शुक्रवार, ५ ऑक्टोबर, २०१८

● चला बौद्ध धर्माचे अनुसरण करूया.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

     ● चला बौद्ध धर्माचे अनुसरण करूया.
                  लेख - उमेश गजभिये

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

"बाबासाहेबांचे बौद्ध धर्म (धम्म) दीक्षा हे साध्य नव्हे." असा आरोप अनेक वर्षांपासून समाजातील स्वतःला आंबेडकरी समजणारे बामसेफवादी, मूलनिवासीवादी, बहुजनवादी, दलितवादी लोक म्हणतात. याचाच असा अर्थ निघतो कि - बाबासाहेबांनी घेतलेला बौध्द धर्म हा साध्य म्हणजेच सिद्धता किंवा साबित करणे. याबाबत नव्हता तर तो कुचकामी होता. बाबासाहेबांचा सर्व लढा हिंदू धर्माच्या पवित्र मानणाऱ्या शास्त्रा विरोधात व हिंदू धर्माच्या विरोधात होता व अस्पृश्य लोक, वंचित लोकांच्या हिंदू धर्माच्या गुलामगिरीतून मुक्तते करिता होता व हे परिवर्तन बौद्ध धर्माच्या स्वीकारल्या मुळेच होऊ शकते. हे बाबासाहेबाना माहित होते व त्यामुळे हा लढा धर्म परिवर्तन करिता होता.

१९५० च्या संविधानामुळे अस्पृशांची सर्व प्रश्न सोडवल्या गेले होते व सर्व भारतीयांना मूलभूत अधिकार व कर्तव्य निश्चित करण्यात आली. त्यामुळे संविधानामुळे जर अस्पृशांचे सर्व प्रश्न सुटले असते. तर बाबासाहेब हे "बौध्द धर्म" घेण्याच्या भानगडीत कशाला पडले? त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी हिंदू धर्मातच राहायला पाहिजे होते. मग बाबासाहेबांनी बोध्द धर्म का घेतला? हे समजून घेणे महत्वाचे आहे. बाबासाहेबांचे आयुष्यभरातील तत्वज्ञान हे बौध्द धर्म सोडून होते काय? आज इतरांचा बौध्द धम्म (धर्म) व बाबासाहेबांचा बौध्द धम्म (धर्म) समजणे आवश्यक आहे.

काय आज भिक्खू संघ बाबाबासाहेबांनी सांगितलेला बौध्द धर्म अनुसरतात? त्रिरत्न बौद्ध महासंघाचे संघरक्षित, दलाई लामा व इतर राष्ट्रातील बौध्द हे बाबासाहेबांनी सांगितलेला बौध्द धर्म अनुसरण करतात काय? त्रिपिटक यातील बौध्द धर्म बाबासाहेबांना मान्य होता काय? मग बाबासाहेबांनी आम्हाला कोणता बोध्द धर्म दिला? बाबासाहेबांचा बौध्द धर्म व दुसऱ्या बोद्धांचा बौध्द धर्म काय सारखा आहे? या सर्वांचे उत्तर आपले लोक देतील, अशी आशा बाळगतो.

दलित, मूलनिवासी, बामसेफवादी, बहुजन किवा रिपब्लिकन हे सर्व काय हिंदू धर्मात राहून स्वतः ला 'आंबेडकरी चळवळ' म्हणू शकतात काय? आंबेडकरी तत्वज्ञान काय बुद्धाला सोडून आहे? बाबासाहेबांचे तत्वज्ञान हे बुध्द प्रणीत आहे. त्यामुळे ते स्वीकाराचे असेल तर अबौद्ध राहून स्वीकारता येत नाही. त्याकरिता बौध्द धम्म स्वीकारावा लागेल.

◆◆◆

लेख -
उमेश गजभिये
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा