रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

● पुन्हा यावे राजे (कविता)

● पुन्हा यावे राजे

अभय दान द्यावे राजे ।
परतूनी पुन्हा यावे राजे ।।धृ।।

आज ही होते नागवी प्रजा ।
रक्षण त्यांचे करावे राजे ।।१।।

कुस्करल्या जाती कळ्या ।
हात कलम ते व्हावे राजे ।।२।।

काळ हा मोठा बाका आला ।
रड गाणे शोषकांनी गावे राजे ।।३।।

अशी कशी ही निपजली प्रजा ।
शोधण्या वंश न जावे राजे ।।४।।

दीन दुबळे न्याय मागती ।
उघड्या डोळ्यांनी पहावे राजे ।।५।।

होतो अत्याचार नावावर तुमच्या
काय अन कसे सहावे राजे ।।६।।

माजले बहु बहुरूपी सोंगे ।
कैवारी कुणास म्हणावे राजे ।।७।।

बहुतजनांचे कल्याण व्हावे ।
राज्य रयतेचे रहावे राजे ।।८।।

कवी -
मिलिंद धुमाळे

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा