बुधवार, ७ जून, २०१७

● शेतकरी दिवस (कविता)

●शेतकरी दिवस

झाला झाडू दिवस,
झाला योगा दिवस ।
कधी येतोय साहेब,
आमचा शेतकरी दिवस ।।धृ।।

पन्नास किलोची गोणी,
बघा उचलून डोक्यावर ।
तीन - तीन हांडे पाणी,
आणून दाखवा डोक्यावर ।।१।।

शेतकऱ्याच्या सूखासाठी,
करा एकदा नवस ।
कधी येतोय साहेब,
आमचा शेतकरी दिवस ।।२।।

पोटाची खळगी तुमची,
ठेवा जरा उपाशी ।
शीळी भाकर खा आमची,
नका खाऊ तुपाशी ।।३।।

आमच्या बापा सारखा,
काढा एक तरी दिवस ।
कधी येतोय साहेब,
आमचा शेतकरी दिवस ।।४।।

नांगर धरून शेतात,
चालवून दाखवा दिवसभर ।
गळक्या पत्राच्या घरात,
राहून दाखवा रातभर ।।५।।

बिना लाईटची बघा,
आमची रोजची अमावस ।
कधी येतोय साहेब,
आमचा शेतकरी दिवस ।।६।।

विधवा झालेली शेत करीन,
बघा तिचे हाल ।
शेतात राबणारी मोल करीन,
घरा विना बेहाल ।।७।।

तिचेही येऊ द्या साहेब,
एकदा सुगीचे दिवस ।
कधी येतोय साहेब,
आमचा शेतकरी दिवस ।।८।।

कवी -
संजय बनसोडे
(लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा