मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१७

● रमाई माऊली (कविता)

● रमाई माऊली

आसवांची आज झाली फुले,
स्मरुन माता रमाईला ।
आम्हा लेकरांची होऊन सावली,
धन्य ती कोटी कोटींची रमाई माऊली ।।धृ।।

गोवऱ्या थापुन केला संसार उभा,
भाव न दिसु दिले मुखी सदैव चंद्रमा ।
ह्रदया वरती नाव तु कोरले भिमरायाचे,
दु:खात हि मुख तुझे लाजरी लालीमा ।।१।।

सोसले कष्ट तु उपासी पोटी राहुनी,
चेतना दिली बा भिमाला होऊनी संजिवनी ।
तुझ्या त्यागाचे गं चिज झाले,
ह्या देशाला घडविणारे बाबासाहेब खरे तर तुच दिले ।।२।।

अंथाग प्रेमाची तु प्रेमळ गाथा,
दिसली तुज त्या वसतीगृहाची व्यथा ।
उपासी मुलांना पाहुनी,
सोन्याच्या बांगड्या दिल्या तु काढुनी ।।३।।

यातनांची होती गं तुज जान,
देऊनी चार बाळाचे बलीदान ।
मरण पाहिले तु अप्त जनांचे,
गरिबीत ही न ढळला तुझा स्वाभिमान ।।४।।

थोर भार्या तु थोर महामानवाची,
स्फुर्ती प्रेरणा होती भिमाची सावली ।
कोटी कोटी अभिवादन तुजला माझे,
आई तुच झाली गं कोटी कोटीची रमाई ।।५।।

कवि - 
रजनी निकाळजे

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा