गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

● गौरी लंकेश यांची हत्या व वास्तव

● गौरी लंकेश यांची हत्या व वास्तव

लेख -
सतीश कांबळे : कोल्हापुर

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

गौरी लंकेश यांना मारण्यात आले ही धार्मिक कट्टरता की राजकिय अपरिहार्यता याचा विचार करण्याची वेळ आली आहे. गौरी लंकेश यांनी लंकेश पत्रिके यातुन सरकार विरोधी जी मोहीम चालवली होती. त्यामुळेच त्याना जीव गमवावा लागला आहे. २०१४ पासुन दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश यांना मारण्यात आले आहे. या सर्वां मध्ये एकच समान दूवा आहे तो म्हणजे हे सर्वजन हिंदूत्वाच्या अजेंड्याला मारक होते. या सर्वांना मारण्याची ही पध्दत सारखीच आहे. कुणी तरी दोघे जन बाईक वरुन येतात, गोळ्या घालतात व निघून जातात. संशयीत म्हणुन एखाद्या संस्थेचे नाव येते तिथवर येवुन तपास बारगळतो. पुढे तपासात प्रगतीच होत नाही. गौरी लंकेश यांनी थेट प्रधानमंत्री यांच्यावर टिका केली होती. कन्हैय्या कुमारला मुलगा संबोधले होते. हा सगळा मामला संघाच्या फेक न्युज बनवणाऱ्यांपर्यंत जातो. गौरी लंकेश त्यांच्या लंकेश पत्रिके साप्ताहिकात 'कंडा हागे' नावाच्या संपादकियात लिहायच्या. ज्याचा अर्थ आहे 'जे मी पाहीले'. गौरी लंकेश यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर एक फोटो प्रसिध्द केला होता ज्यात एक संडासचे भांडे होते त्यावर मोदी नाव होते. "हर हर मोदी, घर घर मोदी" या घोषणेची खिल्ली उडवली गेली होती. गौरी लंकेश मोदींना नेहमी बुसी बसीया म्हणत. याचा अर्थ "जेव्हा पण तोंड उघडतील तेव्हा खोटेच बोलतील" असा होतो.

जे लोक राजकारणात अडचणीचे ठरतात त्यांना धर्म चिकीत्सेच्या नावाखाली संपवणे हे पण चूक आहे. गौरी लंकेश यांनी तथाकथीत हिंदूत्वाच्या अजेंड्याला टार्गेट केले होते. हा हिंदूत्वाचा अजेंडा आहे तरी काय? हिंदूत्वाच्या भावना आहेत तरी काय? ईथे हिंदूत्वाच्या नावाखाली अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासुन रोखले तरी कुणी हिंदू याचा निषेध करत नसतो. कुणी हिंदूत्वाच्या नावाखाली निरपराध मुस्लीमांना संपवले तरी बोलत नसतो. कुणी काय खावे या बद्दल ही हिंदूत्वाच्या नावाखाली गळचेपी केली जाते. हिंदूत्वाच्या नावाखाली गाय माता असते पण गाय पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज माफी देताना या हिंदूत्वाचे ठेकेदार गळा काढतात. कर्ज माफी दिली की आम्ही टॅक्स भरतो व शेतकरी फुकटे आहेत, शेतकरी चैन्या करतात, शेतकरी कर्ज काढून उधळ पट्टी करतात असा ही तर्क काढला जातो. हिंदूत्वाच्या नावाखाली केरळ मधील हिंदूंना मारले, काश्मिर पंडिताना मारले म्हणुन हिंसेचे समर्थन केले जाते पण रोजच कुठे तरी हिंदू असणाऱ्या मागास वर्गियांवर अत्याचार होतात. हिंदू मागास वर्गिय महिलांवर बलात्काराच्या घटना घडतात तिथे हे हिंदूत्वाचे रखवाले अवाक्षर ही बोलत नसतात. संपुर्ण भारतात गाय माता असते पण गोव्यात गाय उपयुक्त पशू असते. तसेच साधू साध्वींना जामीन मिळाला, बॉम्ब स्फोटाच्या आरोपीला जामीन मिळाला तरी ते लोक क्रांतीकारकांच्या यादीत येतात. जेल मधून बाहेर येताना बॉम्ब स्फोटाच्या आरोपीच्या चेहऱ्या वरच्या तेजावर पान भरून लिहीले जाते. तिथे तो केवळ जामीनावर सुटलाय हा विचार नसतो. जिथे देशाचा चौकीदार जर एखाद्या वृध्द महिलेच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीचा ट्विटर वर फॉलोअर असेल जो व्यक्की त्या वृध्द गौरी लंकेश यांच्या मृत्युला "कुतिया की मौत" म्हणतो याचा अर्थ हे सरकार हिंदूत्वाच्या नावाखाली दडपशाही करणाऱ्या लोकांची पाठ राखण करतेय हे सिध्द होते.

ऑक्सीजन अभावी ४५० च्या वर बालकांचा मृत्यु झाला पण ऑगस्ट मध्ये बालके मरतातच असा अजब प्रतिवाद केला गेला. फेक न्यूज बद्दल गौरी लंकेश यांनी आवाज उठवला होता. बिजेपीच्या आयटी सेलचे दुखणे बनल्या होत्या. गौरी लंकेश यांना त्यांच्या सत्य बोलण्याची जी सजा मिळाली तशी सजा त्यांच्या मारेकऱ्यांना व त्यांच्या मास्टर माईंडना व्हायला हवी. देशभरात सरकार विरोधी वातावरण असताना सरकार विरोधी आवाज उठवणाऱ्यांना अशा प्रकारे संपवले जाणे हे हुकुम शाहीचे द्योतक आहे. ज्या देशात आजवर पक्षांचे सरकार होते जसे कॉंग्रेस सरकार, जनता दल सरकार, अटल बिहारींचे बिजेपी सरकार मात्र मोदी सत्तेत आल्यापासुन हे सरकार पक्षाचे राहिले नसून हे मोदी सरकार झालेय ईथेच हुकुम शाहीची सुरवात झाली आहे. यांच्याकडे कसला ही अजेंडा नाही, विकासासाठी कोणताही ठोस विकास कार्यक्रम नाही, मागच्या कॉंग्रेस सरकारने केलेल्या कामांचे श्रेय घेणे हाच यांचा अजेंडा राहिला आहे. मंगळ यान मोहीम, मनरेगा, आधार कार्ड, जि एस टी, स्वच्छ भारत ईत्यादी योजना या कॉंग्रेस सरकारने केलेल्या योजना आहेत. योजनांची नावे बदलून त्याच योजना पुढे आणल्या गेल्या. पण त्याही अयशस्वीच झाल्यात. योजनांची घोषणा करणे व त्यांची अमंल बजावणी करणे यात खुप फरक असतो. हे लोक घोषणा करण्यात पटाईत आहेत. लोकांच्या समस्या गेल्या तेल लावत पण यांना भारत माता की भारत पिता यामध्ये स्वार्थ आहे. गायी बद्दल स्वार्थ आहे. कुणी सरकार विरोधी आवाज उठवला तर त्याला देशद्रोही ठरवण्यात स्वारस्य आहे. देशाचा विकास दर ७% टक्यांवरुन १०% टक्के होणार होता. तो दहा टक्के तर सोडाच पण विकास दर ५% टक्क्यांवर आला आहे. कॉंग्रेस काळात संपुर्ण जगाला मंदीची लाटेने होरपळले होते पण भारतात जागतिक मंदी जाणवली नाही कारण ईथे जागतिक दर्जाचा अर्थशास्त्री प्रधान मंत्री होते. मनमोहन सिंहांच्या कार्यकालात कधी चीनने संपुर्ण दहा वर्षात सिमेवर आगळीक केली नाही. पाकिस्तानच्या हल्ल्यात मरण पावलेल्यांची संख्या मनमोहन सिंहाच्या सरकार वेळी केवळ १२५ होती तीच मोदी सरकारच्या ४ वर्षाच्या काळात ७०० च्या वर आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येणार होता. काळा पैसा तर बाहेर आला नाही पण यांची तोंडे मात्र काळी झाली. खुद्द रिझर्व्ह बँकेलाच माहीत नाही की किती काळा पैसा बाहेर आला. जुमले बाजीच्या जिवावर, सोशल मिडीया, प्रिंट मिडीया, ईलेक्ट्रॉनिक मिडीया यांच्या जिवावर सत्तेत आलेले विकावु सरकार यांच्याकडे कसलाच विकासाचा अजेंडा नाही. विकास पुरुष म्हणुन चौकीदार शोभत नाहीत. जाहिरात बाजी, मार्केटिंग, ट्रोल्सच्या माध्यमातुन खोटेपणाच्या आधारे सत्तेत आलेले सरकार हे कुणाच्या ही भल्यासाठी नाही. एक मात्र आहे की यांनी जो विकास केला तो विकास देशातील बड्या उद्योजकांच्या फायद्याचा ठरला. अडानी, अंबानी यांना फायद्याचा ठरला.

अाज असे लोक सत्तेत आहेत ज्यांच्या पुर्वजांनी मुस्लीमांकडे मंत्रीपदे सांभाळली, धनिकांकडे मुन्शीपदे सांभाळली, गावोगावी फिरुन व्यापार केला. बाजार बुनगे म्हणुन सैन्या बरोबर हिंडले. दिवाणजी म्हणुन चोपड्या सांभाळल्या. हे लोक देशाला दिशा देण्यासाठी नालायक ठरलेत. जर यांच्या विरुध्द कुणी आवाज उठवला तर हे लोक गोळी घालुन आवाज बंद करणार असतील तर हे जास्त काळ चालणारे नाही. विवेकाचा आवाज बुलंद होता व असेल ही हाच विवेकाचा आवाज जर बुलंद करायचा असेल तर सत्ता लालसी, केवळ एकाच धर्मातील मुठभर लोकांचे हित जोपासणाऱ्या लोकांना सत्तेतुन हद्दपार करायलाच हवे. २०१९ ला सर्वांनी मिळुन या सरकारच्या भ्रष्ट निती विरोधी आवाज उठवायला हवा. आता हे जरी सत्तेत असले तरी राज्यसभेत हे अल्प मतात आहेत. तरीही प्रधान मंत्री म्हणतात की - छोटे छोटे १००० कायदे बदललेत. जर हे सरकार पुन्हा २०१९ ला सत्तेत आले तर यांचे राज्य सभेत ही बहुमत असेल. त्यावेळी हे घटना ही बदलू शकतात. कारण देशाचा कारभारच सध्या पपेटच्या हाती आहे. हा पपेट केवळ बोलू शकतो, नौटंकी करु शकतो, जुमले बाजी करु शकतो, मंकी बात करु शकतो, कार्य प्रवणता शून्य आहे. अशा लोकांना २०१९ ला देशाच्या राजकारणातुन डिलीट करायची वेळ आली आहे.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सतीश कांबळे उर्फ सतीश भारतवासी
(लेखक, विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा