बुधवार, २० मार्च, २०१९

● पहिला चवदार मुक्ती संग्राम (लेख)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           ● पहिला चवदार मुक्तीसंग्राम
                    लेख - यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

"आपली संघटना आपण स्वतंत्रच ठेवली पाहीजे. स्वतंत्र संघटनेशिवाय आपल्याला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही. संध्या जे लहान - मोठे राजकिय पक्ष दिसतात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या दृष्टिने कोणताच कार्यक्रम ठेवलेला नाही. तसा कार्यक्रम कोणी ठेवला असता तर त्याचा आम्ही विचार केला असता म्हणून आपण आपली सध्याची सुस्त अवस्था फेकून दिली पाहिजे. येथून पुढे आपल्याला जे काही मिळवायचे आहे ते इज्जतीने मिळविले पाहिजे. कोणाची हाजी - हाजी करून अथवा भिक मागून आम्हास काहीही नको. आपला भविष्य काळ उज्वल करण्यासाठी मला निष्ठेची माणसे हवीत."

विचार -
डाँ. बाबासाहेब आंबेडकर

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

           अस्पृश्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा उगम कोकण! या 720 कि.मी. च्या समुद्रकिनारा लाभलेला अपरांतात अस्पृश्यांच्या स्वतंत्र, समतेसाठी महात्मा फुले यांच्या काळापासून सातत्याने येथील अस्पृश्यांच्या नेत्यांनी प्रचंड लढे दिले. जोतिबा फुले या महामानवाच्या काळामध्येच अस्पृश्यांचा लढा आद्य समाज सुधारक आयु. गोपाळदादा वलंगकर यांनी सुरू केला. व कोकणातील अस्पृश्यांच्या हक्कासाठी पहिली अस्पृश्य निवारण संघटना दापोली येथे उभी केली व तेथील जातीय गुलामगिरीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटविली.

त्यानंतर महार समाज सेवा संघाचे सचिव मा. रामचंद्र बी. मोरे मुक्काम : दासगाव, तालुका : महाड, जिल्हा : रायगड यांनी इ. स. १९२६ मध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर अस्पृश्यांना सार्वजनिक तलावावर पाणी भरण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे सवर्ण समाजाने अस्पृश्यांवर बहिष्कार घातला व त्यांचा बाजार हाट ही बंद केला. या विरोधामध्ये मुंबई इलाख्यात ३ ते ४ निषेधाच्या सभा झाल्या. ह्या विषयावर अस्पृश्य जराही डगमगले नाहीत व त्यांनी लढा सुरूच ठेवला व त्यानंतर ३/१२/१९२६ रोजी दासगाव धर्म शाळेसमोरील पटांगणात सवर्ण व अस्पृश्य यांची संयुक्त सभा होऊन सर्व मान्य करून बहिष्कार उठविण्यात आला.

या विजयामुळेच अस्पृश्य समाजाला आपली ऐक्याची ताकद उमगली व नेत्यांची ह्या लढ्याची व्याप्ती वाढविण्याचे ठरविले व त्या पुर्वीच या संघाची बहिष्कृत ऐक्य, संवर्धक महार समाज सेवा संघ म्हणून दिनांक १० आँगस्ट १९२६ रोजी माननीय केशवराव गोविंदराव आडरेकर यांच्या निवास स्थानी स्थापना करण्यात आली. परंतू थोड्याच दिवसात कर्मवीर दादासाहेब तथा संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या सुचनेनुसार संघाचे नाव १९/१०/१९२६ रोजी महार समाज सेवा संघ असे करण्यात आले. मा. संभाजी तुकाराम गायकवाड यांचा जन्म पहूर, तालुका : माणगाव, जिल्हा : रायगड येथे झाला. त्यांना डाँ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमाने दादासाहेब हाक मारत असत. दासगाव तळ्याच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या अडीच हजार वर्षाच्या गुलामी व्यावस्थे विरूद्ध भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांनी पहिले बंडाचे निशाण महाड येथील प्रसिद्ध चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून अस्पृश्यांच्या मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी कुलाबा जिल्हा (आताचा रायगड) बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद दिनांक १९ - २० मार्च १९२७ रोजी महाड येथेच झाली. ह्या ऐतिहासिक परिषदेचे अध्यक्ष मा. डाँ. बाबासाहेब आंबेडकर होते व दादासाहेब गायकवाड हे स्वागताध्य्क्ष होते.

ह्या परिषदेसाठी त्यांनी त्यांचे चिरंजीव भिकाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महार समाज सेवा संघाच्या माध्यमातून तमाम कोकणात मुंबईसह परिषदेचा प्रचार केला. सैनिकी हुद्यावर काम करत असताना ही सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर यांनी ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्रंचड मेहनत घेतली. कार्यकर्त्याचे दोन भाग पाडून मां केशव गोविंद आडेरकर, मा. रामचंद्र बाबाजी मोरे यांनी स्व खर्चाने डिसेंबर १९२६ पासून कोकणात रत्नागिरी, दाभोळ, दापोली, महाड, माणगाव, रोहा, पेण या ठिकाणी परिषदेसाठी बैठका घेतल्या व प्रचार केला. यामध्ये सर्वस्वी शिवराम गोपाळ जाधव, गोविंद रामजी आडरेकर, चांगदेव नारायण मोहिते, शंकर लक्ष्मण वडवलकर, पांडूरंग महादेव साळवे, तनाजी महादेव गुडेकर, जनार्दन भागाजी गमरे, पांडूरंग बाबाजी मांडलेकर, वरधरकर, गणपत राव केंबुर्लीकर, राघोराम गोयलकर, बाळू वामनेकर, सुदाम केंबुर्लेकर या नेत्यांनी परिषथ यशस्वी करण्याची प्रचंड मेहनत घेतलीच परंतू महाड मधील श्री. अनंतराव तथा भाई चित्रे, श्री. सु. गो. तथा नानासाहेब टिपणीस ह्या कायस्थ तरूणांनी ही सक्रिय सहभाग घेतला.

दिनांक २० मार्च १९२७ रोजी परिषदेची सांगता झाल्यानंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्याची कृती कार्यक्रमाची अंमल बजावणी झाली. परंतू अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी बाटवल्यावर विरेश्वर मंदिरात जाणार आहेत. अशी अफवा पसरली व शे - पाचशे लोकांनी काठ्या - लाठ्या घेऊन अस्पृश्य लोकांना मिळतील तिथे मारण्यास सुरूवात केली. यामध्ये दादासाहेब गायकवाड यांचे पुत्र भिकाजी गायकवाड गंभीर जखमी झाले. व काही दिवसानी त्यांचा मृत्यू झाला. महाड परिषदेतील डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार समाजाने मेलेली गुरे ओढणे. कातडे काढणे, मृत जनावराचे मास खाणे, पाईन मागणे इत्यादी गलिच्छ कामे बंद केली. कोर्ट लढाई व अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी या संघाने "कोकण संरक्षण फंड" सुरू केला. व कोकणातील शेतकऱ्यांना संघटीत करून वरिल खोती विरूद्ध प्रचंड लढा दिला व बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजातील पहिला वैदिक विवाह आयु. केशवराव गोविंदराव आडरेकर यांचा संघाचे एक प्रमुख सदस्य आयु. विठ्ठल लक्ष्मण तिडेकर यांची कन्या विठाबाई हिच्याशी दिनांक १९/६/१९१९ रोजी मुंबई परेल दामोदर हाँल येथे संघाने घडवून आणला व धार्मिक संस्कारात परिवर्तन घडवून अस्पृश्य समाजाला सुधारणा प्रिय बनविले. तिच्यात बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमत्रण दिले. त्यांचा अस्पृश्य वर्गाला अत्यानंद झाला व संघाने त्याचा सन्मान म्हणून डाँ. बाबासाहेब आबेडकर पर्स फंडची स्थापना केली व २ आँक्टोबर १९३० रोजी त्यांना रक्कम अर्पण करण्यात आली.

• स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डाँ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मधील लोक :

१) ठुणाजी तुकाराम शिर्के - जन्म १८९९, मु. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड

२) नारायण भिकू असगोलकर - मुक्काम पोस्ट : असगोली, तालुका : गुहागर, जिल्हा : रत्नागिरी हे दोन्ही अस्पृश्यांचे पहिले नगरसेवक वांद्रे नगरपालिकेत दिनांक २८/११/१९३८ ला निवडून आले.

३) चांगदेव नारायण मोहिते - जन्म १८ मे १८९९, मुक्काम : पोयनार, तालुका : दापोली, जिल्हा : रत्नागिरी वांद्रे म्युनिसिपालटीत १९४५ ला नगरसेवक व महार जाती पंचायत समितीचे पहिले मुख्य सचिव

४) व्हि. वाय. मोहिते (दहिवलकर बुवा) वरळी व एस. डी. चिपळूणकर (लव्हग्रोव्ह) येथून शेतकरी कामगार फेडरेशनच्या वतीने १९४६ ला नगरसेवक झाले.

५) महार जाती पंचायत समिती स्थापना दिनांक २५ मे १९४१ रोजी मा. गणपत विठ्ठल कासारे (लाटवणकर बाबा) यांच्या निवास स्थानी झाले.

६) सुभेदार शिवराम सज्जन घाटगे (येरंडकर) देवी रमाबाई आंबेडकर विद्यार्थी आश्रम (दापोली) या संस्थेचे आद्य संस्थापक व संचालक.

७) भिकाजी स. गायकवाड व केशवराव आड्रेकर, स्टार्ट कमिशन पुढे अस्पृश्य समाजाच्या वतीने साक्ष.

८) नारायण रामजी जाधव तुळसकर - जन्म १९१२, देवी रमाई बोर्डिग चालविणे व संघाचे पहिले सचिव व बोर्डिग पी. ई. ए. कडे सुपूर्द.

९) सदानंद बाळाराम जाधव (आलसुलकर) उत्तम नाट्य कलावंत, नुतन नाट्य मंडळ (फोर्ट) मुंबई संस्थेचे निर्माते.

१०) मा. दि. मोरेश्वर बी. तांबे, तालुका : महाड, जिल्हा : रायगड, पहिले नाट्य लेखक कलावंत व पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त.

११) मा. घनश्याम तळवटकर, मुक्काम : तुळवट, तालुका : खेड, जिल्हा : रत्नागिरी. पहिले दिग्दर्शक, अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक व महाविद्यालयीन प्रशासक व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे विशस्त.

१२) मा. जगनाथ भातणकर व रामकृष्ण भातणकर (पनवेल) दोन्ही शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे आमदार.

१३) यशवंत भातणकर (पनवेल) नगराध्य्क्ष व त्यांच्या निवास स्थानी प्रबोधनकार ठाकरे यांचे येणे - जाणे होते.

अश्या असंख्य ज्ञात - अज्ञात कोकण वासीय नेत्यांच्या त्यागावर आज आपण उभे आहोत. त्यांचे त्या काळातील परिश्रम अंनत अटी अडचणीवर मात करित जिद्दीने लढण्याच्या प्रवृत्तीवर आपण कोकणस्थ बौद्ध म्हणून पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे व पुढील येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरलो पाहिजे. त्यास्तव व त्याच्या पवित्र स्मृती जागवित ठेवल्या पाहिजेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कोकणस्थ नेत्यांनी जो लढा दिला आहे.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

"शेवटी मला आपणास एवढेच सांगावयाचे आहे कि - जर आपण एकजुटीने वागाल तर काही तरी करू शकाल. आपल्या समाजावर हजारो वर्षापासून होत असलेले जोरजुलूम व अन्याय निवारण करण्याचे कार्य आजच्या पिढीने स्व खुशीने आपल्या शिरावर घ्यावयास हवे आहे. आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरूरी आहे. ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे."

विचार -
डाँ. बाबासाहेब आंबेडकर

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"साप्ताहिक करिअर दर्पण" (२४ मार्च २०१५)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ फेसबुक वर एकदा नक्की भेट द्या.

• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ मुंबईत स्मारकांना एकदा नक्की भेट द्या.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (चैत्यभूमी)

पत्ता : भागुजी बाबूजी किर हिंदू स्मशान भूमी, संत ज्ञानेश्वर मार्ग, चंद्रकांत दुरु वाडी, शिवाजी पार्क जवळ, दादर, मुंबई (पश्चिम), पिन कोड - ४०००२८

• माता रमाई आंबेडकर स्मारक (वरळी)

पत्ता : माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशान भूमी, जिजामाता नगर, डॉ. ई. मोझेस रोड, फोर सिजन हॉटेल समोर, वरळी, मुंबई (पश्चिम), पिन कोड  - ४०००१८

सूचना : माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशान भूमी येथे आल्यास "माता रमाई स्मारक एवं प्रचार - प्रसार समिती" च्या ९८९२११४३१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ YATIN JADHAV : 9967065953

सादर कोणत्याही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (ग्रुप म्हणजे समूहात) वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
❖        रमेश भोसले : ९७७३३३८१४४     ❖
❖  कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील  ❖
❖     क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.    ❖
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖