शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

● १ जानेवारी अर्थात वर्षाची सुरुवात

● १ जानेवारी अर्थात वर्षाची सुरुवात

नाग वंशियांच्या पराक्रमाने, वीरतेने नव वर्ष सुरु होते. भीमा - कोरेगाव चा संग्राम याची साक्ष आहे. नागांच्या अतुलनीय शौर्याने "महा - अरी" च्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या पेशव्यांचे राज्य धुळीस मिळविले. केवळ ५०० महार सैनिकांनी ३० हजार पेशव्यांच्या सैन्यास पराजित केले. या युद्धात आवश्यकते पेक्षा जास्त दारु गोळा खर्ची घातला म्हणून ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात शेरे लिहिले. काय कारण असावे? एका गोळीने शत्रू मेला तरी त्याचे धूड गोळ्यांनी छलनी करण्याचे कृत्य महार सैनिकांनी केले.

शेकडो वर्षाचा हा असंतोष, कंबरेला लावलेल्या बोराट्याच्या झाडूची जखम आणि गळ्यातील मडक्यांचा भार क्रोधाग्नी बनून बंदुकीच्या फैरीतून झडला. एका पराक्रमी वंशाचा हा अपमान ज्वालामुखी बनून बाहेर आला. नाग हे आर्यांचे कट्टर शत्रू होते. आर्यांशी लढे देताना ते परागंदा झालेत. गौतम बुद्धांच्या समतावादी धम्मामुळे जे सामाजिक बदल घडले त्यामुळे पुनःश्च नाग वंशीय लोक राजे झालेत. या नागांनीच बुद्धाच्या तत्त्वांचा प्रचार प्रसार केला.

शिशु नाग ते बृहद्रथ असा हा प्रवास आहे. पुष्यमित्र श्रुंग या सामवेदी ब्राह्मणाने धोक्याने बृहद्रथ या सम्राट अशोकाच्या वंशजाचा खून केला आणि आपले ब्राह्मणी राज्य स्थापित केले. त्याच्याच काळात मनुस्मृती लिहून शस्त्राच्या जोरावर कायम करण्यात आली. या मनुस्मृती आणि ब्राह्मणी आतंकवादाने पूर्वाश्रमीच्या बौद्धांना अस्पृश्यतेच्या खाईत ढकलले. मात्र महार जी जात नसून एक लढवय्या वंश होता त्याचे रक्त गोठणार थोडीच होते? अनेक अस्पृश्य जाती, वीरांच्या वंशावळीतील होत्या. नागनाक या "महा - अरी" ने वैराटगड जिंकून दिला. तर शिदनाकाने खर्ड्याच्या लढाईत परशुराम भाऊ पटवर्धन यांचा पठाणाच्या हल्ल्यातून जीव वाचविला आणि पेशवाईला जीवदान दिले.

रायनाकाने बाजीप्रभू सारखी खिंड लढविली. विठू महाराने दामाजी पंताचे ब्रिटीशां कडील देणे चुकता केले. १७९६ ला स्थापित झालेल्या महारांच्या फौजेने १ जानेवारी १८१८ ला इतिहास घडविला आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. पुन्हा उच्चजातीच्या मुखंडांनी ब्रिटीशांकडे कागाळ्या करून महारांची सैन्यभरती थांबविली. मात्र अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ब्रिटिशांना निवेदने देवून भरती सुरु करायला बाध्य केले. त्यात गोपाल बाबा वलंगकर यांचा मोठा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण ताकदीने या प्रश्नास रेटले आणि १ जानेवारी १९४६ ला महार रेजिमेंटचा उदय झाला. वर्षभरातच भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जम्मू काश्मीरच्या भूमीवर महार सैनिकांनी जो पराक्रम केला त्याला इतिहासात तोड नाही . झान्गुर आणि नौशेरा येथे रावू कांबळे आणि बारक्या कांबळे यांनी ६००० पाकी सैनिकांना थोपवून अनेक भारतीय सैनिकांना बाहेर काढले. यावेळी रावू आणि बारक्या यांच्या गर्दनी तुटून पडल्या तरी त्यांची मशीन गन गर्दानी शिवाय ५ ते ७ सेकंद सुरूच होती. या धुमश्चक्रीत १० वीर कामी आले त्याचा बदला नाईक कृष्णा सोनावणे यांनी घेतला. इतर सैनिकांच्या मदतीने एकट्या सोनावणे यांनी "जयभीम" च्या जयघोषात १००० शत्रूंचा खात्मा केला.

महार रेजिमेंट च्या पाच वीरांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. पहिले महावीर चक्र नाईक कृष्णा सोनावणे यांना मिळाले. ३ लाख मुस्लिमांना पाकिस्तानात सुखरूप पोहचविण्याचे काम महार रेजिमेंटने पार पाडले. असे हे वीर म्हणूनच आंबेडकरी आंदोलकांच्या धमन्यातून गर्जना करीत असतात. आज ही ...मग ते नामांतर आंदोलन असो कि खैरलांजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या पूर्वजांचा गौरवांकित इतिहास सांगून आपल्या लोकांच्या शुरतेला जागे करायचे आणि त्यांच्या हिंमतीला उर्जा द्यायचे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर भारत अस्पृश्य वीरांच्या ऐतिहासिक नोंदींनी बद्द आहे. पंजाब मध्ये शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांना जेव्हा औरंगजेबाने कैदेत टाकून त्यांचे शीर कलम केले आणि त्यांचे तुकडे करून किल्ल्याच्या चारी बाजूला लटकावून गिधाडांना खाण्यासाठी ठेवायचे असा मनसुबा रचला तेव्हा मणि सिंग या अस्पृश्य वीराने स्वत:च्या मुलाला तलवार चालवायला सांगून आपले धड व शीर तिथे ठेवून गुरुचे शीर व धड न्यायला सांगितले. अशा तऱ्हेने गुरुसाठी बलिदान देणाऱ्या मनिसिंगचे नाव शीखांमध्ये आज आदराने घेतले जाते.

आज पंचप्यारे यांना अवघा शीख समाज गुरुस्थानी मानतो. शिखांचे १० वे आणि अंतिम गुरु गोविंद सिंग यांनी पाच तरुणांच्या हिमतीची परीक्षा घेतली आणि जे प्रत्यक्ष मरायला तयार झालेत त्यात तीन तरुण अस्पृश्य होते. पहिल्या पंचप्यारयात धर्म सिंग, दया सिंग , साहेब सिंग अस्पृश्य बंदे होते. झलकारी देवी ते फुलन देवी या सर्व वीरांगना होत्या. या देशातील तमाम अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्रातून आवाज उठतो. पिप्रा / बेल्छी / पारस्बिघा / नारायणपूर / अरवल / देवलीतील अत्याचार असो की दक्षिण भारतातील मीनाक्षीपुरम असो, बौद्ध समाजाने सदैव आंदोलनातून या अत्याचाराला धिक्कारले आहे. प्रत्येक वेळेस बौद्ध समाजाची परीक्षा घेण्याचे काम राज्यकर्ते करतात आणि अशा आंदोलनात गुंतवून आपली प्रगती रोखण्याचे षड्यंत्र रचतात. त्यास रोखठोक उत्तर देण्याचे काम आपण आता केले पाहिजे. नागवंशी शुरांनी आता बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उच्चावस्था गाठली पाहिजे. भारिप - बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे विजन आहे, दांडगा अभ्यास व राजकीय शहाणपणा आहे. आंबेडकरी निष्ठा व पारदर्शकता आहे. आंबेडकरी घराण्याचा वारसा आहे त्यांना सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे. प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा त्याग आणि लढाऊ वृत्ती चळवळीस ठावूक आहे. त्यांनी बाळासाहेबांना सहयोग केला पाहिजे.

आज ही ते दमदारपणे सामाजिक लढे लढू शकतात. रामदास आठवले कार्यकर्त्यांच्या अडचणी समजणारे व त्यांच्याशी मिळून मिसळून राहणारे म्हणून त्यांची छवि आहे. एक कुशल संघटक म्हणून ते चळवळीच्या पाठीशी उभे राहिले तर चमत्कारिक निकाल बाहेर येईल. बसपा ही काही आपली शत्रू नाही. प्रत्येकाचे आपले पवित्रे असतात. बसपा कडे प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आहे आणि पैसा ही आहे. कल्पना शक्ती आणि व्यूह रचना करणारी डोकी आहेत. त्यांनी सर्व हात हातात घेवून हजारो वर्षापासून आमच्या शरीराला गुंडाळलेली शृंखला तोडण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.

काय रिपब्लिकन - बहुजन आघाडी होऊ शकत नाही. ते एक येतात - बजरंग दल, आर एस एस, विश्व हिंदू परिषद, श्री राम सेना, हिंदू महासभा, हिंदु सेना, अभिनव भारत, हिंदू जन जागरण मंच, भामसं, पतितपावन संघटना, दुर्गा वाहिनी, राष्ट्र सेविका समिती, भाजपा, शिवसेना आणि अशा शेकडो संघटना एकच छत्राखाली आहेत. आपण का नाही? आपल्या पूर्वजांच्या शिशु नाग, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोकाची राजछत्रे सांभाळण्यासाठी सज्ज व्हा. उठ सुठ कुणी ही आपणास डिवचतो, अन्याय करतो, अत्याचार करतो, हिणवितो, षडयंत्रे रचून आपल्या अधिकार्यांना पोलिस प्रकरणात अडकवितो, समस्त जणांना भ्रष्टाचारी म्हणतो. आपण मुठभर क्षेत्रात आहोत. मिडिया, चित्रपट, खेळ, लष्कर अधिकारी, उद्योग, शेती येथे आपला नन्नाचा पाढा आहे. या क्षेत्रांचा मार्ग, राजमार्गा वरूनच जातो. आपण मुठभर नाही फक्त आपली पाच बोटांची मुठ बनण्याचीच तेवढी देरी आहे.

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• पेशवाईचा अंत करणाऱ्या त्या शुरविरांना, पूर्वजांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।

अभिवादक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
Buddhism - Ambedkarism Blog

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
WWW.Facebook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
WWW.Facebook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
WWW.Facebook.Com/UatinJadhaV789456123

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा