणी सहजा - सहजी स्विकारलेली नाही. आपणहून ती त्यांनी मान्य केलेली नाही ती त्यांच्यावर जबरदस्तीने लादली गेली आहे. साम्यवाद प्रस्थापित करतांना त्यांना हि भिती घातली गेली की, ज्यांनी जर साम्यवाद विचार प्रणाली मानली नाही, तर त्यांना फासावर लटकविले जाईल आणि त्यामुळेच ते अजून ती निमूटपणे पाळीत आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे की, भयापोटी कोणतीच विचार प्रणालीचे मूळ धरु शकत नाही. एखादी विचार प्रणाली ग्रहण केली गेली, परंतु कालांतराने तिची धारणा शक्तीच नष्ट झाली तर त्या विचार प्रणालीचे पुढे काय होईल, या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत देता येणार नाही, तो पर्यंत ती लोकांच्या मनावर बिंबविण्यात काहीच अर्थ नाही. मनो भूमिका तयार केली नसेल, तर सत्येची नेहमीच कारण जरुरी भासेल याच कारणास्तव मला नेहमी बुध्दांचे आकर्षण वाटते. बुध्दाची विचार सरणी ही लोकशाहीची विचार सरणी आहे. 

अजात शत्रुला वज्जींना जिंकावयाचे होते. हे सांगण्यासाठी अजात शत्रुचा सरसेनापती बुध्दाकडे आला. बुध्द त्याला म्हणाला की, राजा वज्जींना पराभव करु शकणार नाही. कारण वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पध्दतीला धरुन राज्याशन चालवित आहेत, तोपर्यंत त्यांचा पराभव होणे शक्य नाही. बुध्दाने वज्जींना जुन्या पध्दतीचे उघड स्पष्टीकरण कोणत्या कारणामुळे केले नाही, हे कळायला काही मार्ग नाही. परंतु ज्या बाबतीत बोलला ती बाब वज्जींच्या लोकशाही प्रधान व गणतंत्री राज्य कारभार संबंधीच होती यात मात्र संशय नाही. आणि म्हणूनच बुध्द म्हणाले की, वज्जी जोपर्यंत आपल्या जुन्या पध्दती प्रमाणे चालतील तोपर्यंत ते कधीच पराजित होणार नाही. यावरुन बुध्द हा लोकशाहीचा मोठा पुरस्कर्ता होता हे उघड होते.

अध्यक्ष महाराज,
जर मला परवानगी देतील तर मला तुमच्या हेच निदर्शनास आणून द्यायचे आहे की, मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी होतो, अर्थशास्त्राचा ही विद्यार्थी होतो, एवढेच नव्हे तर अर्थशास्त्राचा प्राध्यापक ही होतो. माझ्या जीवनातील बराच कालावधी मी कार्ल मार्क्स साम्यवाद व इतर अनेक विषय ह्यांचा अभ्यास करण्यात घालविला तसेच बुध्दाच्या धम्माचा ही अभ्यास करण्यास मी बराच काळ व्यतित केला बुध्द तत्वज्ञान व मार्क्सवाद ह्यांचा जेव्हा मी तौलनिक अभ्यास केला तेव्हा मी ह्याच निष्कर्षाला पोहचलो की, जगातील एका फार मोठ्या समस्येचा बाबतीत म्हणजेच जगात दुःख आहे व त्याच्या निवारणाचा एक निश्चित उपाय आहे, ह्या बाबतीत बुध्दांचाच मार्ग सर्वोत्तम आहे. सुरक्षित आहे आणि भर भक्कम आहे. ह्याचे कारणास्तव मी बौध्द राष्ट्रातील तरुण पिढिस सांगू इच्छितो की, त्यांनी बौध्दांच्याच वास्तववादी तत्वज्ञानावर विशेष भर दिला पाहिजे व त्यावरच आपले सारे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

बंधू - भगिनिंनो,
इत:पर मी अजून काही सांगावे असे काहीच राहिले नाही. आपणास केवळ काही मुद्यांचे दर्शन घडवावे एवढीच माझी मनीषा होती. साम्यवादाच्या विजय दुंदभिने तुम्ही बावरुन जाऊ नका किंवा भूलून जाऊ नका किंवा दिपून ही जाऊ नका. तुम्ही जर बौध्द विचार सरणीचा व तत्वज्ञानाचा एक दशांश भाग जरी आत्मसात करु शकलात तर साम्यवाद जे काही निर्माण करु इच्छितो, ते तुम्ही करुणा, न्याय, सदभावना व ह्याच्या जोरावर घडवून आणू शकाल यात तिळमात्र शंका नाही.

धन्यवाद!

◆◆◆

लेखक -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV : 8767048591
(Use Only WhatsApp Massage,.)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा 

धन्यवाद ।