मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१८

● ब्राह्मणांनी हिंदू धर्मासाठी बौद्ध संस्कृती, तत्वज्ञान आणि सणाची चोरी केली आहे.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  ● ब्राह्मणांनी हिंदू धर्मासाठी बौद्ध संस्कृती,
      तत्वज्ञान आणि सणाची चोरी केली आहे.
                  लेखक : सुरेंद्र पवार

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

अडीच हजार वर्षापूर्वी इ. स. ५६३ पुर्वी तथागत बुद्धाच्या काळात सम्यक संबुद्ध कश्यप बुद्धांनी (सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या अगोदर झालेले) अंधाराकडून प्रकाशाकडे ह्या तत्वातून दिप दान उत्सव लोक साजरे करत. ज्ञान प्रकाश दान म्हणजे धम्म ज्ञान. हळू हळू लोक उत्सव मानू लागले आणि त्यातील ज्ञान प्रकाश दान विसरले आणि "दीप ज्ञान प्रकाश उत्सव" सुरु झाला. अगोदरच्या सम्यक संबुद्ध कश्यप व गौतम बुद्ध ह्यात खुप काळाचा अंतर असल्याने लोक त्याला वेगवेगळया राज्या महाराज्याशी ह्या सणाना जोडले गेले. असो.

ह्याच सणाला सिद्धार्थ बुद्ध झाल्यावर "गौतम धम्म दिपोत्सव" पाली भाषेमध्ये "धम्म दीप पकास उत्सव" अशा नावाने शाक्य वंशिय लोक दिपावली साजरी करीत असत. सिद्धार्थ गृहत्याग करून जेव्हापासून कपिलवस्तु राज्य सोडून गेले तेव्हापासून घरोघरी लोक अंधकारच्या दुःखात असायचे. जनता ही भ्रमक झाली होती. सिद्धार्थ सोडून गेल्यामुळे लोक दिशाभूल झाले होते म्हणजे अंधारात राहत होते. पण जेव्हा माराला हरवून त्यांनी खऱ्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला. अंधकार नष्ट केला तेव्हा अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन निर्वाणाच्या ज्ञानाचा प्रकाश निर्माण झाला. आणि हि बातमी शुध्योधनाला मिळाली आणि सर्वीकडे दीप लावून आनंद साजरा झाला.

खरी दिवाळी इथून सुरु झाली. ती म्हणजे बुद्ध पौर्णिमा होय. ज्या दिवशी जन्म, ज्ञान प्राप्ती आणि परिनिर्वाण दिवस ती पौर्णिमा म्हणजे निसर्गच पौर्णिमेला दीप लावून आनंद व्यक्त करतो. आणि धम्म प्रचार केल्या नंतर मध्ये खूप दिवस गेले आणि कपिलवस्तूला जाण्याचे ठरविले. ती दिवस कश्यप संबुद्धचा दीप दान उत्सव होता. पण त्याला विकृती कारण आले होते. म्हणून ह्या दिवशी कपिलवस्तू मध्ये येण्याचे ठरविले. हि बातमी ऐकून शुद्धोदन खूप खुष झाला त्याने आपल्या राज्यात, गावोगाव बातमी दिली की - तथागत आपल्या शिष्यासह कपिलवस्तू नगरामध्ये येणार आहेत. ज्या दिवशी तथागत येणार होते. ती रात्र कर्तिकी अमवास्यची होती. भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी लोक इतके आकुल व्याकुळ होते. त्या आनंदाची सीमा नाही. त्यानी कार्तिक रात्री बुद्ध दिसावे व आनंदी साजरा म्हणून दिवे लावले.

राजवाडा संपूर्ण दिव्यांनी सजला होता. तथागत येणार म्हणून गावागावातील लोकानी रंगबेरंगी नवीन कपडे घालून, सुहासिनीनी घरोघरी गोड - धोड बनवले होते. त्यात बेत खीरचा होता. कारण बुद्धांना खीर खूप आवडे... तथागताना काळोखे रात्री येण्यासाठी त्रास होऊ नये. म्हणून रस्त्याच्या कडेला दिव्याची रोशनी केली होती. घरोघरी दिवे लागले होते. झाडावर दीप लावले गेले. तथागत आपल्या राजवाड्यात आल्यानंतर पूर्ण कपिलवस्तू आनंदीत झाली होती. पहाटे उठून गावातील लोक सुगंधी द्रव्यानी अभ्येन्ग स्नान करून आपापल्या घरासमोर दिवे लावले होते. कारण पहिल्या दिवशी तथागताना भेटायचे होते. संपूर्ण राजवाड्यात गर्दी उसळली होती.

सम्यक संबुद्ध भगवान बुद्धानी आपल्या प्रजेला प्रश्न विचारला. "मी कोणता दिपक प्रकाश देत आहे? मी कोणता दिपक घेऊन तुम्हाला प्रकाश देण्यासाठी आलो माहीत आहे? भोजन दान, वस्त्र दान, भय दान या सर्वापेक्षा सर्वात मोठे दान असेल तर ते धम्म दान आणि हेच दान ह्या दिवशी सम्यक संबुद्ध कश्यप बुद्धांनी शिकविले. तो धम्म नष्ट झाला आणि तो शोधून काढला जर तोच धम्म अंधारात गेला नसता तर अत दीप भवची शिकवण शोधायला गृहत्याग केला नसता. संपूर्ण चार महिन्याच्या पावसाळीमध्ये शेतकऱ्यानी कष्ट करून धन प्राप्त केले होते. प्रत्येक सुहासिनी ने  खीर, शिरा, रवा असे कित्येक प्रकारचे गोड पदार्थ बनवून त्या धन दिनाच्या (आताच्या काल्पनिक हिंदू मध्ये धनत्रयोदशी म्हणतात) दिवशी तथागताना व त्यांच्या शिष्याना खाऊ घातले. शाक्य वंशियाची कुळ देवतेची पुजा केली जायची. (काल्पनिक हिंदू मध्ये लक्ष्मी पुजन) दुसऱ्या दिवशी गोधेम (गहू), तांदुळ इत्यादी शेतातील पिकांची पूजा केली जायची. याच दिवशी भय दस्सी चालू होते. भय म्हणजे भीती, दिस्सी म्हणजे दिवस म्हणजे भय दिवस भीतीला दूर करणे. शेतात जे धान्य पिकवले गेले. ते भाऊ बहिण यांना समान हक्क देणे असा तो दिवस होता. (काल्पनिक हिंदू धर्मामध्ये भाऊ बीज) तरी भाऊ बीज म्हणजे संपत्तीची समान वाटणी करून वाटणे. त्या दिवशी दोघे भाऊ बहीण एकमेकास संपत्ती समान वाटत.

बुद्धांनी आपल्या साऱ्या गावकऱ्याना दहा दिवस विपस्यना दिली. त्यात त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग भावीत कसा करायचा? ते शिकविले. दहा दिवसा मधील सहावा दिवस महत्वाचा असतो. या सहाव्या दिवशी फक्त दुध व खीर प्राशन करून साधना केली जाते. कारण अर्ध्या पोटी साधने मधून मन प्रज्वलित होते. गंमत ही की लोकांनी ह्या बुद्धांच्या साधनेला विकृत करून हिंदू धर्मा मध्ये याला छट पूजा सुरु केली. एक दिवस दिप प्रज्वलित केला म्हणजे साधना पूर्ण झाली असे नाही. पूर्ण दहा दिवस विपस्यना केल्यानंतर प्रज्ञाचा प्रकाश निर्माण होतो. ज्याला बोधी ज्ञान म्हणतात. दहा दिवसानंतर मंगल मैत्रीची साधना दिली. ज्यात अनंत मैत्र, अनंत करुणा, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा ज्यामुळे लोक एकमेकास मंगल मैत्री देऊन सर्व ज्ञानाची मैत्री, करुणेच्या प्रकाशाची देवाण - घेवाण करतात. म्हणजे अंधाराला आपल्या मनातून नष्ट करतात.

जेव्हा सम्राट अशोक राजाला सम्यक सबुद्धांच्या खऱ्या  ज्ञान प्राप्तीची माहिती मिळाली. तेव्हा सम्राट देवनप्रिय अशोक राजाने रस्त्या वरच्या प्रत्येक दगडाला कोरून, स्तुप, लेणी, मूर्ती, धम्म पदावर उधाण वाक्य दगडावर कोरून बुद्ध धम्माचा प्रसार प्रचार केला आणि ते जन मानसात दिसावे. म्हणून ८४ हजार बुद्ध शिकवणीचे (स्कंद) उधाण प्रेरक शिकवणीच्या समोर प्रत्येकी दिवे लावले. त्यावेळी ह्याच दिवशी... आज सुद्धा राजस्थान मध्ये राज भवन आहे. तिथे ८४ हजार दिवे कार्तिकी अमावस्याला लावले जातात. पण बुद्धा ना विसरले त्याच्या आतील ज्ञानाला विसरले. फक्त आणि फक्त सण उत्सव साजरे होत राहिले. पण बुद्धांच्या नाही तर नको त्या लोकांच्या नावाने प्रत्येक आपल्या चांगल्या सणाला विकृत केले गेले. प्रबोधनकार ही सांगतात की - "हिंदूंनी बौद्ध संस्कृतीला विद्रुप करून आपली पोळी भाजली आहे."

बुद्ध काळात दहा दिवस दिपावली आनंदाने साजरी केली जायची. विपश्यनाचे ते दहा दिवस खूप आनंदी जायचे. त्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या अज्ञानाकडून प्रकाशाकडे दीप अंतर्मनात प्रज्वलित करायचा आणि एकमेकास दान करून दान पुण्य परिमिता वाढवीत असे. पण या भटा - बामणानी इतिहासाला विकृत करून धनत्रयोदशी, लक्ष्मी पुजन, छट पुजा वगैरे काल्पनिक पात्रे तयार करून काल्पनिक दिवाळी सण तयार केला. या काल्पनिक सणाला बगल देऊन आपला खरा बौद्ध कालीन (१) गौतम धम्म दिपोत्सव, (२) दिप दान उत्सव, (३) धम्म दीप पकास उत्सव साजरा करूया. ज्यामुळे सम्यक कश्यपच्या वेळी दीप ज्ञान प्रकाश उत्सव जो खऱ्या ज्ञान प्रकाश ह्या संकल्पनेवर आधारित होता. नंतर सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांनी ह्याच दिवशी दहा दिवशीय विपश्यना देऊन तीच प्रथा सुरू ठेवली. म्हणून गौतम धम्म दीपो उत्सव सुरु ठेवली. पण उदेश काय तर अंतर्मनात दीप प्रज्वलित करणे ज्ञानाचा आणि अत्त दीप भव होणे होय.

◆◆◆

लेखक -
आयुष्यमान सुरेंद्र पवार
(लेखक, कवी आणि आंबेडकरी विचारवंत)
"सदस्य : स्क्रीन राईटर्स एसोसिएशन"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा