रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

● धम्मचक्र प्रवर्तन दिन : आशय, शंका आणि मार्गदर्शन

● धम्मचक्र प्रवर्तन दिन : आशय, शंका आणि मार्गदर्शन

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जात, वर्ण व्यवस्थेच्या असमानतेवर आधारित असलेला हिंदू धर्म कायमचा त्यागला. मानवतेला प्राधान्य देणारा, सर्व मनुष्य मात्रास समान समजणारा, विश्वाला प्रेम, मैत्रीचा संदेश देणारा, भारताचा मूळ संस्कार बुद्ध धम्म स्वीकारला. त्यांच्या विचार सरणीस अनुसरणाऱ्या समाज आणि व्यक्तीस २२ प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांच्या जीवनभराच्या अथक संघर्षाचे सार या एका दिवसात मिळते, असे मला वाटते

• निर्माण होणारी खंत -

खंत वाटते कि - ज्या उत्साहात हा दिवस साजरा करायला हवा तो उत्साह दिसत नाही. हा दिवस अगदी तशाच प्रकारे साजरा करायला हवा ज्या प्रकारे बाबासाहेबांनी तो महान दिवस वठवला होता. धर्म परीवर्तन बाबत बाबासाहेबांची २ पत्रे ज्यामध्ये नमूद असलेले वाक्य पहावे.

पत्र क्रमाक १ मध्ये महत्वाचे वाक्य :
"I have decided to have my conversion about the Dussehra holidays" about means "sometime around"

• निर्माण झालेला आशय -

बाबासाहेब इथे अगदी स्पष्टपणे सांगतात की - दसऱ्याच्या "सुट्टी" मध्ये (जेंव्हा अनेक लोकांना ऑफिसला जायचे नसते आणि ते सर्व ह्या कार्यक्रमाचा फायदा करून घेतील, हा एकच आशय मला दिसतो) दसऱ्याच्या दिनाचे विशेष बाबासाहेबांना नक्कीच नाही. आणि अशोका विजयादशमीचे हि महत्व नाही हे स्पष्ट होते. म्हणून आपण असा निष्कर्ष काढू शकतो कि - बाबासाहेबांना अपेक्षित होते कि, जास्तीत जास्त लोकांनी एकत्र यावे आणि धम्म दीक्षेचा मोठा कार्यक्रम व्हावा.

पत्र क्रमाक २ मध्ये महत्वाचे वाक्य :
"There is Really No Ground for Regret or Though the First Ceremony Might Be Held in Nagpur It is Not That Similar Ceremonies Will Not be Held in Bombay or Other Places. These Will Be Held Wherever There is Big Gathering of People Desiring to Convert Themselves and I Will Be Present There".

या पत्रात देखील मुंबई च्या लोकांस उद्देशून बाबासाहेब म्हणतात - "ज्या प्रकारचा कार्यक्रम नागपूर मध्ये झाला त्याच प्रकारचा कार्यक्रम मुंबई आणि इतर ठिकाणी देखील होऊ शकतो. असे कार्यक्रम पुन्हा होतील जेंव्हा मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतील आणि धर्म बदलण्यासाठी त्यांची इच्छा असेल आणि ज्या वेळेस मी देखील तिथे उपस्थित असेल."

• निघालेले निष्कर्ष -

बाबासाहेबांना देशात अनेक ठिकाणी बौद्ध धम्मात पदार्पण करणारे कार्यक्रम घ्यायचे होते. दिवस महत्वाचा नाही तर तो कार्यक्रम, आणि कार्यक्रमाचे सार्वजनिक मोठे स्वरूप त्यांना अपेक्षित होते.

• शंका आणि त्याचे निरसन -

हिंदुत्वाचे कोडे, क्रांति आणि प्रतिक्रांती, शुद्र पूर्वी कोण होते, अशा अनेक पुस्तकांतुन बाबासाहेबांनी भारताचा खरा इतिहास जगा पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आज भारतात अशोकाबद्दल कोणत्याही शालेय पुस्तकात, अभ्यास क्रमात हवी तेवढी माहिती नाही. किंवा ती मुद्दाम वगळली जाते. विश्वातील सर्वात मोठे साम्राज्य हे मौर्य राज घराण्यातील सम्राट अशोकाने  निर्मिले आहे. सम्राट  भारतातून आक्रमणाने उच्चाटन झालेल्या बुद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने सामाजिक, राजकीय स्तरांवर बुद्ध धम्माची तत्वे रचली होती. त्यामुळेच इतक्या मोठ्या साम्राज्याला सोन्याचे दिवस आले होते असे म्हणणे अनुचित ठरणार नाही. असे असून ही बाबासाहेब त्यांच्या पत्रात अशोक विजयादशमी असा उल्लेख न करता "दशहरा" असा उल्लेख करतात. म्हणूनच अशोक विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशीच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करत बुद्धाला सोबत घेण्याचे ठरवले हे म्हणणे योग्य ठरणार नाही.

• आपण काय करावं? -

आपण "अशोक विजयादशमी" कि "१४ ऑक्टोबर" असा "भांडणाचा" विषय घेण्याऐवजी कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा नेता येईल ह्या कडे लक्ष द्यावे. बाबासाहेबांना सुद्धा हेच अपेक्षित आहे, असे त्यांच्या पत्रातून दिसून येते.

१४ ऑक्टोबर ह्या दिवशी सुट्टी नसेल आणि दसऱ्याच्या दिवशी अनेक लोकांना सुट्टी असेल आणि जास्तीत जास्त लोक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा लाभ घेऊ शकत असतील तर दसऱ्याच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करावे. १४ ऑक्टोबरला सुट्टी असेल (किंवा रविवार असेल) तर त्या दिवशी कार्यक्रम ठेवावा. किंवा दोन्ही दिवस किंवा आठवडाभर हे कार्यक्रम ठेवावा. कार्यक्रम मोठे ठेवावे, ते सार्वजनिक ठिकाणी ठेवावे. जास्तीत जास्त लोकांना ह्यात दिवसात सामील करून घ्यावे. मोठ्या उत्साहात धम्म प्रवर्तन दिन साजरा करावा.

सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय समाजाला त्यांच्या पूर्वजांच्या पूर्व धर्माचे स्मरण करून द्यावे. ती खऱ्या अर्थाने योग्य "घर वापसी" असेल. बुद्ध धम्माचे महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत न्यावे. हे काम वर्षभर करावे. ज्या प्रमाणे बाबासाहेबांनी हिंदू धर्म, हिंदू देव, हिंदू रूढी सोडल्या त्या प्रमाणे हिंदू तिथी, मुहूर्त हे आपण सुद्धा त्यागावे. त्यातूनच आपण संपूर्ण "परिवर्तन" झाल्याची साक्ष जगाला आणि आपल्या पुढल्या पिढीला देऊया.

◆◆◆

साभार -
एबी प्लॅटफॉर्म - कम्युनिस्टी
(AB Platform - Community)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा