मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

● माता रमाई म्हणजे त्याग

● माता 'रमाई' म्हणजे त्याग

महामाता रमाई यांच्या जीवनाची थोर गाथा सांगणं, जीवनातील सोसलेल्या खडतर काटेरी वाटांवर फुलं त्यांचा सुगंध दरवळ केवळ त्याच पसरवू शकल्या. दुसरं उभ्या आयुष्यात कोण करू शकलं नसतं. स्वतःच्या वागण्यात मित स्वभावात जन्मताच मूळ रक्तात दृढ निश्चयात असावी, होती.असं जाणविल्या शिवाय राहत नाही. कारण लहानपणीच नुकत्याच उमललेल्या कळीचा विवाह कोवळ्या वयातच रामजी सकपाळ बाबांनी त्यांचा सुपुत्र 'भीमराव' यांच्या बरोबर भायखला, मुंबई 'मासळी' बाजारात उरकला. त्यानंतर खऱ्या अर्थानं रमाईच्या जीवनाला सुरवात झाली. लहानपणीच आई वडिलांचे मातृत्व हरपले असताना देखील दहा बारा वर्षात सुद्धा ती विचाराने, आचाराने अगदी परिपक्व, शांत, सहन शीलतेने, अगदी सासुर वाशिणी सारखं चोकपणे वागून घरातील सर्वांची देखभाल उदरनिर्वाह करायची. तिचे हेच मोठेपण पुढे 'भीमा' ला महान प्रकांड पंडित विद्वतेचा महामेरू डॉ. बाबासाहेबांना घडवूनच या अवघ्या जगात महान केलं.हे खर वास्तव, सत्य आपल्या समोर असून ते केवळ माता रमाईच्या निस्सीम अथक प्रयत्नामुळे, कष्ठामुळे व त्यागामुळेच.

संसाराचा गाडा रमाईन ओडला नसता तर भीमराव रामजी आंबेडकर शिकला नसता. डॉ. बाबासाहेब झाला नसता, जगाचा महामानव बुद्धिवंत, आपला उद्धारकर्ता, मार्गदाता, येथील रंजल्या गांजलेल्या मागासलेल्या, उपेक्षित शोषित दारिद्यतेत खितपत पडलेल्या समाजाला कदापि मिळाला नसता. हे आपल्याला माता रमाईला कायमचं लीन, नतमस्तक होऊन मान्य करावेच लागेल. लहान वयातच तिला हे सगळे सोसावं लागेल असं कधी तिला स्वप्नात देखील वाटलं नसेल. परंतु त्या माउलीन सोसून पोळून आपला संसार उभा केला. मोल मजुरी करून, शेणाच्या गवऱ्या थापून आपल्या मुलांना संभाळल. परदेशात शिकत असलेल्या बाबासाहेबांना कधीही जाणवू दिलं नाही. ज्या मातेनं स्वत:ची मुलं डोळ्या देखत मांडीवर अखेरचा श्वास, प्राण सोडताना पहात हृदयावर दगड ठेवूनच स्वतःच्या पदराचा 'कफन' म्हणून वापर करून त्यात गुंडाळून अंतिम संस्कार करणारी माता! अशा हृदय हेलवणाऱ्या वेदनेत, दुःखाच्या क्षणी तिला काय भावना, वेदना झाल्या असतील? विचार करण्यापलीकडे आहे. हेच दु:ख मनाशी झेलून नेसलेल्या साडीचा पदर फाडून स्वताच्या पदरात गुंडाळून स्वतः स्मशानात जाऊन आपल्या उदरातून जन्म झालेल्या मुलांवर अंतिम संस्कार करणारी माता या जगात कुठे सापडेल?

बंधु हो,
मृत्यू झालेल्या माणसावर शेवटच्या क्षणी पांढऱ्या रंगाचे कफन घातले जाते ते सुद्धा घालायला तिच्याकडे पैसे नव्हते. अशा केविलवाण्या अवस्थेत देखील स्वतःच्या मनाला कणखर करून जीवनात घडलेल्या प्रसंगाला धिरोदात्तपणे सामोऱ्या गेल्या.

मित्र हो,
आजच्या २१ व्या शतकातील मातानो, भगिनीनो, मित्र हो, अशा महान कर्तुत्ववान रमाई मातेकडून धाडसाचे जिवंत मूर्तिमंत उदाहरणं, आत्मविश्वास व मनाचा कठोरपणा घ्या. त्याकाळी रमाई माता करू शकल्या. आज आपण काय करतो आहोत याचा विचार करावा. आभाळाचे ढग जसे दाटून आल्या नंतर काळाकुट्ट अंधार होतो क्षणात सोसाट्याचा वादळ वारा वहाताच कानठळ्या बसविणाऱ्या विजांचा गडगडाट होतो. अंधारात तर विजा चमकताना कोणतं तरी मोठं संकट येत आहे असा होणारा भास, काही क्षणातच त्या स्वत:च्या अंगावर पडणार असा गर्भगळीत इशाराच देत अंगावर धाऊन येत आहेत असं कदाचित तिला वाटलं असेल. कारण त्याक्षणी महामानव डॉ. बाबासाहेब तिच्याजवळ नव्हते, तिच्यावर कोसळल्या दुखाचा डोंगर सावरायला. रमाईन आयुष्यात एकटेपणाची कायम सवयच लावून घेतली होती. असं म्हणायला हवं. डॉ. बाबासाहेबांना आपला उद्धार करण्याकरिता परदेशात शिकायला धाडले होते. आज आपण काय करतो आहोत? कुठे आहोत? याच आकलन, मनन चिंतन करावंच लागेल. जेंव्हा डॉ. बाबासाहेब विद्वान होऊन भारतात येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले. हे तारेने कळल्या नंतर तिने मनाशी पक्का निश्चय केला की, बाबासाहेबांच स्वागत करायला भाऊच्या धक्यावर जायचंच. परंतु रमाईन राखून ठेवलेली साडी नेसण्यासाठी पत्र्याच्या पेटीत शोधायला गेली. परंतु त्या पत्र्याच्या पेटीत ठेवलेली साडी बिलकुल नेसण्या सारखी नव्हतीच. तिला वाळवी लागली होती, सडली होती, भोकं पडली होती. मात्र त्या दृढ निश्चय विचार केलेल्या रमाईन मनाशी ठाम निर्धारच केला होता आणी माता रमाई बाबासाहेबांच्या स्वागतास हजर राहिलीच, गेलीच. ती कोणती साडी नेसून गेली असेल?

पहा बंधुनो,
माझ्या 'निळ्या नभाचा आसरा' या काव्य संग्रहातील काव्यातून.....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विद्वतेचा महामेरू झाले.
निघाले भारतात येण्यास,
लुगडं फाटलेल नेसू कसं मी?
जाऊ साहेबांच्या स्वागतास,
नेसले साडी मी 'फेटा' जरीचा.
साहेबांना दिला होता एका सत्कारात
'शाहू' महाराजांचे आभार मानते मी
हजर राहिले बाबासाहेबांच्या स्वागतास हजर

पहा रमाईच्या लेकीनो,
किती कमालीची उत्सुक्ता, आतुरता माता रमाईकडे होती. शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांना दिलेला फेटा नेसून आपल्या नवऱ्याच अर्थात बाबासाहेबांच स्वागत करायला गेली व लांबूनच स्वागत केलं. कारण तिला कळत नकळत मनातून भीती देखील वाटत होती की, साहेबांना काय वाटेल. साहेब सुटाबुटात येणार आणी मी स्वतः त्यांची रामू जरीचा फेटा नेसलेली एका झाडाच्या आडोशाला उभी आहे, परंतु बाबासाहेबांचे डोळे सुद्धा कोणाला तरी शोधत होते. नजर इकडे तिकडे जाताच जेंव्हा साहेबांची तीक्ष्ण नजर रामूकडे गेली. त्याक्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रुंच्या धाराच लागल्या होत्या. कदाचित साहेबांना जाणीव झाली असेल मी एवढा शिकून मोठा झालो. सुट बुटात परदेशातून आलो आहे. अनुयायी फुलांचे हार घालून स्वागत करीत आहेत.मी लंडन अमेरिका राहिलो परंतु माझ्या पत्नीला, रामूला एक साडी घेऊ शकलो नाही. याचं शल्य कायमच मनात त्यांच्या कोरून राहिल असावं. पण आजची भगिनी, स्त्री ही केवळ रमाईच्या महान त्यागामुळेच दहा, वीस हजाराची साडी नेसते आहे, मोठ्या कपाटात वेगवेगळ्या प्रकारची साडी लाऊन ठेवत आहे. आनंदाने स्वतःच्या "नवऱ्याला कधी तरी प्रेमाने विचारते अहो, आज मी कोणती साडी नेसू" ही सहजता, साज, नटणे, मुरडणे, रमाईच्या अवर्णनीय त्यागामुळे तिने घडवलेल्या महान साहेब अर्थात डॉ. बाबासाहेबांच्या परीस्पर्शामुळे हे नाकारू शकत नाही लक्षात असू द्या.

माझ्या भगिनीनो,
हे केवळ रमाईच्या, डॉ. बाबासाहेबांच्या कठोर महान त्यागामुळेच आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं अर्थ निर्माण झाला हे विसरता कामा नये.आपलं स्वतःच जीवन, आयुष्य जोपर्यंत असेल, जोपर्यंत शरीरातील धमण्या मध्ये रक्त असेल, जोपर्यंत अखेरचा श्वास असेल तोपर्यंत या जगात माणसात ज्यांनी आणले व या भारतातील जातीपातींचा, विषमतेचा डोळ्या समोर असलेला अंधार कायमचा दूर केला. त्यांना मनातील आतील नाजूक हृदयात मानाचं, अनमोल स्थान द्या. त्या दोघां महान उभयतांचे स्मरण, कायमच स्थान आई वडिलांपेक्षा ही अधिक मोलाचं असून क्षितिजाच्या पली कडील पोहचण्याचा मान सन्मान त्यांनी आपल्याला मिळवून दिला याच विसर नकोच. त्यांच्या मुळेच आपल्याला हिमालयाचं शिखर पहाता, बघता आलं. ही प्रेक्षणीय, रमणीय सृष्टी डोळ्यांनी पहाता आली.याचं भान ठेवून आपण सगळ्यांनी अवलोकन करून आपण स्वतः सुद्धा आपल्या समाजाचा मागासलेल्या उपेक्षितांचा उद्धार करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना साथ देऊन अनेक हात एकसंग जोडायचे आहेत. रमाईला बाबासाहेबांनी पंढरपूरला विठोबाचे दर्शन घेण्यास मनाई केली आणी तिला म्हणाले की, मी तुझ्यासाठी दुसरे पंढरपूर निर्मान करीन. त्यांनी १९५६ ला बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन, देवून तथागतांचा विज्ञान बुद्ध स्वीकारून जगाच्या इतिहासात रक्तरहित क्रांती करून पंढरपूरातील विठ्ठला (मुळात विठ्ठल हा बुद्धच आहे) पेक्षा नाग भूमीत नाग वंशीय नागपूरातीत भारतातील मूळ बुद्धाला अंगीकृत करून भारतीय भूमी किती अधिक श्रेष्ठ आहे. याची ओळख जगाला निर्माण करून दिली अर्थात 'दीक्षाभूमी' हेच आपले पंढरपूर आहे. असे दाखवून दिले. मात्र हा सोहळा पाहण्यासाठी त्यागमूर्ती माता रमाई त्याक्षणी नव्हत्या. ही सल त्यांच्या मनात कायमची राहिली असेल. मात्र आपल्याला माता रमाई या डॉ बाबासाहेबांच्या मायेच्या "सावली" ला वंदन स्मरण करताना स्वाभिमानानं, अभिमानानं त्यांचे विचार बुद्ध धम्माला पोषक असतील असंच अनुसरण करून 'रममय - भिममय - बुद्धमय' होऊ या. अशा महान कर्तुत्वास जयंती निम्मित वंदन, अभिवादन !

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा