मंगळवार, ११ जुलै, २०१७

● पांढर पेशे (कविता)

● पांढर पेशे

कुणीही कल्पना करु शकेल,
अगदी तशे आहोत ।
कुणाशी देणे - घेणे नाही,
आम्ही पांढर पेशे आहोत ।।धृ।।

राशीचक्राचे बनावट किस्से,
आम्हाला भारी वाटतात ।
मालिका मधली खोटी पात्रे,
आम्हाला खरी वाटतात ।
आम्हीच फु - बाई - फू मधल्या,
नकली टाळ्या आणि हशे आहोत ।।१।।

संदीप - सलिलची गोड गाणी,
कशी आमच्या मनाला भिडतात ।
शुक्रतारा मंदवारा ऐकताना,
आमची मने आभाळी उडतात ।
"अण्णाभाऊ साठे" हे कोण,
आम्ही डबक्यातले माशे आहोत ।।२।।

रिक्षाचा संप साले माजलेत सगळे,
उशिर झाला की होतो त्रागा ।
नवरात्रीची तोरणे आली की,
पुढे जायला करुन देतो जागा ।
अंगावर कोणी येईल तर,
आम्ही भित्रे सशे आहोत ।।३।।

नाही म्हणायला कधी - कधी,
आम्ही सामाजिक बांधीलकी पण पाळतो ।
अण्णा हजारेंच्या आंदोलनात आम्ही,
एक मेणबत्ती नेऊन जाळतो ।
दाभोळकर हत्येला २ वर्ष झाले,
आम्हाला काय? आम्ही बसलेले घशे आहोत ।।४।।

कवी -
डॉ. नितीन अण्णा : पुणे
(लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••••••••••••••••••••••••••••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• मंडणगड - दापोली सामाजिक प्रतिष्ठान
Plz Join us 'MDSP' : 7303535166

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा