रविवार, १५ जानेवारी, २०१७

● देशद्रोह (कविता)

● देशद्रोह

'माणूसकीच्या रक्ताचा
अभिषेक घेणाऱ्या शेंड्या
ऊपटणे' असेल देशद्रोह,
तर हो, मी केलाय देशद्रोह ।।धृ।।

हो, मीच मारल्यात ढेराळलेल्या 
भटशाहीच्या ढुंगनावर लाता 
अन् मारत राहिन तिच्या 
माकड हाडाचे मणके गळे पर्यंत ।।१।।

आम्ही मागितला न्याय,
तो देशद्रोह? आम्ही म्हणालो 
'समता - बंधुता', तो देशद्रोह? 
आम्हाला तुमचा धर्म नको, 
नकारतो तुमचे नपुसक देव, देशद्रोह?
आम्ही म्हणतो 'चला एक होऊ,
जाती तोडू' तोही देशद्रोह? ।।२।।

तुमच्याकडे नेहमीच असते
'हाफ चड्डी' झाकायला तूमच्या 
कंडाळ संस्कृतिची लाज,
तूमच्या मार्मिक भाषेला असतो 
'धेड - लांडे' शब्दांचा साज ।।३।।

तूमच्या छिनाल भेजातून
प्रसवणारा प्रत्येक विचार
तूमची देशभक्ती असते?
तुम्ही मारता 'सत्यधर्माचे' 
पहारेकरी, देशभक्ती? 
तुम्ही काडता नथुरामी
गेंड्यांचे जुलुस, देशभक्ती? 
तुम्ही जाळता 'विजयी
विश्व तिरंगा प्यारा', देशभक्ती? ।।४।।

आमच्याकढे बोट दाखविणाऱ्या
मनुवादी दलदलीतील गांडुळांनों! 
जरा डोकावून पहा तुमच्याच
बोच्यातुन सुटते देशद्रोहाची दुर्गंधी ।।५।।

कवी -
नामदेव ढसाळ

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा