शनिवार, १३ जानेवारी, २०१८

● शौर्या पुढे संक्रातीची हि फाटते. (१३ जानेवारी २०१८)

● शौर्या पुढे संक्रातीची हि फाटते.

सूचना एवं उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत ऐतिहासिक - चालू घडामोडी विषयक माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कार्यव्य असले पाहिजे.

लेख - 
यतिन जाधव

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

आंबेडकरी समाजातील जनता नेहमी आपल्या पूर्वजांना तसेच नामांतर वेळी शाहिद झालेल्या त्यानंतरच्या पुढच्या पिढीला त्याच्या शौर्याला अभिवादन करून नेहमी शौर्य दिन साजरा केला जातो. आंबेडकरी जनतेने आपल्या पूर्वजांचे आणि पिढीने केलेले कर्तव्य कधी हि विसरता कामा नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसारच - "जो इतिहास जाणत नाही, तो इतिहास घडवू शकत नाही." असे असताना इतिहास पुनः पुन्हा सांगावा लागत आहे.

◆ भीमा कोरेगाव शौर्य गाथा :

मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश्या मधील विकोपाला गेलेले संबंध पाहून युद्ध कधी ही होईल तेंव्हा आपण ही आपला पराक्रम शिव राज्यासाठी खर्ची घालावा आणि इथे ठाण मांडून बसलेल्या गोऱ्यास कायमचे हाकलून देऊया. या उदात्त भावनेने शिवाजी संभाजी महाराज्यांच्या मराठे शाहितल्या सरदार शिदनाक महार यांचा नातू शिदनाक महार ज्याने खरड्याच्या लढाईत अप्रतिम पराक्रम गाजविला होता. पठाणांच्या तावडीत सापडलेल्या मराठा सरदार भाऊ पटवर्धन याचे रक्षण करून हरणारी मराठी सेने स विजय मिळवून दिला होता, असा हा शूर सरदार महार जातीतल्या अन्य सरदारास घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यास भेटून आम्ही महार सरदार तुमच्या बाजूने ब्रिटिशा विरुद्ध लढाईत उतरू इच्छितो. तुम्ही आम्ही सारे एकत्र येऊन ब्रिटिशाला हाकलून लावु या, आम्हांला इंग्रजांच्या बाजूने लढायचे नाही, परन्तु माय बाप तुमच्या लष्करात आणि राज्यात आमच्या महार जातीचे स्थान काय राहणार? आमच्या गळ्यातील मडके कंबरेचा झाडू खांद्या वरच्या घोंगडी आणि हातातील घुंगराची काठी नष्ट करणार काय? आम्हांला माणसा सारखी वागणूक मिळणार काय? काय मागितले शिदनाक महार? फक्त माणुसकी! पण आमच्या राज्याच्या राज्यास आपल्या बापाची जागिरदारी समजणाऱ्या या उन्मत घमड खोर आणि मनुस्मृतींनी आंधळ्या झालेल्या या मूर्ख  बाजीरावाने तिरस्काराने जबाब दिला - "सुईच्या अग्रावर थरथरत रहाणाऱ्या धुळीच्या कणा एव्हडी ही स्थान तुम्हां महारास माझ्या राज्यात रहाणार नाही. तुम्ही आमच्या बाजूने जरी लढण्यात तरी ही तुम्हाला तुमच्या पायरीवरच राहावे लागेल. ब्राह्मण धर्मात कोणताच बदल घडणार नाही, हे पक्के ध्यानात धरावे. तुमची आम्हाला गरज नाही आणि जर तुम्हांला तुमचे स्थान हवे असेल तर ते मिळूनच दाखवा." बाजीरावाच्या उन्माद उत्तराने शिदनाक महारांच्या तळ पायाची आग मास्तकास भिडली आणि तो योद्धा कडाडले. धर्माचे तत्वज्ञान सांगणाऱ्या भेकडा पुरुषार्थ हाच जर तुझा क्षत्रिय धर्म असेल आणि तुम्ही खरे क्षत्रिय असाल तर आमचा युद्धात पाडाव करून दाखवाच. आज पासून तुमच्या जीवन मरणाच्या सीमा आम्ही ठरवु, असे निर्वाणीचा इशारा देऊन महार सरदार पेशवे दरबारातून बाहेर पडले.

१९ ऑक्टोंबर १८१७ ला विजया दशमीच्या मुहूर्त साधून पेशव्यांचे सैन्य जमा झाले. २९ ऑक्टोबर १८१७ ला बापू गोखल्याने मूळा मुठा नदीच्या बेटावर हल्ला केला. बेट लुटून जाळण्यात आले. ३० ऑक्टोबर गणेश खिंडीवर पेशव्याने हल्ला केला, दिनांक ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकीच्या युद्धास सुरुवात झाली. मात्र पेशव्यास यशाने हुलकावणी दिली तर दिनांक ६ नोव्हेंबर १८१७ रोजी केवळ २०० (दोनशे) सैनिकांच्या बळावर आणि पेशव्याचा फितूर ब्राह्मण बालाजी नाथूच्या मदतीने झुलमी शनिवार वाड्यावरचा भगवा उतरवून त्या ठिकाणी गोऱ्यांचा युनियन जॅक फडकविण्यात आला. कोणी मदत केली बालाजी नाथू, कश्यासाठी? स्वतःच्या फायद्यासाठी, शिदनाक महार काय मागत होता? फक्त माणुसकी! सत्ता जहागिरी नाही, पेशव्याची गादीच गेली आणि बाजीराव माहुलीला पळून गेला. पेशव्याच्या सैन्याची दनादन उडाली. सेनापती बापू गोखले पेशव्यास येऊन मिळाल्या नंतर गनिमी काव्याने बाजीरावाने पुन्हा एकदा सैन्याची जमवा जमाव करून युद्धाच्या तयारीस लागला व जे युद्ध झाले ज्यात पेशवाईचा अस्त आणि ब्रिटिश सत्तेचा निरंकुश अंमल ते युद्ध म्हणजेच भीमा कोरेगावचे महार सैनिकांच्या महान विजयाची शौर्य गाथा होय!

ब्रिगेडियर जनरल स्मिथच्या सैन्यास झुकांड्या देत बाजीरावने ३०००० घोड दल, १३८०० पाय दल घेऊन श्रीमंत बाजीराव पुण्यापासून ८ कोसावर असलेल्या फुल गावला दिनांक ३० डिसेंबर १८१७ रोजी दाखल झाला. सदरची खबर पुण्याच्या बंदोबस्त सांभाळणाऱ्या कर्नल बार्टला समजली, परन्तु त्याच्या जवळ पुरेसे सैन्य बळ नसल्यामुळे त्याने सातारा शिरूर छावणीला "लाखोटा" पाठवुन मदत मागितली. कर्नल बार्टने पाठविलेला "लखोटा" लेफ्टनंट कर्नल फिल्समन ने वाचून या कामासाठी कार्य कुशल साहसी, हमखास विजय मिळवून देणारी ज्यामध्ये महार जातीचे सैनिक मोठ्या प्रमाणात आहे. अशी सैन्य तुकडी, ज्या महारांची पेशव्याशी असलेले हाड वैर या गोऱ्या अधिकाऱ्यास चांगले ठाऊक होते. त्याने त्याच "बॉंबे नेटिव्ह इन्फंट्री सेकण्ड बटालियन फर्स्ट रेजिमेंट" ची ताबडतोब निवड करून कॅप्टन स्टोनटनाला ५०० महार सैनिक २७० घोडेस्वार तोफा ओढणारी २५ माणसे आणि २ तोफा चालविणारे असा विषम मानवी बळ देऊन पेशवे रुपी मृत्यूच्या कराल जबड्यात ढकलले. परंतु त्यास महार सैन्याच्या पराक्रम वर पूर्ण विश्वास होता महार मरतील पण पाठ दाखविणार नाहीत हे त्याला पक्के माहित होते.

महार सैनिक २५ किलो मीटरचा प्रवास करून दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी ८ वाजता कोरेगाव या ठिकाणी पोचले. भीमा नदीच्या पैलतीरावर दुसरा बाजीराव जातीने ३०००० पेक्षा जास्त शस्त्र सज्ज फौजे सह युद्धास तयारच होता. त्याचा यावेळी ही सरदार होता बापू गोखले, तर सैन्यात मात्तबर होळकर जाधव, गायकवाड, विंचूरकर, पुरंदरे, भोसले, सातारचे भोसले, निंबाळकर, घोरपडे इत्यादी दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी कॅप्टन स्टोनटनालाने पूर्ण कोरेगाव आपल्या ताब्यात घेतले. मात्र कोरे गावातील गढी आणि धर्म शाळा मात्र ताब्यात न घेतल्याचा परिणाम हि त्याच्या सैन्यास भोगावा लागला. सकाळी १० वाजता पेशव्यांनी आक्रमण केले. पेशव्यांच्या सेनापतीस ब्रिटिशांच्या अल्प सैन्याची पुरेपूर कल्पना होती आणि स्वतःच्या बलाढ्य सैन्या बद्दल फाजील आत्म विश्वासाच्या जोरावर त्याने चढाई केली.

५०० महार सैनिकांनी सतत ४ तास गोळ्यांचा पाऊस पाडून पेशवे सैनिकांची दनादन उडवली, तर ब्रिटिश तोफ सांभाळणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्माने तोफांचा भडीमार करून विरोधी सैन्याचे प्रचंड नुकसान केले. स्वतः बाजीराव तोफेच्या जबरदस्त हदर्याने त्याच्या पाया खालची जमीन सरकली व पायांना कंप सुटला. बाजीरावाच्या सैन्याच्या होत असलेली वाताहत थांबविण्यासाठी सेनापती बापू गोखले आणि विंचूरकर यांनी ब्रिटिश सैन्याच्या पिछाडीने कोरेगावात प्रवेश करून धर्म शाळा ताब्यात घेतली, परन्तु ती पुन्हा महार सैनिकांनी ताब्यात घेतली. दरम्यान पेशव्यांच्या सैन्याने तोफ चालविणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्मास एकटे गाठून त्याचे शीर धडपासून छाटून भाल्याच्या टोकावर नाचवत  "मारला... मारला... तोफवाला मारला." असा उन्माद करीत भीमेचे पात्रं ओलांडून हात घाईवर आले. दरम्यान ब्रिटिश सैनिकांच्या गोळ्या सुद्धा संपल्या होत्या, त्याच बरोबर बाजीरावाच्या सैन्याने कोरेगावतील गादीवर कब्जा केला होता. तिथून जबरदस्त मारा सुरु होता. पेशव्यांचा भडीमराने ब्रिटिश अधिकारी भांबावून गेले.

काही अधिकारी कॅप्टन स्टोनटनाला माघार घेण्यासाठी विनवण्या करू लागले. तेव्हा महार सैनिकांनी त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून कॅप्टन स्टोनटनाला निर्वाणीचा शब्दात सांगितले. ज्यांना जीवाची भीती आहे त्यांनी खुशाल रणातून माघार घ्यावी. परंतू आम्ही महार सैनिक पेशव्यांसोबत लढूनच मरू मात्र मरणापूर्वी माघार घेणार नाही. महार सैन्याच्या दृढ निश्चयाने कॅप्टन स्टोनन ला बळ चढले आणि आता बंदुकी सोडून तलवारीला तलवारी भिडल्या. महार सैन्याने आपल्या कुशाग्र बुद्धीने वेग वेगळ्या लढाऊ रचना रचून बाजीरावाच्या सैन्यास जेरीस आणले. पोटात ना होते अन्न ना पाणी समोर होते बलाढ्य शत्रू जे तुला माणुसकी नाकारत होते.

एक तर मर अथवा मारून जग, असा त्या महार सैनिकास त्याचे मन बजावीत होते. भीमेच्या पैल तिरा वरून बाजीराव युद्ध पाहत होता, तर आकाशातील सूर्य भास्कर आपल्या शहत्र धारांनी त्या वीर पुरुषांना चेतवत होता. त्याने एका स्त्रीसाठी झालेले राम रावण युद्ध पहिले होते, सत्तेसाठी कौरव पांडवांना कोंबड्या सारखे भांडताना पहिले होते, परंतु हे युद्ध ना राज, गादीसाठी होते, ना स्वर्ग प्राप्तीसाठी होते, हे युद्ध होते माणूस म्हणून जगण्यासाठीचे, दिनकर ही खुश होता. नेहमीपेक्षा जरा जास्तच आग ओकत होता. ज्यात महालातील गोरी चामडी भाजून निघत होती. तर दुसऱ्या बाजूने महारांची वर्मी घाव पडत होते, महारांच्या मजबूत आणि दणकट हातातील तलवारीचे घाव झेलता झेलता पेशव्याची सेना मेटाकुटीस आली. लढाईचे पालटणारे स्वरूप आणि नूर बघून बाजीरावाने रण गणातून धूम ठोकली. बाजीरावाचे अनुकरण त्याच्या जीवावर आणि भरवश्यावर अवलंबून असलेल्या आणि जीवाची भीती असणाऱ्यांनी तात्काळ केले. सेनापती बापू गोखल्यांच्या एकुलत्या पुत्राच्या गोविंद बाबाची तुकडी त्याला युध्दात एकट्याला सोडून जिवाच्या आकांताने पळत सुटली, मात्र तश्या हि परिस्थितीत गोविंद बाबा तलवार गाजवीत होता, त्याची महार सैनिक सोन नाकाशी पडली.

मदमस्त हत्ती प्रमाणे एक दुसऱ्यावर चालून गेले, परंतु सोननाक महारांच्या जबरदस्त तलवारीचा पहिलाच घाव गोविंद बाबाला चुकवता आला नाही. उजव्या अंगावर घाव झेलीत पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न असफल ठरला. सोनानाकाच्या दुसऱ्या घाव सरशी गोविंद बाबा "आई ग..." अशी आर्त किंकाळी फोडून भीमेच्या किनाऱ्या वरील मातीत मिसळला. एक एक महार सैनिक ५६, ५६ पेशव्यांच्या सैनिकाला कापून काढीत होता. सेनापती बापू गोखल्यांल त्याचा तारणा ताठा एकुलता एक पुत्र युद्ध भूमीवर बेवारस पडल्याचे समजताच त्याच्या सर्वांगास कंप सुटला. तो धीपाड योद्धा आपल्या लेकरास शोधीत युद्ध भूमीचाच पडू लागला. भीमेच्या तटावर त्याला त्याच्या पुत्राचे कलेवर सापडल्यावर तो शूर सेनापती मूक आक्रोश करू लागला. इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला, मानवर करून पाहिले असता तो विंचूरकर सरदार होता. विंचूरकर धीर गंभीर आवाजात म्हणाला उठा सेनापती शोक करण्यात अर्थ नाही, खूप मजल मारायची आहे. पुत्राच्या मरणाने बापाचे काळीज फाटले होते. तो शत्रूच्या नारडीचा घोट घेऊ इच्छित होता, पण समयाने कूस बदलली होती. पेशव्याच्या सैन्याला युद्ध भूमीवर महारानी चिरनिद्रेस पाठविले होते, जे मूठभर आपला जीव घेऊन पळाले होते, तेच तेव्हडे वाचले होते.

सूड घेऊ पाहणारा सेनापती हतबल होता, विंचुरकरांचा शहाणपणाचा सल्ला शिरोधार्य मानून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले सुद्धा त्याच्या धण्या प्रमाणे रणभूमी सोडून बाजीरावाच्या मागे चालता झाला. युद्धाचा निकाल लागला होता, ज्या शिदनाक सरदाराने बाजीरावास आव्हान दिले होते. ते त्याच्या शूर वीरांनी बाजीरावास उघड्या डोळ्यांनी पहायला भाग पाडले होते. ज्या भीमा कोरेगावच्या भूमीवर मराठ्यांच्या छत्रपती संभाजी महाराज्याना मनुस्मृतीनुसार हाल हाल करून ठार मारण्यात आले होते, त्याचा सुड संभाजीच्या मर्द मराठ्यांना जरी घेता आला नाही तरीही १००, १२५ वर्षाच्या प्रतिक्षे नंतर अधर्माने माजलेल्या आणि बाप मनूच्या कायद्याने उन्मत, मस्तवाल घमेंड खोर भेकड ब्राह्मण शाही रुपी पेशवाईस छत्रपती शिवाजीच्या खऱ्या मर्द मावळ्यांनी चारी मुंड्या चीत केले होते, हाच वर्मी घाव पेशवाई नायनाट करण्यास कारक ठरला. बाजीराव जे बोलला ते शिव काळ असता बोलला असता काय? शिवबाने त्याची जिभच छाटली असती, पण कर्तृत्ववान महापुरुषांचे वारस तसेच निपजतील, असे कोणी ही सांगू शकणार नाही, काही अपवाद असू शकतात.

◆ भीमा कोरेगाव विरुद्ध घटना :

सदर आंबेडकरी जनतेच्या पूर्वजांचे शौर्य पाहून स्वतःला मराठे (क्षत्रिय) समजणारे लोक ब्राह्मणी विचार सारणीनुसार कृती करणारे ब्राह्मण (ब्राह्मण मुळात क्षत्रिय नाहीत.) लोक स्वतःच्या पूर्वजांचा पराभव पाहून होणाऱ्या सभा तसेच कार्यक्रमांवर बंदी आणावी या करिता मनुवादी पोलिसांच्या मदतीने कामे करत होती. तसेच आताच्या शांत असलेल्या पुढच्या पिढीला पुन्हा पुन्हा भडकवण्याचे काम करत नेहमी येत असलेल्या ठिकाणाचे नुकसान करत म्हणजे वडू बुंद्रुक येथील गोविंद गायकवाड उर्फ गोविंद गोपाळ महार समाधीचे छत पाडून समाधीला थोडी इजा करून सोशल मीडिया वरून स्वतः माहिती प्रसारित करून लोकांना भडकवले.

तसेच १ जानेवारी रोजी सकाळीच मनोहर भिडेची सभा घेऊन लोकांवर हल्ला करण्याचा कट आधीच आखला होता, असे माहिती वरून कळते. नंतर सकाळीच ९ च्या सुमारास दगडफेक करण्यात आली. पोलीस तसेच सरकार वरील घडनेवर कार्य करत नसल्याचे पाहून २ तारखेला आलेली लोक कशी तरी आपापल्या घरी पोचली. ३ तारखेला सरकार विरोधात तसेच भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात तपासणी करिता महाराष्ट्र बंद करण्यात आला त्यात लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचे कळते. तसेच दंगलीच्या मुख्य आरोपीना पोलिसांनी अटक न करता "महाराष्ट्र बंद" आंदोलनातील भिम सैनिकांना उलट अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोरडीत मारहाण करत होते. सदर पोलीस कोरडीत मारहाण झाल्याने काही लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे घटनेनुसार कळते. अश्या लोकांच्या ध्येय, शौर्य आणि कर्तव्याला सलाम!

◆ मराठवाडा नामांतर शौर्य गाथा :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जगात सगळ्यात जास्त गाजलेलं नाव. तेथील विद्या दानाच्या अद्भूत पद्धतीमुळे नव्हे तर मानवी अधिकार मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षामुळे. विद्यापीठाचे नाव समोर आले की - चित्र उभे राहते ते ऐतिहासिक सामाजिक समतेच्या परिवर्तनाच्या लढ्याचे! विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचे. ह्या लढ्याने काय मिळालं? हा वादातीत विषय आहे आणि राहील देखील. पण नामांतराच्या चळवळीनं आमच्या कडून जे हिरावून घेतलं ते कधीच परत मिळणारं नव्हतं. आज त्याच विद्यापीठाच्या या महाकाय प्रवेश द्वाराच्या वास्तूला ४० पेक्षा जास्त वर्षे पूर्ण झालीत. त्या नामांतराच्या एकुण चळवळीवर आणि त्याच्या परिणामांवर ह्या चाळीशीच्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाश..

सत्तरच्या दशकात महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह पूर्तीच्या सुवर्ण महोत्सव निमित्ताने तमाम आंबेडकरी संघटनांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून त्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशा प्रकारचा ठराव देखील मंजूर केला गेला. एव्हाना पँथर देखील फाटा फुटीला बळी पडली होती. या फाटा फुटीमुळे राज्यभरातील पँथर्स मध्ये खदखदणार्‍या अंसोताषाला प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद मस्के, कमलेश यादव, उमाकांत रणधीर, मारुती सोनवणे, डी. एम. गायकवाड सारख्या खमक्या तरुणांनी वाचा फोडली. या सर्व तरुणांनी एकत्र येवून औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या सभेत पँथरला पुन्हा एकदा जीवदान मिळवून दिले. त्यावेळी झालेल्या बैठकीत पँथरची भविष्यातील वाटचाल निश्चित करताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर हाच मुख्य अजेंडा असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री आणि पुलोद प्रयोगाचे प्रणेते असेलेले शरद पवार यांच्याकडे तसा प्रस्ताव देखील मांडण्यात आला. पण त्याला योग्य तो प्रस्ताव न मिळाल्याने संतापलेल्या पँथर्सनी मुंबईतील मंत्रालयावर धडक मोर्चा काढला होता. नामांतर मोर्चास महाराष्ट्रातील  खेड्या - पांड्यातून लाखोंच्या संख्येने पँथर सहभागी झाले होते. त्या पँथरच्या ताकदीच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधी मंडळात संम्मत करताच त्याच रात्री मराठवाडा पेटला. मराठवाड्यातील हिंदू धर्मीय सनातनी जातीयवादी गावगुंडांचा पोटशुळ उठला व त्यांच्या तरुण मुलांना भडकावून देऊन महारवाडे पेटवा, त्यांची घरे जाळा, त्यांना बेदम मारा, त्यांच्या लहान मुलांना व महिलांना ही झोडपा, असे आदेश देऊन भयानक दंगल ह्या जातीवादी औलादींनी घडवली. ही दंगल भयानक व अतिशय क्रूर होती.

दंगलीत जातियवादी गावगुंडाना दलित पँथरने ही जेरीस आणुन, तरुण पँथर त्याचा मुकाबला करुन रात्रं दिवस लढत होते. जातीयवादी वृत्तीचे सनातनी कट्टर हिंदूत्ववादी औरंगाबादचे गोविंदभाई श्रॉफ याने लोकांना भडकविण्याचे व दलित वस्त्यांचा नायनाट करुन त्यांना बेचिराख करावे, म्हणून नामांतर विरोधी कृती समितीचे गुंड पाच जिह्यांतील खेड्या - पाड्यांतील वस्त्यांवर जाऊन रात्री पेट्रोलचे जळते गोळे फेकून घरांना व झोपड्यांना आगी लावत असे. त्याचवेळी नामांतरवादी कृती समिती मध्ये कॉलेजचे तरुण आणि पँथर्स जश्यास तसे उत्तर देत असत. जवळ जवळ महिनाभर ही दंगल चालू होती. पोलीस अनेकदा हिंदूचीच बाजू घेत असत. आंबेडकरी समाज अल्पसंख्याक असून देखील महिला ही लढतांना अग्रभागी राहून दलित पँथरच्या तरुणांना अन्याया विरुध्द लढण्याचे बळ देत होत्या.

भिमा कोरेगांव येथील महार बटालियनने पेशव्यांना पळवून लावून त्यांना पराभूत केले. त्याच सामर्थ्याने मराठवाड्यातील आंबेडकरी लोकानी दंगलखोर, जातीयवादी गावगुंडांशी मुकाबला केला. उदगीर, जळपोट, नांदेड या शहरात व तेथील खेड्या - पाड्यांतील लोकांवर अतिशय अन्याय, अत्याचार केले गेले. पोचीराम कांबळे यांना गावगुंडांनी हाल हाल करुन ठार मारले. ते इतके भयानक होते की - २०० लोकांच्या जमावाने पोचीराम कांबळेला पकडून त्यांचा अमानुष छळ करुन पहिला त्यांचा हात काढण्यात आला व गावगुंड पोचीरामला मारत मारत म्हणायचे - “सांग पोच्या तू जय भिम करणार का?”  पोचिरामला इतक्या वेदना होत असताना ही म्हणाला - “ जय भिम म्हणणार...” नंतर दुसरा हात काढला दोन हात काढल्या नंतर एक पाय काढला तरी पोचीराम चिडून `जय भिम‘  म्हणून ओरडायचा नंतर दुसरा ही तोडला. तेंव्हा पोचीरामचे रक्त सांडलेले होते. पोचीरामचे दोन हात व दोन पाय मराठवाड्यातील हैवानांनी तोडले होते. तेवढ्यात ही पोचीराम जय भिम म्हणत होता, पोचिराम याचे फक्त तोंड राहिले होते. त्यांनी बजावले, “पोच्या, आता तुझे फक्त मुंडके राहिले आहे. सांग जय भिम करणार का? "जय भिम” म्हणून बोलत असतांना त्या हरामखोरांनी तलवारीने मान छाटताच "जय भिम" हा शेवटचा नारा बोलला. सर्व रक्त जातीयवादी गुंडांच्या अंगावर उडून पोचीरामच्या रक्ताने अनेक पँथर निर्माण झाले. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील टेंभुर्णी ह्या गावी पशुला ही लाज वाटेल असा प्रकार केला होता. जनार्दन मेवाडे यांना ही हाल हाल करुन ठार केले होते. असे असताना ही मराठवाड्यातील नामांतराबाबत ची दंगल पत्रकारांना लिहू देखील वाटत नव्हती. दंगल ग्रस्त भागात मुंबईतून दलित पँथरचे नेते प्रा. अरुण कांबळे, रामदास आठवले आले, तेव्हा वातावरणात पँथर काय करतील? हे सांगता येत नव्हते. सर्व लोकांना ह्या नेत्यांनी शांतता ठेवण्यात यावी असे सांगितले.

प्रा. अरुण कांबळे म्हणाले -
“सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची ।
संपली नाही लढाई नामांतराच्या लढ्याची ।।"

ह्या गंभीर परिस्थितीमुळे पँथरला शासन घाबरुन राहत होते. गंगाधर गाडे यांच्या अटकेमुळे सर्व पँथर चळवळीचा भार तरणा बांड बिबळ्या वाघ रामदास आठवलेंवर पडला. रामदासच्या अंगात पँथर संचारला होता. रामदास आठवलेंना मुंबईत घरदार नव्हते, सिध्दार्थ हॉस्टेल रु.नं. ५० हे त्यांचे निवास स्थान व राज्याचे पँथर कार्यालय होते. रामदास आठवलेंचे लग्न झाले नव्हते. तरणा बांड बिबळ्या वाघाच्या ढांगा खेड्या - पाड्यात पँथर तयार करण्यास जात होत्या. रिपाइंचे ऐक्य टिकले नाही. रामदास कॅबिनेट मंत्री झाले शरद पवार यांनी आठवलेंची ताकद ओळखून १७ वर्षे सत्तेत घेतले. मंत्री असतांना रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री शरद पवार यांना विश्वासात घेऊन १४ वर्षांचा दलितांच्या अस्मितेचा नामांतराचा प्रश्न आता तरी सोडविण्याचे साकडे घातले. १४ जानेवारी दिवस निवडला आणि राज्यातील प्रत्येक पोलीस ठाणे वरिष्ठांना आदेश दिले. पोलिस पाटील व सरपंचांची बैठक `सह्याद्रीवर’ बोलविली व तेथे सांगितले की एका ही आंबेडकरी लोकांचे घर जळताना दिसले नाही पाहिजे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक गावच्या पोलीस पाटील व सरपंचावर असणार विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मंजुर करताच संपुर्ण आंबेडकरी वस्त्यांत दिवाळी साजरी झाली.

दरवर्षी १४ जानेवारी रोजी भोळी भाबडी आंबेडकरी जनता या गेटची मनोभावे पूजा करते. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत. या श्रद्धेने ते गेट पुढे नतमस्तक होतात. एवढे मोठे पावित्र्य या गेटला दिले असेल तर मग आज ही जनता किंवा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते. विद्यापीठ प्रशासनाला ही गेटच्या ४० व्या वर्धापन दिनाचे भान का बरे नसावे? वर्षातून केवळ तीन वेळेसच या गेटला रोषणाई केली जाते. त्यापैकी एकदा १४ जानेवारी रोजी नामांतर वर्धापन दिना निमित्त. दुसरे १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य म्हणून आणि तिसरे म्हणजे २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचा वर्धापन दिन असतो. तेव्हा चार तपांचा साक्षीदार असलेल्या या गेटच्या उभारणीचा आज वर्धापन दिन होता. केवळ सभा-समारंभ घेतल्यावरच ती वास्तू पुनीत होते असे नव्हे तर किमान या दिवशी सदरील वास्तूची आठवण जरी केली तरी ते पुरेसे आहे; पण ते या गेटच्या नशिबी नाही, हे दुर्दैव!

या गेटच्या उभारणीचा इतिहास ही तसा रंजनकारकच आहे. ज्या अभियंत्याने ही सुंदर वास्तू अवघ्या ३५ दिवसांत उभी केली ते विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीप सिंग छाबडा आज ही हयात आहेत. सध्या त्यांचा सिंधी कॉलनीत निवास आहे. या संदर्भात ते सांगतात की - डॉ. आर. पी. नाथ यांनी १९७१ मध्ये ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात होणार्‍या पदवी दान समारंभासाठी त्यांनी तत्कालीन गव्हर्नर नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित केले होते. या समारंभा पूर्वी विद्यापीठ गेटची उभारणी करावी, असा डॉ. नाथ यांचा आग्रह होता. एवढय़ा अल्पकाळात एवढी मोठी वास्तू उभारण्यास तेव्हा शहरातील एका ही वास्तू विशारदाने अनुकूलता दर्शविली नव्हती. मग हे आव्हान विद्यापीठाचे निवासी अभियंता कुलदीप सिंग छाबडा यांनी स्वीकारले. त्यांनी विद्यापीठातील मजूर सोबत घेऊन लोड बेअरिंग या संकल्पनेतून ही वास्तू उभारण्यास सुरुवात केली. ६ नोव्हेंबर १९७१ ला या गेटच्या उभारणीचे काम सुरू केले अन् १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर अशा वास्तूचे लोकार्पण झाले. विद्यापीठाचा लोगो या वास्तू द्वारे साकारला आहे. यामध्ये अजिंठा येथील बौद्ध शिल्प ही साकारण्यात आलेले आहे. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट एवढय़ा रुंद आहेत.

जोपर्यंत हे विद्यापीठ आहे तोवर त्याचे प्रवेश द्वार आहे. हेच प्रवेश द्वार आमच्या सारख्याना आणि आमच्या नंतर येणार्‍या कैक पिढ्यांना त्या जुलूमाची, त्या अत्याचाराची, त्या त्यागाची, शौर्याची आणि झुंजार लढ्याची आठवण करून देत राहील. त्यातूनच नवे चैतन्य कायम संचारत राहील. नामांतर लढ्याची आठवण आंबेडकरी समाजाला सदैव स्फूर्ती देत राहो.

◆ नामांतर विरोधी घटना :

भीमरायाच्या नावासाठी,
रक्त सांडले राव ।
असेल कोणी माईचा लाल,
तर पुसून दावा नाव ॥धृ॥

असे क्रांती गीत पण जेव्हा आम्ही विचार करतो का? बाबासाहेबांच्या लेकरांना त्यांच्या नावासाठी रक्त सांडावे लागते. ज्या बाबासाहेबांनी या देशाचे संविधान लिहून तमाम भारतावर एका प्रकारे उपकार केले आहेत. त्याच भारतात त्यांची उपेक्षा का व्हावी? खर तर या नामांतरासाठी रक्त का सांडावे लागले? हेच समजत नव्हते. कारण तेव्हा आम्ही लहान होतो, पण जसे जसे शिक्षणा बरोबर इतिहासाची समज यायला लागली आणि या नामांतराचे गुपित समजले गेले. नामांतराला या महाराष्ट्रात खूप विरोध झाला इतका कि काही हुतात्मा झाले काय गरज होती? त्यांना आपले जीव गमवायची पण बापाच्या नावासाठी लढणारे हे शूर लढवय्ये होत. त्यांची नावे अशी आहेत. : गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे, अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर, ज्ञानेश्वर साखरे, डोमाजी कुत्तरमारे, चंदर कांबळे, जनार्दन मवाळे, शब्बीर अली काजल हुसैन, रतन मेंढे, सुहासिनी बनसोड, नारायण गायकवाड, अब्दुल सत्तार, दिवाकर थोरात, जनार्दन मस्के, भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे, प्रतिभा तायडे, गोविंद भुरेवार, शरद पाटोळे, मनोज वाघमारे, कैलास पंडित, रतन परदेसी.  बाबांच्या या लेकरांना प्रथम त्रिवार ।

आज बाबासाहेबांच्या लेकरांना बाबांच्या नावासाठी संघर्ष करावा लागतो. काय दुर्भाग्य आहे? या भारत भूमीचा  सुपुत्र ज्याने साऱ्या जगाला दाखवून दिले कि - भारत देश या जगात किती महान देश आहे? पण त्याचा महात्माच्या नावासाठी संघर्ष करावा लागणे हेच मनाला पटत नाही. इतिहास साक्षी आहे कि - बाबासाहेबांनी किती यातना सहन केल्या केवल या भारत देशासाठी पण या भारताने त्यांना काय दिले? त्यांच्या लेकरांना त्यांच्या नावासाठी लढावे लागणे एकजूट हि खरी संघटना असते पण आम्हाला ती कधी समजली नाही.

मध्यंतरी दलित पँथर उदयास आले. मोठी गर्जना केली. बाबांच्या नावाने त्याकाळी पँथरच्या डरकाळीने सारा भारत देश हादरला होता. पण हाच पँथर शिवसेनेच्या जवळ गेला आणि मांजर होवून बसला नामांतराच्या वेळी सेनेच्या अध्यक्षाने विषारी फुत्कार टाकले. त्याने ह्या बाबासाहेबांच्या समाजाला म्हटलं होत - "यांच्या घरी नाही पीठ ते कशाला मागतात विद्यापीठ?" आज ते हयातीत नाहीत. पण आजला ते जिवंत असते. तर मात्र नक्की कि आज त्याना ही वाटल असत. तेव्हा मी चुकलो होतो आणि त्यांनी मरते शेवटी काबुल केले. रामदास आठवलेला आपल्या युतीत घेतलं, कारण जाणीव झाली कि बाबासाहेबांच्या लेकरांना जर साथ केली. तर आपण सत्ता काबीज करू पण उद्धव नि त्यावर पाणी टाकले त्याला कारणीभूत ठरली.

सध्याची महानगर पालिका निवडणूक आज ही दादरच्या नामांतर होण्याला काहींचा विरोध आहे. पण ते जाहीरपणे विरोध नाही करत बाबांच्या लेकरांना आता गरज आहे. एकमेकांची साथ देण्याची शेवट कसा ही झाला तरी जेव्हा मराठवाडा विद्यापीठला बाबांचे नाव मिळाले. त्याची ही एक गोष्ट आहे नामांतराच पहिली गोष्ट कुणी काढली असेल? तर ती शरद पवार यांनी पुण्यातील नवीन पेठेत असणाऱ्या समाजवादी भवनात असणाऱ्या कार्यक्रमात शरद पवार यांनी नामांतराची पहली गोष्ट केली. त्यावेळी मराठवाडा मध्ये गोविंद श्रॉफ यांचा प्रस्थ होत आणि ते समाजवादी विचाराचे होते. त्यांना मराठवाड्यात शह देण्यासाठी पवारांनी त्या सभेत एक गुगली टाकली. ती म्हणजे पवार त्या कार्यक्रमात भाषण करताना म्हणाले - बाबासाहेबांच्या पद स्पर्शाने मराठवाडा भारावलेला आहे. तर आपल्याला मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांच नाव द्यायला काय हरकत आहे? हे शरद  पवारांचं वक्तव्य आहे. त्यानंतर मात्र नामांतराची लाट उसळली आणि त्याच नामांतराला शरद पवारांनी विरोध केला. ज्यांनी नाव सुचवले त्यांनीच नावाला विरोध केला. जोडीला बाल ठाकरे यांनी तर कहरच केला. म्हणे - "यांच्या घरात नाही पीठ हे कशाला मागतात विद्यापीठ?" जणू हे त्यावेळी बाबांच्या समाजाला पीठ पुरवत होते. त्यांनी त्यावेळी पिठाची गिरणी चालू केली असावी, म्हणून कदाचित त्यांना असे जाणवले असणार कि यांच्या घरी पीठ नाही. आज ही हाच मनुवादी चेहरा पांघरून काही लोक बसले आहे, अश्या लोकांना इशारा आहे. येणारा काळ हा बाबांच्या लेकरांचा आहे, हे धान्यात ठेवा. मराठवाडा तर झालाच आता दादर हि करू चैत्यभूमी.

◆ मकर संक्रांत आणि बौद्ध समाज :

हिंदू धर्मात "मकर संक्रांत" हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण मानला जातो. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येते. फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती" ग्रंथ वाचला कि लक्षात येईल कि - असुर कोण होते? काल्पनिक बाबी कश्या रचल्या गेल्या आणखी बरेच काही माहिती त्या ग्रंथात मिळते.

काही लोक मकर संक्रांतीचे महत्व असे हि सांगतात कि - महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात. तो सण म्हणजे "मकर संक्रांत" सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक हिंदु सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो. भारतात बहुतेक भागात हा सण साजरा केला जातो. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. स्त्रिया मृत्तिक घटाचे दान देतात व देवाला तीळ, तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांती निमित्त सौभाग्यपण लुटतात. हे सर्व हि गोष्टी मूर्खपणाचा आहेत. लोक स्वतःला फसवून घेण्यात मग्न दिसतात.

काही लोकांच्या मते - संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्ति वर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी. हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेह संबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. "तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला" या शब्दात केवळ अर्थ भरला आहे, असे हिंदूंना म्हणजे मूर्खाना वाटते. बौद्ध लोकांना सांगायचे आहे कि - हिंदू जनतेशी संगती करू नका. कारण ते जनतेला फसवून भिकारी करून सोडतात. हिंदू तसेच इतर लोकांना सांगायचे आहे कि - हवे ते खाद्य पदार्थ खा. निरोगी व्हा. व्यायाम करा. स्नेह मैत्री, बंधुभाव, एकता निर्माण करायची असेल तर स्वतःचे मन निर्मल करा. जाती पोटजाती - धर्म वैगेरे उकिरड्यात टाकून द्या. माणुसकीने वागा. एकमेकांना मदत करा. जर आमचे म्हणणे पटत नसेल तर आम्ही काय करायचे ते आमचे आम्ही पाहू.

बौद्ध बांधवाना सांगायचे आहे कि - आपण बौद्ध असल्यास हिंदूंशी संबध ठेवणे उचित नाही. डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या "अभिनव बौद्ध आचारप्रणाली" पुस्तकात जे काही लिहले आहे ते लोकांचे हित जाणून लिहले आहे आणि ते तर्कशुद्ध आहे. ते लिहतात कि - "आमचे आचरण बुद्धिवादीच असले पाहिजे, कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत.

धम्माचे उपासक असणे म्हणजे काय? धम्माचा उपासक कोणाला म्हणावे? धम्माच्या उपासकाचे आचरण कसे असावे? धम्माच्या उपासकाचे विचार कसे असावेत? या आणि अशाच इतर ही प्रश्नांच्या संदर्भात आपण सर्वांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असे मला वाटते. तेव्हा या दिशेने काही पावले टाकण्याचा आपण प्रयत्न करू.

आम्ही बुद्धिवादी आहोत. कोणी काहीही सांगावे आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवावा असे आम्ही नाही. कोणाच्या ही बोलण्यावर वा लिहिण्यावर आम्ही डोळे मिटून विश्वास ठेवीत नाही. आम्ही विचार करतो. लिहिलेले वा बोललेले कोणतेही वचन बुद्धिवादाच्या कसोटीवर उतरते की नाही ते आम्ही काटेकोरपणे पाहतो. तर्काच्या कसोटीवर उतरते ते खरे! सर्वांच्याच कल्याणाचा उद्देश बाळगते ते खरे! या आमच्या भूमिकेला आम्ही आमचे प्रमाण शास्त्र मानतो. या प्रमाण शास्त्राला आम्ही आंबेडकर प्रमाण शास्त्र असे आदराने मानतो, आमचे वागणे आणि बोलणे या प्रमाण शास्त्राशी एकनिष्ठ राहिले पाहिजे यासाठी आम्ही जिवाचा आटापिटा करतो कारण आम्हीं धम्माचे उपासक आहोत, धम्म बुद्धिवादीच आहे. 'एहिपस्सीको धम्मः' असे बुद्धाचे म्हणणे आहे. याचा अर्थ - मी म्हणतो म्हणून एकदम मान्य करू नकोस. कोणीही काहीही म्हटले की - डोळे मिटून एकदम मान्य करू नकोस, विचार कर, चिकित्सा कर, त्यातील उपकारकता आणि विघातकता तपासून पाहा. चुकीची गोष्ट खरी म्हणून स्वीकारू नको. आपल्या विचार शक्तीचा अपमान होईल असे वागू नको. तो तुझ्या माणूस असण्याचाच अवमान होईल, म्हणून कोणत्याही वचनाची, कोणत्याही गोष्टीची चिकित्सा करूनच स्वीकार कर असे बुद्धाचे सांगणे आहेया सांगण्यानुसार आम्ही जगतो म्हणून आम्ही धम्माचे उपासक आहोत. असे आपणाला सांगता यायला हवे.

आम्ही इहवादी आहोत. इहवादी असणे म्हणजे 'सेक्युलर' असणे! बुद्धिवाद आणि इहवाद या एकाच वैचारिक कुटुंबातल्या गोष्टी आहेत. आम्ही पूर्व जन्माचा खोटा विचार मानीत नाही. आम्ही पुन र्जन्माचा खोटा विचार मान्य करीत नाही. आम्ही माणसाला पृथ्वीच्या पाठीवर मिळाले तेवढेच जीवन खरे मानतो. जन्मापासून मृत्यू पर्यंतचे माणसाचे जीवन आम्ही खोट्या चौकटीत बसवित नाही. कारण तसे केले की ईश्वर जाती आणि वर्ण या सर्वच गोष्टी पाठीशी लागतात. आम्ही या सर्वच गोष्टी नाकारतो आणि पृथ्वीच्या पाठीवरचे माणसाचे जगणेच सुंदर व्हावे, अर्थपूर्ण व्हावे यासाठी आम्ही धडपडतो कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा संगितल्या. या बावीस प्रतिज्ञांमध्ये धम्माच्या उपासकांची विचार संहिता ही आहे आणि आचार संहिता ही आहे. आम्ही कोणताही देव वा देवता मानत नाही. अशा कोणत्या देवाच्या यात्रेला ही आम्ही जात नाही. अशा कोणत्या देवी - देवाची पूजा ही चुकून ही करीत नाही. तसे आमच्या डोक्यात ही येत नाही. आमच्या घरात बुद्धाची मूर्ती असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्तीं वा फोटो असतो. असलाच तर शाहू महाराज, जोतीबा फुले. सावित्री माई, गाडगे बाबा, रमाई यांचे फोटो असतात पण कोणाही देवीचे वा देवाचे फोटो आमच्या घरी नाहीत. आम्ही अशा कोणत्याही देवाला मानत नाही. देव ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. एवढेच नाही तर कोणत्याही बाबा - बुवाला आम्ही अजिबात मानीत नाही. त्यांच्या तीर्थस्थळी जात नाही. आम्ही अशा कोणाची ही पूजा वा आराधना करीत नाही किंवा कोणाला आम्ही नवस करीत नाही. कोणा देवी - देवतेसाठी आम्ही उपास करीत नाही. नवस कोणाला करायचा? कोण काय देतो? उपास कशासाठी करायचा? देवाच्या नावाने उपास केल्याने काहीही होत नाही. त्यामुळे आम्ही असे काहीही करीत नाही. इतर धर्माच्या कार्यक्रमांमध्ये, यात्रा - जत्रा मध्ये आम्ही जात नाही. आम्ही घरीच राहतो. मुलांना बुद्धाचा धम्म यावेळी सांगतो. आम्ही इतर कोणत्याही धर्माचे सण करीत नाही. दिवाळीला वा इतर सणांच्या वेळी आम्ही रोशणाई करीत नाही.

आम्ही होळी पेटवीत नाही. रंग पंचमीला कोणाच्या अंगावर रंग टाकीत नाही वा कोणालाही आमच्या अंगावर रंग टाकू देत नाही. कारण इतर लोकांना हे माहीत असते की हे लोक धम्माचे उपासक आहेत आणि त्यांच्या निष्ठेत या गोष्टीत बसत नाहीत म्हणून असे कोणतेही लोक या अशा निमित्तीनी आमच्याकडे येत नाहीत आम्ही असे स्पष्ट आहोत. आत एक बाहेर एक असे आम्ही नाहीत. आम्ही धम्माचे आम्ही खोटे बोलत नाही. कोणाला फसवित नाही. कोणाचे आम्ही उणे चिंतीत नाही. कोणाचे अहित व्हावे वा कोणाचे अहित करावे असे आमच्या डोक्यात ही येत नाही. जगण्यासाठी तंबाखू, बिडी - सिगरेट वा दारू यांची कुठली ही गरज नाही. उलट या गोष्टी व्यक्तीच्या आणि समाजाच्या ही आरोग्याला अत्यंत विघातक आहेत. या सर्वच गोष्टीमुळे व्यक्तीची व समाजाची नैतिक, आर्थिक शारीरिक आणि मानसिक हानीच होते. म्हणून अशा कोणत्याही मादक पदार्थाचे सेवन आम्ही करीत नाही. आम्हीही अशा विघातक गोष्टीचे सेवन करीत नाही आणि आमच्या सहवासात येणाऱ्या इतरांनी ही अशा गोष्टीचे सेवन करू नये, यासाठी आम्ही कटाक्षाने प्रयत्न करीत राहातो कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत.

आम्ही चांगला विचार करतो. सर्वांच्याच चांगल्याचा विचार करतो. आम्ही विश्वाच्या, मानवी जीवनाच्या कल्याणाचे चिंतन करतो. त्यासाठी आम्ही चांगले साहित्य वाचतो. बुद्धाचे विचार अधिकृतपणे सांगणारे साहित्य आम्ही वाचतो. आमच्या मुला - बाळांना ते वाचायला लावतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आम्ही मुळातून वाचतो आणि बाबासाहेबांच्या विचारांचा योग्य, अधिकृत अन्वयार्थ लावणारे साहित्य ही आम्ही वाचतो. आमच्या प्रत्येकाच्या घरी आमची ग्रंथालये आहेत. दर महिन्याला किमान शे - दीडशे रुपयांची चांगली पुस्तके आम्ही विकत घेतो. घरात या पुस्तकांचे वाचन करतो. त्यावर चर्चा करतो. ग्रंथांचे महत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कळले होते त्यामुळेच आम्हाला ही ग्रंथ हे आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत असे वाटते.

आम्हाला असे वाटते की - गंभीर विचार प्रवर्तक ग्रंथांच्या वाचनामुळे डोके तल्लख राहते. बुद्धीला सारखी धार येत जाते. विचार करण्याच्या प्रक्रियेला एक शिस्त लाभते. आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वालाच एक डौल प्राप्त होतो. एक छान रेखीवपणा प्राप्त होतो. एक जबाबदार मूल्य व्यवस्था असे रूप आपल्या व्यक्तिमत्त्वाला प्राप्त होते ही आमची धारणा आहे आणि प्रज्ञावंतांचा तसेच करुणावंतांचा समाज निर्माण होण्यासाठी या सर्वच गोषीची गरज आहे असे आम्हास वाटते. म्हणून आम्ही ग्रंथ विकत घेतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचार सूत्रे निष्ठापूर्वक समजावून सांगणारे खऱ्या आंबेडकरवादी साहित्यिकांचे साहित्य आम्ही आवर्जुन विकत घेतो आणि जबाबदारीने वाचतो. इतर काही गोष्टीवरचा थोडा थोडा खर्च कमी करून आम्ही पुस्तके घेतो. आमची संस्कृती आंबेडकर संस्कृती आहे आणि तिचा एक अर्थ वाचन संस्कृती असा ही आहे. तिचाच एक अर्थ चिकित्सा संस्कृती असा ही आहे. आम्ही या संस्कृतीचे निघुवंत पाईक आहोत कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत.

आम्ही धम्माचे उपासक आहोत म्हणून उगीचच उधळ - माथळ आम्हाला अजिबात मान्य नाही. नामकरण, लग्न अशा कोणत्याही कार्यक्रमात उगीचच पैसा उधळणे आम्हाला आवडत नाही. आम्ही हुंडा घेत नाही. कोणाला देत नाही. कोणाला लुटत नाही. हुंडा घेणे म्हणजे माणसाला छळणे आणि धम्मात माणसाला छळणे बसत नाही. आमचे इतके हज़ार लोक येतील इतक्या बसेसचा खर्च द्या, अशा महागड्या वस्तू द्या हे सर्वच प्रकार आम्ही करीत नाही. कारण हे धम्माच्या विरोधात आहे. लग्नातील सर्वच प्रकार कमीत कमी खर्चात व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हा वाचणारा पैसा आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो. इतर गरीब विध्यार्थ्यांना जमेल तेवढी मदत करतो. पैसा फार महत्त्वाचा आहेजो पैसा वाचवतो त्याला पैसा वाचवतो. तेव्हा पैशाचा योग्य वापर कुठे आणि कसा करावा. ते आम्हाला चांगले कळते कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत.

विहारांमध्ये गोर गरिबांच्या समाजाला छळणाच्या प्रश्नांची चर्चा आम्ही करतो. बेरोजगारीची, महागाईची, शिक्षणातील प्रगतीची वा गळतीची, विध्यार्थ्यांच्या गुणवत्तेची, त्यांच्या अभ्यासाची चर्चा अत्यंत गंभीरपणे करतो. आपली मुले खूप मेहनत घेतील कथंचे डोंगर उपसतील. आपली बुद्धी - शक्ती पणाला लावतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ज्ञान - विज्ञानाच्या क्षेत्रात, माहिती - तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणि तत्त्वज्ञानाच्या तसेच साहित्याच्या क्षेत्रात आमची मुले सूर्यासारखी तळपावीत असा ध्यास आम्हाला लागलेला आहे. त्यामुळे उगीचच भलभलत्या गोष्टीवर, खर्च करण्याची गरजच नाही असे आम्हाला प्रखरपणे वाटते आणि त्याप्रमाणे आम्ही वागतो, कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बुद्धिवादी विचारवंत आहेत. त्यांच्या समतेच्या आणि बुद्धिवादाच्या भूमिकेत संघ, बीजेपी व शिवसेना आणि संघाची समरसता या गोष्टी बसतच नाहीत. त्यामुळे आम्ही या सर्वच गोष्टीपासून कटाक्षाने दूर राहतो. आपल्यातल्या काही मंडळींना समरसता आवडते. ते समरसतेचा सतत पुरस्कार ही करतात. पण त्यांनी असा समरसतेचा पुरस्कार करणे आम्हाला आवडत नाही. आम्ही मात्र अशा समरसते तेपासून जाणीवपूर्वक दूर राहतो, कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत.

धम्माला कर्मकांडाचे रूप येऊ नये. याची आम्ही खूप काळजी घेतो. परित्राण पाठ करणे हे आम्हाला बुद्धच्या बुद्धिवादात न बसणारे प्रकरण वाटते. हाताला धागे - दोरे बांधणे हा महायानाचा प्रकार आम्हाला वाटतो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महायान नाकारलेलाच आहे. बुद्धाचे बुद्धिवादी आणि समतावादी तत्त्वज्ञान हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. इतर कर्मकांडात आम्हाला गुंतायचे नाही. याचे कारण इतर धर्माची कर्मकांडे आणि धम्म यात मूलभूत तफावत आहे. आम्ही सतत परिवर्तन शील लोक आहोत. काळाचे वाचन करीत, काळाला बाकवित आणि त्याला योग्य दिशा देण्याचा निर्धार करीत जगणे ही आमची जीवन शैली आहे. त्यामुळे कर्मकांड म्हणजे साचलेपणा होय असे आम्हाला वाटते. कर्मकांड प्रवाहित्व नष्ट करते. माणसाच्या डोक्याला एका ठिकाणी थांबवून ठेवते म्हणून आम्ही कर्मकांडाला थारा देत नाही. आम्ही युद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार जगणारे लोक आहोत, कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत

आम्ही कोणतीही अंधश्रद्धा मानीत नाही. आम्ही जाती - पोट जाती पाळत नाही. आम्ही कुठल्याही प्रकारची विषमता मानीत नाही. आम्ही अत्यंत सजग आहोत, जबाबदार आहोत. गोर गरिबांच्या दुःखांचे आम्हाला चांगले भान आहेया दुःखांपासून लोकांना मुक्ती मिळावी असे आम्हाला मनापासून वाटते. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही. अख्खे मानवी जीवन सुखी व्हावे, समजूतदार आणि प्रबुद्ध व्हावे, प्रज्ञानी व्हावे असे आम्हाला मनापासून वाटते, कारण आम्ही धम्माचे उपासक आहोत."

वरील लिखाण हे प्रकरण १ मधले आहे. शेवटच्या प्रकरणात त्यांनी कोणते दिन विशेष म्हणून पाळावेत? हे लिहले आहे. तरी बौद्ध आंबेडकरी जनतेने वरील बाबी लक्षात घेता मकर संक्रात साजरा करु नये. त्याऐवजी आपण नामांतर दिवस साजरा करूया. अंधश्रद्धा, कर्मकांडांना मूठमाती देऊया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या प्रमाणेच - "आपले हक्क मागून मिळत नसतील तर हिसकावून घ्यावे लागतात." आणि ते आपण पुढे हि नक्कीच मिळवू. कारण शौर्या पुढे संक्रातीची हि फाटते.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV : 7738971042
(Use Only WhatsApp Massage,.)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा