सोमवार, १२ फेब्रुवारी, २०१८

● अस्पृश्यता आणि आंबेडकरांचे कार्य आणि कर्तृत्व

● अस्पृश्यता आणि आंबेडकरांचे कार्य आणि कर्तृत्व

लेख -
आनंद आर्कडे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

भारतातील अस्पृश्यता ही निग्रो गुलामीपेक्षा कित्येक पटीने अधिक दाहक होती. एका मोठ्या मानव समूहाला वेशी बाहेरचे जीवन जगण्यास मजबूर करणे. त्याच्या सावलीचा देखील विटाळ मानने, त्यांना पशु सारखी वागणूक देणे, सार्वजनिक पाणवठ्यावर कुत्र्या-मांजरांनी पाणी प्यायले तर हरकत नाही मात्र अस्पृश्यांनी पाणी प्यायले तर "विटाळ!" त्यावर कहर म्हणजे, ही अमानुष अस्पृश्यता धर्मशास्त्र प्रमाणित! अश्या प्रकारच्या गुलामगिरीचे जगात दुसरे उदाहरण नसावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा मार्टिन ल्युथर किंग अथवा नेल्सन मंडेला यांच्या पेक्षा अधिक खडतर आणि संघर्षमय होता. कारण, निग्रो लोकांवर लादलेली गुलामी धर्माने लादलेली नव्हती, उलटपक्षी भारतातील अस्पृश्यता ही धर्माधिष्ठित होती. या देशातली अस्पुश्यता पोसण्यास धर्म भावने कडून मिळणारी रसदच कारणीभुत होती. इथल्या अस्पुश्यतेला धर्मा देशाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याने अस्पुश्यता पाळने हे आपले कर्तव्य आहे हे इथल्या लोकांची पक्की समजूत होती. भारतातील विषमतेची मूळं जन मानसात मजबूत करण्याचे काम धर्म शस्त्रांनी केले. अस्पुश्यतेला पावित्र्याचा दर्जा प्राप्त झाला होता. जे अधिक घातक होते.

समाजात फोफावलेल्या या विषमतेच्या राक्षसी वृक्षास उखडून टाकणे ही सोपी गोष्ट मुळीच नव्हती. याउलट कृष्ण वर्णीय निग्रो लोक हे गुलाम होते मात्र ते धर्म घोषित अस्पृश्य नव्हते. तिथल्या वर्णवादाला धार्मिक अधिष्ठान प्राप्त नसल्याने तेथील लोकांच्या मनात कृष्ण वर्णियांच्या बद्दल असलेला द्वेष मावळला जाणे भारतातील अस्पुश्यतेशी तुलना करता कमी कष्टमय ठरणारे होते. भारतीय संस्कृतीत ज्या धर्माची मुळे खोलवर रुजली आहेत त्या धर्माला आव्हान देऊन अस्पृश्यतेचा कणा मोडण्याचे जे अशक्य प्राय काम बाबासाहेबांनी शक्य केले ते अद्वितीयच होय! याच कारणास्तव मार्टिन ल्युथर किंग असोत अथवा नेल्सन मंडेला, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आणि कर्तृत्व हे जागतिक परिप्रेक्षात श्रेष्ठतमच ठरते.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आनंद आर्कडे (लेखक एवं विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा