शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

अंधश्रद्धा ( माझी कविता )

अंधश्रद्धा

अंगामध्ये टाय कोट हातमध्ये बंग
चौकात मोठ लिंबू पाहून फिरला माघच्या माघ
पर्सनल कामी जाता येता मांजर गेली आडवी
अपशकून मोठा झाला म्हणून माया आपली भडवी
शिक्षण मोठ भारी त्याची इंग्लिश हाय फाय
पण नवरात्रीची नउ दिवस खेटखचून पाय
कामामधून ब्रेक मिळाला संकट पडल भारी
घेऊन परडी हातावरी जोगवा मागतोय दारी  
महागाईत कर्जाचा गाडला भारी टप्पा
तरी घरात बसतो त्याचा नवसाचा बाप्पा
यतीना सांग तयाला जालीम एक उपाय
तथागताच्या धम्मा शिवाय नाही तरणोपाय

                                         -  यतिन जाधव.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा