रविवार, २ डिसेंबर, २०१८

● "नोव्हेबर - डिसेंबर" ठाम निश्चय करण्याचा काळ

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           ● "नोव्हेबर - डिसेंबर" ठाम
                 निश्चय करण्याचा काळ
                   लेख - यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               आपल्याच देशात पशूतुल्य जिवन जगणाऱ्या बहूजन समाजाला माणूसपण देणाऱ्या आणि प्रस्थापित समाजाला ही माणूसपण म्हणजे काय? याची शिकवण देऊन संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजालाच माणूसपणाचे अधिकार प्रधान करणाऱ्या या समाज क्रांतीकारकांच्या स्मृती दिनी काही बाबी गभिर्यानट विचारात घेणे मात्र आवश्यक आहे. तथागत गौतम बुद्ध आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे दोनच महामानव जगात होऊन गेले. ज्यांनी तत्वज्ञान तर निर्माण केलेच, पण तत्वज्ञानावर आधारित समाज क्रांती ही घडवून आणली. जगात अनेक तत्वज्ञाने आणि त्याचे तत्ववेते निर्माण झाले; परंतू त्यांनीच निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर त्यांना क्रांती करता आली नाही. जगातील भांडवल शाही विरोधात कामगार सत्तेचे साम्यवादी तत्वज्ञान निर्माण करणारा कार्ल मार्क्स देखील अपवाद नाही.

मार्क्सने निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर क्रांती होण्यासाठी रशियातील लेनिन यांचे नेतृत्व लाभले. परंतू तथागत बुद्ध आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्वज्ञाना बरोबरच क्रांती घडवून तत्वज्ञानाचा व्यवहार ही निर्माण केला. बुद्धाने वर्ण वर्चस्ववादी समाज व्यावस्था नष्ट करुन समाज क्रांती घडवली. हि समाज क्रांती घडवण्यासाठी त्यांनी प्रचारक असणाऱ्या बौद्ध भिक्खू संघाचा उपयोग केला. म्हणूनच बुद्धाचा भिक्खू संघ हा क्रांतीकारी संघ होता, असे विवेचन स्वत: डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ही केले आहे.

बुद्धाने राजकिय, सामाजिक, आर्थिक या बरोबरच स्त्री विषयक आणि सांस्कृतिक क्रांती ही घडवून आणली. त्यामुळे कर्मकांडी ब्राह्मणी वर्चस्ववादी व्यवस्था कोलमडून समतावादी समाज व्यावस्था बुद्धाने निर्माण केली. बुध्दांकडे बाबासाहेबांनी ही याच मूलभूत दृष्टिकोनातून पाहिले. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या तत्वज्ञानावर आधारित समाज क्रांती देखील सामाजिक, आर्थिक, राजकिय, स्त्री विषयक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक स्वरुपाची आहे. या क्रांतीचा व्यवहार निर्माण करताना त्यांनी भारतीय संविधानाचा अत्यंत खुशीने उपयोग करून घेतला. बहूजन समाजाला सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्वाचा अधिकार मिळवून दिला. शासकीय क्षेत्रात प्रतिनिधीत्वाचा अधिकार मिळविण्यासाठी मूलभूत शैक्षणिक पात्रता आवश्यक असल्यामुळे शिक्षणाचा अधिकार सार्वत्रिक केला. त्यात ६ ते १४ वयोगटासाठी शिक्षण सक्तीचे केले. भारतीय समाज दोन भारतात विभागला गेला होता. त्यात एक गावकूसातील भारत आणि दुसरा गावकूस बाहेरील भारत!

संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या दोन्ही भारतातील भौगोलिक अंतर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गावाकडून शहराकडे स्थलांतर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. शिक्षित समाज शहरात येऊन स्थिरावला. मात्र शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज गावाकडेच राहिला. गावातल्या गावकूस बाहेर राहणाऱ्या समाजात प्रस्थापितांनी खैरलांजी घडविण्याची काळी कृत्य अजून ही होताना दिसतात. मात्र या सारख्या काळ्या घटनांवर समाजाने राज्यभर तीव्र आंदलोन करून ही त्यानंतर काळात राजकीय आणि सामाजिक परिणाम दिसून आलेला नाही.

डाँ. बाबासाहेब आंबेडकर याच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करत असतानाच अशा प्रश्नांचे आवाहन आंबेडकरी, बौद्ध समाज आगामी काळात कसे पेलणार आहे? याचा निश्चय ही करावा लागेल. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तत्वज्ञानात राजकीय परिवर्तनाच्या आधी सामाजिक परिवर्तनाला महत्व दिले आहे. मात्र या दोन्ही गोष्टी निरंतर प्रक्रिया म्हणून चालविल्या गेल्या पाहिजेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही प्रक्रिया ही राजकीय पद्धतीतून पुढे जात असल्याने सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा आंबेडकरी समाजात राजकीय परिणाम ही दिसून आला पाहिजे. त्यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून या देशाची सत्ता स्थाने लोकशाही प्रक्रियेने ताब्यात घेण्याचा त्यांचा विचार सुस्पष्ट होता. त्या ध्येयात आम्ही पुढे किती वाटचाल केली आहे? हे बघणे ही आमचे कर्तव्य आहे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले प्रतिनिधीत्वाचे अधिकार नव्या मुक्त धोरणातून हिरावले जात आहेत. अधिकार हिरावण्याची ही प्रक्रिया राजकीय सत्तेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र आंबेडकरी समाज ना ही प्रक्रिया थांबवू शकत ना त्यासाठी नवा पर्याय देत आहे.

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी "सामाजिक अर्थशास्त्र" विकसीत करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याला त्या नंतरच्या काळात 'जातीचे अर्थशास्त्र' म्हणून ही पुढे आणण्याचा प्रयत्न आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला आहे. परंतू ज्यांना अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपण ओळखतो त्यांनी सामाजिक अर्थशास्त्राला गती देण्या ऐवजी भांडवली अर्थशास्त्र कायम ठेवून त्याची फक्त आकडेवारी बदलविण्याचा आज पर्यत प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे 'जात' ही शोषण व्यवस्था नष्ट करण्यासाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर घडवून आणले.

१९५६ च्या विजया दशमीला त्यांनी स्विकारलेली आणि समाजाला दिलेली धम्म दिक्षा 'जाती मुक्त' समाज व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल होते. मात्र त्या दिशेने धम्म चळवळ किती वेगाने पुढे जात आहे? याचा विचार करीत त्यासाठी काय उणीवा राहिल्या? याचा विचार समाजाला करावाच लागेल. नव्या शिक्षितांना नव्या आर्थिक रचनेत रोजगारापासून ही वंचित रहावे लागत आहे. अशा अनेक प्रश्नांच्या कोंड माऱ्यात आज समाज सापडला असला तरी यातून मार्ग काढण्यासाठी बुद्ध, आंबेडकरी तत्वज्ञान सक्षम आहे. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे. बुद्ध, आंबेडकरी तत्वज्ञानावर आधारलेल्या समाजाचा व्यवहाराला प्रतिष्ठा मिळवून देण्याची!

बुद्धाने ब्राह्मणी कर्मकांडाचा समाजात असलेला स्तोम प्रज्ञा, शील, करुणाच्या मार्गाने उधळून लावला. त्यामुळे कर्मकांड व्यवस्थेला समाजात प्रतिष्ठा राहिली नाही. परिणामी तत्कालीन समाज बौद्ध धम्मात दाखल झाला. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील प्रस्थापित समाज व्यवस्थेचे तत्व आणि व्यवहार नितीमूल्य असल्याचे सांगून नवनवीन व्यवहार निर्माण करण्याचा सक्रिय मार्ग दिला. मात्र आज ६२ व्या वर्षानंतर आपलीच माणसे प्रस्थापितांच्या व्यवहाराला प्रतिष्ठा देऊन आपल्याच लढ्याची पाऊले खेचत आहेत. हे सर्वच क्षेत्रात दिसून येत आहे. मग याला राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला आणि साहित्यिक असे कोणतेही क्षेत्र अपवाद दिसत नाही. त्यामुळे समस्त आंबेडकरी अनुयायांनी ६२ व्या महापरिनिर्वाण दिनी एकच निश्चयात्मक निर्णय करुया कि - बुद्ध, आंबेडकरी तत्वज्ञान आणि व्यवहार नितीवान असून या विचारांनीच प्रत्येक क्षेत्राचे उत्थान होईल. कारण ज्या व्यवहाराला सामाजिक प्रतिष्ठा लाभते. तोच व्यवहार आणि विचार पुढे जातो. त्यामुळे प्रस्थापितांच्या क्षेत्रात लिन होण्यापेक्षा बहुजनांच्या कल्याणाच्या मार्गाचा व्यवहार निर्माण करुया. हिच या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली ठरेल.

◆◆◆

आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"Buddhism & Ambedkarism Blog"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा