रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

शिवजयंती बदलापूरची - १९२७ सालची




शिवजयंती बदलापूरची - १९२७ सालची

बाबासाहेब नावाचं वादळी नेतूत्व स्पृश्य नि सवर्ण वर्गात मोठी खळबळ उडवून देत असे. सनातनी लोकांना सळो की पळो करुन सोडणारं हे व्यक्तिमत्व जाती पातीच्या बेड्या तोडून नवी समाज रचना उभी करण्यासाठी मोठा झगडा चालविला होता.
१९२७ साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ३ मे रोजी शिवजयंती उस्तव दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पार पडणार होता. पण उत्सव समितीने या वर्षी अध्यक्ष म्हणून कुणास बोलवावे हे ठरविण्यासाठी मिटिंगावर मिटींगा घेतल्या. अनेक नावाची चर्चा झाली पण काही ना काही कारणास्तव ही सर्व नावं नकारली गेली. शेवटी सर्वानूमते असे ठरले की डॉ. भीमराव आंबेडकरयाना या उत्सवाचे अध्यक्ष म्हणून बोलवावे. मग प्रश्न असा पडला की बाबासाहेबाना निमंत्रण देण्यास जाणार कोण? पालेय शास्त्री नावाच्या भिक्षूकावर (ब्राह्मण) ही जबाबदारी टाकण्यात आली.
हे भिक्षूक ब्राह्मण मुंबईस आले , पण थेट बाबासाहेबाना भेटण्याची हिंमत होईना. ’ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर’चे संपादक नाईक याना जाऊन भेटले. आपला मानस त्यांच्याकडे बोलून दाखविला. भिक्षूकाचा प्रस्ताव ऐकून नाईकाना फार आनंद झाला. नाईकानी या भिक्षूकाची बाबासाहेबांशी भेट घडवून आणली. पालेय शास्त्र्यानी आपला परीचय दिला व गावात भिक्षूकीचा व्यवसाय करतो असे सांगितले. या वर्षीच्या शिवजयंतीच्या उत्सवास आपण अध्यक्ष म्हणून लाभावे अशी ईच्छा व्यक्ती केली. बाबासाहेब मोठ्या आनंदाने हे निमंत्रण स्विकारतात.  हे ब्राह्मण गृहस्थ खूश होऊन निघून जातात.
ठरलेल्या तारखेप्रमाणे बाबासाहेब बदलापूरला येतात. अध्यक्ष स्थान स्विकारुन एक तेजस्वी भाषण देतात. बाबासाहेबांची खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था या भिक्षूकाच्या घरी केली जाते. जेंव्हा महाराला शिवने सुद्धा विटाळ मानल्या जाई अशा काळात एका भिक्षूकाने बाबासाहेबाना आपल्या राहत्या घरी मुक्कामी ठेवून केलेला आदरातित्य पाहता  त्यांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम करावयाची ईच्छा होते. त्या दिवशी मोठ्या जल्लोशात शिवजयंती साजरी होते. दुस-या दिवशी बाबासाहेब परत जातात. बाबासाहेबानी आपल्या आयूष्यात साजरी केलेली(? सहभाग घेतलेली) ही एकमेव शिवजयंती होय. 
पण...
पण ही झाली पडद्या पुढची घटना.
या एकंदरीत कार्यात पडद्या मागे जे घडले ते ही फार ईंटरेस्टींग आहे. मुळात या कार्यक्रमास बाबासाहेबानाच का बोलावले? प्रदिर्घ चर्चे नंतर यानाच बोलावण्याचे कारण काय? तर याचे उत्तर आहे, ईथे या दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंदू-मुस्लिमांच्या दंगली झाल्या होत्या. हिंदूंची ताकद कमी पडू लागली होती. त्यातल्या त्यात अस्पृश्य समाज मोठ्या प्रमाणात ख्रीस्ती धर्म स्विकारू लागला होता. मुसलमानांची कु-हाड सतत आभाळात दिसे, कधी कोसळणार नेम नाही. त्याच दरम्यान बाबासाहेब नावाचा अस्पृश्यांचा मसीहा उदयास आला होता. त्याना वाटले असावे बाबासाहेबांच्या मदतीने अस्पृश्यांची ताकत आपल्या पाठीशी उभी करता येईल. त्याच बरोबर धर्मांतरही रोखता येईल. ही होती एक बाजू. दुसरी बाजू अशी होती की सुधारणेचे वारे वाहू लागले होते. बाबासाहेब व ईतर पुरोगामी मताचे नेते सामाजीक बदल घडवून आणन्यास मोठ्या जोमाने कामास लागले होते. याचा एकंदरीत  परिणाम असा झाला की आपल्याही गावात बाबासाहेबांसारख्या थोर पुरुषाचे पाय लागावेत असे वाटून त्यानी बाबासाहेबाना जयंती उत्सवाचे निमंत्रण दिले. ठरल्या प्रमाणे बिचा-या ब्राह्मणाने जाऊन बाबासाहेबांशी तसे बोलून निमंत्रण देऊनही टाकले.
त्या नंतर सुरु झाली खरी गंमत.
बाबासाहेब येणार हे पक्क झाल्यावर खरा प्रश्न उभा ठाकला, तो म्हणजे बाबासाहेब थांबणार कुणाकडे? मराठा व ईतर बहुजन समाज बाबासाहेबाना आपल्या घरची पायरी चढू देण्यास तयार नव्हता. सुधारणा बिधारणा त्या काय भानगडी असतात त्या घराच्या बाहेर. एक महार घराची पायरी चढून आता यावा हे त्याना अजिबात मान्य नव्हते. महाराच्या पदस्पर्शाने गाव पावन होणार होता पण तोच महार घरात आल्यास मराठ्यांचे घर बाटणार होते. त्यामूळे मोठा पेच निर्माण होतो.
गावची सर्व लोकं परत एकदा एकत्र येतात व मिटिंग घेतात. बाबासाहेबांची राहण्याची सोय कुणाकडे करायची यावरुन मोठा वाद उभा ठाकतो. सुधारणावादी बहुजन वर्गातून एकही माणूस पुढाकार घेण्यास तयार नसतो. शेवटी पंचायत होते ती बिचा-या ब्राह्मणाची. जेंव्हा बहुजन समाज मागे हटतो तेंव्हा पालेय शास्त्री उभे होऊन जाहीर करतात की मी करेन बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था, बॅरिस्टर आंबेडकरांची राहण्याची व खाण्या पिण्याची सर्व सोय मी  माझ्या घरी करण्यास तय्यार आहे.
एका भिक्षुकानी सर्व जबाबदारी स्वत:वर घेतल्यामुळे बहुजन समाज एका मोठ्या संकटातून सुटल्यागत श्वास घेतो. पण भिक्षुकी करुन जगणा-या ब्राह्मणावर आस पासच्या गावची लोकं बहिष्कार टाकणार व त्याचे जगणे मूश्किल करणार हे दिसत होते. त्याच्या भिक्षूकीच्या व्यवसायावर संकट कोसळणार हे उघड होते. तो प्रश्न निकाली काढण्यासाठी आस पासच्या चौदा गावच्या लोकांची दुसरी मिटिंग भरवून तसा बहिष्कार टाकण्यात येऊ नये म्हणून एक ठराव पास करण्यात आला. एवढं करुनही काही चित्पावनानी मराठ्याना या भिक्षूकाच्या विरोधात उठविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. सर्व मराठा (व ईतर बहूजन) समाजानी बाबासाहेबांची जबाबदारी एक भिक्षूकाच्या माथी मारली व शिवजयंतीच्या कार्यक्रमात सुधारणावादी असल्याचा आव आणत मोठ्या तो-यात फिरत होते. पालेय शास्त्री नावाचे ब्राह्मण गृहस्थ मराठ्यांच्या या डबडल स्टॅंडर्डनी अवाक झाले. अन बाबासाहेबांचे आदरातिथ्य करण्यात व्यस्त झाले.

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १


  जयभीम मित्रहो.
भवानीचं चित्र असलेलं पत्र.
संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघानी बाबासाहेबांच्या नावानी जी काही चळवळ रुपी विपर्यासाची विकृती चालविली आहे ती आता थेट बाबासाहेबांवर घाला घालण्याच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. नेटवर अन सर्वत्र या लोकानी असा प्रचार चालविला आहे की बाबासाहेब हे शिवाजी महाराजांचे भक्त होते वा भवानी देवीचे ते भक्त होते. अन पुरावा म्हणुन त्यांचे अगदी सुरुवाते पत्र पुढे केले जाते ज्यावर जय भवानी असे लिहले आहे. तेंव्हा सर्व बौद्धाना सुद्धा शिवाजी महाराज पुज्यस्थानी आहे. तसेच भवानी माताही आहे. एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे. प्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते काबाबासाहेबानी तुकारांमाचे काही कोट्स कुठल्या संदर्भात वापरले व त्याचा विपर्यास ब्रिगेडी लोकानी कसा चालविला आहे यावर मी लवकरच लेखमालीका (अस्सल पुराव्यांसकट) चालु करणार आहे. पण तत्पूर्वी हे शिवाजी व भवानीचा विपर्यास परतवून लावण्यासाठी आधी अस्सल पत्रांचे नमूने टाकतो आहे.
अगदी सुरुवातीला बाबासाहेबानी आपल्या लेटरहेडवर भवानीचे चित्र व तलवार अन पेन छापून घेतले होते. त्याचे कारण असे आहे की बाबासाहेबांचे मुळ आडनाव सपकाळ अन देवी भवानी ही सपकाळांची कुलदेवता. म्हणुन बाबासाहेबानी तसे चित्र छापून घेतले. पण नंतर हळू हळू त्यानी या देवताना हद्दपार करुन निरिश्वरवादी बौद्ध धर्माला आदर्श मानुन समतेची मुल्ये स्विकारली. पण ब्रिगेडी लोकांनी बाबासाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या ( व नंतर टाकुन दिलेल्या) या भवानीचं भांडवल करुन बाबासाहेबांच्या चरित्रात शिवाजी घुसडविण्याचा चंग बांधला आहे. पण सुदैवाने बाबासाहेबांच्या एकून वाटचालीत कसा बदल झाला हे दर्शविणार सगळे अस्सल पत्र व लेटरहेट माझ्याकडे असल्यामुळे मी ते सर्व पत्र ईथे कालक्रमानूसार मांडणार आहे. आपल्या लोकांनी आता जागं व्हावं अन ब्रिगेडच्या विपर्यासाला विरोध करावा. आज जर आपण गाफिल बसलो तर उदया ब्रिगेडी बाबासाहेबांच्या चरित्रात दैवतांची घुसखोरी करवून इतिहास विकृत केल्या शिवाय थांबणार नाहीत.


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२

मे १९३१ मधले पत्र जिथे भवानी नाही.
हे बघा मित्रानो,
१९३१ मधिल हे पत्र व त्या लेटरहेड वरील चित्रातील बदल हे सांगते की बाबासाहेबानी भवानीला जयभीम ठोकला अन आपल्या लेटरहेडवर आता फक्त तलवार व लेखनी एवढचं ठेवलं. 
पहिल्या पत्रात तलावर अन लेखनी सोबत तो-यात दिसणारी भवानी माता ईथे बाबासाहेबानी सन्मानपुर्वक बाजूला सारून आपण त्या विचारधारेपेक्शा वेगळ्या विचारधारेचे आहोत याचा पुरावा दिला. आपल्या हजारो पिढ्यानी ज्या भवानीला कुलदैवत म्हणुन जोपासले त्या देवीचा सुरुवातीला बाबासाहेबानाही अभिमान वाटे हे पहिल्या लेटरहेडवरुन खुलासा होतो. पण आता मात्र ती देवी माझ्या वा माझ्या बांधवांच्या दु:खाचे निवारण करणार नाही व नुसती फसवी अन आभासी आदर्श बाबासाहेबानी ओळखली अन लगोलगो त्याना आपल्या आयुष्यात काहिच स्थान नाही हे सिद्ध करणारा पुरावा म्हणजे या दोन लेटरहेडमधील बदल होय.
बाबासाहेबांच्या जीवनात एक एक गोष्ट कशी बदलत गेली. त्यानी एकदम धर्मांतर केला नसुन तो विचार हळू हळु कसा आकार घेत गेला याचा अंदाज तुम्हाला या अस्सल पत्रांच्या लेखमालिकेतुन येईलच. बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील अन शेवटच्या काळातील परस्पर टोकाचे वाटणारे धार्मिक विचार मधल्या काळातील एकंदरीत जुलमी अन जातियभेदाच्या समर्थन करणा-या हिंदूमुळे आकार घेत गेले. बाबासाहेबानी स्वत: आपल्यातील हिंदुला विसर्जीत करायला सुरुवात केली. बाबासाहेबांचे वडील अत्यंत धार्मिक हिंदु गृहस्थ होते. लहानपणी त्याना श्लोक व स्त्रोते म्हटल्याशिवाय सायंकाळचे जेवण मिळत नसे. अशा धार्मिक वातावरणात ज्याची जडण घडण झाली त्या बाबासाहेबानी आतल्या हिंदूचे विसर्जन करायला बराच वेळ लागेल हे ताळले होते. अन वरील पत्रांतील नमुन्यातुन ती आतमधल्या हिंदुच्या विसर्जनाची श्रुंखला आपल्याला बघता येईल.


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३

१९३१ च्या शेवट पर्यंत बाबासाहेबानी आपल्या लेटरहेड मधे केलेला बदल अत्यंत उल्लेखनीय आहे. आज पर्यंत जे बाबासाहेब जय भवानीच्या लेटरडवरुन सर्व पत्रव्यवहार चलवित त्यानी १९३१ च्या शेवटी तो लेटरहेड बाद केला. या नंतर कधीच त्यानी जयभवानी वा आपल्या कुलदेवीच्या नावाचं लेटरहेड वापरलं नाही. यापुढील सर्व पत्र हे त्यांच्या नावानी छापलेल्या लेटरहेडवरच दिसतील.
बाबासाहेबांच्य पुढील सर्व पत्रव्यहारातील लेटरहेडवर त्यांच्या नावाखाली त्यांचे शिक्षण व पदव्या छापलेल्या दिसतात. खरं तर १९३० च्या आधिच त्यानी या सगळ्या पदव्या मिळविल्या होत्या. पण आता पर्यंत त्यानी त्या पदव्यांच्या ऐवजी भवानीला स्थान दिले होते. परंतू महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या विचारांमधे अमुलाग्रह बदल घडून आला.
त्यानी प्रत्येक गोष्टीला चिकित्सकपणे पाहणे सुरु केले. किंवा आपण जे करणार त्याचं अनुकरण माझा भोळा समाज करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बाबासाहेबानी प्रत्येक कृती करताना ती पुढे अनुयायांद्वारे अनुकरण करण्यात येणार आहे तेंव्हा ती अत्यंत विचारपुर्वक केली जावी यावर कटाक्षाने लक्ष दिले. अन्यथा माझा बांधव भरकडला जाऊ शकतो याची त्याना जाण होती.
याचाच परिणाम म्हणुन बाबासाहेबानी आपल्या कृतून भवानी देवीला बगल दिली अन दलिताना निरिश्वरवादाच्या दिशेनी पाऊल टाकण्याचा संकेत दिला.



बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०४


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०५




























बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०६



























बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं- ०७
















































































बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - १०

१९५५ पर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांच्या लेटरहेड्सनी कसा प्रवास केला याचा आपण धावता आढावा घेतला आहे. माझ्याकडे सुमारे १५० पेक्षा जास्त अस्सल हस्तलिखीत पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या नावानी कुणी काहिही बरळत सुटले आहेत. आमच्या पुढेच त्यांच्या चरित्रात विपर्यास करण्याचा कट चालविला जात आहे. ज्याना कुणाला बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही असली कागदपत्रांची खात्री करुन घ्यावयाची आहे त्यानी मला संपर्क साधावा. मी तसे कागदपत्र उपलब्ध करुन बाबासाहेबांबद्दल निर्माण केला जाणारा संभ्रम दुर करण्याचे माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न करीन.
सगळ्याना एकच विनंती आहे. संभाजी ब्रिगेड वा मराठा सेवा संघ जर बाबासाहेबांबद्दल काही सांगत वा लिहत असेल तेंव्हा त्यावर विश्वास ठेवू नका. हि लोकं आपल्या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांना चख्ख शिवाजी व भवानीचा अनुयायी बनविन्याचे षडयंत्र चालविले जात आहे.
ज्या तुकाराम महाराजाना नाकारुन बाबासाहेबानी कबिराना गुरु मानले त्या तुकाराम महाराजाला बौद्ध मंचावर जगतगुरु म्हणुन घुसडण्याचा कट ब्रिगेड व मराठा सेवा संघाने चालविला आहे.
तेंव्हा सर्व बौद्ध बांधवाना परत एकदा विनंती करतो की त्यानी ब्रिगेड वा मराठा सेवा संघाकडून होणा-या बाबासाहेबांच्या विपर्यास परतवुन लावण्यास सज्ज व्हावे.
जयभीम.
















कार्ला लेण्यांवर एकवीरा देवीचे अतिक्रमण



कार्ला लेण्यांवर एकवीरा देवीचे अतिक्रमण



फोटो नं. १


कार्ल्याच्या लेण्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. पण एकवीरा नावाच्या देवीने ईथे घूसखोरी केलेली आहे. आमच्या या बौद्ध लेण्यांच्या मुख्य़ द्वारातच एकवीरा देवीनी आपलं बस्तान बसवलं. कार्ल्याच्या लेण्यातील मुख्य बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच उजव्या कोप-यात एकवीरा देवीचं हे मंदीर म्हणजे बौद्ध धर्मीयांचा हिंदूनी केलेला जातीयवादी छळ होय. मंदिर बनवायचंच होतं तर संबंध डोंगर पडलं होतं. किंवा दुसरीकडेही मोकळी जागा होती. पण मंदिर उभं करण्या मागचा हेतू जातीयवादी असल्यामूळे बौद्ध स्तूपाच्या अगदी दारातच हे मंदीर उभं करण्यात आलं. या मंदिरामूळे आत जाण्याचा अर्धा मार्ग हिंदूनी गिळंकृत केला. आपल्याला आत जाण्यासाठी अर्धाच रस्ता सोडण्यात आला.



फोटो नं. २ 
या फोटोट देवीचं मंदिर थोडसं दिसतं. त्या उजव्या कोप-तात निट बघा. अन तिकडे मागे जे दिसत आहे ते बौद्ध स्तूपाच्या मूख्य द्वाराचा भाग आहे. अगदी या मूख्य द्वारातच देवीला बसायची ईच्छा झाली. ती देवी आहे, कुठेही बसू शकते.  



फोटो नं. ३
या फोटोत मधोमध जे  शेंदूरी रंगाचा मंदिर दिसतेय ते एकवीरा देवीचं मंदिर आहे. आत जाणा-या मूख्य वाटेतील हे मंदिर बौद्ध स्तूपावरील अतिक्रमण होय हे सांगण्याची गरज नाही ईतकी बोलकी परिस्थीत असुनही आम्हाला ब्र शब्द बोलण्याची परवानगी नाही. 



फोटो नं. ४
हा फोटो बघा. बौद्ध स्तूपात जाणारा हा एकमेव रस्ता. समोर दिसतय ते भव्य बौद्ध स्तूपाचं प्रवेश द्वार. डाव्या बाजूल दिसणारा भव्य स्तंभ हा अशोक स्तंभ होय. चउजव्या हाताला दिसणारा पसारा/बांधकाम हे एकवीरा देवीने स्तूपाच्या प्रवेशद्वारावर केलेलं अतिक्रमण होय. पायत चपला नघालता चालणारी जी लोकं दिसतायत ती सर्व देवभक्त होतं. अगदी प्रवेशद्वारावर होम-हवन घालण्यात आला आहे.  या होम-हवनामूळे बौद्ध बांधवाना स्तूपात जाण्यासाठीचा मार्ग बंद करण्यात आला. जो पर्यंत होम हवन चालू होतं तो पर्यंत बौद्ध स्तूपात जाण्यास बंधी घालण्यात आली. त्या नंतरही कित्येक तास लोकांनी होम हवनातील राख  पवित्र राख म्हणून उचलण्याचा कार्यक्रम चालविला.




फोटो नं. ५
हा त्या प्रवेशद्वारातील डाव्या हातावरील भव्य अशोकस्तंभ होय. चार दिशांवर नजर ठेवणारे हे चार सिंह म्हणजे शत्रूच्या उरात धडकी बसविणारं प्रतीक. पण आज आमची अवस्था ईतकी बिकट व दुर्बल झाली की, सिंहांच्या पायथ्याशीच एकवीरेनी बस्तान मांडलं. वरुन स्तूपात जाण्याचा रस्ता अडविला.



फोटो नं. ६
या फोटोत बघा, कसं स्तूपाचं मुख्य़ दरवाजा एकवीरेनी हडपलाय. मुख्य दाराला थेटून बांधलेलं हे एकवीरेचं मंदिर बौद्धाना अव्हान देणारं आहे. या मंदिरात दर्शन घेणारे भक्त नुसतं दर्शन घेत नाहीत. तर प्रचंड प्रमाणात आरडा ओरडा चालू असतो. आत स्तूपात शांत पणे स्तूप दर्शन घेणा-या लोकाना याचा प्रचंड त्रास होतो. एवढयावरच थांबले तर ते हिंदू कसले. मंदिरावर लावलेलं लाऊडस्पिकर बघा. या लाऊड स्पिकर जोर जोरात वाजवून, एकवेरेची गाणी लावून बौद्ध बांधवाना भंडावून सोडविण्याचं काम भक्तगण करत असतात.


  
फोटो नं. ७ 
होम-हवन संपल्यावर सुद्धा स्तूपात जाणारी वाट मोकळी करण्यात आली नाही. उलट भक्तीभावाने होमचे दर्शन घेणारी लोकं अनवाणी पायानी कशी राख उचलण्यात मग्न झालित ते बघा. होम संपल्यावर सुद्धा आम्हाला प्रवेशा साठी आडकाठी आणणारी हि लोकं दांभिक नाहीत काय? तरी सुद्धा आम्ही शांत पणे प्रवेशासाठी संयमाचे धडे गिरवित होतो.

फोटो नं. ८
या फोटोत होम मधली राख उचलणारी बायी बघा. अन अगदी तीच्या मागे जे मंदिराचं दार आहे त्यातून भक्तांची उडालेली झुंबड बघा. बौद्ध स्तूपात जाण्यासाठी मार्ग कशा प्रकारे बंद करण्यात आला होता हे या फोटो अगदी स्पष्टपणे दिसत आहे.



फोटो नं. ९
स्तूपाचं मुख्य दार होम टाकून अडविल्यावर मनसोक्तपणे पूजा पाठ करणारे एकवीरा भक्त हे विसरलेत की आपण स्तूपाचं द्वार अडवून बसलो आहोत. याना स्तूपात जाणा-यांची गैरसोय होते यांशी काही देणे घेणे नाही. 



फोटो नं. १०
या फोटोतील लोकांच्या पायाकडे बघा. सर्व लोकं (एक सोडून) अनवानी पायानी होम दर्शनासाठी जमली आहेत. स्तूपात जाणारा रस्ता रोखून धरण्यात आला आहे. स्तूपात जाणा-याना दम भरण्याचं काम चालू होतं. उलट पक्षि होम जवळून चपला घालून चालू नका म्हणून आंगावर धावणारी लोकही होती. मूळात आमच्या रस्त्याव होम घातलाच कशाला असे विचारल्यावर उलटं आम्हालाच दम भरण्यात आला.





फोटो नं. ११
हा बघा बौद्ध स्तूपाचा भव्य असा मुख्य प्रवेशद्वार. अन त्या प्रवेश द्वारावरील अतिक्रमणरुपी एकवीरा मंदिर.

  

फोटो नं. १२
स्तूपाच्या प्रवेश द्वारातीवरील होम, अन या होमचे दर्शन घेऊन मंदिराच्या आत डोकावणारी हि लोकं. खरंतर फोटोत दिसणारं बौद्ध स्तूपाच्या दिशेनी उघडणारं हे दार बंद होतं. तरी सुद्धा भक्तानी त्या दारात गर्दी केली व स्तूपाचा रस्ता रोखून धरला. स्तूपात जायला पुर्णपणे अडवणूक केली गेली होती.



फोटो नं. १३
हा बघा मंदिराचा तो दरवाजा जो बौद्ध स्तूपाकडे उघडतो. या दरवाजातून देवीचे दर्शन घेणा-यांची अधून मधून उडणारी झुंबड बौद्ध स्तूपाच्या वाटेत थेट अडथडा निर्माण तर करतेच पण वरुन त्या वाटेत घातलेल्या होम-हवनानी आज बौद्ध बांधवांची पार वाट लावली.


फोटो नं. १४ लोकांनी स्तूपाच्या दिशेला उघडणा-या दारातून दर्शनासाठी कशी गर्दी केली ते बघा. 


फोटो नं. १५
या फोटोत बघा. दोन माणसं होमातील राख उचल आहेत. त्याच बरोबर देवभक्त देवीच्या दारात उभं राहून दर्शन घेत आहेत. पाय-या व होम मधिल अंतर बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे स्तूपाची वाट रोखण्यात आली होती. त्याच बरोबर वाटेत उभी माणसही बघा, ती सर्व देवीचे भक्त आहेत. एकाच्याही पायात चपला दिसत नाहीत.



फोटो नं. १६,
पूजेचं ताट घेऊन थाटात मिरवणारे भक्तगण. पण या भक्ताना एवढं सुद्धा भान नाही की ते जिथे वावरत आहेत ती जागा बौद्धांची आहे. व मागे जे दिसत आहे ते पवित्र स्तूप आहे.

फोटो नं. १७,
ईथेतर लिटरली होमच्या दर्शनासाठी लोकांची झूंबड उडाली. स्तूपाचा रस्ता पुर्णपणे रोखण्यात आला. याला काय म्हणावे तेच कळत नाही.   

फोटो नं. १८,
होम-हवनाचं दर्शन घेणारे हे सर्व भाविक बौद्धांचे मारेकरी आहेत असे मी मानतो. बौद्धांच्या पवित्र स्तूपावरील आक्रमणाचा हा नजारा तळपायाची आग मस्तकात नेणारा आहे. मी स्वत: हे सर्व पाहताना अस्वस्थ होऊन गेलो. 


फोटो नं. १९
होम संपल्यावर ही स्थीती आहे तेंव्हा होम चालू असताना काय तमाशा चलला असेल जरा विचार करा. हजारो लोकांच्या अलोट गर्दिने या ठिकाणी होम हवनाच्या निमित्ताने स्तूपात जाणारा मार्ग अडवून धरला. या होमला आमदारअनंत तेरे आले होते. त्या सर्वानी मिळून बौद्ध स्तूपाच्या मुख्य दरवाजात जातीयवादी कृत्य रचले. मी अनंत तेरे याना फोन लावून या बद्दल विचारना केली. ते म्हणाले तुम्हाला हवं ते करा आम्ही तिथेच होम लावणार. हवं तर तुम्ही बौद्ध स्तूपात येऊ नका. एवढी मूजोरी करणारे जातीयवादी लोकं बौद्धांच्या संस्कृतीला एक दिवस मिटवूनच दम घेणार. यांचा बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे.



फोटो नं. २०
पुजेचं ताट धरुन फिरणारा हा पांढ-या शर्टातील माणूस बघा. अन त्याच्या शेजार पाजारची सर्व माणसं देवीची भक्त आहेत. ते सर्व अनवानी पायानी होमचे दर्शन घेत आहेत. या सगळ्यानी स्तूपाची वाट कशी रोखून धरली ते बघा.




फोटो नं. २१
हा दूरुन घेतलेला फोटो बघा. यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल की कशा प्रकारे भव्य अशा बौद्ध स्तूपाच्या मुख्य दरवाज्यात देवीचं मंदिर बांधून बौद्धांच्या पवित्र स्थानांवर आक्रमण करण्यात आलं. डाव्या बाजूला दिसणारं बौद्ध स्तूपाचं भव्य प्रवेश द्वार बघा अन त्याच्या शेजारीचा जातीयवादी मंदिर बघा.  राम मंदिराचं निमित्य करुन मुस्लिमांवर अतिक्रमणाचा अरोप करणार हिंदू व त्याच्या मदतीला धावणारा मिडीया हे दोघं मिळून अयोध्या प्रकरणावरुन देश पेटवून देतात. पण याच्या अगदी उलट हिंदूनी  ईथे बौधांच्या स्तूपांवर केलेल्या अतिक्रमणा बद्दल मात्र हाच मिडीया मूग गिळून बसतो. किंबहून बौद्धाना दामदाटी करुन पिटाळून लावण्यात येते. काल अशोक विजयादशमीच्या शूभदिनी धम्मकच्रपर्वतनाच्या निमित्तानी मी सहकुटुंब या ठिकाणी गेलो. तेंव्हा हा प्रकार बघून थक्क झालो. मी विरोध केला, पण मला दम भरण्यात आलं. मी थेट आमदाराना फोन लावून विचारणा केल्यावर त्यानी सुध्दा मलाच दम भरला. उपस्थीत पोलिसांना भेटुन या बद्दल विचारल्यावर त्यानी हात झटकले. अशा वेळी आम्ही काय करावं? कुणाकडे जावं? मुस्लिमांच्या नावानी धर्मिक अतिक्रमणाचे खडे फोडनारे बौद्ध स्तूपावर अतिक्रमण करतात तेंव्हा कायदाही मदतीला येत नाही. आपण सर्वानी एकवटून या देवीला कार्ल्यातून पिटाळून लावता येईल का यावर विचार करु या. डॉ. परम आनंदनी ही मोहिम आधिच हाती घेतली आहे. आता गरज आहे ती आपण सर्वानी त्यांच्या या लेनी बचाव चळवळीला हातभार लावण्याची.


 
हा बौद्ध स्तूपाचा आत मधला फोटो
 
हा स्तूपाचा मुख्य भाग



तर असा आहे आतमधे आपला बौद्ध स्तूप.
----x----x----x----