गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

◆ निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण म्हणजे काय?

◆ निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण म्हणजे काय?

निर्वाण (निब्बान पाली भाषेत म्हणतात.)
निर + वाण = निर्वाण
निर = नाही
वाण = तृष्णा
तृष्णा विरहित जीवन = निर्दोष जीवन.

संसारात पुनः पुनः जन्म घेणाऱ्या तृष्णेला वाण म्हणतात. माणुस हा निरंतर बदलणाऱ्या नामरूपाचा एक प्रवाह आहे आणि माणसाचे मन हे त्या प्रवाहातील अत्यंत महत्वाचा घटक आहे. मनाचे परिवर्तन, अकुसलांसाठी पूर्णपणे थांबण्याची अवस्था, मनाच्या पूर्ण विश्रांतिचि अवस्था, इच्छा, लालसा, व दुःखाच्या अभावाची अवस्था म्हणजे निब्बाण किंवा निर्वान होय. निर्वाणाप्रत पोहचण्या आधी मनुष्याचा सतत पुनर्जन्म होतो. जेंव्हा तो निर्वाणप्रत पोहचतो तेंव्हा त्याचा पुनः जन्म होत नाही. (इथे पुनर्जन्म म्हणजे मनाच्या अवस्थेचं परिवर्तन असे घ्यावे. निब्बाणच्या वेळी मनाच्या अवस्थेचे परिवर्तन होणे थांबलेले असते.)

आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे मध्यम मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गाचे अंतिम धेय्य म्हणजे निर्वाण होय. निर्वाणाचा अर्थ - राग, द्वेषापासून मुक्ती, राध नावाचे स्थविर भगवंतकडे गेले तेंव्हा भगवंतानी निर्वाणाचा उपदेश केला.

भगवंत म्हणाले -
"श्रेष्ट जीवन निर्वणाश्रित आहे, निर्वाण हेच लक्ष्य होय आणि निर्वाण हाच उद्देश होय!" - सन्दर्भ: Buddhist Catechism (बौद्धप्रश्नोत्तरी) लेखक: कर्नल एच. एस. ऑलकॉट (इ.स.1881) सांस्कृतिक मंत्रालय श्रीलंका तर्फे प्रसिध्द.

परिनिब्बान - महापरिनिब्बाण (महापरिनिर्वाण) समाज घटकांचे तिन प्रकार मानले जातात. प्रथम प्रकारच्या समाज घटकांमधे श्रद्धावान व्यक्ति, समाज प्रेमी, चांगल्या गोष्टींचा आदर करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. अशा श्रद्धावान व्यक्तींच्या मनाला एकाग्रता, शांतचित्तता व कुशल कर्माचा मर्यादित लाभ झालेला असतो. अर्थात अशा व्यक्तीला निर्वाणाचा स्पर्श झालेला असतो. आशा व्यक्तिस निर्वाणाची (निब्बानाची) अनुभूति होते.

शेवटच्या प्रकारात निर्वाणाची अंतिम उच्चतम अवस्थेला पोहचलेल्या सर्वस्वाचा त्याग करुण मुक्त झालेल्या, अद्भुत ज्ञानी असलेल्या व अर्हत पदासारख्या उच्चतम अवस्थेस पोहचलेल्या व प्रामुख्याने बुद्धत्व प्राप्त केलेल्या महापुरुषांचा समावेश होतो. आशा उच्चतम अवस्थेच्या व्यक्तिस महापरिनिर्वानाची अनुभूती होते.

निर्वाण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या निधनाला परिनिर्वाण आणि निर्वाण प्राप्त असामान्य कर्तुत्व असणाऱ्या व्यक्तीच्या निधनाला महापरिनिर्वाण म्हणतात. सामान्य व्यक्तीचे निधन हे निर्वाण नाहि, परिनिर्वाणही नाही, महापरिनिर्वाण तर अजिबात म्हणता येणार नाही.

बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्ता व कर्तुत्वाकडे बघून त्यांच्यात बुध्दपदाच्या अवस्थेतील प्रज्ञेचा, करुणेचा व शीलाचा अंश होता असे समजते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील विषमता दूर करण्यात सामाजास अर्पण केले. ते प्रकांड पंडित होते. तसेच ते बोधिसत्व सारखे जीवन दु:खीतांच्या, पददलितांच्या कल्याणासाठी व्यतीत करीत असत. त्यांना समताधिष्ठीत समाज रचना अभिप्रेत होती त्यासाठी त्यांनी स्वतंत्र, समता, बंधुता, न्याय या तत्वावर आधारित संविधान लिहले. अशा असामान्य कर्तुत्वामुळेच बाबासाहेबांच्या निधनाला महापरिनिर्वाण असे सबोधतात.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा