शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

● माणुसकी मिळवण्या करीता झालेले युद्ध : भिमा कोरेगाव

● माणुसकी मिळवण्या करीता झालेले युद्ध : भिमा कोरेगाव

"मराठा क्रांती मोर्चा" च्या पार्श्वभूमी वर माझ्या एक मराठा मित्राच्या मोबाईल वर आलेला एक मॅसेज मला त्याने वाचायला दिला, २२ ते २५ वयाच्या एका मुलीने तो मॅसेज पोस्ट केला होता, त्यामध्ये तिने असे मत मांडले होते की, नेहमी भीमा कोरेगावच्या विजयाने छाती फुगविणाऱ्याचा खऱ्या मर्द मराठ्यांशी सामना न झाल्यामुळे व्यर्थ अभिमान बाळगत आहात, ५६ इंची छाती नसलेले सुद्धा अश्याच प्रकारची मते कधी सोशल मीडियात तर कधी खाजगी चर्चेत सुद्धा मांडतात ते केवळ मराठा समाज्या त जन्मले या गर्वा मुळेच,आपल्या समाज्याच्या उजवल जाज्वल्य इतिहासाचा अभिमान प्रत्येकाने जरूर बाळगावा पण गर्व मात्र बाळगू नये, कारण गर्व होत्याचे नव्हते करते, याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत आणि भीमा कोरेगाव सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती म्हणायला हवी, भीमा कोरेगावचा रण संग्राम नेमका का आणि कश्यासाठी घडला? त्यास जबाबदार कोण? इतदेशीय जुलमी सत्ता उलठविण्यास कोण जबाबदार? धर्माने आंधळे झालेले पेशवे की पेशव्यांच्या बेबंद शाहीला पायबंद घालण्यास असमर्थ ठरलेले शिव छत्रपतींचे साताऱ्याचे राज घराणे की पेशवाही चा अस्त करणारे ते स्वाभिमानी ५९९ महार सैनिक? आज तरी याचा गंभीरपणे विचार होणार की नाही? खरा प्रश्न हाच आहे, आता तरी आम्ही जात पात सोडून माणूस म्हणून जगणार की जनावर सारखेच वागणार? काय आहे हा समर माझ्या अल्प माहिती नुसार असा,

दिनांक १ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज यांना इथल्या धर्म अभिमान्यांनी घरभेदीच्या सहाय्याने रत्नागिरी जिल्यातील सँगमेश्वर तालुक्यातील कसबा यागावी औरंगजेब बादशहाच्या सरदार मुकरबाद आणि त्याचा मुलगा इखलास खान याने कैद केली, तर दिनांक ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज्यांच्या हत्या हिंदू धर्म शास्त्र मनुस्मृती नुसार भीमा कोरेगाव परिसरात करण्यात आली, शंभु राजे जवळ जवळ १ महिना ११ दिवस औरंगजेब च्या कैदेत होते, ते ही मराठ्यांच्या महाराष्ट्रात, पण एक ही मर्द मराठा शिव पुत्रास सोडवण्याचे धाडस करू शकला नाही, एव्हडेच काय शंभू राजाच्या हत्ये नंतर त्यांच्या छिन्न विछिन्न देहाला अग्नी द्यायला एकही मराठा कुणबी तेली माळी सोनार कुंभार अथवा कोणी पंडित पुढे आला नाही, वडूज गावच्या महारानी या रण धुरंधर शिवबाच्या सुपुत्राच्या शरीरास जोडून मुखाग्नी दिला, का महारांना बादशहाची भीती नाही वाटली जी मराठ्यांना वाटली, आज ही छत्रपती संभाजी महाराज्यांची समाधी  वडूजच्या महार वाड्यातच आहे, तर जिजाऊचा वाडा पचाडच्या महार वाड्याच्या मधेच आहे, काय हा योगा योग म्हणायचा की रक्ताचे नाते म्हणायचे?

संभाजी महाराज्यांच्या हत्ये नंतर मराठी साम्राज्य श्री वर्धनच्या मनुस्मृती ग्रस्त ब्राह्मणांच्या हातात गेले, त्याचीच औलाद दुसरा बाजीराव, सून १८१७ साली ब्रिटिश आणि पेशव्यांचे संबंध विकोपाला गेले, आणि बाजीरावाने युद्धाची तयारी सुरु केली, पेशव्याच्या बाजूने निपणकर अक्कल कोटवाले भोसले, निबालकर, घोरपडे, जाधव, विचुरकर, राजे बहाद्दूर, भोईटे, पुरंदरे छोटे मोठे सरदार आणि सातारचे छत्रपतींचे राज घराणे, या फोजेचा सेनापती होता बापू गोखले,

मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश्या मधील विकोपाला गेलेले संबंध पाहून युद्ध कधी ही होईल तेंव्हा आपण ही आपला पराक्रम शिव राज्यासाठी खर्ची घालावा आणि इथे ठाण मांडून बसलेल्या गोऱ्यास कायमचे हाकलून देऊया, या उदात्त भावनेने शिवाजी संभाजी महाराज्यांच्या मराठे शाहितल्या सरदार शिदनाक महार यांचा नातू शिदनाक महार ज्याने खरड्याच्या लढाईत अप्रतिम पराक्रम गाजविला होता, पठाणांच्या तावडीत सापडलेल्या मराठा सरदार भाऊ पटवर्धन याचे रक्षण करून हरणारी मराठी सेने स विजय मिळवून दिला होता असा हा शूर सरदार महार जातीतल्या अन्य सरदारास घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यास भेटून आम्ही महार सरदार तुमच्या बाजूने ब्रिटिशा विरुद्ध लढाईत उतरू इच्छितो, तुम्ही आम्ही सारे एकत्र येऊन ब्रिटिशाला हाकलून लावु या, आम्हांला इंग्रजांच्या बाजूने लढायचे नाही, परन्तु माय बाप तुमच्या लष्करात आणि राज्यात आमच्या महार जातीचे स्थान काय राहणार? आमच्या गळ्यातील मडके कंबरेचा झाडू खांद्या वरच्या घोंगडी आणि हातातील घुंगराची काठी नष्ट करणार काय? आम्हांला माणसा सारखी वागणूक मिळणार काय? काय मागितले शिदनाक महार? फक्त माणुसकी! पण आमच्या राज्याच्या राज्यास आपल्या बापाची जागिरदारी समजणाऱ्या या उन्मत घमड खोर आणि मनुस्मृतींनी आंधळ्या झालेल्या या मूर्ख  बाजीरावाने तिरस्काराने जबाब दिला, सुईच्या अग्रावर थरथरत रहाणाऱ्या धुळीच्या कणा एव्हडी ही स्थान तुम्हां महारास माझ्या राज्यात रहाणार नाही, तुम्ही आमच्या बाजूने जरी लढळात तरी ही तुम्हाला तुमच्या पायरी वरच राहावे लागेल, ब्राह्मण धर्मात कोणताच बदल घडणार नाही, हे पक्के ध्यानात धरावे, तुमची आम्हाला गरज नाही आणि जर तुम्हांला तुमचे स्थान हवे असेल तर ते मिळूनच दाखवा, बाजीरावाच्या उन्माद उत्तराने शिदनाक महारांच्या तळ पायाची आग मास्तकास भिडली आणि तो योद्धा कडाडले. धर्माचे तत्वज्ञान सांगणाऱ्या भेकडा पुरुषार्थ हाच जर तुझा क्षत्रिय धर्म असेल आणि तुम्ही खरे क्षत्रिय असाल तर आमचा युद्धात पाडाव करून दाखवाच, आज पासून तुमच्या जीवन मरणाच्या सीमा आम्ही ठरवु, असे निर्वाणीचा इशारा देऊन महार सरदार पेशवे दरबारातून बाहेर पडले,

१९ ऑक्टोंबर १८१७ ला विजया दशमीच्या मुहूर्त साधून पेशव्यांचे सैन्य जमा झाले, २९ ऑक्टोबर १८१७ ला बापू गोखल्याने मूळा मुठा नदीच्या बेटावर हल्ला केला बेट लुटून  जाळण्यात आले, ३० ऑक्टोबर गणेश खिंडीवर पेशव्याने हल्ला केला, दिनांक ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकीच्या युद्धास सुरुवात झाली, मात्र पेशव्यास यशाने हुलकावणी दिली, तर दिनांक ६ नोव्हेंबर १८१७ रोजी केवळ २०० (दोनशे) सैनिकांच्या बळावर आणि पेशव्याचा फितूर ब्राह्मण बालाजी नाथू च्या मदतीने झुलमी शनिवार वाड्या वरचा भगवा उतरवून त्या ठिकाणी गोऱ्यांचा युनियन जॅक फडकविण्यात आला, कोणी मदत केली बालाजी नाथू, कश्यासाठी? स्वतःच्या फायद्यासाठी, शिदनाक महार काय मागत होता? फक्त माणुसकी! सत्ता जहागिरी नाही, पेशव्याची गादी च गेली आणि बाजीराव माहुलीला पळून गेला, पेशव्याच्या सैन्याची दाना दान उडाली, सेनापती बापू गोखले पेशव्यास येऊन मिळाल्या नंतर गनिमी काव्याने बाजीरावाने पुन्हा एकदा सैन्याची जमवा जमाव करून युद्धाच्या तयारीस लागला, व जे युद्ध झाले ज्यात पेशवाईचा अस्त आणि ब्रिटिश सत्तेचा निरंकुश अंमल ते युद्ध म्हणजेच भीमा कोरेगावचे महार सैनिकांच्या महान विजयाची शौर्य गाथा होय !

ब्रिगेडियर जनरल स्मिथच्या सैन्यास झुकांड्या देत बाजीरावने ३०००० घोड दल १३८०० पाय दल घेऊन श्रीमंत बाजीराव पुण्यापासून ८ कोसावर असलेल्या फुल गावला दिनांक ३० डिसेंबर १८१७ रोजी दाखल झाला, सदरची खबर पुण्याच्या बंदोबस्त सांभाळणाऱ्या कर्नल बार्टला समजली, परन्तु त्याच्या जवळ पुरेसे सैन्य बळ नसल्यामुळे त्याने सातारा शिरूर छावणीला "लाखोटा" पाठवुन मदत मागितली, कर्नल बार्टने पाठविलेला "लखोटा" लेफ्टनंट कर्नल फिल्समन ने वाचून या कामासाठी कार्य कुशल साहसी, हमखास विजय मिळवून देणारी ज्यामध्ये महार जातीचे सैनिक मोठ्या प्रमाणात आहे अशी सैन्य तुकडी, ज्या महारांची पेशव्याशी असलेले हाड वैर या गोऱ्या अधिकाऱ्यास चांगले ठाऊक होते, त्याने त्याच  "बॉंबे नेटिव्ह इन्फंट्री सेकण्ड बटालियन फर्स्ट रेजिमेंट" ची ताबडतोब निवड करून कॅप्टन स्टोनटनाला ५०० महार सैनिक २७० घोडेस्वार तोफा ओढणारी २५ माणसे आणि २ तोफा चालविणारे असा विषम मानवी बळ देऊन पेशवे रुपी मृत्यूच्या कराल जबड्यात ढकलले, परंतु त्यास महार सैन्याच्या पराक्रम वर पूर्ण विश्वास होता महार मरतील पण पाठ दाखविणार नाहीत हे त्याला पक्के माहित होते,

महार सैनिक २५ किलो मीटरचा प्रवास करून दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी ८ वाजता कोरेगाव या ठिकाणी पोचले, भीमा नदीच्या पैल तीरावर दुसरा बाजीराव जातीने ३०००० पेक्षा जास्त शस्त्र सज्ज फौजे सह युद्धास तयारच होता, त्याचा यावेळी ही सरदार होता बापू गोखले, तर सैन्यात मात्तबर होळकर जाधव, गायकवाड, विंचूरकर  पुरंदरे भोसले सातारचे भोसले, निंबाळकर घोरपडे इत्यादी दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी कॅप्टन स्टोनटनालाने पूर्ण कोरेगाव आपल्या ताब्यात घेतले मात्र कोरे गावातील गढी आणि धर्म शाळा मात्र ताब्यात न घेतल्याचा परिणाम हि त्याच्या सैन्यास भोगावा लागला, सकाळी १० वाजता पेशव्यांनी आक्रमण केले, पेशव्यांच्या सेनापतीस ब्रिटिशांच्या अल्प सैन्याची पुरेपूर कल्पना होती आणि स्वतःच्या बलाढ्य  सैन्या बद्दल फाजील आत्म विश्वासाच्या जोरावर त्याने चढाई केली, ५०० महार सैनिकांनी सतत ४ तास गोळ्यांचा पाऊस पाडून पेशवे सैनिकांची दाना दान उडवली, तर ब्रिटिश तोफ सांभाळणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्माने तोफांचा भडीमार करून विरोधी सैन्याचे प्रचंड नुकसान केले, स्वतः बाजीराव तोफेच्या जबरदस्त हदर्याने त्याच्या पाया खालची जमीन सरकली व पायांना कंप सुटला, बाजीरावाच्या सैन्याच्या होत असलेली वाताहत थांबविण्यासाठी सेनापती बापू गोखले आणि विंचूरकर यांनी ब्रिटिश सैन्याच्या पिछाडीने कोरेगावात प्रवेश करून धर्म शाळा ताब्यात घेतली, परन्तु ती पुन्हा महार सैनिकांनी ताब्यात घेतली, दरम्यान पेशव्यांच्या सैन्याने तोफ चालविणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्मास एकटे गाठून त्याचे शीर धडपासून छाटून भाल्याच्या टोकावर नाचवत  "मारला... मारला... तोफ वाला मारला"असा उन्माद करीत भीमेचे पात्रं ओलांडून हात घाईवर आले, दरम्यान ब्रिटिश सैनिकांच्या गोळ्या सुद्धा संपल्या होत्या, त्याच बरोबर बाजीरावाच्या सैन्याने कोरेगावतील गादीवर कब्जा केला होता, तिथून जबरदस्त मारा सुरु होता, पेशव्यांचा भडीमराने ब्रिटिश अधिकारी भांबावून गेले, काही अधिकारी कॅप्टन स्टोनटनाला माघार घेण्यासाठी विनवण्या करू लागले, तेव्हा महार सैनिकांनी त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून कॅप्टन स्टोनटनाला निर्वाणीचा शब्दात सांगितले,  ज्यांना जीवाची भीती आहे त्यांनी खुशाल रणातून माघार घ्यावी, परन्तु आम्ही महार सैनिक पेशव्यां सोबत लढूनच मरू मात्र मरणा पूर्वी माघार घेणार नाही, महार सैन्याच्या दृढ निश्चयाने कॅप्टन स्टोनन ला बळ चढले आणि आता बंदुकी सोडून तलवारीला तलवारी भिडल्या, महार सैन्याने आपल्या कुशाग्र बुद्धीने वेग वेगळ्या लढाऊ रचना रचून बाजीरावाच्या सैन्यास जेरीस आणले, पोटात ना होते अन्न ना पाणी समोर होते बलाढ्य शत्रू जे तुला माणुसकी नाकारत होते, एक तर मर अथवा मारून जग, असा त्या महार सैनिकास त्याचे मन बजावीत होते, भीमेच्या पैल तिरा वरून बाजीराव युद्ध पाहत होता, तर आकाशातील सूर्य भास्कर आपल्या शहत्र धारांनी त्या वीर पुरुषांना चेतवत होता, त्याने एका स्त्रीसाठी झालेले राम रावण युद्ध पहिले होते, सत्तेसाठी कौरव पांडवांना कोंबड्या सारखे भांडताना पहिले होते, परंतु हे युद्ध ना राज, गादीसाठी होते, ना स्वर्ग प्राप्तीसाठी होते, हे युद्ध होते माणूस म्हणून जगण्यासाठीचे, दिनकर ही खुश होता, नेहमी पेक्षा जरा जास्तच आग ओकत होता, ज्यात महालातील गोरी चामडी भाजून निघत होती तर दुसऱ्या बाजूने महारांची वर्मी घाव पडत होते, महारांच्या मजबूत आणि दणकट हातातील तलवारीचे घाव झेलता झेलता पेशव्याची सेना मेटाकुटीस आली,  लढाईचे पालटणारे स्वरूप आणि नूर बघून बाजीरावाने रण गणातून धूम ठोकली, बाजीरावाचे अनुकरण त्याच्या जीवावर आणि भरवश्यावर अवलंबून असलेल्या आणि जीवाची भीती असणाऱ्यांनी तात्काळ केले, सेनापती बापू गोखल्यांच्या एकुलत्या पुत्राच्या गोविंद बाबाची तुकडी त्याला युध्दात एकट्याला सोडून जिवाच्या आकांताने पळत सुटली, मात्र तश्या हि परिस्थितीत गोविंद बाबा तलवार गाजवीत होता, त्याची महार सैनिक सोन नाकाशी पडली, मदमस्त हत्ती प्रमाणे एक दुसऱ्यावर चालून गेले, परंतु सोननाक महारांच्या जबरदस्त तलवारीचा पहिलाच घाव गोविंद बाबाला चुकवता आला नाही, उजव्या अंगावर घाव झेलीत पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न असफल ठरला, सोनानाकाच्या दुसऱ्या घावसरशी गोविंद बाबा "आई ग..." अशी आर्त किंकाळी फोडून भीमेच्या किनाऱ्या वरील मातीत मिसळला, एक एक महार सैनिक ५६, ५६ पेशव्यांच्या सैनिकाला कापून काढीत होता, सेनापती बापू गोखल्यांल त्याचा तारणा ताठा एकुलता एक पुत्र युद्ध भूमीवर बेवारस पडल्याचे समजताच त्याच्या सर्वांगास कंप सुटला, तो धीपाड योद्धा आपल्या लेकरास शोधीत युद्ध भूमीचाच पडू लागला, भीमेच्या तटावर त्याला त्याच्या पुत्राचे कलेवर सापडल्या वर तो शूर सेनापती मूक आक्रोश करू लागला, इतक्यात त्याच्या खांदयावर कुणाचा तरी हात पडला, मान वर करून पाहिले असता तो विंचूरकर सरदार होता, विंचूरकर धीर गंभीर आवाजात म्हणाला उठा सेनापती शोक करण्यात अर्थ नाही, खूप मजल मारायची आहे, पुत्राच्या मरणाने बापाचे काळीज फाटले होते, तो शत्रूच्या नारडीचा घोट घेऊ इच्छित होता, पण समयाने कूस बदलली होती, पेशव्याच्या सैन्याला युद्ध भूमीवर महारानी चिरनिद्रेस पाठविले होते, जे मूठभर आपला जीव घेऊन पळाले होते, तेच तेव्हडे वाचले होते, सूड घेऊ पाहणारा सेनापती हतबल होता, विंचुरकरांचा शहाणपणाचा सल्ला शिरोधार्य मानून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले सुद्धा त्याच्या धण्या प्रमाणे रणभूमी सोडून बाजीरावाच्या मागे चालता झाला, युद्धाचा निकाल लागला होता, ज्या शिदनाक सरदाराने बाजीरावास आव्हान दिले होते, ते त्याच्या शूर वीरांनी बाजीरावास उघड्या डोळ्यांनी पहायला भाग पाडले होते, ज्या भीमा कोरेगावच्या भूमीवर मराठ्यांच्या छत्रपती संभाजी महाराज्याना मनुस्मृती नुसार हाल हाल करून ठार मारण्यात आले होते, त्याचा सुड संभाजीच्या मर्द मराठ्यांना जरी घेता आला नाही तरीही १००,  १२५ वर्षाच्या प्रतिक्षे नंतर अधर्माने माजलेल्या आणि बाप मनूच्या कायद्याने उन्मत, मस्तवाल घमेंड खोर भेकड ब्राह्मण शाही रुपी पेशवाईस छत्रपती शिवाजीच्या खऱ्या मर्द मावळ्यांनी चारी मुंड्या चीत केले होते, हाच वर्मी घाव पेशवाई नायनाट करण्यास कारक ठरला, बाजीराव जे बोलला ते शिव काळ असता बोलला असता काय? शिवबाने त्याची जिभच छाटली असती, पण कर्तृत्ववान महापुरुषांचे वारस तसेच निपजतील असे कोणी ही सांगू शकणार नाही, काही अपवाद असू शकतात हि...

डॉ, बाबासाहेब म्हणायचे - आमचे पूर्वज नक्कीच मेष राशीचे नव्हते, ते सिह जातीचे होते, याची जाण जर नादान बाजीरावास झाली असती तर, सरदार शिदनाकाची माणुसकीची मागणी मान्य केली असती तर... तर खरेच इंग्रज इथे १५० ते २०० वर्ष राज्य करू शकले असते? आम्हाला आमच्या पूर्वजांचा सार्थ अभिमान आहे, गर्व नाही, पण आनंद मात्र नक्कीच नाही, कारण हा देश माझा आहे.

लेख -
अनिल जाधव

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• पेशवाईचा अंत करणाऱ्या त्या शुरविरांना, पूर्वजांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।

अभिवादक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
WWW.Facebook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
WWW.Facebook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
WWW.Facebook.Com/UatinJadhaV789456123

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

1 टिप्पणी:

  1. पेशवाईचा अंत करणाऱ्या त्या शुरविरांना, पूर्वजांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।

    khup chhan vishleshan.
    congrats.

    उत्तर द्याहटवा