शनिवार, १४ ऑक्टोबर, २०१७

● तू मला जीवदान दिले. (कविता)

● तू मला जीवदान दिले.

हे क्रांती सुर्या,
माझ्या पायातली जखड बंद,
साखळी फोडणाऱ्या लोहारा ।
लोहार कसला तर मातीतून,
सोने पिकवनारा सोनार आहेस तू ।।धृ।।

कडाकडा मोडून काढला माझा जाच,
चबुकाचे फटकार ओढून ओरबडून,
तू त्यांची आई माई एक केली ।
तू कोणासाठी लढला अन का लढला,
हे मी डोळे झाकून विचारणार नाही,
पण माझा नवा इतिहास तू घडवला ।।१।।

गमावलेला गंगाधर अन,
संसाराची झालेली धुळघान ।
भले भले पंडित तुझ्या,
पुढे अक्षरशा लोळु लागले ।
सुलगलेला त्यांचा मेंदू तू,
खलबत्यात ठेसून काढला ।।२।।

सोंगा - ढोंगाचे वागने,
तुला कधीच पटले नाहीं ।
ना तू उभ्या आयुष्यात,
कोणाला महात्मा म्हटला ।
रात - दिवस लढताना समतेची लढाई,
तुझ्या लाल झालेल्या बूबळांची ।
साक्ष खाच पडलेल्या डोळ्यांची,
तुझ्या कर्जाचे इनस्टॉलमेंट भरणे अशक्यच ।।३।।

मला सारं अठवतय आज,
मुक्तीची घोषणा अन ,
धडाधड़ जाळलेला मनु ।
नमवून काळा त्याला चवदार पाणी,
पाजणारा तू एक अद्वितीयच ।
दंड थोपतुन उतरताना तू,
बिलकुल मागे पुढे पाहत नव्हता ।
तुझ्या डरकाळीने सारे रान भिदरुन जाई,
झांबरु लोक करपुन जाई ।
करकट मरकट होउन पाय लावून पळाले,
तू मात्र करुणेने पेटवित गेला विषमतेचा डोंगर ।।४।।

बुद्धं सरणं गच्छामि म्हणत,
तू अशोका, महामोगलायन,
सरिपुत्त, आनंदाच्या पंक्तीत बसला ।
हे बोधिसत्व, मला कडकडून मीठी मारत,
करोडोंना बुद्धाच्या ओटित टाकलं,
अन माझे जग बदलले ।
माझी वेदनेची गाथा तू हेरून नागांच्या,
नगरीत गार पाण्याचा घोट कंठात ओतला ।
तू मला दीक्षा दिली, दीक्षा कसली रे,
तू मला जीवदान दिले ।।५।।

कवी -
निलेश यशवंत आंबेडकर : नाशिक
(लेखक, विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा