शनिवार, २९ जुलै, २०१७

● तो बाप कोण? (कविता)

● तो बाप कोण?

सर्व्वोंच पदी बसलास,
मोहताज होतास खायला ।
ज्याची पुण्याई तो बाप कोण?
जा विचार आपल्या मायला ।।धृ।।

बाप सोडुन बापूच्या,
पायात जावुन बसलास ।
ज्याच्यामुळे भेटलं सार,
त्या बापाला विसरलास ।
घटना सोडुन मनुची,
गिता वाचुन रायला ।।१।।

पद - दलित हिनवल,
जगात तरी फसलास ।
टाँय - कोट सोडुन गाढवा,
हाप चड्डी नेसलास ।
चवदार पाणी भुललास,
चायवाल्याच्या चायला ।।२।।

भाऊ मारले वस्ती जाळली,
भोगली बहीन - आई ।
डोळ्या देखत घडुन जरा,
कशी लाज वाटली नाही ।
तुझ्या सारखा दलाल,
अजुन एक पायला ।।३।।

तुकड्यावर त्यांचा जगलास,
हे म्हणुन सारं घडल ।
तु अक्कर माशी बेवारस,
हे काल आम्हा कळलं ।
उगाचं बसलो होतो आम्ही,
ताल धरुन नाचायला ।।४।।

लिलाव करतील देशाचा,
कुणी वाली उरला नाही ।
तुच असशील दलाल,
तुच करशील सही ।
बैल म्हणुन आणलं तुला,
त्याची जमीन वाहायला ।।५।।

कवी -
खेमराज भोयर : नागपूर

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा