सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२

शिवरायांचा इतिहास २०२०

  • शिवरायांचा इतिहास २०२


शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता कधी झाला याची तारीख राज्यशासन ठरवेल त्या तारखेला झाला अस मानायला काही हरकत नाही. त्यांची आई जिजाबाई. त्यांचे वडील शहाजी राजे. शिवरायांचे शिक्षण पुण्यातील रोझरी स्कूलमध्ये झाले. त्यांना दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी, तुकाराम महाराज या सर्व टीचर्स ने शिकवले. पण यातील कोणीच त्यांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीजामातेच्या सांगण्यावरून तोरणा गड जिंकून ‘हिंदी स्वराज्याची’ स्थापना केली. आणि स्वराज्याची पताका म्हणून तिरंग्याची निवड केली. शिवरायांनी एकामागून एक असे अनेक किल्ले जिंकून स्वराज्य चौफेर पसरले. परंतु शिवाजी महाराज कट्टर अहिंसावादी होते. अगदी महात्मा गांधी प्रमाणे. शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव आदिलशहाला डोळ्यात खुपणारा होता. म्हणून आदिलशहाने अफझल खानला शिवाजी महाराजांना समजावण्यासाठी पाठवले.
अफझल खान आणि शिवाजी महाराज खूप जुने दोस्त होते. अगदी लंगोटी यार. यावरून महाराज किती धर्म निरपेक्ष होते याचा अंदाज करायला हरकत नाही. आणि शिवाजी महाराज मशिदीत सुद्धा जायचे अफझल सोबत. मोठ्या लवाजम्यासह अफझल खान शिवाजी महाराजांना समजवायला. अफझल खान येतो आहे असे समजताच, राजे आनंदून गेले. प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराजांनी अफझल खानसाठी एक मोठा शामियाना उभारला. खान आला आणि महाराजांकडील ऐश्वर्य पाहून आनंदित झाला. महाराज आपल्या सोबत जीवा महाला घेऊन भेटीसाठी आले. जीवा महाला शामियाना बाहेर उभे राहिले. महाराज शामियान्यात गेले. दोघा मित्रांनी एकमेकांना पाहून कडकडून आलिंगन दिले. पण तेवढ्यात, अफझल खानला छातीत जोरात कळ आली.
आताच्या भाषेत ‘हार्टअटॅक’. महाराजांनी त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने अफझलखान वाचू शकला नाही. कळीच्या वेदनेने अफझलखान ‘बचाव’ म्हणून किंचाळला. अफझलखानाचा सच्चा सेवक सय्यद बंडाने शिवाजी महाराजांनी घात केल्याचा असा समज होवून, त्यांच्यावर वार केला. महाराजांना वाचवण्यासाठी जीवा महालाला सय्यद बंडाला मारावे लागले. ह्या घटनेने महाराजांना अतिशय दुख: झाले. महाराजांनी मुस्लीम पद्धतीने अफझलखानचे अंत्यसंस्कार केले. आणि त्याची एक कबर बांधली. आणि महाराज नेहमी त्या कबरीला भेट देत असत. परंतु याच घटनेचा काही समाजकंटकांनी महाराजांबद्दल अफवा पसरून आदिलशाही आणि शिवशाही मधील वैर वाढवले. हिंदू आणि मुस्लीम ऐक्याचे दोर त्यामुळे तुटले गेले.
अफझलखानाच्या मृत्यूमुळे आदिलशहा चिडला. महाराजांना संपवण्यासाठी त्याने सिद्धी जोहरला सर्व शक्तीनिशी पाठवले. शिवाजी महाराजांना ही बातमी कळताच पन्हाळगडावर गेले. परंतु सिद्धी जोहरने पन्हाळगडला वेढा देवून रसद तोडली. महाराजांनी काही काळ वेढा उठण्याची वाट पाहिली. परंतु सिद्धी जोहरचा वेढा काही उठेना. मग महाराजांनी शिताफीने विशालगडावर पोहचण्याचे ठरवले. एके रात्री महाराज सिद्धीच्या वेढ्यातून निसटले. सिद्धीस ही बातमी कळताच त्याने महाराजांचा पाठलाग करण्यास सुरवात केली. घोडखिंडीत महाराजांना सिद्धीने गाठले. बाजीप्रभूने महाराजांना विशालगडावर पोहोचायला विनंती केली. जोपर्यंत महाराज पोहचणार नाहीत तोपर्यंत बाजीप्रभूने सिद्धीच्या सैन्याला झुंझत ठेवण्याचे वचन दिले. महाराज गडावर पोहचले. परंतु तोफेच्या आवाजानंतर सिद्धीच्या विशाल सेनेपुढे बाजीप्रभूने आपले प्राण सोडले. महाराजांना ह्या गोष्टीमुळे अतोनात दुख: झाले. त्यांनी त्या घोडखिंडीचे नाव ‘पावनखिंड’ असे ठेवले.
त्याकाळी मोगल सम्राट भारतात सर्वात प्रबळ होते. त्यातील सर्वात प्रबळ मोगल म्हणून औरंगजेब दिल्लीचा बादशहा होता. परंतु राज्य शासनाच्या समितीच्या सूचनेनुसार हा भाग वगळण्यात आला आहे. शिवरायांच्या बंदोबस्तासाठी औरंगाजेबने त्याचा मामा शाहिस्तेखानला स्वराज्यावर पाठवले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. महाराजांनी शाहिस्तेखान भेटीसाठी निघाले. परंतु पोचायला रात्र झाली. अंधारात महाराजांना पाहून शाहिस्तेखान गडबडला. आणि अंधारात त्याला पुढे काही न दिसल्याने खिडकीतून पडला. परंतु महाराजांनी त्याला हात देवून वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काच कापल्याने शाहिस्तेखानची बोटे कापली गेली. महाराजांनी मारण्याचा कट केला अस समज करून शाहिस्तेखान पळून गेला. आणि त्यामुळे औरंगजेब अजूनच चिडला. यापुढील इतिहास भाग राज्य शासनाने वादग्रस्त ठरवून अभ्यासक्रमांतून गाळण्याचा निर्णय घेतला असल्याने महाराजांचा इतिहास सध्याला तरी इतकाच आहे.

                                                                                                                            - तिन जाव.

1 टिप्पणी:

  1. आपल्याकडे याचे काही पुरावे आहेत का खान आणि शिवरायांचे मित्र कुठे काय नाते जुळते का इतिहास चुकीचा सांगू नका सत्य हे सत्य असते खानाला मारावे लागले न कि खान हार्ट अटक नि मेला आणि शिवरायांनी त्याला वाचवले असा कोणत्या बखरीमध्ये उल्लेख आहे आणी तुमच्याकडे असेल तो द्यावा कारण इतिहास सत्याचा लिहावा उगाच खोटा इतिहास तरी सांगू नका ब्राह्मणी साहित्यीकार मंडळीनी चुकीचा इतिहास लिहिला म्हणून प्रतिशोध म्हणून मुस्लिम ऐक्यासाठी असली फालातुगीरीन करू नका

    उत्तर द्याहटवा