रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

● पुणे करार : समज आणि गैरसमज

● पुणे करार : समज आणि गैरसमज

१९२० अखेरीस बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य जनतेचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जाती संस्थे विरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. गांधीजी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्या वर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावर ही ते नाराज होते व त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागास वर्गीयांच्या सभे मध्ये बाबासाहेबांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागास वर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्या शिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी प्रचंड संतापले.

२४ सप्टेंबर १९३२ दिवस शनिवार, सकाळी पुणे करारा बाबत चर्चा चालु झाली. शेवटी १४८ राखीव जागा देण्याचे ठरले व स्पृश्य हिंदुंच्या जागांपैकी १०% जागा अस्पृश्य वर्गाला देण्यात येतील असे ठरले. आता मात्र राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी किंवा सर्वमत यावरुन खडा जंगी होऊ लागली. गांधीजींच्या समर्थकांनी १० वर्षासाठीच राखीव जागा असासाव्यात या मताला लावून धरले तर बाबासाहेबांनी कुठल्या परिस्थीतीत कालावधी ठरवू नये. अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीव जागा रद्द करण्याची अट घातली. या चर्चेतून काहीच परिणाम निघत नाही असे दिसु लागल्यावर शेवटी बाबासाहेबांनी गांधींची भेट घेतली. गांधीजी सोबत झालेली चर्चातर अधिकच बिन बुडाची व तर्क विसंगत निघाली. गांधींनी ५ वर्षातच सार्वमत घेण्याचे बोलून दाखविले. बाबासाहेब मात्र आपल्या मतावर ठाम होते. शेवटी गांधी चिडून जातात अन निर्णायक आवाजात गरजतात, “५ वर्षात सर्वमत घ्या किंवा माझा जीव घ्या.”

गांधींचा अविचारीपणा बाबासाहेबाना अजिबात आवडला नव्हता. ते तडक उठून बोलणीच्या ठिकाणी आलेत व शेवटी त्यानी रोकठोक भूमिका मांडली, सार्वमत कमीत कमी १० वर्षानी घ्यावे किंवा बोलणी थांबवू या असे जाहीर केले. बाबासाहेबांचा निर्णायक सुर ऐकून गांधीवादी नेत्यांचे धाबे दणाणले. दबावाचे सर्व तंत्र निष्क्रीय करण्यात बाबासाहेबांनी आघाडी घेतली. आता मात्र त्यांचे सर्व अस्त्र निकामी झाले होते. शेवटी सर्वमताचा मुद्दा बाजूला सारुन मुदतीचा नाम निर्देश न करता करार करावा असे ठरले.

दुपारी ३ वाजता राज गोपालाचारी यानी ही माहिती तुरुंगात जाऊन गांधीजींना सांगितली. गांधीजींनी आशिर्वाद दिला. चर्चेच्या ठिकाणी आनंदाच्या कारंज्या उडाल्या. लगोलगो कराराचा मसूदा तयार करण्यात आला. पुणे करार आणि त्यातला संक्षिप्त मसूदा असा होता.

१) प्रांतीय विधान सभा मध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी अस्पृश्य वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणे प्रमाणे : मद्रास - ३०, मुंबई व सिंध मिळून -१५, पंजाब - ७, बिहार व ओरिसा - १८, मध्य भारत - २०, आसाम - ७, बंगाल - ३०, मध्य प्रदेश - २० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.

२) या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धती द्वारे प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी अस्पृश्य वर्गातील ४ उमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.

३) केंद्रिय कार्यकारिणी मध्ये अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.

४) केंद्रिय कारिणी मध्ये अस्पृश्य वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल.

५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.

६) प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिणी मध्ये अस्पृश्यांच्या जागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे. तो पर्यंत अंमलात असेल जो पर्यंत दोन्ही संबंधीत पक्षां द्वारा आपसात समझोता होऊन त्यास हटविण्याची सर्व संमत निर्णय होत नाही.

७) केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत अस्पृश्यांचा मतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.

८) अस्पृश्यांना स्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक अस्पृश्यास नोकरीत घ्यावे.

९) सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.

मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम. सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबांना सही करु देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम. सी. राजानी मुंजे सोबत जो करार केला होता, तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्य द्रोहीनी या करारावर सही करु नये. अशी मद्रासच्या अस्पृश्यांची मागणी होती. शेवटी यात ही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबांनी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवियाने सही केली. इतर सर्व सभासदानी ही सह्या केल्या. अन तिकडे तुरूंगात ही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.

२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महा राज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्याने प्रत्यक्षपणे माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्री मंडळाने पुणे करार मंजूर करुन घेतला. त्यावर मंत्री मंडळाने शिक्का मोर्तब केले. तिकडे दिल्लीत हिंदु महासभेने ही आपली मंजूरी दिली, असा होता पुणे करार.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
निलेश यशवंत आंबेडकर : नाशिक
(लेखक, विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा