रविवार, ३० डिसेंबर, २०१८

● भिमा कोरेगाव येथे लढाईत शाहिद होणाऱ्या सैनिकांनीच लावला सांचीच्या स्तुपाचा शोध

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

      ● भिमा कोरेगाव येथे लढाईत शाहिद
             होणाऱ्या सैनिकांनीच लावला
                 सांचीच्या स्तुपाचा शोध
                    लेख - रवींद्र सावंत

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

              भीमा कोरेगाव इतिहासातील महत्वाचा भाग असून याच बरोबर एक महत्वाचा इतिहास जो जगा पुढे आजवर आला नाही. त्याचे महत्वाचे कारण आम्हाला हि त्याचा इतिहास माहिती नाही. मध्य प्रदेशात असणारे हे सांची स्तूप आणि महाराष्ट्रात असणाऱ्या भीमा कोरेगाव विजय स्तंभ काय कनेक्शन आहे? तर भिमा कोरेगावच्या लढाई मध्ये ब्रिटीश सैनिकाच्या फौजेत असणारी महार सैन्याची तुकडी यात मराठा सैन्याची हि तुकडी आहेत. एक लक्षात घ्या केवळ महारच नाही तर मराठा देखील पेशवाईच्या विरोधात उभा होता. ब्रिटीशांच्या बाजूने ज्यांनी छत्रपतींचे राज्य लयास नेले, अश्या पेशव्यांच्या विरोधात उभे होते महार - मराठा! म्हणूनच हा विजय स्तंभ केवळ महार सैन्यांचा च नसून मराठा सैन्यांचा देखील आहे आणि त्यात महत्वाची बाब अशी कि सर्वांची नावे हि "नाक" नावनेच आहेत. त्यामुळे त्यातले महार - मराठा कोण? हे कोणालाच ओळखता आजवर आलेलेल नाहीत.

ह्याच कोरेगावची लढाई १८१७ च्या शेवटच्या रात्री अवघ्या ७५० सैन्याच्या साथीने २८ हजार सैन्यांशी झाली  यात ५०० महार - मराठा सैनिक होते. त्यांनी जीवाची बाजी लावत विजय संपादन केला. काहीनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या नावाने हा विजय स्तंभ आहे. पण त्याच बरोबर क्रांतीकारक घटना हि आहे कि - या कोरेगाव च्या सैनिकांच्या लढाईत कुमक म्हणून पाठवली असणारी एक सैन्याची तुकडी ग्वाल्हेरच्या छावणीत मेजर हेनरी टेलर याच्या अधिपत्याखाली असणारी सैनिकाची पलटण पुन्हा ग्वाल्हेरकडे पाठवण्यात आली. तेव्हा हि पलटण भोपाळपासून त्गोड्या अंतरावर असणारे भिलसा या ठिकाणी थांबली होती. त्यावेळी त्या पलटण मधील अधिकारी शिकारीसाठी दुपारचे जंगलात गेले असताना मुख्य मार्गावर बाजूला शेजारी झाडा झुडपांनी वेढलेल्या टेकडीवर गेले असताना त्यांच्या भोवती अनेक कृत्रिम छोट्या - छोट्या टेकड्या नजरेस आल्या त्यातील काही टेकड्या ह्या गोलाकार असून सुंदर आहेत असे जाणवले. त्यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्या पैकी कॅप्टन एडवर्ड फेल आणि लेफ्टनंट जॉन बागनोल्ड आणि निशाण जी जॉर्ज रोबुक यांनी या ठिकाणी उत्खनन झाले पाहिजे. यासाठी पुन्हा या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला.

दोन कनिष्ट अधिकाऱ्यांनी या अवशेषांचे रेखाचित्र काढले आणि एडवर्ड फेल यांनी एक अहवाल तयार केला. तो कलकत्ता जर्नलच्या जुलै १८१९ च्या अंकात प्रकाशित झाला. या अहवालात त्यांनी लिहिले होते कि - एका अलग पडलेल्या टेकडीवर सपाट माथ्यावर अर्धगोल घुमटकार आकारात पडलेले दगडात बांधलेले टप्या टप्प्याने बांधलेले सिमेंचे अजिबात वापर न करता पूर्ण ठोस असे स्मारक बांधलेले आहे. १२ फुट उंच आणि ७ फुट रुंद आस्व वर्तुळाकार ५५४ फुट परीघ असलेले स्मारक बांधलेले आहे. या स्तुपा भोवती भग्नावस्थेत पडलेले तोरणे आणि कठड्यावरील नक्षीचे हि वर्णन त्यांनी अहवालात केले होते. शिल्पाचा अर्थ न लागल्याने एका दीर्घ कालीन प्राचीन इतिहासाला उलगडा करणऱ्या स्थळ जैनांचे कि बौद्धांचे याबाबत निश्चिती नव्हती. कलकत्त्यातील रॉयल आशियाटिक सोसायटीच्या एच. एच. विल्सन यांनी दुर्लक्ष केल होते. नंतरच्या काळात जॉन प्रिन्सेप अलेक्झांडर कनिघहम आणि जॉन मार्शल यांनी लक्ष घालून सांचीचा शोध लावला.

सांचीचे संरक्षण आणि पुर्नबांधणी करण्यासाठी साधन सामुग्री नेण्यासाठी एक छोटी रेल्वे लाईन खालच्या मोठ्या लोह मार्गावरून टाकण्यात आली. सांची वरील जातक कथा, बुद्ध जीवन कथा दान दात्यांचे शिलालेख आणि तर सामग्री वरून सम्राट अशोकाच्या काळापासून इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून ते गुप्तोतर काळापर्यंत म्हणेज इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत आहे आणि बौद्ध धम्माचा इतिहासावर एक प्रकाश पडला. पेशवाई बुडवणाऱ्या कोरेगावातील लढाई मधील हे यश, हे विषमतेचे राजवट नष्ट करणे हे होते आणि दुसरी यश सांचीच्या शोधातून उलघडत जाणारा बौद्ध धम्माचा समतावादी परंपरेचा शोध हे होते. बाबासाहेब यांच्या अभ्यासात हे आले नसावे का? तर नक्कीच आलेले आहे त्यामुळे बाबासाहेब हा अनोखा संगम साधतात. ते १ जानेवारीला कोरेगाव या ठिकाणी जावून विजय स्तंभाला मान वंदना देतात. जणू हेच सांगत असतात कि - आजच्या दिवशी एक बौद्ध धम्माच्या महत्वाचा परंपरेचा शोध लागला आहे. सांची चा महास्तूप आजच्या दिवशी याच लढाईसाठी पाठवलेल्या सैनिकांनी शोधून काढला. हे इतिहासात मात्र लपवून ठेवलेले आहे. आपण जगा पुढे जाताना हे मात्र उजेडात आणले पाहिजे. त्यामुळे कोरेगावच्या विजय स्तंभाला मानवंदना देणाऱ्या बौद्ध बांधवाना हा हि इतिहास माहिती असणे आवश्यक आहे.

जोवर तुम्हाला तुमचा इतिहस कळणार नाही. तोवर तुम्हाला त्याचे महत्व  कळणार नाही का? बाबासाहेब यांनी १९५६ ला बुद्धच्या ओटीत टाकले. याचा विचार करा १९२७ ला कोरेगावला जाणाऱ्या बाबासाहेब यांना या बौद्ध संस्कृतीचा चांगला परिचय झाला होता. कोरेगावच्या लढाईसाठी पाठवलेली कुमक म्हणून जी पलटण पाठवली. तिने सांचीच्या स्तुपाचा शोध घेणे आणि भीमा कोरेगावला त्याच लढाई मध्ये लढाई विजय होणे. एक योगायोग समजावा असा आहे. त्यामुळे भीमा कोरेगावला विजय स्तंभाला मान वंदना देण्यासाठी येणाऱ्या लोकांनी हा इतिहास अभ्यासावा वाचवा आणि बौद्ध धम्माच्या इतिहासाची ओळख असणाऱ्या बौद्ध लेण्याकडे वळावे. कारण इथूनच बौद्ध धम्माची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात झाली आहे. चला तर आपला वारसा जतन करण्यासाठी पुढे येऊ या.

सूचना-
कृपया लेण्या संदर्भात माहिती करिता किंवा ब्राम्ही लिपी शिकण्या करिता Ancinet Buddhist Caves Preservation & Research चे प्रमुख "रवींद्र सावंत : ८१०४१२०३७६" आणि "मुकेश जाधव  :९७३०१२९२६६" यांच्या सतत संपर्कात राहावे.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
रवींद्र उर्फ भीमरत्न सावंत (लेणी संवर्धक)
"बौद्ध लेणी संशोधन एवं संवर्धन संघटना"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

● दुसरी महार बटालियन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील प्रसंग

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         ● दुसरी महार बटालियन आणि
   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील प्रसंग
               लेख - सविता बाविसकर

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

                कश्मिरच्या सीमेवर आमच्या दुसऱ्या महार बटालियनने शौर्य व धैर्याचा जो अपूर्व लढा दिला, तो पाहून सारे सैनिक अधिकारी दंग झाले. कुणी सांगावे आमची हि बटालियन काश्मिर सीमेवर लढली नसती तर संपूर्ण काश्मिर, पाकिस्तानच्या घशात गेले नसते का? आमच्या बटालियनने दाखविलेली वीरश्री पाहून बाबासाहेब गहिवरले. सन १९४९ मध्ये बाबा या बटालियनला भेट  देण्यास काश्मिरला गेले.

बाबा मिलिटरी प्रांगणात आले. साऱ्या सैनिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची छटा नाचत होती. बाबांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा त्यांना अवश्य लाभ घडला होता. बाबांनी आपली प्रेमळ नजर चोहीकडे फिरविली. प्रत्येक सैनिक गडी आदराने नतमस्तक होऊन उभा होता. त्याच क्षणी बाबांच्या टपोऱ्या डोळ्यात आसवे तरळली. एका क्षणात तिथे गंभीरता निर्माण झाली. एक जवान बुटांचा खटखट आवाज करीत बाबांकडे आला आणि म्हणाला - "बाबा! काय झालं ते तात्काळ सांगा. आम्ही तुमच्या करिता रक्ताचे पाट..." परंतु त्या सैनिकाचे बोलणे संपण्या पूर्वीच बाबा म्हणाले - "तसं काही नव्हे रे... त्याच असं आहे."

काही वर्षापूर्वी म्हणजे भारताला स्वातंत्र मिळण्यापूर्वी इंग्रजांनी फायोनियार कोर्स करिता (हलक्या दर्जाची कामे जशी रस्ते बनविणे. रस्त्यावर दगडांची भर टाकणे, पूल बनविणे इत्यादी.) आपली माणसे देण्या बद्दल मला लिहिले होते. मी त्यांना खडसावून सांगितले कि - "माझी माणसं शूरवीर आहेत. शत्रू सैन्याशी दोन हात करण्यास अन्य जमाती पेक्षा त्यांच्यात अधिक दम आहे. तुम्ही माझ्या लेकरांना दोन हात करण्याची संधी देऊन पहा."

इंग्रजांनी माझी शिफारीस पाहून कामठी मध्ये पहिली महार बटालियनची स्थापना केली. त्यानंतर सुमारे दोन वर्षानंतर दुसरी बटालियन स्थापन करण्यात आली. तुम्ही लोकांनी माझे शब्द खरे करून दाखविले, हे पाहून मला अत्यानंद होत आहे. माझ्या डोळ्यात तरळणारी आसवे समाधानाची व आनंदाची आहेत. बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून सारेच गहिवरले.

◆◆◆

लेख -
सविता बाविसकर (फेसबुक पेज संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

● सम्राट अशोक त्यांचा धम्म आणि त्याचे भवितव्य

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

                ● सम्राट अशोक त्यांचा
                धम्म आणि त्याचे भवितव्य
                    लेख - सुरेंद्र पवार

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               त्या तलवारीतून (खडंगातून) फक्त किंकाळ्या, आरडाओरड ऐकू यायचे. "चंड" अशोक म्हणून ओळखला जायचा तो "विद्रुप" म्हणून त्या सुंदर महिला हसल्या होत्या आणि एका क्षणाच्या आत त्याच्या सुंदर मुंड्या धडाच्या वेगळ्या झाल्या होत्या. संध्याकाळी कत्तल खाण्यासारख्या त्या कारागृहात सगळ्या आरोपीची मस्तके उडविताना अशोक आपली चंडगिरी सिद्ध करायचा त्या किंकाळ्या ते चित्कार! स्वतःच्या सावत्र भाऊ सुशीमला मारताना हि त्याला काहीही वाटलं नाही. त्याच्यासाठी केलेल्या सापळ्यात सुशीम पडला आणि भस्म झाला. पण एका बाजूने त्याची पत्नी विदिशा त्याच्यात हळू हळू बुद्ध परित होती आणि झाले ही तसे कलिगाच्या त्या युद्धात राशीच्या राशी मासाचा, हाडांचा डोगर, रक्ताच्या नद्यांच्या नद्या पाहून सम्राट पदाच्या आनंद फार वेळ पचवू शकला नाही आणि हाथातून ती तलवार (खडंग) आपोआप सुटले आणि एकच घोष निघाला. "बुद्धम शरणम गच्छामि ।"

अशोकला बदलला त्या सुशीमच्या सात वर्षाच्या मुलाने तो भिक्षू सात वर्षाचा सरळ अशोकाच्या सिंहासनावर जाऊन बसला. अशोकातील चंड जागा झाला लगेच तलवारीवर (खडंगावर) हाथ गेला. त्याला वाटलं सुशीमच गादीवर बसला आहे, कारण सुशीम असाच दिसायचा. तो मुलगा लगेच उठला आणि म्हणाला - "राजा कसा बसतो? ह्या सिंहासनावर किती तरी विंचू आहेत. ह्या सिंहासनावर मी एक मिनिट सुद्धा बसू शकत नाही. हे मलमूत्र सारखेच आहे." माझ्यासाठी आणि सम्राट मध्ये आमूलाग्र बदल झाला. नंतर त्याने मोगलीपुत्त तिस्साला भेटायला गेला. जे अर्हत होते. पण त्यांनी सांगितले की - "ते येणार नाहीत. ते सुद्धा सम्राट आहेत." धर्माचे आणि अशोक स्वतःहून नदी पर्यंत भंतेना भेटावयास गेले. भंते होडीतून बाहेर आले आणि सम्राट पुढे होऊन हाथ मिळविला. तेव्हा पासून आपल्या भारतात हस्तदोलन हा प्रकार सुरू झाला. दोन अनोळखी आता सुद्धा एकमेकास हाथ मिळवितात व मित्र होतात. हि प्रथा तेव्हापासून भारतात सुरु झाली आणि मग मोगलीपुत्त तिस्सानी अशोकाला विपश्यना दिली. सम्राट अशोक राजस्थान मध्ये जवळ जवळ ६ वर्ष विपश्यना करत होते आणि त्यात प्रवीण होत होते.

आज ८३००० स्तूप व लेण्या आपण पाहतो. ते त्यांचीच देन आहे. अखंड भारत करून त्यांनी आपली संपत्तीचे समान विभाग करून जनतेत वाटले. अशोकांनी पहिल्या प्रथम बुद्धांचा उपदेश उपयोगात आणला. आर्थिकतेच्या बाबतीत आणि त्यानुसार आपल्या राज्यात ही आर्थिक समानता असावी, ते सिद्ध केले. राज्याचा पैसा तो जनतेचा सर्व लोकांना सामान जमीन वाटली. तक्षशीला, नालंदा विद्यापीठात लोक बाहेरून येत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था खाद्य ह्याची व्यवस्था स्वतः अशोकाच्या आदेशाने होत होती.

नशा - पाणी, नाच - गाणे, नाटक, शस्त्र ठेवणे ह्याला बंदी आणली. मनुवाद बंद केला. सर्वे समान आहेत, म्हणून प्रचार प्रसार केला. चंड अशोकचा धम्म अशोक ज्या विपश्यनेमुळे तो धम्म अशोक झाला. ती विपश्यना व धम्म बाहेरील देशात प्रचार प्रसार करणारा पहिला राज्य सम्राट अशोक होय. असे म्हणतात की - त्याच्यात जी मंगल मैत्री जागली. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांतील देवता, ब्रम्हाचा लाडका म्हणजे प्रिय होता, म्हणून त्याला लोक "देवान प्रिय राजा" म्हणत. ८३००० लेण्या बांधताना वेगवेगळ्या ग्रहातील दगड वापरले. त्यामध्ये तुषित लोक,१६ ब्रम्ह लोक असे अनेक लोक मधील देवतांनी लेण्या बनविल्या व त्यावर वेगवेळ्या औषधी झाडे लावली. पारिजातक हे परनिर्मिती वंशवर्ती देव लोकातील फुल ते पृथ्वी वरील नाहीत.

एका वर्षात ८३००० लेण्या बांधल्या गेल्या. इतर लोकांतील वेगवेगळे आभूषणे व सोने, हिरे, मोती आकाशातील वेगवेळ्या ग्रहावरून आणले गेले म्हणूनच तर ह्या देशाला सोन्याची चिडीया बोलू लागले. राम राज्यात मनुवाद होता. खालील जातीतील, पीडित, शुद्र  लोकांवर अन्याय होत होता. जसे शंभुकाचा वध किंवा स्त्रीयावर अन्याय स्वतः सीतेला जंगलात सोडणारा श्रीराम होता. पण सम्राट अशोकाच्या राज्यात लोक प्रगती पथावर वर होते, असे लोक होते. जे परग्रहावर जात असत, येत असत. त्यामुळे खूपच धम्म समजत होता.

पृथ्वीवर नव्हे तर त्यावेळी ६ देव लोक व १६ रूप ब्रह्म लोक हि बुद्धाचे अनुयायी होते आणि हे साध्य झाले. ते मोगलीपुत्त तिस्समुळे त्यावेळी पृथ्वीवर हजारोच्या संख्येने अर्हन्त होते आणि इतर ग्रहावर हि तेव्हढेच होते. त्यावेळी देवता ब्रम्हाला परमात्मा वैगेरे मानत नसत. कारण तेही मरणारे आहेत. हे सिद्ध होण्यासाठी त्यावेळचे अर्हन्त एकत्र असत किंवा स्वतः ब्रह्म लोकातील ब्रम्ह अर्हन्त अशोकाच्या सानिध्यात येऊन सांगत. देवता ब्रम्ह लोकात ही वैदिक धम्म होता व बौद्ध धम्म होता. तिथे ही वेगवेगळ्या विचाराचे लोकात भांडणे होत असत.

देवता, ब्रम्हा व मनुष्य समान आहेत. फक्त ग्रह वेगवेगळे आहेत. पण दोन्ही मरण धर्मीच आहेत. ह्यामुळे कोणी उच्च नाही की नीच नाही. पण काही मनुवादी देवता ब्रम्हा स्वतःला मनुष्यापेक्षा श्रेष्ठ समजत. पण जेव्हा बुद्धांच्या वेळी व अशोकाच्या वेळी मनुष्य त्याच्या लोकी येऊन त्याच्यापेक्षा रिद्धी - सिद्धी मध्ये उजवे ठरू लागले व तेथील अर्हतांनी हि सिद्ध केले की - "सर्व समान धर्मी आहेत. कोणी उच्च नाही की नीच नाही. फक्त धातू वेगवेगळे आहेत." अशोकाच्या वेळी जे ब्रम्हा व देवता, यक्ष लोक अर्हत झाले होते. ते तेथील मनुवादी देवता ब्रम्हा पेक्षा भारी व जास्तच रिद्धी - सिद्धी होते व उजवे होते. त्यामुळे पृथ्वीवर ते कहिही वाईट घटना किंवा घातक कार्य करता येत नव्हते. त्यात अशोक पुण्य परिमिता युक्त आणि बुद्धाचे भविष्य ह्या सत्यासमोर देवता, ब्रम्हा नपुसक होते. दोन गट होते. एक समतावादी व एक असमातावादी आणि खरंच त्यावेळी मार हि हरला होता. कारण सम्राट आता धर्माचा सम्राट होता. त्याला कोण नमविणार होत. कोणीही नाही आणि बुद्ध कालीन जास्तच वय जगणारे अर्हत देवता, ब्रम्हा होतेच. समर्थनाला आणि त्याची परिमिता ही!

अशोकाच्या ८०० वर्षानंतर जेव्हा ह्या देशात अर्हत होणं बंद झाले. तेव्हा मात्र ह्या देशात सत्य धम्मानी साथ सोडली आणि त्यात महायान, वज्रयान असे दूषित विकृत धर्म निर्माण झाले. त्यामुळे देवता ब्रम्हा लोकी सुद्धा अर्हन्त होणे बंद झाले. मनुष्य लोकी जी प्रथा जोर धरते ती प्रथा देव लोक व ब्रह्म लोक मध्येही सुरु होते. हा निसर्ग आहे. ह्या सर्व घटनेचा फायदा माराला होतो. परनिर्मिती कारक वंशवर्ती देवताला बुद्ध धम्म आवडत नाही. त्याला लोकांची दिशाभूल करण्यात मजा येते. तो दिशाभूल करण्यासाठी मनुष्याना भरकटवितो. कारण त्याला कोणी अर्हत किंवा बुद्धत्व होऊन त्याच्या क्षेत्रा बाहेर गेलेलं आवडत नाही. त्याला सत्व - जन्म - मृत्यूच्या विळख्यात असावे, हेच आवडते. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून तर कधी सत्व मनुष्य व्यक्ती होतो. तर कधी प्राणी, कधी देवता कधी, ब्रम्हा ह्या प्रवासात सत्व अडकते आणि हेच त्या परनिर्मिती वंशवर्ती लोकांतील काळ ब्रम्हाला आवडते. तो कधी आल्हा स्वतःला म्हणवितो. तर कधी परमात्मा, तर कधी ईश्वर! हा काळ ब्रम्हा हि वेळेनुसार मारतो आणि कर्माच्या गतीनुसार जन्म घेतो. हा एकच नाहीय करोडोने आहेत. तो एक स्वयं प्रकाशीत लोक आहे.

आज आपण जे जीवन जगतोय. ते काल ब्रम्हा म्हणजे परनिर्मिती वंशवर्ती देवता माराच्या राज्यात जे असत्य आहे. त्यात आज मनुवाद त्याचेच प्रतीक आहे. लोक सदाचार सोडून चमत्कार, परमात्मा वगैरे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत. जेव्हा महंमद गजनीने कत्तली केल्या. तेव्हा कोणीही अर्हत नव्हते. ते भिक्षु धम्माचे पालन करत नव्हते. तर खूप तर चरित्र भंग भिक्षु होते. त्यामुळे ह्या मरानी डाव साधलाच आल्हा बनून सत्य धर्म हा धारण केला. तरच धावून येतो. असत्य धारण केल्यावर सत्य कसे धावून येणार? तुम्ही कोणता धम्म धारण केलंय? तेसेच होणार की मग तुम्ही कोणतीही पातळी लावा. भिक्षु असा ना धम्म काही परमात्मा नाही. जसे बीज रोवणार तसे होईलच. तुम्ही त्याचे नाव घ्याल व तो खुश होईल असे नाही, होत नाही. जे धारण कराल तेच फळ येईल आणि त्यावेळी  कोणी अर्हत नसल्याने त्याच्यात कोणती ताकत नाही की - "ते आपल्यासाठी कोणते संरक्षण तयार करतील किंवा त्यांच्यासाठी धावून येईल.

आज बुद्ध धम्माच्या शोधाला कोणी मानत नाहीत. अर्हत होणे तर दूरची बाब पण आता विपश्यना ह्या देशात पोचली आहे आणि लोक श्रोतापन्न (जागृत) होत आहेत. यामुळे इतर ग्रहावर चांगले देवता ब्रम्ह तयार होत आहेत. तेव्हा परत ह्या देशात धम्म पसरेल, हि भविष्य वाणी बुद्धांची आहे. जशी भविष्य वाणी होती तसे झाले. २५०० वर्षानी परत धम्म भारतात येईल व तसेच झाले एक बोधिसत्व ज्यांनी परत ह्या देशात धर्मातर केलं व पहिली वेळ ह्या देशात "बुद्धम शरणम गच्छामि" चे स्वर ऐकू येऊ लागले आणि ते बोधिसत्व डॉ. भिमराव रामजी आंबेडकर आहेत. धम्म तर आला पण त्यावर चालण्याचा मार्ग विपश्यना ज्यांनी अर्हत होता येत. तो धम्म मार्ग हि निसर्गतःच आला आणि त्याचे श्रेय सत्यनारायण गोयंका गुरुजी यांना मिळते.

◆◆◆

लेखक -
आयुष्यमान सुरेंद्र पवार
(लेखक, कवी आणि आंबेडकरी विचारवंत)
"सदस्य : स्क्रीन राईटर्स एसोसिएशन"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

● सोडून गेली भिमाई गुणी (हृदयद्रावक कविता)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

             ● सोडून गेली भिमाई गुणी
                    कवी - यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

सोडून गेली भिमाई गुणी ।
ह्या पाखरांना दिसेना कैवारी कुणी ।।धृ।।

पिल्ले सात कोटी पंखात होती,
माऊलीच्या अटी सावरीत होती,
निराधार वासरांचा कुणी हो धनी ।।१।।

वासरे झाली दिन नादानी,
घाबरत होती दिशा दिशा कोणी,
कुणी पाजील का त्यांना घोटभर पाणी ।।२।।

अंत नव्हता हो त्या माऊलीचा,
नाही राहिला कुणी कुणाचा,
भाऊ भाऊत होतात बघा ते खुणी ।।३।।

नाते गोते मत लोभाचे,
धन - संपत्ती त्या मालकीचे,
रमाईच्या देखील किती गातात गाणी ।।४।।

"यतिना" तु हो प्रतिकार कवी,
लेखणी चालव हो तेजस्वी,
आठव भिमाईचे बोल हो मनी ।।५।।

◆◆◆

कवी -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"Buddhism & Ambedkarism Blog"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

रविवार, २ डिसेंबर, २०१८

● "नोव्हेबर - डिसेंबर" ठाम निश्चय करण्याचा काळ

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           ● "नोव्हेबर - डिसेंबर" ठाम
                 निश्चय करण्याचा काळ
                   लेख - यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               आपल्याच देशात पशूतुल्य जिवन जगणाऱ्या बहूजन समाजाला माणूसपण देणाऱ्या आणि प्रस्थापित समाजाला ही माणूसपण म्हणजे काय? याची शिकवण देऊन संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजालाच माणूसपणाचे अधिकार प्रधान करणाऱ्या या समाज क्रांतीकारकांच्या स्मृती दिनी काही बाबी गभिर्यानट विचारात घेणे मात्र आवश्यक आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे दोनच महामानव जगात होऊन गेले. ज्यांनी तत्वज्ञान तर निर्माण केलेच, पण तत्वज्ञानावर आधारित समाज क्रांती ही घडवून आणली. जगात अनेक तत्वज्ञाने आणि त्याचे तत्ववेते निर्माण झाले; परंतू त्यांनीच निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर त्यांना क्रांती करता आली नाही. जगातील भांडवल शाही विरोधात कामगार सत्तेचे साम्यवादी तत्वज्ञान निर्माण करणारा कार्ल मार्क्स देखील अपवाद नाही.

मार्क्सने निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर क्रांती होण्यासाठी रशियातील लेनिन यांचे नेतृत्व लाभले. परंतू तथागत बुद्ध आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्वज्ञाना बरोबरच क्रांती घडवून तत्वज्ञानाचा व्यवहार ही निर्माण केला. बुद्धाने वर्ण वर्चस्ववादी समाज व्यावस्था नष्ट करुन समाज क्रांती घडवली. हि समाज क्रांती घडवण्यासाठी त्यांनी प्रचारक असणाऱ्या बौद्ध भिक्खू संघाचा उपयोग केला. म्हणूनच बुद्धाचा भिक्खू संघ हा क्रांतीकारी संघ होता, असे विवेचन स्वत: डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही केले आहे.

बुद्धाने राजकिय, सामाजिक, आर्थिक या बरोबरच स्त्री विषयक आणि सांस्कृतिक क्रांती ही घडवून आणली. त्यामुळे कर्मकांडी ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्था कोलमडून समतावादी समाज व्यावस्था बुद्धाने निर्माण केली. बुध्दांकडे बाबासाहेबांनी ही याच मूलभूत दृष्टिकोनातून पाहिले. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर आधारित समाज क्रांती देखील सामाजिक, आर्थिक, राजकिय, स्त्री विषयक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक स्वरुपाची आहे. या क्रांतीचा व्यवहार निर्माण करताना त्यांनी भारतीय संविधानाचा अत्यंत खुशीने उपयोग करून घेतला. बहूजन समाजाला सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्वाचा अधिकार मिळवून दिला. शासकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्वाचा अधिकार मिळविण्यासाठी मूलभूत शैक्षणिक पात्रता आवश्यक असल्यामुळे शिक्षणाचा अधिकार सार्वत्रिक केला. त्यात ६ ते १४ वयोगटासाठी शिक्षण सक्तीचे केले. भारतीय समाज दोन भारतात विभागला गेला होता. त्यात एक गावकूसातील भारत आणि दुसरा गावकूस बाहेरील भारत!

संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या दोन्ही भारतातील भौगोलिक अंतर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गावाकडून शहराकडे स्थलांतर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिक्षित समाज शहरात येऊन स्थिरावला. मात्र शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज गावाकडेच राहिला. गावातल्या गावकूस बाहेर राहणाऱ्या समाजात प्रस्थापितांनी खैरलांजी घडविण्याची काळी कृत्य अजून ही होताना दिसतात. मात्र या सारख्या काळ्या घटनांवर समाजाने राज्यभर तीव्र आंदलोन करून ही त्यानंतर काळात राजकीय आणि सामाजिक परिणाम दिसून आलेला नाही.

डाँ. बाबासाहेब आंबेडकर याच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करत असतानाच अशा प्रश्नांचे आवाहन आंबेडकरी, बौद्ध समाज आगामी काळात कसे पेलणार आहे? याचा निश्चय ही करावा लागेल. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तत्वज्ञानात राजकीय परिवर्तनाच्या आधी सामाजिक परिवर्तनाला महत्व दिले आहे. मात्र या दोन्ही गोष्टी निरंतर प्रक्रिया म्हणून चालविल्या गेल्या पाहिजेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही प्रक्रिया ही राजकीय पद्धतीतून पुढे जात असल्याने सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा आंबेडकरी समाजात राजकीय परिणाम ही दिसून आला पाहिजे. त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून या देशाची सत्ता स्थाने लोकशाही प्रक्रियेने ताब्यात घेण्याचा त्यांचा विचार सुस्पष्ट होता. त्या ध्येयात आम्ही पुढे किती वाटचाल केली आहे? हे बघणे ही आमचे कर्तव्य आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले प्रतिनिधीत्वाचे अधिकार नव्या मुक्त धोरणातून हिरावले जात आहेत. अधिकार हिरावण्याची ही प्रक्रिया राजकीय सत्तेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र आंबेडकरी समाज ना ही प्रक्रिया थांबवू शकत ना त्यासाठी नवा पर्याय देत आहे.

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी "सामाजिक अर्थशास्त्र" विकसीत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याला त्या नंतरच्या काळात 'जातीचे अर्थशास्त्र' म्हणून ही पुढे आणण्याचा प्रयत्न आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला आहे. परंतू ज्यांना अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपण ओळखतो त्यांनी सामाजिक अर्थशास्त्राला गती देण्या ऐवजी भांडवली अर्थशास्त्र कायम ठेवून त्याची फक्त आकडेवारी बदलविण्याचा आज पर्यत प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे 'जात' ही शोषण व्यवस्था नष्ट करण्यासाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर घडवून आणले.

१९५६ च्या विजया दशमीला त्यांनी स्विकारलेली आणि समाजाला दिलेली धम्म दिक्षा 'जाती मुक्त' समाज व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल होते. मात्र त्या दिशेने धम्म चळवळ किती वेगाने पुढे जात आहे? याचा विचार करीत त्यासाठी काय उणीवा राहिल्या? याचा विचार समाजाला करावाच लागेल. नव्या शिक्षितांना नव्या आर्थिक रचनेत रोजगारापासून ही वंचित रहावे लागत आहे. अशा अनेक प्रश्नांच्या कोंड माऱ्यात आज समाज सापडला असला तरी यातून मार्ग काढण्यासाठी बुद्ध, आंबेडकरी तत्वज्ञान सक्षम आहे. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे. बुद्ध, आंबेडकरी तत्वज्ञानावर आधारलेल्या समाजाचा व्यवहाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याची!

बुद्धाने ब्राह्मणी कर्मकांडाचा समाजात असलेला स्तोम प्रज्ञा, शील, करुणाच्या मार्गाने उधळून लावला. त्यामुळे कर्मकांड व्यवस्थेला समाजात प्रतिष्ठा राहिली नाही. परिणामी तत्कालीन समाज बौद्ध धम्मात दाखल झाला. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील प्रस्थापित समाज व्यवस्थेचे तत्व आणि व्यवहार नितीमूल्य असल्याचे सांगून नवनवीन व्यवहार निर्माण करण्याचा सक्रिय मार्ग दिला. मात्र आज ६२ व्या वर्षानंतर आपलीच माणसे प्रस्थापितांच्या व्यवहाराला प्रतिष्ठा देऊन आपल्याच लढ्याची पाऊले खेचत आहेत. हे सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. मग याला राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला आणि साहित्यिक असे कोणतेही क्षेत्र अपवाद दिसत नाही. त्यामुळे समस्त आंबेडकरी अनुयायांनी ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी एकच निश्चयात्मक निर्णय करुया कि - बुद्ध, आंबेडकरी तत्वज्ञान आणि व्यवहार नितीवान असून या विचारांनीच प्रत्येक क्षेत्राचे उत्थान होईल. कारण ज्या व्यवहाराला सामाजिक प्रतिष्ठा लाभते. तोच व्यवहार आणि विचार पुढे जातो. त्यामुळे प्रस्थापितांच्या क्षेत्रात लिन होण्यापेक्षा बहुजनांच्या कल्याणाच्या मार्गाचा व्यवहार निर्माण करुया. हिच या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली ठरेल.

◆◆◆

आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"Buddhism & Ambedkarism Blog"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।