रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

● त्याग रमाईचा लयच भारी

● त्याग रमाईचा लयच भारी

(रमाबाई आंबेडकर जयंती स्पेशल लेख)

महामानवाला मोलाची साथ देणाऱ्या या माऊलीच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न..

शिवाजी महाराजांना छत्रपती बनवण्यात माँ जिजाऊ यांचा मोठा सहभाग. छत्रपती बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगूनच त्या मातेने शिवाजी महाराजांवर संस्कार केले. ज्योतिबांना क्रांतीबा महात्मा फुले बनविण्यात त्यांच्या सहचारिणी माता सावित्रीबाई फुलेंचे योगदान आहे. त्यांनी जर ज्योतिबांच्या समाज उद्धाराच्या कार्याला बळ दिले नसते तर ज्योतिबांच्या हातून समाज उद्धाराचे काम घडलेच नसते तत्वच माता रमाईने डाँ. बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटी जनाचे क्रांतीसुर्य बनले. एक कवी रमाईची महती सांगताना म्हणतो -

"भिमराज होते दिव्याच्या समान
परि त्या दिव्याची रमा वात होती."

बाबासाहेब आंबेडकर यांना घडविण्यात माता भिमाई पिता सुभेदार रामजी आंबेडकर यांची मोठी भुमिका आहे. माता भिमाबाईने दिलेले प्रेम, वात्सल्य सुभेदार रामजी यांनी त्यांच्या बाल मनावर केलेले संस्कार त्यांच्या जीवनाला लावलेली शिस्त आणि त्यांच्यात ज्ञानार्जनाची निर्माण केलेली आवड यामुळेच बाबासाहेब घडले आणि रमाईने सावली बनून बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली साथ व वैयक्तिक जीवनात मोठा त्याग केला. त्यामुळेच बाबासाहेब महामानव बनले म्हणजेच संयुक्तिक ठरेल.

७ फेब्रवारी १८९८ ते २७ मे १९३५ हा अवघा ३७ वर्षाचा रमाईचा जीवन प्रवास रमाई एका महासुर्याची सावली झाली. स्वत: जळत जळत या सावळीने त्या सुर्यावर मायेची सावली धरली. "कोट्यावधी" ची ती आई झाली. रमाईचा जन्म वणंदगाव, दापोली, जिल्हा रत्नागिरी येथे बुधवार ७ फेब्रवारी १८९८ रोजी झाला. त्याच्या आईचे नाव रुक्मिनी तर पित्याचे नाव भिकु धोत्रे होते. त्यांना अक्का आणि गौरी या २ बहिणी तर, शंकर हा लहान भाऊ होता. त्यांचे वडील दाभोळ बंदरावर हमालीचे काम करत असत. भाऊ शंकर धोत्रे हे मुद्रणालयात नोकरी करित होते. आई वडील लहानपणीच वारल्याने रमाईचे तिच्या भावंडाचे पालन पोषण चुलत्याने आणि मामाने केले.

१९०७ साली वयाच्या ९ वर्षी त्यांचा विवाह डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भिमराव आंबेडकर यांच्याशी झाला. रमाईचा स्वभाव मितभाषी, दृढ निश्चयी आणि स्वाभिमानी होता. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाचा पूर्वभाग अत्यंत काबाड कष्टात, हाल अपेष्टात काढला. पती परदेशी असता हाल अपेष्टात काढून ही कधी कुरकुर केली नाही किंवा कधी तोंडा वाटे कठोर शब्द काढला नाही. वेळ प्रसंगी त्यांनी शेणाच्या गोवऱ्या ही थापूल्या. रमाई म्हणजे समाधानी वृत्ती, मनाचे औदार्य - शुद्ध चारित्र्य ह्यांची मंगल  प्रतिमाच होती. रमाई शालीमतेची आणि विनम्रतेची मुर्ती होती. अडचणीशी भांडत रमाईने आयुष्यभर पतीच्या सुरक्षितेची काळजी वाहिली. एका अदृश्य आगीत रमाई जळत होत्या. त्यांच्या जीवन साथी युगाला नवा आशय आणि नवी दिशा देण्यात गुतला होता. त्याच्या कृती उक्तीनी देशात चक्री वादळे उठत होती, त्यांच्या वाणीतून लाव्हा सांडत होता. या देशातील जगा वेगळा पशुतेशी ते एकटेच भांडत होता. इकडे रमाई दरिद्राशी एकटीच भांडत होती. रमाईला ३७ वर्षाचे आयुष्य लाभले. २८ वर्ष त्यांनी बाबासाहेबांचा संसार केला. या काळात सासऱ्याचा मृत्यू, नवऱ्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू आणि गंगाधर, रमेश, इंदू आणि राजरत्न या मुलांचे मृत्यू तिने पाहिले त्या आधी तिने आई वडीलांचे मृत्यू पाहिले होते. रमाईला या मृत्यूनी दमवले, कष्टाने थकवले होते. काळज्यांनी तिचे काळीज कुरतडले होते.

रमाई आगीत ही चांदणे झाली. तिने जळण्यातच गौरव मानला. युग प्रवर्तकाचा हात सौदर्याचा शिल्पकार हात या देशातील क्रांतीची कलमे लिहत होता. त्यावेळी कुटूंबाची चिंता त्यांच्या पर्यत पोचून तो विचलीत होऊ नये यासाठी रमाईने आपल्या आयुष्याला चूड लावली. या तिच्या कृतीनेच तिला देशातील उपेक्षितांच्या मातृत्वाची महानता दिली. रमाईला लिहता वाचता येत होते. त्यांनी एकदा बाबासाहेबांना पत्र लिहून "बायका माझ्या गरिबीची चेष्टा करतात. माझ्या अंगावर सोन्याच्या एकही दागिना नाही" असे म्हणतात. अस कळवल त्यावर बाबासाहेबांनी रमाईस पत्राने उत्तर दिले. रामू कोणालाही मिळाला नसेल असा दागिना कदाचित तुला मिळेल! अशा कोट्यावधी लोकांच्या गळ्यातला तुच एक दिवस दागिना होशील. रामू माणसाला दुख मोठ करतात, सुख माणसाला मोठ करत नाहीत. ज्यांना मोठ व्हायच असत ते लोक दुखाचे आभार मानतात. रमा या दुखाचे तु आभार मान ही दुखे तुला उजेडात घेऊन जातील. बाबासाहेबांचे म्हणणे रमाईनां पटले.

रमाईना १९१३ ते १९२७ या काळात चार मुले व एक मुलगी असे ५ अपत्ये झाली. त्यातील यशवंत तेवढा वाचला. भिमरावांना संतती सौख्य मिळाले नाही त्यामुळे ते हादरून गेले. या दुखातून बाहेर पडणे कठीण झाले. मातृत्वाचे बुरूज ढासळलेले असताना ही रमाबाई डगमगल्या नाहीत. त्यांनी साहेबांच्या जन सेवेतच आपला दुख विसरून घेतल. एकदा भाविक रमाईने पंढरीच्या विठोबाच दर्शन घ्याव असा ध्यासच घेतला होता. पंढरपूरला जावून तस दर्शन त्याना कस मिळणार? दुरून दर्शन घेण्याच्या कल्पना तर, स्वाभिमानी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना सहनही होत नव्हती, रमाईची समजूत घालण्यासाठी ते म्हणाले -

"जेथे भक्तांना विठोबाच दर्शन ही मिळत नाही, ते पंढरपूर काय कामाचं तू खंत करु नकोस! त्याग पूर्व जीवन घालवित सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू, आणि येथेच दुसरे पंढरपूर निर्माण करु."

महाड सत्याग्रह नंतर रायगड वर उद्भवलेल्या जीवघेण्या प्रसंगानंतर रमाबाईना बाबासाहेबांची फार चिंता वाटे. साहेब घरी येईपर्यत त्यांच्या जीवात जीव राहत नसे. रमाईचे मन विशाल होते. त्या प्रेमळ होत्या, कष्टाळू होत्या. स्वत: च्या मनाला कष्ट देत होत्या. परंतू दुसऱ्याचे मन दुखवत नव्हत्या. साहेबांवर आणि त्यांच्या शिक्षणावर त्यांचे जीवा पलीकडे प्रेम होते. प्रदिर्घ आजाराने २७ मे १९३५ रोजी जीवन ज्योत मावळली. सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात जे अनमोल स्थान यशोधरेला आहे. तेच स्थान बाबासाहेबांच्या सिद्धार्थासाठी यशोधरा जशी चंदना सारखी झिजली तशीच रमाई डाँ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी अहो रात्र झिजली. रमाईच्या आधारामुळे डाँ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले. समाजाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची शिकवण देऊ शकले.

• 'रामू' च्या स्मृतीस अर्पण -
तिच्या अंत:करणाचा चांगुलपणा: तिच्या मनाचा उथासपणा; तिच्या चरित्र्याचा निष्कलंकपणा; त्याच प्रमाणे ज्यावेळी कोणी मित्र उरला नसता. आणि आमच्या पोटा पाण्याच्या विवंचनेचा काळ होता. असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता जिने ते दिवस मूकपणाने सहण केले व माझ्या बरोबर ते दु:ख सहन केले आणि मज बरोबर तसले ही दिवस काढले म्हणून तिच्या वरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहे.

'पाकिस्तानची फाळणी' या इंग्रजी ग्रथांच्या प्रथम पृष्ठावर डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील अर्पण पत्रिका लिहिली आहे. तिच रमाईच्या कार्याची पावती आहे. रमाईचा त्याग हा दलित पिडित व शोषितांच्या कल्याणासाठी आहे. अश्या या कोटी कोटी जनांच्या मातेला त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि साऱ्या जनतेला मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ।

आवाहात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा