शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

● पुष्यमित्र श्रुंगाने केलेल्या प्रतिक्रांती नंतर मौर्य वंशाचे पुढे काय झाले?

● पुष्यमित्र श्रुंगाने केलेल्या प्रतिक्रांती नंतर मौर्य वंशाचे पुढे काय झाले?

संपूर्ण जगात ख्याती पावलेल्या मौर्य साम्राज्याचा उत्कर्ष सहन न होऊन, वैदिक धर्माचा दुराभिमानी असलेल्या पतंजलीने आपला शिष्य असलेल्या पुष्यमित्र श्रुंगाच्या मनात बौद्ध धम्मानुयायी मौर्य सम्राट बृहद्रथ याच्या विरुद्ध विष कालवून दिले. त्याने प्रभावित होऊन मौर्यांचा सेनापती असलेला पुष्यमित्र मौर्यांचा दु:स्वास करू लागला. बौद्ध धम्माचा अनुयायी असल्यामुळे बृहद्रथ आपले आजोबा सम्राट अशोक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार न्यायी पणाने आपले राज्य चालवित होता. अशोकाच्या वेळेप्रमाणेच त्याच्या वेळी ही ब्राम्हण, जैन व बौद्ध हे आपापल्या धर्माचे आचरण करत होते. पण बौद्ध भारताला पुन्हा आर्यावर्तात पराशर्तीत करण्याचे स्वप्न पतंजली पाहत होता. आणि लवकरच त्याला तशी संधी चालून आली. त्याचा शिष्य असलेला पुष्यमित्र श्रुंग ब्रुहद्रथाचा सेनापती झाला. आणि पतंजलीला आपल्या महत्त्वाकांक्षेसाठी आयते खतपाणी मिळाले. संधी साधून त्याने पुष्यमित्राला बृहद्रथ विरुध्द फिटवून मौर्य साम्राज्य उखडून काढण्याचे अघोरी कारस्थान रचले, व सम्राट ब्रहद्रथची हत्या करून मौर्यांचे सिंहासन काबीज करण्याचे षडयंत्र रचले.

पुष्यमित्र हा सेनापती असल्याने त्याने सैन्यात आधीच आपले ब्राम्हण सैनिक भरती करून ठेवले, व आपले पारडे गुप्तपणे मजबूत करुन ठेवले. सम्राट अशोकाने कलिंग विजयानंतर सैन्य सज्जता व शस्त्र सज्जता आजमावण्यासाठी सैन्य संचलन पाहण्याची प्रथा सुरु केली होती व ती बृहद्रथने ही कायम ठेवली होती. व तो आणीबाणीच्या वेळी ही आपले सैन्य तयारीनिशी सज्ज असावे, या करिता असे सेन्याचे संचलन घडवून आणत असे.एकदा असेच सैन्य संचलन पाहत असता एका बेसावध क्षणी पुर्वीच ठरल्या प्रमाणे अतिशय चपळाईने प्रथम बृहद्रथचे अंगरक्षक नि:शस्त्र करून पुष्यमित्राच्या ब्राह्मण सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतले व इतर राजसैन्य गोंधळलेल्या अवस्थेत असता, ते भानावर येण्या अगोदर सैन्याच्या सन्मुख उभा असलेल्या बृहद्रथवर अति त्वरेने पाठी मागून प्राणघातक हल्ला करून करून विश्वास घाताने दगा करुन, त्याला जागीच ठार केले व त्यानंतर राज प्रासादाकडे आपला मोहरा वळवून मौर्य घराण्यातील इतर लहान - थोर, स्त्री - पुरूष यांची सरसकट कत्तल सुरू केली. तशा बिकट परिस्थितीत ही मौर्य राज घराण्यातील काही स्त्रिया व पुरुषांनी स्वत:ला मोठ्या शिताफीने वाचवून, राज प्रासादातील गुप्त मार्गाने बाहेर पडून, वेशांतर करून लपत छपत पाटलिपुत्र नगराच्या बाहेर पडले. वाचलेल्या काही विश्वासू साथीदारांच्या मदतीने त्यांच्यातीलच काही पश्चिमेकडे राज पुतान्याकडे अरवली पर्वतात (राजस्थान) भरकटले, तर काही तसेच अतिदूर दक्षिणेकडे गुर्जर प्रदेशातून (गुजरात) महाराष्ट्रातील अपरांत (कोकण) प्रांतात येऊन पोहोचले. काही काळानंतर स्थिर स्थावर त्यांनी अरवली पर्वताच्या सुरक्षित सानिध्यात मेवाडच्या चितोडगड परिसरात आपले नवीन राज्य स्थापन केले व ते पुढे सुमारे नऊशे - साडे नऊशे वर्षे टिकले. तेथील शेवटचा मौर्य राजा "भान मौर्य" याचा इ. स.७६५ या सुमारास बाप्पा रावळ याने पराभव करून आपल्या "शिसोदिया" या वंशाची स्थापना केली.

अकबराला जेरिस आणणारा महाराणा प्रताप याच्याच वंशातला तर इकडे महाराष्ट्रात कोकण किनार पट्टीवर आलेल्या मौर्य वंशजांनी ही समुद्रातील एक सुरक्षित बेट पाहून आपली राजधानी तेथेच वसवून संपूर्ण कोकण प्रांत व पश्चिम महाराष्ट्रावर आपला अंमल पुन्हा नव्या जोमाने सुरू केला. जेथून ते आपला राज्य कारभार पाहत असत, ते ठिकाण म्हणजेच पुरी, श्रीपुरी अथवा आजचे घारापुरी, अर्थात "एलिफंटा" हे होय. हे बेट समुद्रात असून चार ही बाजूंनी पाण्याने वेढलेलै असल्यामुळे इतक्या दूरवर शत्रूंपासून अत्यंत सुरक्षित असे होते. येथे इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील बांधीव बौद्ध स्तूपांचे अनेक अवशेष सापडले आहेत. ग्रीक भूगोल तज्ञ "टॉलेमी" याच्या ग्रंथात, व "पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी" या प्राचीन ग्रंथात घारापुरीचा उल्लेख आढळतो. मौर्यांनी आपल्या सुरुवातीच्या येथील काळात पाटलिपुत्र जवळील सप्तपर्णी गुहे सारख्याच अत्यंत साध्या लेण्या येथील खडकात खोदल्या. मौर्यांचे येथील शासन ही सुमारे आठ - साडेआठ शतके टिकले. बौद्ध सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करणारा द्वितीय पुलकेशी सम्राट याने हजारो जलयानांच्या (जहाजांच्या) सहाय्याने पुरी बेटाला वेढा घालून मोठ्या आरमाराच्या सहाय्याने युध्द करून येथील मौर्यांचा ही पराभव केला व मौर्यांची येथील सत्ता संपुष्टात आली. पुढे शिवाजी महाराजांना राजा म्हणून न जुमानणारे जावळीचे चंद्रराव मोरे हे येथील मौर्यांचेच वंशज! ते स्वत: ला सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे वंशज समजत, व आपले नाव ही "चंद्रराव" असेच वंश परंपरेने लावीत. संत तुकाराम महाराज हे देखील मौर्यांचेच वंशज होते. इतकेच कशाला? आज महाराष्ट्रामध्ये ठिक ठिकाणी "मोरे" हे आडनांव असलेले सर्वच हे मौर्यांचेच वंशज आहेत.

आज घारापुरी येथे अस्तित्वात असलेल्या शैव पंथीय लेण्या या मुळच्या बौद्ध लेण्याच असून, त्यांचे सध्याचे स्वरूप व तेथै असलैली प्रचंड त्रिमूर्ती ही इ. स. च्या सहाव्या शतकानंतर वाकाटक, कलचुरी, राष्ट्रकूट यांच्या काळात प्राप्त झालेले आहे, तर एलिफंटा हे नामाभिधान तेथे असलेल्या हत्तीच्या महाकाय अशा दगडी पुतळ्यामुळे प्राप्त झाले आहे. लेण्याच्या प्रवेश द्वारा समोरच असलेल्या या प्रचंड दगडी हत्तीच्या शिल्पाला पाहून तो भंग करून त्याची खडी करण्याची कल्पना एका इंग्रज अधिकाऱ्याला सुचली व त्याने घणाचे घिव त्या हत्तीवर घातले व क्षणात हे सुंदर शील्प छिन्न विछिन्न झाले, परंतू सुदैवाने "जॉर्ज वूड" या वरिष्ठ अधिकाऱ्याला ही कुणकूण लागताच त्याने त्वरेने येथे येऊन या शिल्पाची मोड - तोड थांबविली. व त्याची डागबुजी करून हा गजराज इंग्लंड येथे नेण्याचे ठरविले, परंतु हे अवजड शिल्प बोटी मध्ये चढवत असतांना ते पुन्हा एकदा भंगले. मग मात्र तो प्रयत्न सोडून देत मोठ्या मुश्किलीने १८६५ साली मुंबईच्या राणीच्या बागेत आणून ते जोडून ठेवले. आजच्या जिजामाता उद्यानातील "भाऊ दाजी लाड" संग्रहालया जवळ हा हत्ती मोठ्या दिमाखात उभा असलेला आपल्याला दिसतो.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
अरविंद वाव्हाळ (विचारवंत एवं अभ्यासक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा