शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

● चळवळी बर्बाद का होतात?

● चळवळी बर्बाद का होतात?

चळवळी बर्बाद का होतात? चळवळ उभे करणारे कधीच या प्रश्नाचा गांभिर्याने विचार करत नसतात. आंबेडकर चळवळ - रिपब्लिकन चळवळ नव्या दमाने उभी व्हावी असे अनेकांना वाटते. मागच्या पन्नास वर्षात अनेक व्यक्ती आले ज्यांनी आंबेडकरी - रिपब्लिकन चळवळी उभारण्यासाठी प्रयत्न केले. पण शोकांतीकाच म्हणावी लागेल की त्यांच्या चळवळी उभ्या राहु शकल्या नाहीत. आज ही अनेक प्रामाणिक लोक प्रामाणिकपणे चळवळ उभी राहावी म्हणून प्रयत्नरत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांचे फलीत कायम स्वरुपी असेल काय? माझ्या सारख्याला तरी "नाही" असे च उत्तर द्यावे लागेल. याचे कारण चळवळी निर्माण करता वेळेस त्या बर्बाद होऊ नये म्हणून ब्रर्बाद झालेल्या मागच्या लोकांनी ज्या चुका केल्या आहेत. त्या बर्बादीतुन जी कारणे पुढे आली आहेत. त्या चुकांचा, कारणांचा ही मंडळी विचारच करताना दिसत नाही. म्हणूनच मला असे वाटते की जे बर्बादीच्या कारणांचा, चुकांचा विचार करत नाही आणि त्यातुन काही शिकत नाहीत. त्यांच्या चळवळी काही काळा पुरत्याच मर्यादित असतात.

अनेकांना तसा अनुभव आलेला असेल. चळवळी मुख्यत्या कोणत्या कारणांनी तुटत असतील तर पद, पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी चळवळीतील व्यक्ती मध्ये होत असलेला झगडा. ही बाब चळवळ चालविण्याऱ्यानी लक्षात ठेवली तर ते चळवळीच्या दृष्टिने बरे होईल. या ठिकाणी मी चळवळ संस्था - संघटना या अर्थाने वापरत आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. चळवळ - संघटन उभे राहावे असे मला सुध्दा इतरांप्रमाणेच वाटते.

• कायम स्वरुपी चळवळ उभी करण्यासाठी महत्वाच्या बाबी :

१) चळवळ ही लोकशाही प्रधान असावी. म्हणजे लोकशाही मार्गाने तीची वाटचाल झाली पाहिजे.

२) नेतृत्व बुध्दीवादी, प्रामाणिक, नैतिक आणि समर्पित असले पाहिजे.

३) चळवळीला बुध्दिवादी नेतृत्वाची आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची आवश्यकता असते.

४) बहुमतानी ठरलेला निर्णय बहुसंख्याकांनी आणि अल्पसंख्यांनी मान्य केला पाहिजे. "मै बोलु वो कायदा" असे नकोच.

५) चळवळीला अधिकृत प्रवक्त्यांची अत्यंत गरज असते. चळवळीत जे शिजेल ते प्रवक्त्याच्या माध्यमातुन जाहिर व्हायला पाहिजे. त्याचेच लालन - पालन अनुसरन कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.

६) संघटने पेक्षा कोणताही पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता मोठा नाही हे मान्य केले पाहिजे.

७) चळवळीचे ध्येय आणि कार्य प्रणाली स्पष्ट असली पाहिजे.

८) नेता, पदाधीकारी, कार्यकर्ते यानी आपले मतभेद संघटनेच्या अखत्यारीत राहुनच सोडवावे. त्यांना सार्वजनिक करता कामा नये.

८) नेतृत्वाने चळवळीच्या ध्येय - उद्देश आणि बहुमताने ठरलेल्या निर्णया अनुरुपच वागले पाहिजे.

९) संघटनेतील प्रत्येकाने बहुमताने जे ठरलेले असेल त्याला कोणत्याही प्रकारचा जाहिर विरोध करु नये. त्या निर्णयानुरुप त्याने कार्य हे केले पाहिजे.

१०) चळवळ ही व्यक्तिगत विरोधावर उभी असता कामा नये. विरोध हा वैचारिक आधारावरच असला पाहिजे.

११) संघटना ही कोणत्याही विशिष्ट समुहापुरती मर्यादित राहता कामा नये. इतर समुहातील लोक, संघटनातील लोक आपल्या संघटनेच्या प्रवाहात कसे सहभागी होतील. असा सर्व समावेश आणि विशाल दृष्टिकोन जोपासुन कार्यरत असले पाहिजे. हे नेतृत्व, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आवश्यक आहे.

१२) आर्थिक व्यवहार हा पारदर्शी असला पाहिजे. पैशाचा सदुपयोगच झाला पाहिजे. कोणत्याही एका व्यक्तीच्या हाती पैशाचा व्यवहार असता कामा नये.

१३) कार्यकर्त्यांत उत्साह, चैतन्य निर्माण करण्यासाठी संघटनेने वेळोवेळी कार्यक्रम दिले पाहिजेत. असे झाले नाही तर कार्यकर्ता निरुत्साही बनेल. त्याच्यात संघटने विषयी उदासिनता निर्माण होईल.

१४) संघठनेच्या शाखांवर मुख्य शाखेने लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना कार्यक्रम पुरविले पाहिजेत. दिशा दि्ग्दर्शन केले पाहिजे. शाखांची सदस्य संख्या वाढत नसेल तर त्या कां वाढत नाही याची विचारपुस झाली पाहिजे आणि मुख्य शाखेकडून त्या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन केले गेले पाहिजे आणि ज्या शाखांची सदस्य संख्या वाढत असेल त्यांना अधिक उत्साह देणे मुख्य शाखेचे कार्य असावे. लहान मोठ्या शाखांच्या संपर्कात नेहमीच मुख्य शाखेने राहिले पाहिजे. त्यांच्या कडून अर्ध वार्षिक अहवाल मागीतला पाहिजे. या शाखांना मनमर्जी प्रमाणे चालण्यास मनाई असेल. या शाखांनी सुध्दा काही कार्य करण्यापुर्वी मुख्य शाखेशी संपर्क करुन तशी परवानगी घेतली पाहिजे.

१५) संघटनेच्या ध्येयानुरुप कार्यकर्ते तयार करण्यासाठी नियमित कार्यशाळा राबविल्या गेल्या पाहिजेत.

१६) कोणत्याही नवीन कार्यकर्त्याला एकदम पदाधिकारी बनविण्यात येवु नये. त्याला कमीत कमी ६ महिने ते १ वर्ष पर्यंत हितचिंतक कार्यकर्ता म्हणून कार्य करु द्यावे. त्यानंतरच त्याच्या निष्ठेला घेवुन त्याला पदाधिकारी बनण्यास मान्यता द्यावी.

१८) संघटना चालविण्यासाठी कार्याचे विभाजन केले जावे. जसे काही जनांनी विध्यार्थ्यांच्या हिताचे कार्य करावे. काहींनी शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करावे. काहींनी बेरोजगारांच्या हिताचे कार्य करावे. काही लोकांनी झोपडपट्टी वासियांच्या हिताचे कार्य करावे. काहींनी मजदुरांच्या हितासाठी कार्य करावे. इत्यादी. या सर्वांसाठी सह संघटना असाव्यात. मात्र त्या सर्वांची नाळ मुख्य संघटनेशी जोडलेली असावी. मुख्य संघटनेत या प्रत्येक सह संघटनांचे प्रतिनिधी असावे आणि मुख्य संघटनेच्याच मार्गदर्शना खाली या सह संघटनांनी कार्य केले पाहिजे.

१९) संघटनेच्या नेतृत्वाने, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वत:च्या प्रतिष्ठे पेक्षा संघटनेच्याच प्रतिष्ठेसाठी झटले पाहिजे.

२०) नैतिकता, शिस्त, समर्पित भावना, ध्येयनिष्ठा यांनी कार्यकर्ता मुख्यता पदाधिकारी आणि नेतृत्व परिपुर्ण असले पाहिजे.

अशा काही प्राथमिक बाबी संघटना चालविण्यासाठी आवश्यक असतात. असे मला वाटते. या पेक्षाही अधीक चांगल्या सूचना पुढे येवु शकतील. अहंकार आणि पद, पैसा, प्रतिष्ठा यातुन उत्पन्न होणारे मतभेद चळवळीला जास्त काळ जगु देत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच चळवळीच्या यशस्वीतेसाठी विनम्र मनाची, सर्वांना घेवुन चाळण्याची मानसिकता, सुसंवाद साधण्याची कला, संघटनेचे कार्यक्रम, कुशल संघटकत्व, मतभेदांचे अंतर्गत निवारण या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
तक्षक लोखंडे (एक ज्वलंत आंबेडकरी विचारवंत)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा