सोमवार, १२ मार्च, २०१८

● बुधभूषण आणि बुद्धा संबधी निर्माण करण्यात येणारे गैरसमज

● बुधभूषण आणि बुद्धा संबधी निर्माण करण्यात येणारे गैरसमज

सूचना - 
"जनहितार्थ माहिती लहान ते वयोवृद्ध लोकांपर्यंत पोहचवणे, जेणे करून लोकांचा अफ़वा वरील विश्वास उडेल आणि लोक डोळस बनतील. ऐतिहासिक माहिती जाणून घ्यायची झाली तर त्याचा सलोख अभ्यास करावा, कृपया फसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये." - यतिन जाधव

लेख -
किशोर चहांदे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

संभाजी राजाने बुधभूषण ग्रंथ लिहिला आहे. बुधभूषणचा संबंध बुध्दाशी जोडण्यासाठीची एक पोस्ट "व्हाट्सअँप" (WhatsApp) वर सतत फिरत होती. बुधभूषण चा संबंध बुध्दाशी जोडून बहूजनवादी मानसिकता आंबेडकरी समाजात प्रदुषण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती. म्हणून हा लेख प्रपंच.

बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागीना अर्थात विद्वानांचा दागीना असा अर्थ असलेला 'श्री बुधभूषण' हा छत्रपती संभाजी राजांच्या लेखनीतुन साकारलेला संस्कृत ग्रंथ आहे. डॉ. प्रभाकर ताकवले यांनी मराठीत अनुवाद केले असून ॲड. शैलजा ज्ञानेश्वर मोळक यांनी ग्रंथाचे संपादन केलेले आहे. या ग्रंथाला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची प्रस्तावना आहे. ३३५ पानांचा हा ग्रंथ जिजाईने प्रकाशित केला आहे. प्रा. अधिक देशमुख यांचे कडून सन १९२६ साली प्रा. ह. दा. वेलनकर यांनी संपादीत केलेली व भांडारकर संस्थेने प्रकाशित बुधभूषणची प्रत मिळाल्याचे प्रास्तविकात नमूद आहे. बुधभूषण संभाजी राजाने लिहिला नाही इथपासून ते त्यांनी लिहिलेला ग्रंथ वेगळाच असावा, हे सारे श्लोक कुणी तरी घुसडले असावेत. ही प्रत सत्यप्रत नाही. कवी कलशाच्या आहारी गेलेला राजा अशा प्रकारची मते या ग्रंथाच्या संबंधाने आहेत. संभाजी राजाने बुधभूषण हा ग्रंथ वयाच्या चौदाव्या वर्षी लिहायला सुरुवात केली व वयाच्या सतराव्या वर्षी लिहून पूर्ण केला. संस्कृत मध्ये लिहिलेल्या 'श्री बुधभूषण' या ग्रंथात तीन अध्याय, ६५ प्रकरणे व ८८६ श्लोक आहेत.

◆ प्रथम अध्यया मध्ये एकूण 'अ' व 'ब' भाग मिळून एकूण १९४ श्लोक व ४७ प्रकरणे येणे प्रमाणे आहेत -

देवता - वंदन, स्वकुल व स्वकाव्य वर्णन, भवान्या (स्मृती), प्राचीन नामस्कृती, सूर्य, चंद्र, वारा, मेघ, राजहंस, भ्रमर, चातक, कोकीळा, मोर, पोपट, कावळा, बगळा, काजवा, हत्ती, सिंहन्योक्ति, हरिण, वृक्षवृंद व वेली, रोहणाचल, सागर, रत्न, मोती, शंख, नदी, सरोवर, कमळ व मधुमक्षिका, विहिर, कस्तुरी, जल, मिश्रान्योक्ती, कासवी, कुंभ (मातीचा घडा), कापड, हार, मत्स्य, उंट, नगारा, चमेली, लिंब व कावळा, सोने, विष, शंख, साप व श्री शंकर, मध्यंतरात्तरी.

◆ द्वितीय अध्याय मध्ये ६३० श्लोक असून १७ प्रकरणे येणे प्रमाणे आहेत -

राजनिती (राज्यशास्त्र), नृप व नृपलक्षने, राजाचे सहाय्यक, अमात्य (मुख्य प्रधान), राजपुत्र त्यांचे शिक्षण व कर्तव्ये, राजाचे सहाय्यक, कोशनिरुपण, राष्ट्र, दुर्ग निरुपण, दुर्ग संपत्ती, धननाधान्य कोठारांचीही दखल, दुर्गाध्यक्ष (गजप्रशस्ती, गजमहत्ता, हत्तीचे प्रकार, बल - सेना, राजाचे आचरण), गुप्तहेर व त्याची लक्षणे, राजाचे विविध अधिकारी व सेवक वर्ग, (धर्माधिकारी , सेवक लक्षण), मंत्री व त्यांची मंत्रणा, दुतगुण व दुतकारण, राजाची कर्तव्ये, राजाची संकटे (राजा, मंत्री, राष्ट्र, कोश, दुर्ग व बल यावरील संकटे), राजाचे आक्रमण, राजाची सामान्य कर्तव्ये.

तृतीय अध्याया मध्ये एकूण ५९ श्लोक आहेत व प्रकीर्ण निति (मिश्रक निती) हे एकमेव प्रकरण आहे. तिन्ही अध्याय मिळून ६५ प्रकरणे असून श्लोकांची एकूण संख्या ८८६ इतकी असलेल्या 'श्री बुधभूषण' या ग्रंथाचे अंतरंग आहे. बुध्द आणि बुधभूषण मधील बुधचा उच्चार सारखा केल्याने अनेक लोकं बुधभूषणला 'बुध्दभूषण' समजतात. संभाजी राजाने तथागत बुध्दावर बुध्दभूषण हा ग्रंथ लिहिला असे अनेक लोकं ठोकून देतात आणि जे पुस्तक न वाचताच तशी समजूत करून घेतात. त्यांना सत्यता समजवून सांगितली तर बहूजनवादी लोकं आंबेडकरी माणसांना काळ्या पाण्यात पाहातात. अनर्गल भाषेत टिका - टिप्पणी करतात. ग्रंथात असलेल्या ६५ प्रकरणा वरून नुसती नजर जरी फिरवली तरी बुध्द आणि बुधभूषण यात काही एक संबंध नाही हे लक्षात येते. ३३५ पानांच्या, ६५ प्रकरणे व ८८६ श्लोक असलेल्या ग्रंथात केवळ तिन वेळा बुध्दाच्या नावाचा उल्लेख आला आहे. एकदा श्लोकात व दोनदा अनुवादकाने घुसडलेला आहे असे प्रथम दर्शनी जाणवते. बुध्दाच्या नावाचा उल्लेख असलेला श्लोक बघा :

• येन क्षोणिणाले कलावविकले बुध्दावतारं गतं।
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छैः समासदिते।।
भूयस्तत्परिपालनाय सकलञ्जित्वा सुरव्देषिणः।
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णाः क्रमात्।।

अर्थ : 
त्याने पृथ्वीतलावर कली पूर्ण (अशांत) झाल्यावर बुध्दावतार धारण केला. (तथागत गौतम बुध्दाने कलीरुपाने चाललेला अमानवतावादी वैदिकशाहीचा विषमतावादी भ्रष्ट कारभार नेस्तनाबुत केला) नंतर त्यांनी अखिल वर्णा धर्माचा समूह बनवून म्लेंछ धर्माला आश्रय दिलेल्यांनाही त्या छत्रपती शिवाजी राजाने जींकून देवादिकांच्या द्वेष (सुरवर्णीय) करणाऱ्या सगळ्यांना जींकून त्यांच्या परिपालनासाठी आपापल्या वर्णा मध्ये (स्व गुणानुसार ) विप्रादिंना बऱ्याच काळ पर्यंत स्वतः च्या स्वधर्मानुसार विहित कर्माची कामे करविली.

वरील श्लोका मध्ये बुध्दावतार धारण केला असा अवताराच्या रूपात बुध्दाचा उल्लेख आहे. अवतार ही संकल्पना बुध्द नाकारतात त्यामुळे वरील एकमेव श्लोका मध्ये आलेल्या 'बुध्दावतारं' या एका शब्दांवरून बुध्द आणि बुधभूषण यांचा दुरान्वयानेही संबंध जोडता येत नाही. आणखी काही श्लोकांचे उदाहरणे पाहू :

• सुवर्णरंभां दम्भारि (?) मृदुलोरुविराजिताम्। कामेषुधिसुहृज्जंघां जानुयुग्मोपशोभिताम्।।
(प्रथमाध्याय : भवान्या स्तुति/२७)

अर्थ - 
तिच्या मृदुल मांड्या सुवर्ण केळींच्या खुंटांचे गर्व हरण करणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे गुडघ्यांच्या जोडीने शोभणारा जंघाप्रदेश हा कामदेवाच्या बाणाप्रमाणे सुहृदवत् आहेत.

• पुरा स्वर्गे सुखेनासन् कामगाः खेचरा गजाः।
मुनिशाद्रता भूमौ ततो जाता वनेचराः।।
(द्वितीय अध्याय : दुर्गाध्यक्ष/१५७)

अर्थ - 
पूर्वी स्वर्गा मध्ये इच्छे प्रमाणे अंतरिक्षात संचार करणारे हत्ती सुखाने राहत होते. ऋषींच्या शापामुळे ते पृथ्वीवर येऊन वनात राहणारे असे उत्पन्न झाले.

• शरतोमरवज्जैश्च गजस्कन्धहता नराः।
क्षणात्स्वर्गं प्रयत्न्येव तस्मात्स्वर्गोपमा गजाः।।
(द्वितीय अध्याय : दुर्गाध्यक्ष/१८४)

अर्थ - 
बाण तोमर, वज्रांनी किंवा युध्दांमध्ये जे मारले जातात ते क्षणात स्वर्गात जातात. म्हणून हत्तींना स्वर्गोपमा दिली जाते.

• व्यूहतत्वविधानज्ञः फल्गुसारविशेषतः।
राज्ञा सेनापतिः कार्यो ब्राह्यणः क्षत्रियोथवा।।
(द्वितीय अध्याय : दुर्गाध्यक्ष/१९०)

अर्थ - 
व्यूहाचे तत्व आणि रचना जाणणारा, विशेष करून आवश्यक व बारीक सारीक आणि धर्म जाणणारा या अशा ब्राम्हण किंवा क्षत्रियास प्राधान्याने राजाने सेनापती करावे.

• अनाहार्येदृशंसस्य (श्व) दृढभक्तिश्च पार्थिवे।
ताम्बुलधारी भवति नारी वाप्यथ तत् गुणाः।।
(द्वितीय अध्यायः राजाचे विविध अधिकारी व सेवक वर्ग/२२५)

अर्थ - 
कमी भोजन करणारी, मवाळ, दीर्घ स्नेह असलेली (राजावर) अशा गुणांनी युक्त अशीच स्त्री विडा देणारी असावी.

• काले प्राप्ते तु मतिमानुत्तिष्ठेत्क्रूरसर्पवत्।
(द्वितीय अध्याय : राजाची कर्तव्ये/२८९)

अर्थ - 
योग्य काळ येताच मात्र बुध्दिमान राजाने सर्पा प्रमाणे उठावे (उठाव करावा.)

• उत्कोचजीविनो द्रव्यहीनान्कृत्वा विवासयेत्।
स दानमानसत्कारैः श्रोतियान्वासयेत्सदा।।
(द्वितीय अध्यायः राजाची सामान्य कर्तव्ये/४०२)

अर्थ - 
लाच लुचपत खोरांना द्रव्यहीन करून निर्वासित ठेवावे. तसेच उच्चविद्या विभूषित ज्ञानदान वेद पाठ करणारांचा दान सन्मानासह सत्कार करून त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी.

• किंतु यस्मिन्य आचारो व्यवहारः कुलस्थितिः।
तथैव परिपाल्यो सो यथावंशमुपागतः।।
(द्वितीय अध्यायः राजाची सामान्य कर्तव्ये/४०६)

अर्थ - 
परंतु ज्याचा जसा आचार, व्यवहार कुलस्थिति त्याच प्रमाणे त्यांच्याशी वागावे. ज्याप्रमाणे वंश परंपरा स्थिति चालत आली आहे तिचे ही पालन करावे.

• आश्रयी यदि वा वर्णी पूज्यो वाथ गुणि(रु) र्महान्।
नादण्ड्यो नाम राज्ञोस्ति स्वधर्मे बाबतिष्ठति।।
(द्वितीय अध्याय : राजाची सामान्य कर्तव्ये/४४६)

अर्थ - 
आश्रम किंवा चौवर्णांचे काटेकोर पालण करणारा, पूज्य किंवा महान गुणी असणाऱ्यास राजाने शासन करू नये. तसे केल्यास स्वधर्मास कमीपणा येतो.

• एवं धर्मप्रवृत्तस्य राज्ञो दण्डधरस्य च।
यशोस्मिन्प्रथते लोके स्वर्गे वासस्तथाक्षयः।।
(द्वितीय अध्याय : राजाची सामान्य कर्तव्ये/४७०)

अर्थ - 
अशा तऱ्हेचा दण्डधारी राजा, पृथ्वी लोकावर यशस्वी होतो व स्वर्गा मध्ये अक्षय निवास करतो.

• व्दैपायनेन मुनिना मनुना च धर्मा
युध्देषु ये निगदितास्तु तेगः (?)।
स्वर्भ्य(भ्र्व)र्थगोद्विजहिते त्यजतां शरीरं
लोका भवन्तु विपुलाः सुलभं यशश्च।।
(द्वितीय अध्याय : राजाची सामान्य कर्तव्ये/५७०)

अर्थ - 
आचार्य व्यास मुनी, आचार्य मनु यांनी कर्तव्य म्हणून युध्दांमध्ये जे संवादिले आहे ते देवता तुल्य स्वतः च्या सत्वासाठी, गो ब्राह्मणांच्या हितांसाठी आपले शरीर सोडण्यास तयार होतात . त्या लोकांना भूतलावर यश अत्यंत सुलभ (सहजतेने) प्राप्त होते.

वरील श्लोका मध्ये आलेले अवतार, स्वर्ग, देव, वर्ण व्यवस्था, वेद हे सर्व तथागत बुध्दाने नाकारलेले आहे आणि माणूस केंद्रबिंदू मानून अखिल मानवाला दुःख मुक्त करून मानवी कल्याण साधने हेच बुध्दाच्या धम्माचे सुत्र आहे. असे असताना बुधभूषण मधील श्लोका वरून या ग्रंथाचा आणि बुध्दाचा संबंध जोडल्या जाऊ शकत नाही. द्वितीय अध्याय मधील ५६ व्या क्रमांकाच्या श्लोका मध्ये भृगु ऋषीचा उल्लेख आहे. ते भृगु ऋषी तथागत बुध्दा विषयी म्हणतात - "राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस!" याचा अर्थ जर बुधभूषण या ग्रंथाचा आणि बुध्दाचा संबंध असता तर जसा भृगु ऋषीवर एक श्लोक आहे तसा एखादा श्लोक तथागत बुध्दावर ही असता. बुध्दावर श्लोक नाही म्हणून काही संभाजी राजाला दोष देण्याचे येथे प्रयोजन अजिबात नाही. श्री बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ ३५६ वर्षापूर्वी लिहिलेला आहे आणि शिव धर्माची स्थापना १२ जानेवारी २००८ मधील असली तरी पण 'शिव धर्म' हा शब्द प्रयोग सदर ग्रंथात सात वेळा केलेला आहे.

श्री शिव शंकर, श्री पार्वती, श्री भवानी देवी, श्री कृष्ण, गणपती यांच्या बद्दल संभाजी राजाला आत्यंतिक आदर होता. सांगायचे हेच आहे की, बुधभूषण म्हणजे विद्वानांचा दागीना अशा अर्थाचे शिर्षक असलेल्या संभाजी राजाने लिहिलेल्या श्री बुधभूषण या ग्रंथाचा आणि तथागत बुध्दाचा काही एक संबंध येत नाही एवढेच.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
किशोर चहांदे (लेखक, कवी, एवं मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

1 टिप्पणी: