सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

● भारतीयत्वाचा शोध घ्यायलाच हवा!

● भारतीयत्वाचा शोध घ्यायलाच हवा!

उद्देश -
‘आजच्या संघर्षांत इतिहास कालीन संघर्षांचा उपयोग’ असे न करता ‘आजच्या एकत्वासाठी (भारतीयत्वासाठी) इतिहासाचा अन्वयार्थ’ अशी भूमिका ठेवण्याची गरज आहे. वरील माहिती लहान ते वयोवृद्ध पाठवावी तसेच खालील लेखात दिलेली माहिती प्रसारित करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असले पाहिजे.

लेख -
आयुष्यमान शेषराव मोरे (इतिहासाचे अभ्यासक)

••◆●◆•◆●◆•●◆●•◆●◆•◆●◆••

सध्या देशात असहिष्णुतेची लाट आली आहे, अशी सहिष्णू लोकांची तक्रार आहे. सरत्या वर्षांत लोक सभेपासून साहित्य अकादमी पर्यंत सर्वत्र हीच चर्चा चालू होती. बिगर सहिष्णुवाद्यांचे म्हणणे असे की, ही तक्रार व आरोप निव्वळ राजकारणप्रेरित असून खोटे आहेत. त्यांचा दावा आहे की, या देशाची संस्कृती हीच मूलत: सहिष्णू असून तिच्यासाठी असहिष्णुता ही परकीय गोष्ट आहे. या संस्कृतीत जन्मास येणारा माणूस जन्मत:च सहिष्णू असतो. या देशाची संस्कृती मानणारा असहिष्णू असू शकत नाही. या देशाचा इतिहास हा सहिष्णुतेचाच आहे.

‘सहिष्णुता विरुद्ध असहिष्णुता हा साधासाधा वा तात्कालिक प्रश्न नाही. तो दोन संस्कृतींचा संघर्ष आहे. बुद्धपूर्व संस्कृती सहिष्णू नव्हतीच; बुद्धाने सांस्कृतिक क्रांती केली व सहिष्णू संस्कृती उदयास आली. त्यानंतर इ. पू. दुसऱ्या शतकात पुष्यमित्र शुंगाने मनूच्या साहय़ाने प्रतिक्रांती घडवून आणली व भारतीय समाज पुन्हा विषमतेचा व अन्यायाचा बळी झाला. त्यानंतर सुमारे बावीसशे वर्षांनी भारताच्या राज्यघटनेने पुन्हा पूर्वी सारखीच क्रांती घडवून आणली व आधुनिक मूल्यांचे व सहिष्णुतेचे युग सुरू झाले; परंतु आता मनूसारखीच प्रतिक्रांती घडविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असहिष्णुतेचे वाढते वातावरण व घडणाऱ्या घटना या पुढील प्रतिक्रांतीची नांदी होत.’ अशी ही आजच्या वातावरणाची विचारवंत "रावसाहेब कसबे" यांनी त्यांच्या मध्यममार्गी सम्यक दृष्टीतून केलेली मीमांसा आहे. याचा अर्थ स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली तरी अद्याप आपल्यात ‘भारतीयत्व’ निर्माण झालेले नाही. परस्परां विषयीचा अविश्वास व भीती अद्यापही कायम आहे. हा अविश्वास व भीती केवळ सद्य:कालीन घटनांचा परिणाम नसून त्यामागे प्राचीन काळापासूनचा इतिहास उभा आहे. वस्तुत: स्वातंत्र्य प्राप्ती नंतर व आधुनिक मूल्यांवर आधारित राज्यघटना आल्यानंतर आपण केवळ ‘भारतीय’ किंवा ‘आधी भारतीय मग अन्य काही’ अशी भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होणे अभिप्रेत होते. मागच्या काळातील गोष्टींकडे केवळ इतिहास म्हणून किंवा भारतीयत्वाला पूरक म्हणून पाहायला हवे होते. अशा प्रकारचे भारतीयत्व निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झालाच नाही.

केवळ शाळांच्या पाठ्य पुस्तकांतून ‘भारत माझा देश आहे; सारे भारतीय माझे बांधव आहेत’, अशा प्रतिज्ञा समाविष्ट केल्याने हे साध्य होणारे नव्हते. यासाठी परस्परांत अविश्वास व संघर्ष निर्माण करणारी बीजे असणाऱ्या पूर्वीच्या इतिहासाकडे भारतीयत्वाच्या दृष्टीने कसे पाहावे याची समाजाला शिकवण देण्याची गरज होती. इतिहास कालीन व वर्तमान कालीन धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अन्याय वा अत्याचाराची बुद्धिवादी, समतावादी व कठोर चिकित्सा तर करायलाच हवी, पण ‘आजच्या संघर्षांत इतिहास कालीन संघर्षांचा उपयोग’ असे न करता ‘आजच्या एकत्वासाठी (म्हणजेच भारतीयत्वासाठी) इतिहासाचा अन्वयार्थ’ अशी भूमिका ठेवण्याची गरज आहे. यासाठी खोटा इतिहास सांगण्याची गरज नसून या भूमिकेतून इतिहास मीमांसा मात्र केली पाहिजे. प्राचीन इतिहासात निर्णायक पुरावा नसणाऱ्या संदिग्धतेच्या भरपूर जागा आहेत. त्याचा भारतीयत्वाच्या दृष्टीने इतिहास मीमांसा करण्यासाठी उपयोग करून घेता येतो.

इतिहास ही एक प्रेरक शक्ती आहे. भारतीयत्वाचा जन्म इतिहासातूनच झाला आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला, पण भारतीयत्वाचा जन्म काही त्या दिवशी झालेला नाही. त्यापूर्वी ही ते अस्तित्वात होतेच. ते तसे होते म्हणून तर आपण स्वातंत्र्याची आकांक्षा धरू शकलो, स्वतंत्र होऊ शकलो, स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करू शकलो आणि ती राज्यघटना लिहिण्यासाठी ‘मनुवादी’ भारतीयांनी कोणाची निवड केली? तर ज्यांच्यावर प्रतिक्रांतिवाद्यांनी शतकानुशतके सामाजिक अन्याय केला त्या समाजाचे नेते व प्रतिनिधी असणाऱ्या व त्या अन्यायासाठी जबाबदार असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची! म्हणूनच ‘एका हातात राज्यघटना व दुसऱ्या हातात मनुस्मृती असे चालणार नाही’, ही बाबासाहेबांची घोषणा भारतीयत्वाची आधारशिला बनली आहे. भारतीयत्वाची मूलतत्त्वे कोणती? ते आपल्यात आहे म्हणजे नेमके काय? भारतीयत्वाची वैशिष्टय़े कोणती? भारतीयत्व निर्माण वा वृद्धिंगत करायचे म्हणजे काय करायचे? भारतीयत्वाला विरोधी असणाऱ्या शक्ती, विचार या श्रद्धा कोणत्या आहेत? भारतात प्राचीन काळापासून एकत्व ही आहे आणि विविधत्व ही आहे याचा अर्थ काय? भारतीयत्व आणि आधुनिकता यांचा समन्वय कसा करायचा?

भारतीयत्व म्हणजेच भारतीयांचे एकत्व, म्हणजेच भारताचे राष्ट्रीयत्व. राष्ट्रीयत्व म्हणजे भारतीय लोकांतील देशपातळीवरील एकत्वाची भावना. अशा राष्ट्रीय भावनेने एका राज्यसत्तेखाली एकत्र राहात असलेले लोक म्हणजे राष्ट्र. आम्ही असे एक वैशिष्टय़पूर्ण स्वतंत्र राष्ट्र आहोत, अशी भूमिका मांडणारा सिद्धांत म्हणजे राष्ट्रवाद. धार्मिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिक वा भौगोलिक अशा प्रकारचे विविध राष्ट्रवाद जगात मांडले गेले. अत्याधुनिक म्हणून प्रादेशिक वा भौगोलिक राष्ट्रवाद मानला जातो. आपण एका भूमीवर आणि एका राज्यसत्ते खाली राहात आहोत व आपले ऐहिक व भौतिक हित संबंध समान आहेत एवढ्या खातर आपण एक राष्ट्र, ही भूमिका या भौगोलिक राष्ट्रवादाचा पाया होय. हा राष्ट्रवाद आदर्श असला तरी या उच्च अवस्थेपर्यंत भारतीय लोक पोहोचले आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. राज्यघटनेने व आपण बहुतेक सर्वानी धर्माधारित राष्ट्रवाद नाकारलेला आहे, परंतु सांस्कृतिक राष्ट्रवाद नाकारला आहे काय, हा गंभीर वादाचा विषय होऊन बसलेला आहे. राज्यघटना धर्म निरपेक्ष आहे, पण संस्कृति निरपेक्ष आहे काय? राष्ट्रीयत्व वा राष्ट्रवाद याचा भावनेशी संबंध आहे की नाही? राष्ट्रवाद हा धर्म निरपेक्ष आहे, पण तो भावना निरपेक्ष ही आहे काय? केवळ समान ऐहिक हित संबंधांवर राष्ट्र उभे राहू शकते काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो.

स्वातंत्र्य पूर्व काळात राष्ट्रवादाची खूप चर्चा झाली. ब्रिटिश लोक भारतीयांना हिणवीत होते की, तुम्ही एक राष्ट्र नाहीत, भारतात अनेक राष्ट्रे आहेत. यास उत्तर देण्यासाठी आपण आग्रहाने मांडू लागलो की, आम्ही एक राष्ट्रच आहोत. जसे ब्रिटिश हे एक राष्ट्र आहेत तसेच आम्हीही एक राष्ट्र आहोत. राष्ट्रीयत्वासाठी पाहिजे असणारे जे घटक तुमच्यात आहेत तसे आमच्यात ही आहेत. त्या काळात भारत हे एक राष्ट्र आहे, की ते अनेक राष्ट्रांनी बनलेले आहे, असा कडाक्याचा वाद विवाद चालत असे; परंतु भारतीय एक राष्ट्रवाद मानणाऱ्यांनी ही त्या राष्ट्रवादाची मूलतत्त्वे वा आशय मांडणारा एखादा आधारभूत ग्रंथ लिहिलेला नाही. त्या काळात आग्रहाने मांडला जाणारा मुस्लीम राष्ट्रवाद व हिंदू राष्ट्रवाद यास विरोध करणारे प्रतिपादन एवढ्या पुरतेच त्या भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीचे स्वरूप राहिले. स्वातंत्र्योत्तर काळात ही या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. भारतीय राष्ट्रवादाची समग्र मांडणी करणारा ग्रंथ अद्याप ही उपलब्ध नाही, असे का झाले? याचे एक कारण हे की, स्वातंत्र्योत्तर काळात देशात डावे व उजवे अशी विचारवंतांची विभागणी करण्यात आली. मार्क्‍सवादाच्या प्रभावा खाली असलेल्या डाव्या विचारवंतांना मूलत: राष्ट्रवादच मान्य नव्हता. साम्यवाद वा समाजवाद हीच त्यांची सर्वोच्च विचारसरणी होती. राष्ट्रवादाला ते प्रतिगामी मानत असत. एवढेच नव्हे तर आपल्या विचाराला न मानणाऱ्यांना ते उजवे व प्रतिगामी मानत असत. आजचे सहिष्णू व बिगर सहिष्णू हे अनुक्रमे त्याच डाव्या व उजव्यांचे वैचारिक वारसदार होत. त्यामुळे त्यांच्याकडून भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीची अपेक्षा करता येत नव्हती. आता उरले तथा कथित उजव्या विचारांचे नेते व विचारवंत. त्यांना, एखाद्याचा अपवाद वजा जाता, पाहिजे होता धार्मिक राष्ट्रवाद. त्याला ते सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणत असले तरी आशय होता धार्मिक राष्ट्रवादाचा. अल्पसंख्याकांनाच काय, पण हिंदूंतील बहुसंख्याकांना ही तो मान्य होणारा नव्हता. त्यामुळे त्यांना ही भारतीय राष्ट्रवादाची मांडणी करता आली नाही. एवढेच काय, पण त्यांना हिंदू राष्ट्रवादाची ही समग्र वा नीट मांडणी करता आली नाही. आज ही भारतीय राष्ट्रवाद त्याच्या समग्र मांडणी अभावी डावीकडे व उजवीकडे असे हेलकावे खात अभ्यासकांसमोर प्रश्न म्हणून उभा आहे.

जीनांच्या मुस्लीम लीगने ‘मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत’ असा सिद्धांत मांडला. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यामुळे उर्वरित भारताला ‘हिंदुस्थान’ हे नाव देणे तर्कशुद्ध व स्वाभाविक ठरले असते. आज ही सामान्यत: उपखंडातील मुसलमान या देशाचा उल्लेख ‘हिंदूस्थान’ असा करतात. असे असता ही आपण या देशाचे नाव ‘हिंदुस्थान’ न ठेवता ‘भारत’ असे ठेवले. ऐतिहासिक दृष्टीने पाहता ‘भारत’ हे प्राचीन नाव असून ‘हिंदू’ हे मध्ययुगीन नाव आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते ‘हिंदू’ हे नाव भारतात आल्यावर मुसलमानांनी दिलेले आहे व तत्पूर्वीच्या धर्म ग्रंथात व इतिहासात ते सापडत नाही. ‘भारतीयत्व’ हे हिंदुत्वा पेक्षा प्राचीन होते. भारतीय नेत्यांना हेच अभिप्रेत होते. म्हणून त्यांनी या देशाचे नाव ‘भारत’ ठेवले. या भारतीयत्वाचा शोध आपल्याला घ्यायलाच हवा.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान शेषराव मोरे (इतिहासाचे अभ्यासक)

••◆●◆•◆●◆•●◆●•◆●◆•◆●◆••

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

● दि ग्रेट इंडियन - एक प्रखर देशभक्त

● दि ग्रेट इंडियन - एक प्रखर देशभक्त

उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जनहितार्थ मार्गदर्शक माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कार्यव्य असले पाहिजे.

लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

मनुष्य मात्रांच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्गाता, कोट्यावधी मानवाच्या जीवना मध्ये प्रकाश निर्माण करण्याचे काम डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करून असामान्य कर्तृत्व उभे केले अस्पृशांच्या आचार विचारा मध्ये अमूल्याग्र क्रांती केली. माणूस असूनही ज्याला माणसा प्रमाणे तर नाहीच पशू पेक्षा ही हिन जीवन जगत असलेल्या मनुष्य मात्रास समाजा मध्ये प्रतिष्टित करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले त्यासाठी बाबासाहेबांना अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागला त्याचा हा संघर्ष, लढा संबंध मानव जातीच्या उत्थनाचा स्वाभिमान आंदोलनच ठरले. अस्पृश्यांच्या मुक्तीसाठीचा हा प्रारंभीचा लढा अस्पृश्यां पुरताच मर्यादित राहिला नाही. समाज, राष्ट्र यांच्या परिस्थितीना या आंदोलनाने केव्हाच ओलांडल्या. संबंध मानवी जीवन, विश्व कल्याणाचा मुलभूत विचार असणारे हे आंदोलन विश्वव्याप्ती बनले. अस्पृश्य समाजात जन्मल्यामुळे अस्पृश्यतेचे दाहक अनुभवाचे चटके बाबासाहेबांना लहानपणी बसलेच नंतर शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनात त्या अनुभवानी पाट सोडली नाही म्हणून त्यांच्या चळवळीचा मुख्य केंद्र अस्पृश्य समाजाचा उद्धार हा असणे श्यवहार्य आणि सामाजिक ठरतो. जसाजशी आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. तसा बाबासाहेबांच्या चळवळीचे केंद्र समाज, देश, विश्व व एकून मानवजात राहिली म्हणूनच अस्पृश्यांच्या उद्धाराचे मुख्य ध्येय असले तरी त्यांनी समाज, देशहिताकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणार्धांत बाबासाहेबांनी समाज देश देशाची एकता व अखंडता, स्वातंत्र्य व समता याचाच विचार केला म्हणूनच बाबासाहेब प्रखर राष्टभक्त होते, राष्टवादी होते. आपल्या अस्पृश्य समाजामध्ये देखील तशीच राष्टभक्ती जोपासण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. म्हणून अण्णाभाऊ साठे सारखे साहित्यक बाबांची एका वाक्यात आठवण करून देतात ते असे -

"जग बदल घालूनी घाव ।
सांगून गेले मज भिमराव ।"

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाच्या अनेक पैलूचा अभ्यास झालेला आहे. पण बाबासाहेबांचा राष्टवाद आणि त्यांचे देवप्रेम या विषयाला अद्यापही म्हणावा तसा न्याय मिळाला नाही. प्स्थापित इतिहासकार, विचारवंतानी जाणीव पूर्वक हा विषय सर्व व्यापक बनवला नाही उलट दुसरीकडे बाबासाहेबांच्या एखाद्या भूमिकेचा चुकीचा अर्थ काडून त्याचा मात्र प्रसार व प्रचार करण्यात येतो आहे. तसाच संदेश विद्यार्था पर्यत पसरवला जाऊन बाबासाहेबांनी देशाच्या स्वतंत्र्याबद्दल, देशभक्ती बद्दल फारसे काही झाले नसल्याचे विद्यार्थाना बिंबवले जाते. विशेषत काँग्रेसने तिच्या चळवळीत ज्यांनी भाग घेतला नार्ही, सहकार्य केले नाही त्या सर्वाना देश विरोधी आणि स्वातंत्र्य विरोधी ठरविले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यातून सुटले नाहीत म्हणूनच बाबासाहेबांची राष्टवादाची भावना त्यांचे देशप्रेम हा दृष्टिकोन सर्वव्याप्ती झाला नाही.

• बाबासाहेबांची राष्ट्रवादाची संकल्पना -

याकाळी काँग्रेस आणि तिच्याशी संलग्नीत असणाऱ्या संघटनांच्या नेत्याच्या राष्टवादाची संकल्पना आणि बाबासाहेबांचा राष्ट्रवाद ही संकल्पना यात फरक असल्याचे दिसून येते.

• स्वातंत्र्य कुणाचे -

बाबासाहेब देशाचे स्वातंत्र्य आणि जनतेचे स्वातंत्र्य अया दोन वेगळ्यच बाबी मानत. देश स्वातंत्र झाला म्हणजे देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळते. असा अर्थ नाही. देश स्वातंत्र्य होवून हि देशातील जनता जर गुलामगिरीत आणि मुठभर लोकांच्या शोषणास बळी पडत असेल, विकासाची संधी मिळत नसेल, तर अशा स्वातंत्र्यास बाबासाहेब स्वातंत्र्य मानत नसत. या संदर्भात बाबासाहेब अमेरिकेच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा संदर्भ देतात. ४ जुलै १७७६ ला अमेरिका ब्रिटिशांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. अमेरिकेस स्वातंत्र्य मिळाले पण तेथील निग्रोंना मात्र स्वातंत्र्य मिळाले नाही. त्याला त्यानंतर कित्येक वर्ष गुलामगिरीत जगावे लागले. अमेरितेच्या स्वातंत्र्या नंतर निग्रोंना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी संघर्ष करावा लागला. प्रदीर्घ संघर्षानंतर तेथे निग्रोंना अधिकार मिळाले, स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच देशातील सर्व सामान्य माणसास समतायुक्त आणि शोषण मुक्त जीवन जगता येत नाही त्यांस मानसिक, बौध्दिक, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोग नसतो. म्हणून स्वातंत्र्याचा असा उदात्त अर्थ बाबासाहेबांन अभिप्रेत होता आणि ब्रिटिश्यां विरुद्ध स्वातंत्र्याची मगणी करणारी काँग्रेस तर मुठभर लोकांचीच प्रतिनिधीत्व करते. आपल्या अनुयायांनी देखील त्यांनी स्वराज्य म्हणजे ते समजावून घ्यावे आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन केले होते.

• सायमन कमिशन व डाँ. बाबासाहेब आंबेडकर -

येथील जातीवादी आणि मनुवादी लोकांनी बाबासाहेबांच्या द्वेषापोटी त्यांच्या हिताच्या आणि विशिष्ट बाबींना समोर ठेवून स्वातंत्र्य चळवळी बाबत बाबासाहेबांनी भूमिका मात्र अंधारात ठेवली. इतिहासातील अनेक घटनांचे विकृतीकरण करुन आम्हाला तोच इतिहास येथे शिकविला जातो. हा वेगळा आणि स्वातंत्र्य विषय आहे. भारतीयांना द्यावयाच्या राजकीय हक्का संदर्भात भारतीय संघटना, नेते यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी १९२७ ला भारतात सायमन कमिशन पाठविले. या कमिशनावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. कारण असे सांगतात की, या कमिशनमध्ये सर्व सदस्य ब्रिटिश होते. पण बहिष्काराचे खरे कारण दुसरेच आहे. या दरम्यान भारतात विविध जातीधर्माच्या लोकांकडून आपापल्या समूहासाठी हित जोपासणाऱ्या मागण्या चालू होत्या आणि सायमन देखील त्यात अनूकुल होते त्यांच्या हिताच्या मागण्यांचा इंग्रजा कडून विचार होवू नये म्हणून काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला.

या कमिशनला बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले. इंग्रजांकडून अस्पृश्य समाजाची बाजू मांडणे महत्वाचे वाटत होते म्हणून बाबासाहेबांनी सायमनला साक्ष दिली, लेखी निवेदने दिली. त्या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी दुष्ट बुद्धिने घेतलेल्या निर्णयास विरोध केला. स्वातंत्र्य आंदोलनाची धार कमी करावी. हिंदू - मुस्लिमांत अंतर पडावा हिंदूना झोडपण्यासाठी मुस्लिमांचा उपयोग होईल अशा अनेक हेतूने सायमनने सिंध प्रांत निर्माण करण्याची शिफारस केली होती. जमातवादावर आधारित इंग्रजांच्या कारस्थानास बाबासाहेबांनी विरोध केला. भारतात जमातवाद आणि धार्मिक द्वेष वाढविण्याचा प्रयत्न इंग्रजांनी करु नये असे बाबासाहेबांनी सांगून निवेदना मध्ये स्पष्ट नमूद केले. येथील हिंदू - मुस्लिम किंवा सिंधी हे पण अगोदर हे सर्व भारतीय आहेत आणि नंतर ही भारतीय आहेत. त्यामुळे जमातवादी गट, जाणीव वाढेल असे काहीही प्रयत्न इंग्रजानी करु नये, असे बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर भूमिका घेतली.

• इंग्रजांवर प्रखर टिका -

डाँ. बाबासाहेब आंबेडकर सरकार नियुक्त अनेक समित्यांवर, गव्हर्नरच्या कार्यकरी मंडळात सदस्य असताना देखील त्यांनी इंग्रजांच्या अन्यायी, पक्षपाती आणि भारतीय जनतेच्या विकासास मारक ठरणाऱ्या धोरणावर जाहीर टिका केल्या, भूमिका घेतल्या. १९१९ च्या साऊथ बर समितीने जातवार प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले पण आवश्यक असलेल्या अस्पृश्यांना मात्र योग्य व प्रमाणशीर प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून हे प्रतिनिधित्व देण्याचे धोरण अनुदारपणाचे व बेअकलीपणाचे आहे, अशी प्रचंड टिका त्यांनी केली. सायमन कमिशन वेळी बाबासाहेब मुंबई कौन्सिलचे सदस्य होते आणि सायमनला सहकार्य करण्यासाठी नेमलेल्या समतीचे ही सदस्य होते तरी पण बाबासाहेबांनी इंग्रजां विरुद्ध भूमिका घेऊन त्यांच्यावर प्रखर टिका केली. बाबासाहेबांनी पी.एच.डी. (PH.D) आणि डी.एस.सी. (DS.C) साठी जे प्रबंध लिहले. त्या प्रबंधा मधून देखील इंग्रजांच्या शोषणामुळे भारतात दरिद्र कसे वाढत गेले आणि शोषण कसे होते याचे सादर विश्लेषण करुन इंग्रजांचे अंतरंग उघडे करून दाखविले. ब्रिटिश सत्ता भारतात खिर झाल्यापासून भारता मध्ये अनेकदा दुष्काळ पडला त्यात अनेक लोक भुकेने मेले या उपासमारीचे कारण इंग्रजांचे धोरण. कारण आहे. येथे उद्योग व्यापार याची वाढ होवू द्यायची नाही व भारतातील व्यापारी पेठ सदैव खुली रहावी असे इंग्रजांचे राज्य कारभार करण्याचे धोरण आहे, असे न्या रानडे, दादाभाई नौरोजी प्रमाणेच बाबासाहेबांनी ही स्पष्ट केले. याचाच सलोख अभ्यास करुन अण्णाभाऊ साठे जाहिरपणे सांगतात कि -

"ये आजादी जूठी है ।
देश कि जनता भूखी है ।"

भारतीयांच्या अधिकारासाठी इंग्रजां विरुद्ध कायदेशीर लढाई बाबासाहेबानी प्रयत्न केले. १९३० च्या सविनय कायदे भंगाच्या चळवळीचा एक भाग म्हणून ठिक ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आले. पनवेल जवळ चिरनेर मध्ये असाच जंगल सत्याग्रह चालू असताना पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब केला तेव्हा सत्याग्रही देखील आक्रमक बनले त्यामुळे हिंसक वळण लागले यात काही सरकारी कर्मचारी, एक मामलेदार ठार झाला. सरकारने अनेक सत्याग्रहींना अटक करून खटला दाखल केला. अटक सत्याग्रहींची बाबासाहेबांनी बाजू माडली. गोलमेज परिषदेसाठी सरकार कडून त्यांची नियुक्ती झाली होती तरी बाबासाहेब सरकारच्या विरोधात सत्याग्रहींच्या बाजूने उभे राहीले. सरकारच्या ध्येर्या पेक्षा जनतेचे न्याय्य हक्क आणि स्वातंत्र्य यांना जास्त प्राधान्य द्यावे अशी भूमिका घेवून बाबासाहेबांनी युक्तीवाद करुन सत्याग्रहींची मुक्तता केली.

• गोलमेज परिषदे मध्ये प्रखर राष्टवादाची प्रचिती -

डाँ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत 'मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीय आहे.' १२ नोव्हेबर १९३० पासून सुरू झालेल्या लंडन येथील गोलमेज परिषदेसाठी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर आणि डाँ. सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली. इंग्रजांच्या साम्राज्यात जाऊन त्यांच्या साम्राज्यवादा विरुद्ध बोलण्याचे साहस डाँ. बाबासाहेबांनीच दाखविले. या परिषदेत बाबासाहेबांनी भारतीयांना न्याय्य हक्क देण्यास आणि जबाबदार शासन पध्दती देण्यासाठी तयारी नसेल तर इंग्रजांनी भारत सोडून निघून जावे, असे स्पष्ट निर्भिडपणे इंग्रजांना सुनावणारे बाबासाहेब एकमेव प्रतिनिधी होते. ब्रिटिश राजवटी मध्ये अस्पृश्यांच्या स्थिती मध्ये कसली सुधारणा झाली नाही. त्यामुळे दलितांचा ब्रिटिशांनी विश्वासघात केला. अशा ब्रिटिशांनी भारतात लवकरात लवकर जबाबदार शासन पद्धती देण्याची मागणी गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी केली.

बाबासाहेब आपल्या संपूर्ण जीवना मध्ये राष्टनिष्ठेपासून ते कधीच ढळले नाहीत. देश्याच्याच ऐक्याला एकात्मतेला आणि अखंडतेला अस्मितेला धोका पोहचणार नाही, याची सदैव काळजी घेतली. जरी या देशातील लोकांनी, धर्माने, संस्कृतीने त्यांना व त्यांच्या समाजास अमानवी वागवणूक दिली. गुलामगिरीचीच व्यावस्था जोपासली त्या लोकांबद्दल आणि धर्माबद्दल त्याना राग असला तरी त्या समाजाचा आणि देशाचा सुड घेण्याचा विचार ही त्यांच्या मनाला स्पर्श केला नाही. मुस्लिम लीघ आणि बँरिस्टर जिना यांच्याशी संगनमत करुन बाबासाहेब पहिले प्रधानमंत्री होऊ शकले असते. फाळणी टाळण्यासाठी जिनांनी बाबासाहेबांना पंतप्रधान करत असल्यास पाकिस्तानची मागणी मागे घेण्याच प्रस्ताव काँग्रेसकडे ठेवला होता. बाबासाहेबांनी कधीच देशहितापेक्षा आपला स्वार्थ हित यास प्राधान्य दिले नाही. म्हणूनच बाबासाहेब अन्य कोणत्याही राष्टवाद्यापेक्षा अधिक प्रखर राष्टवादी होते. नंतर ते ८ मे १९५० ला स्वतंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. ते जाणत होते की आपला समाज अजून स्वतंत्र्य अनूभवत नाही. देशात कुठेना कुठे गैर प्रकार घडतोच त्याकरिता त्यानी राज्यघटना लिहली.

पण हि राज्यघटना २६ जानेवारी १९५० ला प्रजेच्या हिता करिता लागू करून अंमल बजावणी केली हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून लोकशाहीचे बिज रोवले आणि सर्वाना एक संदेश दिला कि संविधान किती ही चांगले असो पण ते चालवणारे लोक चांगले नसतील तर संविधान इतके सवोत्कृष्ट असून सुद्धा ते लोक इतरांचे कल्याण करु शकत नाहीत. आणि प्रजासत्ताक दिन संबधी समते विषयी प्रश्न उभे करून सांगितल की २६ जानेवारी १९५० ला आपण एक विसंगती युक्त जीवनात प्रवेश करणार आहेत, राजकारणात आपल्याकडे समता राहील; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमत्ता राहिल. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत.

अश्या परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळापर्यत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्या शिवाय राहणार नाही. हि विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्ट परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकिय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील. परत स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे? ते जबाबदारीचे सार हे पटवून देताना बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य ही आनंददायी चीज आहे परंतु स्वातंत्र्याने आपणावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नये.

आणखी ते म्हणतात कि आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची व बंधुत्वाची गरज आहे. एकात्मता व बंधुता हा आपल्या राष्टाचा गाभा ठरला पाहिजे. आपली राज्यघटना म्हणजे काय आहे? हे समजावून सांगतात कि - "आपली राज्यघटना म्हणजे संसदीय लोकशाही स्थापित करण्यासाठी केलेली यंत्रणा आहे. संसदीय लोकशाहीचा अर्थ आहे. 'एक व्यक्ती एक मत' याचाच अर्थ असा की शासनकर्ते सतत दक्ष असावेत. जेव्हा ते मतदात्यांपुढे जातील तेव्हा त्यांनी केलेल्या कामाचा जनता आढावा घेऊ शकेल."

पाहिले बाबासाहेब जे सांगतात त्यावरूनच जे स्वातंत्र्य, समता, बंधूत्व स्मरण करून देणारा दिवस म्हणजे संविधान गौरव दिवसाला प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो यावरून डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्टभक्त होते ते लक्षात घेतले पाहीजे.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया",
"दि नॅशनल नेटवर्क बुद्धिस्ट युथ : पुणे ग्रुप"

लेखाचा पहिला भाग - 
https://m.facebook.com/737916446278745/photos/a.738180676252322.1073741827.737916446278745/787019241368465/?type=1&refid=17

लेखाचा दुसरा भाग - 
https://m.facebook.com/737916446278745/photos/a.738180676252322.1073741827.737916446278745/787426684661054/?type=1&refid=17

लेखाचा तिसरा भाग - 
https://m.facebook.com/photo.php?fbid=1049561971726633&id=524271910922311&set=a.524738524208983.138854.524271910922311

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

● अरे यार बाबासाहेबांमुळे (कविता)

● अरे यार बाबासाहेबांमुळे

बाबासाहेबांनी अरे यार,
शोषून साहिलेल्या अती कष्टामुळे ।
साहेब तु सर झालास,
समाजाचा लिडर झालास ।
गांडु पहिलेचा होता आता,
नर झाला अरे यार बाबासाहेबांमूळे ॥धृ॥

अरे काल सावलीन तुझ्या,
बाटत ईथे होता सळा ।
तोंडाला होत गाडग,
ढुंगनाला तुझ्या फळा ।
लढु शकत नव्हता,
तु हक्काचा लढ़ा ।
आज बांधतो माड्यावर,
माडा बाबासाहेबांमुळे ॥१॥

तुला बाबासाहेबांमुळेच,
खरा मान - सन्मान मिळतो ।
कालचा अशिक्षित भिकारी,
लाखात आज खेळतो ।
काल एखाद कुत्र ही,
विचारत लेका तुला नव्हत ।
आज स्वतः कुत्र पाळतो,
फक्त बाबासाहेबांमुळे ॥२॥

अरे बाबासाहेबांमुळे तु आज,
त्यावरच्या शिखरावर गेला ।
पद - पैसा - प्रतिष्ठा मिळताच,
तुला भडव्या माज फार आला ।
म्हणुनच समाजाला,
तु समजतो भाजी पाला ।
डाँक्टर - कलेक्टर - कमिशनर,
झाला तू बाबासाहेबांमुळे ॥३॥

वाटायला लाज पाहिजे,
तुम्हाला पुजा - आरत्या करतांना ।
२२ प्रतिज्ञांना पायदळी तुडवुन,
तुम्ही गौरी - गणपती बसवितांना ।
शिर्डी - शेगावात जाऊन तुम्ही,
घरच्या महिलेची ओटी भरताना ।
गंडे - धागे - दोरे बांधुन,
महिनो - महिना नवस करताना ॥४॥

भेसळ बापाची औलाद,
स्वतःला सुशिक्षित समजतो,
नागड्या भोंदू लोकांचा,
घरात फोटो लावतो ।
व्यसनी लोकांना आदर्श मानतो ॥५॥

खरे सुशिक्षित तर,
आपले पूर्वजच होते ।
संकटात ही बुध्द अन बाबांशी,
तुटुन दिले नाते नाते ।
स्वाभिमानी होते मर्द,
ते कुणा पुढे ना कधी झुकले ।
बा भिमाच्या एका शब्दावर,
३३ कोटी देव उकिरड्यात फेकले ॥६॥

विषमतेच्या काळात ही त्यांनी,
आपल माणूसपण लपवल नाही ।
जगले सारे ताठ मानेने,
पेशवाई सारी संपवुन टाकली ।
तुम्ही माणुसकी लपवनारी औलाद,
शेवटी हरामखोरीवर गेली ।
बाप लपवुन स्वतःच्या आईला ,
भलतीच दुसऱ्याची रखेल केली ॥७॥

तुमच्या अगांत आहे भेसळ रक्त,
झेलण्यातच वाटते तुम्हाला मजा ।
कधी - कधी तुमच्या,
बापाची सर्वांना शंका वाटते ।
तर जयभिम म्हणायला तुमची,
दिड हात टरटर फाटते ॥८॥

अरे छि - थु तुमच्या शिक्षणावर साली,
सारी हिजड्यांची औलाद पैदास झाली ।
म्हणुनच तुमच्यामुळेच आज,
खरी ही औदसा आली ।
बाबासाहेबांनी दिलेली,
जबाबदारी पाळली असती ।
आज इथे घाटकोपर - खैरलांजी,
इथे कधीच घडली नसती ॥९॥

चुक नकळत झालेली,
मित्रा मी समजू शकतो ।
तु जाणून केलेल्या चुकीमुळे,
मी तुझ्या तुथारावर थुंकतो ।
अरे अजून ही वेळ गेलेली नाही,
भिमकार्याचा धुरा खांद्यावर धर ।
लाचारीत मरण्या पेक्षा,
स्वाभिमानाने लढता - लढता मर ॥१०॥

अरे स्वाभिमानाने जगशील,
तर तुला मानाचा जयभिम करीन,
नाही तर हा "यतिन जाधव" तुला,
सर्वांच्या समोर ठोकून मारिन ॥११॥

कवी -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

•◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆•

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

•◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.