सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

● राज्याच्या आर्थिक धोरण बाबतचा बौद्ध दृष्टीकोन

● राज्याच्या आर्थिक धोरण बाबतचा बौद्ध दृष्टीकोन

बुद्धाने व्यक्तीचा संपत्ती विषयक दृष्टीकोन,
खाजगी मालमत्ता धारण करण्या विषयीचा दृष्टीकोन, संपत्तीचा विनियोग करण्याचे व्यक्तीचे धोरण कसे असावे (Micro Economics) याबाबत जसा आपला दृष्टीकोन विविध प्रसंगी केलेल्या उपदेशातून मांडला आहे तसाच राज्याचे आर्थिक धोरण कसे असावे? (Macro Economics) बाबत ही आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आहे. बौद्ध दृष्टीचे व्यक्तीधिष्ठीत अर्थशास्त्र आणि राज्याशी संबंधित स्थूल अर्थशास्त्र याचा विचार केल्यास बुद्धविचारात कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या अर्थव्यवस्थेची (मुक्त, भांडवली, समाजवादी, मिश्र या प्रकारच्या) मांडणी आढळून येत नाही. तर, अर्थ व्यवस्था (Economic System) कोणत्याही प्रकारची असो, व्यक्ती अथवा राज्याची अर्थविषयक नीती (Economic Strategy) कशी असावी याबाबतची मार्गदर्शक तत्वे बुद्ध विचारात आढळून येतात.
राज्याची आर्थिक नीती कशी असावी?

मज्झीम निकायातील "चक्क्वत्ति सिंहनाद सुत्त व कुटदंत सुत्तात" केलेल्या उपदेशात बुद्धाने दारिद्याला सामाजिक समस्या मानले आहे. मनुष्याला धन मिळाले नाही तर तो दरिद्री होईल. यामुळे दारिद्र्य वाढेल, दारिद्यामुळे जे मिळत नाही ते अनधिकाराने प्राप्त करण्याचे, हिसकावून घेण्याचे, चोरी करण्याचे प्रमाण वाढेल, चोरी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे चोरांना रोखण्यासाठी शस्त्रांचा वापर करण्याचे प्रमाण वाढेल, शस्त्रांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले तर हिंसेचे प्रमाण वाढेल, यामुळे चोरी करून ही ती न केल्याचे सांगण्यारांचे (खोटे बोलणारांचे) प्रमाण वाढेल, खोटे बोलणारांचे प्रमाण वाढल्यामुळे चुगली - चाहाडी करण्याचे प्रमाण वाढेल.चुगली चाहाडी करण्यामुळे व्यभिचाराचे प्रमाण वाढेल.

"अधनानाम धने अनुप्पादियामने दलिद्दियम विपुलम अगमासी, दलिद्दियम विपुलम गते अदिन्नदानम विपुलम अगमासी, अदिन्नदानम विपुलम गते सत्थम विपुलम अगमासी, सत्थे विपुलम गते पानातीपातो विपुलमअगमासी, पानातीपातो विपुलम गते मुसावादो विपुलम अगमासी, मुसावादे विपुलम गते पिसुन्नवाचा विपुलम अगमासी, पिसुन्नवाचा विपुलम गते कामेसू मिच्छाचारा विपुलम अगमासी"

अश्या प्रकारे दारिद्र या एका कारणामुळे समाजात अनीती आणि अशांतता माजेल असे बुद्धाचे म्हणणे आहे. या समस्येची सोडवणूक करण्यासाठी राजाने लक्ष घातले पाहिजे असा उपदेश या सुत्तात करण्यात आला आहे.

दिघ्घ निकायातील कुटदंत सुत्तात बुद्धाने अनुष्ठापन व दान धर्मापासून होणाऱ्या फल प्राप्तीची चर्चा करताना समाजाचे आहेरे आणि नाहीरे या दोन वर्गात झालेले विभाजन दाखविले आहे. आहेरे किंवा संपन्न वर्गामध्ये राजकीय व्यक्ती, राजाच्या दरबारातील लोक (अधिकारी) पुरोहित आणि विद्या संपन्न सल्लागार, सावकार आणि श्रेष्ठी यांना समाविष्ट केले आहे तर सर्व साधारण वर्गामध्ये शेतकरी, दास - श्रमिक आणि पशुपालक, फुटकळ व्यापारी - दुकानदार आणि शिपाई - सैनिक व कनिष्ट चाकर यांचा समावेश केला आहे. अनुष्ठापन व दान धर्मापासून योग्य फल प्राप्ती होऊन अनुष्ठान कर्त्यांचे स्वतःचे आणि समाजाचे भले होण्यासाठी पहिल्या चार (संपन्न) वर्गाला समाधानी ठेऊन दुसऱ्या वर्गातील तीन प्रकारच्या समूहाला अधिकाधिक वाटप केले पाहिजे असे बुद्ध म्हणतो. या सुत्तात सुख समाधान आणि समृद्धी मिळवण्यासाठी शेकडो पशूंचा बळी देऊ पाहणाऱ्या कुटदंत ब्राह्मणाला उपदेश करतान बुद्धाने महाविजीता नावाच्या राजाच्या कथेचा दृष्टांत दिला. या कथेतील महाविजीता राजाचा प्रधानमंत्री जो पूर्व जन्मात बोधिसत्व असल्याचे म्हटले आहे, तो राजाला म्हणतो की, राज्यामध्ये चोरांचा (भ्रष्ट अधिकारी) सुळ - सुळाट झाला तर वस्त्या, गाव आणि नगरे उध्वस्त होतात. राज्यामध्ये शोषित जनतेची (दस्सुखिल) संख्या वाढते. अशा वेळी राजाने जनतेवर अधिक कर लावले तर ते चुकीचे ठरते.महाराजाने आदेश दिल्यास मी या लोकांचा बंदोबस्त करू शकतो. परंतु दडपशाहीने या लोकांना कैदेत टाकले किंवा ठार मारले, जबरीने गप्प केले तर या लोकांमधील असंतोष समाप्त होणार नाही.

जे या जुलुमातून जिवंत राहतील ते राजाला धोका निर्माण करतील. या उलट महाराजाने जे शेतकरी आणि पशुपालक आहेत त्यांना धान्य (बियाणे) आणि चारा दिला, जे व्यापार करणारे आहेत त्यांना व्यापारासाठी भांडवल दिले, जे राजाची चाकरी करणारे (कर्मचारी) आहेत त्यांना चांगले जीवन जगता येईल असे वेतन दिले, तर ते लोक आपापला व्यवसाय उत्तम प्रकारे करतील आणि राज्याला धोका निर्माण करणार नाहीत. यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल, राज्यात शांतता नांदेल, लोक आनंदी होतील आणि आपल्या मुला - बाळांसह आपापल्या घरी सुखाने राहतील. (दिघ्घ निकाय, शीलखंध वग्ग) राज्यामध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाली तर शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते हे बुद्धाने प्रतिपादित केले आहे. राज्याचे आर्थिक धोरण जनतेचे हित व जनतेचे कल्याण लक्षात घेऊन आखले पाहिजे हा महत्वपुर्ण विचार बुद्धाने सांगीतला आहे.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सुनील खोब्रागडे (संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

1 टिप्पणी: