मंगळवार, २४ डिसेंबर, २०१९

● भीमा कोरेगाव येथे जाताना अनुयायांनी घ्यायची वैचारिक गरुडझेप

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         भीमा कोरेगाव येथे जाताना अनुयायांनी
                घ्यायची वैचारिक गरुडझेप
                  लेखक - यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

सप्रेम जयभीम,
आपणास कळविण्यात येते की - आपण जर भिमा कोरेगावला जात असाल तर आम्ही सुचवल्याप्रमाणे खबरदारी घेण्यास कष्ट घ्यावे आणि महाराष्ट्र मधील विविध जिल्हा मधील जाणाऱ्या अनुयायांना ही सुचना द्यावी.

१ जानेवारी रोजी आपण काही जण भीमा कोरेगाव येथे जात असतो. महाराष्ट्र राज्यामधील मधुन लाखो भिम बांधव रेल्वे तसेच विमान तसेच खाजगी वाहने घेऊन विजयी स्तंभला अभिवादन करण्यास येतात. पण गेल्या वेळेस १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव ठिकाण लगत झालेला दंगली नंतर अगदी जोमाने भिम बांधव १ जानेवारीला विजयी स्तंभ अभिवादन करण्यास येतील. हे आम्हास ठाऊक आहेच. अनेक लोक भिमा कोरेगाव ठिकाणी आले होते. प्रशासनाने देखील खबरदारी घेतली होती. पण लोकांची संख्या जास्त असल्याने गैरसोय होणे साहजिक होते. त्यामुळे या परिस्थितीची ही दखल घेता आपण आपल्याच गैरसोयीचे निराकरण करूया. 

आठ किलोमीटर अंतरावर गाड्या पार्किंगसाठी जागा निश्चित केला केल्याने जेष्ठ नागरिक व स्रिया तसेच लहान मुले आठ किलोमीटर चालत जाताना आढळत होते. त्या ठिकाणी दंगल असल्याने ठिकाणी अनेक दुकाने बंद होती. त्यामुळे कृपया आपण येताना आपला बरोबर जेवणाचा डब्बा बरोबर आणा. तसेच त्याबरोबर पिण्याचे पाणी असलेली बाटली किंवा पॅकेट आणावे. चैत्यभूमी परिसरात जशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते. तशी पुणे जिल्ह्यात केलेली नसते.

सध्या हिवाळा सुरू आहे. पुणे जिल्ह्यात डिसेंबर मध्ये प्रचंड थंडी असते. त्यामुळे आपण न दिसणार असे स्वेटर घालावे. (दिसत असेल तरी हरकत नाही.) जर आपण सकाळी गाडीतून निघाला असाल तर तुम्ही सोबत येताना ब्लॅंकेट, चादर तसेच चटई घ्या. फ्लॅशलाईट (म्हणजे अंधारात वापरायची लाईट) कारण जास्त वेळ झाला तर किंवा अंधार पडल्यास उपयोग होईल. पुणे मधील मंडपात किंवा कोणताही बुध्द विहार किंवा संस्थाचा कार्यालयात विश्रांती घेता येईल. आणि सकाळी विजय स्तंभावर अभिवादन करून परत घरी निघता येईल.

भीमा कोरेगाव येथे निघताना मोबाईल फुल्ल चार्जेस करून घ्या. मध्येच मोबाईल बंद पडल्यास संकट त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे आपल्याकडे पॉवर बँक किंवा दुसरी एखादी बॅटरी असेल तर सोबत घेऊन जाण्यास हरकत नाही. गाडीत असतानाच एका वहीत आपापले नंबर सर्व अनुयायांनी नोंदवून ठेवा. मोबाईलचे नंबर आपला सर्व सहकार्य करणाऱ्या लोकांना लिहून द्यावा. कुठे ही अडकल्यास किंवा काही अडचण आल्यास संपर्क करता येईल. तसेच अपंग व्यक्तींना सोबत ठेवावे. अस्थिव्यंग किंवा कर्णबधिर अपंग व्यक्तींना एकटे सोडू नये. पुणे शहरातील अनुयायांनी महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्हा मधुन आलेल्या लोकांना पुणे स्टेशनवर थांबवून आलेला रेल्वे गाड्याबाबत माहिती देऊन त्यांना रेल्वे गाडीत बसण्यासाठी मदत करावी.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, पुणे, सांगली, नाशिक, सातारा, कोल्हापूर इतर अनेक जिल्हे येथून येणाऱ्या अनुयायांना खाजगी वाहने आणि बसेस घेऊन भिमा कोरेगाव येणाऱ्या अनुयायांनी आपल्या गाडी किंवा बसेस मध्ये आपल्या बॅगी ठेऊन न जाता सोबत घेऊन जाव्यात. आपण जर डब्बे आणले नसतील तर काही सुक्के खाद्य पदार्थ सोबत आणावेत. आपण फरसान, फळे, बिस्कीट वैगरे आणून खाऊ शकता. सोबत पाण्याची बॉटल तरी आणायला विसरू नका. भीमा कोरेगाव येथे आपण येतो. त्या ठिकाणी अनेक पुस्तके, मुर्त्या, स्टॉल खाद्य पदार्थ वैगेरे लागतात. आपण काहींना काही खरेदी कराल. त्यामुळे आपण जाड प्लास्टिक किंवा कापडी पिशवी तरी सोबत घ्यावी.  महिलांना नेहमी सांगितले जाते की, गर्दीच्या ठिकाणी दागिने जास्त घालून येऊ नये. गर्दीचा फायदा घेऊन चोरी होऊ शकते किंवा हरवू शकतात.

भिमा कोरेगाव जाताना किंवा त्या ठिकाणी पोचल्यास कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा देऊ नये. आपण अगदी शांततेत प्रवास करा. लहान मुलांना घेऊन जाताना व्यवस्थित संभाळून घेऊन जावे. मुलांकडे आपला नंबर देऊन ठेवा. हरवल्यास पोलिसांमार्फत संपर्क करण्यास मदत होईल. जेष्ठ नागरिकांना उठता, बसता हाताला धरून मदत करा. इतर कोणत्याही व्यक्तीला सहकार्य करा. आपण शांत चित्ताने व शिस्तीने विजयी स्तंभला मानवंदना घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात करावी. धन्यवाद!

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
    यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
    "दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ फेसबुक पेजवर एकदा नक्की भेट द्या.

• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ YATIN JADHAV : 9967065953 ◆

सादर कोणत्याही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ BSNET NEW & OLD HELPLINE ◆
     7738971042 or 7718962406
 (Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (म्हणजे समूहात) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

             रमेश भोसले : ९७७३३३८१४४
          कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील  
            क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

● संविधान निमिर्ती आणि आपण केलेली लोकशाहीची व्याख्या (लेख)

● आमचे मित्र "सारिष डोळस" यांची मुलगी "भूमिका डोळस" हिला संविधान विषयावर संशोधणात्मक निबंध हवा असल्यामुळे हा प्रपंच प्रयत्न म्हणून माझ्या तर्फ करण्यात आला.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         ● संविधान निमिर्ती आणि आपण
             केलेली लोकशाहीची व्याख्या
                 लेखक :- यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         आज शासन म्हणजे लोकशाही अशी साधी सोपी लोकशाहीची व्याख्या असली तरीही लोकशाही ज्या चार खांबावर उभी आहे, ते खांब मजबूत असणे गरजेचे आहे. नाहीतर समाज विघातक कृत्य, अराजकता, विध्वंसक वर्ग, संघर्ष, सामाजिक दुष्परिणाम पाहायला मिळाल्या शिवाय राहणार नाही. हे आपणास माहीतच आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही लक्षात घेतलं पाहिजे. संविधान नेमकं काय आहे? लोकशाही म्हणजे नेमकं काय आहे? त्याची आपण चिकित्सा करूया.

संविधान म्हटले की प्रथम ओठी नाव आंबेडकरांचेच येईल. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, घटनाकार म्हणून सर्वत्र ज्ञात आहेत. संविधान निमितीसाठी कोण कोणाला काय कष्ट घ्यावे लागले याकडे वळूया. भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्व प्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. ११ डिसेंबरला डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरुंनी घटना समितीत मांडलेल्या उद्देश पत्रिकेच्या आधारे घटनेचा सरनामा / प्रास्ताविक तयार करण्यात आले. पुढे त्या प्रास्ताविकेच्या चौकटीतच घटनेची निर्मिती करण्यात आली. घटना समितीने घटना निर्मितीच्या कामांसाठी ८ मुख्य समित्या व १३ उपसमित्यांची रचना केली. 

२९९ सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामे वाटुन देण्यात आली. घटना समितीने राज्य घटना तयार करणे, देशासाठी कायदे तयार करणे, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे, भारताचा राष्ट्र ध्वज, राष्ट्र गीत, राष्ट्र गान स्विकृत करणे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाल्यानंतर १९४६ ला कॅबिनेट मिशनची स्थापना झाली. मिशनच्या शिफारशींनी भारताची राज्य घटना समिती तयार करण्याची पद्धत ठरली. राज्य घटना तयार करण्यासाठी प्रातिनिधिक संविधान समिती निर्माण झाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. त्या अंतर्गत बावीस समित्या होत्या. त्यापैकी अतिशय महत्त्वाची समिती मसुदा समिती होती. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. घटनाकारांनी सांसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. ही शासन पद्धती जनतेच्या संमतीवर आधारलेली असते आणि त्यात विचार, आचार, संचार, उच्चार व संघटनेचे स्वातंत्र्य असते.

मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये ७ सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये सादर केला. भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ८ महिने वेळ दिला. जनतेची मते, सुचना,  टीका विचारात घेऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर १९४८ मध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. या टप्प्यात एकुण ७५६३ सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७३ सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला.

मसुदा बनविण्याचे प्रमुख (Chief Draftsman) म्हणुन एस. एन. मुखर्जी यांनी काम पाहिले. भारताची राज्य घटना ही संघराज्य पद्धतीने लोकशाही जोपासणारी आहे. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची ही घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लिहून पूर्ण केली आणि २६ जानेवारी १९५० ला संविधान भारतात लागू करण्यात आले. भारतीय राज्य घटना लिहिण्यास २ वष्रे ११ महिने आणि १७ दिवस लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमाने ही राज्य घटना लिहिली. त्यात त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या बुद्ध तत्त्वांचा समावेश केला. मसुदा समितीत एकूण सात सदस्य होते.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्य घटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. २९९ पैकी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी राज्य घटनेवर सह्या केल्या. सदस्य सह्या करत असताना बाहेर पाऊस सुरु झाला हे शुभसंकेत असल्याचे बोलले गेले. २४ जानेवारी १९५० रोजी पुन्हा एकदा घटना समितीने राज्य घटनेवर सर्वांच्या स्वाक्षऱ्या केल्या. घटनेचा अंमल २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरु झाला. हा दिवस निवडण्या मागचे कारण म्हणजे काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा “पुर्ण स्वराज्य दिन” म्हणुन साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणुन ओळखला जातो. तो दिवस प्रजासत्ताक - गणराज्य दिन म्हणुन साजरा केला जातो. 

२६ जानेवारी १९५० पासुन घटना समिती संपुष्टात आली. भारतीय संविधान अंमलात आल्यापासुन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७, भारत सरकार कायदा १९३५ व त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले. एका सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एका सदस्याचे निधन झाले होते आणि एक सदस्य समितीत आलेच नाहीत. एक सदस्य अमेरिकेत राहत होते. एक सदस्य राज्याच्या कारभारात होते आणि दोन सदस्य दिल्लीच्या बाहेर राहत होते. तसेच ते तब्येतीमुळे मसुदा समितीत हजर राहात नव्हते. त्यामुळे एकटेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे काम करीत होते. राज्य घटना लिहिण्याचे कार्य हे दिनांक ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आधुनिक बुद्धाने मानवतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून त्यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली.

भारतीय राज्य घटना कशी चालवावी? पक्ष आणि प्रशासन व्यवस्था, कायदे यंत्रणा, निरनिराळ्या योजना व राज्य, केंद्र शासनाची कर्तव्ये, न्यायालयाची कर्तव्ये व वेगवेगळय़ा आयोगाची कर्तव्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, सांसद लोकसभा, राज्यसभा यात निवडून येणाऱ्या लोकांच्या भूमिका आणि कार्य-कर्तव्ये काय आहेत, यांचे संपूर्ण नियोजन भारतीय संविधानात नमूद केलेले आहे. ती योग्य प्रकारे देशातील जनतेच्या हितासाठी, समृद्धीसाठी व विकासासाठी राबवावी हे भारतीय संविधानाचे उद्दिष्ट आहे. नव समाज व नव भारताची निर्मिती करण्याकरिता मी प्रथमत: भारतीय आणि शेवटी ही भारतीयच आहे. असा महान संदेश या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेला आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याची मुभा घटनेने दिली. तसेच कोणत्याही धर्मावर जबरदस्तीने धर्मातर न करण्याची अट ही घातली आहे. 

भारतीय संविधानात प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे धर्म स्वीकारण्याची व बदलण्याची मुभा दिलेली आहे. भारतीय संविधानात वेळ प्रसंगी कायद्याच्या कलमांमध्ये बदल करण्याचा अधिकार ही दिलेला आहे. संविधानाची अंमल बजावणी जर यथायोग्य झाली तर या देशाचे कल्याणच होईल. पण भारतात हजारो वर्षापासून ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेचा पगडा असल्यामुळे जैन, ख्रिश्चन, मुसलमान, इसाई, शिख व अन्य धर्म, पंथ यांची ही मानसिकता हिंदु धर्माला पोषक आहे. या देशात बौद्ध धम्म आणि हिंदू धर्म यांचा संघर्ष हजारो वर्षापासून चालतच आहे आणि पुढे ही असाच चालू राहणार आहे. कारण धम्म आणि धर्म यात फरक आहे. भारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. घटना निर्मितीसाठी जो कालावधी लागला. या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस काम केले.

मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. घटना निर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला. भारतीय राज्य घटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले. त्याच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतन मधील इतर कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. प्रास्ताविकाचे नक्षीकाम बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी केले. हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले. त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षी काम केले.

भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटी मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहारादुन येथे छापण्यात आली. घटना समितीची निशाणी म्हणुन हत्ती स्विकृत करण्यात आला होता. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २२ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटना दुरुस्त्या झाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र पुरस्कार प्रजासत्ताक दिनी दिले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये “Abide with me” हे गीत गायले जाते.

आज भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात मोठी राज्य घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली आहे. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, वंश, समुदाय, गोत्र, भाषा राहणीमान, प्रांत असतांना सुद्धा सर्वाना भारतीय राज्य घटनेने एका सूत्रात बांधून सर्वाना भारतीय लोकशाही प्रणाली बहाल केली आहे. सांसदीय लोकशाहीचे भवितव्य विषद करताना लोक नितीमान असणे ही पूर्वअट आहे. वर्तमानातील लोक नितीमान नसल्यामुळे, राजकीय साक्षर किंवा राजकीय दृष्टी नसल्यामुळे तसेच काही लोकांच्या महत्त्वाकांक्षी धोरणात हिरवा राष्ट्रवाद किंवा भगवा राष्ट्रवाद असल्यामुळे आणि या तत्त्वज्ञानाची पाळेमुळे खोलवर रुजविण्यासाठी त्यांच्या सांस्कृतिक तत्त्वाला अडसर असणारी सांसदीय लोकशाही आणि संविधान त्यांना नको आहे. अशी विचारसरणी असलेल्या लोकांचा आरंभापासूनच भारतीय संविधानाला विरोध आहे. म्हणूनच या ना त्या कारणाने भारताच्या संविधानांतर्गत सांसदीय लोकशाहीवर अनेक स्तरातून आक्रमणे होताना दिसून येतात. त्यामुळे भारतात धर्म, भाषा, पैसा, पक्ष प्रदेश वादाची भावना प्रज्ज्वलित करण्यात येथील प्रसार माध्यमे अग्रेसर आहेत.

आज या देशात भ्रष्टाचारामुळे सत्ताधारी आणि त्यांचे हित चिंतक अधिक श्रीमंत होताना दिसत आहेत आणि गरीब अधिक गरीब होताना दिसत आहेत. सांसदीय लोकशाही प्रणाली आजही धोक्यात आलेली आहे. खासगीकरण, बेरोजगारी महागाई, यांनी तर कळसच गाठला आहे. म्हणून लोकशाहीला वाचविण्या करिता सामान्यातील सामान्य माणसाने आपल्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायला पाहिजे. आपले संविधान ही असेच.. तुमचा विश्वास नसला तरी काम करत राहील. त्यामुळेच ते उपयुक्त ठरत राहील. भारताचे संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हेत, तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे.. संविधानाची पायाभूत मूल्ये न्याय पालिकेने जपलीच; पण ती लोकांमध्ये नागरी समाजात ही रुजायला हवीत.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ फेसबुक पेजवर एकदा नक्की भेट द्या.

• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  ◆ YATIN JADHAV : 9967065953 ◆

सादर कोणत्याही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 ◆ BSNET NEW & OLD HELPLINE :
      7738971042 or 7718962406
 (Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (म्हणजे समूहात) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           रमेश भोसले : ९७७३३३८१४४     
      कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील  
         क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.

बुधवार, २० मार्च, २०१९

● पहिला चवदार मुक्ती संग्राम (लेख)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           ● पहिला चवदार मुक्तीसंग्राम
                    लेख - यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

"आपली संघटना आपण स्वतंत्रच ठेवली पाहीजे. स्वतंत्र संघटनेशिवाय आपल्याला स्वाभिमानाने राहता यावयाचे नाही. संध्या जे लहान - मोठे राजकिय पक्ष दिसतात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या दृष्टिने कोणताच कार्यक्रम ठेवलेला नाही. तसा कार्यक्रम कोणी ठेवला असता तर त्याचा आम्ही विचार केला असता म्हणून आपण आपली सध्याची सुस्त अवस्था फेकून दिली पाहिजे. येथून पुढे आपल्याला जे काही मिळवायचे आहे ते इज्जतीने मिळविले पाहिजे. कोणाची हाजी - हाजी करून अथवा भिक मागून आम्हास काहीही नको. आपला भविष्य काळ उज्वल करण्यासाठी मला निष्ठेची माणसे हवीत."

विचार -
डाँ. बाबासाहेब आंबेडकर

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

           अस्पृश्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा उगम कोकण! या 720 कि.मी. च्या समुद्रकिनारा लाभलेला अपरांतात अस्पृश्यांच्या स्वतंत्र, समतेसाठी महात्मा फुले यांच्या काळापासून सातत्याने येथील अस्पृश्यांच्या नेत्यांनी प्रचंड लढे दिले. जोतिबा फुले या महामानवाच्या काळामध्येच अस्पृश्यांचा लढा आद्य समाज सुधारक आयु. गोपाळदादा वलंगकर यांनी सुरू केला. व कोकणातील अस्पृश्यांच्या हक्कासाठी पहिली अस्पृश्य निवारण संघटना दापोली येथे उभी केली व तेथील जातीय गुलामगिरीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत पेटविली.

त्यानंतर महार समाज सेवा संघाचे सचिव मा. रामचंद्र बी. मोरे मुक्काम : दासगाव, तालुका : महाड, जिल्हा : रायगड यांनी इ. स. १९२६ मध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर अस्पृश्यांना सार्वजनिक तलावावर पाणी भरण्याचा उपक्रम सुरू केला. त्यामुळे सवर्ण समाजाने अस्पृश्यांवर बहिष्कार घातला व त्यांचा बाजार हाट ही बंद केला. या विरोधामध्ये मुंबई इलाख्यात ३ ते ४ निषेधाच्या सभा झाल्या. ह्या विषयावर अस्पृश्य जराही डगमगले नाहीत व त्यांनी लढा सुरूच ठेवला व त्यानंतर ३/१२/१९२६ रोजी दासगाव धर्म शाळेसमोरील पटांगणात सवर्ण व अस्पृश्य यांची संयुक्त सभा होऊन सर्व मान्य करून बहिष्कार उठविण्यात आला.

या विजयामुळेच अस्पृश्य समाजाला आपली ऐक्याची ताकद उमगली व नेत्यांची ह्या लढ्याची व्याप्ती वाढविण्याचे ठरविले व त्या पुर्वीच या संघाची बहिष्कृत ऐक्य, संवर्धक महार समाज सेवा संघ म्हणून दिनांक १० आँगस्ट १९२६ रोजी माननीय केशवराव गोविंदराव आडरेकर यांच्या निवास स्थानी स्थापना करण्यात आली. परंतू थोड्याच दिवसात कर्मवीर दादासाहेब तथा संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या सुचनेनुसार संघाचे नाव १९/१०/१९२६ रोजी महार समाज सेवा संघ असे करण्यात आले. मा. संभाजी तुकाराम गायकवाड यांचा जन्म पहूर, तालुका : माणगाव, जिल्हा : रायगड येथे झाला. त्यांना डाँ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमाने दादासाहेब हाक मारत असत. दासगाव तळ्याच्या संघर्षाची प्रेरणा घेऊन अस्पृश्य वर्गाच्या अडीच हजार वर्षाच्या गुलामी व्यावस्थे विरूद्ध भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर याच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांनी पहिले बंडाचे निशाण महाड येथील प्रसिद्ध चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श करून अस्पृश्यांच्या मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी कुलाबा जिल्हा (आताचा रायगड) बहिष्कृत वर्गाची पहिली परिषद दिनांक १९ - २० मार्च १९२७ रोजी महाड येथेच झाली. ह्या ऐतिहासिक परिषदेचे अध्यक्ष मा. डाँ. बाबासाहेब आंबेडकर होते व दादासाहेब गायकवाड हे स्वागताध्य्क्ष होते.

ह्या परिषदेसाठी त्यांनी त्यांचे चिरंजीव भिकाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महार समाज सेवा संघाच्या माध्यमातून तमाम कोकणात मुंबईसह परिषदेचा प्रचार केला. सैनिकी हुद्यावर काम करत असताना ही सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर यांनी ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्रंचड मेहनत घेतली. कार्यकर्त्याचे दोन भाग पाडून मां केशव गोविंद आडेरकर, मा. रामचंद्र बाबाजी मोरे यांनी स्व खर्चाने डिसेंबर १९२६ पासून कोकणात रत्नागिरी, दाभोळ, दापोली, महाड, माणगाव, रोहा, पेण या ठिकाणी परिषदेसाठी बैठका घेतल्या व प्रचार केला. यामध्ये सर्वस्वी शिवराम गोपाळ जाधव, गोविंद रामजी आडरेकर, चांगदेव नारायण मोहिते, शंकर लक्ष्मण वडवलकर, पांडूरंग महादेव साळवे, तनाजी महादेव गुडेकर, जनार्दन भागाजी गमरे, पांडूरंग बाबाजी मांडलेकर, वरधरकर, गणपत राव केंबुर्लीकर, राघोराम गोयलकर, बाळू वामनेकर, सुदाम केंबुर्लेकर या नेत्यांनी परिषथ यशस्वी करण्याची प्रचंड मेहनत घेतलीच परंतू महाड मधील श्री. अनंतराव तथा भाई चित्रे, श्री. सु. गो. तथा नानासाहेब टिपणीस ह्या कायस्थ तरूणांनी ही सक्रिय सहभाग घेतला.

दिनांक २० मार्च १९२७ रोजी परिषदेची सांगता झाल्यानंतर चवदार तळ्याचे पाणी पिण्याची कृती कार्यक्रमाची अंमल बजावणी झाली. परंतू अस्पृश्य लोक चवदार तळ्याचे पाणी बाटवल्यावर विरेश्वर मंदिरात जाणार आहेत. अशी अफवा पसरली व शे - पाचशे लोकांनी काठ्या - लाठ्या घेऊन अस्पृश्य लोकांना मिळतील तिथे मारण्यास सुरूवात केली. यामध्ये दादासाहेब गायकवाड यांचे पुत्र भिकाजी गायकवाड गंभीर जखमी झाले. व काही दिवसानी त्यांचा मृत्यू झाला. महाड परिषदेतील डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार समाजाने मेलेली गुरे ओढणे. कातडे काढणे, मृत जनावराचे मास खाणे, पाईन मागणे इत्यादी गलिच्छ कामे बंद केली. कोर्ट लढाई व अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी या संघाने "कोकण संरक्षण फंड" सुरू केला. व कोकणातील शेतकऱ्यांना संघटीत करून वरिल खोती विरूद्ध प्रचंड लढा दिला व बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजातील पहिला वैदिक विवाह आयु. केशवराव गोविंदराव आडरेकर यांचा संघाचे एक प्रमुख सदस्य आयु. विठ्ठल लक्ष्मण तिडेकर यांची कन्या विठाबाई हिच्याशी दिनांक १९/६/१९१९ रोजी मुंबई परेल दामोदर हाँल येथे संघाने घडवून आणला व धार्मिक संस्कारात परिवर्तन घडवून अस्पृश्य समाजाला सुधारणा प्रिय बनविले. तिच्यात बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमत्रण दिले. त्यांचा अस्पृश्य वर्गाला अत्यानंद झाला व संघाने त्याचा सन्मान म्हणून डाँ. बाबासाहेब आबेडकर पर्स फंडची स्थापना केली व २ आँक्टोबर १९३० रोजी त्यांना रक्कम अर्पण करण्यात आली.

• स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डाँ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मधील लोक :

१) ठुणाजी तुकाराम शिर्के - जन्म १८९९, मु. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड

२) नारायण भिकू असगोलकर - मुक्काम पोस्ट : असगोली, तालुका : गुहागर, जिल्हा : रत्नागिरी हे दोन्ही अस्पृश्यांचे पहिले नगरसेवक वांद्रे नगरपालिकेत दिनांक २८/११/१९३८ ला निवडून आले.

३) चांगदेव नारायण मोहिते - जन्म १८ मे १८९९, मुक्काम : पोयनार, तालुका : दापोली, जिल्हा : रत्नागिरी वांद्रे म्युनिसिपालटीत १९४५ ला नगरसेवक व महार जाती पंचायत समितीचे पहिले मुख्य सचिव

४) व्हि. वाय. मोहिते (दहिवलकर बुवा) वरळी व एस. डी. चिपळूणकर (लव्हग्रोव्ह) येथून शेतकरी कामगार फेडरेशनच्या वतीने १९४६ ला नगरसेवक झाले.

५) महार जाती पंचायत समिती स्थापना दिनांक २५ मे १९४१ रोजी मा. गणपत विठ्ठल कासारे (लाटवणकर बाबा) यांच्या निवास स्थानी झाले.

६) सुभेदार शिवराम सज्जन घाटगे (येरंडकर) देवी रमाबाई आंबेडकर विद्यार्थी आश्रम (दापोली) या संस्थेचे आद्य संस्थापक व संचालक.

७) भिकाजी स. गायकवाड व केशवराव आड्रेकर, स्टार्ट कमिशन पुढे अस्पृश्य समाजाच्या वतीने साक्ष.

८) नारायण रामजी जाधव तुळसकर - जन्म १९१२, देवी रमाई बोर्डिग चालविणे व संघाचे पहिले सचिव व बोर्डिग पी. ई. ए. कडे सुपूर्द.

९) सदानंद बाळाराम जाधव (आलसुलकर) उत्तम नाट्य कलावंत, नुतन नाट्य मंडळ (फोर्ट) मुंबई संस्थेचे निर्माते.

१०) मा. दि. मोरेश्वर बी. तांबे, तालुका : महाड, जिल्हा : रायगड, पहिले नाट्य लेखक कलावंत व पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त.

११) मा. घनश्याम तळवटकर, मुक्काम : तुळवट, तालुका : खेड, जिल्हा : रत्नागिरी. पहिले दिग्दर्शक, अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक व महाविद्यालयीन प्रशासक व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे विशस्त.

१२) मा. जगनाथ भातणकर व रामकृष्ण भातणकर (पनवेल) दोन्ही शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे आमदार.

१३) यशवंत भातणकर (पनवेल) नगराध्य्क्ष व त्यांच्या निवास स्थानी प्रबोधनकार ठाकरे यांचे येणे - जाणे होते.

अश्या असंख्य ज्ञात - अज्ञात कोकण वासीय नेत्यांच्या त्यागावर आज आपण उभे आहोत. त्यांचे त्या काळातील परिश्रम अंनत अटी अडचणीवर मात करित जिद्दीने लढण्याच्या प्रवृत्तीवर आपण कोकणस्थ बौद्ध म्हणून पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे व पुढील येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरलो पाहिजे. त्यास्तव व त्याच्या पवित्र स्मृती जागवित ठेवल्या पाहिजेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली कोकणस्थ नेत्यांनी जो लढा दिला आहे.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

"शेवटी मला आपणास एवढेच सांगावयाचे आहे कि - जर आपण एकजुटीने वागाल तर काही तरी करू शकाल. आपल्या समाजावर हजारो वर्षापासून होत असलेले जोरजुलूम व अन्याय निवारण करण्याचे कार्य आजच्या पिढीने स्व खुशीने आपल्या शिरावर घ्यावयास हवे आहे. आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरूरी आहे. ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे."

विचार -
डाँ. बाबासाहेब आंबेडकर

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"साप्ताहिक करिअर दर्पण" (२४ मार्च २०१५)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ फेसबुक वर एकदा नक्की भेट द्या.

• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ मुंबईत स्मारकांना एकदा नक्की भेट द्या.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (चैत्यभूमी)

पत्ता : भागुजी बाबूजी किर हिंदू स्मशान भूमी, संत ज्ञानेश्वर मार्ग, चंद्रकांत दुरु वाडी, शिवाजी पार्क जवळ, दादर, मुंबई (पश्चिम), पिन कोड - ४०००२८

• माता रमाई आंबेडकर स्मारक (वरळी)

पत्ता : माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशान भूमी, जिजामाता नगर, डॉ. ई. मोझेस रोड, फोर सिजन हॉटेल समोर, वरळी, मुंबई (पश्चिम), पिन कोड  - ४०००१८

सूचना : माता रमाबाई आंबेडकर वरळी स्मशान भूमी येथे आल्यास "माता रमाई स्मारक एवं प्रचार - प्रसार समिती" च्या ९८९२११४३१९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ YATIN JADHAV : 9967065953

सादर कोणत्याही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (ग्रुप म्हणजे समूहात) वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
❖        रमेश भोसले : ९७७३३३८१४४     ❖
❖  कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील  ❖
❖     क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.    ❖
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

● होती शिक्षणाची आई (कविता)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

              ● होती शिक्षणाची आई
                  कवी - सुचिता कांबळे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

माता सावित्री माई,_
होती शिक्षणाची आई ।
माझ्या बोटाले धरुन,
मला शाळेत ती नेई ।।धृ।।

                नव्हती मुभा कशाची ही,
                दारं, कुलुपं मनुची ।
                म्हणे घरातच बसं,
                गरज नाही शिक्षणाची ।।१।।

दारं तोडणारी आई,
माता सावित्री माई ।
राग मनुचा तिच्यावर,
शेण फेके अंगावर ।।२।।

                का शिकवतेस त्यांचा,
                हक्क नाही शिक्षणावर ।
                सारा राग तो झेलुनं,
                दिली विद्या भरभरूनं ।।३।।

गेली सक्षम करूनं,
अशी ती शिक्षणाची आई ।
या विद्येनेच आली,
माझ्या लेखनीला धारं ।।४।।

                आज झाले मी साक्षर,
                माई तुझे उपकारं ।
                अशी उब ती मायेची,
                माझ्या हक्काच्या छायेची ।।५।।

कशी विसरु मी माई,
तुच शिक्षणाची आई ।
माझ्या बोटाले धरुन,
मला शाळेत ती नेई ।।६।।

◆◆◆

कवी -
सुचिता अर्जुन कांबळे : मुंबई
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।