बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

● शेतकऱ्यांचे स्वराज्य

● शेतकऱ्यांचे स्वराज्य

लेखक - 
केशव सीताराम ठाकरे

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

लेखकाचा प्रास्ताविक खुलासा

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

या पुस्तकात व्यक्त झालेल्या विचारांचे बीजारोपण २९ वर्षांपूर्वी देवास (मध्य हिन्दूस्तान) येथील व्हिक्टोरिया हायस्कूल मध्ये मी मॅट्रिकचा अभ्यास करताना झालेले आहे. त्यावेळी माझे परमपूज्या गुरुवर्य़ कै. गंगाधर नारायण शास्त्री (पण्डया) एम्.ए. ‘शाळा सुपरदंट’ हे आमचा इंग्लीश क्लास घेत असत. यांची शिक्षण पध्दती परिणामकारक, चित्तप्रबोधक आणि व्यापक असे. विषय चिकित्सापूर्वक समजावून देण्याची यांची हातोटी मला आज सुध्दा अनन्य अशीच वाटते. ‘कॅरेक्टर ऑफ दी हॅपी वॉरियर’ आणि गोल्ड स्मिथची ‘ट्रॅव्हलर’ व ‘डेझर्टेड विलेज’ ही काव्ये शास्त्रीबुवा सबंध वर्षभर दररोज नियमित शिकवीत असत. त्यांचे व्याख्यान सुरु झाले की बारिकसारिक मुद्देसुध्दा स्पष्ट सिध्द करण्यासाठी अनेक संदर्भ ग्रंथांच्या राशीच्या राशी टेबलावर येउन पडायच्या. इतिहास तत्त्वज्ञान काव्य समाजशास्त्र थिऑसफी, कसलाही संदर्भ विवेचनात येताच, त्याची शहानिशा स्पष्ट झाल्याशिवाय शास्त्री बुवांचे पाऊल पुढे पडत नसे. इतकेच नव्हे, तर ‘डेझर्टेड विलेज’ मधला Sweet Was The Sound, When Oft At Evening’s Close Up Yonder Hill The Village Murmur Rode; ‘As Some Tall Cliff That Lifts its Aweful Form.’ या काव्या मधले वर्णन प्रात्याक्षिकाने पटवण्यसाठी शास्त्री बुवा आम्हा विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन एका खेड्यातही दोऱ्यावर गेले होते. ट्रॅव्हलर मधल्या ‘As Some Tall Cliff That Lifts its Aweful Form.’ या चारच ओळीवर शास्त्री बुवा तब्बल आठवडाभर प्रवचन करीत असताना, त्यांची एकतान झालेली तल्लीन वृत्ती आजही माझ्या नजरे पुढे स्पष्ट दिसत आहे. माझ्या विचार - उच्चार - आजारांची पिण्ड प्रकृती महाराष्ट्राला आज बरी वाईट परिचित आहे, तिच्या कमावणीच्या श्रेयाचा बराचसा भाग मी कै. शास्त्री बुवांच्या स्मृतीसमाधीवर गंगेच्या पाण्याने गंगेची पूजा म्हणून आज जाहीर रीतीने समर्पण करीत आहे. मुंबईच्या चालू संपाच्या कान्तीयुगात गिरणी कामगारांच्या प्रत्येक झोपडीत उपासमारीची अवदसा भयंकर धुमाकूळ घालीत आहे. सावकारी पिण्डाच्या माझ्या अनेक मित्रानी काय देवीजीच्या चापात माझ्या उमल्या लोक सेवेची ठेचणी करुन, मला ही या गिरण बाबूंच्या उपासमरीचा आणि कफल्लक राहणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुसंधी दिल्यामुळे, त्यांच्या वेदनांशी आणि भावनांशी तद्ररुप आणि तल्लीन होणे कठीण गेले नाही.

प्रस्तुत पुस्तकाच्या कल्पनेचा जन्म गिरणीत जाणाऱ्या पण बेरोजगारीने उपाशी तळमळणाऱ्या एका कोकण्या बाईच्या स्फुंदनात झालेली आहे. करुणेला ही करुणेचा पाझर फोडणारे तिचे चित्र पाहून मी क्षणभर दिड मूढ होउन, तसाच, रस्त्यावर उभा राहिलो. एका क्षणात लाख विचारांचा सिनेमा मस्तकात खेळला. इतक्यात एका मोटारबाईने कर्णभेदी कर्णा पुंकून राज रस्त्यावर उभे राहणे मूर्खपणाचे आहे, असे माझे कान उपटले. फूटपाथ वरुन मी घरचा (घर कसले? भाडोत्री बिऱ्हाडाचे खुराडे!) मार्ग धरताच, डेझर्टेड व्हिलेज मधल्या खालच्या ओळी २९ वर्षांपूर्वी शाळेत पाठ केलेल्या ओळी आपोआप बिनचूक माझ्या तोंडून बाहेर पडू लागल्या. Ah, Turn Thine Eyes, Where The Poor Houseless Shivering Female Lies. She Once, Perhaps, In Village Plenty Blest, Has Wept At Tales Of Innocence Distrest; Her Modest Looks The Cottage Might Adorn. Sweet As The Primrose Peeps Beneath The Thorn; Now Lost To All Her Friends, Her Virtue Fled. Near Her Betrayer’s Door She Lays Her Head; And, Pinched With Cold, And Shrinking From The Shower. With Heavy Heart Deplores That Luckless Hour When Idly First, Ambitious Of The Town, She Left Her Wheel And Robes Of Country Brown. लागलीच शास्त्री बुवांच्या प्रवचनाची आठवण जागी झाली. याच ओळी समजावून सांगताना, उध्वस्त खेड्यातून शहरी भांडवल शाहीच्या जाळ्यात येऊन अडकलेल्या तरुणीच्या कर्महाणीचे ह्रदयद्रावक वर्णन तल्लीनतेने चालले असताना, शास्त्री बुवा मधून मधून आपले डोळे उपरण्याने कसे पुशीत, त्याचेही स्मृतिचित्र मला दिसू लागले. बिऱ्हाडी खुराट्यात येताच डेझर्टेड व्हिलेजचे पुस्तक बाहेर काढले. त्याचे सह्रदयतेने वाचन केले आणि मनावर जे जें विचार तरंग उठले त्याची टिपणे तयार केली.

महाराष्ट्रातल्या शहरी मजूर आपल्या पिढीजात नांगराची उपासना करणारा खेड्यातला स्वावलंबी शेतकरी बनल्याशिवाय, आज सर्वत्र भडकलेल्या पोटाच्या बंडाला पायबंद लागणार नाही, ही गोल्ड स्मिथची विवंचना माझ्या विचारांशी प्रथम एकतान झाली आणि त्यावरचे सर्व विचार उत्कान्त होत असे, त्यांचे पर्यवसान आज शेतकऱ्यांचे स्वराज्य या आजच्या स्वप्न सृष्टीत पण उद्याच्या सत्य सृष्टीत झाले आहे. ऑलिव्हर गोल्ड स्मिथने आपले उध्वस्त खेडे काव्य प्रसिध्द केले तेव्हा त्यात गोविलेली तत्त्वे खरी का काल्पनिक यावर तत्कालीन आंग्ल विद्वानात मोठी चर्चा चालू झाली. कोणी म्हणे हे काव्य सूचनात्मक आहे, कोणी म्हणे हा इंग्लण्डला एक इषारा आहे, तिसरा म्हणे ही वाङ्मयाची नुसती सेवा आहे, आणि शेवटी वादाचा समारोप करण्यासाठी कविवर्य ग्रे याने अभिप्राय दिला कीं “This man is a poet” (हा मनुष्य कवि आहे) हिंदुस्तानाच्या शेतकीचा आज जसा विंध्वंस झाला आहे, तसा गोल्डस्मिथच्या किंवा कोणाच्याही काळी इंग्लण्डने कधीच अनुभवलेला नसल्यामुळे, प्रस्तुत काव्यातल्या विचारांना कवि-कल्पनेपेक्षा अधिक महती कोण देणार? आणि आपल्या राष्ट्रभूषण कवीने वर्णन केलेली परिस्थिती आपल्याच राष्ट्राच्या सम्राट छत्राखाली एका प्रचण्ड देशात, पुढे लवकरच यथाक्षर घडणार आहे, याची या आंग्ल पंडितांना काम कल्पना असणार? गोल्ड स्मिथेचे ‘उध्वस्त खेडे' इंग्रजांना इंग्लण्डात कधीच दिसले नाही, तरी ते इंग्रजी कदरीखाळी कण्हत कुंथत पडलेल्या हिन्दुस्तानात आज पंचखंड दुनिया उघड्या डोळ्यांनी पहात आहे.

क्षेत्रफळ आणि लेकसंख्येच्या मानाने इंग्लण्ड म्हणजे हिन्दुस्तानापुढे एक तालुका. पण आज तोच हिन्दुस्तान म्हणजे गोल्ड स्मिथचे उध्वस्त खेडे होऊन बसला आहे. हिन्दुस्तानच्या भवितव्याचा कळकळीने विचार करणारीनी या काव्याचा नव्या दृष्टीने अभ्यास करणे अगत्याचे आहे. अनेक आंग्ल काव्यांचे तर्जुमे देशी व मराठी भाषेत करणारे कवि झाले. पण एका ही जातिवंताला या काव्याचे रुपांतर करण्याची प्रेरणा होऊ नये, याचे कारण आधुनिक कवींच्या आत्म्याची संवेदनाच शेतकीप्रमाणे उध्वस्त झालेली आहे. गुलामांच्या शारदेने लव्हाळ्याची लकतेरच धूत बसावी!

- दादर (मुंबई १४) मंगळवार श्रावण,
श्रीकृष्ण गोपाल जन्मष्टमी शके १८५९.
ता. २७ ऑगस्ट, सन १९२९ इसवी

°°°°°°°°°°°°°°°°°°°"""""""""

■ “ज्यांना राजकारणांत भाग घ्यावयाचा असेल त्यांना इतर देश प्रमाणें या हि देशांत प्रत्येक मनुष्याला मनुष्यत्वाचे सर्व अधिकार दिले पाहिजेत; नाही तर आमच्या हातून मुळीच देश सेवा होणार नाहीं.”

- राजर्षी कै. छत्रपती शाहू महाराज

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : १ -
परिस्थितीचे सिंहावलोकन

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• अभयाने श्रमणारा शेतकरी वर्ग :

इंग्लण्डचा सुप्रसिध्द स्पष्ट वक्ता कविराज ऑलिव्हर गोल्डस्मिथ याने आपल्या ‘डेझर्टेड विलेज’ (उध्वस्त खेडे) नामक अजरामर काव्यात वरील उद्गार काढले आहेत. त्यांचा भावार्थ असा - “ज्या देशांत गडगंज संपत्ति नुसती कोठारात अडकून पडते, (म्हणजे काही मूठभर लोकच तेवढे अलोट संपत्तीचे कोठावळे बनतात) आणि सारी जनता भिकेला लागते, त्या देशात लवकरच सत्यानाश होणार, ही खूणगाठ बांधावी. राजे महाराजे सरदार श्रीमंत इत्यादी झब्बू लोक भरभराटले काय अथवा घरघराटले काय, जगाला त्याचे सुहेर सुतक बाळगण्याचे कारण नाही. कारण, जनतेच्या अनुकूल प्रकिकूल अभिऱ्यावरच त्यांचे जनन मरण ठरलेले असते. (लोक मानतात म्हणून हे झब्बू रोजे किंवा सरदार बनतात. जनतेने नन्नाची मुंडी हालविली तर, कोट्याधीश असून हि त्यांच्या राजेपणाला किंवा सरदारीला कुत्रा सुध्दा धूप घालणार नाही.) पण, अवघ्या देशाच्या अभिमानाचा केवळ पाठ कणा असा जो अभयाने श्रमणारा शेतकरी वर्ग, तो जर नष्ट झाला, तर मात्र त्यांनी जागा कशाने कधी हि भरुन निघणे शक्य नाही."

हिन्दुस्तान पूर्वी कसा होता, किती श्रीमंत होता, त्यातून सोन्याचा धूर निघत होता तो जाड होता की बारीक होता, इत्यादी ऐदी प्रश्नांवर डोकी खाजवण्याची आज जरुर नाही. हिन्दुस्तान ही धर्मभूमि का कर्मभूमी, आमची संस्कृती श्रेष्ठ का पाश्चिमात्यांची श्रेष्ठ, वेदान्ताचा कासोटा धरुन आम्ही स्वर्गाला जाणार, का धादान्ताच्या एरोप्लेन मधून पाटलोणे सुरपियन स्वर्ग पाताळ एक करणार, चरख्याने स्वराज्य मिळणार, का टिळकांची देवळे गावोगाव थापून तेथे घण्टा बडविल्याने स्वराज्याचा मेवा अलगज आमच्या घशात घुसणार, असल्या बाष्काळ बायकी बडबडीनाहि विचारांत घेण्याची आज फुरसद नाही. राजकीय चळवळ बरी, का सामाजिक चळवळ खरी, या वादाच्या किसक्या मसणात गेल्या तरी आज पुरवल्या. केवळ तोंड पाटीलकीने आणि नॅशनल कॉँग्रेसच्या नाटकी थैमानाने प्राप्त होणारे स्वराज्य हिंदूंचे का ब्रिटीश राजवटीत दरसाल रावसाहेब खान बहादूर सर वगैरे महात्म्यांची पैदास गेली शंभर वर्षे शेकड्यांनी होत आली आहे. हिन्दी जनतेने किती सरांची सरकी आज वर मान्य केलेली आहे? मुसलमानांचे, ढोमिनियन स्टेटस बरे का कंप्लीट इंडिपेंडन्स बरे, या चर्चेला आज फुटक्या कवडीचे हि महत्त्व उरलेले नाही. आजचा हिन्दुस्तान भाकरीला मातोद झाला आहे. उपाशी पोटावर तत्वज्ञानाचा लेप काय कामाचा?

पोटात पेटका आणि पाठीला चटका।
जखम जोक्याला आणि मलम पट्टी पायाला।

अशी आजच्या हिन्दुस्थानची स्थिति होऊन बसली आहे. विचार उच्चार आणि आचाराच्या क्षेत्रात कान्तीकारक कल्पनांचा थैथयाट किती हि आकाण्ड ताण्डवी चालू असला, तरी रोगाचे प्रत्यक्ष निधानच निश्चित न ठरल्यामुळे, वैद्य डागदारांच्या मत वैचित्र्याच्या शिमग्यात रोग्यांची होळी होऊन, जनतेला प्राणान्तीचा शंख करण्याचा प्रसंग येऊन बितला आहे. गेल्या ५० वर्षाच्या राष्ट्रीय चळवळींची फलश्रुति आणि ब्रिटीशांच्या शंभर वर्षे राज्य कर्तृत्वाची पुण्याई काय? तर उभा हिन्दुस्तान भणंग बनला!

अन्नासाठी दाही दिशा।
आम्हा फिरविशी जगदीशा।

म्हणून देशाच्या नावाने पांचजन्य करण्या पुरती हि हाता तोंडाची गाठ घालायला उजगद नाही. कारण पूर्वी दहा हि दिशा फिरवून तरी भक्ताच्या पोटात भाकरीचा तुकडा ढकलणाऱ्या जगदीशाला आज दहाहि दिशा शून्. झाल्यामुळे, आकरावी दिशा कोठे निर्माण करावी, या विवचनेत तो सुध्दा बुळा बावळा आणि खुळा होऊन बसला आहे. देवाच्याच अकलेचे तेरावे पडल्यामुळे, भक्तांच्या पोटाचे बण्ड वर्तमान परिस्थितीचे तीनतेरा करण्यासाठी लालबुंद कान्तीच्या प्रयोग शाळेत धुमाकूळ घालायला सिध्द झाल्यास, त्यात आश्चर्य़ मानण्याचे मुळीच कारण नाही. हिन्दुस्थानात क्रांतीचा धुमाकूळ सुरू झाला, म्हणून नाटकी आश्चर्याने पाटलोणीची पार्सले धोबी घाटावर रवाना करण्याच्या फार्साने हिंदी जनतेला चकविणाऱ्या सर्व समर्थ ब्रिटिश सरकारला या क्रांतीच्या आदि अंताची अगदीच काही अटकळ नसंल, असे मानणारा माणूस हिंदु तरी असावा किंवा मूर्ख तरी असावा. हिंदुस्तान ही क्रांतीभूमी आहे. हिला क्रांतीचा संन्यास शिकवून, शांतीचा हव्व्यास धरायला लावणारे लोक एकतर पागल असले पाहिजेत, अगर जिवाला कंटाळलेले आततायी असले पाहिजेत; मग ते ब्रिटिश असोत, त्यांचे राजनिष्ठ हिंदी पोशिंदे असोत, अगर काणीहि असोत. हिंदुस्तानाने क्रांतीचा हि महिमा अनुभविला आहे आणि गेल्या शंबर वर्षे शांतीची हि कसोटी अजमावली आहे. हिंदुस्तानचा आत्मा जर क्रांतीकर्मा नसता तर, ग्रीक आणि रोमन साम्राज्याच्या धुळीतून डोके वर काढणाऱ्या रानटी ब्रिटन लोकांच्या आंगाचा विदुषक रंग आणि पांगरलेली जनावरांची कातडी आज सुध्दा कायम राहून, त्याना न्यू कॅसलच्या काळशावर आपली दोन प्रहर साजरी करावी लागती.

• क्रांतीला राम - राम ठोकून :

क्रांतीला राम - राम ठोकून जर आपले सर्व दरवाजे शांतीच्या अडसराने हिंदुस्थान घट्ट बंद करील तर अवघ्या २४ तासात हिंदुस्थानेतर सर्व जगाच्या भपक्याचे डोळे पांढरे होतील. शिकंदराच्या स्वरीपासून तो मोगल बादशाहीचा अंत होई पर्यत असंख्य परचक्राचे क्रांतिकारक धुमाकूळ या देशाने आपल्या ह्रदयावर सहज लीलेने खेळविले आहेत.दिल्लीच्या क्रान्तिकारक तक्तावर अनेक चक्रावर्तींच्या रियासती गाजल्या आणि ‘मी चिरंजीव, मी अमर’ अशा वल्गना करता करताच, यथा काळ यथावकाश कान्तिवक्ताच्या भोवऱ्यात गडप झाल्या. ब्रिटिशांच्या आगमना पूर्वीचा परचक्राचा इतिहास म्हणजे लुटालुटींचा बेबंद शाहीचा काळ, असे पुष्कळ बावळटाना वाटते. त्यावेळी हिन्दी लोकांचे जीवीत रात्रं दिवस धोक्यात असे, तरी राष्ट्रीय प्रगतीचा मार्ग आताप्रमाणे कधीच कोंडाटलेला नव्हता. लुटा लुटीच्या नित्य दंगलीने व्यापाराचा प्रवाह डोंगराळ प्रदेशातून वाहणाऱ्या नदी प्रमाणे चालत होता, तरी आर्थिक भरभराटीला आता प्रमाणे ऊर्ध्व वायूचा घरघराट कधीच लागलेला नव्हता. तो काळ पूर्ण कान्तिमय असल्यामुळे, प्रत्येक हिंदी स्त्री - पुरूषाचे मनगट आणि पाठकणा हव्या त्या परिस्थितीशी टक्कर देण्या इतका मजबूत आणि खंबीर होता. आसेतू हिमाचल रात्रं दिवस लढाईचे मामले अखंड चालू असता, वेळी एखाद्या सैन्याने शेतांतल्या उभ्या पिकाची कापणी करुन लुटली, तरी नगाला नग आणि डोळ्याला डोळ्याचा सूड उगविण्या इतका हिन्दी शेतकरी नांगर बहाद्दर आणि तलवार बहाद्दर असे पुरूषांचीच गोष्ट कशाला? पुरूष घरात नसता, दरवडे आणि परचक्रांची झाप हिंदी बायकानी हि परत फिरविल्याचे पराक्रम इतिहासात रेळचेळ आढळतात. रोजेची बाईल परका मनुष्य दृष्टी समोर पळवून नेत असता, त्या अधमाचा जागच्या जागी मुर्दा न पाडता, आजू बाजूचे चार ‘संभावूत साक्षीदार’ घेऊन पालिस ठेचणात (Station) कागदी फिर्यादी देणारे महात्म्ये त्या क्रांतीच्या काळात लोकांच्या स्वप्नी सुध्दा नव्हते; मग पाह्यला कोठून मिळणार? असली नामर्दाची अवलाद शांतीच्या स्मशान युगातच कशी पैदा होत असते, याचे दाखले चालू राजवटीत दररोज मुबलक दिसून येतात. हिन्दुस्थानने सम्राट अशोकाचा अखिल राष्ट्रीय शस्त्र संन्यास हि पाहिलेला आहे आणि पानपतची घनघोर महायुध्दे हि अनुभवली आहेत.

येथे शेकडो परकीयानी स्वाऱ्या केल्या, कल्पनातीत रक्तपात केले, राज्य क्रांतीचा धुमाकूळ उडविला, लुटारू धाडश्यानी संपत्तीची घवाडेच्या घवाडे काबूल कंदाहार कडे पळवून नेली, पण त्या वेळी सुध्दा हिन्दुस्तान आजच्या इतका जगायला नालायक आणि अन्नाला मोताद झाला नव्हता. औरंगजेबाची कारकीर्द भयंकर रंगात रंगविण्याचा मोह न आवरणाऱ्या वृहस्पतीना सुध्दा हे कबूल करावे लागेल की त्या काळी सुध्दा भेदरट हिन्दु आणि आचरट मुसलमान उभ्या हिन्दुस्तानात सापडणे मुष्किलीचे असे. आजच्या शांतीप्रिय कमजोर दृष्टीला भयंकर वाटणाऱ्या त्या क्रांतीला काळात, हिन्दुस्तानची शेती ओसाड पडली नाहीं आणि तांदळाच्या चार दाण्याला शेतकरीहि कधी मोताद झाला नाही. कारागीर भिकेला लागला नाही आणि ज्ञानी पंडिताला हि उपासमार भोगण्याचे शांति सौख्य अनुभवावे लागले नाही. क्रांतीच्या या रक्तपाती लालबुंद युगात हिन्दी आदमी निसर्ग निर्मित मिठाच्या खड्याला मुकला नव्हता, किंवा टीचभर चाकू सुरीला पारखा झाला नव्हता. कान्तीचा धुमाकूळ तुफानी झाजावाता प्रमाणे त्यांच्या भोवती अखंड घडामोडी घडवीत असतानाहि, हिन्दी मनुष्य सांसारीक आणि राष्ट्रीय झगड्यांच्या क्षेत्रात सवसारखा मर्द म्हणूनच सतत उभा असे. राजा कलस्य कारणम्. यथा राजा तथा प्रजा. या म्हणी पुष्कळांना तोंडपाठ येतात. पूर्वीच्या कान्तीयुगात हिन्दुस्थान मर्द होता आणि आजच्या शान्ति युगात तो मुर्दा बनला. याची अनेक कारणे असली, तरी राजकारण हे मुख्य कारण आहे. म्हणूनत बऱ्याच एकाक्ष हिन्दी पुढाऱ्यांचा राजकारणी काथ्याकुटावर बराच जोर असतो. ब्रिटिश पूर्व क्रांतीकारक विजयी जेत्यानी दिल्लीच्या राजधानीत अनेक रियासतींच्या उलटा पालटी केल्या; राजकिय सत्तेच्या जोरावर हिन्दुस्थानच्या सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनात त्यानी विलक्षण क्रान्ति केली आणि आपापल्या विशिष्ट संस्कारांची रयतेवर कायमची छाप हि पाडली; पण त्यानी या देशाची आतडी कातडी धुवून आपापल्या देशाची घरे भरली नाहीत.

• शेतकरी किती उन्नत झाला :

हिन्दुस्थानाला भणंग भिकारी बनवून, आपल्या देशाच्या वैभवाचे मनोरे उभारले नाहीत. हिन्दुस्थानची कामगिरी ठार आणि कारागीर उपाशी मारून, त्यानी आपल्या देशातल्या व्यापाऱ्यांच्या गंगाअळी भरल्या नाहीत. देशी शेतकऱ्यांच्या पाठ कण्याचे मणके करांच्या करवतीने कापून, त्याना धान्याच्या राशी पुढे उपाशी मारले नाही. प्रत्येक विजयी जेत्याने दिल्लीचे सार्वभौम तत्क काबीज करताच, हिन्दुस्थानालाच आपला मायदेश मानून, येथेच कायमचे वास्तव्य केले. मोगल बादशाही तर हिन्दी जीवनात इतकी समरस होऊन गेली कीं, दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या बारा बादशाहांपैकी सहा बादशाहांच्या माता हिन्दु होत्या. हिन्दुस्थानात वंश जाति धर्मक्ती हि भेद अस्तित्वात असले तरी मोगल रियासतीच्या अमदानीत, हिन्दु आणि मुसलमान दिल्ली कडे पाहताना एकदम एकजिनशी अभेदभावी बनत असत, ही मुद्याची गोष्ट आज हिंदु, मुसलमान, द्वैताची धुळवड शेणवड खेळणाऱ्या हिंदी पुढाऱ्यांच्या भ्रष्ट मनोवृत्तीत घुसत नाही. यथावकाश कान्ति चक्राची गति बदलली आणि कान्तिप्रधान मोगल दिल्ला खतम् होऊन, त्या जागेवर शान्ति प्रधान ब्रिटिश दिल्ली चमकू लागली, तिच्या शांतिमय शंभर वर्षांच्या अमदानीत हिंदी शेतकरी किती उन्नत झाला, हिंदी कारागिराची केवढी भरभराट झाली, हिन्दी लोकांची इतिहास प्रसिध्द मर्दुमकी किती वाढली आणि या देशाची सांपत्तिक शक्ति किती वर्धमान झाली, याची चिकित्सा करणे, हे सुध्दा सध्याच्या शांति प्रधान आणि कायदेबाज राजवटीत एक भयंकर महापाप होऊन बसले आहे.

पूर्वीच्या कान्ति युगात हिन्दी आदमी आणि विशेषतः शेतकरी मूठभर साठ आणि पोटभर भाकरीला तरी मुकलेला नव्हता; पण आजच्या शांति प्रधान ब्रिटिश सुवर्ण युगात मोठमोठ्या विद्वान पंडीताना हि भीक मागून पसाभर धान्य मिळवण्याची पंचाईत पडली आहे. सन १८५७ साली अखिल भारत खंडाने राजकारणी स्वातंत्र्यासाठी निर्वाणीच्या तगड्या झाडल्या; पण आज राजकारणाचा प्रश्न मागे पडून, भाकरीच्या सुक्या ओल्या तुकड्यासाठी आपंडित अनाड्याना हाता पायाना आचके देण्याचा प्रसंग येऊन ठेपला आहे. ब्रिटिश राजवटीने आमच्या मेंदूची आणि जिभेची वाढ भरंसाट केली, पण पोटाच्या पापाकडे पाठ फिरविली. जगाचा एकूण एक व्यवहार पोटासाठी. ब्रिटिशानी हिन्दुस्थान घशात टाकले पोटासाठी. क्रांतीची भस्मासुरी भूक आणि शांतीची तृष्णा प्रथम पोटालाच लागते. इतिहालाची पृष्ठे मानवी रक्ताच्या लाल भडक रंगाने रंगविणारी महायुध्दे आजपर्यंत या पोटानेच घडवून आणली. राजकीय वर्चस्वाची भावना, जित आणि जेते, कारखानदार आणि कामगार, किंवा मालक आणि नोकर हे भेद पोटाच्या पोटीच जन्मलेले आहेत. सावाचा चोर, सज्जनाचा दुर्जन, मित्राचा शत्रू, राजनिष्ठाचा राज्यक्रांतिकार बनविण्यांच्या कामी पोटांच्या तिडकाची वकिली किंवा याचनाच कारण होते. मानो मनुष्याच्या मानाची मान कापण्याचा कुपराक्रम, आणि स्वदेशाच्या उदरभरणासाठी परदेशाच्या स्वातंत्र्यावर कारस्थानचे जळजळीत निखारे ओतण्याची राक्षसीवृत्ति पोटानेच आजवर चेतविली. एक पोट नसते, तर या जगाला मसणवटीचे रुप आले असते. मसणवटीत गुरे वावरतात, आणि ती हि म्हणे पोटासाठीच! तेव्हा मसणवटीची उपमा हि शोभणार नाही. पोट नसते तर जगच जगले नसते, किंबहुना ते अस्तित्वातच आले नसते. सगळी बंडे पत्कतली, पण पोटाचे बंड पत्करत नाही. राजकारणी कान्त्यांची बंडे आपल्याला मोठी भयंकर वाटतात.

कांति चक्राचा थैमान सुरू झाला की त्यात पडणाऱ्या माणसांच्या आहुती पाहून किंवा ऐकून आपले मन चर्र होते. परंतु त्या बंडांना किंवा मानवांच्या कत्तलीना कारण आपले पोटच आहे; अर्थात् ते किती भयंकर असले पाहिजे, याचा मात्र सहसा कोणी विचार करीत नाही. याचे कारण पोटाचा आपलेपणा किंवा आप्पलपोटेपणा. इंग्लडच्या ब्रेडबटरसाठी तांदळाच्या पेजेला गुकलेल्या हिन्दी शेतकऱ्याची दैन्यावस्था पाहून आमचे ब्रिटिश सरकार सुध्दा जाड जाड रिपोर्टभरअश्रूंचा धबधबा गाळते. पण दैन्याला कारण आपल्या इंग्लण्डचेच पोट, ही नेमकी गोष्ट त्या धबधब्यात बिनचूक वाहून जाते व बेपत्ता होते. शेतकरी मेला कीं देश भिकेला लागला, ही गोल्ड स्मिथची निर्वाणाची किंकाळी इंग्लण्डने धिःकारल्यामुळे त्याला व्यापाराच्या सबबी खाली स्वतःच्या पोचासाठी ब्रिटिश साम्राज्य वृध्दीचा आठारेटा करण्याची पाळी आली. हा अनुभव दृष्टीसमोर असता हि, स्वतःला पेज आणि इंग्लण्डला भात चारणाऱ्या हिंदी शेतकऱ्याचा ऱ्हास साम्राज्य, सत्ता बाजीच्या मडात त्यानी उघड्या डोळ्यांनी पहात स्वस्थ बसावे हा मोठा क्रांतिकारक देखावा नव्हे काय? शेतकऱ्याची शेतकी मेल्यामुळे तो कर्मचारी होऊन देशोधडीला पोटासाठीहवी ती मजुरी करुन जगण्याची धडपड करीत आहे. याचा परिणाम शहरी लोकावर होऊन; त्यांचीही उपासमार सुरु झाली आहे. म्हणजे पोटाच्या बण्डाचा धिंगाणा आता सर्व हिन्दुस्थान भर संचार करु लागला आहे. श्रमजीवी शेतकरी आणि वुध्यपजीवि शहरी वा दोघांच्या हि दुःखाना तीव्र एकजूनसीपणा आल्यावर, कान्तीच्या स्फोटाचा भाजी परिणाम यथातथ्थ वर्णम करण्याची कामगिरी भविष्य काळालाच चांगली साधेल. पोटाचे बण्ड आज साऱ्या जगावर धुमाकूळ घालीत आहे. रशियांतील राज्यकांति पोटानेच केली आणि झारला सहकुटुंब सहपरिवार कुत्र्याच्या मोतानें ठार मारला पोहि या पोटानेच.

• चमढी के झोपडी मे आग :

जर्मनी सारखे बलाढ्य राष्ट्र, पण या टीचभर पोटाच्या आगीने त्याच्या सर्व शस्त्रास्त्र संपत्तीची राख रांगोळी करुन त्याला गायी पेक्षा हि हीन दीन केले. पोटाच्या बण्डानेच इंग्लण्डात मजूर पक्ष निर्माण झाला आणि चालू घटकेला ब्रिटिश साम्राज्याची सुत्रे याच पोटार्यी पार्थिवांच्या हाती दुसऱ्यांदा आलेली आहेत. सर्व जगात पोटाने मारलेले जर कोणते राष्ट्र असेल तर ते हिन्दुस्थानच होय. जगाच्या पोटाच्या बण्डाची आग विझवण्यासाठी हिन्दुस्थानाने आज पर्यंत आपली चामडी सोलवटून घेतली. पण आज त्याच्या "चमढी के झोपडी मे आग" लागली असून, ‘बुझानेवाला कौन है?’ या त्याच्या किंकाळीला जगा कडून सक्रीय उत्तर मिळेनासे झाले आहे. पोटाचे भयंकर बण्ड येथे आज कित्येत अहोरात्र बिन अटकात व बिन उपाय चालू आहे. प. वा. दादाभाई नवरोजी, रमेशचंद्र दत्त प्रभृती अर्थशास्त्र पटूनी वाढत्या हिन्दवी दारिऱ्याची आरोळी ५० वर्षापूर्वीच मारली. राजकिय बंडाच्या उपक्रमाचा नुसता खरा खोटा बास येताच त्याच्या पाळ्या मुळ्या उखडताना जे ‘व्यापारी’ इंग्रेज सरकार सुक्या ओल्याची हि लवमात्र क्षिती बाळगीत नाहीं, त्याला एतद्देशीय पोटाच्या बण्डाची मात्र दखल करण्याची बुद्धी होत नाही.

इंग्रेजी साम्राज्याचा जग ढव्याळ वेळ विस्तार वाढविला आणि अखेर आज त्याच इंग्लण्डचे तेच पोट मजूर पक्षाच्या रुपाने प्रबळ बण्डखोर बनून त्याच साम्राज्याचे कर्णधार व सूत्रधार होऊन बसले आहे. पोट काय करणार नाही? नव्हे, करवणार नाही? पोटानेच हिन्दी नागरिकाना आणि शेतकरी मजुराना फिजी केन्याचे काळे पाणी दाखविले आणि पोटाच्या बण्डामुळे तेथे उपरे आलेले गोरे लोक बण्डखोर आणि मस्तवाल बनले. पोटाच्या पोटी पुण्याच्या काय काय खाणी आहेत, याचा ठाव ठिकाण जरी अद्याप कोणास लागलेला नाही, तरी पोटाची पापे आज साऱ्या जगभर दिवसा ढवळ्या मोकाट वावरत आहेत, यात मुळीच संशय नाही. ‘ना विष्णूः पृथिवीपति’ या अजागाळ भावनेने राजा आणि राज्य कारभारी यांच्या तोंडाकडे पाहून, आपल्या सर्वांगीण जीवनाच्या उत्क्रान्ति अपक्रांतीची सट्टेबाजी खेळण्यास सवकलेल्या हिन्दी लोकाना न झाल्यामुळे, वर्तमान दैन्याचे खापर ते ब्रिटिशांवर फोडतात. पण ही चूक आहे.

• व्यापार म्हणजे इंग्रजाचा देव :

मांजर उंदरासाठी, कोल्हा कोंबडासाठी, पठाण - मारवाडी, व्याज्यासाठी, भट दक्षणेसाठी, भांडवल्या नफेबाजीसाठी, कायस्थ प्रभु कारकुनीसाठी, मराठा - क्षत्रियत्वाच्या कोरड्या ऐटीसाठी, झब्बू मानपानासाठी, पारशी दारू - ताडीच्या मक्त्यासाठी, मद्राशी पोट भरण्यासाठी, आणि ऐदी श्रीमंत कोण शीलदारीसाठी जसे जीव टाकतात, तसा इंग्रेज प्राणी व्यापारसाठी जगाच्या पाठीवर हवा तेथे जीवाचे रान करीत भटकत फिरेल. व्यापार म्हणजे इंग्रजाचा देव. तोच त्याचा धर्म आणि तेच त्याचे वर्म. या वर्माच्या मर्माला जरा मुंगी चावली की इंग्रजाचा प्राण तेव्हाच कासावीस होतो. इंग्रजानी हिन्दुस्थान देश पादाक्रान्त केला, तो हिन्दी लोकाना माणुसकी देण्यासाठी, त्याना सुधारण्यासाठी, वगैरे गप्पा, भाषा-सौदर्याचे मासले आहेत. शिकंदर तार्तर मोगला प्रमाणें इंग्रेज जर जात्या शुध्द राजकारणी देश - जेते असते, तर हातात तागड्या घेऊन साऱ्या जगाच्या ज्ञात अज्ञात भागांत त्यानी आपली तंगड तोड केलीच असती कशाला? जशी गूळ तेथे माशी आणि व्हेकन्सी तेथे मद्राशी तसा जेथे व्यापार तेथे इंग्रज हा सनातन सिद्धान्त समतावा.

व्यापारा पलीकडे तसा इंग्रजा जवळ राजकारण नाही, समाजकारण नाही, धर्म नाही आणि नीती हि नाही. व्यापार नसेल तेशे इंग्रज श्वास सोडायला ही पळभर राहणार नाही. इंग्रेजी व्यापारीचू पकड राजकारणाच्या आटा रेट्या शिवाय जर कायमची शाबूत टिकत असेल, तर इंग्रेज लोक राजकारणाच्या फंदात पडायला मुळीच तयार नाहीत. मात्र व्यापारी पकडीची मांड जर राजकारणी वचकाशिवाय किंचित हि ढिली पडण्याची त्याना शंका असेल, तर तेवढ्यासाठी राजकारणच काय, हवे ते नवे कारण सुद्धा हाताळायला इंग्रेज लोक मागेपुढे पाहणारे नव्हत. हिन्दुस्थानाच्या एकमुखी एकसुत्री सम्राट पदाची दिल्लीची किल्ली इंग्रेजानी केवळ व्यापाराच्या आचद्रार्क अमर पट्टयासाठीच हस्तगत केली आहे. त्यात त्याना राजकारण साधावयाचे नाही किंवा राजनीति शास्त्रावर नवीन शोध लावायचे नाहीत. बोलून चालून इंग्लंड हे ‘शॉपकीपर्स नेशन’ (दुकानदारीचे राष्ट्र). त्याना मोगल बादशाही प्रमाणे चक्रवर्ति पदाचे बेगडी ऐश्वर्य मिरवून आणि हिन्दी लोकांच्या आत्म्यात आत्मा मिसळून करायचे काय ? केवळ व्यापाराच्या वृध्दीसाठी नाइलाजाने त्या बिचाऱ्यांना या भरतखंडाच्या सम्राट पदाची उलाढाल करणे भागच पडले.

• बापजाद्यांचा गाढवपणा बद्दल :

राजकारण म्हणजे इंग्रेज प्राण्यांचे साध्य नसून साधन आहे. अशा प्राण्याशी राजकारणी झगडा देऊन स्व-राज्. प्राप्तीच्या दंगली करणारे हिन्दी लोक मुर्ख नव्हत तर कोण ? इंग्लंड बोलून चालून बलियांचे राष्ट्र. बनियेगिरी हाच प्रत्येक इंग्रेजाचा पिंड. राजकारण असो नाही तर धर्मकारण असो, इंग्रेज आदमीं त्याला व्यापारी धोरणानेच हाताळीत असतो. अशा बनिया वृत्तीच्या आणि भांडवली पिण्डाच्या इंग्रजानी शुद्ध तत्वज्ञानी हिन्दुस्थान घशात उतरून, आज ते या महाखण्डाचे धनि होऊन बसले. इंग्रजानी हिन्दुस्थान कसे पाजाक्रान्त केले, कां केले, वगैरे ऐदी प्रश्नंची चिकित्सा आज फुकट आहे. इंग्रेज आज हिन्दुस्थानाचे जेते मालक आहेत आणि हिंदी लोक आज त्यांचे जित गुलाम आहेत. ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असल्या आरेळ्या ठोकणाऱ्या बृहस्पतीनी, इंग्रेज बनियांच्या पचनी पजणाऱ्या आपल्या बापजाद्यांचा गाढवपणा बद्दल, चुकून सुद्धा एकदा निषेधाचा फूत्कार काढल्याचे कधी कोणी ऐकले आहे काय? बळी तो कान पिळी आणि ज्याच्या हाती शिकार तो पारधी हा व्यवहाराचा निसर्ग धर्म दृष्टीआढ करून, इंग्रेजी सत्तेविरुद्ध शिव्यागाळीची नुसती आदळ आपट करणे, एवढेच बडे राजकारण हिन्दुस्थानातील बडे राजकारणी झब्बू गेली ३० - ३५ वर्षे अहमद भिकेने खेळत बसले आहेत. पक्षभेद, पंथभेद, धर्मभेद, जातिभेद वगैरे भेदांचे भिन्न भिन्न विदुषकी पोशाख घालून जरी हे झब्बू आपल्या वाणकोटी नाचांची कमाल रात्रं दिवस करीत असले, तरी इंग्रेजी सत्तेला नुसत्या बायकी शिव्या देण्या पलिकडे एकाहि गाढवाची मजल गेलेली दिसत नाही.

नॅसनल कॉँग्रेस घ्या, वृत्तपत्रे पहा, सामाजिक परिषदा अभ्यासा, यूथ लीगा तपासा, किंवा रस्तो रस्ती गल्लोगल्ली नित्य उफलणारे हिंदु महासभेच्या तोड पाटलिकीचे सुरनळे पहा, जिकडे पहाल तिकडे शहरी झब्बूंचा गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ! निरनिराळ्या चळवळीचा धुमाकूळ सर्वत्र अखंड माजल्यामुळे, बऱ्याच बावळढाना स्वराज्याचा चांदोबा डोक्यापासून दीड बोटावर आल्याचा भास होतो. पण राष्ट्रीय स्वातंत्र्याचे आकाश चुटकी सरसे चाटण्यासाठी हात हातभर जिभा बाहेत काढणारांना आपल्या पाया खालची जमीन खचत चाचली आहे आणि आजू बाजूला कसली आग भजकली आहे, याची मुळीच दाद नाही. इंग्रेजी सत्तेचा फास ज्या ज्या वळणानी, गाठीनी आणि पेचानी हिन्दुस्थानाच्या गळ्या भोवती बसत गेला आणि अखेर ब्रम्ह गाठीने कायम घट्ट झाला, ती वळणे त्या गाठी आणि ते पेच, ब्रम्ह गाठी कडून उलट सुरूवात करून सोडविल्या शिवाय हा फास सुटणे शक्य नाही.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : २ -
पोटाच्या पापाचा व्याप

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• इंग्लण्डचा ऱ्हास :

बेदरकार आणि बिन काळजाच्या भांडवल शाहीचा व्याप बाढला, श्रीमंतांच्या चैन बाजीच्या भस्मासुरी भुकेचा वणवा चोहीकडे भडकला, देशातली संपत्ति काही थोड्या धनाढ्यांच्या तिजोऱ्यात अडकून, जनता अनन्य दशेला येऊम मिळाली आणि शेतकऱ्याच्या शेत जमिनीवर श्रीमंत भांडवल्यांचे वाडे आणि कारखाने बसले की त्या देशाचा ऱ्हास होत चालला, असा सिद्धांत गोल्ड स्मिथ कवीने आपल्या ‘उध्वस्त खेडे’ काव्यात सन १७७० साली व्यक्त केला. आज या सिद्धान्ताला २६० वर्षे होत आली. विषयाच्या प्रतिपादनासाठी कवीने इंग्लण्ड देश घेऊन त्याच्या ऱ्हासाचे चित्र रंगविले आहे. शेती बुडविल्यामुळे इंग्लण्डचा ऱ्हास झाला, असे कवीने म्हटले आहे, ते कितपत खरे खोटे किंवा कल्पनामय काव्य, हा प्रश्न बाजूला ठेवला, तरी इंग्लण्ड शब्दाच्या जागी इंडिया शब्द घातला तर आपल्या जात भाईच्या अमदानीत हिन्दुस्थानची अवस्था कशी होणार आहे, याचेच भाकीत गोल्ड स्मिथने करून ठेवले, असे म्हणावयास हरकत नाही. भांडवल शाही नंगा नाच सुरू होण्यापूर्वी, इंग्लण्डची स्थिती कशी होती? कवि म्हणतो - A Time There Was, Era England’s Griefs Began, When Every Rood Of Ground Maintained Its Man; For Him Light Labour Spread Her Wholesome Store; Just Gave What Life Required, But Gave No More; His Beat Companions, Innocence And Health; And His Best Riches Ignorance Of Wealth.

अनुवाद -
"इंग्लण्ड देशावर दुर्दैवाचा पगडा पडण्यापूर्वी असा एक काळ होता की, त्यावेळी जमिनीचा एकूण एक तुकडा प्रत्येक मनुष्याला पोटभर भाकर देत असे. थोडेसे श्रम केले की धट्टयाकट्या जीवनाला लागणाऱ्या अन्न वस्त्रादि सर्व आवश्यक गोष्टी त्याला गरजे पुरत्या सहज मिळत असत. बाजवी पेक्षा फाजील पुरवठा होत नसे आणि त्याची जरुर हि नसे. सर्व लोक सुखी संतुष्ट चित्त आणि निरोगी असत. जवळ जे काही असेल त्यातच समाधान मानून, द्रव्य साठवून ठेवण्याची आसुरी लालसा त्यांना कधीच शिवली नाही."

ब्रिटिशांच्या आगमन पूर्वी माती मळून सोने काढणारा हिन्दी शेतकरी याच समाधानी वृत्तीचा आणि स्थितीचा नव्हता काय? पण इंग्लण्डातल्या पोटाच्या बंडाने बोकार बनलेल्या लोकांच्या माध्यान्हीची सोय लावण्यासाठी, जेव्हा इंग्रेजादि युरपियन बनियांच्या तागड्यांच्या तंगड्या हिन्दुस्थानाला भिडल्या आणि राजकारणा बरोबरच सुधारणेच्या नावाखाली भांडवल शाहीचा व्यापारी नंगा नाच येथे सुरु झाला, तेव्हा हिंदी शेतकरी बसल्या जागी शेतीच्या मातीत कसा मळला मिसळला गेला, याचे शब्दचित्र किंवा भविष्य गोल्ड स्मिथ कसे थोडक्यात रंगवितो, ते पहा - "But Times Are Altered; Trade’s Unfeeling Train Usurp The Land, And Dispossess The Swain; Along The Lawn, Where Scattered Hamlets Rose, Unwieldy Wealth And Cumbrous Pomp Repose, And Every Want to Luxury Allied, And Every Pang That Folly Pays To Pride."

अनुवाद -
"पण तो सुखाचा काळ गेला। व्यापारावर आपल्या तुंबड्या भरण्यास लाल चटलेल्या पाषाण ह्रदयी लोकांनी सगळ्या शेत जमिनी गिळंकृत करुन, शेतकऱ्याला देशोधडीला हाकून लावले. ज्या भूमीवर पूर्वी शेतकऱ्यांची झोपड्यांची खेडी तुरळक तुरळक सर्व वसलेली असत, त्याच समृद्ध भूमीवर श्रीमंतांच्या डोईजड ऐश्वर्याचे टोलेजंग वाडे वसले. येथे धनाडय लोक आपल्या चैनबाजीच्या कृत्रीम सुखा - स्वादात मग्न असतात. या चैनबाजीत तरी त्यांना खऱ्या सुखाची प्राप्ती होते काय? मुळीच नाही."

चैन बाजीच्या पोटी निपजणाऱ्या अनेक दुःखांचे पोट, श्रीमंतीच्या घमेंडीचा मूर्खपणा सावरण्यासाठी त्याना घशा खाली लोटावेच लागतात. प्रस्तुत वर्णन किती यथार्थ आहे, याची शिफारस करण्याची जरुरी नाही. देशी उद्योग धंद्याच्या वाढीच्या गोंडस सबबी खाली, एकट्या मुंबई इलाख्यातील काही जिल्हातल्या खेड्यात थाटलेले भांडवल शाही कारखाने पहा म्हणजे खात्री पटेल. शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो एक पिकाळ जमिनी या कारखान्यांच्या पायात गडप होऊन, तेच स्वावलंबी शेतकरी त्याच कारखान्यात मिळेल त्या रोजाने पडेल ती मजुरी करीत आहेत. दारिद्र्याचा वणवा सर्वत्र भडकल्यामुळे रोख रोजदारीला चटावलेला शेतकरी सुद्धा, नांगरणी पेरणी कापणीच्या याता यातीला राम - राम ठोकून, या कारखान्यात मजूर म्हणून घुसला आहे. हाताशी शेतीचे काम करणारे मदतगार भाईबंध खेड्यातून उठून गिरण्या कारखान्यात गेल्यामुळे, उरल्या सुरल्या शेतकऱ्यांना शेकडो एकर जमीन नापिक टाकून, एकट्या दुकट्याला बनेल तेवढ्याच तुकड्यांची मशागत करुन जगण्याचा प्रसंग आला आहे. बरे, हे कारखाने तरी देशी कसे म्हणावे? विलायतचा कच्चा माल आणून त्यावर हे देशी ब्रूब कामगिरीची पैदास करणारे, विलायती व्यापाऱ्यांचे आश्रय दाते एजण्ट! लोखंडी नांगराचेच कपूर किर्लोस्करी कारखाने घ्या. एकजात शेतकरी शेती ओसाड टाकून, किंवा ती असल्या कारखान्यांच्या भक्ष्य स्थानी घालून, शुद्ध पोटार्थी मजूर बनल्यावर, किंवा बनविल्यावर, हे विलायती बिडाचे लोखंडी नांगर कोणाच्या उरावर चालविणार? जुना पुराणा लाकडी नांगर चालविण्यास हि जेथे शेतकरी शिल्लक नाही, तेथे लोखंडी नांगरांची अकर माशी पैदास, भांडवल्या ह्रदयाची ठेवण कशी उलटी आहे, इतके मात्र स्पष्ट दाखविते.

तात्पर्य -
उद्योग धंद्याच्या वृद्धीच्या सफेत सबबीवर निघालेले हे असले कारखाने, गिरण्या प्रमाणेच, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मुळावर आलेली मूळ नक्षत्रेच होत, यात मुळीच शंका नाही. कारणे काही हि आणि किती हि असोत, आज हिन्दुस्थानात शेती आणि शेतकरी हे शब्दच काय ते शिल्लक आहेत. बाकी, एकजात पूर्वीच्या पिढीजात शेतकऱ्यांचा वंशज आज पोटासाठी हवा तो रोजगार करणारा निर्भेळ मजूर बनून, आपल्या बापजात्यांच्या जन्म, कर्म, भूमीला (उध्वस्त खेड्याला) राम राम ठेकून, मुंबई सारख्या गिरणाळू शहरात येऊन पडला आहे. इंग्रेज सरकारच्या शेतकी आक्टातले स्वार्थ साधण्यासाठी ‘मी शेतकरी - मी शेतकरी’ म्हणून पंचांग बहाद्दर भटापासून तो शेमले बहाद्दर मराठ्या झब्बू पर्यंत सर्व वीरपीर कोर्टत हजर होतात. पण भाडभीक सोडून चौकशी केली तर पूर्वीच्या शेतकऱ्यापैकी जेमतेम शेकडो पाच नांगरावर टिकून असतील नसतील! बाकी सगळे पोटाच्या पापाच्या व्यापाने ‘जिकडे भरला दरा, तो गाव बरा’ असे देशोधडीला लागून उध्वस्त झाले आहेत. पोटाच्या पापाचे उत्तम प्रदर्शन म्हणजे मुंबई. हिन्दुस्थानाच्या अवाढव्य पोटच्या खास तिडका मुंबईस केन्द्रित झालेल्या आहेत. भारत खण्डाच्या पोटाच्या माप मुंबईच्या ताजव्यात खुशाल बुनचूक मोजून घ्यावे. मुंबई आणि पोट या दोन शब्दांची सांगड इतकी निकटची पडलेली आहे की मुंबईकडे धाव घेणारा प्रत्येक माणूस मग तो महाराष्ट्रीय असो, नाहींतर यण्डुगुण्डु मद्राशी असो पोटासाठी वाटेल ती खटपट करणाराच असतो. पोट जसे टीचभर पण त्याचा व्याप जगभर, तशी मुंबई टीचभर पण तिचा पोटाचा आटा रेटा जगभर, पोटाच्या पापाने नाडलेला प्रत्येक प्राणी अखेर निर्वाणीला मुंबईची कास धरतो.

• पोटार्थ्यांचे पोट :

व्यापार, उद्याग - धंदा, शास्त्रें, कला - कौशल्य, विद्या वगैरे सर्वच बाबतीत मुंबईने पहिला नम्बर पटकविलेला पाहून, सत्कृद्दर्शनी तिच्या बाह्य झकाकीने प्रेक्षक अगदीं थक्क होतो. चोवीस तास अहोरात्र चैतन्यपूर्ण असलेल्या या नगरभवानी (Queen Of Cities) च्या इन्द्रधनुतुल्य सौन्दर्याने तो मोहित होतो. परन्तु या सर्व बाह्य लकलकाटाच्या मुळात पोटाच्या पापाचे खत पडत आहे, हे मात्र त्याच्या कल्पनाचक्षूला गोचर होत नाही. विद्युत प्रकाशाचा लखलखाट. खण्डोगणति गिरण्यांचा धडधडात, मोटार टामरेलीचा खडखडाट आणि मुंग्यांच्या वारुळाला ही लाजविणारा रस्तोरस्ती व गल्लोगल्ली असणारा पोटार्थी पाप्यांचा सुळसुळाट पाहून क्षणभर कौतुक वाटते. पण अरेरे! पण या सर्व धडपडाटाची लखाकी किती अमानुष तत्वावर चाललेली आहे! गिरण्या व तत्सम इतर कारखाने पाहिले की आम्ही औद्योगिक मोक्षाच्या मन्दिराकडे झपाट्याने चाललो आहो, असा भास होतो खरा. परन्तु या मोक्ष साधनाच्या तपश्चर्येत आम्ही कोण कोणाची आणि किती आहुति देत आहो, याची खुद्द तापस्यांनाच जर कल्पना होत नाही, तर इतराना कशी व्हावी? किती तरण्या बँड जवानांच्या शरीराची माती या गिरण्यात पडत असते? किती? जवान स्त्रियांच्या अब्रूचे धिण्डवडे रात्रन्दिवस उडत असतात? किती महत्त्वाकांक्षी माणसांच्या आयुष्याच्या दोऱ्या या गिरण्यानी व कारखान्यानी तोडल्या आहेत? किती लहान बचड्याना अगदी लहानपणा पासूनच ‘तू मजूर आहेस, तुझा जन्म या गिरण्या मध्ये राबण्या करिताच झालेला आहे’ असे प्रत्यक्ष शिक्षण या औद्योगिक कारखान्यानी दिले आहे? गिरण्या कारखाने फॅक्टऱ्या वगैरे संस्था, पोट भरण्याच्या जागा आहेत, या भावनेने आपले घरदार गणगोत शेतवाडी व पुष्कळ प्रसंगी पोटची पोरे टाकून मुंबई व तत्सम गिरगाळू, ठिकाणी धावत आलेल्या किती पोटार्थ्यांचे पोट आज पर्यत भरले आहे? चामडीच्या झोपड्याना लागलेल्या आगी आज पर्यत कितीशा बुझालेल्या आहेत? उप्पर तो और बनी, अन्दरकी बात खुदा जाने! इतर ठिकाणची गोष्ट सोडून द्या. फक्त एकट्या मुंबईतील गिरणी कामगारांचीच स्थिती पहा.

• दया करा, थोडी अधिक भाकर द्या :

त्यांची रहाण्याची ती खुराडी, त्यांची अन्नान दशा, त्यांच्या शरिरा वरच्या त्या चिन्ध्या, रात्रं दिवस अक्षरक्षः काबाड कष्ट करुन त्यांच्या चेहऱ्यावर आलेली ती प्रेतकला, कुटुम्बात राहून हि त्याविषयी वृद्धिंगत होणारा निराशा जन्य एक प्रकारचा तिटकारा, जीवित म्हणजे एक पाण्याचा बुडबुडा किंवा गिरणीवाल्या शेट्याची गुलामगिरी करण्यासाठी देवाने दिलेला एक काळ, या कल्पनेमुळे व्यसनांचा झालेला अतिरेक आणि दिवसाचे चोवीस तास जीवन कलहानी तोंड गिळवणी करता करता मोटा कुटीला आलेली ती त्रासदायक चिडखोर वृत्ति, हे चित्र पहाणाऱ्याच्या तोंडून अखेर हाच उद्गार निघेल की ‘नरक जर पृथ्वीवर कोठे असेल तर तो येथेच येथेच येथेच’! सारांश, गिरण्या कारखाने व फॅक्टऱ्या म्हणजे जिवन्तपणीच माणसाना मरणाचा अनुभव दाखविणाऱ्या आणि माणसे असता हि त्यांची जनावरे बनविणाऱ्या नरकाच्या खाणीच हाटल्या तरी चालतील. या खाणी कोणी उत्पन्न केल्या? या खाणी पोटाने निर्माण केल्या. होय. पण असे हे पोट तरी कसले कीं, त्याची खाच बुझविण्यासाठी कोट्यावधि माणसें जिवन्तपणी प्रेता समान होतात? असे हे राक्षसी पोट तरी कोणाचे की ज्याच्या शान्त वनासाठी लाखो लोकांच्या पोटातली आतडी पिळून निघावी? त्यांच्या रक्ताचे झालेले पाणी सुद्धा त्यांच्या शरीरात उतरू नये? औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली अखिल राष्ट्राच्या शारिरीक प्रगतीचे होळ कुकडे करण्यास उद्युक्त झालेले आणि भुकेने पेटलेली पोटे ‘दया करा, थोडी अधिक भाकर द्या’ म्हणून किंकाळ्या मारीत असताना, ज्या पोटाच्या वीत दीड विती वरच असलेल्या कानांची भोके साफ हुजून जातात, असे हे पोट तरी कोणते? आणि केणाचे? हजारो लाखो पोटांच्या तिडकांवरच ज्याची ङूक भागविली जाते असे ते पोट म्हणजे प्रदर्शनात ठेवण्या सारखी एखादी वस्तू असेल काय ? नाही. पोटासारखेच पोट; पण त्याच्या भुकेची आग आणि खाद मात्र फार भयंकर. हे पोट दुसरे तिसरे कोणाचे नसून गिरणीवाले कारखानदार यांचे होय.

• पोटाच्या पापातून :

जगातल्या पोटांच्या पापावर या बड्या पोटांची खाज शृगांरली जात असते. कारखानदार आणि कामगार यांच्यामध्ये श्रीमन्तीचे एक भले जाडजूड फिल्टर लटकले असल्यामुळे, कामगारांच्या लक्षावधि पोटांच्या तिडका त्यात शिरता क्षणीच त्याचे पौष्टिक खाद्यात रूपान्तर होते. या फिल्टरमुळे मजुराच्या पोटाच्या किंकाळ्या कारखानदाराना मुळीच ऐकू न येता, त्या ऐवजी त्यांच्या श्रीमन्ती वैभावाला झिलईची झकाकी चढविणाऱ्या स्तुति स्तोत्राच्या मंजुळ गायनात त्या किंकाळ्याचे परावर्तन होते. पोटाच्या पापाचे निर्माण केलेल्या श्रीमंत आणि गरीब या भेदाने जगात आज पर्यंत जितके अत्याचार केलेले आहेत, तितके महायुद्धाने राज्य क्रांतीने किंवा ठगांच्या दरोड्यानीहि केलेले नाही. पोटाच्या पापातून श्रीमन्ती जन्माला आली असल्यामुळे माणसाची जनावरे बनविणे आणि पशु पेक्षा हि जडमुढाना माणुसकीता मुलामा चढविणे, या गोष्टी तिच्या सहडलीला होऊन बसल्या आहेत. श्रीमन्तीचे आवरण जर खेचून झुगारून दिले तर तिच्या अतरंगाच्या मसाल्यांच साऱ्या जगाच्या पातकाचा सफडा नरक ओतप्रोत भग्लेला आढळेल. इतकेच नव्हे तर शेकडा ९८ - ९९ श्रीमंत फक्त श्रीमंतीच्या प्रसादानेच माणसात मोडतात, नाही तर त्याना टोणग्या डुकरा पेक्षा अधिक कसली हि किंमत नाहीं, हेच अखेर प्रत्ययाला येते. शहरी शहाणे जिला सुधारणा सुधारणा म्हणतात, ती भांडवल्यांच्या श्रीमंतीची आणि चेनबाजीची बुरखी सबब आहे. कारखाने व गिरण्या या सबबीची हत्यारे असून, त्यानी शहरी जीवनात इलायट्रीची कितीहि भपकेबाज दिवाळी केलेली असली, तरी त्यानी खेड्यातला शेतकरी पोटाच्या पापाने पामर बनबून भिकेला लावला, ही गोष्ट सहसा कोणाच्या लक्ष्यात येत नाही.
सुधारणेच्या नावाखाली मुंबई सारखी शहरे पृथ्वीवरील स्वर्ग बनली, तरी त्या स्वर्गाने सर्व खेडी उध्वस्त करुन शेतकऱ्यांच्या शेतीचा नरक बनविलेला असतो, हे पाहावया शहरी शहाण्याना दृष्टीच उरलेली नसते. सुधारेला सुखाची माता मानणाऱ्याना गोल्ड स्मिथ म्हणतो - Ye Friends to Truth. Ye Statesmen Who Survey The Rich Man’s Power Increase, The Poor’s Decay, It's Yours To Judge, How Wide The Limits Stand Between a Splendid And a Happy Land.

अनुवाद -
"गोर गरीबांच्या ऱ्हासावर श्रीमंतांची सत्ता वाढत चालली आहे, हे स्पष्ट पहाणाऱ्या, अहो सत्याच्या भोक्त्यानो, अहो मुत्सद्यानो, ढामडौली दिमाखाचे राष्ट्र म्हणजे सुखी राष्ट्र नव्हे, हे तुमच्या जितके लवकर लक्ष्यात येईल तितके बरे.”

कारखानदार श्रीमंत हजारो रुपये किंमतीच्या मोटारी उडवीत आपल्या धन कनक संपन्नतेचे प्रदर्सन करीत असतात. पण ही मोटार दौड आपण पोटार्थी गरीबांच्या पोटावरच करीत असतो, हे त्यांच्या लक्ष्यात येत नाही. गिरणीवाल्या शेट्यांच्या मोटारी जिवंत माणसांच्या ताज्या तिखट कष्टाळू रक्ताच्या पेट्रोलवर दौडा मारीत असतात. गोर गरीबांच्या आंगातून थबथब निथळणाऱ्या घामाच्या पाटाचे वंगण या ऐदी श्रीमंत चेला शेटांच्या मोटारीत पडत असते. लाखो स्त्री पुरुष आणि मुले यांच्या शरीराची हाडे न् हाडे पिचतात, तेव्हा या नफेबाज घनाड्यांच्या माड्यांची बहाले आणि मोटारींचे सांगाडे सज्ज होतात. शेतीला मुकून अन्नान्न झालेल्या स्त्री पुरूष मजुरांच्या ऐन उमेदी जीविताच्या राखरांगोळीवर या लाखाधिशाना पुरुषोत्तमत्वाचा अधिकार प्राप्त होतो आणि सामाजिक क्षेत्रात यांच्या मोठेपणाच्या टिमक्या वाजतात.

पोट पैशासाठीं पापाचा परवल पत्करते, पण पैसा मात्र असा हरामखोर आहे कीं तो वाटेल तसल्या पापावर पुण्याचे पांघरूण पांघरतो. आजच्या जगात श्रीमंत व गरीब, मजूर व कारखानदार, ऋणको व धनको, आणि गुलाम व धनी, हे जे भेद माजले आहेत, त्याला मूळ कारण "चमडी के झोपडी मे लगी हुई आग" हे जरी असले, तरी तिच्या ज्वाळा अव्याहत भडकत ठेवण्या वरच श्रीमंतांच्या श्रीमंतीची भरती असल्यामुळे, श्रीमंतीच्या न शमणाऱ्या भुकेनेच हे भेद दिवस न् दिवस अधिकाधिक तीव्र होत चालले आहेत. सगळी पोटे पत्करली, पण श्रीमंतीची भूक लागलेल्या भांडवल शाहीच्या पोटाची आग परवडत नाही. सामाजिक समतोल पणाचा कल भांडवल शाहीच्या राक्षसी पोटाकडे कलंडल्यामुळे आज पोटार्थी गरीबांचे हे हाल, किंवा त्यांच्या पोटाचे बण्ड कसे थांबवावे, हा प्रश्न सध्या महत्त्वाचा आहे.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ३ -
बांडगुळ्या मध्यम वर्ग

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• समाज शास्त्राची नवीन कमाई :

गेली ५० वर्षे इंग्रेजी विद्या, विलायती सुधारणा, व्यापाराची वाढ इत्यादी थाटामाटाच्या पचनी पडलेल्या आणि त्यावरच आपले बांडगुळी जीवन ऐष आरामात घालविणाऱ्या मध्यम पांढर पेश्या वर्गाला स्वर्ग अगदी दोन वोटे उरलेला होता. त्यांचे जीवन बोलून चालून अक्षरशः बांडगुळेच असल्यामुळे, अन्नदात्या पल्लव प्रसारा पलिकडे आणखी जग असल्याची भावना त्याना कल्पनाच नव्हती. त्यांची सारी सृष्टी म्हणजे मुंबई. तिच्या वरुन हे जगाच्या परिस्थितीची अटकळ बांधणारे उंटावरचे शहाणे. मध्यम वर्ग ही एक हिन्दुस्थानातील समाज शास्त्राची नवीन कमाई आहे. ब्रिटिश जुन्या राजवटीत असल्या बांडगुळ्या वर्गाचा हिंदी समाज रचनेत मागमूल ही लागत नाही. हिंदुस्थाने तर कोणत्याही देशांत या मासल्याचा आणि मसाल्याचा वर्ग आज ही आढळून येणार नाही. श्रीमंत आणि मजूर, मालक आणि चाकर, असे दोन ठळक भेद सर्वत्र आहेत आणि ते असणारच. पण या दोन भेदांच्या मध्यें, आगगाडीच्या बफर प्रमाणे असणारा, परंतु श्रीमंत भांडवल्ये मालक आणि राज्याधिकारी यांच्या कृपेच्या खोडाला बांडगुळ प्रमाणे चिकटलेला, मध्यम वर्द फक्त हिन्दुस्थानातच आढळतो. या वर्गात निरनिराळ्या जातीचे लोक असले, तरी त्यांच्या व्यवसायाची आणि मनोवृत्तीची माती एकाच खाणीची असते. या खाणीचा शोध करता असे आढळून येते कीं हा बांडगुळ्या मध्यम वर्ग म्हणजे प्राचीन प्रतिष्ठित श्रीमंत शाहीचा कोलमडून पडलेला सडका ढलपा होय.

श्रीमंतीचा वट वृक्ष उभा सुकून त्याची पाळीमुळे जरी क्रांतीच्या वणव्यात जळून खाक झाली, तरी यदृच्छेने वाचलेल्या या ढलप्याची प्रतिष्ठितपणाची गाठ अझून बरीच ताठ आहे. याचा डाम डौल आणि झोक नोक पहावा तर सरदारी श्रीमंतीचा, पण वस्तुस्थिती मात्र कंगाली. भिकाऱ्या पेक्षा भिकारी आणि मजूरा असून हि, या पांढर पेश्या बांडगुळ्यानां धनीपणाची श्रीमंती मिरवण्याची हातोडी उत्तम साधलेली आहे. गोर गरीबाच्या थंर्ड क्लासात प्रवास करावा तर यांच्या प्रतिष्ठेचे पाणी पाणचट पडते आणि सेकंड क्लासच्या दिडक्या खर्च करायला याना तोंडच नसते. स्वतःच्या उदरंभरणा पलीकडे अधिक अक्कल जवळ नसली, तरी ब्रम्ह देवाने अकलेची सारी वखार आपल्याच हवाली केली आहे. अशा आढ्यतेने राजकारण समाजकारण धर्म नीति हव्या त्या विषयावर यांची वाचाळ पंचविशी म्हणजे मुल्क मैदानची मावस बहीण. हे लोक मोठे सव्यासाची दिसतात.

• दुर्लभ कार्यकर्ता :

एकाच तोंडाने राज्य निष्ठेची आणि जन निष्ठेची गरम सर्द हवा सोडणे यांच्या बत्तीशीची सहजलीला. एकीकडे सरकारी नोकऱ्यांत राबत असतात, किंवा परदेशी गोऱ्या व्यापाऱ्यांच्या आणि असहकारवादाच्या चळवळीला फुंकर मारतात. उपजीविकेसाठी हा पांढर पेश्या वर्ग राज्यकर्ते, श्रीमंत, भांडवले वगैरेच्या तैनातीत बांडगुळ प्रमाणे अखंड चिकटलेला असल्यामुळे, मागासलेल्या पद दलित मजूर शेतकऱ्यांच्या वाऱ्याला हि हा कधी उभा रहात नाही किंवा त्यांच्या दुर्दशेचा याला कधी घाम फुटला नाही. तथापि मागासलेल्या जनतेच्या चळवळीत फुकट दोन शब्द खर्च करून जर याच्या पगडीवर लोक मान्यतेचा तुरा चढण्याचा संभव असेल, तर तेवढ्या पुरती व्याख्यान बाजी किंवा लेखन बाजी करायला हा मुळीच माघार घेणार नाही. ‘नृपति जन पदानां दुर्लभः कार्यकर्ता’ ही प्राचीन विचारवंतांची विचारसरणी या बांडगुळ्या लोकांनी ब्रिटिश राजवटीत अक्षरशः खोटी ठरवली आहे.

चक्र नेमीक्रमाने हिन्दुस्थानात होणाऱ्या क्रांतीच्या उलथा पालथीचा अंदाज बांधून, गोऱ्या टोपकर बनियानी जेव्हा मुंबई मद्रास कलकत्ता येथे आपल्या वखारी उघडल्या आणि व्यापाराच्या पांघरूणा खाली राजकारणी सट्टेबाजी सुरू केली, तेव्हा त्याना कारकून कामगार आणि कूली या तीन ककारांची जरूरच पडली. रोख रोजदारीच्या आणि मासिक तनख्याच्या आशेने, खेड्याना आणि शेतीला रामराम ठोकून, कामगार आणि कूली जसे या शहरांकडे धावत धावत सुटले, तसे जुन्या ऐदी श्रीमंतीला पोटजड झालाले हजारो वृद्धूपजीवी पांढर पेशी सुद्धा कारकुनीच्या कलम बहाद्दरी वर आपल्या दैवा वरचा पाचोळा झाडण्याच्या उमेदीने खेडी गावे सोडून मुंबईत घुसले. आनुवंशिक संस्काराने बुद्धीची चलाखी जिंवत राहिल्यामुळे, त्यांनी आपल्या परदेशी मालकांची परकी भाषा तेव्हाच जिव्हगत आणि कलमागत करून टाकली; आणि स्वामिनिष्टाचे सफेदे फासून कारकून, हिशोब्ये (अकौटण्ट्स), मध्यस्थ (इंटरप्रीटर्स), गुमास्ते (एजण्टस) आणि वकील (अँम्बासडर्स) इत्यादि अनेक भूमिका ‘राजी खुषीने अक्कल हुषारीने’ नटवून, ब्रिटिशाना हिंदुस्थान मिळवून दिले. ‘परस्पर पावणे तेरा’ ही व्यापारी धोरणातली ‘ग्येनबाची मेख’ ब्रिटाशां जवळून शिकून घ्यावी. त्यानी इंग्रेजी विद्येची हॉटेले शहरो शहरी उघडली, म्हणून पूर्वी त्यांचे पोवाडे गाणारे शाहिर (आणि तेहि हे बांडगुळे पांढर पेश्येच!) शहरो शहरी उफलले होते. इंग्रेज लोक आणि इंग्रेजी विद्या म्हणजे स्वर्गातून कोसळणारा अमृताचा वर्षाव, अशा टिमक्या त्यावेळी मन मुराद ठणठणल्या.

परंतु, हा उपद्व्याप इंग्रेजांनी हिन्दुस्थानाच्या खास कल्याणासाठी थोडाच केला? त्यांच्या व्यापारी राज्याची गिरणी सुरळीत आणि बिनधोक चालावी, यासाठी त्याना छोट्या मोठ्या कारकुण्ड्या यंत्रांची जरुर अनिवार्यच होती. ती यंत्रे या शिक्षणाने पैदा करुनच त्यानी आपला राज्य कारभार आणि व्यापार पूर्वी केला आणि आज करीत आहेत. हिन्दी मातीच्या मडक्याना आंग्लाईची झिलई बेमालूम चढल्या वर, त्या मडक्यानी आपल्या मूळ मातीच्या जातीला विसरल्या शिवाय गत्यंतरच नव्हते. इंग्रेजी विद्येला वाघिणीच्या दुधाची उपमा देण्याचा प्रघात आहे. पण बांडगुळ्या वर्गाच्या आज पर्यंतच्या चरित्रा वरून इंग्रेजी विद्या म्हणजे बेचव बेवडा हाच सिद्धांत काढणे प्राप्त आहे. निदान, ज्या बांडगुळ्या मध्यम वर्गाने इंग्रेजी शिक्षण घेऊन, इंग्रेज सरकारच्या आणि व्यापाऱ्यांच्या भल्या बुऱ्या उलाढाली लढविण्यात केवळ आपल्या पोटोबाच्या पुजेची सोय पाहिली, त्यानी या वाघिणीच्या दुधाचा बेवड्या प्रमाणेच उपयोग केला, यात तिळमात्र शंका नाही. हिन्दुस्थानचा इतिहास सकाहि उलट सुलट तपासा, त्यात एकच मुद्याची गोष्ट स्पष्ट दिसून येईल की इंग्रेजी राज्याची प्राण प्रतिष्ठा इंग्रेजी सैन्य किंवा इंग्रेजी दगलबाजी (Diplomacy) ने केलेली नसून, याच बांडगुळ्या हिन्दी पोटार्थी पार्थिवांच्या दगाबाजाने झालेली आहे. त्यानी ब्रिटिशाना त्यांची व्यापारी - राजकारणी (Politico-commercial) सत्तेची पकड या देशाच्या नरड्याला भिडवण्यास काया वाचा मने मदत केली आणि आपल्या मायदेशाची व देश बांधवाची खरी खोटी गुह्रे इंग्रेज परक्याना दाखवून, त्यांच्या मेहरबानी वर स्वतःच्या कारकुण्ड्या ऐश्वर्याचे महाल सजविले. यांचे मुख्य भांडवल म्हणजे राजनिष्ठा उर्फ स्वामी निष्ठा. या निष्ठेला सद्गुणांचे पाणी चढवून तिची बाजारी किंमत त्यांनी कितीहि वाढवली तरी या बांडगुळ्यांची राज निष्ठा म्हणजे कुत्र्याची स्वामी निष्ठा यापेक्षा अधिक काही नाही.

• ज्याची भाकरी त्याची चाकरी :

ज्याची भाकरी त्याची चाकरी, इतकेच जीवनाचे ध्येय बनल्यामुळे, या कारकून मध्यस्थ गुमास्ते वकील आणि कंपनीने आपल्या मायदेशाच्या भवितव्याकडे सपशल पाठ फिरविली. स्वतःच्या पोटाचा दरा भरण्यासाठी स्व-देशाच्या नरड्यावर सुरा फिरवायला ही यांची मनोवृत्ती वूर्वी कधी बाचकली नाही, आणि आज शरमत नाही. आत्म प्रतिष्ठा, स्वदेशाभिमान, स्वातंत्र्य, राष्ट्रीयत्व इत्यादी सर्व गुणांचे गुळवेल सत्व म्हणजे यांची राज निष्ठा! मग तो राजा कोणीही असो. ठिकाणावर असो वा नसो. स्वार्थांच्या बाबतीत ते पूर्ण आप्पल पोटे असले तरी राज निष्ठेच्या क्षेत्रात आपपर भेद त्यांच्या ह्रदयाला आज वर कधीच शिवला नाही. असल्या लक्षवेधी बांडगुळ्यांच्या स्वदेश द्रोही वृत्तीच्या मदतीनेच इंग्रेज व्यापाऱ्यांनी, बंदुकीचा एक बार हि न उडविता, उभा हिन्दुस्थान आपल्या पचनी पाडला.

हिन्दुस्थानातल्या ब्रिटिश साम्राज्याचा पाया बाच बांडगुळ्या महात्म्यांच्या एकनिष्ठ घामावर उभारलेला असल्यामुळे, राज्य कारभाराची सर्व लहान - मोठी सुत्रे याच सव्यसाची अर्जुनांच्या हाती दयाळू मायळू आणि पायाळू इंग्रेज सरकारने ठेवलेली आहेत. दिल्लीच्या सेक्रेटरियेट पासून तो पेट्यातल्या महालकरी कारकूनापर्यंत याच मध्यम वर्गाचे हिंदी रथी महारथी इंग्रेजांचा राज्य कारभार खास आंग्रेजी कदरीने चालवीत आहेत. शोभेसाठी थोडे मूठभर गोरे अधिकारी असतात. सत्ता त्यांची असली, तरी मत्ता मात्र पांढर पेश्या चाणक्यांचीच असते. इलाख्याचा गव्हर्नर असो, किंवा जिल्ह्याचा कलेक्टर असो, चिटणीशी कुवडा खास हिन्दुस्थानमा बनेला मालच असते. गोऱ्या परदेशी भांडवलावर उभारलेल्या आगबोट आगगाड्यांच्या जगड्व्याळ व्यापारापासून तो थेट हजामतीचे वस्तरे विकणाऱ्या विलायती वखारीचा कारभार हेच खलबत्ते राजकारणी धोरणाची मलमे घोटीत असतात, आणि गुप्त पोलीस खात्यात यांचीच अक्कल अक्कल काढ्याच्या भट्या रात्र दिवस चढवीत उतरीत असते.

• माझा स्वयंपाक मीच करीन :

“माझा स्वयंपाक मीच करीन” ही टिळकांची उक्तीच जर स्वराज्याच्या सर्व अटींची समर्पत मानली, तर आज स्वराज्याच्या हाकटीत वास्तविक मुळीच काही अर्थ नाही, असे स्पष्ट कबूल करणे भाग आहे. कारण, आज हिन्दी राज्य कारभार एकजात हिन्दी बांडगुळे शहाणेच चालवीत असून, गोरे अधिकारी निवळ कुंकवाचे आधार म्हणूनच या देशात वावरत आहेत. इंग्रेजी राजकारणाचा फास हिन्दुस्थानाच्या गळ्याला जर विशेष घट्ट बसून, त्याला जीवहि नकोसा झाला असेल, तर त्याला कारण ब्रिटिश लोक नसून हिन्दी बांडगुळ मुख्यतः होत, हे शेकडो पुराव्यानी सिद्ध होण्या सारखे आहे. परकीय सरकारच्या आणि भांडवल्यांच्या प्रत्यक्षा वगलेत वसून, राज निष्ठा आणि लोक निष्ठा या दोन हि धोंड्यावर हात ठेवून मध्यस्थीची नाटकी कसरत करणारा हा मध्यम पाढर पेश्या हिन्दी वर्ग म्हणजे या राष्ट्राच्या भवितव्याच्या मार्गातील एक चमत्कारिक अडचणच होय. गेल्या २० - २५ वर्षांत हा बांडगुळ्या वर्ग बऱ्याच निराळ्या वळणाने धडपड करू लागला आहे. एकाद्या झाडाला बांडगुळ चिकटले की त्या झाडाचा रस कायम असे पर्यंत ते टवटवीत राहते. पण रस नाहीसा झाला कीं स्वतः बांडगुळ तर सुकतेच सुकते, पण त्या झाडाचे हि सुकेठाक खोड बनविते. अलिकडे स्वराज्य प्रात्पीच्या बहुरंगी आणि बहुरूपी चळवळी जोराने चालू झाल्या आहेत. जनता लोकमत लोकशाही वगैरे शब्दांचे हापट बार फोडणाऱ्या वृत्तपत्रांताहि मनस्वी सुळसुळाट उडाला आहे. व्याख्यानांचा तोफखाना नाको नाकी गावोगाव अष्टौप्रहर धडे बाजी करीत आहे. ब्रिटिश नोकरशाहीच्या उच्चाटणाची भाषा सर्वत्र बेफिकीर बोलली जात आहे, आणि आजच्या प्राप्त गुलामगिरीचे बंद तोडण्याची तयारी सर्व देशात सारखी करण्याचे प्रयत्न जोराने चालले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चळवळींच्या अग्रभागी मध्यम वर्ग बांडगुळेच उभे असलेले दृष्टीस पडतात.

पिढ्यान पिढ्या ज्यांचा जन्म परसेवेने उद्रंभरण करण्यात गेला, त्याच वर्गातल्या काही थोड्या व्यक्ती एकदम अशा उलट्या पावलानी चालू लागाव्या हे आश्चर्य अक्षरशः क्रान्तिद्योतक नव्हे काय? ही क्रान्ति कशाने झाली? मुख्य झाडावर हे बांडगुळ आता कां उलटले? अर्थात् झाडच रसहीन झाल्या शिवाय ही धडपड चाललेली खास नाही. परोपजीवि समाज पोट पुजेच्या संकल्पात फार पटाईत असतो. त्याच्या पोटाला चवली एवढी सुद्धा रिकामी जागा सहन होत नाही..स्वतःचे पोट भरले कीं तिकडे जगाला जरी आग लागली, तरी तो बांडगुळ्या चुकून सुद्धा नुसती विचारपूस करावयाचा नाही, तोच आज बहुजन समाजाच्या दारिद्यावर संतापाचे आकांड तांडव करू लागला आहे, या कोड्याचा उलगडा क्षामशीचा वायदा घेऊन कोणी तरी केलाच पाहिजे. हा जनतेचा अस्सल कळवळा कीं या बांडगुळ्यांच्या उपाशी पोटाच्या कळा? परकीय राज्य कर्त्यांच्या महेरबानीचा सरस आपल्या भाग्याला चोपडून, त्याच्या जोरावर महालकरी, मामलतदार, मुनसफ, रजिस्टर, पोलिस इन्स्पेक्टरादि, गोर गरीब जनतेच्या अज्ञानावर मनमुराद चरणारे, राजमान्य आणि लोकमान्य महात्मेच पैदा करण्याचा ज्या वर्गांचा कुसवा, त्याच कुसव्यातून गरीब रयतेच्या पोटाच्या बंडासाठी बण्ड करणारे तांबडे निळे निळे पिवळे वीरपीर फटाफट निजपू लागले, हा एक मोठा चमत्कार आहे. कायदे बाजीच्या घवघवीत मळजटाने, न्याय अन्यायाच्या डोळस निवढीच्या सबबी खाली भिकारी शेतकऱ्यापासून तो थेट भांडवल्या झब्बू पर्यंत सर्वांना कज्जे बाजीचे व्यसन लावणाऱ्या आणि त्यावर आपल्या संसाराचे उखळ पांढरे करणाऱ्या वकीलांचे इरसाल बांडगुळे ताण्डेंच्या ताण्डे आज ब्रिटिश नोकरशाही विरूद्ध लोकशाहीचे झेंडे नाचवीत आहेत.

या अकल्प्य घटनेच्या पोटात कोणाच्या पोटाच्या पापाचा व्याप हा एवढा उपदव्याप करीत आहे, याची चिकित्सा करणे अगत्याचे आहे. ब्रिटिश राज्य कर्त्यानी इंग्रेजी बिद्येचे भाण्डार फोडून, शहरी बांडगुळ्या झब्बूना आंग्लकळा आणल्यामुळे, हिंदुस्थानातील शहरांचे स्वरूप जीवन आणि विचार बाह्यात्कारी पुष्कळ बदलले आहेत. सुधारणेची सर्व बेगड मुंबई कलकत्त्या सारख्या व्यापारी शहरांतच विशेष चमकते. इंग्रेजी विद्येचा यसफ्यस चवचालपणा आणि जीवनक्रांतीचा अप टु डेट हॅट पाटलूणपणा फक्त शहरांतच वागडतो. मूठभर शहाण्या शिक्षित चळवळ्यांच्या विचार क्रांतीचा उच्चार उमटवून, त्यांचे घसे मोकळे करणारे छापखाने आणि वृत्तपत्रे यांचा सुळसुळाट फक्त शहरातच. अर्थाच प्राप्त विद्येच्या घटपठादि खटपटी आणि त्यावर पोटा - पाण्याचा प्रश्न चवचवीत वंगण्यावर अध्यपायासाने सोडविण्याच्या धडपडी करणाऱ्या खास शहरी शहाण्याना खेड्यातील शेतकरी जनतेच्या स्थितीकडे सक्ष्य पुरवण्याची मुळी दृष्टीच उरलेली नाही. आजच्या हिन्दी चळवळ्या पाश्चिमात्य कल्पना कोंबडीचे पिल्लू आहे. त्याच्या जन्म जीवन आणि मृत्यूच्या त्रयाची सांगड शहरी खुराड्यांशीच पडल्यामुळे, त्याला मुंबई मद्रास कलकत्ता सारखी शहरे म्हणजे सारे हिन्दुस्थान वाटते. स्वतःच्या उत्क्रांत विचारावरून तो अवघ्या हिन्दुस्थानाच्या विचार परिणतीचे प्रमाण गृहित धरून, आचार क्रांतीची लगबग करीत असतो. शहरांतील शिक्षण प्रसाराच्या राम गाड्यावरून तो सर्व हिन्दुस्थानाच्या साक्षरतेची कल्पना ठरवीत असतो,

दृष्टीच्या आर पार बदलामुळे सारी सृष्टी त्याला शहरी मसाल्याची दिसते आणि त्या माल मसाल्यावर तो उभ्या हुन्दुस्थानाच्या जीवनात क्रांतीची फोडणी घालण्याचा चंग नित्य मारीत असतो. शहरी आकर्षक जीवनाच्या कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या या आंग्ल विद्या विभूषित माशा हिन्दी खेड्यांच्या आणि अफाट शेतकरी जनतेच्या हिता हितांच्या प्रश्नाला पारख्याच बनल्यामुळे, त्यानी अखिल देशाच्या क्रांतीकाऱ्यांच्या ठोकलेल्या प्रातिनिधीक आरोळ्या किती फोलकट आणि कमजोर आहेत. याची त्याना स्वतःला जाणीव नसली, तरी ती दीर्घदृष्टी ब्रिटिश नोकरशाहीला खास आहे. नॅशनल कॉंग्रेसचा इतिहास म्हणजे या बांडगुळ्या वर्गतील विशेष शिष्टांच्या शहरी धडपडींचा इतिहासच होय. सुरूवातीला कॉंग्रेस ही रावसाहेब रावबहादुरादी ब्रिटिश निर्मित हिन्दी लॉर्डांची एक वार्षिक मजलस असे. या मजसलीत जहाल मवाळ भेदांच्या भेदिक लावण्यात रंगली. तरी सुद्धा देश भक्तीत तू मोठा की मी मोठा? हाच कॉग्रेसी चळवळीचा भर रंग असे. एकाहि देश भक्ताला दारिद्र ग्रस्त शेतकऱ्याचा आणि पोटासाठी खेडी उध्वस्त टाकून शहरांच्या गिरण्या कारखान्यात घुसलेल्या मजूरांचा चुकून सुद्धा घाम फुटला नाहीं, कीं कोणाला त्यांची आठवण आली नाहीं.

एवढे मोठे लोकमान्य बनविलेले टिळक! पण त्यांच हि तीच गति. त्यांच्या चळवळी हि शहरी आणि भगत हि शहरीच. चिरोल केसचा फास गळ्याला बसला, तेव्हा गोर गरीब शेतकऱ्यांच्या घासातला घास काढायला, शुद्ध भिक्षुकी थाटाने टिळकांचा जो मोटारदौडी नाटकी स्वराज्य दौरा खेड्या - पाड्यांतून झाला, तेवढाच काय तो त्यांच्या आणि खेडवळ जनतेचा, तन्मातला पहिला आणि शेवटला प्रसंगापूर्वी या लोकमान्य प्राण्याने ना कधी शेतकऱ्यांची विचारपूस केली, ना कधी मुंबईच्या गिरण बाबूंच्या क्लेशाची चौकशी केली, किंवा ना कधी पददलित अस्पृश्यांवरील सामाजिक जुलुमावर डोके खाजविले. टिळकांच्या हिंमतीचा सारा मारा ब्रिटिश नोकर शाहीच्या चक्रव्यूहावरच विशेष. त्याना ब्रिटिशशांचे भांडवल शाही कुदळ खोरे स्पष्ट दिसे, पण बांडगुळ्या वर्गाची सर्व भक्षी जळूशाही मुळीच कधी दिसली नाही. सामाजिक क्रांतीचे वावडे असणाऱ्या टिळकांच्या हातून केवळ एकजोडी राजकारणी जी धडपड झाली, तीच आणि तितकीच पुण्याई त्यांच्या खाती जमा घरूनच, या थोर पुरूषाची स्मृति टिकणारी आहे. यानंतर कॉंग्रेसमध्ये महात्मा गांधीचे युग सुरू झाले. या युगाचा महिमा डॉक्टर रविंद्रनाथ टागोर सत्याची हाक (call of truth) मानक निबंधात मार्मिक पणे वर्णन करतात - "स्वदेशी चळवळी नंतर अस्तित्वाच आलेल्या प्रस्तुतच्या खळबळीचा व्याप दांडगा असून, तिचा प्रभाव सर्व हिन्दुस्थान भऱ पसरलेला आहे. पूर्वी आमच्या राडकारणी पुढाऱ्यांची दृष्टी आंग्रेजी जाननेवाल्या लोकां पलीकड़े गेलीच नव्हती. कारण, इंग्लिश लोकांनी लिहिलेल्या इतिहास ग्रंथातील पुस्तकी चित्रां पलिकडे त्यांची स्वदेशाची कल्पनाच कधी गेली नाही. स्वदेशाची ही कल्पनाच म्हणजे बर्फ आणि ग्लॅडस्टन, माझिनी आणि ग्यारी वाल्डी, यांच्या पुसकट वाफऱ्यांनी निर्माण झालेली मृगजळाची सृष्टी होय. स्वार्थत्याग म्हणजे काय आणि आपल्या देश बांधवा बद्दलची खरीखरी कळकळ म्हणजे काय, याची त्या काळच्या राजकारणी पुढाऱ्याना अटकळच झाली नाही म्हणावयास काही हरकत नाही. अशा प्रसंगी, महात्मा गांधी एकदम पुढे सरसावले. त्यानी आपल्या कोट्यावधि झोपड्यात प्रत्यक्ष प्रवेश केला आणि त्यांच्या विचार विनीमयाचा नवीनच उपक्रम सुरू केला. पुस्तकी चर्पट पंजरीचा अवतार गांधीना प्राप्त झालेल्या महात्मा पदवीने त्यांचा गौरव केला असे म्हणण्यापेक्षा, महात्मा गांधी असे त्यांचे खरेखुरे नावच व्यक्त झाले, असे म्हटले पाहिजे. हिन्दुस्थानातील एवढी मोठी अफाट जनता माझ्याच हाड - रक्त - मासाची आहे असे समजणारा कोणचा मायेचा पूत दुसरा होऊन गेला बरें? सत्याचा स्पर्श होताच कोंदाटलेल्या आत्म्याच्या शक्ती खाडकन् आपल्या बंधनातून तोण्डाळ टिळक भगतानो, ऐका ऐका, रविंद्रनाथाची ही कटु स्पष्टोक्ति, ही नम्र सत्याची हाक ऐका. मुक्त झाल्या. हिन्दुस्थानच्या दरवाजावर शुद्ध प्रेमाने टिचकी मारताच तो प्रचण्ड दरवाजा उघडला, विकल्प नाहीसा झाला आणि नामर्दाईने तोंड काळे केले. सत्याचे प्रबोधन सत्यानेच केले” (प्रबोधन पाक्षिक, १ डिसेंबर १९२१)

• गुलामगिरीचा पहिला टाहो :

महात्मा गांधीच्या पूर्वी ६० वर्षे, मागासलेल्या शेतकरी जनतेच्या बौद्धिक आणि आर्थिक प्रबोधनाचा पहिला कसोशीचा प्रयत्न कै. ज्योतिबा फुले यानी केली. फुले स्वतःच मागासलेल्या कष्टाळू शेतकरी समाजातले असल्यामुळे, जोडा कोठे चावतो, हे त्याना बिनचूक कळले आणि त्याप्रमाणे त्यानी अखिल शेतकरी वर्गाच्या गुलामगिरीचा पहिला टाहो फोडला. इंग्रेजांच्या गुलामगिरीची त्याना जाणीव होती, तरी हि त्यापेक्षा विशेष निकटच्या आणि रात्रं दिवस रक्त शोधून निस्सत्व करणाऱ्या बांडगुळ्यांच्या मखमली जुलुमांची त्याना फार काळजी होती. परदेशी शत्रूला घरात घेऊन त्याच्या पायतण पुजेवर स्वतःच्या पोटपुजेची सोय पहाणाऱ्या शहरी शहाण्याच्या घाशीरामीला टक्कर देण्याचा ज्योतिबाने अचाट प्रयत्न केला. त्याची स्थिती एकांड्या शिलेदाराची होती. जात्या खेडवळ. ज्या खेडवळ्याच्या जागृतीसाठी तो झटत होता ते सारे अनाडी आणि खुळसट. जगता मरता भटांच्या तोंडाकडे पहाणारे.

एकीकडे केवळ व्यापारी तुंबडी बाजीची पर्वा करणारे परके इंग्रेज सरकार, आणि दुसरीकडे अनाडी रयतेच्या अज्ञानावर चरण्यास सवकलेला धोरणी बांडगुळ्या भटवर्ग. अशा तिरंगी सामन्याला तोंड देउन, ज्योतीबाला जेवढे काही देश काळानुसार करता आले,तेवढे त्याने केले. पण, अखेर त्याची शेतकरी आणि कामगार वर्गाच्या जागृतीची चळवळ बांडगुळ्या पांढर पेश्या भटानी आणि भटेतरानी चिरडून टाकली. चालू घडीच्या राजकारणात शेतकरी आणि कामगारांचे महत्त्व क्रांतीचे स्फोट कसकसे उडवित आहे, हे पाहिले म्हणजे ज्येतिबाच्या बाबड्या बोलाच्या खेडवळी चळवळीचे मर्म आणि महत्त्व जितके स्पष्ट होते, तितकेच चिपळूणकर टिळक प्रभृति बांडगुळ्या गुंडांच्या शहरी चळवळीचे नासके धोरण नागडे उघडे पडते.

बांडगुळ्यांच्या राजकारणात मामलदार मुनसफीच्या वाढत्या जागा, कौन्सिलातल्या खुर्च्या इत्यादि बाबी किती हि असल्या तरी घोंगड्या शेतकरी, आणि त्याची मरती शेती या बाबीना त्याच्या ओसरीवरहि जागा नसे. ज्योतिबाची चळवळ शेताच्या बांधा वरची. ती या शहरी शहाण्याना क्षुद्र कां वाटू नये? पांढर पेशांची उखळे पांढरी झाली कीं, स्वराज्याचा स्वर्ग हाती आला, एवढ्याच अनुभवाची या वाण्डगुळ्यांची परंपरा. भटांना पेशवाई मिळाली की भट भोजनातल्या खरकट्या पत्रावळींच्या उकीरड्यालाहि ‘मराठी साम्राज्य’ नाव द्यायला यांची तयारी. अशा मुर्दाड मनाच्या माणसानी ज्योतिबाची चळवळ पाळण्यातल्या पाळ्यात कितीही ठेचली, तरी महात्मा गांधींनी तीच चळवळ पुनरुज्जीवीत करताच, तिच्या पुढे टिळक चिपळूणकरी बडव्याना पगड्या पागोटी घासताना आपल्या नाकांच्या अणकुचीदार बोंड्याहि थबकटून घ्याव्या लागत आहेत, हा काळाचा महिमा खरोखरच रम्य आणि चिन्त्य आहे.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ४ -
महायुध्द पूर्वी आणि नंतर

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• थेट कारकुंड्यापर्यंत :

नेहमी बुध्दिवान वर्गच राष्ट्रमत व्यक्त करणारा असतो. सर्व चळवळींच्या अग्रभागी तोच उभा असतो. बहुजन समाज (Masses) नेहमी अडाणी असल्यामुळे, त्याच्या संघ शक्तीचा उपयोग राष्टोध्दाराकडे कुशलतेने करण्याचा अधिकार बुध्दिमान वर्गाचाच असतो. हिंदी मध्यम वर्ग बुध्दिमान असल्यामुळे, राष्ट्राच्या प्रतिनिधित्वाचा मान त्याच्याकडे जाणे अगदी साहजिक आहे. परंतु, प्रतिनिधी किती ही शहाणा आणि होलका असला, तरी तो आज - कालच्या धढापासरी वकीलां प्रमाणे खाटकी काळजाचा असता कामा नये. तो बहुजन समाजाच्या सुख - दु:खाशी एकजिनशी एकजीव एकतान झालेला असला पाहिजे. तो स्वत: त्याच समाजाचा जातिवंत घटकावय असून, बुध्दीच्या क्षेत्रात पुढारलेला असला पाहिजे.

हिंदी मध्यम वर्ग बहुजन समाजाशी आज पर्यंत फटकून तिटकाऱ्याने वागला. त्याला त्याच्या सुख - दु:खाची त्किंचित ही कल्पना नाही आणि जाणीव ही नाही. जात्याच तो बांडगुळ्या असल्यामुळे आणि जिकडे घुगऱ्या तिकडे उगो उहो करुनच पोट भरण्याच्या कलेत त्याची सारी बुध्दी श्रमत असल्यामुळे, त्याच्या मुर्दांड वकीली वर बहुजन समाजाने डोळे मिटून विश्र्वास ठेवणे अत्यंत धोक्याचे आहे. युरिपयन महायुध्द पूर्वी या बांडगुळ्या वर्गाला सर्वच बाबतीत अस्मान ठेंगणे झाले होते. मुंबई सारखी शहरे युरपियन व्यापाऱ्यांच्या दुकान वखारीनी नुसती उफलून निघाली होती. घाऊक दलाली पासून तो किरकोळ फेरीवाल्यांपर्यंत आणि हॅटपाट लोणीच्या ऐंटीत ‘रिप्रेझेण्टेटिव’ गिरीचा दिमाख मिरवणाऱ्याा ‘बिझिनेस मॅन’ पासून तों थेट कारकुण्ड्यापर्यंत, एक जात सर्व बांडगुळ्यांच्या उदरी शनि आला होता. पोटाच्या वंगणाचा पुरवठा उमाप झाल्यामुळे, शेकडो बांडगुळे नवीन सरदार शाईच्या संघटनेत गर्क झाले होते. पोटा पलीकडे परमेश्वर नसणाऱ्या बांडगुळ्यांना या शहरी भपक्यातच हिन्दुस्थानचा उध्दार झाल्याची सुख - स्वप्ने खास दिवसा पडत असत. पोटापाण्याचा प्रश्न केवळ पांढर पेशे पणाच्या पुण्याई वर सहज सुटत असल्यामुळे, देशात दुर्गा देवी दुष्काळ जरी पडला, तरी मध्यम वर्गाच्या पोटाला सुरकुती पडण्याची केव्हा ही कसली हि भीति नसे. पहिली तापीक आणि एक आण्याचे तिकीट एवढ्या तपश्चर्येंवर लक्ष्मी बिनधोक बिनचूक त्यांना प्रसन्न होत असे.

• अंडे आधी का कोंबडे आधी :

परंपरादत्त बुध्दि कौषल्याचे कोड पुरविण्यासाठी, फावल्या वेळात, इकडे तिकडे थोडी दिवाण खानी आणि वृत्तपत्री देश हिताची चळवळ हे बांडगुळे करीत. त्यात मनाच्या विरंगुळ्या पेक्षा मात्र अधिक काही हि नसे. खुंटीला काळीजे अडकवून, बदामाचे केशरी शिरे खात खात, देशातल्या दुष्काळाच्या किंवा रोगराईच्या अधी व्याधी हृदयद्रावक भाषेत नटविणारे ‘जॅकेट शास्त्री’ जसे बोकाळले होते, तसे शेतकऱ्यांचे तोंड जन्मात एकदा हि न पाहिलेले बाळ पंडित शेतकऱ्यांच्या वतीनें सरकारशी तोंड पाटीलकीचा लढा लढविण्यात गर्क असत. कॉंग्रेसी आणि वृत्तपत्री वादविवादाच्या मैदानावर ‘राजकारण आधी का समाजकारण आधी असल्या, ‘अंडे आधी का कोंबडे आधी’ मासल्याच्या वादाची रणधुमाळी चालत असे. सगळ्या बांडगुळ्या चळवळीचा शहरी जोर ठरावांच्या रूपाने सरकारकड़े राजकीय हक्कांची भिक्षा मागण्यातच खर्चीं पडत असे. भूक मागण्या पलीकडे भिक्षुकांची अक्कल थोडीच जाणार?

सगळी हयात शहरी वातावरणात गेल्यामुळे, खेड्या - पाड्यांतल्या कोट्यवधि जनतेच्या वाल्या दारिद्र्याची आणि ऱ्हासातील संकल्पना कोणाला हि नसे. दृश्य किंवा अदृश्य जुलुमांचा प्रतिकार अर्ज विनविण्याच्या मलम चोपडणीने होईल, का क्रान्तिकारक अत्याचाराने होईल, या प्रश्र्नावर जगात कधी एकमत होण्याचा संभव आज तरी दिसत नाही. शांतीला भुरळलेली मनोवृत्ती 'क्रान्ति’ हा नुसता शब्द ऐकताच बेशुध्द पडते! परंतु क्रन्ति का शान्ति हा वाद सुध्दा ‘अंडे का कोंबडे’ या सारखाच असल्यामुळे, शांती प्रमाणेच क्रांती सुध्दा सृष्टीच्या जीवन क्रमाच्या उत्क्रांतीला आवश्यक आणि अनिवार्यच असते. १८५७ च्या राजकारणी क्रांती पासून सुमारे ४० वर्षे शांतीचा अनुभव घेतल्यावर, जनतेच्या महिरलेल्या वृतींत चैतन्य उत्पन्न करण्याची कामगिरी कोणीतरीं करावीच लागते. ती बरी का वाईट या प्रश्नाचे उत्तर देण्याचा अधिकार वर्तमान काळाला नसतो. तो अधिकार भविष्य काळाचा. निसर्ग सुध्दा ठराविकाचे बेधन क्रांतीच्या स्फोटाने तोडतो. मग मानव सृष्टी तरी एकाच ठराविक मसाल्याच्या जीवनात कायम कां रहावीं? क्रांतीचा मार्ग चुकलेला असो वा फसलेला असो, निश्चित तत्वावर क्रांतीकारकाचा आत्म विश्वास किती ढिला किंवा घट्ट होता, यावरूनच भविष्य काळ त्या क्रन्तीच्या बरे वाईटपणाचा अभिप्राय देत असतो. नोकरी दलाली किंवा वकीलीच्या मऊमऊ गाद्यांवर लोळता लोळता देशोध्दार करु पाहणाऱ्या शांतिप्रिय शहरी बांडगुळ्यांच्या विचारात क्रांतीचा पहिला स्फोट पुण्याच्या चाफेकर बंधूनी केला. परकीय सत्तेच्या जुलुमांचा प्रतिकार अर्ज विनवण्यांच्या मलम पट्यांनी होत नसेल तर, दाताला दात आणि जिवाला जीव घेऊन देऊन केला पाहिजे, हा नवा विचार त्यावेळी सर्व बांडगुळ्यांना धरणी कंपापेक्षा भयंकर वाटला.

हा वेळ पर्यंत गोरा आदमी मग तो दीड दमडीचा बुटलेर असो वा कोणी असो हिन्दी लोकाना बापाचा बाप आणि देवाचा देव वाटत असे. त्याने एकाद्याच्या तोंडात मारली तरी स्मितहास्य करून चटकन दुसरे गाल फड पुढे करणाऱ्या येशू किस्तानी सारा हिन्दुस्थान गजबजलेला असे. खाना तयार करण्यासाठीं कलेकटराच्या आधी दौऱ्याच्या मुक्कामावर येऊन पोहचणाऱ्या गोऱ्या बुटलेरालाच कलेक्टर समजून हारतुरे मानपत्र अर्पण करणाऱ्या रावसाहेब रावबहादुरादि बांडगुळ्या घेण्डांची पुष्कळ उदाहरणे महाराष्ट्राच्या परिचयाची आहेत. चाफेकरांनी ही गोऱ्या कातडीची माया फोल ठरनिण्याचा पहिला प्रयत्न केला. चाफेकर प्रकरणाने राजकीच वातावरण क्रांतीची पहिली ठिणगी पडली. परकीय सत्तेची शरम सर्वत्र उत्पन्न झाली. सरकारतर्फे कायदे बाजीच्या गिरणीत ‘राजद्रोह’ चोज घासून पुसून तयार झाली आणि कज्जे दलांच्या वखारीत घाऊक किरकोळ खपू लागली. शांतीच्या संतोषाचे युग संपून क्रांतीच्या असंतोषाची वावटळे सर्वत्र वाढू लागली. मध्यम वर्गाला आपल्या उत्पत्ति - स्थिति याची आत्म संवेदना विशेष तीव्रतेने दंश करू लागली. बंगालच्या फाळणीने तर क्रांतीचा कल्पनातीत स्फोट करून, हिन्दुस्थान म्हणजे शांतीचा मुर्दा नसून क्रांतीचा मर्द आहे, ही जाणीव परकीय राज्यकर्त्याना प्रथमड विशेष जोराने करून दिली. बुध्दिमान मध्यम वर्गाच्या बांडगुळ्या प्रवृत्तीला या क्रान्ती चक्राने इतके जोराचे धडके दिले की तिच्या कवचाचे खडपे उडून, मध्यम वर्गातील शेकडो नवमतवादी तरुण देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचे बलिदान करायला मी मी म्हणून पुढे आले आणि त्यानी १९०७ - ०८ सालच्या क्रांतीच्या भडकलेल्या डज्ञात आपल्या प्राणांचे बळी हासत खेळत दिले. बांडगुळ्या मध्यम वर्गाच्या पोटीच ही नव्या क्रांतीकारक स्वर्ग त्याग्यांची उत्पत्ति झालेली आहे.

• आपला देश :

डॉ. रविद्रनाथ टागोर ‘सत्याची हाक’ निबंधात या घटनेची अशी चिकित्सा करतात - “बंगालच्या फाळणीच्या होगामाच विकार वशतेच्या उन्मादात राज्य क्रांतीच्या जोरावर युगांतर घडवून आणण्याचा प्रयत्न काही तरुणानी करून पाहिला. त्यानी पेटविलेल्या अग्नीत पहिल्या. प्रथम आपल्या स्वत:चाच बळी देण्यात केलेल्या आत्म यज्ञाला, आपल्याच देशाने नव्हे तर इतर देशानी सुध्दा, शिरस्राण काढून मुजराच केला पाहिजे. जड सृष्टीत आलेले त्यांचे अपयश त्यांच्या स्वार्थ त्यागात अंतर्भूत असलेल्या आध्यात्मिक वैभवाच्या दीप्तीनें प्रकाशमानच झाले. या नितान्त कष्टमय प्रयोगाचा पूर्ण अनुभव घेऊन, सरतेशेवटी त्यांच्या प्रचितीस आले कीं रक्तपातमय राज्य क्रांतीचा मार्ग हा काही खरा मार्ग नव्हे. जेथे मुळातच काही राजकारण नाही, तेथे राज्य क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न, म्हणजे गावाचा ठावठिकाणा नसतानाच प्रवासाला निघण्यासारखे आहे; आणि चुकीचा मार्ग सुगम व अगदी जवळचा असा जरी भासत असला, तरी त्या मार्गाने गेल्.स आपण आपल्. उद्दिष्ट स्थली तर पोहचणार नाहीच, पण उगाच पायाना मात्र शीण दिल्या सारखे होईल. ’आपला देश’ म्हणून जो काही निर्माण करावयाचा असतो, तो अखिल जनतेकडून निर्माण व्हवयाचा असतो; एका दुसऱ्या विशिष्ट पक्षातून नव्हे. ‘आपला देश’ जनतेच्या अंत:करणातून व संकल्प शक्तीतून उत्पन्न होणाऱ्या ओज स्तेजाच्या प्रकटीकरणाने निर्माण होत असते. त्यासाठी जनतेच्या सर्व शक्ती बिनतोड एकवटल्या पाहिजेत.”

ब्रिटीश राजसत्ता या देशात दृढमूल झाली आहे, ही गोष्ट गृहीत धरून, देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न राजकारणानेच सुटेल, अशा दिशेने काम करणारांची संख्या येथे बरीच मोठी आहे. या मंडळींचा स्वदेशाभिमान त्यांच्या मताइतकाच जाज्वल्य होता व सध्या आहेहि. राजकीय स्वातंत्र्याच्या युध्दात—मग ते युध्द खरेखुरे लष्करी असो, कॉन्स्टिट्यूशनल कायदेबाजीचे असो, किंवा भीक मागणीचे असो. इंग्रेज नामोहरम झाला, अथवा प्रसन्न झाला, कीं सामाजिक धार्मिक आर्थिक विषमतेचे प्रश्न एका दिवसात चुटकीसरसे सुटतील; त्यासाठी वेगळी धडपड खटपट मुळीच करायला नको, या समजुतीने कै. टिळक प्रभृति राजकारणपटूनी हव्या तितक्या तंगड्या झाडल्या. पण त्यामुळे राजकारणाची ब्रम्हगाठ सुटण्याऐवजी ती आधिकाधिक घट्ट मात्र बसत गेली.

• कायद्याचे प्रस्थापित केलेले राज्य :

सामाजिक सुधारणावाद्यांनी आपल्या दिशेने प्रयत्न पुष्कळ केला. पण त्याना जनतेचे अज्ञान आणि टिळक प्रभृति राजकारणवाद्यांचा विरोध या दोन अवस्थेशी टकरा खात स्वस्थ बसावे लागले. शक्ति युक्तिचा सर्व जोर राजकारणा वरच दिल्यामुळे, सामाजिक विषमतेचा विष वृक्ष फोफावत गेला. धर्म मार्तंडानी धर्म आणि संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी छातिफोड मेहनत केली, तरी हि इंग्रजांचे बूड काही हालेना. काय केले असता हिंदुस्थान स्वतंत्र स्वयं निर्णयी होईल ? प्रश्न गेली ५० वर्षे सुटता सुटत नाहीं. यात प्रश्न सोडविणारांची नालायकी जबाबदार नसून, या प्रश्नाचा अपूर्णपणाच विशेष महत्वाचा आहे. हिंन्दुस्थाना पुढे पडलेला ‘जगावे का मरावे’ चा प्रश्न यापूर्वी कोणत्याही राष्ट्रा पुढे पडलेला नव्हता, इतका तो चमत्कारीक कोड्याचा आहे. हिंन्दुस्थानातील परकी ब्रिटीश सत्ता ही राजकारणी आहे, का समाजकारणी आहे? धार्मिक आहे का आर्थिक आहे? तिचे वास्तविक स्वरुप काय आहे, याचा आज पर्यंत नीटसा निर्णय न लागल्यामुळे, नानाविध प्रयत्नांचे पर्वत. टिंगणावर कळसा आणि गावाला वळसा, असे फुकट जात आहेत.

डॉ. रविंद्रनाथ टांगोर (सत्याची हाक) निबंधात म्हणतात - "हिन्दुस्थानातील परकीय राज्य सत्ता ही केवळ रंग बदलणाऱ्या सरड्या प्रमाणे आहे. आज ती इंग्रेजाच्या वेषात आली आहे, उद्या दुसऱ्या एकाद्या परस्थाच्या वेषात येईल, तर परवा, अगदी तेवढ्याच तीव्रपणाने, ती कदाचित आपल्याच देश बांधवांच्या रूपाने प्रगट होईल! प्राणघातक शस्त्रास्ज्ञांच्या योगाने या परसत्ता पिशाचाचा पिच्छा पुरवून त्याचा नायनाट करण्याचा आपण केवढाहि दांडगा प्रयत्न केला तरी तो निष्फळ होईल. कारण, वरचेवर रंग रालटण्यात तिचा हात खेडा असल्यामुळे, तिला आपल्या हातावर तुरी दोऊन निसटून जाणे केव्हा हि अवघड नाही.”

“कायद्याचे प्रस्थापित केलेले राज्य!” ही दणदणीत शब्दांची धमकी वजा टिमकी अलीकडे रात्रं दिवस आमच्या कानांशी ठणाणत असते. किती क्रॉंग्रेस वाल्यांनी या सूत्राचे सूत कातले? किती कायदे बाजांनी या ‘कायद्याचे' पृथ:करण केले? किती इरसाल कम्युनिष्टानी या शब्दांची पारख केली? इंग्रेजांनी हिंदुस्थान जिंकले. ते तलवारीच्या जोरावर असो, बुध्दिमत्तेच्या चतुराईवर असो, नाही तर कारस्थानांच्या पुण्याई वर असो. पण ते त्यानी जिंकले. परदेश जिंकताना धोरणी जेत्याना ज्या युक्त्या जुक्त्या लढवाव्या लागतात, त्या सर्व त्यानी लढविल्या. पडले ते स्वार्थत्याग केले. आत्मयज्ञ हि केले. इंग्रेजांचे हिंन्दुस्थानातील साम्राज्य म्हणजे तेराव्याचे मंत्र म्हणून ऐदी भटाने हबकलेली दक्षिणा नव्हे! दिल्लीच्या साम्राज्य दण्डासाठी हजारो इंग्रजानी या देशात आपल्या प्राणांचे आणि उमलत्या आयुष्याचे बळी दिले आहेत. खुद्द इंग्लंडात इंग्रेज लोकानी स्वराज्य नियंत्रणाची जी एक विशिष्ट यंत्र रचना उत्क्रान्त केली आहे, ती अल्लाउद्दीनाच्या जादूच्या दिव्याचा चमत्कार नव्हे. तीसुध्दा त्याना स्वदेशातल्या स्वदेशात अनंत हालअपेष्टा भोगून, अनेक राज्य क्रांतीच्या ज्वालामुखीशी तोंड देऊन, आस्ते आस्ते घडवून आणावी लागलेली आहे. ब्रिटिशांचे ‘व्यापारी’ राजकारण त्यांच्या अनेक शतकांच्या स्वार्थ त्यागी परिश्रमांचा मधुर आणि परिपक्व परिपाक आहे. आत्म सामर्थ्याच्या शिस्तवार आणि कदरबाज तपश्चर्येची फलश्रुति आहे. राष्ट्र धर्माच्या विवेक शुध्द कल्पना क्रांतीचा तो परिणाम आहे. गेल्. महायुध्दात जर्मनीसारख्या लष्करबाज रावणी सेस्कृतीच्या बलाड्य राष्ट्राला ‘डोकोबाज’ इंग्लंडने जे केवळ युक्तिच्या चुटकीने जमीनदोस्त केले, त्याचे मर्म त्याच्या राष्ट्र धर्माच्या शिस्तीतच आढळून येते. हे जे मर्म, त्यालाच इंग्रेज ‘कायदा’ असे नाव देतो. ‘कायद्याने प्रस्थापित केलेले राज्य’ म्हणजे इंग्लंडच्या उत्कान्त राष्ट्रध्रमाने हिन्दुस्थानाच्या अपक्रान्त आणि क्रिया निषठ राष्ट्र धर्माला जगाच्या कल्याणासाठी चडविलेली काटेरी तोंड बेडीच होय. हिंन्दुस्थान ही धर्मभूमि आहे, असा हिन्दी अर्थ विशेषत: हिन्दु लोकांनी केवढा हि मोठा शंख ध्वनि केला, तरी ‘राष्ट्र धर्माच्या' बाबतीत हिन्दुस्थाना सारखा पागल आणि बेइमान देश जगाच्या पाठीवर दुसरा नाही.

• विचार - उच्चार क्रांतीची लाट :

हिन्दुस्थानाला राष्ट्र धर्माची शिस्त शिकविण्यासाठी इंग्लंडच्या साम्राज्यदण्डाची कदर निसर्गाला राज्य क्रांतीच्या रुपाने येथे प्रस्थापित करणेच क्रम प्राप्त झाले. या शिस्तीत हिन्दुस्थान तरबेज होऊन, गुरुच्या तेगड्या गळ्यात अडकवे पर्यंत इंग्रेज आणि हिन्दुस्थान हा संबंध तुटणे शक्य नाही. इंग्रेजी विद्देची महाद्वारे सताड मोकळी करून, अल्पसंख्य शिक्षितांच्या विचारात क्रान्ति घडविण्याचे श्रेय ब्रिटीश राजवटीलाच देणे प्राप्त आहे. विचारक्रान्तीची मजल आज उच्चार क्रांती पर्यंत आली आहे. आचार क्रांतीला अजून बराच अवकाश आहे. कारण ब्रिटीश राज्य येथे शंभरावर वर्षे नांदून ही ३० कोट प्रजेत केवळ साक्षरतेचे प्रमाण शेकडा ५ च्यावर गेलेले नसल्यामुळे, विचार - उच्चार क्रांतीची लाट अझून बहुजन समाजाला नुसती एकदा हि चाटून गेलेली नाही. म्हणजे सबंध हिन्दुस्थान अज्ञानाच्या अंधारात धडपडत असून, देशभर चाललेल्या स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या चळवळी मूठभर शहाणे शहरी झब्बूच चालवीत आहेत, असाच निष्कर्ष काढणे प्राप्त आहे. पाश्चिमात्य विविध ज्ञान प्राप्तीमुळे या शहरी षहाण्यांची बरीच विचार क्रांती होऊन, आपल्या मायदेशाच्या गुलामगिरीची त्याना भयंकर चीड येत चालली आहे. राजकारणी सत्तेच्या जोरावर व्यापारी खोऱ्याने हिन्दुस्थानाला सर्व बाजूनी दिगंबर बनविणाऱ्या ब्रिटीश नोकरशाहीचा त्याना मनस्वी खंत येऊन, तिचा नाहीतर आपला अंत झाला तरी परवडला, रण चालू गुलामगिरीचा यापुढे एक दिवस मुलाजा राखावयाचा नाही, इतका तीव्र असंतोष आज गेली कित्येक वर्षे शहरी वातावरणात धुमसत आहे. या असंतोषाचा वणवा दिवसें  दिवस किती हि वाढत्या प्रमाणावर असला आणि त्याच्या वणव्यात भावना वश तरुणांच्या किती ही आहुती पडत असल्या, तरी त्या वणव्याची आच नाक्षरतेमुळे विचार क्रांतीला मुकलेल्या कोट्यावधी खेडवळ जनतेला आजपर्यंत कधीच लागली नाही. ती लागावी असा प्रयत्नच आज वर कोणी केला नाही. अर्थात् स्वारज्य आणि स्वातंत्र्याच्या चालू बोलघेवड्या चळवळी म्हणजे पृष्ठभागा वरच्या लहरी आहेत.

खालच्या सर्व जल समूह शांत आणि थंड आहे. मग आत्म सामर्थ्यांची तरी ओळख कुठली आणि शहरी चळवळ्यांच्या ढोळस धडपडींना पाठिंबा देण्याची प्रेरणा कसली? अखिल हिंदुस्थानातील लोक संथ्येच्या मानाने ‘दर्यामे खसखस’ असणाऱ्यां शहरांतील बोलक्या डोकोबाजानी क्रान्ति घडविण्याची चासविलेली धडपड, झब्वु शाही वृत्तपत्रांत कितीही समर्थ दिसली, तरी तिला जनतेची एकमुखी किंवा निदान मुकी सम्मति मुळीच नसल्यामुळे, सर्व चळवळीं ठावठिकाणा नसलेल्या बंदराकडे जाऊ पाहाणाऱ्या गलबता प्रमाणे होऊन बसल्या आहेत. गेल्या युरपियन महायुध्दाने हिन्दुस्थानावर जेवढे चिरकाल टिकणारे उपकार केले, तेवढे इंग्रेजांच्या शेभर वरच्या शान्ति प्रधान राज्याने हि केले नाहीत. विशेषत: बांडगुळ्या बुध्दिवंतांच्या अकलेवर शोधनप्रकाशाचा जोरदार झोत पाहून. त्यांच्या परोपजीवि प्रवृत्तीचा जाड्यपणा सणसणीत ठेचला.

• बुध्दीच्या नाजूक धाग्यावरच पोट :

शहरी जीवयातील विश्व मानून राहणाऱ्या या शिंपल्यातल्या कीटकांची शहरी भपक्यांची धुंदी उतरली. महायुध्द सुरू होताच, परदेशी सर्व व्यापार एकदम बेद पडला, आणि लक्षावधि बांडगुळे बेरोजगारी बनले. पोटालाच चिमटा बसल्यावर त्याना सर्व ब्रम्हांड आठवले. इंग्रेजांची राज्य सत्ता म्हणजे मासिक प्राप्तीची हुकमी कामधेनू, हा त्यांचा वेडगळ ग्रह दूर झाला. अकलेला तणावे देऊन दोन प्रहर साजरे करण्याचे सर्व यत्न फोल होऊ लागले. युनिव्हर्सिट्यांच्या पदव्या विकून बाजारात चहाचा एक कपसुध्दामिळेनासा झाला. बुध्दीच्या नाजूक धाग्यावरच पोट लोंबकळत ठेवण्याच्या वंशानुवंशाच्या, सवयीमुळे, अंग मेहनतीला हाता - पायात शक्तीचा अभाव. मजुरी करावी किंवा भीक मागावी, तर आज वरच्या प्रतिष्ठेची इस्तरी बिघडते. पेज पिऊन मिशीला शीत लावण्याची हि नाटके नटविली; पण, पुढे पेजहि मिळेनाशी झाली. मजुरीला मोल आले; पण कारकुनांचे हाल झाले. शिवाय, खेड्या - पाड्यांतून आणि इतर गावांतून लक्षावधि बांडगुळे एकाच भाकरीच्या तुकड्यांवर लांडग्याप्रमाणे तुटून पडायला मुंबईमध्ये भराभर जमा झाले. पोटाच्या पापाची आग मध्यम वर्गापर्यंत जाऊन भिडली. उपासमारीच्या वेदना जरी एकजिनशी असल्या, तरी पोटाच्या पापाचे प्रकार अनेक असतात. आन्न मिळवायला मजुरी हि महाग झाली, तरी अनाडी शेतकरी झाडपाला खाऊन झोपडीतल्या झोपडीत पडेल; पण बुध्दिवान माणूस पोटासाठी हवे ते उत्पात करील. पोटासाठी गोर गरीबानी केलेल्या चोऱ्या तेव्हाच उघडकीस येतात; पण पांढर पेश्या शहाण्यांच्या ‘पोटाच्या बण्डाचे अत्याचार’ त्यांच्या बुध्दिमत्तेच्या झकाकी खाली सफाईत दडले जातात.

त्यातल्या त्यात मध्यम वर्ग बांडगुळ्या जात्याच परोपजीवि प्रवृत्तीचा दास असल्यामुळे, स्वत:चा जीव वाचविण्याठी तो कोणाचा जीव घेईल, किंवा कोणाच्या मानेला कसा विळखा घालील याचा नियम नाही. जेथे रसं तेथे बांडगुळ! आज श्रीमंत भांडवल्यांच्या पदरी, तर उद्या मजुरांच्या उदरी. सकाळी राजनिष्ठ तर संध्याकाळी लोक निष्ठ. काल सरकारच्या सी. ए. डी. चा सरदार तर आज स्वराज्याच्या चळवळीचा सुभेदार. दिवसभर लोकांच्या कायदे बाजीच्या व्यसनावर मन मुराद चरणारा वकील, तर फावल्या वेळी देश भक्तीचे नाटक नटविणारा सूत्रधार. सरकार मवालले की लोक शाहीचे डोले नाचविणारा हाच, आणि सरकार जहालले की नोकर शाहीचे बूट पालीश करणारा हाच.सरकारने राज द्रोहाचे हत्यार पाजळले की बांडगुळ्यांच्या राज निष्ठेच्या सनया तिताऱ्या जोरजोरानें वाजू लागल्याच. मग मुलीचे लग्न असं, बापाचे श्राध्द असो, सुनेचे गर्भदान असो, की मयत बायकोची अविधवा नवमी असो, त्यात सुध्दा राज निष्ठा व्यक्त करण्याचा एकादा बांडगुळ्या विधी साजरा करायला तो विसरायचा नाही. पगडी - पालटाच्या घाल मेलीत पांढर पेश्या बांडगुळ्यांच्या हातून कित्येक वेळी इतकी पोरकट आणि हलकट कृत्ये घडतात, की त्यांचा नुसता विचार सुध्दा शरमेला शरम आणतो. सबंध वर्षभर संपाच्या धाम धुमीमुळे लक्षावधि कामगार उपाशी मरत आहेत, पोलीसांच्या संगिनी सोटे व गोळीबाराला बळी पडत आहेत, व्यापाराचा सर्वत्र बोर्या उडालेला, सारे लोक हवालदिल. आशीहि भयंकर अवस्थेत अमूक तारखेच्या आत ४० हजार रुपये जमवून वॅकबेवर कै. टिळकांचा पुतळा उभारलाच पाहिजे, अशा अटीतटीच्या चळवळी करणाऱ्या बांडगुळ्यांची काळिजे फत्तराचीच नव्हत, तर कशाची? लोक उपाशी मरोत! त्यांचे सुतक या फत्तराना नाही. टिळकाचा धोंडा थापला म्हणजे सर्व काही झाले.

• देशाभिमानाची शिंगे शेपटे चिकटवून :

स्वराज्याच्या सबबीवर जमविलेले कोट कोट रुपयांचे फंड याच बांडगुळ्या मधील विशेष डोके बाजांच्या पोटाच्या पापाने फस्त केले. सारांश, पोटासाठी हवे तें उलट सुलट उत्पात करणाऱ्या मध्यम वर्गा कडून देशोध्दाराची अपेक्षा करणे, म्हणजे वेश्ये कडून पती व्रत्याची आशा करण्या इतकेच धाडसाचे आहे. विचार - क्रांतीने बांडगुळ्या किती हि देशभक्ताशला, तरी त्याचा पिण्डच गोऱ्या सरकारच्या आणि व्यापाऱ्यांच्या गोऱ्या मेहरबानी असल्यामुळे, त्याला गोऱ्या कातडीचा मोह मुळीच आवरत नाही. देव्हाऱ्यात एकादा गोरा देव आणून बसविल्या शिवाय त्याच्या देश भक्तिचा मिहमा मनाजोगता थरारत नाही. मग तो देव, विलायतेत भाकरीला मोताद झालेला समाज बहिष्कृत पोळ असो, नाही तर बटाटेविक्या पाटीवाला असो, त्याची प्रवा नाही. तो गोरा असला म्हणजे झाले. दगडाचाहि देव बनवून त्याला नवसाला फळावयास लावणाऱ्या हिन्दु बांडगुळ्यांनी हव्या त्या गोऱ्या उपटशुंभाला हिन्दी देशाभिमानाची शिंगे शेपटे चिकटवून, शृंग ऋषीप्रमाणे, त्याला शृंग मानव म्हणून बाप देवाच्या जागी कां पुजू नये ? देश हिताच्या प्रत्येक चळवळीचा क्रमधारपणा एखाद्या विलायती गोऱ्या कर्णाच्या कानात अडकवून, त्याच्या हुकमतीखाली रास लीलेचा नाच नाचणाऱ्याने हिन्दी बांडगुळ्यांचे ‘राष्ट्रीय’ व्यसन जगजाहीर झालेले आहे. त्यामुळे, विलायतेत कवडीमोल असलेले शेकडो गोरे उनाजटप्पू येथे येऊन, हिन्दुस्थानाचे कैवारी म्हणून देवकळा पावले. परंतु, या गोऱ्या कैवाऱ्यांच्या दिन्दुस्थानच्या यात्रांचे मर्म त्यांच्या पोटाच्या नँडातच असते, हे मात्र एका हि बांडगुळ्या मुत्सद्याच्या अझून लक्ष्यात येत नाही!

हिन्दुस्थानातील इंग्रेजी सत्ता धाडशी गोऱ्या भटक्यानी आणि उनाडटप्पूनी स्थापन केली. कोणी व्यापारी, कोणी डॉक्टर, कोणी मिशनरी. कोणी निवळ मजूर, तर कोण महीतरी असे लोक येथे आले. त्यानी नाना वेषांतरे केली, नाना मतांतरे केली, पण अखेर सर्वानी मिळून हिन्दुस्थान काबीज केले. इंग्रेज माणूस आपल्या देशासाठी वाटेल ते धाडस करतो, वाटेल तेथे जातो, नोकरी धरतो, ‘टाळा - चावी’ करतो, परभाषा शिकतो, परक्यांत मिसळतो, त्यांचा जानीदोस्त बनतो, त्यांचा धर्म स्वीकारतो, त्यांच्यासारखा पेहराव करतो, त्यांच्यासाठी हसतो, रडतो, मरे मरे तो काम करतो, हाल अपेष्टाहि भोगतो. पण वेळ आली की अखेर मात्र इंग्रेज तो इंग्रेज आणि हिन्दी तो हिन्दी जातिवंत इंग्रेज आपल्या ब्रिटीश साम्राज्याशी कधीच बेइमान होणार नाही. एकादा गोरा माणूस हिन्दी लोकांशी जरा मिळून मिसळून राहू लागला की त्यांना मोठा गुळ पापडीचा आनंद होतो. त्यातल्या त्यात त्याने जर मुसलमानी किंवा हिन्दु धर्माची दीक्षा घेतली, तो एकादा मौलवी, अभयानंद किंवा मसणानंद बनला, त्याने भगवी कफनी अगर खादी अंगावर चढविली, तो जरा हिन्दुस्थानाच्या वतीने लिहू बोलू लागला, इंग्रेज सरकार वर टीका टिपणी करू लागला, की बावळट हिन्दी लोकांना विशेषत: हिन्दु लोकाना, त्यातच्या त्यात बांडगुळ्या भटाना आणि भट्यांना तो अगदी आपला बाप किंवा 'देवांचा देव महादेव' वाटू लागतो. मग महादेवा पुढचे हे भक्तगण त्या गोऱ्या अवताराचे जे काही थेर माजवितात, त्याचे वर्णन शेषाच्या हि बापाला साधायचे नाही. स्राज्य चालविण्याचच्या पात्रते बद्दल स्वत:च्या बुध्दीच्या टिमक्या पिटणारांची इंग्रेजी वृत्तपत्रे चालवायला विलायती बांडगुळ्यांची पार्सले अजून हि मागवावी लागतात, हा मध्यम वर्ग देश भक्तांचा गलधटपणा विचार करण्यासारखा नव्हे काय?

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ५ -
जनार्दनाचा नववा अवतार

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• भट हा प्राणी :

That trade’s proud empire hastes to swift decay, As ocean sweeps the labored mole away; While self dependent power can time defy, As rocks resist the billows and the sky. (Deserted Village.) तळमळणाऱ्या अंत:करणात उत्पन्न झालेला विचार कधी मरत नाहीं. विरोधकांच्या डावपेचानी त्याच्या उच्चाराची गळचेपी झाली. किंवा आचारात उमटताना त्याला घायाळ जखमी केले, तरी हि तो मरत नाही. कारण तो अमर असतो. नॅशनल कॉंग्रेस, सामाजिक सुधारणांच्या परिषदा, औद्योगिक प्रदर्शने वगैरे शहरी बांडगुळ्यांच्या शहरी धडपडी नाटकी, बिन काळजाच्या आणि केवळ हंगामी विरंगुळ्याच्या आहेत. त्यात मुठभऱ शहरी शहाण्यां शिवाय बहुजन समाजाचा (Masses) मुळीच काही संबंध येत नाही. त्याला कोणी विचारीत नाही. त्याच्या हिता हिताची कोणाला जाणीव नाही, कल्पना नाही. म्हणून सत्यशोधक समाज स्थापन करून कै. ज्योतीराव फुले यानी मागासलेल्या वर्गातील काही थोड्या अनुयायांसह मोठी चळवळ सुरू केली. आजचे भटी बांडगुळ्ये ज्या ज्या निरनिराळ्या चळवळी “स्वकल्पित नव्य कल्पनेच्या' आत्म प्रौढीने चालवीत आहेत, त्या सर्व कल्पनांचा बाप ज्योतीराव फुलेच होय. परंतु मागासलेल्या भटेतर जनतेच्या रक्तावरच जगणाऱ्या एकजात भट - भटेतर बांडगुळ्यानी ज्योतीरावचा कोंडमारा करून त्याची चळवळ घायाळ केली. गोरगरीब रयतेच्या प्रत्यक्ष हिताची चळवळ हाती घेणाऱ्या प्रत्येक भटेतर नव मतवाद्याचा पाण उतारा करून त्याची चळवळ ठार मारण्यासाठी भट हा प्राणी ब्रह्म देवाच्या खास अकलेतून निर्माण झालेला आहे. भट वर्ग बुध्दीने अचकट पण संख्येने कुझकट असला, तरी त्याच्या कळकट पायतणाला खिळ्या प्रमाणे, किंवा त्याच्या पिळवट नाकाला शेवंडा प्रमाणे चिकटणाऱ्या भटेतर बांडगुळ्या जाती बऱ्याच असल्यामुळे, भट वर्गाला हवे ते उत्पात स्वत: नाम निराळे राहून सफाईत घडवून आणता येतात.

राज्यकर्त्या गोऱ्या नोकर शाहीकडे पहावे तो त्याना गोर गरीब मेले काय किंवा बांडगुळे जगले काय, याची विचारपूस करायला फुरसदच नाही. त्यांची तिजोरी भरली, इंग्रेजी व्यापाऱ्यांच्या थैल्या फुगून त्यांच्या तागड्याच्या तंगड्या बिन अटकाव सर्वत्र पसरल्या, म्हणजे इतर कशाचें हि सुहेर सुतक बाळगण्याचे कारण त्याना नाही. राजकारणी धोरणाची झाप व्यवस्थित पाडण्यासाठी जो ज्या वेळी त्यांच्या कामी येईल तो त्यांचा मामा. अशा परिस्थितीत शहरो शहरी वृत्तपत्रें, सभा, परिषदा इत्यादी शहरी बांडगुळ्यांचा लेखाळ आणि तोंडाळ धुमाकूळ बेसुमार चालला असता हि, खेड्यांतला शेतकरी अन्नाला मोताद होऊन देशोधडीला जन्मठेप चालला आहे आणि शेतकरी मेला तर राष्ट्रहि मरणारच, म्हणून त्याला वाचविला पाहिजे, या कै. ज्योतीराव फुल्यांच्या घायाल कल्पनेला उचलून धरणारे कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपति बहुजन समाजाच्या आत्मोध्दाराच्या चळवळीच्या अग्रभागी स्वयं प्रेरणेनें येऊन उभे राहिले. राष्ट्राच्या स्वयं निर्णयाची गुरूकिल्ली शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळात आहे आणि हव्या त्या भपकेबाज साम्राज्य-सत्तेच्या मृत्यू शेतकऱ्याच्या हालात आहे, हा सनातन सिध्दांत बिनचूक ओळखणारा महाराष्ट्राचा पहिला आणि शेवटला छत्रपति फक्त करवीरकर शाहूत होय. शिवाजीनें मराठी स्वराज्य स्थापन केले म्हणून आम्ही त्याचा मोठा गौरव करतो. पण तोही भटी गो मुत्राच्या गाडग्यांत अडकून भटी ब्रम्ह गांठीच्या आ खेबाज फामात डोळे उघडे ठेवून फाशी गेला. शिवाजीचा मृत्यू तोच मऱ्हाठी साम्राज्याचा मृत्यू! पुढचे सगळे छत्रपति म्हणजे आयत्या बिळांतले नागोबा आणि पेशवे म्हणजे छत्रपतींच्या तेराव्यांवर जगणारी भटी भुते! शिवाजीने जे केले नाहीं,ते करवीरकर शाहूने केले करवीरकर शाहूने केले, ते जर शिवाजी करता, तर महाराष्ट्राचा नकाशा तांबड्या रंगांत कधीच रंगता ना. शाहू छत्रपतीनी आपल्या कुळ धर्माला व कर्तव्य निष्ठेला स्मरून ‘ब्राम्हणेतर’ चळवळीच्या पुनरुज्जीवनाचा इतक्या जोराने उठाव केला कीं गौतम बुध्दाच्या धर्माला हद्दपार करणारी भिक्षुक शाही अवघ्या सहा महिन्यांत गलित त्राण होऊन ‘त्राहि माम्’ चा शंखध्वनि कोकलू लागली.

• भटशाहीचा मुर्दाडपणा :

कोणत्याही कामगिरीचे महत्व आणि परिणाम भटी शिव्या श्रापांवरून डोळे झाकून ठरवावे. शिव्या शाप जितक्या जोराचे असतील, तितकी जोरकस ती कामगिरी वठली असा खुशाल अंदाज वांघावा. शाहूच्या ब्राम्हणेतरी चळवळीचा व्याप, सह्याद्रीच्या वणव्या प्रमाणे खेडोपाडी इतका पसरली की जो भट देवाच्या खालोखाल अनाडी जनतकडून पूजला जात, असे, त्याला ठिक ठिकाणी पैजारांचा आहेर होऊ लागाल. धार्मिक क्षेत्रांतच भटाची आळवाची भाजी पाण्यापेक्षा पातळ होऊ लागल्यावर, समाज आणि राजकारणाच्या क्षेत्रात हि च्याला नासक्या सुपारीप्रमाणे उचकून फेकून देण्याची सुरुवात झाली. भट—बहिष्काराची ही चळवळ, बांडगुळ्यांच्या सर्व चळवळी प्रमाणे जर शहरी चळवळ असती, तर भटशाहीचा मुर्दाडपणा किंचित् सुध्दा डगमगला नसता. पण ब्राम्हणेतर चळवळ खास खेड्यातल्या शेतकऱ्यांपासून फैलावल्यामुळे, प्रत्येक बांण्डगुळ्या भटाच्या पोटावर मणमण बिव्याचे पलीस्तर बिनचूक थापले गेले. खेडवळांमध्ये शिक्षणाचा प्रसार मुळीच नसल्यामुळे, कोणतीहि चळवळ त्यांच्यात फैलावण्याचे काम हा वेळपावेतो एकाहि बांडगुळ्या बृहस्पतीला साधले नाही. पण शाहूने सत्यशोधकी जलशांचा उपक्रम करून, शेतकऱ्याना आवडणाऱ्या थाटात भाषेत आणि रंगा ढंगांत, ब्राम्हणेतर चळवळीचे लोण अगदी थोड्या अवधीत सर्व मुंबई इलाखाभर एकूण एक खेड्याच्या कोना कोपऱ्यात नेऊन भिडविले. ब्राम्हणेतर चळवळीने सर्व शेतकरी खडबडून जागा झाला. त्याला भटांची आणि बांडगुळ्यांची कारस्थाने उमगू लागली, शत्रु मित्रांच्या पारखीची दृष्टी त्याला आली आणि सरकारी राज्य मंत्र्यांच्या रचनेचा हि परिचय करून घेण्याची त्याची जिज्ञासा फुरफुरू लागली. यापूर्वी केसरी इंदुप्रकाश ज्ञानप्रकाश यांसारखी भटी पत्रे ‘सार्वजनिक’ मताचे प्रतिनिधी म्हणून निर्लज्जपणें मिरवत असत. (आज हि हा निर्लज्जपणा गेला आहे असे नव्हे!) परंतु, अनेक साक्षर मराठ्यानी बऱ्याच ब्राम्हणेतरी वृत्तपत्रांचा पाया शुध्द उपक्रम करून, भटी पत्रांच्या टोल्याला टोला आणि जोड्याला जोडा हाणण्याचा जोरकस आणि यशवंत प्रयत्न केला. ब्राम्हणेतर चळवळीने खेड्यातल्या दक्षणांपान्तु भटाचे उच्चाटण तर केलेच केले, पण शहरी बांडगुळ्यांच्या कांग्रेसी धडपडीना हि चांगलाच पायबंद लावला.

शेतकऱ्यांचे यजमान आणि दरोबस्त खोड्या - पाड्यांचे राजे आम्ही, आम्ही म्हणू ती पूर्व दिशा, लागेल तो फंड हवा तेव्हा आणू, शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी वकील ते आम्हीच, इत्यादि गर्वोत्कींचा भार वाहणारे सर्व भारवाहक भटलोक आता दीनवाणीने रडू लागले आहेत की, शहरांत आमच्या प्रतिष्ठेची पाचवी कशी बशी पुजली जाते, पण पूर्वी ज्या खेड्यात आम्ही वाटेल त्या वेळी. वाटेल त्या सबबी खाली, वाटेल त्याच्या खऱ्या - खोट्या वारशाच्या घुगऱ्या खाल्ल्या, त्याच खेड्यात आम्ही पाऊल ठेवताच आमच्या हातूनच आमचे तेरावे घालण्याचे प्रसंग आज नित्य येत आहेत. प्रत्यक्ष काळ सुध्दा ज्या बांडगुळ्या भटांचा मुर्दाडपणा चेचताना चकला, तोच मुर्दाडपणा ब्राम्हणेतर चळवळीने शेतकरी जागा होताच, ठिकच्या ठिकाणी गारठून पडला. खेडवळ शेचकरी जनतेचे प्रबोधन ही केवढी विलक्षण शक्ती आहे, याचा प्रयोग शाहू महाराजानी प्रत्यक्ष करून, शहरी बांडगुळ्यांच्या सर्व चळवळींचा फोलकटपणा स्पष्ट सिध्द करून, देखविला. याची त्याना बक्षिसी काय? तर त्यानी भटी बांडगुळ्या देश भक्षकानी “स्वराज्य द्रोही छत्रपति “ अशी कचकचित शिवी हासडली. ब्राम्हणेतर चळवळ नव्या वळणाने आणि धोरणाने प्रयोगाच्या प्रथमावस्थेत असतानाच, एकाकी शाहू छत्रपतीचा अमत झाला! बहुजनसमाज किंचित जागृत होऊन आपल्या आत्मशक्तीचा अंदाज घेतो न घेतो, तोंच त्याच्या भवितव्या वरचा सर्च लाईट विझाला! गोरगरीब जनतेने दु:खाने तोंडात माती घातली, पण बांडगुळ्या भटानी शहरो शहरी पेढ्यांच्या पराती पोटात पुरल्या शाहू छत्रपति हयात असेपर्यंत, त्यांच्या पैशाला भाळून शेकडो मराठे ब्राह्मणेतर चळवळीच्या धुरेला मान देण्यासाठी मी मी म्हणून पुढे सरसावले.

छत्रपतींचा अंत होताच, चळवळीचा मार्गदर्शक तर गेलाच, पण त्याबरोबर पैशाचा पुरवठा बंद पडून कोल्हापूर संस्थानाचे हि दरवाजे बंद झाले. गूळ गेला कीं माशी उडाली! तव्दत केवळ पोटासाठी चळवळीची पाठ धरणारे शेकडो भटेतर वीर चळवळीचे जूं फेकून देऊन घरोघर स्वस्थ बसले. श्रीमंत भास्करराव जाधवा सारखे दोन तीन पुढारी मात्र झेंड्याला चिकटून उभे राहिले आणि चळवळीची उदात्त व्यापक आणि सर्वस्पर्शी तत्वें जरी दिवस न् दिवस भ्रष्ट होत चालली, तरी त्यानी यथाशक्ति यथामति ब्राम्हणेतर चळवळ कायम टिकवून धरली. छत्रपतिबरोबरच चळवळ मरेल हे भटांचे बविष्य या पुढाऱ्यानी सपशेल ठेचाळले, ही गोष्ट काही लहान सहान महत्त्वाची नव्हे. चळवळीचा उगम आणि प्राथमिक जोर सातारा कोल्हापूर प्रांती झाला. तिकडे मराठ्यांची वसति फार. त्यामुळे चळवळीत मराठ्यांना भरणा विशेष झाला, यात नवल नाही. शाहू नंतर सर्वत्र बेबंदशाही माजली. नव्या पुढाऱ्यांच्या पायतणांच्या आदला - बदली होऊ लागल्या. मतभिन्नतेच्या टकरा लागू लागल्या आणि जबरदस्त नेता कोणीच न राहिल्यामुळे, पुढाऱ्यांच्या गाढव लाथाळीत ‘मराठा - मराठेतर’ भेद उत्पन्न झाला. निस्पृहपणाने निकाल सांगायचा तर, या भेदाची उत्पत्ति मराठा आणि मराठेतर अशा दोघाही पुढाऱ्यांच्या क्रियानष्ठ तत्व भ्रष्टतेतूनच झालेली आहे. सत्यशोधक आणि ब्राम्हणेतर अशा जोड गोळीने जातिभेद विध्वंसनाच्या प्रतिज्ञा करून, मागासलेल्या अखिल भटेतरांची एकजिनशी संघटना करणारे पुढारीच जेव्हा जाति स्वार्थाचे शेण - मूत कालवून खाऊ लागले, तेव्हा हे असले भेद निर्माण होणारच. अंतस्थ यादवांचा हा दोष ब्राम्हणे तरी मराठ्यांचा नसून, शहरांतील भट - भटेतरादि बांडगुळ्यांच्या सहवास संकराचा परिणाम होय. ब्राम्हणेतर चळवळ अनेक दिव्यांतून तावून सुलाखून आज ती लोकमान्य आणि राजमान्य झालेली आहे. तिला कसलीच मान्यता मिळू नये, जोरदार धिकारात तिचे बुरूज ढासळून जमीन दोस्त करावे, तिच्या पुढाऱ्याना ‘मवाळी दादा’ किंवा ‘गुंड’ ठरवून लोकांच्या तिरस्काराला पात्र करावे, (एरव्ही गोऱ्या नोकर शाहीला किती हि शिव्या दिल्या तरी एवढ्या ‘राष्ट्रीय’ कर्मांसाठी) सरकारचे हि बूट चाटून त्याना या चळवळी विरुध्द चिथावून सोडावे, वगैरे शेकडो रेग ढेग शहरी बांडगुण्यांनी करून पाहिले, परंतु, ब्राम्हणेतरी चळवळीचे मूळच शेतकऱ्यांच्या काळजांतून निघालेले असल्यामुळे, तिच्यात शहरी चळवळीची शिस्त किंवा बेगडी भपका मुळीच नसता हि, तिचा व्याप खेड्या - पाड्यात भरंसाट फैलावला, बांडगुळ्यांचे श्रीयुती आकाण्ड ताण्डव वृत्तपत्री कालमातल्या कालमातच मुरले आणि सरकारला ही ब्राम्हणेतर पक्षासाठी कौन्सिलात एक खास दालन रिझर्व करून ठेवणे भाग पडले.

• शेपटी मुळासकट कापाल तरच :

माझ्यासाठी जनता का तुझ्यासाठी जनता हा जहाल मवाळ शहरी बांडगुळ्यांचा वाद प्रत्यक्ष पुराव्याने पराभूत झाला आणि ब्राम्हणेतर चळवळीने खेडवळ जनतेला गदागदा हालवून जनार्दनाचा जो नवावतार निर्माण केला, त्याच्या प्रभंजना पुढे आसरकार भट - भटेतरादि शहरी शाहिराना मान तुकवावीच लागली. सगळ्या हिन्दी राष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची मिजास मारणाऱ्या नॅशनल कांग्रेस सारख्या शहरी संस्थेतले मोठ मोठे पुढारी ब्राम्हणेतर चळवळीला, संधी सापडताच, ज्या शिव्या गाळी करतात, त्यातील रहस्य एवढेच की ज्या कोट्यावधि जनतेच्या अज्ञानावर त्याना मनमुराद चरता येत असे आणि त्यांच्या मुक्या वृत्तीच्या मुक्या संमतीवर या शहरी बांडगुळ्याना अवघ्या राष्ट्राच्या नावाने हवा तो गोंधळ घालता येत असे, त्या भ्रमाचा भोपळा या ब्राम्हणेतर चळवळीने आरपार फोडला. कोणत्या हि चळवळीच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्तीने अथवा समाजाने, आपल्या धोरणाशी आणि हितांशी विसंगत किंवा बाधक असणाऱ्या, दुसऱ्या एकाद्या चळवळीला विरोध केला, तर त्यात वावगे असे काही नाही. पण ज्यांचा संबंध चुकून सुध्दा एकाद्या चळवळीत येत नाही, चळवळीत भाग घेण्याची ज्याना मुळी लायकीच नाही, अशा शहरी खुराडयांत वंश वृध्दी करीत जन्म कंठणाऱ्या कारकुण्ड्या बांडगुळ्यांनी प्रत्येक चळवळीत मध्ये मध्ये तोंड खुपसले कीं,

तुका म्हणे ऐशा नरा ।
मोजुनि माराव्या पैजारा ।।

या अभंगाचे मूळ कारण तेव्हाच उमगते. या बांडगुळ्यांत पुष्कळ भटेतरी जाती आहेत. त्यांच्यावर भटी खेटरांचा मार धार्मिक सामाजिक आणि इतर सर्व बाबतीत नेहमी खरपूस पडत असतो. पणं उदरं भरणाची सभ्य हमाली करताना दररोज काळ्या - गोऱ्या हापसरांच्या लाथा शिव्या खाऊन खाऊन मुर्दाड बनलेल्या त्यांच्या मनोवृत्तीला भटी खेटरे पुष्पांच्या वर्षावासारखी वाटणे अगदी साहजिक आहे.

दिवसाची खर्डघाशी हमाली उरकून ही बांडगुळी कबुतरे खुराडयात परतली की एक आण्याच्या वृत्तपत्रातील बातम्यावर चाललेल्या यांच्या खास पांढर पेशी निर्णयाच्या मखलाशावर मखलाशा ऐकून, बेडकानी सुध्दा चातुर्मासात हल्ली शहराला राम - राम ठोकला आहे. या बांडगुळ्याना काळ्या गोऱ्या भटांच्या पत्रांशिवाय इतर पत्रांच्या अस्तित्वाची दाद नसते. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना ही कारकुंडी कबुतरे कितीहि तिरमिरीवर आली, तरी खुराड्यांची राखण करणाऱ्या फाटक्या पायतणाच्या लायकीच्या भैय्या पठाणापुढे हे सारे बाजीप्रभूचे वंशज आणि बाजीराव पेशव्यांचे भाई शेपटाच्या वाकणासाठी श्र्वानाती नक्कल इतकी हुबेहूब करतात, कीं अलीकडे ‘शेपटी मुळासकट कापाल तरच पाळीव कुत्रा बनतो‘ अशा अटी कुत्री आपल्या मालकाना घालू लागली आहेत. शहरातल्या भांडवलबाज खुराडेवाल्यानी या कबुतराची लायकी अंदाजूनच त्यांच्यासाठी दहा दहा फुटांची दोन दोन बिळे बांधण्याचा प्रघात राजमान्य ठरवून घेतला आहे. ही बिळे त्यांचे विश्र्व. एका भिंतीच्या पलीकडे दुसरा कोणी मेला तरी त्याची हा कधी दखल करीत नाही. व्यक्ति स्वातंत्र्य मत स्वातंत्र्य आत्म प्रौढी यांच्या वल्गना मात्र मोठ मोठ्या. सगळ्या शहरी सभांचे प्रेक्षक हीच बांडगुळी कबुतरे. परस्परविरुध्द दहा सभा असल्या तरी दहा हि ठिकाणी तेच प्रेक्षक हवे ते उलट सुलट ठराव पास करायला तयार. असल्या बांडगुळ्याना ब्राम्हणेतर चळवळीचे महत्व कसले कपाळाचे कळणार? पण भटी खेटरे खाऊन हि भटांच्या डोळ्यानी पहाणऱ्या या भटेतरी बांडगुळ्यांच्या ब्राम्हणेतरी चळवळीवर मोठा शहरी रोष! त्यांच्या पैकी उगाच चार दोन मंडळी ब्राम्हणेतर चळवळीत सक्रीय पुढाकार घेतात, म्हणून यांची त्यांच्यावर करडी बायकी नजर! सायमन कनिशनपुढे एका पांढर पेशा वकीलाने ब्राम्हणेतर मागासलेल्या जन संघातर्फे साक्ष दिली. ती दिल्यामुळे ‘ आमच्या जातीच्या प्रतिष्ठेच्या नाकाची बोंडी छाटली गेली,’ या सबबी वर हिवताप पूरच्या काही नाकाळ ब्राम्हणेतर बांडगुळ्यानी त्या वकील जातभाईचा निषेध केला! इतकेच नव्हे तर ‘आम्ही ब्राम्हणेतर नाही’ असा मोठा डंका हि पिटला, लेकाच्याना ‘ब्राम्हण’ म्हणवून घ्यायला तोंड नाही, आणि ‘ब्राम्हणेतर’ असताना तसे म्हटलेले खपत नाही.

अर्थात या बांडगुळ्यांची कोटी हिन्दु समाज रचनेतील मानवांपैकी नसून शृंग पुच्छादि अलंकराच्या दुसऱ्याच कसल्या तरी कोटी पैकी असली पाहिजे खास! मद्राशी बांडगुळ्या भटांचे काळेकुट्ट ढगार मुंबई वगैरे शहरांवर कोसळे पर्यंत दखनी पांढर पेश्या वर मिश्या करून कारकुनी पेशाच्या घमेंडीत बराच तर्र असे. महायुध्दामुळे त्याच्या भाकरीचे काठ जरी पुष्कळ ठिकाणी करपले गेले, तरी अगदीच पोटात कोळशे कोंबण्याचा प्रसंग आला नव्हता. पण तिकडे मद्रास इलाख्यात डॉ. नायर, त्यागराज चेट्टी प्रमृति ब्राम्हणेतर वीरानी इतक्या जोराने आणि शिस्तीने आपली ब्राम्हणेतर चळवळ चालविली की तिकडील मद्राशी भटांच्या बांडगुळ्या जीवनाला आरपार करवतच लागली. त्याचा परिणाम असा झाला कीं मद्राशी भटांची पोरे कुल्याला लुंग्या लाऊन, उघडी बोडकी अयय्यो करीत, मद्रास इलाखा सोडून बाहेर पडली. जिकडे भरला दरा, तोच गाव बरा. नानासाहेब पेशव्याच्या कारकीर्दीत जेव्हा चित्पावनांनी स्वत:ची शुध्दि करून, देशी ब्राम्हण वर्गात आपली संघटना करून घेतली. त्या वेळेपासून महाराष्ट्राला तेलंग्या भटाची ओळख झाली होती.  तेलंग्या म्हणजे मोठा चिकट. पण त्याचा चिकटपणा दक्षिणेचे पाणी सुटताच बुळबुळीत महाराष्ट्रात मद्राशांची पार्सले, प्रथम १८९६ सालीं जी. आय. पी. रेल्वेच्या तारमास्तरांच्या संपाच्या प्रसंगी रेल्वे कंपनीनेच आणली.

• हवा तो भाव पण नोकरी लाव :

पोटा - पाण्याच्या काही तक्रारींसाठी जी. आय. पी. च्या सबंध लायनीवर तार मास्तर सिप्रळरानी संप केला. कंपनाने ताबडतोब मद्राशी तरुणांच्या ट्रेनीच्या ट्रेनी भरून आणल्या आणि प्रत्येक स्टेशन वर दोनदोन चारचार यंडुगेंडु भराभर सोडले. येणाऱ्या - जाणाऱ्या गाड्यांच्या नुसत्या खुणा करून सुरवातीला काम चालविले. नंतर जागच्याजागीच त्याना कडकडकट टेलीग्राफी शिकवून कामावर कायम केले आणि संपवाल्या देशी लोकांना घरी बसविले. चालू मुंबईच्या संपात हि मद्राशी कोंगाडी मजुरानीच गर्दी करून संपाच्या टिकावाला फोडले आहे म्हणतात. मद्रास मजुरांची माताच म्हणायची! पेशव्यांच्या आणि त्यांच्या जातभाईच्या पंक्तिला बसून पुख्खा पाडणाऱ्या तेलंगी भटाला, इतर भटांपेक्षा, दुप्पट दक्षिणा पेशवे देत. म्हणून हजारो तेलंग्ये पुण्यास टोळ धाडीने नेहमी जमत. पेशवे तेलंग्याचे आन्नदाते म्हणून तेलंग्या भटाच्या टाळक्यावर पेशव्याचे स्मारक पगडीच्या रुपाने आझूनही झळकत असते.

पण हा मद्राशी भट म्हणजे तेलंग्याचा तेलंग्या! चिकटणीच्या कामात सरसाचा बाप. पायाला इंगळा डसला तर मान मोडताच चावा सोडतो. पण मद्राशी भट! चिकटला की तेथल्या दगडमातीला सुध्दा वंश - परंपरा बाधल्या शिवाय राहायचा नाही. हिन्दुस्थानात असे एक शहर शिल्लक नाही की जेथे मद्राशी भटी बांडगुळ घुसलेले नाही! मग्राश्यानी बाप जन्मात जरी कधी राज्ये कमावली नाहीत आणि स्वाऱ्या शिकाऱ्या केल्या नाहीत, तरी त्यांच्या पोटाच्या पापाच्या स्वारीने सारा हिन्दुस्थान आफ्रिका फिजी केन्या वगैरे देळ आज बेजार होऊन बसले आहेत. मद्राशी जात नाही कोठे? हवा तेथे जातो. फार काय पण जेथे हवा जात नसेल तेथे हि तो घुसतो. एकदा एकाद्या ठिकाणी घुसला की मग रामेश्र्वरलिंगम्! रावणाच्या रावणाला जागचे हालायचे नाही. सगळा मद्राशी लुंगीवाला एक जात बांडगुळ्या कारकुंडा. नोकऱ्यांच्या क्षेत्रात मद्राश्याची चुरस नेहमी ‘मीन कॉम्पिटिशनची' (नीच स्पर्धेची) असते. मुंबईवर मद्राशी बांडगुळाची स्वारी होताच, त्यानी निरनिराळ्या शिलेदारी नोकऱ्यांचे भाव फटाफट खाली पाडले. हवा तो भाव पण नोकरी लाव, यापेक्षा खोल भानदडीत तो कधीच पजत नाही सारम् भातम् सुटले की सूर्योदया पासून सूर्योदया पर्यंत ही नोकरीची ज्याची तयारी, त्या दिव्य महात्म्यांपुढे पोषाखी पांढरपेश्ये कचाकच कच खाऊन नामोहरम झाले, तर त्यात आश्र्चर्य कशाचे आणि कोणी करायचे? लक्षावधि दखन्ये बांडगुळे मद्राशी बांडगुळ्यानी घरोघर रिकामे बसविले. “मध्यम वर्गात बेरोजगारी वाढली" म्हणून श्रीयुती कुरवूर शहरी पत्रांतून टुरटुरू लागली.

पण हे दखनी पांढर पेशे इतके पचपचीत शेळपट, कीं स्वत:च्या पोटाला मद्राशी कोळशाने आग लावली, हे सिध्द सत्य धडाडीने उघड बोलून लिहून दाखवायची हि याना हिंमत नाही! आणि म्हणे आम्हाला स्वराज्य पाहिजे! वर्षानुवर्षे कष्टाळू शेतकरी उपाशी मेला, गैव जोश्याच्या शिध्यापासून तो कलेक्टराच्या सरबराईच्या कोंबड्यांपर्यंत जरी वेदोक्त कायद्योक्त नागावला गेला, सावकारी चक्रवाढी व्याजात राहत्या झोपडीला आणि मळत्या शेतात मुकला, आणि अखेर कराच्या करकरी खाली भरल्या शेतापुढे पसाभर दाण्याला मोताद झाला, तरीहि त्याचा ज्या शहरी स्वराज्यवादी बंडगुळ्याना चुकून सुध्दा कधी घाम फुटला नाही, त्याच पांढर पेश्यांवर बेरोजगारीची नुसती झुळूक चाटून जाताच, अन् एम्प्लॉयमेण्ट, आन् एम्प्लॉयमेण्ट, म्हणून केवढी बोंबाबोंब! पांढर पेश्या शहऱ्यांच्या पोटालाच जेव्हा कचकचीत चिमटा बसला, तेव्हा त्यांची वृत्तपत्री वाग्वे जयंति “हिंन्दुस्थान दरिद्री झाला” आशा श्रीयुती हाका आरोळ्या मारू लागली. तेव्हाच च्यांचा स्वराज्यवाद फुरफुरूं लागला. तेव्हाच च्यांचे पूर्वीचे अन्न दाते व आश्रय दाते दयाळू सरकार ‘सैतानी वाटी लागले. त्यातच त्यांना रशियन कम्युनिझमची तत्वे वेदान्ता पेक्षा हि गोड वाटू लागली. उपासमारीचा आणि दारिद्याचा वणवा खेड्यांतल्या शेतांच्या बांधावरून कोसळत कोसळत जेव्हा या पांढर पेश्या शहरी शहाण्यांच्या टीचभर पोटाच्या पाटाला येऊन विनचूक भिडला, तेव्हा याना गिरणबाबूंच्या हीनदीन स्थितीचा कळवळा फुटला. जो पांढरपेश्या उन्मत्त वर्ग कारकुनीपेक्षा इतर कष्टाळी उद्योगाला तुच्छ समजत असे. तोच आता पडेल ते काम ‘डिगनिटी ऑफ लेवर’ (कोणतेही काम नीच नाही) च्या वेदान्तावर करण्यास तयार झाला.

मद्राशी आणि तत्सम परप्रांतियां विरुध्द व्र काढण्याची किंवा स्पर्धा करण्याची आंगात ताकद नसल्यामुळे, तो देशबंधुत्वाच्या नाटकी सबबीवर आपल्या कमजोर मनगटाचे समर्थन करीत असतो. युनिव्हर्सिट्यांट्या पदव्यांच्या दिमाखावर दीन दुनिया खातर जमेत न धरणाऱ्या पांढर पेश्या एमे बीएना जेव्हा चहाचा कपसुध्दा कमविण्याची लायकी नसल्याचा अनुभव पटला आणि शहरा पेक्षा खेड्यातले लोक आझूनहि किंचित सुखी आहेतसे त्याना दिसले, तेव्हा शहरी सुधारणेचा दिव्य प्रकाश खेड्या - पाड्यात पाडण्यासाठी विद्वान तरुणाना खेड्यात घुसण्याचे उपदेश सर्वत्र होऊ लागले. सारांश, ज्या बांडगुळ्यांच्या पिढ्यान् पिढ्यांच्या परिश्रमांवर शहरांची वाढ व भरभराट झाली, त्याच शपरांत त्याना उपाशी मरण्याची वेळ आली.

• आत्म शक्तीने फुरफुरलेले राष्ट्र :

सन १९२३ साली मुंबईत व इतर गिरणाळू ठिकाणी मोठमोठे गिरण्यांचे संप झाले आणि त्यांचे परिणाम इतर सर्व धंद्यांवर विपरीत होऊन, गोर गरीबांचे पीठ झाले आणि पांढरपेश्ये रोजच्या मीठ भाकरींसाठी आचके देऊ लागले. हा वेळपावेतों खेड्यांतील शेती सोडून शहरातल्या गिरण्यांत घुसलेले गिरणबाबू पोटा - पाण्याच्या तक्रारीसाठी संप करीत; पण त्यांच्याच संघटना व शिस्त नसे. गेल्या सालापासून (१९२८) सर्व गिरणी कामगारानी अनेक युनियने स्थापन करून शिस्तीने संप लढवायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची एवढी प्रचण्ड शक्ति आज शहराना जाणवू लागली आहे कीं, ज्या गिरण बाबूकडे लोक एक सहा महिन्याच्या संपाने सगळ्या मुंबईच्या नखऱ्यात गरम मसाला घालू शकतो, हे त्या संघ शक्तीने भांडवाल्यांपासून तो थेट बांडगुळ्या पर्यंत सर्वांच्या प्रत्ययाला आणून दिले. गिरण बाबू संप करून घरी बसलाच, हाटेले बंद झाली, दारूचे पिठे पिकेटिंग शिवाय माशा मारीत बसले, दाणेवाले ‘कुरे कोकरे’ वाणी बाप मेल्या सारखे चेहरे करून स्वस्थ बसले, आणि पानपट्टीवाले दात वासून आकाशाकडे पाहू लागले. खुद्द गिरण बाबूंच्या हि विचारांत अदभूत क्रांति झाली. तत्वासाठी स्वार्थ त्यागच काय, पण आत्म यज्ञ हि करणारे वीर आणि पुढारी त्यांच्यात निर्माण झाले.

पूर्वी संप म्हणजे वृत्तपत्री गप्पेच्या पलीकडे फारसे कोणी विचारात घेत नसत. पण आज मजुरांच्या पोटाच्या बण्डाने एवढी जबरदस्त शिस्तीची संघटना केली आहे कीं, संप म्हटला कीं पोलीशी घोडदळ, लाठीबाज पायदळ आणि गोऱ्या लष्कराची मोटारीची धावपळ एकदम सुरू होते. प्रत्यक्ष महायुध्दाच्या धामधुमीत सुध्दा जे समर्थ सरकार इतका बाचका - बाचकीचा आणि आचका दचक्याचा प्रकार करीत नव्हते, ते ज्याअर्थी नुसत्या नि:शस्त्र गिरण बाबूंच्या साध्या पोटपाण्याच्या प्रश्र्नाला निर्वाणींच्या संपाला एवढे भेदरू लागले आहे, त्या अर्थी जनता जनार्दनाच्या या नवावताराचे विराट स्वरुप तसेच महासमर्थ आणि कर्दनकाळ असले पाहिजे खास. हिंदी कामगार मूळचा शेतकरीच. पोटाच्या वाढत्या पापाला तोंड देण्यासाठीच तो शहरांत येऊन तात्पुरता ‘कामगार’ बनतो. परंतु त्याच्या महत्वाकांक्षेचा सर्व ओघ घरच्या-खेड्याच्या-शेताकडेच लागलेला असतो. शेती हेच त्याच्या स्वावलंबनाचे मूळक्षेत्र. बाकीचे हंगामी धंदे तो अळवा वरचे पाणीच समजत असतो. संप सुरू होताच, शहरातला खर्चं भागे ना, म्हणून चटकन् पडशी खांद्यावर टाकून तो ‘गांवीं’ निघून जातो. याच्या उलट पांढर पेशे लोक पहा. शहरात नोकरीचे टिंराड वाजले तरी तेथेच पडून असतात आणी सर्व उपाय हरले की वैतागून एक दिवस आत्महत्या करतात! हा नामर्दाचा मार्ग शेतकरी-कामगार कधीच पत्करणार नाही. त्याचा आपल्या मनगटाच्या आणि नांगराच्या दांड्यावर भरेसा फार. त्याचा निर्वाणीचा दाता पाण्डुरंग नसून त्याच्या नांगराचा दाण्डु रंगच होय. तीच त्याची आत्म शक्ति तिच्याच जोरावर तो लवकरच शेतकऱ्याचे स्वराज्य निर्माण करील. म्हणूनच गोल्ड स्मिथ आपल्या “उध्वस्त खेडे” काव्याच्या समारोपात म्हणतो. मथळ्या वरच्या इंग्रेजी ओळी पहा - “आत्म शक्तीने फुरफुरलेले राष्ट्र किती हि दरिद्री झाले तरी तेच सुखी राष्ट्र होय. ते काळाच्या काळाला दाद देणार नाही. खडकावर समुद्राच्या आणि हवेच्या लाटा किती हि जोराने आदळल्या म्हणून काय होणार? परंतु जे राष्ट्र नुसत्या व्यापारी तागडीच्या जोरावरच जगण्याची घडपड करते, ते, लाटेचा एकच धडका कृत्रिम बांध पाटाला जसा बोल बोलता फस्त करतो, तसे चुटकी सरसे लयाला गेल्या वाचून रहाणार नाही.”

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ६ -
ब्राम्हणेतर चळवळीचा जमा - खर्च

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• सामाजिक सुधारणेची दृष्टी :

कॉंग्रेस, होमरूल, समाज सुधारणा, वगैरे शहरी शहाण्यांच्या चळवळी गेली ४० - ५० वर्षे शहरो शहरी किती हि मोठा गाजावाजा करीत असल्या तरी मागासलेल्या खेडवळ शेतकऱ्याच्या आत्म प्रबोधनाची खरीखुरी टिकाऊ कामगिरी ब्राम्हणेतर चळवळीनेच केलेली आहे. ज्योतीराव फुल्याने सत्यशोधक समाज स्थापन करून, शहरी डळवळीचा एकांडेपणा शहरी शहाण्यांच्या नजरेला आणण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण राजकारण म्हणजे हजार रोगावर एकच औषध मानणाऱ्या पांढर पेशा भट - भटेतरानी त्याला कोपर खळ्या दिल्या. आगरकर रानडे प्रभृति समाज सुधारकांची सामाजिक सुधारणेची दृष्टी सुध्दा शहरी पांढर पेश्यांच्या क्षितिजा पुढे कधीच गेली नाही. याचा परिणाम असा झाला कीं, शैक्षणिक चतुराई पासून तो ‘स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे’ या वेदान्तापर्यंत शहरी शहाण्यांची हालचाल मुल्क मैदानी ग्रजना करू लागली, तरी शेकडा ९५ बहुजन समाज अंतर्बाह्य स्थितीत मातीच्या ढेकळा प्रमाणेच हतसंज्ञ पडून राहिला. जिकडे पहावे तिकडे पुढारलेल्या पांढर पेश्या लेखाळ वाचाळ चळवळी, मागासलेल्यांची दाद कोणालाच नाही. बंगालची फाळणी, बांज प्रकरणे, महायुध्द इत्यादि अनेक क्रांत्या घडल्या, तरी त्याचा शेंडा बुडखा सुध्दा बिचाऱ्या खेडवळ जनतेला कधी उमगला नाही.

शहरातले ‘लई श्येने बामन’ जसे म्हणताल तसे करावे, मागतील ते गेऊन त्यांची तुंबडी भरावी, सांगतील तसे ओरडावे, या पलीकडे त्याना काहीच कळत नसे. शहऱ्यांच्या शहरी चळवळी खेडवळांवर बांडगुळा प्रमाणे मनमुराद चरत, पण खऱ्या खोट्याची शत्रु - मित्राची पारख करण्याची आत्म शक्ति खेडवळांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न मात्र कधीच कोणी केला नाही. तसा प्रयत्न शहऱ्यांच्या बांडगुळ्या स्वार्थाला विघातक आहे, ही मुद्याची गोष्ट शहरी शहाणे जाणून होते. शेतकरी जागा झाला, त्याला हिता - हिताच्या वाटा कळू लागल्या आणि आपल्या आज्ञानावर पिढ्यान पिढ्या मोकाट चरणाऱ्या बांडगुळ्यांच्या कारस्थानांची त्याला ओळख पटली, कीं शहरी शहाणा बसल्या खुर्चीत गार पडलाच. ही मख्खी ज्योतीरावच्या नंतर करवीरकर शाहू छत्रपतींनी ओळखली आणि च्यांच्या ब्राम्हणेतर चळवळीने तिचा प्रयोग यशवंत करून दाखविला. ‘ब्राम्हणेतर’ या नावामुळे या चळवळी विषयी शहरी भट भटेतर बांडगुळ्यानी सर्वत्र बराच गैरसमज फैलावला.

• भटी वळणाच्या वळचणीचे पाणी पिऊन :

भटी वळणाच्या वळचणीचे पाणी पिऊन, भटी संस्कृतीचय् नकलेवर, आपल्या शहरी श्रेष्ठत्वाचा दिमाख मिरविणाऱ्या कायस्थ प्रभूंसारख्या ज्या अनेक भटेतरी जाती आहेत, त्याना ‘ब्राम्हणेतर’ नावामुळे या चळवळीत आपला नाखुषीचा समावेश होत असल्याचा भास झाला; आणि ते निष्कारण तंगड्या झाडू लागले. वास्तविक ब्राम्हणेतर चळवळ मागासलेल्या बहुजन समाजाची खास चळवळ असल्यामुळे. या शहरी बांडगुळ्याना तिच्याशी स्वत:चा प्रत्यक्ष संबंध जोडण्याचा यत्किंचित हि अधिकार नाही. ब्राम्हणेतर चळवळीच्या पुढाऱ्यानी तसा कधी प्रयत्न केला नाही, करण्याची त्याना जरूरच पडली नाही. बांडगुळ्या मग तो काळा भट असो वा गोरा भट असो, नाहीतर भटेतर असून हि तसे उघड कबूल करण्यास शरमणारा त्रिशंकू असो त्याच्या गुलामगिरीतून खेडवळ शेतकऱ्याला शक्य तितक्या लवकर मुक्त करण्याची जी चळवळ, ती कायस्थ प्रभू सारखे शहरी भटेतर बृहस्पति झाले काय, किंवा आणखी कोणी मटण मासळी खाणारे भट झाले काय, त्यांच्या आशीर्वादावर ती थोडीच अडून बसते? या असल्या शहरी शिलेदारांच्या खुषी नाखुषीने कोड पुरविण्याचा कोडगेपणा ब्राम्हणेतर चळवळीच्या मूळ तत्वांतच नाही.

खेडवळ जनतेच्या अज्ञानावर हव्या त्या बाजूने चरणारे लोक अनेक प्रकारचे आहेत. त्यात भिक्षुक भटाचा नंबर पहिला. त्याच्या धार्मिक सत्ता बाजीची पकड मुळांसकट उखडल्या खेरीज शेतकऱ्याच्या सुधारणेचा प्रत्येक प्रयत्न फुकट जाणार, या धोरणाने भिक्षुक शाहीवर म्हणजे ब्राम्हण्याभिमानी ब्राम्हणांच्या वर्चस्वावर निर्वाणीचा हल्ला चढविणाऱ्या चळवळीला ‘ब्राम्हणेतर’ असे सुटसुटीत विशेषण आपोआपच चिकटले गेले. हिन्दुस्थानातील पूर्वीची मुसलमानी साम्राज्यसत्ता झाली काय, किंवा आताची ब्रिटीश सत्ता झाली काय, देशाच्या गुलामगिरीचीं ही बाह्य व हंगामी कारणे होत. परंतु या सर्व कारणांचे मूळ महाकारण अथवा ब्रम्हगाठ म्हणजे भटा - भिक्षुकांची धर्मोक्त सत्ता हेच असल्यामुळे, तेच प्रथम ठेचण्याची ब्राम्हणेतर चळवळीने दूरदृष्टी व धडाडीची लगबग केली.

• मांजरांच्या डावल्या भाड्याने घेतल्या :

आत्मोध्दाराच्या मार्गातला भयंकर भुजंग म्हणजे भिक्षुकशाही भट, हा शेकडा शतकांचा ऐतिहासिक सिध्दान्त शहरी भटेतर शहाण्यांच्या गळी उतरत नसला, तरी ब्राम्हणेतर पुढाऱ्यानी चो बिनचुक अंदाजून, त्या सापाचे विषारी दात पाडण्यासाठी ब्राम्हणेतर चळवळीचा शिस्तीचा आणि शिकस्तीचा उपयोग केला. चळवळीच्या अग्रभागी शाहू महाराजा सारखा सर्व समर्थ छत्रपति कंबर कसून उभा राहताच, भिक्षुकशाही वर्चस्वाला दहा हि दिशानी इतके जबरदस्त काटेरी मोर्चे लागले की, दखनचा सारा भट समाज छत्रपतीच्या नावाने हाता - पायाची बोटे कडाकडा मोडू लागला. स्वत:ची बोटे मोडल्यावर भटानी अनेक भटेतरी मांजरांच्या डावल्या भाड्याने घेतल्या.

शाहू महाराजावर भाडोत्री भटेतरांकडून डमार हि करविली. पण व्यर्थ! शतकानुशतके खेडवळ जनतेच्या डोळ्यांवर बांधलेली भिक्षुका वर्चस्वावी अंधारी एकदा उचकल्यानंतर भटांच्य़ा वेदोक्त दम धाटणीला कोण कुत्रा जुमानणार? अक्षर शत्रू आणि हेकट खेडवळांच्या विचारांत क्रान्ति घडवून आणण्याचे काम फार बिकट. ते ब्राम्हणेतर चळवळी पूर्वी कोणालाहि साधले नव्हते. कीर्तने पुराणे प्रवचने व्याख्याने इत्यादि शहरी थाटाची यंत्र - तंत्रे खेडवळ कधीच जुमानीत नाही. तो त्यांकडे कधी चुकून ढुंकून सुध्दा पहाणारा नव्हे. वृत्तपत्रांची मिजास निरक्षरांपुढे काय होय? सहीची निशाणी आंगठा न् नांगर एवढीच ज्यांच्या अकलेची कमाई, त्यांच्या अकलेत नवीन विचारांची फोडणी कशी घालावी, हा शाहू छत्रपती पुढे मोठा कठीण प्रश्र्न होता. तो त्यानी सर्व परिस्थितीचा बारीक विचार करुन सत्यशोधक जलशांच्या योजनेने फार कुशलतेने सोडविला. गंधर्वी नाट्य प्रयोगात मुरलेल्या शहरी शहाण्याना तमाशे आणि जलसे हे नाक मुरडण्या इतके गलिच्छ आणि बीभत्स वाटणे सहाजिक आहे.

• सापाला पुंगी, हरणाला गायनाची गुंगी :

नित्य बासुंदी पुरी पुरण पोळ्यांच्या राशीत गडबडा लोळणाऱ्या महात्म्याना गराब खेडवळांच्या चटणी भाकरीची लज्जत कशी कळावी? नित्य नेकटाय कॉलर पॅण्टच्या सुटा - बुटात अंड्याप्रमाणें उबून निघणाऱ्या महाबागाना नांगऱ्या शेतकऱ्याच्या घोगडीच महत्व कसे उमजणार? तमासे, जलसे, भेदिक लावण्या, पोवाडे, कलगी तुऱ्याच्या लढता, हे खेडवळांच्या करमणुकीचे प्रकार. त्याना शहऱ्यांचे स्वयंवर आणि भाव बंधन काय होय? तमाशाचे कडे कडाडल्याचे कानी पडताच पुढ्यातला भाकरीचा थाळा दूर लोटून, कड्याच्या आवाजाच्या दिशेने, मुंडा से सावरीत सावरीत, धावत जाणाऱ्या तरूण वृध्द शेतकऱ्यांची शेकडो उदाहरणे प्रस्तुत लेखकाने स्वत: पाहिलेली आहेत. सापाला पुंगी, हरणाला गायनाची गुंगी, भट देशभक्ताला फंड, वृत्तपत्राला वर्गणीदार, कोल्हापूरला शर्यतीचे घोडे, पुणेकर भटाना टिळकी धोंडे, कायस्थ प्रभूना हुंड्याचे हंडे, ‘बामनेतरी’ मराठ्याना सरकारी नोकऱ्या, याज्ञिक भटाना बोकडी कोहळा आणि क्षात्र जगद्गगुरुला लग्नाचा सोहळा, तद्वत शेतकऱ्याला तमाशाचा जिव्हाळा मोठा. ब्राम्हणेतर चळवळीच्या पूर्वी खेड्यांतले तमाशे कृष्ण लीला, रास क्रीडा वगैरे पौराणिक विषयावर पुष्कळ भर देऊन, त्यांत ब्राम्हणांचे हि महत्व न कळत वर्णित असत.

जसे पुराण तसा तमाशा. शाहू छत्रपतींनी सत्यशोधक जलशाची सल्पना काढूम, तमाशाचा बाहेरचा नाचरंग जशाचा तशा कायम ठेवला, पण नांदीपासून भरतद वाक्यापर्यंत सर्व वाषयाची क्रांति सुचविली. विद्येचे महत्व, शेतकऱ्याना ठकविणारांच्या उघड गुप्त लीला, मद्यपान निषेध, ब्राम्हणांच्या वर्चस्वाचा दांभिकपणा, फंड गुंडांचा धुडघूस, बाल विवाह निषेध, विधवा केशवपनाचा राक्षसीपणा, असले जिव्हाळ्याचे सामाजिक सुधारणेचे विषय संगित मिश्र सवाल जवाबांच्या आणि संगांच्या रुपाने श्तकऱ्यांपुढे मांडण्याची सत्यशोधक डलशानी सुरुवात करताच, महाराष्ट्रातील खेडीपाडी सामाजिक सुधारणेच्या नव्या विचारांनी भारून गेली. जलशानी मद्यपाना सारख्या एकाद्या व्यसनाची वाईट बाजू संगीत फार्साने नटवून नाचून दाखविली कीं, ती खेडवळांच्या हृदयाला इतकी थेट जाऊन भिडत असते कीं फार्स पुरा होताच शेकडो शेतकरी उभे राहून त्या व्यसनाची शपथ घेतात.

• तसल्या सुधारणा खेडवळ :

शहाण्या पांढरपेशा भट भटेतर समाजात अजबन हि चालू असलेला विधवा केशवपनाचा प्रघात जलशाने हुबेहुब रंगविताच, “उद्यापासून जो विधवेला हात लावील तो आपल्या आई बहिणीला हात लावील” अशा शपथा एका मोठ्या शहरातल्या शे - दीडशे न्हाव्यांन घेतल्याचे दृश्य स्वत: प्रस्तृत लेखकाने पाहिलेले आहे. अर्थात् दुसऱ्या दिवशी त्या शहरात विधवांच्या हजामती बंद पडल्या. या क्रांतीचा सरळ अर्थ लक्ष्यात न घेता, ‘ब्राम्हणांवर सत्यशोधकांचा अत्याचार’ झाल्याच्या भटी बोंबा सर्व भटी पत्रांत ठणाणलेल्या हि प्रस्तृत लेखकाच्या चांगल्या स्मरणात आहेत. एकट्या सातारा जिल्ह्यात गेल्या १० वर्षांत खेडवळ विद्यार्थ्यांची आणि शाळांची जी विलक्षण वाढ झाली आहे, त्याचे मुख्य श्रेय ब्राम्हणेतर चळवळीच्या सत्यशोधक जलशानाच देणे प्राप्त आहे.

शेटजी आणि भटजी शेतकऱ्याना कसे लुबाडतात, याचे मनोरंजक फार्स पाहून सेतकरी वर्ग आता चांगला जागा झाला असून, काही खेड्यांतून शेटजी भटजींचे आता कायमचे उच्चाटन झाले आहे. धार्मिक क्षेत्रात तर सत्यशोधक जलशानी घडविलेली आचार क्रान्ति मोठ मोठ्या शहरी सामाजिक परिषदाना आज गुरुस्थानी शोभण्या सारखीच झाली आहे. ज्या सुधारणा तीन डझन वर्षांच्या परिषदानी नुसत्या एकदा हि हाताळण्याची शहरी शहाण्याना अक्कल आली नाही, तसल्या सुधारणा खेडवळ शेतकऱ्यांनी सत्यशोधक जलशाच्या एका प्रयोगाच्या थापेत प्रत्यक्ष आचरणात उमटवून दाखविलेल्या आहेत. उच्च संस्कृतीचा आणि जगातल्या साऱ्या शहाणपणाचा मक्ता मिरविणाऱ्या कायस्थ प्रभू सारख्या समाजात, तीव्र निषेधाची प्रत्यक्ष गाढवे नाचली तरी, हुंड्याची भाड खाणाऱ्या गाढवांची संख्या नित्य वाढतीच आहे. भटा - भिक्षुकांचा दांभिकपणा स्पष्ट उमगला असून हि भटांच्या हात लावणी शिवाय अनेक शहरी भटेतर समाजांतील मुंजी लग्ने आणि तेरावी घसघशीत साजरी होत नाहीत. पण सत्यशोधक जलशानी मागासलेल्या खेडवळात धार्मिक स्वातंत्र्याचा इतका जोरदार पुरस्कार फैलावला कीं, मराठे आणि तत्सम जातीत गेल्या १० वर्षांत भटा कडून लागलेले लग्न हजारात एकादेच सापडेल. बाल विवाह बंद पडत चालले.

हुंडा आणी देज देणाऱ्या घेणाऱ्यांना जमातीचा दंड आणि जाहीर नाचक्कीचे प्रयश्र्चित म्ळत असते. तात्पर्य, खेडवळ जनतेत कोणती हि सुधारणा ठसठशीत वठविण्याच्या कामी सत्यशोधक जलशाचे शस्त्र बिनतोड यशवंत ठरले आहे यात मुळीच शंका नाही. परंतु या चळवळीचे ध्येयच मुळी कधी ठरले नाही. ना तिच्या घटनेचा कोण कधी विचार केला, ना तिच्या नियंत्रणाची जबाबदारी कोणी पत्करली. कॉंग्रेसा झाल्या, परिषदा भरल्या, शहरी चळवळ्यांच्या रंगा - ढंगाच्या नकला पुष्कळ केल्या. पण ध्येयाची निश्र्चिती मात्र केव्हाच ठरली गेली नाहीं. सत्यशोधक चळवळ आणि ब्राम्हणेतर चळवळ यांच्या मर्यादा स्पष्ट आखल्या न गेल्यामुळे तर त्यांच्या संमिश्र गोंधळांत ब्राम्हणेतरांच्या संघटनेचे तीन तेरा खुदेद शाहू छत्रपतींच्या हयातीतच वाजण्यास सुरीवात झाली. झालेली थोडी फार जागृति शिस्तीची पुण्याई नसून, चळवळीच्या डुकर मुसंडीची नवी नवलाई होय.

शेतकरी जागा झाला, त्याला आपले हिताहित कळू लागले, त्याच्या संघटनेचा जोर वाडू लागला, तर त्या अचाट शक्तिचा उपयोग कसा कोठे आणि कोणी करावयाचा, त्याचा विचार आज पर्यत मुळीच झालेला नाही. शाहू महाराजानी तो कधी केला नाही; त्यांच्या मृत्यूनंतर सर्वच बजबजपुरी माजली. याचे कारण छत्रपतींचा लोकसंग्रह आंधळा होता. लोकसंग्रहाच्या बाबतीत टिळक आणि शाहू छत्रपति हे दोघे हि लोकोत्तर पुरुषोत्तम एकसारखे चुकले. दोघे हि मोठे बण्डखोर चळवळ्ये. अचाट क्रान्ति घडविण्याच्या कामात दोघे हि दांडगे महत्त्वाकंक्षी. दोघानाहि लोकसंग्रहाचा मोठा हव्यास. पण आपल्या प्रभावळीत जमणाऱ्या लोकांच्या पात्रा - पात्रतेची कसोटी दोघांपैकी एकाने हि कधी कसाला लावली नाही. हवे ते बाजार वुणगे जमत गेले, यजमानांच्या मोकळ्या थैल्यावर बाण्डगुळा प्रमाणे चर चर चरले, आणि यजमानाचा अंत होताच त्याच्या नावाने घंटा बडवून बडवेगिरी करीत बसले. टिळकांच्या बडवे मंडळात जसा फण्डगुण्ड्या आचारी पाणक्यांच्या भरणा जबरदस्त होऊन, शेकडो नालायक भटें देशभक्त पणाच्या कल्हईने निष्कारण चमकू लागली, तसाच थेट प्रकार शाहूच्या ब्राम्हणेतरी प्रभावळीचा झाला.

• एकल कोंडेपणा लाथाडून :

टिळकांप्रमाणेच शाहूचा हि लोकसंग्रह अखेर त्याना इतका डोईजड आणि बेताल झाला कीं, टिळकांप्रमाणेच शाहू छत्रपतीना सुध्दा आपल्या बडव्यांच्या बदकर्माबद्दल अनेक वेळा प्रायश्र्चिते घ्यावी लागली. हिंदु राजा विशेषत: मराठा राजा म्हटला कीं - त्याच्या भोवती लाळघोट्या माणशी सुरवंटांचा घट्ट गराडा पडलाच म्हणून समजावे. ही सनातन परंपराच आहे. त्यातल्या त्यात शाहू छत्रपति आपल्या छत्रपतित्वाचा संस्थानी एकल कोंडेपणा लाथाडून, अवघ्या महाराष्ट्राच्या दीन दुबळ्या रयतेच्या उध्दारासाठीं, आपली गंगाजळी सताड उघडी टाकून बसलेले! मग काय विचारतां? वाटेल त्या उनाडाने उठावे, महाराजांच्या दर्शनाला जावे, अमूक तमूक करतो म्हणून बढाया माकाव्या. नाना प्रकारच्या ‘स्कीम्स‘ त्यांच्या पुढे मांडाव्या, हजारो रुपये हबकावे, जरा उजाच इकडे तिकडे ‘सत्यशोधक’ किंवा ‘बामनेतर’ म्हणून मिरवावे, असा तुंबड्या भरुन लोकांचा मोठा उरूस चालू झाला होता. कार्यदक्ष, तत्व निष्ठ, धोरणी आणि लायक अशा लोकांचा छत्रपती पर्यंत रिघावच लागे ना. लागला तरी त्यांच्या सूचनांचा विपर्यास करुन दाखवणारी लांडी कुत्री जवळच असायची. याचा परिणाम असा झाला कीं, चळवळ उनाड टप्पू पैशे खावूंच्या हाती गेली, तिचे खरे महत्व बाजूला पडून कार्यक्रमाचा विचका उडाला, सत्यशोधक चळवळीचे खरे तत्व लाथाडले जाऊन, तिच्या नावाखाली गावोगाव गुंड पुडांचे उत्पात आणि अत्याचार सुरु झाले, आणि सर्वच चळवळीचा गोंधळ हुकमती बाहेर गेल्यामुळे अखेर सत्यशोधक समाजाशी माझा कसला ही सांबंध नाही असा शाहू महाराजाना जाहीरनामा प्रसिद्ध करावा लागला. या पूर्वी हाच प्रसंग रा.ब. लठ्ठे आणि जाधवराव याना हि केसरी पत्रातून साजरा करावा लागला होता.

तात्पर्य, चळवळीचे ध्येय आणि धोरण निश्चित न ठरविल्यामुळे आणि तिच्या कार्यक्रमावर शिस्तीचे बंधारण न घातल्यामुळे, ब्राम्हणेतर चळवळी सारखी शेतकरी व मागासलेल्या बहुजन हितवादाची उत्कृष्ट चळवळ, सर्वत्र फैलावून हि, तिचा व्हावा तसा उपयोग झाला नाही आणि होतहि नाही. ब्राम्हणेतर चळवळीचे कर्णधारत्व शाहू छत्रपतीनी पत्करल्यामुळेच तिचा सर्वत्र फार लवकर प्रसार झाला.

• देव - मानवातला दलाल भट :

छत्रपती नावातच अशी जादू आहे कीं, तेथे खेडवळ शेतकऱ्यांचे आणि मावळ्यांचे माथे आपोपआप प्रमाणासाठी खाली वाकते. बहुतेक शेतकरी जातीने मराठेच. आर्थात् त्यांच्यात चळवळीचा फैलाव करण्यासाठी शाहूच्या संग्रहात मराठ्यांचाच भरणा विशेष झाल्यास त्यात नवल नाही. जातिभेद, देव - मानवातला दलाल भट आणि सामाजिक उच्च - नीच्चता, या तीन महत्वाच्या राष्ठ्रीय दोषांवर कट्यार चालविणाऱ्या सत्यशोधक समाजाचा पुरस्कार ब्राम्हणेतरी मराठ्यानी सर्रास केल्यामुळे, या चळवळीच्या संघ शक्तीचा दुरूपयोग मराठे चळवळ्ये स्वजाति वर्चस्वाकडे करतील, अशी प्रथमतः कोणालाही शंका आली नाही. मराठे झाले तरी पिण्डाने जाति भेदाळू हिन्दूच!

विद्येत गदीच मागासलेले. त्यात ब्राम्हणेतर चळवळीने शेकडो वाऱ्याचे पाग्ये बनल्यामुळे बहुतेक कार्यकर्ते मराठे चळवळ्ये मर्यादे बाहेर शेफारून गेले. आम्ही करू ती पूर्वदिशा असा भटी मद त्याना चढला. अनेक ब्राम्हणेतर शहरी समाजांच्या सहकार्याचा प्रयत्नच त्यानी न केल्यामुळे, त्यांच्या सहानुभूतीला ब्रम्हणेतर चळवळ अज्जीबात पारखी झाली. बरे, केवळ मागासलेल्या खेडवळ ब्राम्हणेतर जनतेची संघटना साधावी, तर कार्यकर्त्या मराठ्यांचे मदांध वर्तन अनेक मराठेतर समाजाना जाचक होऊ लागले होतो. फक्त शाहू महाराजांच्या मुर्वतीसाठी प्रतिकाराची भाषा ओठापर्यंत येऊन पोटात फिरत असे. इतक्यात शाहू महाराजांनी क्षात्र जगद्गुरूच्या नव्या मठाचा उपद्व्याप केला आणि क्षात्र - क्षत्रि म्हणजे मराठे अशी स्पष्ट व्याख्या हि जाहीर केली. अनेक मराठे तर क्षत्रिय समाजाना याची चीड आली. पण आतापर्यंत देव मानवातला दलाल म्हणून भिक्षुक भटांची हुर्रेवडी करण्यात दंग असलेले सर्व सत्यशोधकी मराठे, नाटकातल्या ट्रान्सफर सीन प्रमाणे, क्षात्र जगद्गुरूच्या बुटांवर माथी घासायला धावत गेले.

सत्यशोधक समाज आणि त्याची कट्टर विवेकवादी तत्वे राहिली ज्योतिबा फुरबांच्या धडग्यात आणि सगळे मराठे बीरपीर पडले क्षात्र जगद्गुरूच्या नव्या बाडग्यात. मराठ्यांचा जगद्गूरू उत्पन्न झाल्या बरोबर ब्राम्हणेतर चळवळीत दाडगी फूट पडली. या नव्या पीठाच्या समर्थनार्थ अनेक मराठा वृत्तपत्रानी विधानांच्या आणि सबजींच्या मखळाशा लढवून, शाहू महाराजांच्या या धाडशी प्रयोगाला उचलून धरण्याचा प्रयत्न केला, पण तो एकहि विवेकावाद्याला आज पर्यंत पटला नाही. उलट त्यामुळे या मराठा पत्रकारांची दुप्पटी वृत्ति तिटकारा येण्याइतकी चिळसताणी ठरली. सध्या तर बहुतेक मराठा वृत्तपत्रे एकाच तोंडाने कट्टर जातिभेदाची मराठा वर्चस्वाची आणि सत्यशोधकी प्रामाणिक पणाची गरम सर्द हवा सोडण्यात मोठी तरबेज झालेली दिसतात. शाहू छत्रपति हयात असे पर्यंत ब्राम्हणेतर चळवळीत पडलेल्या आणि पडत असलेल्या भेगा एक सारख्या फाटतच गेल्या. मराठा - मराठे तर भेद जोराने पुढे आला. चळवळीच्या नावापासून तो तिच्या ध्येय धोरणाच्या निश्चिती पर्यंत प्रश्न विरामांचे डोंगर उपस्थित झाले. शाहू महाराजांच्या मलीद्यावर धष्टपुष्ट झालेले बरेच बेकर्तगार मराठे गुंड चळवळीचा पुढारी मी म्हणून एकमेकांशीच चुरशीचे सामने देऊ लागले. ब्राम्हणेतर म्हणजे कोण याची व्याख्या हि स्पष्ट नसल्यामुळें, जातीचा ब्राम्हण नव्हे तो ब्राम्हणेतर अशी सोपी व्याख्या पुढे आली.

• कायदेबाज वकील कोंबडे वगैरे :

उमरावतीच्या ब्राम्हणेतर कॉंग्रेस मध्ये तर ब्राम्हण वगळून बाकीची सारी दुनिया चुटकी सरशी ब्राम्बणेतर दालनात आणून बसविली. त्यामुळे, शेतकऱ्याच्या मुंड्या मुरगळणारे गुजर मारवाडी, देशाला दारूबाज बनविण्याचा राजरोस मक्ता घेणारे सोमयाजी पारशी, आणि कज्जे दलालीच्या घरटात त्याला पिळून त्याच्या वर्चस्व नाशाच्या पिठावर आपल्या वैभवाच्या भाकऱ्या थापणारे कायदेबाज वकील कोंबडे, वगैरे शेतकऱ्यांचे खास शत्रू त्यांचे पुढारी बनले. कसाईच गो रक्षणाच्या चळवळीचे सूत्रधार बनवल्यावर परिणामांची कल्पना वाटेल त्या रेम्या डोक्याने करावी. ब्राम्हणेतर चळवळीने ब्राम्हणांच्या सर्वदेशी वर्चस्वाला कायमचे गाडल्यामुळे, जातीने ब्राम्हण नसलेल्या शेटजी भटजींचें आयतेच फावले. ब्राम्हण सावकारांची कारस्थाने ब्राम्हणेतर चळवळ ठिकठिकाणी ठेचून पाडीत असे, पण ब्राम्हणेतर त्वाचा मुखवटा घालून खेडवळ शेतकऱ्यांच्या रक्तावर जगणाऱ्या इरसाल ब्राम्हणेतरी जळवांच्या थैमानाला पायबंद कोणी लावायचा? मॉण्टफर्ड रिर्फार्म्सची नावे कायदे कौन्सिले सुरू होणाच्या सुमारास तर ब्राम्हणेतर पक्षात भयंकर उत्पात माजले.

मराठा - मराठेतर भेदाचा पाया याच वेळी भक्कम पडला. मराठे याच वेळेपासून स्वजाति वर्चस्वाची भाषा विशेष अट्टाहासाने बोलू लागले आणि राष्ट्रवीर सारखी मराठ्यांची जबाबदार वृत्तपत्रे मराठेतर उघड उघड धमक्या देऊ लागली. ब्राम्हणेतर चळवळीची दिशा जातिभेदाच्या ठोकरीमुळे अजीबात बददली. कोणशीलदाऱ्या, दिवाणीगिऱ्या आणि सरकारी नोकऱ्या आणि त्याहि लोकसंख्येच्या प्रमाणात-लायकीच्या नव्हे! खास मराठ्याना मिळाव्या, एवढ्याच क्षुद्र बिंदूवर ब्राम्हणेतर चळवळीची भिंगरी येऊन गरगरू लागली. मागासलेले पडले खेड्यात. बरेचसे शहरी गिरण्यांच्या वेढ्यात, शेतकरी भट भटेतर सावकारांच्या चक्रवाढी तेढ्यात, आणि ब्राम्हणेतर मराठे पुढारी कोण शीलदाऱ्या दिवाणीच्या पटकविणाऱ्या तिरंगी चौरंगी लढ्यात! बिचाऱ्या अस्पृश्यांची मात्र कोणीच दाद घेईना.

चळवळीच्या सुरूवातीला अन ब्राम्हणेतर चळवळीने आपल्या मराठाशाही मदाच्या धुंदीत भावी लोकशाहीच्या - शेतकऱ्यांच्या स्वराज्याच्या मूळ तत्वाला घातक अशा एका महापातकाला नव्यानेच जन्म दिला आहे. आज पर्यंत शेतकऱ्याला मातीला मिळवणाऱ्या अनेक व्यसनांच्या बाज्या उत्पन्न झाल्या. पण ही नवीन बाजी त्या सर्वांवर ताण करून शेतकरी स्वराज्याच्या योजनेची भ्रूणहत्या केल्यावाचून राहणार नाही. ही नव्या पातकाची नवी बाजी म्हणजे इलेकशनी व्होटबाजी ही होय. उमेदवार लोक पक्षाच्या आणि पार्ट्यांच्या पुण्याईवर बाह्यतः किती हि नाचत बागडत असले, तरी एकमेकावर चुरशीची सरशी करण्यासाठी रोख रुपयांचे लांच देऊन मते विकत घेत असतात. लांच देण्या - घेण्या बाबद सरकारी कायद्याचा दिमाख कितीहि कडक असला, तरी एकादे वेळी मोंटे चोर पकडला जातो, पण खाटें जार पकडण्याचे काम फार कठीण असते. आधीच शेकरी निरक्षर आणि अडाणी. आपल्यासा नवीन सरकारी कायद्या प्रमाणे मिळालेल्या मतांचे महत्व काय आहे, हे त्याला नीटसे उमगत नाही.

• हंगाम किती कचकचीत फायद्याचा :

राजकारणात शेतकऱ्यांचे महत्व काय आहे, याची वास्तविक कल्पना आजपर्यंत कोणी हि ब्राम्हणेतरी बृहस्पतीनीहि-त्याला कधी करून दिली नाही. अशा अवस्थेच पैसे घेऊन मते विकण्याचे व्यसन शेतकऱ्यांत फैलावणे किती घातक आहे, याचा प्रत्येक राष्ट्र हितेच्छूने विवंचनेत विचार केली पाहिजे. इलेक्शनच्या हंगामात गावोगावच्या मतदारांची मते खरेदी करून ठेवणारे कित्येक एजण्ट आज मुखवस्तू म्हणून मिरवत असतात. तर मते विकणाऱ्या खेडवळाना इलेक्शनी हंगाम किती कचकचीत फायद्याचा होच असेल, याची कल्पना केलेली बरी. एक दोन जिल्ह्यातली कौन्सिल इलेक्शने खास माझ्या नजरे खाली झडलेली आहेत. प्रत्येक उमेदवाराने चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपयांची उधळ पट्टी काल्याचे मी पाहिले आहे. प्रत्यक्ष पोलिंग स्टेशनच्या आसपास शेतकरी मतदारांच्या टोळ्याच्या टोळ्या, एकेका गावदादाच्या म्होरक्यापणा खाली येऊन बसतात. नंतर हे गावदादा सर्व उमेदवारांच्या एजण्टांजवळ मतांचा भाव अंदाजीत फिरतात. ज्याची बीट जास्त, त्याला त्या टोळीची मते देऊन भरल्या खिशाने परत जातात. प्रत्यक्ष मतदार मुबलक दारू पाजली कीं ते खूष होतात. मतदाराना शिंदीची दारू न् गावदादाला चांदीचा वारू मते विकण्याचे व्यसन शेतकऱ्यांत फैलावल्यामुळे, बुद्धिमान, कर्तबगार, लायक परंतु पैशाने दुबळ्या असणाऱ्या कोणत्याहि मनुष्याला कौन्सिलात शिरण्याचा मार्ग कायमचा बंद होऊन बसला आहे. इलेक्शने म्हणजे पाण्यासारख्या पैशाचा खेळ झाल्यामुळे, कौन्सिले म्हणजे श्रीमंत नालायकांच्या त्रैवार्षिक जहागिरदाऱ्या कां न बनाव्या?

तात्पर्य, इलेक्शनी व्होटबाजीचे हे महापातक शेतकऱ्यांच्या भावी उत्कर्षाला ठार मारणारे असल्यामुळे, शेतकऱ्यांच्या हितवाद्यानी आणि विशेषतः सरकारने त्याला मुळातच छाटण्याचे पुण्य मिळवावे, अशी हात जोडून प्रार्थना आहे. सरकारने गुप्त पोलिसांच् हिन्दुस्थाना एवढा पांजरपोळा पोसलेला आहे. इलेक्शनच्या दिवशी प्रत्येक पोलींग स्टेशनवर त्यातले काही पोळ सोडले, तर शेतकरी मतदाराना राजकारणी व्यभिचाराची चटक लावणारे जार खाटें पकडले जाण्याचा बराच संभव आहे. मागासलेल्या खेडवळ शेतकरी जनतेला साक्षरतेचा परीस लाऊन. तिची सुप्त आत्मशक्ती जागृत करण्यासाठी धडपडणारी ब्राम्हणेतर चळवळ सध्या इंद्रधनुष्या प्रमाणे झालेली आहे. तिचा खरा रंग कोणाता. हे खुद्द पुढाऱ्यानाच उमगेनासे झाले आहे. या पार्टीला घटना नाही. शिस्त नाही. म्हणून प्रत्येक जबाबदार पुढारी वृत्तपत्रांत बोंब ठोंकीत आहे. पण बेशिस्तिच्या पापाचा वाटा स्वतःकडेच येतो, हो मात्र एका हि शंखाच्या लक्ष्यात येत नाही. या चळवळीला कोणी जबाबदार कर्णधारच नसल्यामुळे हिचे रंग दरघडीला सरड्या प्रमाणे बदलत आहेत. प्रथमतः हिचा उमग भिक्षुक वर्चस्वाला हाणून यच्चावत् ब्राम्हणेतर जातींचे सामाजिक व धार्मिक स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी झाला. नेतर त्यात मराठा - मराठेतर भेद उघड झाला.

• सरकारी नोकऱ्या हाच काय तो मोक्ष :

मराठा - मराठेतरानी अस्पृश्यांची काहीच बूज न राखल्यामुळे ब्राम्हणतेर संघातून अस्पृश्य वर्ग दूर फटकला. या पुढची पायरी म्हणजे, एक जातीय मराठ्यांचे वर्चस्व अचानक कोणी मान्य करणार नाही, म्हणून खुद्द ब्राम्हणेतरांतच पुढारलेले आणि मागासलेले असा ठळक भेद करून, या चळवळीला शुद्ध राजकारणी रूप द्यावयाचे आणि सामाजिक धार्मिक प्रश्नाना माजी टाकावयाचे ही राजकारणातही बहुजन हितवादाची व्यापकता नाहीं. शेतकऱ्याच्या अभ्युदयाची विवंचना नाही. त्याच्या परिस्थितीचा अभ्यास नाही. संकटाच्या आणि अडचणीच्या तपशीलाची चिकित्सा नाही. काही नाही. मागासलेल्या वर्गां पैकी विशेष जागरूक अशा समाजाला, त्याच्या अफाट लोसंख्येच्या प्रमाणात (बौद्धिक लायकीच्या नव्हे !) सरकारी नेकऱ्यांचे रुपेरी तोवरे मिळाले, म्युनिसिपालटीच्या, लोकल - बोर्डे, कौन्सिले, असेंब्ली वगैरे संस्थात मराठा जातीचे कच्चे पक्के भले बुरे बरेचसे प्रतिनिधी गेले, की या ब्राम्हणेतर राजकारणाची भूक शमणार. सरकारी नोकऱ्यांची या जातीवर मनमुराद खैरात होताच, त्यांची व इतर सर्व तत्सम मागासलेल्या वर्गांची सर्वांगीण उन्नती होणार, सरकारी नोकऱ्या हाच काय तो मोक्ष, असे ब्राम्हणेतर नावाची चळवळ करणाऱ्या मराठा पुढाऱ्याना वाटत आहे. उन्नतीच्या मार्गात चळवळीचे घोडे कोठे जर अडखळत असेल, तर ते येथेच. सांजिक सुधारणा, धार्मिक स्वातंत्र्य, बौद्धिक परिणति [आर्थिक प्रश्नांची दाद अझून कोणालाच नाही.] वगैरे चट साऱ्या गोष्टी सरकारी नोकऱ्यांच्या खैरातीची सक्षिणीची कांडी फिरताच चुटकी सरशा घडून सेतील, या कल्पनेत ते दंग झाल्यामुळे, त्यानी ब्राम्हणेतर चळवळीचे निशाण आता फक्त सरकारी नोकऱ्यांच्या प्राप्तीवर रोखून धरले आहे. सध्याच्या ब्राम्हणेतर चळवळीचे एवढेच ध्येय आहे, आणि मराठा तरुणांपुढे हेच ठेवण्यात येत आहे.

नरपति हितकर्ता द्वेष्यतां याति लोके ।
जनपत हितकर्ता त्यज्यते पार्थिवेन ।।

इति महति विरोधे विद्यमाने समाने ।
नृपति जनपदांना दुर्लभः कार्य़कर्ता ।।

याचा अर्थ एवढाच कीं, जो इमानी सरकार - सेवक तो इमानी जनसेवक राहू शकत नाही आणि जो इमानी जनसेवक तो सरकारला प्रिय असत नाही. शासित शास्त्याना समानप्रिय असा प्राणी सशाच्या शिंगा इतकाच दुर्मिळ आता पर्यंत ब्राम्हणेतर चळवळीत पुढाकार घेणाऱ्या मराठ्यानी जन सेवेचे तर खूपच अवसाने आणले होते. विशेषतः कै. राजर्षि शाहूछत्रपतींच्या अमदानीत सरकारी नोकऱ्यांचे भडाभड राजीनामे देऊन ब्राम्हणेतर चळवळीची स्वयंसेवा करण्यासाठी पुष्कळ मराठे वीर मी मी म्हणून मिशांवर पीळ भरीत पुढे सरसावले. कोणी वर्तमानपत्रे सुरू केली, कोणी संघ काढले, कोणी व्याख्यानाची धुमच्शक्री चालवली, कोणी ग्रंथमाना काढल्या, असा मारे एकाच घडघडात उडाला! लोकांना वाटले कीं कोण हे देवदूत अवचित आमच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाले! शाही महाराजांचा पाठिंबा जाताच मात्र हे सारे स्वयंसेवक बहाद्दर खरेखुरे स्वतःची सेवा करणारे ठरल्याचे उघडकीस आले. कोणी कोल्हापूर दरबारचे मानकरी होऊन बसले. कोणाला ३५ रूपये, कोणाला ५० रूपये असे लहान मोठे पगार मिळू लागले. कोणी तर प्रत्यक्ष नोकऱ्याच पटकावल्या. छलवळ राहिली चळवळीच्या ठिकाणी आणि हे आपल्या स्वर्थाच्या भजनी! फुरसदीने चार दोन व्याख्याने झोडायला मात्र केव्हा हि ना नाही. आता तर काय? उघड उघड सरकारी नोकऱ्या हेच या चळवळीचे ध्येय ठरले आहे. या ध्येयाच्या प्राप्तीसाठी मराठे पुढारी आज ब्राम्हणा विरूद्ध तर आदळआपट करीतच आहेत, पण खुद्द ब्राम्हणेतरातीलच पुढारलेल्या अनेक जातींच्या नावाने खडे फोडून ब्राम्हणेतर चळवळ म्हणजे फक्त जातीची चळवळ असे नवीन भाष्य प्रचलीत करीत आहेत. या साध्यासाठी ब्राम्हणेतर चळवळीच्या मूळ ध्येयाचे वाटोळे झाले तरी त्याना आता पर्वा नाही.

• नोकऱ्याभिलाषी मराठे :

ब्राम्हणाना ज्या दुष्कर्मांसाठी मराठे दोष देत आले, त्याच दुष्कर्मात ते आता या चळवळीचा बळी देत आहेत. प्रश्न इतकाच उरतो की, जन सेवेची घमेंड मारणारे हे वीर महावीर सरकारी सेवा वृत्तीचे पट्टेदार बनल्यावर जनसेवा व समाजसेवा कशी काय करणार? ब्राम्हण नोकर शाही रयतेच्या हिताकडे पहात नाही. ब्राम्हण अधिकाऱ्यांकडून रयतेला त्रास होतो, न्याय मिळत नाही, जुलून हि होतो, म्हणून बहुसंख्यांक ब्राम्हणेतर जनतेच्या कळवळ्याचे ब्राम्हणेतर अधिकारी शेकडा ५० ते ७५ प्रमाणात जर सरकारी नोकऱ्यांचे पट्टेदार बनले असतील तर, रयतेची आवादानी होईल, हा एक मुद्दा नोकऱ्याभिलाषी मराठे पुढारी नेहमी पुढे आणतात. या मुद्यात मनुष्य स्वभावाचे जितके ज्ञान आहे, तितकेच वस्तूस्थितिचे हि आहे.

सरकारच्या राज्य कारभाराचा गाडा त्यांच्या ठराविक धोरणाच्या कडक शिस्तीने चालवण्यासाठीच सरकारी नोकरी ही संस्था निर्माण झालेली आहे. राज्यकर्त्यांचे राजकारणी नाटक सूत्रबद्ध व ताणेबंद चालण्यासाठी सरकारी नोकऱ्या या लहानमोठ्या निरनिराळ्या भूमिका आहेत. नाटकातली हरिश्चंद्राची भूमिका वठविताना त्याला स्वप्नात दिलेल्या वचनासाठी राज्यसंन्यास करून सहकुटुंब वनवास कोणा हि व्यक्तीला पाळणेच प्राप्त असते. तसे तो न करील तर आपोआप उखडून जाईल. आजहि ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोनहि जातींचे नोकर सरकारी नोकर आहेत. पण दोघांच्या वृत्तीत फारसा फरक नाही. २० - २५ रूपड्या कमावणारा ब्राम्हण कारकून रोज संध्याकाळी कडीसरी फुगवून घरी जातो, आणि ब्राम्हणेतर कारकून दररोज दिगंबर बनतो, असे मुळीच नाही. ८० - ९० चा ब्राम्हण सब रजिस्ट्रार दोन तीन वर्षात कोकणात गावी ७ - ८ हजारांची विष्टेक करतो, आणि कायस्थ प्रभु किंवा मराठा सब रजिस्ट्रार काय कानात तुळशी पत्रे कोंबतो? कायस्थ किंवा मामलदार मुनसफ बिनबोभाट घरी चालत येणाऱ्या वादी-प्रतिवादी - प्रासादिक कामधेनूच्या प्रसादाने आपल्या बायकोला पिवळी ढवळी करतो आणि मराठा मामलदार रयतेला काय आपले घरदार धुवून देतो? ब्राम्हण अधिकारी रयतेला वस्तऱ्याच्या धारेवर धरतात, तर ब्राम्हणेतर अधिकारी काय त्यांना बापदेव मानून देव्हाऱ्यात पुजतात? पाटील पटवाऱ्यादि ब्राम्हणेतराना ब्राम्हण अधिकारी आंगणात तिष्ठत उभे करतात, तर मराठे अधिकारी त्याना झटपट क्षेमा लिंगन देऊन आपल्या मांडीवर घेऊम बसतात की काय? न्याय खात्याची गोष्ट घ्या.

कायस्थ व ब्राम्हण न्यायाधिकारी ब्राम्हणेतराना नीट न्याय देत नाहीत, अशी एक बुरखेबाज कुरबूर ऐकू येते. ही कुरबूर कोणी उघड बोलून दाखवो वा न दाखवो, अमक्या तमक्या ठिकाणच्या ब्राम्हण किंवा कायस्थ मामलदाराला बदलून टाका, अशा अर्थाचे ठराव झालेले पुष्कळ लोकाना माहीत आहेत. ब्राम्हण किंवा कायस्थ सारस्वतीदी मामलदार अगर डेप्यटी कलेक्टर अधिकारी सर्वच देव मामलतदार आणि दामाजीं पंत असतात असे कोणी हि म्हणणार नाही. परंतु त्यांच्या न्याया - न्याय बुद्धिची छाननी च्यांच्या जातीवरून करू पहाणाऱ्या शहाण्याना सरकारी नोकरांच्या जातीची माती कसल्या खाणीची असते हेच कळत नाही असे म्हणावे लागते. एखाद्या खटल्यात ब्राम्हण न्यायधिशाने एखाद्या ब्राम्हणेतर आरोपीला संशयाचा फायदा हि न देता कडक शिक्षा ठोठावली, तर तेथें त्या न्यायाधिशाच्या जातीकडे चटकन् बोट दाखविणाऱ्याला कोणी झाला. करी हाच प्रश्न विचारला कीं त्या ठिकाणी ब्राम्हणाच्या ऐवजी एकदा इरसाल मराठा न्यायाधिश असता, आणि त्याने आरोपीच्या जातीचा मुद्दाच तेवढा विचारात घेउन त्याला दोषमुक्त केले, तर त्यात त्याची जातिहितबुद्धि दाखाणावयची का न्याय बुद्धीचा व्यभिचार निंदावयाचा ? सारंश, सरकारी नोकरीवाले जन्मतः कोणत्याही जातीचे असले तरी ते सरकारी इमानी अधिकारी बनताच त्यांची एक निराळीच जात बनते. एकदा रजिस्ट्रार मामलतदार किंवा डेप्युटी कलेक्टर माठाच्या भाजीच्या जुडीपासून तो थेट व्हिस्किच्या पिंपापर्यंत भक्त जनांचा प्रसाद डोळे मिटून जो मटकावतो, तो ब्राम्हण, मी कायस्थ, मी मराठा या कल्पनेने मुळींच नव्हे. अधिकारी बनला कीं या सर्व भल्या - बुऱ्या मटकावण्यांचा मटक्यांची उसळ त्यावर उसळतच येते. जन्म प्राप्त जातिहिताच्या धोरणाने सरकारी नोकरी बजावणारा माणूस नोकरी प्राप्त जातीच्या चरकात खड्यासारखा उखडून पडल्याची उदाहरणे पुष्कळ आहेत.

तात्पर्य, जनहितवाद्याने सरकार हिताचे सोंग आणणे आणि सरकारी नोकराने जनहितवादाची किंवा जातिहितवादाची मिजास मारणे, या दोन हि गोष्टी अशक्य, अत एव ढोंगीपणाच्या होत.

• कुत्तेगिरीचे पट्टे गळ्यात अडकविल्या नंतर :

सरकारी नोकऱ्यात सर्व जागा भरगच्च भरून आपल्या विवक्षित समाजांचा यर्वांगीण आत्मोद्धार करण्याची शेखी मिरवणारे पुढारी लोक कसल्या शेणा - मेणाचे पुतळे असतात आणि नोकऱ्यांच्या हुलकावण्या दाखवून ते आपल्या समाज बांधवांच्या जागृतीचा आपल्या स्वतःच्या हळद कुंकवासाठी कसा उपयोग करून घेतात, याची स्पष्ट जाणीव शेतकऱ्यांना होणे शेतकऱ्यांच्या स्वराज्याच्या चळवळीला अत्यंत जरूरीचे आहे. प्रश्न हा उरतो कीं सरकारी कुत्तेगिरीचे पट्टे गळ्यात अडकविल्या नंतर हे श्वानवृत्तीचे समाज आपला सामाजिक आत्मोद्धार करून स्वराज्याला पात्र कसे होणार? इंग्रेजी राज्यासत्तेचे वर्म जर सेक्रेटरीयटच्या कारकुंड्या खरडे घाशीत साठविलेले असते, तर मराठ्यादि ब्राम्हणेतरांपेक्षा चाणाक्य बुद्धीत केव्हाही शतपट प्रविण असणाऱ्या ब्राम्हण पुत्रानी या पूर्वीच त्या वर्माचे मर्म आपल्या निसर्ग जात कारकुण्या कौशल्याने हस्तगत केले असते. मारुतीचे वर्म त्याच्या शेपटात होते कीं टाळक्यात होते, हा प्रश्न आज फारसा महत्वाचा नसला, तरी इंग्रेजांच्या हिन्दुस्थाना वरील राज्यसत्तेचे वर्म त्यांच्या चिटणिशी दफ्तरात मात्र खास नाही. वेळ पजली तर दिल्लीच्या कागदी वावड्यांच्या किल्ल्या इंग्रेज सरकार भर्रदिशा हिन्दी कारकुण्ड्या चळवळ्यांच्या स्वाधीन करील, आणि म्हणेल कीं घ्या हे तुमचे स्वराज्य. राजकीय वर्चस्व हे मुळी इंग्रेजी सत्तेचे साध्यच नव्हे. ते साधन आहे. उघड उघड इंग्रेज लोक म्हणजे बनिये आहेत. व्यापारी आहेत. तागडीचे उपासक आहेत. त्यांया तागडीच्या वर्चस्वासाठी तलवारीचा आणि लेखणीचा नाइलाज म्हणून त्याना पुरस्कार करावा लागतो. इंग्रेज म्हणजे तागडी आणि तागडी म्हणचे इंग्रेज, अशीहि परिभाषा अमलात यायला आता फारसा अवधी लागणार नाही. तोंडाळ व लेखाळ हिंदी लोकानी काही भयेकर सत्याग्रही अत्याचार केला तर लेखणीचे स्वराज्य त्याच्या गळ्यात डकवायला धोरणी तागडी तुकप्पा आंग्रेज बहाद्दर मुळीच मागे - पुढे पाहणार नाहीत, आणि नुसते खरडे घाशीचे स्वराज्य चालवायला जर खास शिवाजीचे मराठेच पुढे येत असतील, तर ती देखिल आंग्रेजाना एक इष्टापत्तीच होईल.

केवळ लेखणीच्या टोकावर वैयक्तिक सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाची मान लटकविणारांची संख्या हिन्दुस्थानात जितकी वाढेल, तितके आंग्रेजी तागडीला फायदेशीरच आहे. लेखणीच्या कुरकुरीवर जान कुरबान करायला निघालेल्या क्षत्रिय मराठ्यादि शेतकरी समाजानी शेतकी सारखा अर्थधनोप्तादक धंदा लाथाडला, तरी तिकडे दयाळू आंग्रेज सरकारला दुर्लक्ष्य करून भागणार नाही. हिन्दुस्थानासारख्या शेतकी प्रधान महाखण्डाची शेती नापिक राहू देण्याइतके आंग्रेज बहाद्दर नापित खास नव्हत. कारकुण्डेगिरीच्या बेसुमार पैदासीमुळे, जर हिन्दी शेती ओसाड पडेल, तर विलायतेच्या भुके बंगाल टॉमींच्या फलटणी येथे आणून त्यांच्या कडून शेतकीची निगा राखण्याचे काम त्याना नाइलाज म्हणून हाती घ्यावेच लागेल. भडोच बऱ्हाड खान देशातल्या हिंदी कापूस पिकव्यांकडून आंग्रेजी व्यापाराच्या तागडीचे पारडे मनपसंत झुकत नाही, म्हणून सक्कर धरणाचा पाया घालून, तेथे दयाळू आंग्रेजी व्यापाऱ्याना लांब धाग्याचा कापूस पिकवण्याच्या सोयीची योजना सरकारला नाइलाजाने करून देणे भाग पडलेच ना? सगळेच शहाणे हिनदी लोक जर ज्ञान योगाचे ज्ञानेश्वर बनले, तर मनगट घासून धनोप्तादन धंदे करणाऱ्या विलायती बेरोजगारी कर्मयोग्यांच्या टोळ्या हिन्दुस्थानाच्या कल्याणासाठी येथे आणणे माबाप सरकारला भागच पडेल. त्या दिशेने प्रयत्नांची सुरूवात हि झालेली आहे. शहरी बाण्डगुळ्यांच्या बेगडी वैभवाला भुलून त्यांच्या कारकुण्ड्या जीवनाची नक्कल करण्यास धाधावलेल्या शेतकरी पुत्रांना या शेतकी प्रधान देशातल्या शेतीत जरी माती दिसत असली, तरी त्या मातीचे हि सोने करून त्याने विलायतेला ढवळी पिवळी करण्याची किमिया तागडी बहाद्दर आंग्रेजांना पुरी माहित आहे. अर्थात् देशातील सर्व तरुणांची वृत्ति, विशेषतः शेतकरी समाजांतल्या तरूणांची वृत्ति, जर कारकुंडेगिरीत रममाण झाली आणि ओसाड पडलेल्या अर्थधनोत्पादक क्षेत्रांवर जर विलायती टोळ्यांच्या टोळधाडी येऊन पडल्या, तर हिन्दी लोकांच्या अधःपाताचा पेला भरून, ते जगातील साऱ्या तागडी बहाद्दर राष्ट्रांच्या पखाली बहाणारे बैल बनल्या शिवाय खास राहणार नाहीत. अज्ञानी व नाक्षर दशेतून ज्ञानी व साक्षर दशेत येत असलेल्या मराठ्यादि मागासलेल्या शेतकरी समाजाना आज कारकुंडेगिरीचा डोंगर मोठा साजिरा गोजिरा दिसत आहे. ज्याच्या हाती लेखणी, त्याच्या हाती परिसाच्या खाणी, अशी त्यांची भावना झालेली दिसते. निवळ कारकुनीवर जगू पाहणाऱ्या समाजांची स्थिती उप्पर तो और बनी है पण अंदर की बात खुदा जाने. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला कायस्थ प्रभू समाजच घ्या.

• विद्यार्जनाचे व पदव्यांचे बदलते रंग ढंग :

गेली ३०० वर्षे हो समाज प्रामुख्याने कलमबहाद्दर म्हणून प्रसिद्ध आहे. मावळातल्या काही थोड्या घराण्यानी प्रत्यक्ष शेती केली व सध्या करत आहेत. या शेतीची उत्पत्ति त्यांच्या शिवकालीन तलवार बहाद्दरीतून झालेली आहे. परंतु आंग्रेजी अंमदानीपासून यांची तलवारीची उपासना सुटली, शेतकी हि माजी पडली आणि जगायला फक्त लेखणीचे बोरुचे कांडरू काय ते उरले. कायस्थाची लेखणी हीच त्याचा लाईफ बोय ! अर्थधनोप्तादक दुसरे कसलेहि साधन त्याच्या हिती राहिले नसल्यामुळे, कारकुंडेगिरीच्या बदलत्या रंगाढंगाप्रमाणे विद्यार्जनाचे व पदव्यांचे बदलते रंगढंग करूनच हा समाज आजपर्यंत कसा बसा जगत आलेला आहे. जोपर्यत कारकुनी क्षेत्रात स्पर्धा नव्हती, तोपर्यंत या समाजातील पदवीधर व साधारण चाणाक्ष लोक याना पोटा - पाण्याची फारशी विवंचना नसे. कारकुनी पुरती अक्कल मिळविली की संसाराच्या गाड्याला चबचबीत वंगण मिळत असे आणि जीवन ध्येयाचा क्षितिज-किनारहि हस्तगत होत असे. जीवन सर्वस्वाचे केंद्रीकरण कारकुनी पैशातच सामीवल्यामुळे, अर्थोप्तत्तीचें ल उद्योदधंद्याचे इतर मार्ग या लोकांना अज्जीबात पारखे झाले. पोषाखीपणा भरंसाट वाढल्यामुळे, श्रम साहसासाठी घासायला मुळी मनगटच शिल्लक उरले नाही.

कारकुनी म्हणजे कायस्थाचा जीव. त्या पलिकडे जगात आणखी काही जगण्याचे स्वतंत्र व स्वावलंबी मार्ग आहेत, याविषय़ी त्याची कल्पनाच ठार नेली. महिनाभर लेखणीची कुरकूर करावी आणि पहिल्या तारखेला आण्याचे तिकीट चोपडून मासमुरा घ्यावा व जगावे, यापेक्षा कसलीहि महत्त्वाकांक्षा या जातीत जिवंत उरलेली नाही. कायस्थाचे प्रत्येक पोर कारकुनीच्यच किंकाळ्या मारीत जन्माला येते. पिण्डी ते ब्रम्हाडी। पण ब्रम्हाडातूनच कारकुनीचे उच्चाटन झाले, किंवा कायस्थेतरानीच कारकुनीच्या ब्रम्हाण्डातून स्पर्धेच्या जोरावर कायस्थांचे पद्धतशीर उच्चाटन केले, कीं कारकुनी पिण्डाच्या कायस्थाना प्रतिष्ठित उपासमारी पलिकडे कसला मोक्ष लाभणार? कायस्थ कारकुनीसाठीच कां धडपडतो ? तर जीवन कलहात टिकाव धरण्यासाठी कारकुनीपेक्षा दुसरी कसली हि अक्कल त्याच्यापाशी शिल्लक नाही म्हणून. ‘इस्कूल फलानेल’ झाला, किंवा ‘गरजू एड’ झाला, तरी कारकुनीच्या कुंपणा पर्यंतच या सरड्यांची धाव! जेथे पिण्डच ठेचाळला, तेथे ब्रम्हाण्डात काय आढळणार? शिवाय, कारकुनीचे वैभव मिठागरातल्या टॅलीक्कार्कपासून कों हुजुर डेप्युटी कलेक्टरापर्यंतचे असले, तरी अर्थप्राप्तीचे प्रमाण काम तसा दाम असल्या ठराविक मानाचेच असणार. कारकुनाची कारकुनी व स्वतः कारकुन जिवंत आहे तोपर्यंत महिना गेला

वर्षे गेली पगार वाजे खणाणा ।
नोकरी जाता, स्वतःच मरता,
कुटुंब करते ठणाणा ।।

अशीच परिस्थिती शेकडा ९० कुटुंबाची झालेली आहे. शेतकी किंवा इतर स्वतंत्र उद्योग धंदा करणारे लोक दुर्गा देवी दुष्काळाच्या तुफानात सापडले तरी त्यांची कळण्या कोंड्यावर जगण्याची हिमत असते. परंतु ठराविक तनख्यावर जगणारा कारकुन वर्ग तनखा नसला तर सुबत्तेच्या दिवसातच भिकेला लागतो. कारकुनी पेशाचा दुसरा भयंकर दोष म्हणजे ठरावीक कामाचा ठराविक दाम घेण्याची सवय किंवा सवलत हाडीमासी खिळल्यामुळे, साहस धडाडी महत्त्वाकांक्षा काटकपणा स्वार्थ त्याग बुद्धी इत्यादि आत्मोन्नतिपोषक गुणांचा या वर्गात खडखडाट होतो. अर्थात् असल्या बिनसाहसी अल्प संतुष्ट मानव पुत्रांची संख्या राष्ट्रात वाढविणे, हे अखंड गुलामगिरीचेच चिन्ह होय. असा अवस्थेत, अर्थोप्तादक स्वतंत्र उद्योग धंद्याकडे आणि विशेषतः शेतीकडे तरुणांची मने वळविण्या ऐवजी त्याना कारकुनी पेशाचे व्यसन लावणारानी आपल्या आत्म घातकी चळवळीचा नीट विचार करावा.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रकरण : ७ -
शेतकरी स्वराज्याचे नव चैतन्य

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• स्वराज्याची लाटरी :

“राजकीय सुधारणा झाली म्हणजे सर्व इतर सुधारणा आपोआप होतील, या गोंडस तत्वावर प्रबोधनाचा मुळीच विश्र्वास नाही. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रे गुलामगिरीचिया आचार विचारांनी चिडचिडलेली; बौध्दिक क्षेत्रांत जाणते पणाचा मक्ता मूठभर सुशिक्षितांच्या हाती, बाकी सर्वत्र अज्ञानाची अमावास्येची काळीकुट्ट रात्र; औद्योगिक चतुराई ठार मेल्यामुळे आर्थिक बाबतीत सर्वत्र पसरलेले दैन्य आणि दास्य; अशा विचित्र परिस्थितीत राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा म्हणजे राजकारणी जुगार खेळणाऱ्या जुगारुंची सट्टेबाजी होय. अर्थात् या जुगारांत येन केन प्रकारे हिन्दुस्थानच्या स्वराज्याचे तट्टू यदा कदाचित् जिंकलेच, तर ती स्वराज्याची लाटरी म्हणजे मूठभर मोठ्या माशांना बाकीच्या अनंत धाकटया मासोळ्यांना बिगर परवाना गिळण्याचा सनदपट्टाच होय.” - प्रबोधन (ता १६ ऑक्टोबर १९२१)

• हिन्दु संघटणाच्या पत्रावळीवर ब्राम्हणी वर्चस्वाचा खरकट वाडा :

हिन्दुस्थान सध्या अनेक रंगांच्या चळवळी जोरजोराने चालू आहेत. निर्भेळ राष्ट्रस्वातंत्र्याच्या कल्पनेपासून तो प्रत्येक व्यक्तीला आंतर्राष्ट्रीय इभ्रतीचा दर्जा मिळण्याइतक्या आत्म शुध्दापर्यंतच्या खटपटी सर्वत्र जोराने चालल्या आहेत. जवमतवादी समाज सुधारकांचा अनिर्वाच्य छळ करणाऱ्या जीर्णमतवाद्यांच्या छावण्या आज त्याच नवमतवादी सुधारणांचा अट्टहास करीत आहेत. पण त्या सर्वांत एक मोठा ठळक दोष दिसून येतो. सर्व चळवळी परस्परांवलंबी नसून, एकमेकांपासून सुतक्या अलग व फटकून चालतात. चळवळ उत्पन्न झाली कीं तिचा स्वतंत्र ग्रूप-एक निराळीच जात बनते. अखिल भारतीय विशेषणाच्या संघांचा व्याप आणि सहकार्याचे क्षेत्र सुध्दा त्याच्या पाच पन्नास मेंबरांपलीकडे जात नाही. प्रत्येक संघ वृत्तपत्री लेखाळपणाने आसेतु हिमाचल कार्यक्रमाची मिजास कितीहि मारीत असला, तरी त्याच्या जन्म ग्रामात सुध्दा त्याच्या अस्तित्वाची कोणाला दाद लागत नाही. राष्ट्रीयत्वाची अंडी उबविणाऱ्या नॅशनल कॉंग्रेसच्या खुराडयात हिन्दु - मुसलमान द्वैताचा धिंगाणा. हिन्दु संघटणाच्या पत्रावळीवर ब्राम्हणी वर्चस्वाचा खरकटवाडा.

• पूज्य असा माथेफिरू प्रकार :

शुध्दीच्या चळवळीत नव्या नव्या जाती निर्माण करून हिन्दु चातुर्वर्ण्यांचे षोडशवर्णी भटी वरण ढवळण्याच्या कारवाया. यूथलीग पहावी तों त्यात गोऱ्या कोहळ्यांचा उबारा आणि राळ्या कच्चा कैऱ्यांची आढी. मुख्य लक्ष्यात ठेवण्याचा मुद्दा हाच कीं, हिन्दुस्थानातल्या चळवळीत एकसूत्रतेचा पूर्ण अभाव असल्यामुळे, दोरा तुटलेल्या माळेच्या मण्या प्रमाणे चळवळी पुष्कळ, कार्य पूज्य असा माथेफिरू प्रकार गेली ३० वर्षे हिन्दुस्थान भर चालला आहे. कोणाचा कोणाशी मेळ नाहीं. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. सर्व चळवळीना एकतंत्री शिस्तीत नियंत्रण करणारी शक्तीच मुळी जेथे न्र्माण झालेली नाही किंवा केलेली नाही, तेथे हव्या त्या भोजनभाऊने उठावे आणि आपल्या राहत्या खुराडयात ममता संघ थापावे, असा हलकट पोरकटपणा हेच सध्याचे ‘राष्ट्रीय’ चैतन्य आहे. सर्व चळवळींचा धुमाकूळ मुंबई—पुण्यासारख्या शहरांत. वृत्तपत्रांची पैदास आणि मागतां येइ ना भीक तर एडीटरकी शीक एवढ्याच पुण्याईच्या पुण्यश्लोक पाप्यांच्या पितरांची एडीटरी मुत्सद्देगिरी फक्त शहरात. खेडयांची आणि खेडवळांची आठवण चुकून सुध्दा आजपर्यंत कोणाला झाली नाही. त्यांचे ज्ञानच कोणाला नाही. खेडवळ शेतकरी म्हणजे शूद्र.

शूद्रा सारख्या क्षुद्राची पर्वा ब्राम्हणादि पांडरपेश्या ज्ञानेश्र्वरांनी काय म्हणून बाळगावी? वृत्तपत्री कालमांच्या खर्डेघाशीने ब्रिटीश सरकारला वंगविण्याचा चंग बांधणाऱ्या शहरी वृहस्पतीना नांगरगट्ट्या शेतकऱ्यांच्या संघ शक्तीच्या पाठबळाची काय म्हणून जरूर असावी? सर्व राष्ट्राच्या प्रतिनिधित्वाच्या मळवटाने मिरविणाऱ्या नॅशनल कॉंग्रेसला जर गेल्या ४५ वर्षांत शेतकऱ्यांच्या सुखदु:खाचा सु ओला ढेकर आला नाही, तर कॉंग्रेसच्या नावावर हवा तो शहरी धुडगूस घालून फण्डगुण्डीच्या पुण्याईवर जगणाऱ्या शहरी जळवांनी शेतकऱ्यांची ‘शूद्र’ म्हणून होटाळणी केली, तर त्यात आश्र्चर्य मानण्याचे कारण नाही. पण आता शेतकऱ्याच्या शेतकीला ऊर्ध्व लागल्यामुळे, आणि शहरी शहाण्यांच्या पोटापर्यंत पोटाच्या बण्डाच्या आगीची झळ पोचल्यामुळे, त्यांच्या पांढऱ्या डोळ्यांच्या पंढरीची यात्रा आता खेडया - पाड्यांकडे वळू लागली आहे.

शूद्र किंवा क्षुद्र समजल्या गेलेल्या शेतकरी कामगार मजूर हमाल पाटीवाला, काय वाटेल ते नाव द्या, या लोकांच्या संघशक्तिने आपापली हत्यारे खाली ठेवताच त्यांच्या संपाच्या झंजावाताने शहरी शहाण्यांचे शहरी अस्तित्व कसे क्षुद्र ठरते, याचेहि दाखले आता शहरोशहरी हरहमेश प्रत्ययाला येत आहेत. शहरांच्या शहरी भपक्याचा मूळ उगम शेतकऱ्याया नांगराच्या ऱाळात आहे, ही जाणीव कॉंग्रेसी देशभक्ताना आता थोडथोडी होऊ लागली आहे; आणि कित्येक बेरोजगारी दे भ सध्या खेडी आणि खेडवळ शेतकरी काबीज करण्यासाठी दौऱ्यावर सारखे फिरत असतात. ब्राम्हणेतर चळवळीने थेट खेडयांच्या मुळाला हात घालून महाराष्ट्रातला अखिल शेतकरी वर्ग गदागदा हालविल्यामुळे, पांढरपेशा भट भटेतर कॉंग्रेसी वारकऱ्यांच्या मोहजाळात शेतकरी मुळीच सापडत नाहीत; उलट, खेडया - पाडयात देभ भटाना झाडू मिळतो, अशी स्पष्ट कबुली बापट नावाच्या एका निस्मीम टिळक भगताने नुकतीच ‘केसरी’ तून दिल्याचे पुष्कळांच्या स्मरणात असेल. ब्राम्हणेतर चळवळीला विरोध करण्यातच ब्राम्हण्याची शेखी मिरविणाऱ्या इरसाल पुणेरी भटांचा हा अनुभव, भटाळलेल्या भटेतरानी डोक्यात मेंदु शिल्लक असेल तर विचार करण्यासारखा आहे.

• अंध:पाताला परमेश्र्वर :

महाराष्ट्राच्या जागृतीसाठी ब्राम्हणेतर चलवळीचीहि आवश्यकता होती, अशा अर्थाचे उद्गार बरेच विवेकी ब्राम्हणहि आता नि:संकोच काढू लागले आहेत. ब्राम्हणेतर चलवळीत कितीहि दोष असले, आणि कोणत्या चळवळीत दोष नसतात ?-आणि तिच्या पुढाऱ्यांच्या हातून किती हि चुका झालेल्या असल्या कॉंग्रेसने ‘हिमालयन ब्लण्डर्स’ केलेल्या आहेत, तरी खेडवळ शेतकरी आणि ब्राम्हणेतर चळवळ यांचा परस्पर संबंध, देह आणि आत्मा यासारखा आहे. या चळवळीनेच शेतकऱ्याच्या महिरलेल्या आणि बावरलेल्या वृत्तीत आत्मोध्दाराचे चैतन्य खेळवून त्याला आत्मियत्वाची चटक लावली. शेतकऱ्याला ब्राम्हणेतर चळवळी शिवाय दुसरा परमेश्र्वर नाही. या चळवळीशी बेइमान होऊन, शेटजी भटजीनी उफलेल्या दुसऱ्या कोणत्या हि चळवळीच्या पचनी जर महाराष्ट्रातला शेतकरी पडेल, तर त्याच्या अंध:पाताला परमेश्र्वर सुध्दां जर परमेश्र्वर कोठे असेल तर थोपवू शकणार नाही. चरख्याच्या पुण्याई वर स्वराज्य कमविणाऱ्या महात्मा गांधीनाहि जेथे ब्राम्हणेतर चळवळीची नालिस्ती करायचा मोह आवरला नाही, तेथे त्यांचे शागीर्द वल्लभभाई पुणेरी भटांच्या गळ्यात गळा घालून “मी शेतकऱ्यांचा ‘भंगी’ आहे” म्हणून लॅण्ड लीगचे कितीहि फार्स करू लागले, तरी या नाचकी लोकांच्या देगलीला महाराष्टीय शेतकऱ्यानी बळी पडणे, म्हणजे वस्तऱ्याने गळा कापून आपला आत्म घात करून घेण्यासारखे आहे.

महाराष्ट्र मऱ्हाटयांचा आहे. मऱ्हाठयांचा महाराष्ट्र, इंग्रेजांचा समगोत्री आणि समव्यवसायी जो गुजराथ, त्या गुजराथ्याचे पुढारपण केव्हा हि मान्य करणार नाहीत. प्रांतिक विभागण्या करण्यात तागडी तुकाप्पा गुजराथ्यांची शिवाजीच्या महाराष्ट्राबरोबर मोट बांधण्यांत ब्रिटीश बनिया कंपनीची झालेली चूक सुधारण्याचे महाराष्ट्राला मुळीच कारण नाही. महाराष्ट्राचा मऱ्हाठा घी - शक्कर खाऊ गुजराथ्याचा अनुयायी बनणार? शिवाजीचा मराठा शेतकरी, रण छोड रायजी (युध्दाचे क्षेत्र सोडून पळून जाणाऱ्या) सारख्या आणि तुपाचा शिरा खाणाऱ्या देवाच्या भगताचा भगत बनणार? भांडवल शाहीचा पुरस्कर्ता म्हणून गुजराथेतल्या शेतकऱ्यानी ज्याचा खून पाडला, त्याच्या भावावर शिवाजीचा मराठा शेतकरी विश्र्वास ठेवणार ? इतका बेशरमपणा मराठा शेतकरी खास करणार नाही. शेतकरी म्हटला कीं तो एकजात; मग तो गुजराथी असो, माळवी किरसाण असो, किंवा मऱ्हाठी घाटी कोकण्या असो, पण त्यांच्या अखिल भारतीय संघटनेचा शिस्तवार पाया घालताना, भाषावार प्रांतिक संघ केल्याशिवाय आज गत्यंतरच नाहीं. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्म प्रबोधनाचे प्रयत्न करणाऱ्या ब्राम्हणेतर चळवळीला मूठमाती देण्यासाठी आणि तिच्या पुढाऱ्याना सरकारच्या आणि जनतेच्या अवकृपेला पात्र ठरविण्यासाठी, ज्या ज्या पांढरपेश्या भट भटेतरादि बाण्डगुळ्या समाजानी आजपर्यंत भीमप्रयत्न केले, त्यांच्या सरडेशाही रंगपालटीला मऱ्हाठी शेतकऱ्यानी केव्हा हि भुरळता कामा नये.

पुण्याच्या ज्या टिळकी भट - भटेतरानी धनवडे प्रकरणाचा पराचा कावळा करून, कोल्हापूरच्या छत्रपतीपासून तों थेट टांगेवाल्या म्हादवा पांडवा पर्यंत सर्वांना ‘सावकार’ बनविण्याचा खास डेप्युटेशनी प्रयत्न केला, त्याच केळकरांच्या निशाणाखाली लॅण्डलीगचे ‘कलीग’ (सहकारी) म्हणून मिरविण्यास धाधावलेल्या ब्राम्हणेतरी बृहस्पतीना जनाची नसली तरी मनाची तरी लाज किती शिल्लक असेल, याचीच शंका आहे. राष्ट्रकार्य अभेदाने करावे, हे सूत्र ब्राम्हणेतराना शिकवायला भटांच जरूर नाही. अभेद काय, भेद काय, आम्हाला सगळे समजते. स्वदेशाभिमान भटानाच काय तो ठावा, आणि भटेतर कधीच गेले नाहीत त्या गावा, असाहि प्रश्र्न नाही. पण, भटांच्या पगडी पालटाची हमी जेथे ब्रम्हदेवहि घेऊ शकत नाही, त्थे शेतकऱ्यानी त्यांच्याशी सहकार्य करताना आणि त्यांचे कोणत्याहि बऱ्या वाईट कार्यात पुढारपण पत्करताना, दहाच्या ऐवजी शंभर अंक मोजावे. वाटेल तर जगाचा किंवा आपला अंत होईपर्यंत अंकच मोजीत रहावे.

निदान उजळणी तरी तोंडपाठ होईल, पण पुणेरी टायपाच्या भटांच्या सांसर्गाने अखेर तोंडफाट झाल्याशिवाय मात्र खास राहणार नाही. शेतकऱ्यांच्या जागृतीचे विशेष अभिनंदनीय कार्य बजावलेली ‘ब्राम्हणेतर चळवळ’ आज बर्फाप्रमाणे थिजून गेलेली आहे. तिच्या पूर्वीच्या जलालपणावर शेकडो झब्बूनी आपल्या स्वार्थाचे पापड भाजले आणि आजही उरल्या सुरल्या उष्णतेवर बरेच ब्राम्हणेतर प्राणी आपल्या नकली पुढारपणाचे फाटके कपडे वाळवीत बसले आहेत. ब्राम्हणेतरी मुखपत्रे आणि पुच्छपत्रे जुन्या विधानांचीच लत्करे सध्या धीत बसलेली दिसतात. नवा विचार, नवा कार्यक्रम, नवी धडाडी, संघटणेची नवीन योजना, कोठेच काही नाही. सगळे रेम्येडोक्ये जुनी फाटकी खरडीच घोटीत बसले आहेत. शाहू कालीन् बहुतेक तरूण पदवीधर मराठे पुढारी कोल्हापूर इंदोर बडोद्या सारख्या मराठी संस्थानांच्या चांदीच्या तोबाऱ्यात घुसले.

• पगडी फेटा टोपू उठाव :

काही मराठेतर उरलो तो ‘मराठेतर’ चळवळीच्या विवंचनेत. फक्त एखादे इलेक्शन आले कीं तेवढ्या पुरती पुढाऱ्यांची पैदास आणि बोंबाबोंब; या पलीकडे ब्राम्हणेतर पक्षाचा सध्या काहीच कार्यक्रम किंवा चळवळ नाही. केवळ साठवणीच्या पाण्याचे शेवाळलेले डबके ! या डबक्यातील सगळी शेवाळ, चिखलांचे गळे, फत्तर मुरमाच्या कपऱ्या, नासकी सडकी लाकडे वगैरे अडगळ साफ उचकून काढणारी आणि घाणेरडे पाणी उपसून काढून मूळ झऱ्याच्या स्वच्छ जिवंत पाण्याने हौद भरून टाकणारी एक नव्या कार्यक्रमाची जोरदार योजना श्रीयुत जवळकर यानी नुकतीच ब्राम्हणेतर पक्षापुढे ठेविली आहे. जवळकरांचा जोरदार पम्प एकाद्या ठिकाणी लागला म्हणजे मग तो कोणा कोणाची उचकाउचकी आणि उपसाउपशी करील, याचा नेम नाही.

ही गोष्ट ब्राम्हणेतर चळवळीच्या वैरी ब्राम्हणांप्रमाणेच अनेक ब्राम्हणेतर झब्बूंच्याहि चांगली परिचयाची आहे. मायर्सच्या सुप्रसिध्द पंपाप्रमाणेच जवळकरांच्या पंपाचा एकदा झपाटा चालू झाला की शेकडो नकली दे भ वर आणि भटेतरी झब्बूंवर “Take off your Hat” पगडी फेटा टोपू उठाव करण्याचाच प्रसंग येतो. श्रीयुत दिनकरराव जवळकर हे ब्राम्हणेतर कंपूतले लहानातले लहान आणि तरुणातले तरुण शिंगरु आहे. त्यामुळे, वयाने कामगिरीने आणि प्रसिध्दीने जरठ ऊर्फ वृध्द असलेल्या पुष्कळ पंचकल्याणी अबलक घोडयाना या शिंगराने त्यांच्यावर केलेली मात सहसा सहन होत नाही.

पांढऱ्या काळ्या केसांचा सवतिमत्सर जगाच्या अंतापर्यंत लोकविश्रुत आणि लोकमान्यच राहणार. मात्र या जगाच्या शिंगराने आपल्या तारुण्य प्राप्त तडफडीच्या वाग्लेखन टापानी प्रतिस्पर्ध्यांची जितकी अभिमन्यू प्रमाणे तुफानी दाणादाण उडविलेली आहे, तितकी ब्राम्हणेतर छावणीतल्या एकहि भीष्म द्रोणाने आपल्या लांबलचक आयुष्यात एकदाहि उडविल्याचा दाखला नाहीं. श्री. त जवळकर तरुण आहेत. तारुण्याचे निसर्गसिध्द सर्व गुणदोष त्यांच्या आंगी आहेत. ते विद्यावान् विद्यान् पदवीधर नसले, तरी पदवीधर विद्वानांच्या आंगी सहसा न सापडणारी बुध्दीची कुशाग्रता आणि हवा तो विषय आमूलाग्र चटकन् आकलन करण्याची ग्रहणक्षमता, हाच जवळकरांच्या प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा विशेष आहे. ते साधू संत गोसावी किंवा फकीर नाहीत; ते उघड उघड संसारी आहेत. अर्थात् संसारी वृत्तीच्या पिण्डाला चिकटणाऱ्या सर्व स्वार्थापासून ते अलिप्त असण्याचा संभवच नाही. ज्या अर्थी ते उमलते जवान आहेत, त्या अर्थी तारुण्याला साजेशोभेशा छानछोकी डामडौल आणि उच्छृंखलपणा या गोष्टी त्यानी आताच जर आंगाळल्या तोंडाळल्या नाहीत, तर काय रावबहादुर बोल्यां इतके म्हातापण झाल्यावर त्या नुसत्या बोलाव्या? जवळकर पिढीजात शेतकरी असून, त्यांच्या शेवटचा शेतीचा तुकडा सन १९२५ सालीच गुजर सावकाराच्या भक्ष्य स्थानी पडला. चोराच्या आळंदीचे हे मराठे पाटील. मराठशाहीच्या काळात क्रान्तीच्या तलवारीचा यांच्या पूर्वजांचा फासा जर अंदाजाप्रमाणे हुकमी पडता, तर ‘चोराची आळंदी’ आज ‘सावाची आळंदी’ बनून, जवळकर पाटिलांची जहागिरी म्हणून मिरविली असती ! सावकारी फासात मान अडकलेल्या गरीब शेतकरी पाटलाच्या पोराला कसली शाळा न् कसले शिक्षण ? जगाच्या व्यवहारशाळेतच जवळकरांचे सारं शिक्षण झाले. त्यांच्या विचार - उच्चार - आचाराची घडणी कठोर परिस्थितीच्या घणांच्या घावानीच घडविलेली असल्यामुळे, जवळकरांच्या कोणत्याहि योजनेतला हेमगर्भाचा एकच वळसा, वयोवृध्द ज्ञानवृध्द पुढाऱ्यांच्या काढ्या निकाढयांपेक्षा, विशेष हुकमी आणि रामबाण ठरतो.

• आइस्कीमी विवेकवंतांच्या दृष्टीने :

विचाराने कोणते हि कार्य मग तो आइस्कीमी विवेकवंतांच्या दृष्टीने विधायक असो वा विघातक असो एकदा हाती घेतले कीं, मग त्यात तळमळत्या हृदयाची जळती कळकळ ओतून ते तडीला न्यायचे, मग असं करताना शेंडी तुटो वा पारंबी तुटे, त्याची पर्वा करायची नाही, एवढयाच भांडवलावर जवळकरांचा जवलकरपणा महाराष्ट्राला परिचित झालेला आहे. अनेक दुढ्ढाचार्य पुढाऱ्यांच्या तागडीत जवळकर किती हि हलके ठरत असले, तरी जवळकरी मोठेपणा भटानी वाढविला असल्यामुळे, निदान भटाळलेल्या भटेतरानी तरी जवळकर आणि त्यांच्या विवध चळवळी याना क्षुद्र लेखून, आपल्या ब्राम्हण गुरुमावलीच्या अनंत ‘धनवडी’ यातायातीना क्षुद्र ठरविण्याचा क्षुद्रपणा न दाखविण्यातच झाकल्या मुठीची किंमत सव्वालाख राहिल. जवळकरांचे आद्य कल्पनाचातुर्य (Originality) नावाजण्यासारखे आहे. पण त्याना सहकारी लायक मित्र निवडण्याची अक्कलच नेमकी कमी असल्यामुळे, त्यांच्या पुष्कळ लोकहितवादी कल्पना जन्मताच थोडया दिवसानी मरतात. हा शेरा दुसऱ्या हि रीतीने असा मांडता येईल कीं, अनुकूल देशकालाच्या जन्मा पूर्वीच जवळकरांच्या कल्पना जन्मास येतात. याचे उदाहरण म्हणजे पुणे शिवाजी मराठा मिशन हे होय.

जगातल्या कोणत्या हि मनुष्याला अल्प विधीने ‘मराठा’ जातीत समाविष्टकरून घ्यायचा, हे या मिशनचे ध्येय होये. हे मिशन पध्दशीर चालू होते, तर शुध्दी संघटणाच्या चळवळीचा प्रश्र्न फार सुटसुटीत सुटला असता. पण नवकोट नारायण तुकोजीराव होळकराच्या अमेरिकन बायडीला हळद - भंडारा चोपडून ‘शुध्द मराठीण’ बनविण्यास धाधावलेल्या मराठा पुढाऱ्यानीच शिवाजी मिशनची मात्र भ्रूणहत्या करून, जवळकरांच्या कल्पनेला वांझोटी ठरविली. सहकारी लायक मित्रांची निवड करण्याची कसोटी जर जवळकराना कधि साधली, तर भविष्य काळी ते शेतकरी - स्वराज्य कल्पनेला अभिनंदनीय मूर्त स्वरुप आणतील, यात मुळीच शंका नाही. ‘शेतकरी पक्षा’ चा नुसता आवाज वातावरणात प्रसृत होताच, ‘हे विलायती डोके, हे विलायती डोके’ असा मुंबईच्या एका मटण्या भटाने पुकारा केला. त्याला कोणी झाला तरी पोरसवदाच मानतो. पण ब्राम्हणेतरांतीलच काही भीष्म द्रोणानी पुढचा मागचा काहीच विचार न करता, जवळकर लाल भडक कम्युनिष्ट म्हणून आषाढातच फाल्गुन उरकुन घ्यावा, ही विवेक स्मृती विचार करण्यासारखी आहे.

• ‘उं:’ या आक्षराच्या लांबी - रुंदीचे थडगे :

‘कम्युनिष्ट’ ही सरकारी शिक्क्याची नवीन दगलबाज (Diplomatic) शिवी जन्माला आली; म्हणून तिचा पहिलाच प्रयोग करून पाहण्याची ही जर निवळ हौस असेल; किंवा तीन शतके स्थानाच्या पिण्ड प्रकृतीचा चिकित्सक अभ्यास करणाऱ्या ब्रिटीश नोकरशाहीच्या मुत्सद्देगिरीच्या ताकातले हे अभिनव नवनीत लागते तरी कसे, इतक्याच मजलीची जर ही जिज्ञासा असेल; अथवा माय बापाने केले टुर्र म्हणून पोरानी केले टुर्र, एवढी माकडी नक्कलच यात असेल, तर झालेल्या प्रकाराला ‘उं:’ या आक्षराच्या लांबी - रुंदीचे थडगे पुरे आहे. ‘ब्राम्हणेतर’ चळवळ खास शेतकऱ्यांसाठी, परंतु ‘ब्राम्हणेतर’ नावात मात्र सगळा क्षात्र घोटाळा ! या घोटाळ्यामुळेच आजपर्यंत ध्येयाची निश्र्चिति कोणालाच नीट ठरवता आली नाही आणि आज तर हवा तो लफंगा ‘ब्राम्हणेतर’ शब्दाचा हवा तो अर्थ बसवून, वाटेल तो स्वार्थ साधू धुडगूस घालीत बसलेला आहे. या बेबंद शाहीला यापूर्वीच कोणी तरी पायबंद लावणे जरूरीचे होते. पुढारी जर थंडगार पडले, तर त्याना उचकून देऊन नवीन पुढार मंडळ निवडण्याचा अधिकार अनुयायांचा असतो. परंतु आमच्या शेतकऱ्यांची इतकी तयारी झालेली नसल्यामुळेच, शेंदूर फासून येईल तो म्हसोबा ते निमूटपणे मान्य करीत असतात.

पुढाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चळवळीत जर राम उरला नसेल, तर पुढाऱ्याना रामराम ठोकून चळवळीत राम तरी आणला पाहिजे, अथवा चळवळीलाच राम तरी म्हणायला लावले पाहिजे, याशिवाय अनुयायाना तिसरा मार्गच नाही. ‘ब्राम्हणेतर पक्ष सुधारा नाहीतर मरा’ (Mend or End) असा सडेतोड सवाल श्रीयुत जवळकरानी पक्षाच्या पुढाऱ्यां पुढे टाकण्यात लक्षावधि शेतकऱ्यांच्या वतीने वकिली केली आहे. शेतकऱ्याना बोलता येत नाही, म्हणून शेतकरी पिण्डाचे जवळकर त्यांच्यासाठी बोलत आहेत. जवळकरी योजना निर्दोष नाही. पण तिच्यात जोम आहे, कार्यक्रमाची नवी धडाडी आहे आणि भावी शेतकरी स्वराज्याच्या कल्पनेचे अमर्त्य तत्व त्यात धमधमत आहे. योजनेचा बरा - वाईटपणा व्यक्तीकडे पाहून ठरविणे मूर्खपणाचे आहे.

• माय बाप सरकार काय म्हणते -

बालादपि सुभाषितं ग्राह्यम् न्यायाने जवळकरांचे अल्पवय दृष्टीआड करून, त्यांच्या योजनेतील तत्वांचा भारदस्तपणा व दूरवर पोहचणारे परिणामच विचारात घेणे अगत्याचे आहे. माय बाप सरकार काय म्हणते; नोकर शाहीच्या डोळ्यांवर सध्या कोणत्या रंगाचा चष्मा चढला आहे; लोकमान्यता आणि राजमान्यता या दोन हि टेबलांवर माझे बस्तान नीट बसेल कीं नाही; ‘मुणशिपाल्टी’ आणि ‘कोणशीळ’ ला मी मुकलो किंवा हुकलो, तर गावात माझी किंमत किती गंडे चढेल उतरेल; असल्या विचारांचा विवेक सिंधु ढवळणाऱ्या ढवळ्या पवळ्यांची ढब्बु शाही पहिल्याच सलामीला नेस्तनाबूद करणाऱ्या जवळकरी योजनेचे विरोधक कोण कोण आहेत, तिकडे शेतकऱ्यानी नीट लक्ष दिल्यास, त्याना आपल्या शत्रू मित्रांची पारख डोके न खाजविता हि लवकरच करता येईल. जवलकरांची शेतकरी पक्षाची योजना गेल्या २ - ३ वरात त्यांच्या विचार विनिमयाच्या आणि आंदोलनाचा परिपाक आहे. मी पुण्यास असताना या विषयावर माझ्या बरोबर त्यानी अनेक वेळा खल केलेला आहे. कोणती हि सुधारणा घडवून आणावयाची तर तेवढयासाठी परदेशी चळवळीची किंवा तत्वांची नुसती नाटकी नक्कल न करता, हिन्दू समाजांच्या पिण्ड प्रकृतीचा खोलवर विचार करून, ती त्याना सहजपणे कोणत्या रीति रुपात उत्क्रान्त करता येईल; उत्क्रान्तीच्या मार्गातले आणि निकटचे प्रतिस्पर्धी कोण आणि अडचणी कोणत्या; आणि त्या दूर करण्याचे अथवा कायम चेचण्याचे उपाय कोणते; इत्य़ादि साधक बाधक गोष्टींचा दूरवर विचार करूनच जवळकर आपल्या योजनेने ब्राम्हणेतर पक्षाच्या गारठलेल्या देहात नवचैतन्याचा उबारा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. हिन्दी शेतकरी ‘भाकरी - भाकरी’ करून मरत असता, इंग्रेज सरकारच्या कारकुण्ड्या ‘बामनेतरी’ शंखांच्या मूर्खपणाला पायबंद ठोकायला शेतकरी स्वत:च सर्वसमर्थ व्हावा, आणि शेतकऱ्याचा उध्दार सामाजिक धार्मिक किंवा राजकारणी फोल ठरलेल्या बोलात नसून

अर्धी भाकरी दर एकाला ।
नंतर श्रीमंता पोळी ।।

असल्या आर्थिक क्रांतीच्या चकमकीत हे, हे अखिल भारतीय शेतकऱ्याना सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट दिसावे, एवढीच योजनेची मुख्य विवंचना आहे. हिन्दुस्थानाचा शेतकरी आपल्या पिढीजात नांगराला पारखा होऊ नये, मातीतून सोने काढणारा हा जग प्रसिध्द हिन्दी किमयागार शेतीला मुकून मजुरीच्या मोहाने मायदेशाला मुकू नये; आणि ‘शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी’ ही गोल्ड स्मिथची उक्ती प्रत्यक्ष वस्तुस्थितीत उतरून, या शेतकी प्रधान भारत खण्डाचे स्वराज्य शेतकऱ्यांच्या खास हुकमतीनेच चालावे, यापेक्षा अन्य कसलाहि कटाक्ष जवळकरी योजनेत होत नाही.

• सावकारी फासाचे धागे - दोरे :

गोम्याचे अमृत सोन्याला विष ठरत असते. हा मानवी स्वभावाचा धर्मच आहे. शेतकऱ्याला आरपार पोखरून त्याचा खोका बनविणाऱ्या लहान मोठ्या खास देशी जळवांची सांगड, त्याच्या चंद्रमौळी झोपडीत वित्य घुसणाऱ्या पंचागपण्डित जोशी पाटील कुलकर्ण्यापासून तों त्याच्या भाईबंध पुरूष बायकाना गिरण्याच्या व कारखान्यांच्या मजुरीत मळणाऱ्या भांडवल्यांपर्यंत, एकसारखी बिनतोड लागलेली आहे. त्याच्या गळ्याला लागलेल्या सावकारी फासाचे धागे - दोरे उकलण्याचे एकादे कमिशन सरकारनेच नेमून पहावे, म्हणजे त्यात कोणकोणत्या वर्गाचे वीरपीर असतात, त्याचा तेव्हाच छडा लागेल. मारवाडी गुजर पठाण आणि ब्राम्हण हे तर उघड उघड सावकारीचे कर्मयोगी. हवे प्रमाणे त्यांचा संचार सर्वत्र असतोच. पण या महात्म्यांशिवाय शेकडो भट भटेतर वकील मामलतदार मुनसफ सबरजिष्ट्रार पाटील तलाठी इत्यादि बाण्डगुळ्या मध्यम वर्गाचे प्राणी सुध्दा शेतकऱ्यांवर चरताना आढळतील. खुद्द ब्राम्हणेतर पक्षाच्या पुढाऱ्यांच्या फलटणीत हि शेतक-यंच्या सावकारीवर जगणाऱ्या भांडवल शाही श्रीमंत जळवा अनेक आहेत.

जवळकरी योजनेच्या पम्पाच्या सोसाट्याचा पहिला सपाटा सावकार शाहीच्या उच्चाटनावरच आघात करणारा असल्यामुळे, केवळ श्रीमंताच्या उबाऱ्यावर पुढारपणाच्या स्थान महात्म्याला चटावलेल्या ब्राम्हणेतरी झब्बूंची दाणादाण उडाली असल्यास नवल नाही. असल्या बऱ्याच झब्बूंचा ऋणानुबंध आणि सार्वजनिक अस्तित्व माबाप नोकरशाहीच्या कृपा कटाक्षात, नाकातल्या नथीप्रमाणे, अडकलेले असल्याने, त्यांच्या स्वार्थावर जवळकरी योजनेचे रखरखीत निखारे पडल्याबरोबर उडणाऱ्या त्यांच्या भांडवल्या संतापाच्या भडक्याचे भाषांतर राजद्रोह कम्युनिझम बोलशेविझम किंवा आणखी कसल्या तरी मसण्या जवऱ्या ‘झम’मध्ये करण्याविषयी सरकारला चिथवण्याचेहि प्रयत्न होतील. असल्या प्रयत्नांत भिक्षुकशाहीचा भट पिण्डप्रविण असल्यामुळे, लताबाज भट आणि मत्ताबाज भटेतर भांडवल्या यांच्या गंगा यमुनेचा संगम केव्हा तरी कोठल्या तरी प्रयागावर झाल्या शिवाय राहणार नाही. उध्दरेत् आत्म आत्मानम् स्वत:चा उध्दार स्वत:च करून घ्यावा लागतो, शेती जर राष्ट्राचा प्राण, तर शेतकरी त्या राष्ट्राचा स्वराज्य सूत्रधार झालाच पाहिजे.

• शेतकऱ्यांची अपमानकारक टिंगल :

“तेली - तांबोळी - शेतकऱ्याना कौन्सिलात जाऊन काय नांगर हाकायचे आहेत?” अशी खेडवळ शेतकऱ्यांची अपमानकारक टिंगल करणाऱ्या टिळकांचे बडवे सुध्दा आज “होमरुल लीग पेक्षा लॅण्डलीग बरी” म्हणून नाटकी कबुल्या देत आहेतय सर्व समर्थ आणि सर्वभक्षक काळाने ‘हस्तिनापूरच्या साम्राज्य सत्तेची सूत्रे खेळविणारा पटाईत खेळाडू कोण?’ असा प्रश्र्न हिन्दुस्थानापुढे टाकून, अनेक प्रबुध्द हिन्दु आणि मुसलमान समाजांच्या परीक्षा घेतल्या आहेत. त्यात सगळे समाज नापास झाले. दिल्लीच्या सार्वभौमत्वाच्या किल्ल्या वैदिक हिन्दु, बौध्द हिन्दु, काबुल्ये पठाण, कंदाहारी मोगल, आणि कडवे रजपूत यांच्या हाती देऊन पाहिल्या. त्यानी आपली नालायकी सिध्द केली. दक्षिणेतल्या म-हठ्याना आणि चित्पावनां सारख्या अवचित ब्राम्हणाना हि साम्राज्य प्राप्तीच्या वाटेवर उभे केले. त्यानी हि त्या संधीचा डुकरां पुढे मोत्यांची रास असा दुरुपयोग केला. हिन्दी समाज नापास झाल्यावर, सातासमुद्रा पलीकडच्या जंबुव्दीपस्थ गोऱ्या महादेवांची दिल्लीच्या तक्तावर योजना झाली. गेल्या शंभर वर्षात त्यानी आपल्या कदरबाज एकसूत्री राजदण्डाचा अंमल आसेतू हिमाचल बसवून, राजकारणा पुरता सबंध हिन्दुस्थान जरी साखळी-सखल केला अकला, तरी त्यांच्या नंदीच्या नोकरशाहीच्या—मदांध वर्तनाने राज दण्डाच्या पूर्वीच्या ज्ञिलईला अलीकडे बराच गंज चढलेला आहे.

विषेषत: प्रगमनशील काळाच्या अखंड प्रवाहात पूर्वीच्या राजेशाहीच्या (Monarchy) कल्पना आणि त्याविषयीचा जनतेचा आदर आज साफ नष्ट होऊन, त्याची जागा लोकशाहीच्या (Democracy) नव्या कल्पनेने पटकावली लिहे. हिन्दुस्थानाच्या पिण्डाला झोंबलेल्या राजेशाहीच्या व्यक्ति महात्म्याचे बण्ड सोडून, त्या ठिकाणी समष्टीप्रधान सोकशाहीचे दणदणीत बीजा रोपण करण्याचे श्रेय इंग्रेजी भाषा आणि इंग्रजी सत्ता यानाच दिले पाहिजे. हिन्दुस्थानाच्या राष्ट्रीय आत्मशुध्दीसाठी इंग्रेजी सत्तेचीच जरूर होती आणि आजला ती आहेहि. इंग्रेजांच्या निकट सांनिध्यामुळेच भारत खण्डाच्या शेकडो राष्ट्रीय पातकांवर शोधन प्रकाश पडला, स्वदेशी व परदेशी शत्रू मित्रांचा परिचय झाला आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकशाहीचे साध्य साधण्यासाठी समाजकारणीं राजकारणी आणि आर्थिक बण्डे पध्दतशीर कशी करावी, याचे शिस्तीचे शिक्षण हिन्दुस्थानात इंग्रेजी राजसत्तेनेच प्रथम प्रचलित केले. हिन्दुस्थानाच्या जीवनात सध्या जो क्रान्तीचा खळबळाट उडाला आहे, त्याचे मूळ ब्रिटीश गुरुमावलीच्या लोकशाही गायत्री मंत्रातच सापडणारे आहे. या मंत्राच्या पुरश्र्चरणाच्या सिध्दी विरुध्द नोकर शाही नंदीचा विरोधी थैथयाट पूर्वी कितीहि झाला आणि सध्या हि चालू असला, तरी गेल्या २० वर्षात हिन्दी लोकशाहीची बरीच सत्ता हस्तगत करून, तिच्या रावणी अरेरावीला पायबेडी ठोकली आहे. भावी हिन्दवी स्वराज्याची रुपरेषा आणि स्वरुप कसे असेल, हा भविष्य काळाचा प्रश्र्न भविष्य काळ सोडवील.

• निवडणुकीच्या हंगामात :

सध्या राज्य कारभाराच्या यंत्राची नवीन मांडणी करणा-ऱ्या राजकीय सुधारणांच्या हप्त्यांची पर्वणी आलेली आहे. सध्या जेवढे राजकारणी हक्क हिन्दुस्थानाला मिळालेले आहेत, तेवढे सगळे मध्यम वर्ग्या सुशिक्षित बाण्डगुण्यांतील कज्जेदलाल वकील, भिक्षुकशाहीचे भट आणि भांडवल शाहीचे पित्ते यानी बळकावलेले आहेत. निवडणुकीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या पायांवर पगड्या लोळवून जरी हे त्यांच्या मताची याचना करतात आणि अखेर शेतकऱ्यांच्याच मतांनी कौन्सिलर मिनिस्टर बनतात, तरी शेतकऱ्यांच्या पक्षाची कदरबाज संघटना उभ्या हिन्दुस्थानात कोठेहि नसल्यामुळे, हातीं आलेल्या अधिकारांची अंमल बजावणी करताना, या झब्बूना शेतकऱ्यांची कसलीच पर्वा राहात नाही; आणि त्यांचे कान पकडण्याची शेतकऱ्यांजवळ काही शक्ती हि नसते. मताला शेतकरी, सत्तेला झब्बू असा प्रकार बोकाळला आहे. सगळेच झब्बू शहरी, बाण्डगुळ्ये आणि भांडवल्ये त्याना आपल्या हितापुढे कशाची हि पर्वा नसते. आजचे येथील ब्रिटीश राजकारण म्हणजे याच शेतकऱ्यांच्या वैऱ्यां इलेकशनी जहागीर होऊन बसले आहे. ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ म्हणून काही ‘ब्राम्हणेतर’ पात्रे या मजलसीत असली, तरी त्यात एक दोन अपवाद सोडून बाकी श्रीमंत झोटिंग, बुरखेबाज भांडवल्ये आणि पढत मूर्ख यांचेच प्रमाण अधिक दिसून येते. अशात आणखी काही मराठे संस्थानीक आपापले पित्ते निवडणुकीच्या धामधुमीत खालसात पाठवून, शेतकऱ्यांची चाळवा चाळव आणि निष्कारण भुलभुलावणी करतात, ती वेगळीच. सर्व पापे पत्करली, पण कजे दलाल वकीलाचे पाप परवडत नाही. वकीलीचा धंदा मूलत: केवढा हि थोर आणि किती हि सर्वस्पर्शी असला, तरी हिन्दी वकिलांच्या फलटणी, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने, राजकारणात भाग घेण्यास सर्वस्वी नालायक आहेत. जनतेने त्यांच्या पोटार्थी बाण्डगुळ्या डोक्यांवर राजकारणाची जबाबदारी टाकणे अनर्थावह आहे. पूर्वी भोळसट जनता पदव्यांच्या झकाकीला बाचकत असे व त्यांचा त्याना बाऊहि वाटत असे. पण पाश्र्चात्य बेदरकारी वृत्तीवर पोसलेले आजकालचे धंदेवाईक पोटार्थी वकील हे शुध्द कज्जे दलाल असल्यामुळे, राजकारणा सारखा महत्त्वाचा, शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याच्या जबाबदारीचा विषय त्यांच्या हाती निर्धास्त सोपवणे, बरेच धास्तीचे आहे.

इतर धंद्यांपेक्षा वकीलीच्या धंद्यात थोडी अधिक स्वतंत्रता व फुरसद असते. त्यामुळे, रिकाम्या न्हाव्याच्या भिंतीच्या तुंबड्याप्रमाणे वकील लोकांनी टेनिस बिझिकाप्रमाणेच राजकारणी लेक्चर बाजी हाती घेण्याचा धूमधडाका चालविलेला आहे. अस्सल मुत्सद्याची मुत्सदगिरी आणि या कज्जेदलालांची तोंड पाटिलकी या दोनहि गोष्टींत गोऱ्या काळ्याचे अंतर आहे. पोट भरण्याचा ज्यांचा धंदाच मुळी बिन काळजाचा, त्यांच्या हातून राजकारणी धकाधकीचे मामले किती काळजीने आणि सहृदयतेने चोखाळले जात असताल, याचा विचारवंतानी विचार करावा. राजकारणी क्षेत्रात, भांडवल्यांच्या बरोबरीने कज्जे दलाल वकीलांचा भरंसाट सुळसुळाट माजल्यामुळे, सध्याचे हिन्दी राजकारण नाटकी बनले आहे. त्यात हृदयाची तळमळ नाही, बहुजन समाजाच्या अर्थात् शेतकऱ्यांच्या हिताची कळकळ नाही, काही नाही. पक्ष पंथ भेदाची युध्दे केवळ कज्जेदलाली आचरट पणानेच सर्वत्र चालालेली आहेत. शेतकऱ्याच्या रक्तावर जगणाऱ्या या नानाविध शहरीं बाण्डगुळ्यांच्या धडपडी शेतकऱ्यानी नीट लक्षात घेणे अत्यंत जरुरीचे आहे. सध्याच्या भांडवल शाही आणि कज्जे दलाली राजकारणाला पायबंद लावण्यासाठी अखिल भारत खंडाला एकजात शेतकरी संघटित झाला पाहिजे. त्याने आपली एक नव्या चैतन्याची शक्तीच निर्माण केली पाहिजे. विद्यमान असलेले कोणते हि पंथ आणि पक्ष त्याच्या उपयोगी पडणार नाहीत. सबंध हिन्दुस्थानचा शेतकरी अभेदाने एकवटला, तर त्याच्या संघटनेचा ब्रिटीश पार्लमेण्टावर जेवढा दणक्याचा दाब बसेल, तेवढा शहरी बाण्डगुळ्यांच्या तोंडाच्या वाफाऱ्याचा जगाच्या अंतापर्यंत बसणार नाही. दिल्लीच्या किल्ल्यांचा जुडगा खुळखुळविण्याचा या पुढचा योग भारतीय शेतकऱ्यांचा आहे. जे ब्रिटीश पार्लमेण्ट गेली अनेक शतके भांडवल शाही आणि सरदार शाहीची जन्म प्राप्त वतनी जहागीर होऊन बसले होते, तेच कुदळ्या मजुरानी आणि नांगऱ्या शेतकऱ्यानी पूर्ण काबीज करून, इंग्लंडचा मजूर ब्रिटीश साम्राज्य सत्ताधारी जर बनू शकतो, तर तोच प्रयोग आमच्या हिन्दी शेतकऱ्याना यशवंत करून दोखविता येणार नाही काय? अलबत् आलाच पाहिजे. शिस्तीची संघटना आणि ध्येयाची तळमळ इकडची दुनिया तिकडे करील. मग ‘शेतकऱ्यांचे स्वराज्य’ हा आजची कल्पना सृष्टीतील घटना प्रत्यक्ष सृष्टीत अवतरलेली, प्रस्तुत लेखकाला पाहण्याचा योग न आला तरी परवडला ! अलम दुनिया त्याच्या नांगर चिन्हांकित राष्ट्रध्वजाला मुजरा करील.

• ‘शेतकऱ्यांचे स्वराज्य!’ कल्पना फार गोड :

‘शेतकऱ्यांचे स्वराज्य!’ कल्पना फार गोड. पण तिच्या साघ्याचा मार्ग अनंत परिश्रमांच्या आणि प्रतिकारांच्या काट्याकुट्य़ांनी भरलेला आहे. शेतकरी पक्ष स्थापन करून, शेतकरी स्वराज्याचा मार्ग अखिल भारत खंडाला महाराष्ट्रातील शिवाजीच्या मावळ्यानी दाखवावा अशी मनिषा श्रीयुत जवळकरानी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा कैवारी म्हणविणाऱ्या ब्राम्हणेतर पक्षानेच या नवीन स्वराज्याचे नांगरी ध्वजारोपण करून स्वराज्य संस्थापक शिवरायाचा हा नवावतार जगाला दाखवावा आणि ब्रिटीश मजूर मंत्रि मंडळाच्या तोडीस तोड आणि जोडीस जोड असं बिन्दवी शेतकरी मंत्रि मण्डळ हिन्दी पार्लमेण्टात बसवून, सम्राट जॉर्ज बादशहांची महत्वाकांक्षा याच देही डोळा त्याना फलवति झालेली दाखवावी, या जवळकरी योजनेची किंमत भविष्य काळानेच ठरलिलेली बरी.

भारत खंडाच्या उध्दाराचा हा प्रश्र्न ब्राम्हणेतर पक्षाने हाताळला नाही, तर त्याने आता जगण्या पेक्षा लवकर मरण्यातच अब्रूचा बचाव आहे. अखिल भारतीय शेतकरी पक्ष जन्माला आला पाहिजे, ही वातावरणात घुमत गेलेली कल्पना आता ठार मारणे शक्य नाही. तपशीलाचे आणि कार्यक्रमाच्या पधदतीचे रंग बवे तितके बदला आणि ते बदलणारच ! पण तत्वाचा मत्यू काळाच्या काळाला करता येणार नाही. काळाच्या पोटी जन्मलेली कल्पना जर काळच खाऊ लागला, तर त्याला भट किंवा भाटी यापंक्षां अधिक महत्व कोण देणार? शेतकरी पक्षाची घटना, तत्वे आणि कार्यक्रम कसा असावा, याची चिकित्सा करणे, हा या पुस्तकाचा उद्देश नाही. शेतकऱ्यांच्या आधी व्याधी शेतकऱ्याच उत्तम कळतात. त्या त्यानी संघ शक्तीच्या सर्व सामान्य बळाने नष्ट करण्यासाठी कंबर कसली कीं पुढचे मार्ग आपोआप दिसू लागतात. शेतकरी स्वराज्य़ाची हिन्दुस्थान वाट पहात आहे या कल्पना रम्य भावनेने विचारांत केलेली क्रान्ति मी विचारवंत राष्ट्रकार्यकर्त्यां पुढे मोकळ्या मनानें मांडली आहे. आता फक्त हिन्दुस्थानाच्या शेतकरी स्वराज्याच्या राष्ट्रीय निशाणा बद्दल माझे विचार व्यक्त करून मी या सत्प प्रकरणात्मक पुस्तकाची समाप्ती करणार.

• गांधीच्या चरख्या निशाणात :

राष्टांची निशाणे व्यक्तीच्या लहरींतून निर्माण होत मसतात. त्यांच्या रंग रूप आणि चिन्हांच्या मागे अभ्युत रम्य क्रांतीच्या झटापटींचा जाज्वल्य आणि चित्तवेधी इतिहास उभा असतो. राष्ट्रीय निशाणा प्रमाणेच राष्ट्रगीताची गोष्ट. ‘गॉड सेवह अवर ग्रेशस किंग’ या इंग्रेजी राष्ट्रगीताचा नुसता सूर कानी पडताच, इंग्रेज आदमी आपोआप गंभीरपणाने चटकन् टोपी काढतो; आणि आमचे ‘वन्दे मातरम्’ गीत मुला - मुलींचा तांडा मोठ मोठ्याने ओरडून गाऊ लागला तरी, “अहो, राष्ट्र गीत हे उभे रहा” असे आम्हाला टपली मारीन कोणीतरी सांगितले म्हणजे मग आम्ही “काय शिंपी पिडा ही !” या उद्गारांसह उभे पाहतो. या गोन गीतांतल्या भावनेच्या भेदाचा कोणी तरी कधी विचार केला आहे काय? भगवा झेंडा या उद्गारात जी जादू भरल आहे, ती गांधी प्रणित चरखांकित ‘राष्ट्रीय’ ब्रुव निशाणात काय आहे? ‘चरखा’ म्हटला कीं महात्मा गांधीना ब्रम्हानंद होत असेल. पण व्यक्तिचा ब्रम्हानंद समष्टीत मुरण्या सारखा असा काय मोठा क्रान्तिकारक इतिहास चरख्याच्या मागे उभा आहे? भगवा झेंडा महाराष्ट्रातल्या मऱ्हाट्यांचा असला, तरी त्याच्या पराक्रमाचा धौशा पूर्वेस बंगाल्.पर्यंत, उत्तरेस थेट अटके पर्यंत, आणि दक्षिणेस सेतुबंध रामेश्र्वरापर्यंत दणाणलेला आहे. मऱ्हाठ शाहीत भगव्या झेंड्या खाली मुसलमान आरब आणि रोहिल्यांच्या फलटणी सुध्दा इमाने इतबारे लढत असत. मऱ्हाठ्यांच्या त्या भगव्या झेंड्यात हिन्दु - मुसलमान, ब्राम्हण- ब्राम्हणेतर किंवा स्पृश्या स्पृश्य असला कसला हि भेद नव्हता. बिन्दवी स्वराज्य या व्यापक भावलेचे ते भेदळून्य खरेखुरे राष्ट्रीय प्रतिक होते. सध्याच्या गांधीच्या चरख्या निशाणात भेदांचे रंग स्पष्ट दाखविले असून, त्यांवर ऐक्याचा लटका आरोप करण्यात आलेला आहे. तांबडा आणि हिरवा रंग जरी गळ्यात गळा घालून शेजारी बसलेले दिसतात, तरी प्रत्यक्ष व्यलहारात हिन्दु आणि मुसलमानांचे प्रेम व आदर केवढा पाघळत आहे, ते यहाणाराना खास दिसत आहे. विशेषत: प्रस्तुत निशाणा वर काढलेले चरख्याचे चित्र अनाकर्षक आणि आक्षेपार्ह आहे.

चरखा हे गांधी भगवंताचे सुदर्शन चक्र असले, तरी हिन्दुस्थानाच्या गुलामगिरी वर तेच एक रामबाण औषध आहे, या शामाळू तत्वावर खुद्द मोठ मोठ्या पुढारी बुवातच जेथे मतभेद व अंधविश्र्वास, तेथे चरख्याचे माहात्म्य अखिल हिंदी जनतेला पूर्ण मान्य आहे, असे म्हणणे शुध्द दांभिकपणाचे होईल. चरख्याची घरघर गांधी भक्तांच्या चर्पट पंजरीत जरी मनमुराद बोकाळली होती, तरी चरख्याच्या वेदान्ताला कोणीहि मान्यता दिलेली नाही. प्रतिक चिन्हांची प्राण प्रतिष्ठा जनतेच्या आत्म यज्ञाने सिध्द व्हावी लागते. ते चिन्ह पाहताच, किंवा त्याचे नुसते स्मरण होताच, जनतेच्या आत्म्याला कळवळ्याचा पिळवट तरी पडला पाहिजे एक, अथवा चित्तवृत्ति एकदम खळबळून सोडणारा एकादा चिरस्मरणीय ऐतिहासिक क्रान्तीचा प्रसंग त्याच्या मागे उभा पाहिजे एक. असले फसले चैतन्य चरख्यात आहे की त्याची योजना ‘राष्ट्रीय’ झेंड्यावर होताच, जनतेच्या वृत्ति एकदम खळबळाव्या? चरख्याच्या योजनेत फार झाले तर व्यक्ति माहात्म्य असेल, पण ते मानसिक दास्यसूचक असल्यामुळे, राष्ट्रीय झेंड्या वरची त्याची योजना सर्वमान्य होणे शक्य नाही. निदान, शिवाजी महाराजांच्या भदव्या झेंड्याच्या अभिमानी कट्टा शेतकरी महाराष्ट्र या शामळूं चरख्याचे महात्म्य केव्हा हि कबूल करणार नाही. त्याला कसली हि मानयता देणार नाही व आज देतहि नाही.

ब्रिटिशांच्या राज्य सत्तेपूर्वी एकमुखी एकसूत्री सार्वभौम सत्ता हिन्दुस्थानात कधीच नव्हती.हिन्दी लोकाना एक राष्ट्रीयत्वाची काही कल्पनाच नव्हती, तर अखिल हिन्दुस्थानाला अभेदाने मान्य असणाऱ्या चिन्हाचा राष्ट्रध्वज कोठून येणार? इंग्रेजां सारख्या तात्या पंतोजीच्या कडव्या दण्ड नीतीमुळे एक राष्ट्रीयत्वाचा जिव्हाळा सध्या थोडाथोडा पाझरू लागला आहे. आंतरराष्ट्रीयत्वाची भाषा थोडी थोडी उमटू लागली असली, तरी वाळूचे बोबडे बोल या पेक्षा तिला जास्त महत्त्व नाही. अशा वेळी हिन्दुस्थानाच्या राष्ट्रीय ध्वजावर कोणते चिन्ह ठेविले असता, ते एकजात हिन्दी जनतेला वंदनीय आणि स्वाभिमान प्रेरक होईल, याचा विचार करणे अगत्याचे आहे. असे करताना व्यक्तीत्वाला दृष्टी आड ठेवून, समष्टीच्या बहुजन समाजाच्या भावनेचाच विचार केला पाहिजे. हिन्दुस्थान शेतीसाठी जगप्रसिध्द आहे. शेती हेच त्याचे जीवन, तोच त्याचा देव आणि तोच त्याचा मोक्ष. हिन्दुस्थान शेतीच्या मातीतून भरपूर सोने काढीत होता, म्हणूनच तो सुवर्ण भूमि म्हणून त्रिलोक विश्रुत होता. अखिल भारत खंडातल्या सर्व समाजांच्या पूर्व इतिहासाची निर्दय छाननी केलीं, तर ब्राम्हण व पारशी समाज वगळून बाकीच्या सर्व जातीचे हिन्दी समाज अस्सल शेतकरीच असल्याचे प्रत्ययाला येईल.

• शेतकरी बळीराजा आहे :

परिस्थितीच्या पालटामुळे हे समाज आपल्या पिढीजात नांगराला पारखे होऊन, साधेल ते इतर व्यवसाय करीत असले, तरी प्रत्येक जण जर आपापल्या घराण्याचा वंशवृक्ष मुळाच्या दिशेने शोधीत गेला, तर ढोपरभर चिखलाच्या शेतात नांगर धरून उभा असलेला त्याचा आजा पणजा त्याला खास दिसल्या शिवाय रहाणार नाही. बोरूच्या कांडऱ्यावर पोट बांधून जगणारा पांढर पेश्या कायस्थ प्रभू समाजच दाखल्यासाठी घेतसा. तरी शिवकाळापूर्वी त्याचे बापजादे नांगर देवाच्या भक्ति योंगातच रंगलेले आढळतील. आज सुध्दा मावळात खास शेती करणारे अस्सल कायस्थ प्रभू शेतकरी पुष्कळ आहेत. विशेष लक्ष्यात ठेवण्याची गोष्ट म्हणजे केवळ मजुरीवर जगणाऱ्या पिढी जात मजूर जाती पूर्वी हिन्दुस्थानात नव्हत्या. कारागीर जाती अनेक असत. परंतु शेतकी सांभाळून फावल्या वेळात कारागिरीची आणि मजुरीचीहि कामे त्या करीत. अर्वाचीन गिरण्या कारखान्यानीच त्यांच्या शेतीची माती करून, त्याना खास मजूर जाती बनविलेल्या आहेत. त्याना प्राणापेक्षा प्यार असलेला नांगर परीस त्याना पारखा करून, त्यांच्या हाती घण कोयता कोंबण्यात आलेला आहे. आजचा मजूर भांडवल शाहीच्या चापातला बळी असला, तरी हाडा मासाने आणि भावनेने तो नांगर देवाची पिढीजात उपासना करणारा शेतकरी बळीराजा आहे. गिरणी कारखान्यांतल्या घणांच्या घावानी आज तो आपल्या पोटाची खळगी भरीत असला, तरी त्याची नांगर देवाची आठवण त्याच्या मृत्यू बरोबर हि मरत नाही.

संपाच्या वणव्यात भाजून निघालेला मुंबईचा प्रत्येक गिरण बाबू ऊर्फ मजूर आपल्या कर्म प्राप्त हातोड्याच्या नावाने हातबोटे चोळीत, बापजाद्यांच्या नांगराची आठवण करून धाय मोकलीत बसला आहे. त्याला आज गांधीच्या चरख्याची आठवण होत नाही. किंवा बाण्डगुळ्या कम्युनिष्ठांच्या पुस्तकी पापाने त्यांच्या छातीवर निष्पाप भक्ती चिकटत नाही, चिकटणे शक्य नाही. जो पर्यंत हिन्दी शेतकरी नांगर देवाची एकनिष्ठ भक्ती करीत होता, तोपर्यंत शेकडो दुष्काळातहि तो कळणा कोंड्याला महाग झाला नाही, नांगराने उपाशी मारलेले एकह घर उभ्या हिन्दुस्थानात सापडणार नाही. पण नांगराला धि:कारून, भांडवल शाहीच्या हातोड्यावर भाळून पडलेल्या लोकांना शेतकऱ्यांचे ‘मजूर’ बनलेल्याना खास सुबत्तेच्या दिवसात हि तोच हातोडा मारून, विळ्याने मान कापून घेण्याचा प्रसंग बिनचूक कसा येतो, हे संपांच्या वावटळीने आता चांगलेच शिकविले आहे. संपांच्या इभ्रतीसाठी पोटावर दगडी पाटा ठेवून, मुंबईस उपाशी मरत पडलेल्या गिरणी कामगारांच्या धावण्याला गांधींचा चरखा धावत नाही आणि सपाट समाज पटु कम्युनिष्ठांचा हातोडा कोयतादि कोरडलेल्या घशात पाण्याचे दोन घोट ढकलीत नाहीं.

• अनंत विचारांचे समुद्र मंथन :

उपासमरीने डोळ्यांपुढे चमकणाऱ्या काजव्यांच्या लखाकींत आज त्या बिचाऱ्याना आपला कुळ स्वामी नांगर दिसत आहे. त्यांच्या सर्व सुख दुःखाचा, भूत वर्तमान भविष्याचा, त्यांच्या हासाचा आणि भावी वैभवाचा सारा इतिहास सिनेमाच्या चित्रपटाप्रमाणे त्याना नांगरात हालता बोलता आज दिसू लागला आहे. नांगराची आठवण आज त्याच्या हृदयात अनंत विचारांचे समुद्र मंथन करीत आहे. ‘माझ्या वाडी - वडीलांना ज्या नांगराने पूर्वी चुकून सुद्धा कधी दगा दिला नाही, त्या नांगराने मला खास उपाशी मारले नसते.’ या एकाच विचाराने तो आज तल्लीन झालेला आहे. या त्याच्या तल्लीनतेपुढे गांधींचा चरखा आणि कम्युनिष्ठांचा हातोडा कोयता. म्हणजे त्याच्या खचत्या हृदयावर अपमानाच्या डागण्यांप्रमाणे त्याला दुःख देत आहेत. बाण्डगुळ्या मध्यम वर्ग सुद्धा आता पोटाच्या बण्डापुढे नामोहरम होऊन, शेतीच्या मातीमध्ये घुसू पहात आहे. कसाहि आणि किती हि विचार केला तरी नांगरा शिवाय हिन्दुस्थानाला जगण्याचा दुसरा मार्ग नाही. अर्थात् नांगर हेच हिन्दी राष्ट्र ध्वजाचे चिन्ह ठरणे निसर्गप्रप्त आहे. नांगरापुढे चरख्याची काय मातब्बरी ! नांगराने मातीतून सोनेच काढले नाही, तर चरख्याना सांदीची वाट धरुन, हातोडा - कोयत्याला माय घरच्या आपल्या खाणीच्या मातीत मिसळण्या शिवाय गत्यंतरच उरणार नाही.

कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्याचा नांगरच जर थंड पडला, तर चरखा काय आपल्या कर्माचे सूत काढणार ? नांगर जेव्हा मातीतून सोने काढील, तेव्हा चरखा हातोड्या सारखे सुवर्णकार कसबी त्या सोन्याचे दाग दागिने घडवितील. एरवी काय? विशेष लक्ष्यात ठेवण्या सारखा मुद्दा म्हणजे, कोणत्याही राष्ट्रात पहा, नांगर पुरुषांचा आणि चरखा बायकांचा हात रिवाज सर्वत्र दिसून येतो. बायका नांगर धरीत नाहीत आ पुरुष चरखा फिरवीत नाहीत. नांगराचे काम मर्दाच्या मनगटाचे, आणि चरख्याचे नाजूक काम बायकांच्या हाताचे. सगळ्या हिन्दुस्थानच्या हातात बायकी चरखा देणे, गांधीसारख्या स्त्री-पुरुष भेदातीत महात्म्याला किती हि शोभले, तरी मर्दपणाची मिजास मारणाऱ्या चरखा प्रसारकांना मिशा मोठमोठ्या धराव्या कशाला?’ असा सडेतोड सवाल बासकांनी विचारला पाहिजे होता. त्याच प्रमाणे, हातोडा - कोयत्याच्या तांबड्या निशाणाखाली जगांतल्या मजुरांनो एक व्हा असा सवाल टाकणाऱ्या कम्युनिष्ठांची निष्ठा सुद्धा मजूराला मजूर म्हणूनच टिकवण्या पलिकडे जात नाही, हे लक्षात ठेवण्या सारखे आहे.

हिन्दुस्थानता पिढि जात शेतकरी यापुढे मजूरच राहणार काय ? नाही नाही, त्रिवार, शतवार नाही. त्यांच्या बापजाद्यांचा नांगर त्याना आरोळ्या मारुन सांगत आहे, हिन्दी मजुरानो शेतकरी बना. तुम्ही जर अभेद भावाने एक वटाल, देव धर्म जातपात असल्या क्षुद्र आणि हलकट कल्पनांच्या छाताडावर लाथ मारुन एकजिनसी संघटित व्हाल, आणि तुमच्या बापजाद्यांची मातीचे सोने करणाऱ्या शेतीच्या किमयेचे एकनिष्ठ किमयागार बनाल, तर मुत्सद्यांच्या घोरपणाला चुकवील, इतक्या थोड्या काळात नांगर चिन्हांकित राष्ट्रध्वजा खाली शेतकऱ्यांचे स्वराज्य स्थापन करुन, या अभागी भारत खंडाला पुन्हा सौभाग्य सुवर्णभूमी बनवाल, यात मुळीच शंका नाही. तथास्तु ।

•◆●■[ समाप्त ]■●◆•

लेखक - 
केशव सीताराम ठाकरे

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

══════════════════════

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा