मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता? | Religion of Ancient Indians


प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता? | Religion of Ancient Indians

आजचे बहुतेक बहुजन आपला धर्म हिंदू आहे असे समजतातपण खरे पहाता हिंदू नावाचाधर्मच अस्तित्वात नाहीशैवजैनबौद्धवैदिक यांना आपण धर्म म्हणू शकतोकारण या धर्मांची व्याख्या करता येतेपण या तथाकथित हिंदू धर्माची धर्म या अर्थाने आजपर्यंत कोणीच व्याख्या करू शकले नाहीज्या ग्रंथांना हिंदूचे धर्मग्रंथ मानले जातेत्यापैकी एकाही ग्रंथात हिंदू या धर्माचा उल्लेखही नाहीमग ते वेदउपनिषिदेरामायणमहाभारत,वेगवेगळी पुराणेकिंवा अगदी अलिकडची ज्ञानेश्वरी असो.

          अशोकाच्या शिलालेखात समण (श्रमणआणि बंभन (ब्राम्हणया त्या काळातील दोन मुख्य धर्मांचे  उल्लेख आहेतयातील समण म्हणजे जैन व बौद्ध हे होततर बंभन हे वैदिक ब्राम्हण होतबहुजन हे वैदिक ब्राम्हण या धर्माचे अनुयायी असण्याचा प्रश्नच येत नाहीमग त्याकाळी त्यांचा धर्म जैन किंवा बौद्धअथवा त्या प्रकारचा अवैदिक (आजीवक वगैरेअसणार. 
         आजही वैदिक ब्राम्हण बहुजनांना वैदिक समजत नाहीत. वैदिक ब्राम्हण जरी बहुजनांच्या घरी पूजा-पाठ व इतर धार्मिक विधी करायला जात असले, तरी हे सगळे विधी वैदिक पद्धतीने अजिबात होत नाहीत. बहुजनांसाठी ब्राम्हणांनी वेगळे पौराणिक विधी सुरु केले, पण आपल्या वैदिक पद्धतीचा वापर त्यांच्यासाठी कधीच केला नाही. हे पौराणिक विधी शुद्रांसाठीच असतात आणि वैदिक ब्राम्हण हे बहुजनांना शूद्रच मानतात. ही गोष्टही बहुजन हे प्राचीन काळी जैन अथवा बौद्ध होते हे सुचवते. कारण वेदविरोधी धर्माच्या अनुयायांना वैदिकांनी शूद्र ठरवून त्यांना कायमचे गुलाम केले हे भारताच्या धार्मिक इतिहासाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक संशोधकांनी दाखवून दिले आहे. 

          एकाद्या बहुजनाच्या घरी पूजा सांगत असताना पूजा करणार्‍या गृहस्थास ब्राम्हण त्याचे गोत्र विचारतो. त्या गृहस्थास त्याचे गोत्र माहित नसतेच. मग तो ब्राम्हण त्या गृहस्थास कश्यप हे गोत्र चिकटवून देतो. त्याप्रमाणे मंत्रात कश्यप गोत्राचा उल्लेख करतो.
         असे कातर महावीर आणि गौतम बुद्ध या दोघांचेही गोत्र कश्यप होतेम्हणजेब्राम्हणांना बहुजनांचे मूळ धर्म जैन-बौद्ध आहेत हे चांगलेच माहित आहे हे दिसतेपणबहुजनांना हे कधी कळणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा