रविवार, १ जानेवारी, २०१७

● ऑक्टोबर क्रांतीचे मौलिकत्व

● ऑक्टोबर क्रांतीचे मौलिकत्व

जुन्या, मनुष्यमात्राला हीन मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करणे आणि मानावता जन्य बुद्ध धम्माचा स्वीकार करणे ही मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातली प्रमुख घटना आहे. या घटनेने काय झाले, तर नव्या माणसाच्या समृद्ध मानसाचा अंगीकार आणि वैज्ञानिक वास्तवाचा विनाअट स्वीकार करण्याचे दैदिप्यमान भान जागे झाले. प्रसिद्धी माध्यमां द्वारे ते जगभरातल्या व्यक्ती आणि समूहा प्रत पोचले. पृथ्वीवर मानवी समाजाचे साम्राज्य टिकून राहावे यासाठीची धडपड करणारा वर्ग निर्माण होत असलेला. प्रामुख्याने नव नव्या वैज्ञानिक वास्तवांचा स्वीकार करण्याचे कौशल्य आणि शक्ती मानवी मेंदूला ज्ञात होण्याची अपरिहार्यता मानणारा.त्यासाठीच्या गरजा अधोरेखीत करणारा. मानवी मेंदू स्वतंत्र असणे आणि त्याला आपल्या सारख्याच मानवी मेंदूंना ही मुक्ततेचा अधिकार असल्याचे मान्य असणे. ह्याला जोडूनच भ्रातृभाव आणि न्याय संकल्पनेचा उदय होऊ शकेल हे अध्याहृत असणे, गरजेचे असते असे मानणारा. प्रामुख्याने हेच लोक पृथ्वीचे मौलीकपण टिकवून ठेवतील असा विचार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात येतो.याच लोकांना गतीमान करण्यासाठी बाबासाहेब १९५६ च्या ऑक्टोबर ला बुद्ध धम्माचा स्वीकार करतात. आपल्या ग्रहा वरून निरनिराळ्या काना कोपऱ्यातून बाबासाहेबांचे अभिनंदन करणारे संदेश येतात. याची सर्व प्रथम नोंद घ्या. बुद्ध धम्म स्वीकाराच्या चर्चा होऊ लागल्या. १९५० ते १०५६ असा तो काळ. राज्यघटनेचा स्वीकार आणि बुद्ध धम्माचा स्वीकार असा तो काळ. पृथ्वी वरच्या अस्तित्वात असलेल्या तत्कालीन माध्यमां द्वारे जगभर या घटनेचे उमटलेले प्रतीसाद आणि जगभरातल्या मानवी समूहांच्या पारंपरिक बंदिस्त मूल्यांना झुगारता येऊ शकेल. असे आत्मभान देणारे हे दोन्ही प्रसंग.जगभरात नाविन्याची ओढ निर्माण झालेली. त्याच्या स्वीकाराची अहमहमिका चाललेली. सगळीकडे हा विचार जाऊ लागला. आणि हेच तर लक्ष्य होते. याच पार्श्वभूमी वर बुद्ध धम्माची सांख्यिकीय चर्चा ही होऊ लागली. काळ सरकत गेला.हे नेमकेपणाने थोडक्यात सांगितले पाहिजे की जागतिक स्तरावर बौद्धांची संख्या १९१० साली १३८०६४००० एवढी होती ही संख्या २०१० साली वाढली आणि ती ४३६२५८००० झाली. आज ती त्याहून जास्तच असेल. तरीही हे सरकारी आकडेच आहेत. बाबासाहेबांच्या लक्ष्याकडे काळ सरकतोय.

भारतात नव्याने होत असणारे व्यापक बुद्धधम्म प्रवेश [उदा. उदित राज, संदीप उपरे] हे त्याचंच फलित आहे. मात्र कुणी ही बुद्ध धम्म स्वीकारताना आत्म परीक्षण केले पाहिजे. ठरविले पाहिजे की बुद्ध धम्माचा स्वीकार ही एक जोखीम आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की आपण बुद्ध धम्म दोन कारणांसाठी स्वीकारीत आहोत. 1. आचारांच्या बदला साठी..., 2. विचारांच्या बदला साठी... हे निश्चित झाल्या नंतरच धम्म स्वीकार होतो तो दोन्ही ठिकाणी. देहिमनी धम्म स्वीकारा नंतर आपल्या वर्तन बदलाचे मूल्यमापन कोणत्या निकषांवर होईल याची माहिती आपल्याला असली पाहिजे. भंतेजी होणे हा ही एक मार्ग आहे. या अवस्थेत राहून अर्हत्व प्राप्ती मिळवायचीय. पण त्या आधी आपण अनागारीक होऊ शकतो. पण त्याच्या ही आधी आपण उपासक आहोत का याचा उलगडा आपण स्वतःचा स्वतःशीच केला पाहिजे. उपासकांसाठी आणि अनागारिकांसाठी धम्म सभ्यता आणि भंतेंसाठी धम्म विनय असे शब्द प्रयोग प्रचलीत केले पाहिजेत.

डॉ. बाबासाहेबांना या संदर्भात काय अपेक्षीत होते याचा आपण वारंवार धांडोळा घेतो का? बुद्ध धम्माच्या संदर्भात बाबसाहेबांचाच विचार का करण्यात येतो? बाबासाहेबांना बोधिसत्व का म्हटले गेले? बोधिसत्व आपोआप होतो का? बोधिसत्व कोणत्या पात्रता धारण करतात? धम्म सभ्यता आणि धम्म विनय या दोन्ही अनुषंगाने याचा माग काढला गेला पाहिजे. याच विचार स्त्रोतातून हा प्रतल उद्गमीत झाला आहे. डॉ. मा. प.थोरातां व्यतिरिक्त अन्य कुणी या अंगाने विचार मांडल्याचे माझ्या तरी वाचनात नाही.

बुद्ध होण्यासाठी त्याला दहा कष्ट साध्य अवस्थांमधून जावे लागते. त्यातली सातवी अवस्था दूरंङ्गमा! ही अवस्था बाबासाहेब फार जवळून जाणत होते. या बाबत आपण खोलवर मांडणी कधी करणार? बाबासाहेब हे आमच्यासाठी सर्व काही आहेत. असे म्हटले आणि सगळे काही बाबसाहेबांवर टाकून मोकळे झाले. ही स्वछंदी वृत्ती त्यागली पाहिजे. त्याशिवाय बाबासाहेब कळणार नाहीत. बाबासाहेबांना आपण बाबासाहेब का म्हणतो हे कळल्या शिवाय त्यांना बाबासाहेब म्हणता येणार नाही. बाबासाहेबांनी आपल्याला फार महत्तम जागतिक सभ्यतेशी जोडून दिले आहे. जगभर बौद्धांची संख्या अभिमान वाटावा अशी आहे. खंड निहाय बौद्धांची संख्या सांगतांना आशिया - ११.९%, उ. अमेरिका - ११.१%, युरोप - ०.२%, मध्य पूर्वोत्तर आफ्रिका - ०.१%, लॅटिन अमेरिका कारिबिन - ०.१% अशी माहिती उपलब्ध होते. बाबासाहेबांची अपल्या प्रत दूरदृष्टी लक्षात येते. आपण स्वतःला आता दलित न संबोधता बौद्ध संबोधले पाहिजे. आपल्या संबंधातल्या बातम्या जगात जातांना बौद्धांच्या म्हणून जायला हव्यात.

डॉ. वसंत शेंडे धम्म स्वीकार प्रसंगाला ऑक्टोबर क्रांती म्हणतात, त्यातली मूल्यात्मकता समजून घेतली पाहिजे. ऑक्टोबर क्रांतीच्या पूर्वीचे बौद्ध हे धम्माला धर्म संबोधीत होते. धार्मिकतेने पालन करीत होते. पूजा अर्चा करीत होते. ऑक्टोबर क्रांतीने या कर्मकांडाला छेद दिला. हा फार मोठा बदल होता. हा बदल मानवाच्या दैनंदिनीशी निगडीत होता म्हणून ऑक्टोबर क्रांतीने धर्मांतर झाले नाही तर मूल्यांतर झाले असे प्रा. सतेश्वर मोरे यांनी म्हटले आहे. पुढे जाऊन असे म्हणता येते की ऑक्टोबर क्रांतीची ही देणं आहे की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेकाने दरेकाला दीक्षा देणे खोलवर समजून घेतले पाहिजे. दूरङमा अवस्थे विषयी बाबासाहेब सविस्तर लिहितात. "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथात हे विवेचन आहे. इतर अवस्थांविषयी थोडक्यात लिहिले.दुरङमा विषयी भरगच्च दोन परिच्छेद लिहिलेले आहेत. हे आपण सर्व प्रथम लक्षात घेतले पाहिजे.दूरङमा विषयी इंटरनेट वर विपूल माहिती उपलब्ध आहे. त्याचाही आपण अभ्यास करावा. बोधिसत्वाचं वर्णन करतांना बाबासाहेब म्हणतात - In His Seventh Life.He Goes Beyond Time and Space. ही अवस्था धारण करणारे सत्व दूरङमा अवस्थेत असतो. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला ही अवस्था आपण ताडून पहा. आणि नंतरच बुद्ध धम्माच्या अभ्यासाकडे वळले पाहिजे.

। मनो पुब्बङमो धम्मा मनो सेट्ठा मनोमया ।

असे एक आणि आणि मानवी मन एका क्षणात ८९ पाळ्या बदलते. हे अभिधम्म पिटका अंतर्गत झालेले संशोधनांचे संकलन. या दोन्ही पातळ्या आपण अभ्यासार्थ घ्यायच्या आहेत. या जाणीव पातळ्यांच्या सखोल अभ्यासातूनच मानवी उत्क्रांतीच्या आकलनाचा प्रारंभ होईल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजां इतकीच मानवाला संरक्षणाची ही गरज असते. हे सर्व प्रथम बाबसाहेबांनीच ऑक्टोबर क्रांतीतून दृष्टीगम्य केले आहे. आपल्या माणूस असण्याचे हे संरक्षण बाकी काही नाही. आम्ही माणूस असून आम्हाला माणूस म्हणवून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. इतर मानवां सारखे आमच्याकडे ही पाहिले जावे. तोच सामाजिक दर्जा आम्हाला मिळावा हा आग्रह आहे. या आग्रहाचे संरक्षण हा आमचा मूलभूत अधिकार आहे. या मूलभूत अधिकाराचे संसूचन संबंध मानवी जातीच्या मन पटलावर उमटवीने हे ऑक्टोबर क्रांतीचे लक्ष्य आहे. या वेळी बाबासाहेबांनी बौद्धांशी, बौद्ध राष्ट्रांशी संवाद माध्यम स्वीकारून अखिल मानव जातीला हा परामर्ष स्रोत उपलब्ध करून दिला आहे की। "मनुष्यमात्राला हीन मान मानणाऱ्याचा त्याग." ज्या व्यापक माध्यम पटलावर त्याग करण्याचे धैर्य बाबासाहेब दाखवतात तो विकत घेतलेला नाही. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारता सारख्या परम पावन मंगल भूमीचा तो सर्वोच्च मानबिंदू आहे. अशी क्रांती या आधी पृथ्वीतला वर कुणीही केलेली नाही. असे झालेले असल्यास दाखवून देणारा कुणीही नाही.हे अभिमानाने म्हटले पाहिजे.

ऑक्टोबर क्रांतीसाठी त्यांनी ज्या कार्यकर्त्यांचे सहकार्य घेतले तेही बदला साठी आसुसलेले होते. घरादाराची पर्वा न करता ते अविरत झगडत राहिले. नंतरच्या पिढीने त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे. हे भान ठेवून ज्यांनी आंबेडकरी चळवळीच्या खुणा जपून ठेवल्या ते धन्य होत. कार्यकर्त्यांचे दस्त ऐवजी करण त्यांनी केले. त्यात प्रा. प्रकाश जंजाळ, कारंजा यांनी बी. एस. इंगळे समवेत लिहिलेला अकोला जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचा इतिहास वंदनीय आहे. कारण हे सगळे ऑक्टोबर क्रांतीशी संबंधीत आहे. ऑक्टोबर क्रांती ही मानवी इतिहासातली एकमेव घटना आहे. ऑक्टोबर क्रांती नंतरची मानवी अवस्था अजून जन्माला यायची आहे.

सहस्रावधी वर्षातून अशा घटना घडतात. या नंतर काय घडेल हे सांगता यायचे नाही. पण जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. या विधानातील इतिहास न विसरणे या आशय समुच्चयाशी राहून असे म्हणता येईल की; आपली शेपटी गळून पडली असे मानवाला कधी कळले असेल? आता आपण अंग झाकले पाहिजे असे मानवाला कधी कळले असेल? या कळण्याशी ऑक्टोबर क्रांतीचा सहसंबंध आहे.मानवी मेंदूतील ज्ञान केंद्र उघडण्याशी त्याचा सह - संबंध आहे.आपण सहज वर्तमान काळाकडे नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की, ऑक्टोबर क्रांतीच्या नंतरची मानवी स्थित्यंतरे वैज्ञानिकतेकडे जातांना दृतगती धारण करतात. पर्वता रोहण, ऑलिम्पिक मधले विजय, राष्ट्र प्रमुखांच्या निवडी, परग्रहांशी संबंधीत मोहिमा, प्राथमिक आणि उच्च शिक्षणाकडे पाहण्याचा कल, पैशाकडे पाहण्याला होणारे कमी महत्व, ई. ज्या दिशेला मानवी समाज जातोय ती दिशा ही ऑक्टोबर क्रांतीची देण आहे. ऑक्टोबर क्रांतीने जे तत्व पेरले ते प्रत्येकाला धारण करावेसे वाटले. ते स्वीकारताना त्यातले बुद्ध रंग आमचे आहेत असे आपुलकीने मंडित केले. एकूण काय, तर जे आमचे आहे तेच आम्ही स्वीकारीत आहोत अशी एक सार्थ जिगुत्सा प्रत्येकात ओतल्या गेली. जातांना हे सांगितले पाहिजे की नव्याने बुद्ध धम्म स्वीकारतांना तुमच्यातले आंबेडकरी स्वत्व प्रकटेल. त्रिशरण आणि पंचशील उच्चारतांना तुमच्या सर्वांगावर रोमांच उभे राहतील. तुमच्या सबंध देहाचा रोमाग्र पुलकीत झालेला असेल. लक्षात ठेवा हाच तो क्षण आहे. त्या रोमाग्रावर जी धारणा तुम्ही अंकीत कराल त्याचेच तुम्ही, तुमचे मन, तुमचा देह झालेले असेल. म्हणून सर्वाधिक गंभीरतेने हा प्रसंग ग्रहण करा.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
संजय प्रल्हादराव डोंगरे {जेष्ठ लेखक, शिक्षक)

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा