रविवार, २ डिसेंबर, २०१८

● उत्तम आरोग्य ही जीवनातली सगळ्यात लाभदायक गोष्ट आहे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

          ● उत्तम आरोग्य ही जीवनातली
           सगळ्यात लाभदायक गोष्ट आहे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने दरवर्षी आपण सर्व अनुयायी लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर येथे जमतो. तेथे जमतो ते त्यांची पूजा करायला किंवा त्यांच दर्शन घ्यायला नव्हे. तर त्यांच्या बुद्धिमत्येचा, त्यांच्या दृष्टिकोनाचा, त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्यासाठी तो पुढे नेण्यासाठी. बाबासाहेबांनी अनुसरलेल्या प्रागतिक, आधुनिक आणि वैज्ञानिक मार्गाचा अवलंब करणे ही आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. तेच मार्गक्रमण करत आरोग्याला प्राधान्य देत मागील चार वर्षांपासून आपण शिवाजी पार्कवर मासिक पाळी विषयी जागरूकता आणि मोफत सॅनिटरी पॅडचं वाटप केलंय.

यावर्षी आम्हा डॉक्टरांसोबत विविध ग्रुप्स (संघटन किंवा समूह) ही ते काम करणार आहेत. जे अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातल्या स्त्रियांची किती प्रगती झाली? ह्या वरून ते मोजता येईल, असं बाबासाहेब म्हणत. मग स्त्रीयांच्या आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करणे, त्याचा प्रचार व प्रसार करणे. हे त्या दृष्टीने उचलले जाणारे सर्वात मोठे पाऊल आहे. ह्या वर्षी आपण मासिक पाळीच्या जागरुकते सोबतच शरिराला योग्य पोषण मूल्ये देणाऱ्या आहारा विषयी जागरूकता करणार आहोत.

ज्या शिवाजी पार्कवर महापरीनिर्वाण दिनी करोडों रुपयांची पुस्तकांची विक्री होते. तेथे येणाऱ्या हरेकाच्या तब्येतीची, त्याच्या आहाराची, आहारातील पोषण मूल्यांची म्हणजेच पोषण (Nutrition) आणि आरोग्य (Health) ची काळजी घेणं. हे ही तितकंच महत्वाचं आहे. हे सहज सोपे आहे. कसे करता येईल? काय करावे लागेल? तर ते असे :-

१. जागरूकता : जे.जे. हॉस्पिटलची डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांची टीम ते करणार आहे. इतर ग्रुप्सना (संघटना किंवा समूह) त्यांना जॉईन करता येईल.

२. खाण्याच्या पदार्थां मध्ये बदल : मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कवर अन्नदान होतं. त्यात प्रामुख्याने नाश्त्याला पोहे, उपमा, वडापाव, चहा, बिस्कीट वाटली जातात. तर जेवणामध्ये आलू वांग्याची भाजी, झुणका, चपाती, भाकरी, पुलाव इत्यादी.

वरील नमूद केलेले नाश्त्याचे पदार्थ अर्धा तासात थंड होऊन कडक होतात आणि मग ते फेकून दिल्या जातात असं साधारणतः लक्ष्यात आलाय. जेवणांच्या पदार्था बाबत तसं होत नाही ते व्यवस्थित खाल्या जातात. आता हयात आपण पोषणात आणि स्वार्थात काय बदल करू शकतो? जो स्वस्त आणि कमी मेहनतीचा पडेल.

नाश्त्या मध्ये आपण मोड आलेली मटकी, मोड आलेले मूग असे कडधान्य कमी तेलात फ्राय करून थोडं तिखट मीठ टाकून दिले किंवा अगदी सोप्पं बॉइल केलेले अंडे ही देऊ शकतो. ह्या पदार्थामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे वरील नमूद केलेल्या इतर पदार्थापेक्षा बरंच जास्त आहे. त्यामुळे एकदा केलेला नाश्ता हा पुरेसा होईल. हे पदार्थ बनवायला ही सोपे, कॅरी करायला ही सोपे, किमतीला ही स्वस्त आणि आरोग्यासाठी चांगले! जेवणाच्या भाज्या मध्ये ही बदल करता येईल. सोयाबीनच्या वड्याची कमी रस्याची भाजी आणि सोबत भाकर म्हणजे हाय प्रोटीन आणि हाय फायबरचं मस्त कॉम्बिनेशन. ह्या निमित्ताने शिवाजी पार्कवर येणाऱ्या सर्व अनुयायांना उच्च प्रतीचं जेवण मिळेल. एक नवा पायंडा पडेल आणि गावी परतताना एक नवीन शिकवण ही मिळेल. वापस गावी गेल्यावर जागरूक होऊन त्यांनी अश्या प्रकारचं हेल्दी फूड खाल्लं तर आरोग्याच्या किती तरी समस्यांवर मात करता येईल. आणि पर्यायानं समाजाची सर्वांगीण प्रगती होईल.

हा खटाटोप करण्याचा उद्देश हाच की - आपण जितकं आपलं वैचारिक, सामाजिक आणि राजकीय ज्ञान वाढवण्याचा, जपण्याचा प्रयत्न करतो तितकाच प्रयत्न आपण आपल्या आहार आणि आरोग्या विषयी करायला हवा. तथागत बुद्धांनी ही अडीच हजार वर्षांपूर्वी म्हणूनच सांगितलेलं आहे, उत्तम आरोग्य ही जीवनातली सगळ्यात लाभदायक गोष्ट आहे. त्यामुळे ज्या ज्या संघटना मोफत अन्न वाटप करतात. त्यांना विनंती जमल्यास वरील सुचवलेला आरोग्यासाठी चांगला असलेला बदल करावा.

आरोग्य परमा लाभा ।

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
डॉ. रेवत (डॉक्टर : सर जे. जे. रुग्णालय)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा